Oct 18, 2021
कथामालिका

बाबा तुम्ही साथ द्याल ना !!! भाग 3

Read Later
बाबा तुम्ही साथ द्याल ना !!! भाग 3
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


भाग 3

शीला एक गुणी , प्रेमळ, मनमिळाऊ, कामसू, मनकवडी मुलगी होती,लाघवी स्वभावामुळे तर मामी तिच्या वर आईची ममता ,माया करत होती आणि मामला ती तर जीव की प्राण होती,आधी भाची होती पण नंतर त्याची लाडाची लेक झाली.. तिच्या नुसत्या जाण्याने मामा दोन दिवस तीला आठवून रडत होता...रूपाने सुंदर ,देखणी, काळजाला काळीज देणारी ती ,कोणाला काय हवं नको ते समजून जाणारी, बोलण्याच्या पलीकडच्या भावना आपसूक ओळखणारी, परोपकार जाणारी होती .एकदा कोणाला आपले मानले की त्याची सगळी जबाबदारी तिची असत.
ती आपले परके हा हिशोब करत नसत ,मग ते शेजारी असो वा कोणी मदत मागायला आलेली कोणी नातेवाईक असो.

तिच्या स्वभावाला साजेसेच रामराव मिळाले होते, म्हणून तर सगळेच खुश होते त्यांच्या ह्या नात्याने,मामला ही चिंता वाटत होती ,तिला कसा मुलगा मिळतो ते आणि रामरावच्या बहिणीला ही वाटत होते आपल्या दादाला चांगली बायको मिळावी..त्यांचे दुःख तिने वाटून घेणारी, त्यांचे आयुष्य सुखकर करणारी ..आणि तशीच शीला होती, वहिनी जणू आईच वाटत होती तिला. आई गेल्यानंतर दादाने तिला कसलीच कमी पडू दिली नाही पण तरी आई मात्र मनातून जाऊ शकली नाही कधीच ,आणि ती जणू परत वहिनीच्या रूपाने भेटली ..

संसार वेलीला आता एक फुलाची चाहूल लागली होती ,एक सदस्य येणार आपल्या घरात ह्याने तर सगळे जण खूप खुश होते... त्यांच्या आनंदाला आसमंत कमी वाटू लागले होते, जिथे एक होता तिथे दोघे झाले आणि जिथे दोघे होते तिथे तिघे होणार होते, तिला सोबत आता चिमुकले कोणी तरी येणार होते, ही खबर नणंद बाईला लागली आणि ती लगेच वहिनीला भेटायला आली ,तिकडून मामा मणी तर जणू नाचत आले होते.. बाळा बघण्याची त्यांची इच्छा होतीच.. त्यांना तो आंनद खूप वर्षांनी बघायला आणि अनुभवायला मिळणार होता...

नऊ महिने तर ती माहेरी जाऊन राहू शकत नव्हती आणि मामा मामी तिच्याशिवाय राहू शकत नव्हते हे पाहून रामराव यांनी त्यांनाच इकडे बोलावले होते शेवटचे दोन महिने, त्यात नणंद ही येत जात होती, भाऊ खुश आहे हे पाहून तिला खूप आंनद होत होता, मग कधी कधी वहिनीच्या आवडते पदार्थ करून घेऊन येत होती, तिला हवं नको ते ती जातीने बघत होती, तिच्या इच्छा आता ती पूर्ण करत होती.

शेवटी नऊवा महिन्यात मुलगा झाल्याची बातमी मिळाली आणि घर भर आनंदी आनंद होता, पाहुणे येऊन भेटून जात होते,घर आलेल्या फुलांनी आणि गिफ्ट्स ने भरलेले होते, काहींनी आईला साड्या तर बाळाला छोटे छोटे कपडे, खेळणे,पाळणा, बाबाला कपडे, बाळाचे पोस्टर, तर कोणी सोन्याचे ,चांदीचे मनगट,कोणी तर साधा काळा धागा आणला होता. मामाने तर बाळाच्या आईला बाबाला ,आणि बाळाला त्यांच्या हिशोबाने अंगठ्या केल्या होत्या. बाळ बघून मामी खूप खुश होती कारण तिला असे सुख मिळाले नसले तरी आज ती अनुभवत होती.. घराने परत एकदा कात टाकली होती.

मुलगा झाला अन आत्याने लगेच नाव ही सुचवले आणि तिचा मन पाहून तिला नाव ठेवण्यास सांगितले होते, मग तिने ही सुदीप असे नाव सुचवले जे सगळ्यांना खूप आवडले, घराचा दीपक...

