Jan 28, 2022
Poem

आयुष्य म्हणजे...

Read Later
आयुष्य म्हणजे...

आयुष्य म्हणजे...

 

आयुष्य म्हणजे,
पहाटसमयी दवबिंदूंचं हसणं, 
पहिल्या-वहिल्या किरणासोबत,
स्वतःलाच हरवून बसणं...

आयुष्य म्हणजे,
खळखळणारा, शुभ्र नितळ झरा,
ग्रीष्म ऋतूच्या वणव्यामध्ये, 
वाहणारा शीतल वारा...

आयुष्य म्हणजे,
लेकरावरची आईची निखळ माया,
रात्रंदिवस लेकरांसाठी,
झिजणारी बापाची काया...

आयुष्य म्हणजे,
मित्रांसोबत घोटभर घेतलेला चहा,
रुपयाचा डॉलर खिशात नसताना,
कॉलेजात केलेली हवा...

आयुष्य म्हणजे,
प्रेयसीसोबत बहरलेल्या प्रेमाची आस, 
तिच्यासमवेत उजळलेला,
आठवणींचा प्रत्येक श्वास...

आयुष्य म्हणजे,
आजचं असणं आणि उद्याचं नसणं,
जिवंत नसूनही जिवलगांच्या मनात,
प्रेम रूपात बरसणं... 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now