Login

बाबा चुकीचा नसतो... भाग 2

प्रेमाचा साक्षीदार.. पाऊस

बाबा चुकीचा नसतो…


भाग २ 

पूर्वार्ध: 

ऋषी आणि धृतीचे लग्न ठरले असते. ऋषीने धृतीच्या बाबांच्या अटी प्रमाणे एक फ्लॅट घेतला असतो. तिथे काय हवे नको असे इंटिरिअर बघायला दोघेही आले असतात.


आता पुढे.. 


  ऋषीने इंटेरियरवाल्याला सगळं सांगितले. थोड्या वेळाने तो निघून गेला. ऋषी धृती जवळ आला बघतो तर ती स्वतःतच हरवली होती. 

"या मुली पण अजब असतात.. छोट्या छोट्या स्वप्नात लगेच हरवून जातात.. पण ही खरंच छोटी स्वप्न होती का? यांच्या घराच्या स्वप्नात इकडे माझे हाल होतायेत.." तो स्वतःच्याच विचारात हसला..

"ओ पापा की परी… आता परत कुठल्या बंगल्याचे स्वप्न बघू नका.. नाही तर मी पळून जाईल.." ऋषी तिच्या डोळ्यांपुढे चुटकी वाजवत म्हणाला. 

"तू परत सुरू झाला? तू असे ऐकणार नाहीस.. तुला चांगले फटके द्यायला हवे.." म्हणत तिने त्याच्या हातांवर फटके मारायला सुरुवात सुद्धा केली.

थोड्यावेळ त्यांचा असाच गोंधळ सुरू होता..

"बरं, मारून पोट भरले असेल तर आता निघायचं?" ऋषी.

"ह्मम…" 

"म्हैस कुठली.." त्याने परत तिला चिडवले. 

"आगाऊपणा केल्याशिवाय तुझं अन्न पचत नसेल ना?" 

"वो तो हैं…और अगर तुम सामने हो तो.." 

"तू ना असे नाही सुधारणार.. लग्न होऊ दे बच्चू.. मग बघतेच तुला.." 

"कशाला इतके दिवस थांबते..मी तर म्हणतो आताच बघ.." तो खट्याळपणे हसत म्हणाला. 

"यार ही मुलं पण ना.. यांची सुई एकाच गोष्टीवर येऊन कशी अडकते?" ती बिचाऱ्या चेहऱ्याने त्याचाकडे बघत स्वतःशीच म्हणाली. 

"इंटेरियरवाला काय म्हणाला? किती दिवस लागतील कामाला?" ती विषय बदलवत म्हणाली. 

"तो आधी कोटेशन्स पाठवेल, मग डिसाईड करूया.. तसे पण लग्नाला आहे बराच वेळ.. होईल तोपर्यंत.." तो. 

"ओके." 

"बरं आणखी काही चौकश्या हव्यात की निघुयात?" 

"हो.." एकदा तिने त्या बुक केलेल्या फ्लॅट वरून एक नजर फिरवली आणि दोघेही बाहेर पडले. 

हवेसोबत गप्पा करत त्याची बुलेट पुढे जात होती.. पावसाळा सुरू होता..वातावरण सुद्धा खुप मोहक होते..

"धृती, इकडे नदी आहे, खूप छान आहे.. थोडे फिरुयात?" 

"जाऊ दे ना, जाऊया आता.." ती उत्तरली.

"आजकाल कुठे तू अशी नेहमी नेहमी भेटतेस.. जाऊया की.. तेवढेच थोडा वेळ सोबत घालवता येईल.." 

"मागच्या तीन तासापासून सोबत आहोत..कमीच आहेत?" 

"कसली अरसिक आहेस तू? इतकं छान वातावरण आहे.. लोकं तरसतात अशा वातावरणात फिरायला… अन् तू आहेस की एकदम बोर.. मानमान मिनत्या कराव्या लागतात.." 

"पुरे झाला नौटंकीपणा.. चल.." ती पाठीमागून त्याचे गाल ओढत म्हणाली. 

त्याने घराचा रस्ता बदलून नदीकडे आपली बाईक घेतली.. दोघेही त्या नदीकिनारी रममाण झालीत.. गप्पागोष्टी, वाळू मध्ये नावं कोरून झालीत.. पकडापकडी, मारामारी झाली.. आता आभाळून यायला सुरवात झाली..

"ऋषी, बहुतेक पाऊस येणार. चल मला हॉस्टेलला सोड." ती म्हणतच होती की पावसाचे टपोरे टपोरे मोती तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागले..

"तुला माहिती, हा पाऊस प्रेमाचा साक्षीदार असतो..सगळ्या प्रेमीजीवांना हवाहवासा.. " तो तिच्या चेहऱ्यावर आपली नजर स्थिरावत बोलत होता. 

"अरे पावसाचा वेग वाढला तर अडकून पडू.." 

"आणि पावसात रोमान्स नाही केला तर मग काय रोमान्स केला.." 

"पावसाचा जोर वाढतोय ऋषी.." 

"पावसातले प्रेम आयुष्यभर आठवणीत राहते.." 

"उशीर होईल.." 

"तू खूप सुंदर दिसतेय धृती.." 

त्याला बघून तिने डोक्यावर हात मारला..

"अरे मी काय सांगतेय, तू काय बोलतोय.." 

"मी म्हणतोय, तू खूप सुंदर दिसतेय.. अगदी परी.. माझी परी.." हळूवारपणे बोलत बोलत त्याने एक हात तिच्या कंबरेत घालत तिला स्वतःजवळ ओढले.. 

      वरतून बरसणारा पाऊस, त्याचे गोड प्रेमळ आवाज, त्यात त्याचा उबदार गरम स्पर्श..ती सुद्धा त्याच्या नजरेत कैद झाली.. 

      ती पण आपल्यात हरवली आहे बघून त्याने एका हाताने तिची हनुवटी वर करत, तिच्या डोळ्यात बघत तिच्या ओठांचा ताबा घेतला.. 

      श्वास जड व्हायला लागले तसे तिने त्याला दूर ढकलले…

"चला पावसाचा जोर वाढतोय, निघायला हवे.." तो तिचे विस्तारलेले डोळे बघून म्हणाला..

"कळलं तर तुला.." ती कंबरेवर आपले दोन्ही हात ठेवत लुटपुट्या रागाने म्हणाली..

"हो.. तुझा नजरेचा बाण…" 

"पुरे झाले, चला.." 

दोघंही बाईकवर रूढ झाले आणि पुढचा रस्ता पकडला.. पावसाचे बरसने सुरूच होते.

*******

क्रमशः 


🎭 Series Post

View all