बाई मी सासुरवाशीण ग

Marriage is the most beautiful thing in our life but sometimes it's very irritated....

बाई मी सासुरवाशीण ग.

निधी दिसायला देखणी,सुशील मुलगी...आज तिला बघायला पाहुणे येणार म्हणून थोडी उदास होती,का तर म्हणे तिला सध्या लग्न करायचे नाही,कारण असे की तिचा लग्न या गोष्टी वर विश्वास च नव्हता,,हो कारण तिची जीवभावची मैत्रीण सारिका तिचे लग्न होऊन दोन वर्षे पूर्ण झाली होती पण तिचा म्हणजेच सारिका चा अनुभव काही लग्ना विषयी चांगला नव्हता....

सारिका आणि निधी दोघी जीवाभावाच्या बलमैत्रीनी,दोघींनाही एकमेकींनना सोडून अजिबात करमत नसे, परंतु सारिका चे लग्न तिच्या आईवडिलांनी समोरून चांगले स्थळ आले म्हणून कसलीही अपेक्षा न ठेवता लगेच उरकून टाकले,घरची मंडळी ही सुशिक्षित होतीच,शिवाय मुलगा हा सरकारी नोकरी करत होता....

खर तर सारिका ला शिकून वकील व्हायचे होते,पण तिचे स्वप्न मध्येच राहून आता शिक्षण देखील बंद होईल की काय या भीतीने ती जीव कोंडीस आणून विचार करत होती,शिक्षणाची तिला फार आवड,पण म्हणतात ना लग्ना नंतर शिक्षण चालू राहील की नाही हे काही सांगता येत नाही...

आणि असेच काहीसे सारिका बाबत घडले येवढी हुशार मुलगी लग्न करून पक्की सासुरवाशीण झाली होती,म्हणजेच जसे सासर कडचे म्हणतील तसेच वागायचे,,असे तिचे झाले होते...

सारिका चे सासर थोडे विचित्र होते,म्हणजे कोणाच्या समोर चांगले वागायचे आणि गेल्यानंतर मात्र सारिका चा छड करायचा,,,आता सारिका ही सुशिक्षित पण तरी देखील तिचा छाड व्हायचा,,ही गोष्ट फक्त निधीला माहीत होती,कारण निधी अधून मधून सारिका ला भेटायला जायची....

निधी समोर असली की सारिका ची सासू गोड गोड बोलायची,जसे की सारिका बेटा,जेवून घे ना,राहू दे ग बाळा तू नको करू काम मी करते की....किती बाई कामाची पोर,,,नाही म्हतल तरी काम करतेय...खूप च गुणाची माझी सारू....अशा प्रकारे कोणीही बाहेरचे आले की गोड बोलायची अन् निघून गेले की सारिका ला मग....अग ये बाई सर्व कामे कसे पटापट करायचे,,मी तुझ्या येवढि होती तर कशी भराभर कामे करायची....आणि तू किती ढिल्ली आहेस ग,,नुस्त चार पुस्तके शिकून नाही चालत संसार....संसार हा फक्त सासू ला आराम दिल्या ने चालतो बर का....अग म्हणजेच मोठ्याची सेवा करणे हे घरच्या सूने चे प्रथम कर्तव्य...

जणू सारिका ची सासू आधी नाटक कंपनी मध्ये कामाला होती की काय असा प्रश्न निधी ला नेहमीच पडायचा,,पण काय उपोयोग सारिका तर काहीच तिच्या सासू विषयी कुणाला सांगायची नाही...आणि तिला जरा काही म्हटले की लगेच ती निधिला म्हणायची...बाई 'मी सासुरवाशीण झाली ग आता',याला काहीच तोडगा नाही....शेवटी काय "नशिबी आले पद्री पडले,अन् पवित्र झाले"..अशी गत आहे माझी...असे म्हणत नेहमी गप्प राहायची.....

