बघू पुढे काय होईल ते...भाग७

Ek Prem Katha

बघू पुढे काय होईल ते…भाग७
मागील भागावरून पुढे…

आज सकाळी ऋषी ब्रेक फास्टसाठी हॉल मध्ये येऊन डायनिंग टेबलपाशी बसला पण आपल्याच विचारात होता. पोहे खात खात पेपर वाचणा-या त्याच्या वडलांना आश्र्चर्य वाटलं. त्यांनी ऋषीला विचारलं


"अरे ऋषी… गुड मॉर्निंग. काय रे कसल्या विचारात आहेस?"

ऋषींनी हसून नाही म्हणून मन डोलावली. पण त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चालू आहे हे त्याच्या वडिलांच्या लक्षात आलं त्यांनी पुन्हा एकदा ऋषीला विचारलं


" ऋषी….काय रे काही गडबड आहे?"

"नाही बाबा काहीच नाही झालं."

"मग असा तू कोणत्या विचारत आहेस? त्यामुळे ब्रेक फास्ट करतांना गप्प आहेस?"

तर ऋषी म्हणाला


" बाबा मला असं वाटते की मी आता आपला व्यवसाय जॉईन करावा."

यावर ऋषी च्या वडलांच्या चामच्यातील पोह्यांचा घास तसच राहिला आणि वडील आनंदाने म्हणाले

"अरे वा…! ही तर खूप छान आनंदाची बातमी आहे."

त्यांनी लगेच ओरडून ऋषीच्या आईला आवाज दिला

"इरावती इकडे ये"..

इरावती स्वयंपाक घरातून जरा धावल्या सारखीच बाहेर आली.

"अहो काय झालं केवढ्या जोरात ओरडताय?"

"अगं ऋषी काय म्हणतोय ऐकलस का? अगं ऋषी आपली कंपनी जॉईन करीन म्हणतोय."

" अरे वा ही तर खूप छान बातमी आहे."

असं म्हणत इरावती टेबलासमोरची खुर्चीवरून ओढून त्याच्यावर बसली आणि तिने ऋषीला विचारलं की

"ऋषी असा एकदम बदल कसा काय झाला तुझ्या निर्णयात?"

ऋषी म्हणाला…

"मी विचार करत होतो नोकरी करावी की आपला बिजनेस सांभाळावा? बाबांची इच्छा आहेच मी घरच्या व्यवसायात यावं. नोकरीत दुसऱ्याची मर्जी सांभाळण्यापेक्षा आपली कंपनी सांभाळावी असेही माझ्या मनात आलं."

तेव्हा त्याचे वडील म्हणाले

"ऋषी खूप छान विचार केलास. आता लवकरात लवकर तू आपली कंपनी जॉईन कर आणि तुझ्या कंपनीला कळवून दे की तू ही नोकरी करू शकत नाही म्हणून."

"हो बाबा कळवतो. पण लवकर कशाला…बाबा मी आजपासूनच तुमच्या बरोबर यायचा विचार करतो आहे."

"चला मग ब्रेकफास्ट आटपला की आपण निघूया."

इरावती याच्यावर म्हणाली

"अरे ऋषी पण तू नेमकं हा बदल का केला नाही सांगितलं?"

" अग आई सगळ्याच गोष्टी कशा सांगू तुला?"

"तेच म्हणतोय मी म्हणजे याच्यामागे नेमकं काहीतरी कारण आहे. ऋषी सांग बर काय कारण असावं?\" ऋषीचे बाबा काहीतरी आपल्याला सापडलं या आनंदात बोलले.

"असं काही नाही आहे." ऋषीने टोलवाटोलवी केली. पण ऋषीच्या बाबांना काही पटलं नाही.

"काहीतरी कारण नक्की आहे. कोणी तुला म्हटलं का आपल्या घरच्या व्यवसाया मध्ये तू काम कर म्हणून. असं कोणाच ऐकू नकोस. तुला जे वाटतंय ते तू कर."

