आयुष्याच्या या वळणावर - भाग 1

पल्लवी : हॅलो मधू,  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या...  मधुरा : थँक यु पल्लू... कशी आहेस...मी गावी आले आ

मधुरा.... नावासारखिच गोड,  शांत आणि अत्यंत  लाघवी अशी ही या कथेची नायिका.. 
स्वतःच्या हिमतीवर एक इंजिनीर झालेली मुलगी मधुरा. सध्या पुणे येथे एका नामांकित कंपनीमधें जॉब करत होती.

आज मधुराचा 23 वा वाढदिवस होता. तिला घरी जाऊन बरेच दिवस झाले होते. आजच्या या  निमित्तताने ती घरी आली होती. नेहमीप्रमाणे लवकर उठून योगासने करुन ती तिच्या आवडत्या बाप्पा कडे जाऊन आली. घरी येऊन आई,  बाबा आणि आजोबा यांचा  आशीर्वाद घेऊन दिवसाची सकाळ प्रसन्न केली.
अजूनही तिचा काही प्लॅन नव्हताच या दिवसाचा.
तिच्या गोड स्वभावामुळे जपलेली अशे खूप मित्र- मैत्रीणी होते तिचे. अगदी शाळेतील बेंच पार्टनर पासून ते कॉलेज हॉस्टेल  मधील रूममधील मैत्रीण....सगळ्याचे फोन येऊन गेले.
तरीही ति आज थोडी नाराजच होती.
कारण तिचा हक्काचा असणारा असा एक ग्रुप होता.  पण आज कोणच्या लक्षातही नव्हतं तिच्या वाढदिवसाबद्दल. एक खंत तिच्या मनात राहून गेली.. बरेच दिवसांनी ती घरी सुद्धा आली होती त्यामुळे आज घरी सगळेच उत्साहात होते.
दुपारी जेवणासाठी मस्त तिच्या आवडीचा बेत केला होता. दुपारी सगळ्यची जेवन झाली.
अचानक तिचा फोन वाजला.  तिच्या कॉलेज मधील मैत्रीणचा ( पल्लवी )फोन होता. 

पल्लवी : हॅलो मधू,  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या... 

मधुरा : थँक यु पल्लू... कशी आहेस...मी गावी आले आहे. 

पल्लवी : ओह्ह खूपच छान.. अरे बाप रे... 

असं बोलून  ती फोन कट करते.
मधुराचा जीव अगदी घाबरा होऊन जातो. तिला काहीच समजतं नाही.  ती पुन्हा फोन करायचा प्रयत्न करते पण फोन बंद लागतो. आता मात्र तिला खूप टेन्शन आले होते. 
तिने पल्लवीच्या घरी फोन केला पण तिकडेही फोन लागला नाही. पल्लवीच  घर तिच्या घरापासून 10 मिनिटच्या अंतरावर होते.
तिने पटकन आवरलं आणि सकूटी घेऊन तिच्या घरी गेली. गाडीवरून जाताना तिच्या मनात खूप विचार येत होते.  काय झालं असेल आणि बरंच काही..... 
ती पल्लवीच्या घरी पोहचली. पल्लवी दारातच उभी होती. तिला बघताच मधुराचा जीव भांडयात पडला. तिने गाडी वरून उतरून पल्लवीला मिठी मारली आणि विचारलं काय झालं मगाशी?  तू का ओरडलीस? 

पल्लवी - तू चल माझ्या बरोबर. 

मधुरा - तुझा आवाज ऐकून मी किती घाबरले.

पल्लवी-  सॉरी,  माझे आई....चल आता 

असे म्हणून पल्लवी तिला खेचत शेजारी असलेल्या हॉटेल मधें घेऊन गेली.

आत पूर्ण काळोख होता.  घाबरतच ती थोडी पुढे गेली. अचानक सगळे लाईट चालू झाले आणि बघते तर काय तिच्या ग्रुप मधील सगळे मित्र आणि मैत्रिणी तिला भेटायला आले होते. बलून्स नी सजवलेलं टेबलं, केक... अशी खूप छान सजावट केली होती
आणि बॅग्राऊंड ला गाणं सुरु होत... 

बार बार दिन ये आये, बार बार दिन ये गाये, 
तूम जियो हजारो साल ये मेरी है आरजू, 
हैप्पी बर्थडे टू यू,  हैप्पी बर्थडे टु यू, 
हैप्पी बर्थडे डिअर मधू,  हैप्पी बर्थडे टू यू... 


हे सगळं पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
सगळ्यांना भेटून आजच्या दिवसाचे सार्थक झाल्यासारखं वाटतं होते तिला.... 
खूप आनंदाने तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाले. जुन्या मित्रांबरोबर खूप गप्पा गोष्टी झाल्या.
जुन्या आठवीनीना उजाळा मिळाला.आजचा दिवस खूप छान गेला. रात्री घरी घेऊन आई,  बाबा आणि आजोबान सोबत केक कट केला. जेवणाचा छान बेत आखला होता. जेवण करुन छान अशी गप्पाची मैफिल भरली.
तोच अमितचा (तिचा भाऊ) फोन आला. याचा मस्तीचा मूड बघून त्याने विडिओ कॉल केला. अमित सुद्धा नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी होता. तो सुद्धा बरेच दिवस आला नव्हता. सगळे जण त्याची खंत व्यक्त करत होते. 
बराच वेळ गप्पा झाल्यावर अमितने फोन ठेवला. सगळे झोपायला जाणार तोच बाबांनी तिच्या लग्नाचा विषय काढला. तोच आई पण बाबान बरोबर बोलू लागली. पण मधुरा सध्या तरी लग्न करायच नव्हते. ती तिच्या आजोबांची लाडकी होती. तिने आजोबांनकडे हताश नजरेने बघितले आणि त्यांनीही ते समजून घेतले.
आजोबानी लगेच खूप रात्र झाली आहे असे सांगून मैफिल उठवली आणि तिने सूटकेचा श्वास सोडला. आत जाताना आजोबानी हळूच खुणावले आपण उद्या बोलू म्हणून.... 
दोघेही आपल्या आपल्या रूम मधें गेले. 
आता बघुयात मधुराच पुढचं वळण काय आहेत......

🎭 Series Post

View all