बाळाला माझी गरज आहे

This is the story of Veena and Amit. It explains their point of view of pregnanacy.

 वीणा आणि अमित च भांडण चालू झालं. दोन दिवस  हे सतत होतं असे. वीणा आणि अमित दोघे ही सॉफ्टवेअर इंजिनिअर . लव्ह मॅरेज केलेलं. मोठ्या आयटी कंपनीमध्ये  चांगल्या पगारावर कामाला होते. लग्नाला ३ वर्ष झाली होती. आणि आता बाळाचा विचार करत होते.

 विणाचे एकच चाललं होत की मी बाळासाठी जॉब सोडणार. आत्ताच विचार कर बाळाचं प्लॅनिंग आता करायची की नंतर पण एकदा का बाळ झालं की मी जॉब नाही करणार.

अमित ला कळत नव्हतं ही अस का म्हणत आहे. त्याने तिला खूप समजावलं.   अग इथं फ्लॅट घ्यायचं म्हणल तर ६०-७० लाख रुपये लागतील. एकाच्या पगारावर नाही होणार. ५०-६० हजाराचा हप्ता जाऊन माझ्या पगारात फक्त १०-२० हजार उरतील आपल्याला. त्यात आपण कसे भागवणार. पुढे शिक्षण आहे मुलांची. कसं होईल हे सगळं. तू आधी कधी बोलली नाहीस आपण एवढ बोलायचो या विषयावर हे आत्ताच का चालू केलं आहेस. 

आपल आधीच सगळं ठरलं होते ना.  मग मधेच तू हे का असं करत आहेस.  एव्हडं बोलून तो तिच्या कडे  उत्तराच्या आशेने बघत होता. तिच्या डोळ्यातून पाणी येत होत. ती म्हणाली सांगते.  मागच्या आठवद्यात  आईचं फोन झाला तेव्हा कळलं कि दिलीप  काका वारले. ते अमेरिकेत होते.  ते ऎकल्यापासून माझ्या मनात विचारांचे चक्र चालू झाले. 


 दिलीप काका माझ्या बाबांचे मित्र. ते असून मधून घरी येत असत.  घरी आम्ही फक्त आई बाबा आणि मी.  बाबांचे ऑफिस जवळच असायचे सो ते आधी मधी येऊन माझ्यावर लक्ष ठेवायाचे. आई कामावर जाताना मला शाळेत सोडायची, दुपारी बाबा शाळेतून मला आणायचे. माझं जेवण झाल कि ते परत कामाला  जायचे. शेजाऱ्याच्या काकूंना सांगायचे हिच्या वर लक्ष असुदे. मी एकटीच असायचे घरी. त्या दरम्यात दिलीप काका घरी यायायचे. मी घरी एकटी असले कि ते विचित्र वागायचे. मला उगीच जवळ घेऊन बसायचे . माझा फ्रॉक धरून ठेवायचे . मला कसतरी व्हायचं. माझ्या फ्रॉक बरोबर काही तरी करत असतानाच एकदा काकू आल्या. त्या आल्यावर ते काही केले नाहीत आणि निघून गेले.  दोनदा हा प्रकार घडला.  आता आपण मुलांना शिकवतो कोणी काय केलं तर कस करायचं पण हे सगळं तेव्हा न्हवते.  नंतर ते आले कि मी काकूंच्या घरी पळून जायचे.. मी आई बाबाना काही बोलू शकत न्हवते. मुळात काही कळतच न्हवते. पण देवाचे आभार कि देवाने मला त्यांच्या वाईट  कृत्य तुन वाचवले.. नंतर ते मुलाबरोबर अमेरिकेत गेले कायमचे..मी हि ह्या गोष्टी विसरले होते पण पर्वा आईचा फोने आला आणि त्याच नाव ऐकलं तेव्हा सगळे आठवले.

 
 अमित , माझे आई बाबा गरज होते म्हणून जॉब करत होते. मी चुकीचं म्हणणारच नाही त्यांना. पण त्या वेळी जर माझ्याबरोबर कोण तर असत तर मला हे सगळं सहन करावं लागलं नसते. तुला कदाचित हे कळणार नाही कारण तुमची एकत्र कुटुंब होत. घरात चार माणसे असायचे. आणि हेच नाही तर बऱ्याचदा  मला असे वाटायचे कि माझे आई बाबा माझ्याबरोबर असावेत पण त्यांना वेळ नसायचा.. माझ्या गॅदरिंगला , माझ्या बक्षीस समारंभाला ते कधी नसायचे. माझ्या इतर मित्रमैत्रिणींचे  आई बाबा बघून मला फार वाटायचे कि ते इथे हवेत माझं कौतुक करायला  पण ,  ... पण म्हणून मी त्यांना दोष देत नाहीय. त्यावेळी पैसे कमावणं हि गरजच होती त्यांची. 

आपलं अगदीत तस नाही  आणि  विचार कर ना त्यांचा ऑफिस टाईम मधे  आणि आपल्या ऑफिस टाईम  मधे किती फरक आहे.  ते त्यावेळी ११ वाजता जात ५. ३० पर्यन्त परत येई. पण आपलं तस  आहे का ? आपण सकाळी ८. ३० ला जाणार ते संद्याकाळी ८. ३० ला येणार .  काय वेळ घालवणार आपण त्या बाळाबरोबर. आणि  मी म्हणलं कि मी जॉब करणार नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही कि मी काहीच करणार नाही. तू काळजी करू नकोस. मी बाळावर  लक्ष ठेवून माझ्या टॅलेंटचा, माझ्या शिक्षणाचा  योग्य वापर करून तुला हातभार लावेन.  पण माझ्या साठी  माझी फर्स्ट प्रायोरिटी आपलं बाळ आणि त्याचा स्वास्थ्य असणार. 

अमित ला हि तिचे म्हणणे पटले.तिने काय विचार करून हा निर्णय घेतला हे समजले. शेवटी आपण हे सगळं बाळाच्या  उज्ज्वल  भविष्यासाठीच करत आहोत. त्यानेही तिला साथ द्यायचे ठरवले.  काही महिन्यांनी त्यांनी चान्स घेतला. त्यांना छान गोंडस बाळ हि झाले. जस वीणा ने सांगितल होत तस तिने जॉब सोडला. एक वर्ष विश्रांती घेऊन तिने स्वतःची वेबसाईट  चालू केली.  त्या माध्यमातून तिने ऑनलाईन  कलासेस घेऊ लागली. त्यातून तिला चांगले उत्पन्न पण मिळू लागले. अमित हि खुश होता. वीणा  बाळाकडे लक्ष देऊन हे सर्व करत होती कारण तिला माहित होत आपल्या बाळाला आपली गरज आहे.