Feb 24, 2024
प्रेम

बाबांबद्दल थोडस

Read Later
बाबांबद्दल थोडस

             बाबांबद्दल थोडसं...                                                       बाबा म्हणजे कणखर व्यक्तीमत्व, बाबा म्हणजे दगडासारखा कठोर, बाबा म्हणजे पोलादासारखा टणक, बाबा म्हणजे डोळ्यातून कधीही आश्रु न ढाळणारा एक कर्ता पुरूष...                                                                       खरंच जेव्हा आपण आपल्या लाडक्या बाबांबद्दल अश्या काही चार ओळी लिहतो, बाबांविषयी आपल्या मनात असलेल्या भावाना आपण व्यक्त करतो. तेव्हा आपल्या मनातल्या आपल्या लाडक्या बाबांबद्दलचा असलेला आदर, भावना आपण मनसोक्त व्यक्त करत असतो... पण! पण! खरच कधीतरी खंत ह्या गोष्टीची वाटत असते की, आपण नेहमी आपल्या बाबांची आठवण, आपल्या बाबांच्या विषयी असलेल्या आपल्या भावना, त्यांच्या प्रती असलेला आपला आदर, आपण नेहमी Father's Day च्या दिवशीच का व्यक्त करतो. त्यांच्याबदलचा आपल्या मनातल्या भावना आपण ईतर दिवशी का व्यक्त करू शकत नाही...???                                                                      काहीजण तर वडिलांना हिटलर, तर काहीजण खडूस म्हणून पण संबोधतात. पण तोच बाबा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या माणसांसाठी दिवसरात्र झटतो, दिवसरात्र मेहनत करतो हे मात्र विसरतात आणि तेच बाबा जेव्हा त्यांच्या उतारवयात काहिच करू शकत नाहीत, तेव्हा मात्र आपला लाडका बाबा मात्र आपल्याला नकोशे होतात...   My Dad is My Real Hero.....My Dad is My Supper Hero...  My Dad is My God Father...                                                       पण, जर आपल्या बाबांना, जर आपण एका हिरो सारखं जगू दिलं, राहू दिलं तर त्याहून आणखी पुण्य काय असेल... का होतं असं...??? ह्या प्रश्नाचा सगळ्यांनी नक्कीच विचार करायला हवा...                                                                                   बाबा एक अमुक व्यक्तिमत्व, बाबा एक तमुक व्यक्तिमत्व असे सांगणारे असे लिहिणारे बरेच जण असतात. पण बाबांनी आमच्यासाठी काय केलं, असंही सांगणारे खुपजण असतात. पण त्याच बाबांनी दिवसरात्र एक करून, दुसर्यांची मोलमजुरी करून आपल्याला लाडात वाढवलेलं असतं, आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी कधीच जणवू दिलेली नसते हे मात्र सगळेजण विसरतात...                                                                                                  बाबांना कधीच कुणी रडताना नाही पाहिलं. कारण बाबा कधी त्याचं दुःख कधीच कुणाला सांगत नसतो. त्यांचं दुःख हे त्यांनाच माहित असतं. कारण त्यांना माहित असतं सार्या जगाला सांगूण ह्याचा काहिच फायदा होणारा नाही... आपल्या वडिलांप्रती असलेल्या आपल्या भावना ह्या फक्त आपल्या लिखाणात किंवा Father's Day च्या दिवशीच व्यक्त न होता ईतर दिवशीही व्यक्त व्हाव्यात ईतकंच... हेच तर खरं रिटर्न गिफ्ट आपल्या बाबांना Father's Day चं मिळू शकतं...                                                                                          माझ्याकडून काही चुकीचं लिहीलं गेलं असेल तर क्षमस्व...!!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Adv. Shraddha Magar

Advocate

Happily life .. आयुष्य एकदाच आहे आनंदाने जगते... जिथे जाऊ तिथे स्वतः ची छोटी ओळख निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न...

//