Login

बाजरीची भाकरी

बाजरीची भाकरी ची आवड
बाजरीची भाकरी

प्रिया, "आज छान भाकऱ्या बनव. पण बाजरीची हा." तूषारच्या ह्या बोलण्याने प्रिया वैतागत च आतून बोलली.
अहो, काय वेड बीड लागलय का तुम्हाला? म्हणे बाजरीची भाकरी बनव. पीठ आहे का बाजरीचे घरात?
मी , मटारची उसळ, आणि वरण भात, पोळ्या बनवत आहे. ह्या मध्ये काही बदल होणार नाही.
बरं बरं, म्हणत तुषार गप्प पेपरात डोकं घालून राहिला.
जेवण तयार होताच, प्रिया ने गरम गरम जेवण वाढून तुषार ला जेवायला बोलवलं. छोट्या सोनू सोबत जेवायला बसले. तुषार आज अगदी गप्प जेवत होता. त्याला तसे बघून प्रियाला जरा विचित्र वाटल. एरव्ही सोनू ने एक जरी प्रश्न केला तरी तो तिच्या मनाचे समाधान होई पर्यंत उत्तर द्यायचा. पण आज जरा शांतच होता. जेवण झाली, तसे प्रिया ने सर्व आवरून घेतल. तुषार सोनूला घेवून झोपी गेला.
प्रिया तुषार बसलेला त्या खुर्चिकडे स्वतःचा मोर्चा वळवते. तिथे कालनिर्णय दिनदर्शिका, एक जुना फोटोंचा संच होता. काय चालल आहे ह्याच्या मनात. आज विचारावे लागणारच, असे म्हणत प्रिया पण वामकुक्षी घ्यायला निघून जाते.
संध्याकाळी जाग येताच, आल्याच्या चहाचा दरवळ पूर्ण घरभर पसरलेला बघून, प्रिया चकित होते. चहा! हा कोणी केला?
पियू, झाली का झोप? चल ये मस्त चहा घे. उठ उठ लवकर, मग सोनू ला घेवून फिरून येवू. अस म्हणत तुषार चहा चे कप टेबलवर ठेवतो.
प्रिया चकितच होते. आली मी तोंड धुवून म्हणत आत जाते. दोघेही मस्त चहा घेतात.
तुषार! तू आणि चहा बनवला? तुला येतो बनवता?
अग," मला कुठे येतो? मी यू ट्यूब बघून बनवला".
म्हणजे मी आज बाजरीची भाकरी नाही बनवून दिली म्हणून हे सर्व का? प्रियाच्या बोलण्यावर तुषार हसू लागला.
नाही ग बाई, तू ते सर्व विसर, आता रात्री काही स्वयंपाक बनवू नको, चल आज तुला एक स्वादिष्ट जेवण जेवायला नेतो.
कुठे? प्रियाच्या बोलण्यावर, तुषार तू चल तयार हो, आणि सानुला पण तयार कर. मी हे उचलतो.
प्रिया आणि सानू ची तयारी होताच तुषार सुद्धा तयारी करतो. चल चल गाडीत बस म्हणत गाडी सुसाट निघते.
प्रियाच्या चेहऱ्यावरील प्रश्न चिन्ह पाहून तुषार,मस्त गाणी लावतो.
प्रिया काहीतरी विचारणार,पण असा हसरा तुषार तिला नेहमीच आवडतो, त्याच्या आनंदात ती पण खुश व्हायची.
म्हणून काहीच बोलली नाही.
एका जुन्या घरा समोर गाडी थांबते. तुषारच्या मागून प्रिया  सानुला घेवून गप्प त्या घराच्या दिशेने जाते.
तुषार कोण राहत इथे? कोणाचे घर आहे? काय चाललय तुझ? असे कितीतरी प्रश्न विचारते ती त्याला.
पण तो फक्त सांगतो तू चल माझ्यावर विश्वास ठेव, घाबरु नको.
दाराची बेल वाजताच एक बाई, जवळपास साठी ओलांडलेली, ओवळणीचे ताट घेवून दारात येते. तुषार, प्रिया, सानु ला ओवाळून त्यांना आत घेते. त्या बाईकडे बघून प्रिया नकळतपणे लहानसे हास्य करते.
घर मोठं नव्हत, पण कमालीचं स्वच्छ आणि टापटीप होत.
वस्तू जास्त नाहीत,पण गरजेच्या अश्या होत्या. आतून एक वयस्कर माणूस बाहेर येत, तूषरच्या गळ्यात मिठी मारतो.
हे काय चालल आहे? प्रिया गोंधळून जाते. तेव्हड्यात ती बाई प्रियाला हळद कुंकू लावून तिची ओटी भरते.
सारे कसे शांतपणे चालू होते. पण प्रिया मात्र आतून अशांत होत राहते. तिची ती अवस्था पाहून तुषार सर्वांना बसवून बोलू लागतो.
प्रिया, हे माझे आई वडील.
काय? पण तुषार तू तर अनाथ! मग?
थांब मी तुला आज सर्व सांगतो. तुला आठवत असेल लग्ना आधी मी तुला बोललो होतो, माझ्या काही पर्सनल गोष्टी आहेत,त्या तुला वेळ आल्यावर सांगेन. तू पण तेव्हा हो हो करून मान्य केलेलं.
आता तीच वेळ आली आहे. ही माझी आई, सौ. शालिनी सतीश माने, आणि हे वडील सतीश माने. मी ह्यांचा एकुलता एक मुलगा. पण मी लहान असताना बाबा मला घेवून बागेत बसले होते, तेव्हा मला काही अज्ञात व्यक्तींनी पळवल. त्या धक्क्यामुळे बाबांची वाचा गेलेली. आईला च काय तर इतर कोणालाच ते काही सांगू शकत नव्हते. आई बाबांना मी बऱ्याच वर्षांनी झालेलं अपत्य. पण असे घडल्याने आई सुधा हतबल झालेली. नातेवाईक, मित्र साऱ्यांनी आईला समजावले,तसे मग बाबांच्या वाचेवर उपचार चालू झाले,पण उपाय शून्य. माझा शोध बरेच दिवस चालूच पण काही उपयोग नाही. जवळपास सहा महिने झाले. वाचा गेल्यामुळे बाबांची नोकरी पण गेली. कारण ते आकाशवाणी केंद्रात कार्यरत होते. मग आईने नवस केला, की जोपर्यंत बाबांची वाचा येत नाही तोपर्यंत ती सुद्धा बोलणार नाही. मला ज्यांनी पळवले होते,त्या व्यक्तीने म्हणजेच बाबांच्या च मित्राने मला परत घरी आणून आईकडे सुपूर्त केले. केवळ बाबांवर असलेल्या रागापोटी बाबांना अद्दल घडवण्यासाठी त्यांनी हे सारे केलेले. पण त्यांच्या पत्नी आणि मुलीला एका अपघातात मरण आले, त्यामुळे त्यांनी आईकडे मला आणले आणि स्वतः पोलिसांना शरण गेले. आता आईने मुक राहण्याचा नवस केलेला, कारण तो पत्नी धर्म होता. मला बघून बाबा फक्त रडत होते. त्यांच्या मित्रमुळे माझे हाल झाले अस त्यांना अपराधी वाटायचे. म्हणून मग आईने मला आश्रमात ठेवले. मला बाजरीची भाकरी आणि भाजी खूप आवडायची, म्हणून रोज ती मला डबा पाठवायची, येवून भेटायची पण. एकीकडे मुलगा आणि एकीकडे पती. हळूहळू मी मोठा होत गेलो,माझे शिक्षण संपवून मी नोकरी करू लागलो,स्वतःच घर घेतल. आईला बोललो की आता तरी चला माझ्यासोबत तर ती बोलली माझ्या पती साठी मी सर्व सुख त्यागते. तेव्हा माझे आणि तिचे भांडण पण झाले. तेव्हा आई बोलली तू जेव्हा बाजरीच्या भाकरीची आवड कमी करशील तेव्हा आपण एकत्र राहू. कारण आईच ती, तिला माहित होत, मला बाजरीची भाकरी किती आवडते ते. मी निमुटपणे निघून आलो. आई वडील असून पण नियतीने मला अनाथ केलेलं.
आपल लग्न झालं, सानू झाली. पण आई काही हट्ट सोडत नव्हती. मग मीच रागाने सांगितलं पुढच्या दोन महिन्यात मी बाजरीची भाकरीची आवड सोडून देईन. प्रिया तू डब्यात पोळी द्यायची पण मी बाहेरून चोरून एक तरी बाजरीची भाकरी खायचो. खूप आवडायची. आज दोन महिने पूर्ण होतील. म्हणून मी इकडे तुम्हाला घेवून आलो.
आई,बाबा म्हणत प्रिया त्यांच्या पाया पडली. सानू हे तुझे आजी आजोबा. असे प्रियाने सांगताच, सानू आजोबांना जावून बिलगली. आजोबा आजोबा...गोष्टी सांगणारे आजोबा. सर्वांचे डोळे भरून आले. तूषारचे वडील काहीतरी बोलू पाहत होते. त्याची आई त्यांना,तुम्ही शांत व्हा,मी जेवण वाढते, अस सांगत असताना ते जोरात ओरडुन बोलले.... सा..सानू.
अरे तुषार हे बोलायला लागले. अहो बोला... बोला.
बाबा बोला...तुषार आणि प्रिया पण त्यांना सांगू लागले.
सानू ये इकडे, खावू देणार मी. अस म्हणतच, एवढ्या वर्षांचा आईचा नवस सानुच्या रुपात येवून देवीने पूर्ण केला.
साऱ्यांनी देवाचे आभार मानले. गोडधोड जेवून तूषारने बाजरीच्या भाकरीवर ताव मारला.
आई,आज शेवट भाकरीचा,पण आता तुम्ही आमच्या सोबत चला.
का शेवट? तू आता रोज भाकरी खायची. मी देईन बनवून आणि माझ्या सुनेला पण शिकवेन.
आई खरच, म्हणत प्रिया सासूला बिलगली. तूषारची बाजरीच्या भाकरीची आवड आज सोनू मुळे कायम राहिली.