बाबा नावाचं छत्र #fathers day#_ अलक

Babanch prem Aaj mihira cha vadhdivas

बाबांच प्रेम..
आज मिहिराचा वाढदिवस, पण बाबा गेले होते गावाला, मिहीरा संध्याकाळ पर्यंत हिरमसून बसलेली...बाबानी हळूच डोक्यावर हात ठेवत, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या पिल्लुला” “आय लव यु बाबा” असच असत बाबांच प्रेम

_____________________________________________

हेच माझे बाबा..
“नेहा आज फादर्स डे आहे, बाबांना सोबत आणायचं तुला सांगितलं होतं ना....”
हो मॅडम ,आणलंय ना...अग बाबा..?बाबा नाही आले...
“मॅडम हीच माझी आई आणि हेच माझे बाबा..बाबांच्या कोणत्याच कर्तव्यात ती कमी पडली नाही...
“happy fathers day mamma”

__________________________________________

पत्र
मिल्ट्रीत असलेल्या बाबाला पत्र
प्रीय बाबा,मला तुमची खूप आठवण येते, मी देवबापाला सांगून तुम्हाला बोलावून घेणार आहे, आय लव यु बाबा, तुमची जागा कुणीच घेऊ शकत नाही बाबा, तुम्ही या लवकर, नाहीतर मला तरी बोलवून घ्या..
तुमचा
चिंटू

___________________________________________

माझे बाबा..माझं आयुष्य
स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी..असे म्हणतात पण आई प्रमाणेच बाबांचे अस्तित्व पण मुलांच्या आयुष्यात गरजेचे आहे...संसाराचा रथ दोन्ही चाकावर चालतो..मुलांचं आयुष्य घडवायचं असेल..तर बाबांची छत्रछाया हवीच..माझे बाबा माझेे आयुष्य..मधु चया भावना

_________________________________________

फादर्स डे गिफ्ट
बाबा झोपले होते, मनु बाबांच्या जवळ जाऊन...
“हॅपी फादर्स डे बाबा..माझ्या साठी फादर्स डे रोजच असतो कारण तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात,पण रोज मी तुम्हाला गिफ्ट नाही देऊ शकत म्हणून आजच देतीय...बाबा मी माझ्या हातानी बनवलेलं ग्रीटिंग..बाबांनी मनूला मिठी मारली

__________________________________________
प्रेमाची झप्पी..
हरवलेल्या आराध्या ला पोलिसांनी घरी जेव्हा घरी आणले ..आराध्या अगदी घाबरलेली होती, बाबा आपल्या ला रागावणार या भीतीने पोलिसाच्या मागे लपून होती, बाबांनी जोरात आवाज दिला आराध्या इकडे ये, आराध्या हळूच समोर आली, बाबांनी कसून प्रेमाची झप्पी दिली..

_________________________________________
बाबा नावच छत्र... 
रोहन च्या बाबांना जाऊन दहा वर्षे झालीत...या दहा वर्षात रोहन प्रत्येक फादर्स डे ला वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या सोबत वेळ घालवतो... त्याच्या डोक्या वरच बाबा नावच छत्र गेलं पण मायेन डोक्यावर आशीर्वाद द्यायला शेकडो हात मिळाले...

____________________________________________

हाच माझा बाबा...
मुलगी झाली म्हणून आजीनी मला फेकून दिल होत ,पण माझ्या बाबाने मला उचलून आणल,माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून माझं स्वागत केलं, हाच माझा बाबा ज्याच्यामुळे मला जीवनदान मिळाले..

_____________________________________________
बाबांच पारितोषिक..
आज सिमरनला उत्कृष्ट नर्तिका म्हणून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.. शाल आणि श्रीफळ, पारितोषिक देऊन तिच स्वागत करण्यात आलं...तिनी स्टेज वर बाबांना बोलावून ते पारितोषिक बाबांच्या हातात दिल..
“हे सगळं माझ्या बाबांमुळे शक्य झालं,याचे खरे मानकरी माझे बाबा आहेत...बाबांची छाती गर्वाने फुलली..

___________________________________________
बाबांना पत्र
सकाळी सोमेश ला उशी जवळ चिट्टी दिसली आणि तो वाचयाला लागला,
“प्रिय बाबा, मी कधी बोलले नाही, पण तू माझा सगळ्यात बेस्ट बाबा आहेस,तुझ्याशिवाय माझ्या जीवनाला पूर्णतः नाही बाबा माझ्यावरचा राग दूर सारून एकदा मला मिठीत घे..
तुझी परी..सोमेश चे डोळे पाणावले..आणि तो लगेच धावत गेला..पण तो विसरला होता ती या जगात नाही ते परीच जून पत्र होत..आणि सोमेश ढसाढसा रडला...बापच काळीज तीळ तीळ तुटणारच..दाखवत नसला तरी त्यालाही मन असतच...