बाबा तुम्ही साथ द्याल ना ,भाग 4

Baba


भाग 4..

डॉक्टर ने आता शिलाला मृत घोषित केले होते ,तेव्हा ही बातमी मामाला डॉक्टर ने सांगितली आणि मामाला गरगररून घाम फुटला, मामी ने त्यांना सावरले आणि तिने हळूच सुदीपला धीर देत ही बातमी त्याच्या कानावर घातली,आणि तो तर कोसळलाच जागेवर.. एक आर्त आवाज घुमला त्या वार्डात त्याचा, आधार गेला त्याचा ,त्याची आई गेली त्याला सोडून..

तो बाबांकडे जाऊन ऑक्सअबोक्सी रडू लागला, त्याने बाबाला आधार दिला आणि आता त्यांना आईकडे काही वेळ बसायला सांगितले शेवटचे तिला डोळे भरून बघायला सांगितले, पण इकडे त्याची हिम्मत होत नव्हती आईला बघण्याची..पन तो लांबुनच बघून रडत होता,मामी त्याला समजावत ती ही रडत होती,मामा तर हे बघण्याआधी मला का नेले नाही हे देवाला म्हणत होता..घर कोसळले होते... एक गुणी माणूस आधार काढून निघून गेले होते, आता सगळा संसार बे आधार झाला होता.. नानंदबाई तिकडे हे कळताच दादासाठी आणि सुदीप साठी जोर जोऱ्यात रडत होती,आई हरपली होती तिची...


इकडे सगळी तयारी करून आईला शेवटचे घरी आनले होते, तिची विधीवत संस्कार करून ओटी भरली होती,आणि तिला वाटे लावले होते, घर रिकामे करून तिला शेवटच्या प्रवासाला पाठवले होते..आता दोघांना अंत दर्शन घेण्यास बोलावले होते आणि मुलाला अग्नी द्यायला पुढे बोलावले होते.. तो तर ते आईचे रूप बघू शकत नव्हता.. त्याला मामाने सावरून धरले आणि मग त्याने अग्नी दिला. घरी आता जातांना मन आणि पाय जड झाले होते ,त्याने परत जाताना त्याच्या बाबाला घट्ट पकडले होते आणि त्यांना आधार देत दोघे पुढे घराच्या दिशेने कधी मागे आईचा जळता देहाचा विचार करत पुढे चालले होते..शब्द ही दुःखात गुंतले होते.. आता मध्यस्थी जरी नसली तरी ते बाप लेक जवळ आले होते.. बापाला त्याच्या आधार आणि हिम्मत आज आणि इथून पुढे अशीच लागणार होती..

ते 13व्या चे सगळे विधी झाल्यानंतर मात्र एक एक करून सगळे नातेवाईक हळूहळू करून रामराव यांना हिम्मत बांधायचे सल्ले सांगून निघून गेले होते,इथे फक्त आत्या, मामा ,मामी ,सुदीप रामराव सोबत होते... ते ही उद्या आप आपल्या घरी जाणार होते.. आणि इकडे सुदीपला आता परत जायचे होते,पण ह्या अश्या परिस्थिती त्याला वडिलांना सांगणे जड होत होते, द्विद मनस्थिती होत होती..आधी आई होती तर तिने परिस्थिती हाताळी होती पण आज तीच नाही तर परत संकट वाटत होते.. पण सांगणे गरजेचे होते . त्याचे मन त्याला खात होते वडिलांना इतक्या मोठ्या दुःखात टाकणे योग्य वाटत नव्हते, पण contract असल्याने त्याला जाने भाग होते..
आता काय करावे कळत नव्हते, घर ही सोडावे वाटत नव्हते.. मुख्य म्हणजे बाबांना एकटे सोडावे वाटत नव्हते



