बाप -२

माझी बहीण आता मोठी झालेली आहे.......

" माझी बहीण पण आता मोठी झालेली आहे. काही वर्षात तिच्या लग्नाचं बघायला हवं. हे प्रयत्न कोण करणार? सांग. मी काही अनुभवी नाही. तू विचारलस ना, बी. कॉम नंतर काय करणार? मी काहीच करू शकत नाही. खरं म्हणजे मला लहानपणापासून जज्ज व्हावसं वाटायच. पण त्यासाठी नोकरी सोडून काही वर्ष वकिली करावी लागेल. ते कसं जमेल? पण मला न्याय करणं फार आवडत. "


"अस आहे ना? मग तू आईला का समजून घेत नाहीस? तिच्याबरोबर पण न्याय करायला हवास. एकटीने बाहेरील जगाचे हल्ले पचवून तुम्हा मुलांना वाढवण तिला किती त्रासदायक झालं असेल, नाही? तिची किती घुसमट झाली असेल. कितितरी वेळा तिलाही भीती वाटली असेल. तिनी कोणाला सांगायचं? तुटपुंज्या पैशात संसार कसा रेटला असेल? अरे एक लहान मूल वाढवायचं म्हणजे काय कमी त्रास होतो का? तुम्ही तर तिघे होतात. " मी उत्तेजित होऊन म्हंटले. जसा काही मी एका मुलाचा बाप होतो. बियर संपली . खिमा पाव आला. मग परत बियर मागवली. तो अधून मधून खात होता आणि विचारात गढत होता. काहीतरी विचारायच म्हणून मी विचारलं, "तुझ्या वडलांनी सोडलं तेव्हा तू किती लहान होतास.? "

"चल, आता सगळच सांगतो तुला. त्याच काय आहे की माझा बाप एम. ए वुइथ इकॉनॉमिक्स होता. लग्नानंतर त्याला संजय कॉलेजमध्ये प्रोफेसरशिप मिळाली. कदाचित ती आम्हाला सोडल्यावर मिळाली असेल. तसे आमच्याकडे येणारे जाणारे त्याच्यामुळे बरेच लोक होते. त्यातलेच दिवेकर काका. ते आमच्या समोराच राहतात. माझी आई जेमतेम मॅट्रीक असावी. ती घरातच असायची. बाप साला तिला नेहेमीच कमी शिकलेली, म्हणून घालून पाडून बोलायचा. ती भोळसट, म्हणून तिला वाटेल त्या थापा मारायचा. एक एक रात्र तो घराबाहेर राहायचा. मी लहान होतो. तरी तिसरी चौथीत असेन. अशावेळी घरातल वातावरण वेगळ असल्याचा मला अंदाज यायचा. सुरुवाती सुरुवातीला हा प्रकार कमी व्हायचा. मग तो आठवड्यातले तीन तीन चार चार दिवस येइनासा झाला. पैशाची फार चणचण नसली तरी खूप सुबत्ता होती असही नव्हत. साधारणपणे मागीतलेली वस्तू मिळत असे. बाप अधून मधून प्यायचा किंवा पिऊन यायचा. आणि साला आमच्यावर आणि आईवर राग काढायचा. तरीही आई त्याचे सगळे चोचले पुरवायची. तो जेवायला बसला की त्याला ती वारा घालायची. काय हव नको ते डोळ्यात तेल घालून पाहायची, आग्रह कर करून ति त्याला खायला घालायची. पण भड्व्याला कधी तिच्याशी नीट बोलायची इच्छा होत नसे.

