Login

बाप न उलगडणार कोड

हृदय स्पर्शी

बाप मनाचा सागर हाय, शब्द बोलतो थोडं,
मनातल्या वेदना लपवून, जगतो झाडासारखं मोठं.

पोरांसाठी पाण्यासारखा, वाहतो आयुष्यभर,
नसली हसूची सवय तरी, मनाचं जग असतं भरभर.

चपला फाटल्या तरी चालतं, संसार फाटू नये,
हात पाय दुखले तरी, पोरांचं पोट भरायला हवं.

बापाला कोण समजतं, तो तर कायम गप्प,
मनातलं दडवून ठेवतो, तोच खरा जगाचा खंबीर बाप.

लई अवघड हाय गड्या, समजायला बाप रं,
आयुष्यभर देत राहतो, न मागताच प्रेमाचं साथ रं.


🎭 Series Post

View all