बाबा

बाबा


आई प्रेमानी घास भरवत असताना मला अंगाखांद्यावर खेळवणारे माझे बाबा...
आई अभ्यास घेत असताना मी ऐकला नाही तर रागवणारे माझे कठोर बाबा .... आणि नंतर 'मी जरा जास्तच रागावलो का?' असं आईला हळूच विचारणारे माझे प्रेमळ बाबा...

भाग्यश्री थोरात.
जगच्या जागी वस्तू नाही ठेवल्या गेल्या आणि वेळच्या वेळेवर काम नाही झाले तर चिडणारे शिस्तप्रिय बाबा.....
परीक्षेत पास झाल्यावर पेढे आणणारे.
आपल्या मुलांसाठी आवर्जून वेळ काढणारे माझे बाबा...
गर्दित वाट काढत काढत माझे जास्तीत जास्त फोटो काढणारे माझे बाबा... माझा नाही आला तर समूजन सांगणारे बाबा.... नोकरीत व्यस्त असताना, आई कोणत्याही कर्तव्यात कधीही कमी पडणार नाही हे माहिती असून आजी आजोबांच्या गोळ्या औषधांची फोनवर चौकशी करणारे माझे कतव्यदक्ष बाबा...
बाबा नुसतं ऑफिस करतात असं म्हणताना या सगळ्या गोष्टींचा सहज विसर पडतो ना?
पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण, मुलाला मोठ्ठा करतो हाच तो बाप...
ज्या घरात बाप आहे त्याकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही.
हाच तो वडील ज्याला जवळ घ्यायला वेळा नाही... मुलाला चांगले मार्क्स मिळाले तर आई पापी देते... पण बाप हळूच पेढे आणून वाटतो हे कोणाला लक्षात येत नाही.
आमच्या मुलांना आमच्या लहानपणीचे किस्से सांगताना त्यामध्ये रमून जाणारे माझे बाबा...
कुटुंबातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक अडचणीत खंबीरपणे उभे राहून कुटुंबातल्या सगळ्यांना आधार देणारे माझे खंबीर बाबा.
आमच्या जीवनात आई आणि बाबा दोघांचेही महत्त्वाचे स्थान आहे... कुठेतरी वाचलं होतं आई घराचं मांगल्य आहे तर बाबा घराचा आधार अगदी बरोबर आहे....

भाग्यश्री थोरात