बाबासाहेब पुरंदरे

ज्यांच्यामुळे आम्हाला शिवाजी राजे समजले त्या बाबासाहेब यांच्या बद्दल थोडंसं
शिवाजी महाराज महाराष्ट्रातील प्रत्येकाला वयाच्या पहिल्या वर्षीच भेटतात , आम्हाला राजे अजुन समजले चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून तेव्हापासूनच राजे आमचे दैवत बनले , त्यांच्याबद्दल असणार गूढ वाढत गेल , मला आजही आठवत मी सातवीच्या वर्गात होते , आणि जाणता राजा नाटक आल होत , आमचे सर आम्हा विद्यार्थ्यांना पाहायला घेवून गेले , इतक्या नकळत्या वयात देखील ते नाटक पाहून अंगावर काटे आले होते , त्यानंतर राजे होते म्हणूनच आपण आहोत हे समजल ,तेव्हा त्या वयात माहित न्हवत की राजे आमच्यापर्यंत आणले ते बाबासाहेब पुरंदरे या अवलियाने , नंतरच्या काळात जस वाचन वाढल , तसे शिवचरित्र समजत गेल , आणि अखंड महाराष्ट्राला राजे बाबासाहेबांनी भेटवले, बाबासाहेबांनी त्यांच्या लेखणीतून त्यांनी दिलेल्या संदर्भातून शिवचरित्र जागृत केल , आम्हाला शिवाजी राजे फक्त इतिहासात पाहून नाही चालणार तर वर्तमानात त्यांची शिकवण अंगी बाणयला हवी हा दृष्टिकोन आम्हाला बाबासाहेबांनी दिला , त्यांच्या मुळेच गड ,किल्ले पाहण्याची इच्छा जागृत झाली ,परवाचा त्यांचा पुण्याचा कार्यक्रम पहिला आणि जाणवलं वय हे कारण फक्त सामान्य लोकांसाठी असतं बाबासाहेबानसारख्या असमन्या साठी नाही, वयाच्या अंतिम श्वासापर्यंत शिवाजी राजे यांचं चरित्र सर्वसमोर नेणं हा त्यांचा उद्दात उद्देश किती प्रेरणादायी म्हणावा ....
महाराज आमचे दैवत आहेतच पण त्या देवाला अगदी घराघरात घेवून आले बाबासाहेब पुरंदरे ! येणाऱ्या कित्येक पिढ्यांना बाबासाहेबांच्या लिखाणातून राजे व प्रेरणा भेटत राहतील ...
अश्या ह्या अवलियाच आपल्यातून जाणं मनाला चटका लावून गेल , तुम्हाला अजून आयुष्य भेटलं असतं तर नक्कीच तुम्ही शिवाजी राजांचे रंगीत शिवचरित्र आम्हाला दिलं असत , हे तुमचं अखेरचं स्वप्न स्वप्न राहील , पण ते स्वप्न नक्की पूर्ण होईल...
बाबासाहेब तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली ...
@ अवंती कुलकर्णी