"नाही बाबा मला कोणीतरी म्हटलं हे खरं आहे पण मी त्यावर विचार केला आणि शेवटी मलाही ते पटलं. ते दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपल्याच कंपनीत काम केलेलं किती चांगलं आहे."


"ऋषी खरं सांग कोणी तुला सांगितलं आहे?" ऋषीच्या बाबांनी विचारलं.


ऋषी खूप धैर्य गोळा करून म्हणाला…


"बाबा माझी एक मैत्रीण आहे अरुणा नावाची. ती आणि मी नाटकाच्या प्रॅक्टिस मध्ये भेटलो. तिथे आमची ओळख झाली.ती मला खूप आवडते. आम्ही एकमेकांना चार वर्षां पासून ओळखतो आहे."

"इतके छान विचार आहेत त्या मुलीचे. अरे मग भेटव की तिला कधी."

"बाबा आधी ऐका तर पूर्ण. अरुणा मला कधी असा भाव देत नव्हती. शेवटी मी तिला सरळ सरळ विचारलं तेव्हा लक्षात आलं की तिची आर्थिक स्थिती आपल्यापेक्षा खूप बेताची आहे त्यामुळे ती मला स्पष्ट म्हणाली की तुमच्या आर्थिक स्थिती एवढी आमची नाही त्यामुळे मी काही तुझ्याशी लग्न करू शकणार नाही. मग मी तिला सांगितलं प्रेम करताना मी तुझी आर्थिक परीस्थिती बघीतली नाही. मग तिने मला विचारलं. सध्या तुझी आयडेंटिटी काय आहे? जे काही तुझ्याजवळ आहे ते तुझ्या बाबांनी कमावलेलं आहे. जेव्हा तू तुझ्या नावावर हे सगळं मला दाखवशील तेव्हा मला पटेल ना की तुझी ओळख काय आहे? बाबा मला तिचं हे वाक्य मला खूप पटलं आणि शेवटी म्हणून मी ठरवलं की दुस-या कंपनीत नोकरी न करता आपल्याच व्यवसायात लक्ष घालावं."


"अरे वा हुशार दिसते ही मुलगी.". बाबा म्हणाले.

" हो बाबा अरुणा खूप हुशार आहे. मी ठरवलंय लग्न करीन तर तिच्याशीच. वर्षभर तिने मला दिलाय स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी. ती मला म्हणाली तू ज्या कंपनीत नोकरी करणार आहेस तिथे तू पुढे जा किंवा तुझ्या व्यवसायात तुझं नाव कमव. पण तू स्वतःची ओळख निर्माण कर बाबा ते चॅलेंज मी स्वीकारलाय. माझं ध्येय मला साध्य करता यावं म्हणून तिने मला एक अट घातली आहे." ऋषी म्हणाला.

"अरे बापरे आता कुठली अट घातली रे ?"

इरावतीने मध्येच विचारलं

"आई ती म्हणाली की आपण वर्षभर भेटू नये, एकमेकांना मेसेज करू नये, फोन करू नये."

"तू फोन केला तर काय बिघडतं?"

इरावातीने पुन्हा प्रश्न केला. तेव्हा ऋषी तिला म्हणाला

"आई तिचा मुद्दा बरोबर आहे. ती म्हणाली तुला तुझी ओळख निर्माण करायची असेल तर तुझा पूर्ण फोकस तुझ्या कामावर हवा. जर आपण भेटत राहिलो, बोलत राहिलो तर तुझा फोकस ढळेल. तसा ढळायला नको. त्यापेक्षा तू पूर्ण लक्ष तुझ्या कामाकडे दे. तेव्हा तुला तुझी आयडेंटिटी निर्माण करून पुढे जाता येईल. एक वर्षांनी जेव्हा तू खूप छान ओळख निर्माण करून समोर येशील तेव्हा मला तुझा अभिमान वाटेल."


"अरे वा फार दूरदृष्टीची मुलगी आहे." ऋषीचा बाबा लगेच म्हणाले. इरावती म्हणाली

"अरे हो सगळं ते ठीक आहे पण एकदम तुला जमणार आहे…! तिला न भेटणं?"

मग ऋषी म्हणाला…

"आई ती जेव्हा मला म्हणाली तेव्हा मी सुद्धा तिला असाच प्रश्न केला होता, तर ती म्हणाली की हे बघ ही कठीण अट आहे तिकडे लक्ष नको देऊ. सगळं लक्ष तुझ्या ध्येयाकडे दे. त्यावर फोकस कर. तू जर तुझ्या गोल वर फोकस केलं तर ही अट तुला इतकी कठीण जाणार नाही आणि आई हे मला पटलं. त्यामुळे आता मी ठरवले की पुढच्या वर्षी पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्यांशीला आम्ही दोघं भेटणार आहोत तोपर्यंत या एक वर्षात मी खूप मेहनत करून माझं नाव कमविन माझी ओळख बनवीन."


ऋषी च बोलणं ऐकून आई बाबा स्तब्ध झाले. ऋषी पुन्हा म्हणाला.

"आई या वर्षभरात माझ्याजवळ कधी अरुणाचा विषय पण काढू नकोस. कारण तू विषय काढल्याबरोबर माझं मन विचलित होऊ शकत. आता मला आजपासूनच पूर्णपणे फोकस माझ्या गोल वर करायचे आहे. जेणेकरून मी एक माझी ओळख निर्माण करून अरुणा समोर अभिमानाने उभा राहू शकेन आणि तिलाही माझ्याकडे बघितल्यावर अभिमान वाटू शकेल ."


"हो बाळा खरं बोलतोयस तू . मी आणि तुझे बाबा आम्ही दोघेही ही गोष्ट लक्षात ठेवू. तू पुढे जा. तुझ्या पाठीमागे आम्ही दोघेही आहोत. तुला जेव्हा जशी गरज लागेल तसे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत."
इरावती ऋषीला म्हणाली.


"ऋषी…आपल्या कंपनीत पहिले आठ दिवस तर तुला सगळ्यांची ओळख करून घेण्यातच जातील. मी आपल्या कंपनीतल्या सामंत यांना सांगतो ते तुला सगळया कामाची ओळख करून देतील. त्यानंतर तुझी केबिन तुला देण्यात येईल. तुझ्यासाठी एक वेगळी केबिन आता मी तयार करायला सांगतो. तोपर्यंत तू सगळं काम शिकून घे. प्रत्येक डिपार्टमेंटला काय काय आहे ते बघून घे."


" हो बाबा मी नक्की सगळं करीन आणि मी पहिल्यापासून सुरुवात करणार आहे मला मी साहेबांचा मुलगा आहे असं म्हणून मी वागायाचं नाही."

"बरोबर आहे ऋषी तू म्हणतोस ते. जेव्हा तू असं करशील तेव्हाच तुला सगळ्या गोष्टी कळतील. त्यामुळे तू मेहनत कर. आम्ही दोघेही म्हणजे मी आणि तुझी आई दोघेही तुझ्या पाठीशी आहोत हे लक्षात ठेव."


"ऋषी आज कंपनीत जाशील ना तेव्हा देवापुढे उभा रहा आणि देवाला प्रार्थना कर की मी आज हे खूप मोठ्ठ आव्हान स्वीकारलेला आहे. त्यासाठी माझ्या पाठीशी राहा मला स्फूर्ती दे.माझ्या हिम्मत दे." इरावाती म्हणाली.


"होय आई…देवाला असं म्हटल्याशिवाय मी बाहेर पडणार नाहीये कारण मला कसेही करून अरुणा समोर स्वतःची ओळख असलेलं व्यक्तिमत्व उभं करायचंय. मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आई तुम्हाला खूप श्रीमंत घरातलीच मुलगी सून म्हणून हवी आहे का?"

"का रे असं का विचारतेस?" Iravteene विचारलं.