त्याने कंपनी ला विनंती करून महिनाभर सुट्टी मागून घेतली होती..म्हणून जरा आज निवांत होता पण तरी पुढे कधी तरी जाने भाग होते नाहीतर कारवाई केली जाणार होती.. त्याचे ही त्याला टेन्शन होते.. पण पुढे मात्र त्याने ठरवले होते की मी हे वर्ष नौकरी करून contract नुसार त्याचा काळ पूर्ण होणार होता आणि मग तो परत निर्णय घेऊन आपल्या देशात परत येणार होता, पण बाबाला त्या एका वर्षभरात एकटे ठेवणे भाग होते, जीवावर दगड ठेवून तो पुन्हा त्या देशात जाणार होता . पण बाबा मात्र त्याच्यासोबत कधी ही जायला तयार नव्हतेच.त्यांचा हट्ट होता की मी माझा देश सोडून कुठे ही जाणार नाही.. भले ही मी एकटा राहीन.

ह्या एका वर्षात बाबांना पुन्हा एकटेपण तेच घर जिथे शिलाच्या येण्या आधी कोणी सोबतीला नव्हते..घर खायला उठत होते.. ते आज retire झाले हे मुलाला सांगितले होते पण तो येऊ शकत नव्हता.. त्याला ही बाबांच्या ह्या सोहळ्यात त्यांच्या सोबत असावे वाटत होते, त्यांना एक आधार देऊ वाटत होता की मी ह्या आनंदाच्या क्षणी मी तर नाहीच पण आई ही नाही..

बाबाला मी इथून पुढे ते सगळे सुख देईल जे त्यांनी कधी माझ्याकडून अपेक्षित केले होते.. त्याने ठरवले की ह्या देशात माझे जितके दिवस आहेत तितक्या दिवसात मी बाबांना इकडे बोलावून घेईल आणि त्यांना माझ्यासोबत रहायला बोलावून घेण्याच्या निमित्ताने त्यांना हे जग ही फिरवून आणेन,म्हणजे त्यांना काही काळ तरी विसर पडेन त्यांच्या दुःखाचा.. त्याने लगेच बाबांना फोन लावला आणि त्यांना त्याच्याकडे येण्याची विनंती केली..आणि त्याने त्यांचे पासपोर्ट ही तयार करून घेतले काही दिवसात.

बाबा यायला तयार नव्हते, म्हणत होते की तू तर तिथे रमलास पण मला नाही जमणार तिथे यायला,म्हणत विरोध करत होते..

सुदीप ही मग म्हणाला,बाबा आहो मी ही फक्त वर्षभर राहणार आहे मग मीच भारतात आपल्या घरी कायमचा येणार आहे,तेव्हा तुम्ही माझ्याकडे या,निदान मी इथे आहे तोपर्यंत तुम्हाला ही हे जग दाखवेन,मला आधी कधी तर ते जमले नाही तुमच्या सोबत कुठे फिरणे पण आता ती संधी आहे आणि तुम्ही ही फ्री आहात, आणि घर ही खायला उठत असेल हे मी समजू शकतो,पण तुम्हाला मी एकटे सोडू शकत नाही हे ही खरे आहे.. आणि मी तुमच्या आधाराशिवाय इथे राहू शकत नाही... मग आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ.. तुम्ही म्हणाल त्या मुलीशी मी लग्न करेन आणि परत आपले घर माणसाने भरू...पण आता तुम्ही मला माझ्यासोबत हवे आहात..


बाबांना ही आता कुठे सुदीपचे बोलणे पटले होते, त्यांना ही त्याला सोडून रहाणे कठीण होते ,पण तो जर इतक्या प्रेमाने बोलवत होता तर त्यांना जाने भाग होते..त्यांनी जाण्याची तयारी दाखवली आणि ते सुदीप कडे पोहचले..काही दिवस राहून सुदीपने बाबासाठी सुट्टी काढली आणि त्यांना सगळे जग दाखवले ,अश्यात त्यांचा महिना गेला, बाबा त्याच्याकडे रमले..थोडे दुःख लेकाच्या आनंदासाठी बाजूला सारले.. ह्या आनंदात त्यांनी असे वर्ष काढले...आणि दोघे ही बाप लेक भारतात परत आले,ते ही आपल्या घरी कायमचे..