बेरीज वजाबाकी आयुष्याची ( दत्ता जोशी )भाग एक

नशिबाचा खेळ कोणाला कळला आहे बरं, नाहीतर एक वारांगना एका संन्याश्याच्या प्रेमात पडलीच नसती.


बेरीज वजाबाकी आयुष्याची ( भाग एक )


जिची कामवासना कधीचं तृप्त होतं नसे , नानविध भोगांची लालसा जिच्या मनात सदैव धगधगत असे अशी लावण्याने मुसमुसलेली, उंची वस्त्र आणि सोन्याच्या अलंकारांनी नखशिखांत सजलेली, सर्वांग सुंदर जणू रतीचीच प्रतीकृती भासावी अशी राज नर्तिकी मैथिली गावाबाहेर असलेल्या विस्तीर्ण तलावावर आपले कामतप्त शरीर थंड व्हावे म्हणून मुक्त स्नान करण्यासाठी आपल्या मैत्रिणीं सोबत आलेली होती. ती येणारं म्हणून सगळा तलाव दूरदूर पर्यंत माणूस दिसणार नाही असा निर्जन करून घेतलेला होता. कोणीही आगंतुकाने त्या बाजूला चुकूनही फिरकू नये आणि तिला मुक्तपणे आंघोळ करता यावी म्हणून दुरवर सशस्त्र पहारे बसवलेले होते.


चारही बाजूंनी संगमरवरी पायऱ्या असलेला तो विस्तीर्ण तलाव दाट झाडांनी झाकलेला होता. त्या तलावा भोवती अनेक फळं झाडांनी आणि फुलांनी बहरलेली बाग होती. बागेत हरीण, मोर या सारखे विविध प्राणी आणि पोपट, मैना या सारखे मधूर गायन करणारे पक्षी मुक्तपणं विहार करत होते. फुलांनी सजवलेला आणि वेलींपासून बनवलेला एक झोका उंच अशा हिरव्यागार वट वृक्षाला बांधलेला होता.

मैथिली नगराची प्रमूख नर्तकी. तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दांनी मान खाली घालावी ईतकं ते दैवी आणि स्वर्गीय, अलौकिक सौंदर्य. तिच्या हनुवटी वर असलेला तीळ म्हणजे सौंदर्यावर दिलेला पूर्णविरामच जणू. ती नृत्यात जितकी प्रवीण तितकीच रतिक्रिडेत देखील परिपूर्ण होती. अशा त्या सौंदर्य आणि गुणांची परिपूर्णता असलेल्या मैथिलीवर राजा लुब्ध झाला नसता तर नवलच. सौंदर्या बरोबरच तिला तीक्ष्ण बुध्दीमत्ता आणि निरक्षिर विवेक बुध्दी, निरलस सेवा वृत्ती जन्मजात प्राप्त झालेली होती. त्या मुळे ती राजाच्या विशेष मर्जीतील होती. तो तिला कोणत्याही गोष्टींची कमी पडू देत नसे. तिच्या साठी त्याने सर्व सोयींनी युक्त असा महाल बांधलेला होता. त्या महालाच्या गवाक्षातून नगराचा राजरस्ता दूरवर दिसतं असे. पौर्णिमेच्या रात्री राजा आणि ती दोघं त्या महालात बसून बऱ्याच उशीरा पर्यंत गप्पा मारत असत.
अशा त्या मैथिलीच्या दासी देखील एका पेक्षा एक सुंदर आणि कामक्रीडेत निपुण अशा होत्या.

सगळं वैभव आणि सुख जिच्या पायाशी लोळण घेत होतं. अशी मैथिली आज त्या तलावावर मुक्त स्नानाला आली होती.

मऊशार कोवळ्या, हिरव्यागार गवतावर ती निसंकोपणे पहुडली.  तिच्या अंगावरील सुवर्ण जडीत अलंकार आणि भरजरी वस्त्र दासींनी हळुवार हातांनी दूर केली.   कमळाच्या पानांच्या द्रोणात बनवून ठेवलेल्या चंदनाच्या सुगंधी उटण्याला तिच्या अंगाला कमळाच्या पाकळ्यांनी लावायला सुरूवात केली. अतीव सुखाने तिने आपले हरिणासारखे सारखे विशाल नेत्र मिटून घेतले. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिची सुवर्ण कांती सोनसळी सारखी चमकत होती.

उटण लावून झाल्यावर ती अलगद पाण्यात उतरली. एखाद्या जलपरी सारखी ती दोन्ही हातांनी ती पाण्यात पोहोत होती.

सगळं अगदी मनासारखं सुरू होतं. तोच दासींनी तिला हाक मारली. आणि महाराजांचा निरोप सांगितला.

( क्रमशः)
लेखक: दत्ता जोशी

🎭 Series Post

View all