"यासाठी विचारलं की अरुणा माझी स्फूर्ती देवता आहे. अरुणाचे सगळे विचार मला पटतात. अरुणा मला खूप आवडते पण अरुणा खूप मध्यमवर्गीय घरातील आहे आणि आपण श्रीमंत आहोत. आपल्या घरी जितकं काही आहे यातील अर्ध सुद्धा त्यांच्या घरी नाही. त्याच्यामुळे तुम्हाला अशी सून चालणार आहे का? ते हुंडा देऊ शकणार नाहीत. ते खूप सोनं नाणं देऊ शकणार नाहीत." ऋषीने स्पष्टीकरण दिलं.

" हे बघ ऋषी ही सगळी गोष्ट पुढची आहे. आत्ता तिने तुला जी अट घातली आहे की स्वत:ची एक उत्तम ओळख निर्माण कर आणि तिच्यासमोर उभा रहा. ती आधी पूर्ण कर." ऋषीची आई म्हणाली.

ऋषीचे बाबा हळूहळू त्याला समजावंत म्हणाले.


"हे सगळं आधी तू कर आणि त्यानंतर पुढचा विषय तो लग्नाचा. जी मुलगी एवढ्या श्रीमंत घरातला मुलगा तिच्या मागे आहे हे कळूनही त्याच्या गळी पडत नाही आणि त्याच्याशी लग्न करण्याच्या ऐवजी आधी त्याला स्वतःची ओळख निर्माण कर म्हणते याचा अर्थ मुलगी खूप समंजस आणि विचारी आहे. अरे आपल्याजवळ एवढा पैसा आहे. त्यासाठी मी एवढे कष्ट केलेत पण तिला माझ्या कष्टाची ओळख आहे फक्त पैशाची ओळख नाही म्हणजे ती केवढी विचारी मुलगी आहे."

हे ऐकून ऋषींनी मान डोलवली. दोघांचा ब्रेकफास्ट आटोपला आणि ऋषीचं वडील म्हणाले

"ऋषी चल आता पटकन तयार हो.आपण निघूया."

"हो बाबा" म्हणून ऋषी आवरायला गेला. तेव्हा ऋषीची आई इरावती वडिलांना म्हणाली

"का हो …ते आपल्या पेक्षा खूप सामान्य घरातले आहेत. आपल्या मुलासाठी तुम्हाला अशी मुलगी चालणार आहे का?"


ऋषीचे वडील म्हणाले

"अगं त्या मुलीचे विचार ऐकूनच मला कळलं किती ती खूप हुशार मुलगी आहे आणि मुलीला दूरदृष्टी आहे.तिला पैशाचा हव्यास नाही. उलट तिच्याशी ऋषीचं लग्न लावलं तर आपल्या घरात वेगळे चैतन्य येईल. ऋषीचा जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलेल. त्याला कष्टाचं महत्त्व कळेल. आताच बघ ऋषी किती जबाबदार झाल्यासारखा वागतोय. पुढे मागे अरुणा ऋषीला आपल्या व्यवसाय पण मदत करेल. इतकी हुशार मुलगी आपल्या व्यवसायात आली तर आपला व्यवसाय वाढेलच आणि ऋषीच आयुष्य सुखाचं होईल."

हे ऐकल्यावर इरावती जरा शांत झाली तेवढ्या ऋषी आला. त्याला इरावतीने आठवण करून दिली

"ऋषी देवाला नमस्कार केलास का?"

"होय आत्ताच देवासमोर डोकं ठेऊन आलो."

एवढं बोलून ऋषी आई वडील दोघांच्याही पाया पडला. दोघांनीही त्याला आशिर्वाद दिला. मग ऋषी बाबांबरोबर कंपनीत गेला. इरावतीच्या चेहेऱ्यावर हसू आलं.
___________________________
क्रमशः ऋषीचे कष्ट आता सुरू झाले.त्यात त्याला यश मिळेल का? त्याची ओळख निर्माण होईल का? वाचू पुढील भागात.
लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all