बाबा चुकीचा नसतो...

बाबाची परी..

बाबा चुकीचा नसतो…


भाग १ 



"ऋषी, ऐक ना.." 

"बोलो जी पापा की परी.." 

"काय रे असा नेहमी पापाकी परी करून चिडवत असतो.. " 

"पण मग तू नाहीये का तुझ्या बाबांची परी?" 

"शी बाबा..कट्टी.." धृती गाल फुगवून पलीकडे चेहरा करत रुसून बसत म्हणाली. 

ते बघून ऋषीने डोक्यावर हात मारला.."तुला पण ना ऋषी, भलत्या वेळेसच खोड्या करायची सवय आहे… पण चिडली की भारीच क्युट दिसते…चला आता मनवा.." तो तिच्या जवळ गेला. 

"जहापणा, इस नाचीजसे ऐसी गुस्ताखी फिर दोहराई नही जायेगी.." तो तिच्यापुढे उभा होत तिचे कान पकडत म्हणाला. 

"काय?" तिने परत डोळे मोठे करत त्याच्याकडे चिडक्या नजरेने बघितले. 

"Oops! काहीतरी चुकले वाटते.. बरं, परत अशी मस्ती कधी कधीच करणार.." तो स्वतःचे कान पकडत म्हणाला. 

"ऋषिकेश.." ती नाटकी चीडक्या स्वरात ओरडली.

"धृतिरा… यार किती कठीण नाव ठेवले माझ्या सासऱ्यांनी.." 

"तू माझ्या पप्पांवर जायचं नाही.. पहिलेच सांगून ठेवते.." 

"मी नाही जाणार तर कोण जाणार? आहेच असले खडूस. माझ्या मुलीशी लग्न करायचे असेल तर आधी घर घे म्हणे..नाहीतर मुलगी देणार नाही.. हिटलर कुठले.." 

"मग, बरोबरच आहे त्यांचं.. त्यांना त्यांची मुलगी सुखी बघायची आहे." 

"अरे पण मला जॉबला जॉईन होऊन चार वर्ष पण नाही झालेत..इतक्या लवकर घर घेणे शक्य तरी आहे का? त्यांनी तरी त्यांच्या २५ वर्षाचे असताना घर घेतले होते काय?" तो थोडा वैतागत म्हणाला. 

"तू तेव्हाचा काळ आणि आताच्या काळाचे कम्म्प्यारिजन नको करू.. बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडला आहे…" 

"काय फरक पडला आहे यार? घर म्हणजे अती नाही का झाले? स्वतःहून त्यांच्या मुलीचा हात मागायला गेलो होतो तर हे असे…अशा अटी ठेवणार.. हे यामुळेच आजकाल मुलांची लग्न होत नाहीये. मुली आणि त्यांच्या पालकांच्या अटी भरमसाठ.." 

"सोन्या, आपले लव्ह marriage होणार आहे..त्त्यांनी परवानगी दिली हेच नाही का खूप झाले.." धृती.

"हो, नसती दिली तर जसे काही मी पळवूनच नेणार होतो." 

"तू लाख नेले असते, पण मी यायला पाहिजे ना?" ती आपली बत्तिशी दाखवत म्हणाली. 

"हट्टी बापाची हट्टी पोरगी.. " 

"मला एक सांग, ज्या आईवडिलांनी मला इतकी वर्ष लहानाचं मोठं केलं.. एवढे प्रेम एवढा जीव लावला..माझं भविष्य चांगलं होण्यासाठी आपल्या जिवाचं रान करून मला शिकवलं..त्यांना सोडून जर मी तुझ्यासोबत पळून आले.. तर याची काय गॅरंटी की मी तुझं प्रेम पण सोडणार नाही.." ती हसत म्हणाली. 

"खडूस.. म्हणूनच तर आलो होतो तुझ्या घरी.. हिटलर सोबत बोलायला. लग्नाच्या गोष्टी दूर, त्यांनीच मला किती लेक्चर दिले.. किती किती सुनावले.. त्यात माझी आई सुद्धा त्यांना सामील झाली." त्याचा चेहरा एकदम बिचारा दिसत होता. 

ते बघून तिला हसू आले.

" बघ बरं, तू फ्लॅट बुक केला तर आई पण किती खुश आहेत.." 

"तुमच्या खुशीसाठी आम्हला आमच्या आवडी निवडी बाजूला ठेऊन मरे तो परी झिजावे लागते.." 

"किती झिजला, दाखव.." ती त्याची खेचायची म्हणून हसत म्हणाली. 

