आयुष्याच्या या वळणावर - भाग 2

मधू : you are my great ajjjuuuu.....  आजोबा : ( तिच्याकडे बघणं हसत ) बस झालं नौटंकी,,  चला आता घरी जाऊ बराच वेळही झाला ??

तिन्ही सांजे ची वेळ होती. दिवसभर खोलीत बसून मधुरा कंटाळून गेली होती. तशीच उठून ती हॉल मधें आली.  आईने सगळ्यांसाठी चहा करुन आणला होता.  तिनेही सगळ्यन सोबत चहा घेतला. तिचे आजोबा नेहमी या वेळी फिरायला जात असत. आजोबानी तिलाही फिरायला येण्यासाठी आग्रह केला. तसें तीही आनंदाने तयार झाली.
चालता चालता थोडा वेळ इकडं तिकडंच्या गप्पा झाल्या  आणि आजोबानी कालचा विषय काढला.

आजोबा : मधू बाळा,  काल मी तुझ्या चेहऱ्याकडे बघून लग्नाचा विषय संपवला. तू खूप काळजीत दिसलीस मला... काय ग काही अडचण आहे का? 

मधू : नाही,  आजोबा अडचण अशी काहीच नाही. पण मी आता तर नोकरींला सुरुवात केलीये आणि लगेच हे लग्न वगैरे मला नको वाटतंय.

आजोबा : हे बघ,  आज ना उद्या हा विषय तुझ्या समोर येणारच आहे.  आणि तुझंही काहीच प्लँनिंग असेलच na... तुझे असे काहीच विचार असतील तर ते सांगून टाक घरी... नेहमी नेहमी तुझा आजोबा असेलच असं नाही ह...

मधू : असं काही बोलू नका... तुम्ही माझ्या बरोबर आहात कायम he माहित आहे मला.... 
तसा मला आता फक्त माझ्या करीयरच टेन्शन आहे.  बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही. 

आजोबा : तुला समजतं नाहीये मी काय म्हणतोय ते..... पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्य खूप वेगळं असत.  तुझं करीयर तू लग्नानंतर सुद्धा करू शकते.  पण आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.  ती मात्र टळू  नये. तू तुझ्या अपेक्षा सांगून टाक सगळ्यांना आपण मग तसें मुलं बगु.

मधू : मला लग्नानंतरही नोकरीं करायची आहे हे तर नक्की.. अपेक्षा म्हणल तर मी आणि माझा स्वभाव तर घरच्याना माहितच आहे..  आणि मला माहित आहे तुम्ही सगळे मला सजेसा मुलगा बघाल.

आजोबा : मधू,  राग येऊन देऊ नको...पण हल्ली ते ट्रेंड म्हणतात ना तसेच काही चालू आहे बघ... 
मुली नवरा स्वतःच शोधतात आणि मग घरी सांगतात... तस काही असेल तरीही सांग... 

मधू : मला कधी तुमचा राग आलाय का?  ट्रेंड वगैरे काही नाही हो आजोबा... ज्याला पटत ते करत,  ज्याला नाही ते नाही करत... 
आणि माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही.
माझ्यामते घरच्यांनी आपल्या पसंतिने जुळवलेली लग्नच बेस्ट असतात... 

आजोबा : छान, तुझे विचार ऐकून बर वाटलं. 
तर मग तू सांगशील आज घरी?? 

मधू : आजोबा,  तुम्हीच सांगा ना.... 

आजोबा :  बर,  बोलतो मी सगळ्यांशी.... 

मधू : you are my great ajjjuuuu..... 

आजोबा : ( तिच्याकडे बघणं हसत )
बस झालं नौटंकी,,  चला आता घरी जाऊ बराच वेळही झाला आहे.. 

मधू : yes ( असं म्हणून दोघेही पटापट घरी जातात )

सगळेजण जेवणाच्या वेळेवर येऊन स्वयंपाकघरात बसतात.. मधू उद्या जाणार होती म्हणून आईनेही जेवणचा बेत अगदी मस्त केला होता. मसाले भात,  भाजी,  चपाती,  खीर....  सगळं अगदी तिला आवडत ते... खीर बघून सगळ्यना एकदम बबलूची खूप आठवण आली.

( बबलू म्हणजे मधूचा मोठा भाऊ,  तो नोकरी निम्मित बाहेरगावी असे )
मधूने लगेंच मोबाईल आणला आणि विडिओ कॉल केला. त्याच्याशी बोलत सगळ्यांनी मस्त जेवणाचा आस्वाद घेतला.... 

बघुयात मग मधू आपला जोडीदार कसा निवडतेय...

🎭 Series Post

View all