पण या सर्व प्रकरणाचा निधी खूप विचार करायची,अन् केवळ सारिका च नव्हे तर कितीतरी मुली असा सासरचा त्रास निमूटपणे सहन करतात अन् त्यांना नाही सहन झाले की मग काही तरी विचित्र करून बसतात....आता निधिसमोर प्रश्न होता तो सारिका च्या पतीचा की असा कोणता नवरा असतो की त्याला बायको ची काहीच काळजी वाटत नसावी....खर तर सरिकाचा नवरा हा आर्मी मध्ये असल्यामुळे फार कमी घरी राहायचा....म्हणजेच एखादा महिना घरी आणि उर्वरित दिवस कामावर...मग काय सारिका सासू सासर्या ची काळजी घ्यायला घरीच राहायची म्हणजे तो च तिला कामावर नायचा नाही....

तर सारिका इकडे सासू सासर्यांची सेवा करायची अन् नवरा तिकडे कामावर असायचा...निधी ला काही हे पटत नव्हते,जर पती हा आपल्या पत्नीला मदत करू शकत नाही,फक्त नोकरी च करू शकतो अन् ते ही फक्त आई वडिलांच्या सेवेसाठी लग्न करतो,तर हे लग्न काय कामाचे...काही पतीचे कर्तव्य असते की नाही...की बस दुसऱ्या घरच्या मुली लग्न करून आणल्या की मोलकरीण सारखे फक्त तिच्या कडून काम करून घ्यायचे,,तिला ही पतीची गरज भासते,कारण ती पण आपल्या आई वडिलांना सोडून कायमची पतीच्या घरी राहते....पण काही काही पतींना बायको ची अजिबात च गरज नसते...काय तर फक्त त्यांच्या आई आईवडिलांचे महत्व....

अगदी असहनिय हे सर्व नीधीला वाटायचे,अन् यात दोष ती सारिका च्या आई वडिलांना पण देत असे...कारण फक्त एक नोकरी पाहून मुलींचा विवाह करणे ही च काळाची गरज आहे का??की आपली मुलगी सुखात आहे किवा नाही हे ही तितकेच महत्वाचे आहे जितके की नोकरी चे स्थळ मिळणे....

या सर्व घटने मध्ये सारिका केवळ माझ्या नशिबी असच असेल या विचाराने जगत होती तर निधी मात्र नशीब हे आपल्याच हातात असते अन् आपण ते कसे जगू याचा विचार करून त्यामागील हेतू साध्य करण्यासाठी नेहमी तत्पर राहायची......

आणि नेहमी निधी सारिका ला सांगायची की सासुरवाशीण तर प्रत्येक च मुलीला व्हावे लागते,पण सासुरवाशीण होणे म्हणजेच खरे चांगली सून होणे असे नव्हे....तर आपल्या घरातील लोकांचे खालावले ले विचार सुधारून, प्रत्येक गोष्टीचा गोडवा कायम ठेवून भावी पिढी ही सुसंस्कृत कशी होईल याचा विचार करून जीवन जगणे म्हणजेच खरे आयुष्य जगणे होय......

सारिका ने निधीच्या विचारांना एक स्मित हास्य देऊन तिला घट्ट मिठी मारली,अन् म्हणाली...अग निधी,प्रत्येक च मुलींचे आयुष्य सारखे नसते ग बाई..सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी विशेष असतेच...आणि म्हणूनच सांगते,,तू लग्नाला होकार दे...अग प्रत्येक च मुलगी ही सासुरवाशीण नसते...काही काही मुलींना तर सासर खूप आवडीचे असते म्हणजेच सासरची माणसे खूप छान असतात,तर त्या मुलींना तर माहेरची सुध्धा आठवण येत नाही.....कदाचित तुझ्याही बाबतीत असेच काहीसे असेल....

आणि दोघीही आनंदी झाल्या अन् लगेच हसायला लागल्या....


लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा....


Ashwini Galwe Pund......