"कितीसारे लोन घेतले आहे फ्लॅटसाठी.." 

"हा मग ठीक आहे ना.." 

"यार, त्या लोनमुळे माझी निम्मी salary कट होतेय.. किती महिने झाले मी माझे आवडीचे शूज घेतले नाही." 

"साहेब, ऑलरेडी तुमच्याकडे शुजचे सतरा जोड आहेत." 

"सतरा नाही, सोळा.." 

"Aww.. baby.. रडू नकोस.." तिने त्याला चिडवले.. 

"पैसे वाचवण्याचा चक्करमध्ये मित्र सोबतच्या माझ्या पार्टी नाईटस कमी झाल्या.. साले मित्र, gf चेच ऐकतो म्हणून शिव्या पण देतात.." 

"दोन दिवस ड्रिंक कमी केले तर तुझं अन् सोबतीने माझे सुद्धा आयुष्य सेफ असेल ." धृती.

ते ऐकून त्याने परत डोक्यावर हात मारला, "तुझ्या अंगात असं मधूनच आशिकी दोन ची श्रद्धा कपूर कशी काय घुसते ग? एवढ्याने कोणी मरत नसते…अन् मी काय sucide वगैरे करणार नाहीये.." 

"आवड सवय बनते. आणि सवयीचे रूपांतर व्यसनात कधी होईल, सांगता येत नाही.. आणि त्याने घरं फक्त बरबाद होतात.." 

"हे भगवान…" त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. 

"जाऊ दे, तू भलताच विषय भलतीकडेच नेते.. जे काम करायला आलोय ते करूया.." 

"बरं झालं लवकर समजले.." 

"ह्मम, बोला मग कुठे काय काय बनवायचे आहे.. इंटेरियरवाला येईलच इतक्यात, त्याला सगळे डिटेल्स द्यायचे आहे.." 

"हो.. बघ ही मास्टर बेडरूम, इथे या भिंतीला वॉर्डरॉब करूया. इकडे फुल लेंग्थ आरसा.. आणि तिकडे किड्स बेडरूमला.." ती बोलतच होती की त्याचे डोळे चकाकले..

"किड्स बेडरूम… wow! I like it! मी काय म्हणतो थोडंसं प्रॅक्टिकल करून बघुयात का?" खोडकर आवाजात म्हणाला. 

"चावटपणा पुरे हा.. आणि लग्नाआधी काही नाही..आधीच सांगितलेय ना…" 

"यार ये वेजिटेरियन लडकी अँड ऊसका वेजिटेरियन प्यार.." तो पुटपुटला..

"काही म्हणाला?"

"मी म्हणत होतो, आता घरून परवानगी मिळाली तर आहे..मग काय हरकत आहे?" 

"तुला माझ्यासोबत लग्न करायचं की नाही?" 

त्याने परत तोंड वाकडे केले.. " पुढे बोला.. " 

"बेटर.. आणि हे हॉलमध्ये मस्तपैकी pop करूयात.. तिकडे झुमर, इकडे लाइट्स..आणि बाल्कनीमध्ये झुला..आणि तिथे मी खूप झाडं लावणार आहे.. माझी आवडती जागा बनवणार आहे.. तुला तर माहीतच मला झाडं, रंगीबेरंगी फुलं किती आवडतात… इथे बसून पावसाचा आनंद घेत गरम चहाचे घोट घेत आपल्या भविष्याच्या गप्पा करूयात.. " तिची आपली लिस्ट सांगणे सुरू झाले.. 

"वाढवा बजेट.." 

"असं काय करतो रे.. घर काय वारंवार घेतो का आपण? आणि माझं MBA पूर्ण झाले की मी पण जॉब करणार आहेच की.. तुझ्यावर फार बर्डन नाही येणार.. सोबतीने कमवू, सोबतीने संसार करू.. छान गोड आणि सुखी.." ती आनंदाने स्वप्नवत म्हणाली.

"हो ग माझी गोडुली.. " तो तिचे गाल ओढत, तिला एका हाताने आपल्या कुशीत घेत म्हणाला.. 

          थोड्या वेळाने इंटेरियरवाला आला.. त्याला ऋषी कुठे काय काय फर्निचर, कसे पॅटर्न हवे ते सगळं समजावून सांगत होता.. आणि ती एका ठिकाणी उभी, प्रेमाने तिच्याकडे बघत त्याचा रुपात आपले भविष्य रंगवत होती..  

*******

क्रमशः 

🎭 Series Post

View all