बदल गं जरा स्वतःला...♥️♥️

Woman should change her attitude abt herself n change her life

सारिका वय वर्षे ४०. सतत मुलं आणि नवरा यांनी गुरफटलेली..... त्यांना काय हवं नको ते बघण्यात स्वतःच्या गरजा विसरलेली..... त्यांच्याकडे सतत लक्ष मग साहजिकच स्वतःकडे दुर्लक्ष.....

अगदी काय खायला काय हवं नको तिथपासून ते अभ्यासाच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारीही तिने स्वतःवरच घेतलेली असते.... त्यामुळे विचारातही तेच.... पण मग आता शरीर बोलू लागलं हळूहळू.... शेवटी शरीराकडे दुर्लक्ष केलं तर तेही आवाज काढणारच नं!!.... मनाच्याही काही तक्रारी सुरु झाल्या.... उदास वाटणं, विनाकारण चिडचिड होणं, सतत मुलांमध्ये गुंतून राहणं.....

पण आता सारिकाने स्वतःमध्ये बदल घडवून आणायचं ठरवलं. मुलांना आता थोडं स्वावलंबी करावं तसंही त्यांना आता या वयात आपली फार गरज नसते, कधीतरी आपली त्यांना लुडबुडच वाटते याची जाणीव प्रकर्षाने तिला होऊ लागली. म्हणून तिने स्वतःच्या routine मधे काही बदल केले.

रोज सकाळी उठून ती व्यायामाला जाऊ लागली. थोडं मैत्रिणींमध्ये मन रमवू लागली. वाचन करून मनाला नवीन विचारात खेळवू लागली. तिने तिचं गायन परत सुरु केलं त्यामुळे गायनाचा class आणि त्यांचे कार्यक्रम यात ती अगदी रममाण झाली.

आतापर्यंत सतत घरात मुलांच्या, नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ होत होते. पण आता मात्र आठवड्यातून एक दिवस का होईना ती स्वतःचे आवडते पदार्थ बनवत होती. या तिच्यात तिने घडवून आणलेल्या बदलामुळे तिला खूप आनंद मिळू लागला. मन आणि शरीर निरोगी बनू लागले. त्यामुळे उदासीनता आणि चिडचिड दोन्ही कमी झाले.

आता या तिच्या स्वतःवर प्रेम करण्यामुळे मुलंही स्वतःची कामं स्वतः करू लागली. त्यांनाही आईला काय हवं नको याची जाणीव होऊ लागली. आईला पण काही  आवडीनिवडी असतात हे लक्षात यायला लागले.

मुलं आईवर नितांत प्रेम करतच असतात पण ती स्वतःवर प्रेम करते याची त्यांना जाणीव करून देणे खूप महत्वाचे असते. सारिकाने स्वतःमध्ये बदल घडवून मुलांना पण याची जाणीव करून दिली.

ही सारिका म्हणजे आपलं प्रतिनिधीत्व करणारी आपली मैत्रीण.... आपण प्रत्येक जण थोड्याफार फरकाने या परिस्थितीतुन जात असतो  किंवा काही काळाने जाऊ शकतो  त्यामुळे स्वतःच्या स्वभावानुसार, घरातल्या routine नुसार आपण स्वतःमधे काही बदल घडवून आणणे गरजेचे आहे.... आता ही काळाची गरजच आहे.... आपलं स्त्रीधन म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर ♥️♥️