बाबांचा मोणू

Animal is very innocent,,love animal save animal...and take animal

बाबांचा मोनु

आज मोनु आला नाही का?? मला दिसलास नाही,कुठे गेला काय माहीत,बिचारा कुठे असेल...त्याला बघितल्या शिवाय करमत नाही...आहे तरी कुठे हा....असे सारखे बाबांचे एका मागोमाग एक प्रश्न चालू होते,...

बाबांना मोनु ची फारच काळजी वाटत होती,...आणि का वाटणार नाही,तो अगदीच बाबांच्या जिवाच्या आत आहे...तो जर समोर नसला तर बाबांना अजिबात च करमत नसे....

आता प्रश्न असा की,,हा मोनू आहे तरी कोण??...तर  मोनू म्हणजेच आमची मांजर...ती केवळ मांजर नसून आमच्या घरातील एक सदस्य आहे,...एका सदस्या प्रमाणे तिच्यासोबत घरातील सर्व वागतात....

बाबा आणि मोनू च नात तर खूपच जवळ च...दोघांना देखील एकमेकांशिवाय करमत नाही,तसा तर मोनू आमच्या घरातच राहतो,पण काही काही वेळा तो बाहेर फिरून येतो,,,आल्यावर मात्र सर्वात आधी बाबांकडे जातो,जर बाबा त्याला दिसले नाही तर सारखा बाबांचा शोध घेत असतो...

आमच्या मोनू ला आपण बोललेले सर्व समजते,,...त्याला जर म्हटले की तिथे जाऊ नको,तर तो तिथे जातच नाही,, कसं समजतं त्याला काय माहित....पण खूप नवल वाटतं की एखाद्याला जर आपण आपुलकीने कीवा प्रेमाने समजून सांगितले की त्याला ते समजते....

एकदा तर इतके नवल वाटले होते की चक्क मोनुच्या तोंडून माऊ न ऐकता बाबा हे एकायला आले होते,...म्हणजे त्याने स्पष्ट नव्हते म्हटले,पण मला अन् आईला बाबा च ऐकायला आले ...

आई च्या तोंडून तर कितीदा ऐकलं की, जेवढा लाड मोनुचा बाबा करतात तेवढा तर तुमचा पण नाही केला...पण मोनू आहे ही तसा...काही काही गोष्टी तर त्याच्या कौतुकास्पद आहे,जसे की रात्री तो जर घरात असला आणि त्याला शी अथवा सू या पैकी काही करायचे असेल तर तो आई जिथे झोपते तिथे जाऊन माऊ माऊ जो पर्यंत आई उठत नाही तो पर्यंत करत असे,,नंतर आई उठली की दार उघडायची अन् मग तो बाहेर जायचा...आम्हाला त्याच्या या गोष्टीचं खूप च कौतुक वाटत असे.....

त्याने कधीच कशात तोंड टाकले नाही,,आणि केव्हाच गादीवर सू शी केली नाही...झोपताना तो बाबाच्या पायाजवळ च झोपत असे....

अन् एखाद्या दिवशी जर दुसऱ्या मांजरा आल्यात आणि आमच्या मोनुला जर त्रास द्यायला लागल्यात की मग मात्र मी आणि माझा भाऊ आणि अर्थातच आमच्या सोबतीला बाबा पण,असे त्या दुसऱ्या मांजरांच्या मागे धावायचं की त्या घाबरून पडुन जायच्या...आणि मग तो थोडा सावरायचं आणि गपचुप बाबा जवळ जायचा....

एके दिवशी  मोनू दिसतच नव्हता,खूप काळजी आम्हाला वाटायला लागली,कुठे शोधावे अन् कुठे नाही असे काहीसे आमचे झाले होते,बाबा तर अगदीच हताश झाले होते,..आणि अगदी नर्वस होऊन त्यांनी पुन्हा पुन्हा मोणु विषयी चौकशी केली,...पण  मोनू काही पत्ता च लागत नव्हता,....पूर्ण दिवस संपला संध्याकाळ झाली बाबा अस्वस्थ च होते,अन् पुन्हा मला बाबांनी विचारले...काय ग आला का मोनू ...मी नाही म्हणणार तेवढ्यात वरून माऊ माऊ असा आवाज आला,,आम्ही लगेच वर बघितले तर  मोनू  सज्जा वर बसून होता,त्याला खाली काढण्याचा प्रयत्न आम्ही केला तर कदाचित त्याला बरे नसावे,कारण तो खाली येण्याकरीता तयार नव्हता...

त्या रात्री त्याला तिथेच दूध वैगरे दिले,अन् त्याला आराम करू दिला,,दुसरा दिवस उजाडला पण तरीही मोनू तिथेच मग शेवटी बाबांनी माझ्या भावाला विटरनरी डॉक्टर ला बोलवायला सांगितले,,डॉक्टर आलेत त्यांनी मोनू ला चेक केले,,आणि सांगितले की त्याला इतर मांजरांनी त्रास दिला त्यामुळे तो अशक्त झाला आहे...अन् एक इंजेक्शन त्याला दिले...

बाबांनी त्याच्या आजारपणात त्याची खूप काळजी घेतली,त्याला वेळेवर दूध,त्याचे खाणेपिणे..सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले...दोन तीन दिवसात च मोनू बरा झाला,,अन् पुन्हा आमच्या सोबत च राहायला लागला...त्याला आम्ही बोललेले सर्वच समजतं होतं...अगदी घरातील सदस्य च होता तो.....

हो ...होता तो,याचाच अर्थ असा की आता नाहीये,..तिथून काही दिवसात तो कुठे गेला,,याचा काही पत्ता लागला नाही,,अन् गेला असा की पुन्हा आलाच नाही....

आज तो आमच्या सोबत नाही आहे,पण कुठे तरी त्याने स्वतःची छाप मात्र सोडली,,आजही त्याची आठवण आम्हाला येते ..

कोणीच इथे अमर नाही पण जे आठवणीत राहतात ते नक्कीच विशेष असतात,आणि त्यातलाच एक असा आमचा मोनू,, खरं तर सुरवातीला मला त्याचा खूप राग यायचा पण बाबांचा त्याच्यावर असणारा जिव्हाळा पाहून मला ही त्याने आपलेसे केले होते.....
असा आमच्या बाबांचा मोनू सर्वांचा लाडका होऊन कुठेतरी निघून गेला....

मोनू च्या आठवणीत लिहिलेला लेख,,आवडल्यास नक्की लाईक आणि शेयर करा.....


Ashwini Galwe Pund