सुदीपचे सगळेच जण खूप लाड करत ,एकीकडून मामा मामी तर एकीकडून आई बाबा आणि आत्या.. तर तितकेच आईचे संस्कार ही त्याला घडवत होते.. त्याला चूक बरोबर हे ती त्याच्या अनुभवातून शिकवत होती,मोठ्यांचा आदर त्यांची किंमत ,आणि महत्व काय असते आपल्या आयुष्यात हे ती शिकवत होती...त्याला साधे पालिकेच्या शाळेत घातले जरी होते तरी त्याचे शिक्षण उत्कृष्ट होते.. तो हुशार होता हे पाहून मग नंतर सेमी इंग्लिश मध्ये टाकले, त्याच्या शिक्षणासाठी आई वडील स्वतःचे खर्च कमी करू लागले होते, सुदीप 10 वीत आणि 12 वित ही चांगल्या गुण मिळवून जिल्ह्यात पहिला आला होता,ते बघता त्याला डॉक्टर व्हायचे होते पण fees पुरते ही इतकेच पैसे नसल्याने त्याने इंजिनिअरिंग ला admission घेतले, त्यात ही तो चांगल्या गुणांनी पास झाला होता .


त्याला काही वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट तत्वावर बाहेरच्या देशात बोलावणे आले आणि आता त्यावर घर सोडून अनोळखी दुनिया जवळ करणे जीवावर आले होते,त्याने आईला सोडून रहाणे कधीच पसंत केले नव्हते. आई वर त्याचा आणि आईचा त्यावर खूप जीव होता... बाबा ला ही तो आधार होता,त्याचा गुणी स्वभाव बाबाला जणू हिम्मत देत होता, असे वाटत होते की आता नौकरीच्या निमित्ताने तो जवळ राहील मग त्याचा परिवार असेल,घर अजून भरल्यासारखे होईल,मग आम्हाला कसलीच कमी रहाणार नाही.


पण आता तो घरी कसे सांगणार होता की मला बाहेर देशात जाऊन ,तुम्हाला इथे सोडून नौकरी करायला जावे लागणार आहे, मी काही वर्षात परत येईल,मग आपण सोबत राहू,पण आता मला जावेच लागणार आहे.. हा विचार करताना ही मनावर दगड ठेवून तो आई बाबाला ही आनंदाची पण थोडी मनाला चुटुक लावणारी बातमी सांगायची कशी कळत नव्हते... त्याला बाबांचे त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि स्वप्न काय आहेत हे माहीत होते,तरी तेच स्वप्न भंग होणार होते.. पण नाविलाज होता त्याचा ही.
बाबांचे स्वप्न फार नव्हते तरी मी असमर्थ ठरलो तर सगळ्यात जास्त दुःख बाबांना होईल हे समजत होते.. बाबांना ह्या घरात अजून सुख समाधान हवे होते, घर कधीही रिकामे नको होते, माणसाने भरलेले हवे होते, माझा संसार ह्याच घरात बघायचा होता..पण आता ह्या नौकरीमुळे ते जमणार नव्हते...

त्याने आईला हा निर्णय आणि बाहेर देशातील नौकरी बाबत सांगण्याचे ठरवले,आई जवळची लाडाची ती समजून घेईल आणि बाबांना ही सांगेल असे त्याला वाटले,आणि तसे त्याने केले ही.
सुदीप,"आई तुला एक सांगायचे आहे ग,तुला मन घट्ट करून ऐकावे लागणार आहे, थोडे छान वाटलं पण वाईट ही वाटण्यासारखे आहे हे "

आई, " तू मला घाबरू नकोस बाबा,काय आहे ते सांग बरं "

सुदीप "अग मला मोठी नौकरी मिळत आहे,मोठा पगार असणार आहे ग आई "

आई," अरे मग बरच आहे ना,मग इतका तोंड पडून का सांगत आहेस तू,ह्यात काय वाईट वाटायचे आहे रे ,तू उगाच मला टेन्शन दिले "

सुदीप, मान खाली घालून,तिचा हात हातात घेऊन,दबक्या आवाजात,औंढा गळीत, मन जड करून म्हणतो, अग फक्त मला काही वर्षे तुम्हाला सोडून बाहेरच्या देशात रहावं लागणार आहे,पण फक्त काही वर्षे ,मग मी परत येईल इकडे "

आईने त्याचा हात हळूच तिच्या हातातून काढला आणि तोंड फिरवले आणि आलेले अश्रू पुसले, आणि म्हणाली,आता काय तू निर्णय घेतलाच आहेस तर मी काय बोलणार, आणि तसे ही मुलं एकदा मोठी झाली की ते त्यांचे निर्णय घेत असतात आणि फक्त आई वडिलांना कळत असतात, तू ही तेच कर..तू एकदा तिकडे गेलास तर तू तीकडचाच होणार, मग परत काय येणार तू इथे.. आणि आई रडू लागली,तिला पुढचे भविष्य दिसू लागले..ते एकटेपण जाणवू लागले..

