बकुळी..❤️

A Poem On Beloved

कोरडीच ही काया
चिंब चिंब भिजूनही....
बकुळीच्या फुलांनी तू
भरतोय ओंजळ माझी अजूनही....
वाट पहातेय मी तुझी निरंतर,
तु येशील पुन्हा फिरुनी
त्याच सुखद किनाऱ्यावर
सोबती घेऊनी
बकुळीच्या फुलांनाही...!!
तु येशील ना...?
सोबत बकुळीची फुलं
आणशील ना...?

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे