Login

बाप (अभंग)

बाप - अभंग


*विषय - बाप*


माझा जन्मदाता, भक्कम आधार/
झेलतो रे भार,डोईवर //१//

दिवस नि रात्र, सदा करी काम।
जीवास आराम, नसे कधी//२//

करितो रक्षण, होऊनिया ढाल/
सोसतो तो हाल, निमुटच//३//

बनुनी खंबीर, कुटुंबाचा कणा,
दाखवितो बाणा, कर्तव्याचा//४//

नाही होऊ दिली, कसली उणीव
दु:खाची जाणीव,कधी त्याने//५//

अदृश्य प्रेमाचा, असुनिया झरा/
फुलता निखारा, भासवितो/६//

बोट धरुनिया, दाखविली वाट/
चढविला घाट, जीवनाचा//७//

लाभे मज स्वर्ग, छत्र छायेखाली/
मायेची सावली, देतो बाप//८//

गर्व आहे मला, माझ्या ग पित्याचा/
आमच्या नात्याचा, सर्वकाळ//९//
---------------------------------

सौ.वनिता गऩेश शिंदे ©®

🎭 Series Post

View all