इकडे तिला त्याच्या बाबाला समजवण्याचा बिडा त्याने घ्यायला लावला होता, त्याचे तिला आता जास्त टेन्शन आले होते, त्यामुळे तिचा bp shoot झाला होता, तिला माहीत होते तिच्या नवऱ्याचे किती स्वप्न होते सुदीप कडून,पण हा तर आता त्यांना सोडून दुसऱ्या देशात जाणार आहे म्हणत होता.. आता त्यांना मी कशी हे सांगून मोडकळीस आणणार होती,मी त्यांना हिम्मत देत होते मग मी कशी ही बातमी सांगून त्यांची हिम्मत कमी करू.. तिने बऱ्याचदा हिम्मत केली पण ती काही सांगू शकली नाही..

सुदीपचे जाण्याचे पक्के झाले होते,तो त्याची तयारी करत होता,त्याला वाटले आई सांगेल लवकरात लवकर पण तिने काही सांगितले नव्हते..

मग नेमके सुदीपच्या मित्रांकडून त्यांना कळले ,तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले होते, ते एकदम खचून गेले होते..त्यांनी त्याला जड अंतःकरनाणे परवानगी दिली होती,पण वाईट इतकेच वाटले की घरात त्याची तयारी सुरू झाली होती आणि त्यांना कोणी सांगितले नाही...

काही दिवस त्यांनी त्याचे दुःख सहन केले पण त्यांच्यापेक्षा जास्त दुःख आईला झाले होते,तिचे रडणे थांबत नव्हते,तो तिकडे गेला पण बरेच दिवस त्याला ही तिथे करमत नव्हते,मन लागत नव्हते, काम करत होता पण लक्ष मात्र आई बाबांकडे होते.. त्याने ठरवले होते हे दोन वर्षे नौकरी करेन आणि मी घरी जाईल..

हळूहळू तो त्याच्या कामात रमत जात होता,इकडे आई वडील त्याला आठवून आपले दिवस पुढे ढकलत होते, घरात दोघेच होते, कधी तो येईल आणि भेट होईल याची आतुरतेने वाट बघत होते. त्याचा रोज फोन येत ,विडिओ कॉल होत, म्हणून तरी त्यांना दिलासा मिळत होता. तो नेहमी हेच सांगत की मी पुढच्या दिवाळी ला घरी येईल पण काम वाढले की त्याचे येणे रद्द होई..

इकडे आईची त्याच्या भेटीसाठी जीव आसुसलेला होई,जेवण ही कमी करत..टेन्शन घेत..अश्यातच तिला एक दिवस चक्कर येऊन ती पडते ,तेव्हा नेमके घरी कोणी नसते..मग रामराव घरी आल्यावर त्यांना कळते की तिला काही तरी झाले आहे,आणि ती बोलत नाही. हे बघून त्यांची धांदल उडते. त्यांना कळत नाही काय करावे. ते लगेच शेजाऱ्यांना बोलावून तिला ऍडमिट करतात, तेव्हा सगळ्या टेस्ट नंतर कळते की त्यांना कर्करोग झाला आहे आणि तो ही शेवटच्या टप्प्यात आहे, त्या शेवटच्या घटका मोजत आहेत. हे ऐकून तर रामरावांची गाळण उडते,पायाखालची जमीन निसटते, डोळ्यासमोर अंधेरी येते, काही काही सुचत नाही हे असे काय झाले आहे. आता तर एक एक कडी आयुष्यातून गळून पडतांना दिसत असते, आता परत एकटे रहाण्याची ती पहिली पायरी येते. घर पुन्हा निर्मनुष्य होताना दिसत असते.. घर पुन्हा कात टाकत आहे असे वाटते..
आधी मुलगा दुरावला आता बायको..हे आता सहन होण्याच्या पलीकडे आहे... ही बातमी न रहाता ते मुलाला कळतात ,ही बातमी कळताच तो घरी निघून येतो,आईच्या उरलेल्या क्षणांना तो सोबत करतो..बाबांना हिंमत आणि आधार देत असतो.. त्याला ही कळत नाही हे काय घडत आहे,..त्याला आईच्या नसण्याने आयुष्याची कल्पना ही करवत नव्हती,ग बाबांकडे पाहून अजूनच वाईट वाटत होते,की त्यांचे काय होईल जर आईच नसेल तर,घर खायला उठेल त्यांना आणि मला ,तो आमच्या मधला आधार जर नसेल तर आम्हाला दोघांना कोण जोडून ठेवेल,कोण आमची सांगड घालेन,कोण माझे अपराध पोटात घेईल,मग विचार आला की बाबा कसे जगले असतील त्यांच्या आईशिवाय इतके वर्ष,त्यांना अजून ही त्यांची आई नाही ह्याची टोचणी लागली असेल ,जर मला इतकी लागत आहे.. मी तर आई शिवाय नाही बघू शकत हे घर..आता मला नेमके कुठे जावे हेच कळत नाही निदान आई सांगत होती बाबांना समजावून माझ्या वतीने पण तीच आता अशी निपचित पडली आहे ..

क्रमशः..........
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul