बाबाचे अस्तित्व
आई चे मातृत्व जगजाहीर आहे, ती त्या नवागताला जन्म देते, त्याचे पालन पोषण करते???
त्याला नऊ महिने पोटात वागवतो तिची नाळ जोडलेली असते त्या लेकराशी
पण बाबांचे काय ओ............
बाबांचे काहीच अस्तित्व च नसते का ??
बाबाच्या त्यागाची जाणीव करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आवडल्यास लाईक नक्की करा, आणि दुसऱ्यांना वाचण्यासाठी शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया लेखकाला लेखनास प्रोत्साहन देतात,
आपल्या अनमोल प्रतिक्रिया च्या प्रतीक्षेत
.............................
तीन वर्षाची सानू घरभर पसारा करून बसली होती,
तिची आवडीची बाहुली घेऊन ती खेळत होती, तिची बाहुली म्हणजे तिचा जीव की प्राण होती, गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेली तिचे ते सोनेरी केस, खाली वर खाली वर होणारी हात सगळं सानू ला खुप आवडायचं,
ती तिच्या खेळत मग्न होती,
तेवढ्यात शेजारील मनिषाताई
कोथिंबीर घेण्यासाठी आल्या,
"अरे वा छान खेळ चाललाय छकुली चा
मनिषाताई सानू ला म्हणाल्या
सानू तिच्या खेळत व्यस्त होती, तेवढ्यात मनिषाताई चा आवाज ऐकून घरातील बाकीची माणसे हॉलमध्ये आले,
तसे नेहमी सर्व सानू च्या माघे पुढे च असायचे पण आता सगळे आपापल्या कामाला गेले होते,
पण सानू ला सोडून काही सुचत देखील नव्हते असे गेले की सगळे असे यायचे तिच्याशी खेळायला,
"झाले का आमच्या सानूली चे खेळून "
असे म्हणत केशवराव सानू चे आजोबा हॉलमध्ये आले,
केतकी व माधविताई किचनमध्ये काम करत होत्या मनीषाताई चा आवाज ऐकून त्याही बाहेर आल्या,
केशवराव सोफ्यावर पेपर वाचत बसले,
मनिषाताई ला सानू जाऊन बिलगली म्हणून त्यांनी उचलून घेतली व म्हणाल्या
"खुप गोड आहे ग ही"
"ह्म्मम्म्मम मग मुलगी कुणाची आहे"
केतकी अभिमानाने म्हणाली
"अरे वा म्हणजे आमचे काही नाही
ती सगळी तिच्या आजी आजोबावर गेलीये"
माधवीताई केश्वरावाकडे बघत म्हणाल्या
"हो तर नक्कीच"
केतकी हसत म्हणाली
"पण सानू तुला सर्वात जास्त कोण आवडते ग .......
मनीषाताई सानू ला म्हणाल्या
इवल्याशा सानू ने पटकन आईकडे झेप घेतली व म्हणाली
"आई "
सगळे एकदम हसू लागले
"बघा बघा कशी आई म्हणाली आपण कितीही जीव लावा शेवटी आई बाजी मारणारच "
माधवीताई हसत म्हणाल्या
"हो मग नऊ महिने पोटात वाढवले आहे मी तिला"
केतकी अभिमानाने म्हणाली
" पण मग बाबांचे काहीच अस्तित्व नसते का ग ...."
लॅपटॉप वर काम करत असलेला दीपक मान वळवून म्हणाला
"तसे नाही ओ ....
तुमचे काय ना .....
पण माझी व तिची एक घट्ट वीण असते एका नाळेने जोडले गेलो होतो आम्ही,
स्वास एक झाला होता आमचा, तिचे दुखणे खुपणे सगळं मी स्वतः अनुभवलं ,
म्हणून माझी जागा तिच्या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही "
केतकी दीपक कडे बघत म्हणालीस
आता मात्र दीपक चा संयम सुटला
तो त्याचे काम बंद करून बोलू लागला
"बरोबरच आहे केतकी तुझे तू आई आहेस तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही,
व माझे काय ना ........