एक दिवस रात्री आम्ही मुलं आणि आई झोपलो होतो. एक दीडचा सुमार असेल. काय झाल काही कळल नाही. फाटकन दरवाजा उघडला आणि बाप आत आला. तो आज जाम रागात असावा. मला वाटलं प्यायला असेल. पण प्यायला नव्हता. माझी झोप थोडी चाळवली होती. पण मी अर्धवट झोपेत होतो. बाहेरची खोली आणि आतली खोली यात लाकडाचं पार्टीशन होत. त्याला लहान लहान फटी होत्या. बापाने आईला हाताने खेचून आतल्या खोलीत नेले. दरवाजा बंद केला. तिला दोन चार थोबाडीत मारून म्हणाला, " च्यायला, तुझ्यामुळे माझं नशीब अजून उजळत नाही. चांगली नोकरी अजून मिळत नाही. " आई खोलीतल्या कोपऱ्यात दुःखाने आणि निराशेने कोलमडून पडली होती. ती हळू आवाजात विव्हळत होती. तो दात ओठ खात पुन्हा ओरडला, " लोकांच्या बायका कशा नीट नेटक्या आणि अट्रॅक्टिव्ह राहतात. तु जन्म्जात दरिद्री. साली चांगली कधी दिसत नाहीस. अपशकुनी साली. तुझ्या बापानी हे दरिद्र माझ्या गळ्यात घातलं. हे बघ आत्ताच्या आत्ता मी घर सोडून जाणार आहे. ज सा आ हे त सा . (प्रत्येक शब्दावर जोर देत) मला इथलं काहीही नको आहे. तुझी ही सगळी पिलावळ सांभाळायची, मला आता कंटाळा आलेला आहे. " तरी पण आईने त्याचे पाय धरले. मी आता चांगलाच जागा झालोहोतो. पार्टीशनच्या फटींतून जेवढे पाहाता येत होत तेवढ पाहात होतो. अधून मधून भीतीने मी थरथरत ही होतो. आता बाबा गेले तर आपली आई काय करेल? ती आपल्याला काय खायला घालेल? असे विचार तेव्हाही माझ्या मनात आले. मला एकदम असुरक्षित वाटू लागलं. मग आई कळवळून म्हणाली, " तुम्ही सांगाल तशी वागेन हो मी. मी.., मी नीट राहीन. मी सगळ करीन. तुम्ही मला आणि मुलांना टाकून जाऊ नका हो. मी तुमच्यासाठी उपासतापास सगळ करीन. बघा लवकरच फरक पडेल. ". रडत रडत आईने त्याच्या पायांना मिठी मारली. मग माझे हुंदके ऐकू आल्याने आईला लाथेने उडवून बापाने मधले दात उघडले. आईच्या आर्जवांकडजे दुर्लक्ष करीत तो निघून गेला. मी आईला बिलगून रडत राहिलो, मला झोप कधी लागली कळल नाही. रात्रभर आई जागी असावी. मी जागा झालो. कालच द्रुश्य माझ्या डोइळ्यासमोरून हालत नव्हत. सकाळ झाली होती. आई पण शेजारीच झोपली असावी अस वाटल. पण छे, आई अतिशय कष्टाळू होती. नळ पण असा होता की सात वाजताच जायचा. ती केव्हाच उठून पाणी भरीत असावी.

तिने मला आणि माझ्या इतर भावंडाना उठवलं. नेहेंमीप्रमाणे चहा नाश्ता केला. तिच्या तोंडावर कालच्या रात्रीचे थोडे देखिल अवशेष दिसले नाहीत. उलट तिने मला आणि दुसऱ्या दोघांना उत्साहाने तयार केले व अभ्यासाला बसवले. तिला फारस शिकवता येत नसे. पण जे पायच ते ती अगदी प्रेमाने शिकवायची. त्यामुळे आम्हाला ती फारच आवडायची. असेच दिवस गेले, आठवडे गेले, महीने गेले, वर्ष पण गेली. तू म्हणशील हे तर नॉर्मल आहे. सुरुवातीला अधून मधून काही महिने बापाकडून पैसे यायचे. नंतर नंतर मात्र ते सहासात माहिन्यानी बंद झाले. आईने वास्तव स्विकारलं असाव. पैसे येण्याचे बंद झाल्या वर आईने शेजाऱ्यापाजाऱ्यांना कमासाठी विचारल. पण तोंडावर हात थेऊन कुत्सितपणे हासत त्यांनी नकार दिला. तिची भांडी घासण्याची, स्वयंपाक करण्याची तयारी होती. पण तिला कोणी काम दिले नाही. एक दिवस आई काम शोधायला बाहेर गेली होती. आम्ही मुलं शाळेच्या तयारीत होतो. तो एक माणूस दाराशी आला. वाण्याचा नोकर असावा. तो म्हणाला, "ए तुझी आय कुठे आहे? साला तुमा लोक्ला हमेशा उधार कसा देल? आजपासून उधार बंद. मागचा एकसो छे रुपिया ने बारा आना बाकी हाय. वो जल्दी लाव, और उधारकी भीक मांगने कही और जाव. "


लवकरच आईला धुणी भांडी स्वयंपाक आणि कपडे शिवायची कामं मिळाली. पण सकाळी आमचा नाश्ता झाल्यापासून ते अगदी संध्याकाळी सात साडेसात पर्यंत कामात गुंतली. रविवार, सुटीचे दिवस तर तिला जास्तिची कामं असायची. काही लोक जास्त पैसे देत, तर काही त्याच पैशात जास्त काम कायला सांगत. पण कामं सोडण शक्य नव्हत. मध्ये मध्ये मलाही काम करावस वाटायच. पण प्रयत्न करूनही मला कोणी काम देईना. खुप वाईट वाटायच. मग मी नाद सोडला. आता मी मॅट्रिकच्या वर्गात आलो. इतर मुल क्लासेस लावीत. मला तर पुतक घेणंही मोठ मुष्किल होत. इंग्रजी, गणित विज्ञान माझ मीच केल. अधून मधून दिवेकर काका चोरून चोरून यायचे आणि दोन दोन तास शिकवायचे. ते रेल्वेमधून निव्रुत्त झालेले होते. आम्च्याशी चाळितले लोक संबंध ठेवित नसत. शिवाय आईबद्दल वाटेल ते ऐकायला यायच. त्यांच्यामते ती सकाळ पासून बाहेर जायची ते गाव भटकायला. ते तिला गावभावानी म्हणत. कळल कातुला "गावभवानी "म्हणजे काय ते? तोंडावर कोणीही बोलत नसे. नाहीतर मी त्याला मारूनच काढला असत्गा.

अकरावीच्या वर्गाची फी भरायलाही माझ्याजवळ पैसे नव्हते. एक दिवस शाळेत नोटिस आली की ज्यांनी शाळेची फी भरली नाही त्यांनी एक तारखेपासून शाळे त बसायच नाही. अर्थातच माझ नाव त्यात होतच. शालेचही बरोबर होत. तीन चार महिने झाले तरी शाळेची फी भरली गेली नव्हती. आईला मिळणारे पैसे इतकेच असायचे की आमचा घरचा खर्च जेमतेम भागायचा. कपडेलक्ते तर दुरच होते. मग एकदा दिवेकर काका घरी आले तेचा मला म्हणाले, "काय रे तुझा चेहरा असा पडलेला का? कोणी काही बोललं का? " त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. मला भरून आलं. मी काकांना माझी अडचण सांगीतली. ते म्हणाले, "हे बघ, सबंध वर्षाची फी आणि परीक्षेची फी मिळून अडीचशे रुपये होतात. मी तुला तिनशे रुपये देतो. तेवढे भरून टाक. आणि आता अगदी जोमाने तयारीला लाग., "मी त्यांना वाकून नमस्कार केला. ते म्हणाले, ":अरे मी विशेष काही करतोय का? मला आणखीन एक मुलगा आहे अस समजेन. " मी म्हंटले "पण काका काकूंना आवडणार नाही ना? " ते म्हणाले, " अरे काकूला कोण सांगणार आहे? ते सगळ सोड आणि तू अभ्यासाला लाग. "त्यांनी दुसऱ्या दिवशी पैसे दिले. मी फी भरून एक दोन पुस्तक घेतली. त्या रात्री काय झालं कोण जाणे दिवेकर काकूंचा दणदणीत आवाज येत होता. "त्या सटवीच्या मुलासाठी तुमचा इव तुटतो. पण आपल्या मुलांना कधी शिकवलत, दोन दोन तास काढून? " काका समजवायच काम करीत होते. पण काकू बोलतच राहिल्या. "आख्ख्या चाळीने झीडकारलेली माणस, पण तुम्हाला त्यांचाच पुळका. "काकाच्या समजावण्याचा काही उपय्होग होत नव्हता. मला मात्र आपण ते पैसे उगाचच घेतले अस वाटल. मी त्यांना एकद म्हंटल ही तस. तर्फ ते म्हणाले, " एकदा म्हंटलयस पुन्हा अस म्हणू नकोस. मी नक्की सांगतो एक दिवस असा येईल, आज जे लोक तुझ्याशी बोलतही नाहीत, ते तुझ्या मेहेरबानीसाठी तुझ्याच मागेपुढे फिरतील.

(क्रमशः)