बहारो फुल बरसाओ भाग १

बहारो फुल बरसाओ


बहारो फुल बरसाओ - भाग १

सुचिता तिचा भाऊ अमोल तिचे आईबाबा शहरात नोकरी निमित्ताने राहत होते .
गावाला मामाचा खूप मोठा वाडा ,शेती होती . मामाच गाव आणि आजीच ( वडीलांची आई ) एक तासाच अंतर होत . कामानिमित्ताने , सणासुदीला, लग्नाला नेहमीच जाणयेण होत .

लहान असताना सुचिताला लग्न म्हणजे खूप गर्दी आणि आईची टोचणारी साडी एवढ आठवत होत .
( मामाच लग्न होत आणि सगळ्यासाठी मामी ,मावशी टिकल्यांच्या साड्या घेतल्या होत्या . )

थोडी मोठी झाल्यावर एकदा सुचिता तिच्या चुलत मामाच्या लग्नाला गेली होती . हळदीच्या वेळेला गेल्यावर तिन बघितलं आजी आजोबा कामात जरी असले तरी लग्नाच्या निमित्ताने येणाऱ्या लेकींची वाट बघत होते . सुचिताची आजी कामात होती पण मुली दिसल्यावर तिच्या आजूबाजूला तिची थोडी मोठी झालेली मुल डोळेभरुन बघत होती . मुलगी आणि आईच हे नजरेने बघून बोलण ती बघत होती .

थोड्या वेळाने सर्व छोटी मोठी मुल खेळत होती . अधूनमधून मामा ,मावशी , आजी मुलांना खाऊ देऊन जात होते . आईकडून खाऊ नाही मिळाली तरी कोणत्याही मामा , मावशी ,आजी आजोबा कुणाकडूनतरी मिळून जात होता.

लग्नाच्या निमित्ताने सर्व एकमेकांना खूप दिवसांनी भेटत होते .कुणी बोलून तर कुणी बघून .

जेवण चालू असताना नणद भावजाय यांच्या गमतीजमती चालू होत्या . एकमेकींच्या पाठीवर पापड फोडणे चालू होते .
सुचिता : आई मी कोणाच्या पाठीवर पापड फोडू ?
आई : मामीच्या
आईने सुचिताला सर्व मामी दाखवल्या .
सुचिताने दोन पापड फोडले .
सुचिता : आई मला अजून पापड पाहिजे .
आई : बघ कुणाकडे आहे का ? नाहितर आजीला सांग आजी देइल .
(नातीने पापड मागितल्यावर आजी पापड शोधून
देते .)

सुचिता आता प्रत्येक मामींच्या पाठीवर पापड फोडत होती .सोबत सगळ्यांच्या गमती बघत होती .

जेवण झाल्यावर संध्याकाळी लग्नाला दुसऱ्या गावाला जायच होत .
दुसऱ्या गावाला छान नटूनथटून जायला सुचिताला मजा वाटत होती .

लग्न लागल , लग्नाचे विधी सुरू होते . एकीकडे सुचिताने बघीतल काही आजी बसलेल्या त्यांच्या समोर छान वेगवेगळे लाडू आहेत आणि गमतीजमती सुरु होत्या . सुचिता आणि छोट्या फलटणला आता लाडूची भूक लागली होती .
आता आईच्या आधी आजीजवळ पटकन लाडूसाठी नंबर लावला .
मग काय … आजी आजी केल
आजीने तीन चार वेगवेगळ्या प्रकारचे लाडू सुचिताला दिले .
दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पुजेला मामीचे माहेरचे आले होते . पुजा झाल्यानंतर मामीची आई निघत असताना मामीच्या डोळ्यात पाणी बघून
सुचिता : आई मामी का रडते ? तिला भूक लागली का ?
यावर सगळ्यांना हसायला येत .
आई : मामी आता मामाजवळ राहील . त्यांची आई घरी चालली आहे .
सुचिता : का आई बरोबर नाही राहणार ?
आई : नाही
सुचिता : मामीला जाऊदे ना आई सोबत
आई : मग तुला लाड करायला मामी ?
तेवढ्यात सुचिताला तिचा दादा खेळायला बोलवतो , सुचिता खेळायला लागते आणि प्रश्न संपतात .

आता सुचिताला लग्न म्हणजे खुपसारी मजा एवढ समजत होत .

एकदा दिवाळीला सर्व मामा मावशी जमलेले होते . भाऊबीजची ओवाळणी झाली होती .

सुचिता छोट्या मोठ्या सोबत खेळत होती . खेळ चालू होता . एक मामा चाँकलेट घेऊन आले होते .
सुचिताची ताई : चाँकलेटवाला मामा माझा …
सुचिता : नाही माझा
सुचिताचा दादा : नाही माझा…

काय करणार छोटी फलटण ? मामाकडच्या चाँकलेट वाटणार की ? मामांची वाटणी करणार ?

Veena




🎭 Series Post

View all