मी कुठे अनुभवलं तिच्या बद्दल काही
अग जेव्हा पहिल्यांदा तू आई होणार हे डॉक्टर ने सांगितलं ना त्या पूर्ण रात्री मी झोपलो नव्हतो सारखा उठून तुला पुन्हा पुन्हा बघत होतो कारण येणार मुलं हा माझा अंश असेल ही भावना च खुप वेगळी होती,
तिला नऊ महिने पोटात तू वाढवले पण अनुभव घेतला मी,
जेव्हा तुला उलट्या व्हॉयच्या ना
व तू जेवत्या ताटावरून उठून पळायची ना तेव्हा मी देखील जेवण आवरून तुला पाणी देण्यासाठी यायचो,
तू महिने मोजत होतीस आणि मी दिवस,
जेव्हा तुला पोटात तिची हालचाल जाणवायची व तुला मला सांगायची ना
हे बग ना दीपक या बाजूने जाणवते बाळ
अरे आता इकडे जाणवते बग ना कसे फिरतंय खुप आवडते बहुतेक याला फिरायला तुझ्यासारखे
तेव्हा तू झोपल्यावर तुझ्या पोटावर कान ठेऊन खुप वेळा बाबा ऐकायचा भास व्हायचा मला,
तुझ्या बोलण्यात, वागण्यात , चालण्यात मी तिचा अनुभव घ्यायचो,
जेव्हा तुझे दिवस भरले व तुला त्रास चालू झाला ना तर सगळ्यात अगोदर देवासमोर हात जोडले मी की देवा माझे आजपर्यंत चे जे काही पुण्य असेल ते आज पणाला लाव व माझ्या केतकीला लवकर मोकळं कर,
जेव्हा तुझा तो त्रास बघितला तेव्हाच ठरवलं मुलगा असो की मुलगी पण एक बस झालं ,
तुझी डिलिव्हरी झाली तू गोंडस मुलीला जन्म दिला,
जेव्हा मी तिला पहिला स्पर्श केला ना तेव्हा फक्त डोळ्यातून पाणी वाहात होते कारण आज माझा अंश माझ्या हातात होता व तेंव्हा मी इतका खुश होतो की शब्दात सांगणे अवघड आहे, स्वर्ग सुखाची अनुभूती होती ती,
जेव्हा तुझी डिलीव्हरी झाली व तू आराम मिळावा म्हणून माहेरी गेली,
तेव्हा या घरातील आपल्या बेडरूम च्या भिंती मला खायला उठायच्या तुझी सवय झाली होती ग मला आणि अशी अचानक तू जाणे मला पचायला अवघड च गेलं ,
तशी तू कधी माहेरी गेली नाही मला सोडून असे नव्हे पण एक दिवस जाणे व चार महिने जाणे यात फरक होता,
खुप वेळा रात्री अचानक खडबडून जाग यायची
तुझं ते माझा हात उशाशी घेणं तुझं सतत माझ्या आसपास वावरणं, तुझे गळालेले केस उशीवर सापडणे व त्यावरून मी तुझ्यावर ओरडणं,
तुझे बेड वर पडलेले क्लचर, पुस्तकं, हे सगळं मिस करत होतो मी,
एकटेपणा काय असतो ना ग
तो त्या पुरुषाला विचार ज्याची बायको माहेरी गेलीये कारण जेव्हा मी तुला माहेरी भेटायला यायचो ना .......
तेव्हा पाय निघत नव्हते माझे सानू जवळून
घरी आल्यावर देखील तिच्या व तुझ्या आवाजाचे भास व्हायचे मला,
खुप वेळा तर बिनदास झोपायचो तू सकाळी उठवशील म्हणून व मग मीटिंग ला लेट झाले की आठवण यायची
अरे माझी केतकी कुठे इथे आहे सध्या ..........
याची
तू आई झाली होती
तू सानुत व्यस्त असायची
मी कॉल केला व सानू रडायला लागली की तू नंतर करते म्हणून फोन ठेऊन द्यायची
व नंतर सानुत कॉल करायचं पण विसरून जायची पण मी बघायचो
तुझ्या कॉल ची वाट
की आता करशील नंतर करशील
अशा खुप रात्री गेल्या पण मी कधीच काही म्हणालो नाही
कारण आता बाबा झालो होतो ना ग ........
त्यामुळे तुला आराम मिळावा म्हणून
मी काहीच बोलू शकत नव्हतो.......
तुझा दिवस तिच्यात मस्त निघून जायचा पण माझे काय???
मी मात्र मन लावायचो कामात कारण तुमची आठवण येऊ नये म्हणून
पण तरीही मी काही बोललो नाही
कारण मी बाबा झालो होतो ना,
तू सासरी आल्यावर
खुप वेळा ऑफिसवरून उशिरा आलो ...
कधी कधी तर उपाशीच असायचो पण तू थकून जायची सानू व घर कामात
व जेवायला जर काही नसेल तर तसाच झोपायचो
पण तुला वाईट वाटेल म्हणून कधीच बोललो नाही
कारण मी बाबा झालो होतो ना आता ........
सानू ने टाकलेलं पहिलं पाऊल
मी त्याचा व्हिडीओ बनवला होता
आजही जेव्हा जेव्हा एकटा असतो तेव्हा तेव्हा तो व्हिडीओ बघून मी पुन्हा पुन्हा खुश होतो,
पण या सगळ्याच मला वाईट नाही वाटत
कारण तू मला जगातील सगळ्यात छान भेट दिलीस बाबा बनवून
फक्त माझं अस्तित्व मान्य करत नाहीस
ती तुझीच आहे
तिला तुझ्यापासून कुणीच वेगळं करू शकत नाही पण ती माझी देखील आहे हे विसरू नको,
नाहीतर बाबा फक्त कविता व कथा पुरते राहतील,
या खंबीर, कणखर, व्यक्तिआड एक बाबा देखील आहेत हे तिला कळू दे,
दीपक बोलत होता ....
माधवीताई व केतकी च्या डोळ्यातून पाणी वाहू लागले,
"मी कधी या बाजूने विचारच केला नाही ,
मी इतकी कशी स्वार्थी झाले
खरच स्त्री लेकरू झाले की बदलते म्हणतात पण आज मी ते अनुभवले होते,
दीपक मधील बाबा मला कधी उमगलाच नाही
त्यांचा भावनिक दृट्या मी कधी विचारच केला नाही "
केतकी डोळे फुसत म्हणाली
"प्रत्येक पुरुष असाच असतो ग"
केशवराव केतकीकडे बघत म्हणाले,
"मी कोथिंबीर घ्यायला आलें होते पण आज मी देखील अनुभवलं बाबा होणं काय असत दीपक च्या शब्दात, आता निदान आमच्या यांना मी कधी टोमणे तरी मारणार नाही की तुम्हाला काय कळणार आई होणं काय असत .....
मनीषाताई देखील डोळे पुसत म्हणाल्या,
"मम्मा सु ......."
सानू ने आवाज दिला
"घ्या सानू चे बाबा अर्धा हक्क पाहिजे ना तर न्या मुलीला"
माधविताई
च्या या बोलण्यावर सगळे हसू लागले.
कथा कशी वाटली नक्की कळवा
आवडल्यास लाईक करायला विसरू नका,
आपल्या प्रतिक्रिया लेखकाला लेखनास प्रोत्साहन देतात
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा