बाप नावाचा दीपस्तंभ #fathers_day #अलक

फादर्स डे निमीत्त वडीलांची मुलांच्या नजरेतील प्रतिमा आणि वडीलांची मुलांप्रती भावना म्हणजेच

बाप नावाचा दीपस्तंभ #fathers_day#अलक


कामावरुन थकुन आलेले बाबा , मुलगी वाट बघतेय , अहो बाबा दुकानातून पेन्सिल आणायची आहे होम वर्क राहीला , बरं चल . धीरोदत्त थकलेले बाबा मुलीला दमलेले बघुन कळवळून , आराम कर बाळा !अहो औषध संपली ना तुमची ? 
सांगा आणायला , अगं नंतर आणता येईल , घाई नाही !

———————————

सकाळी तयारी करुन वामनराव घरा बाहेर निघाले , अवं जरा कामाच बघुन येतो , सेठ तीन दिसां पासून काम नायी धान्य संपल , काम हाय का ? काम आहे दिवसभराचे 350 रुपये मजुरी , मजुरी केल्यावर किराणा घेत असता मुलगा आला बा,,तू बोल्ला होता कॅडबरी देणार , बरं घे ! ते 50 रु.च द्या .

————————————

दिनकरराव कंपनीत कामाला होते , वर्षाला चार वर्दीचे कापडं मिळायचे , घर चालवताना तारांबळ व्हायची , दोन वर्दी शिवुन आलटुन पालटुन घालायचे , बाकी कापडाचे मुलाला शर्ट पॅन्ट , बेटा ही आनंदून सेम टु सेम म्हणायचा ,15 चा झाला , नको तो कापड लाज वाटते , जीन्स टी शर्ट हवा , बरं बाबा घेऊन देतो .

————————————

अहो मला मुलगा झाला हे घ्या पेढे ! त्याला हवे ते सर्व दिले , परिणाम मुलगा मोठ्या जबाबदारीच्या पोस्टवर आरुढ ! अरे किती दिवस झालेत तुझा आवाज ऐकला नाही , तुझी आठवण
आली तू ये नाहीतर मी येतो , काय सारखे फोन करता , मी कामात व्यस्त आहे नंतर बोलतो , फोन कट झाला .

———————————

मार्केटमधे गेलेले दोन बहीणी एक भाऊ , खरेदी आणि हाॅटेल मधे नाश्त्या वरुन झालेली चिडचिड , क्रुद्ध होऊन भाऊ त्यांना सोडून घरी निघुन गेला रात्री , मुलीचा फोन त्या टॅक्सीने येतील घरी बाबा लगेच म्हणाले तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा मी बस निघालोच येतोय तुम्हाला घ्यायला , तिथून हलायचं नाही .

—————————————

एक इंन्सपेक्टर कडक शिस्तीचे शिस्तबद्ध काम , त्याच बरोबर गुंडाचे कर्दनकाळ गरीबांना मदत करणारे ,राजकारण्यांना हावी होऊ न देणारे , बेकायदेशीर काम करणार्‍यांच्या विरुद्ध ऊभे राहणारे व्यक्तिमत्व . काय नोकरी केलीत , शिपायांचे सुद्धा
मोठे बंगले आहेत ! बाबा शांतपणे मुलांची बोलणी ऐकतात .

——————————————

बाबा तुम्हाला कळत नाही , तुमचा जमाना गेला , आता असं चालत नाही , आपण कसे आहोत हे सांगितल्या दाखवल्या शिवाय लोकांना पटत नाही , तुम्ही मधे बोलू नका . वासवेकर
आहात का घरी , या दिवाडकर काय काम काढलत ? तुम्हाला समाजकार्यासाठी पद्म श्री पुरस्कार जाहीर झाला .

——————————————

कुटूंबा चा प्रमुख , कमावता , घरातील लहान मोठ्या सदस्यां च्या आरामात राहण्याची सदा काळजी घेणारा , संरक्षण देणारा , प्रसंगी दुःखात धीर देणारा मी आहे तुमच्या पाठीशी सांगणारा कर्ता पुरुष बाबा ! 
फार गाजवतो म्हणुन घरातील लोकं नावं ठेवतात .

———————————————

लाडक्या लेकीला सायकल आणली , एकटीच अंगणात
चालवायची , शेजारच्या दादाला दोन चाकी चालवताना बघायची , बाबांनी तिला बघीतले , इच्छा जाणली , मैदानात
शेजारचे दोन चाकं काढले , भीती वाटते ! मी पकडतो चालवं फक्त समोर बघ,लेकीने स्पीड घेतल्यावर बाबांनी हात सोडले .

———————————————

छोट्याश्या नोकरीत कमी पगारात तीन मुलांना चांगले शिक्षण देणे , नवर्‍याची ओढाताण व्हायची , त्यातच मुलीला स्थळ सांगुन आलं , डोळ्यात चिंता दाटली , कसे होणार , आई शी बोलताना सरिताने खंत बोलुन दाखविली , स्पीकर वरुन बाबांनी ऐकलं , तुझा बाप अजुन जीवंत आहे , सांग तिला .

————————————————