आयुष्याच्या वळणावर - भाग ६

रणजित चा शालेय जीवनापासून तो आता कॉलेज जीवनापर्यंत चा हा प्रवास


सकाळी कॉलेजमध्ये गेल्यावर समजले की,रणजितच्या कॉलेजची सहल ठरली होती. सरांनी वर्गात येऊन प्रत्येकाला विचारले. आता सहल जाणार म्हटल्यावर सर्वजण जाम खुश झाले. आता गावापासून थोडे दूरचे जग बघायला मिळणार या खुशीत सर्वजण नाचू लागले .दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये नावे द्यायची होती. रणजित आणि त्याचे मित्र मधल्या सुट्टीत चहा प्यायला हॉटेलमध्ये गेले. तेथे सर्वांची सहली बद्दल चर्चा सुरू झाली .

" काहीही करून आपण सहलीला जायचं म्हणजे जायचं !" रणजित म्हणाला .तसे बाकीचे मित्र म्हणाले," अरे पण फक्त नावे द्यायची आहेत!" " सरांनी सहल नेमकी सिंगापूरला जाणार की शिंगणापूरला जाणार हे काहीच सांगितले नाही!" दत्ता बोलला तसा प्रकाश उठून उभा राहिला आणि म्हणाला ,"अरे जायचं सोडा पण आपल्या घरातील सहलीला जायला परवानगी देतील का?? अगोदर आपण घरातल्यांना विचारायला पाहिजे!" बाकी सर्वजण विचारांमध्ये पडले.

काहीही करून घरच्यांना सहलीला जाण्यासाठी परवानगी देण्यासाठी तयार केलं पाहिजे. मग काय कॉलेज सुटल्यानंतर सर्वजण घरी गेले. घरी गेल्यानंतर जेवण झालं .जेवण झाल्यानंतर रणजित आणि त्याचे मित्र घरी नेहमी दुपारी झोपा काढायचे .शेतात कधीतरी जायचे.आज मात्र कोणीच घरी थांबले नाहीत .रणजित आणि त्याचे मित्र सरळ आपल्या आई-वडिलांना शेतामध्ये मदत करण्यासाठी शेतात गेलेत. रणजितला त्याच्या आईवडिलांनी शेतामध्ये कधीच बघितलं नव्हतं .त्याला बघताच त्याचे आई वडील खुश झाले .त्यांनी रणजितला विचारले," अरे ,इकडे कसा काय आलास?" रणजित म्हणाला ,"आज मी तुम्हाला शेतामध्ये काम करायला मदत करणार आहे. आई-बाबा बोलली ,"अरे ,पण उन्हामध्ये काम करायला तुला जमणार आहे का?" तसा रणजित म्हणाला, "तुम्ही घाबरू नका. मला शेतामध्ये काम करायला आवडेल .पण तुम्ही मला शिकवलं पाहिजे शेतामध्ये काम करायला ! वडिलांनी रणजितच्या हातामध्ये आयदान दिले ( आयदान म्हणजे एक लोखंडी पहार असते जिच्या सहाय्याने जमिनीमध्ये नाळे म्हणजे खोलगट होल मारले जाते आणि त्यामध्ये भाज्यांच्या बिया पेरल्या जायच्या ) रणजितच्या वडिलांनी रणजितकडे पहार दिली रणजितने नाळे मारायला सुरुवात केली. एक सरी झाली ,दुसरी झाली, तिसरी झाली. शेतामध्ये जायचा योग रणजितला कधीच आला नव्हता. त्यामुळे रणरणत्या उन्हामध्ये गोरापान रणजित लाल टोमॅटो सारखा दिसत होता. आई बाबा आणि शेतातील इतर गडी त्याच्याकडे पाहून हसायला लागली. मग काय रणजित ने जोरात नाळे मारायला सुरुवात केली. अचानक नाळ मारता मारता चुकून ती लोखंडी पहार रणजितच्या पायामध्ये घुसली .रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. रणजीत घाबरला ."आई ,आई ग !"आई असं करतच तो खाली कोसळला .आई वडील आणि बाकीचे गडी पळतच त्याच्याजवळ आलीत. त्यांनी पाहिले रणजितचा रक्ताने माखलेला पाय पाहून आईला चक्कर आली .नशीब बलवत्तर होतं रणजितचे ,कारण ती पहार पायाच्या दोन बोटाच्या मधून आरपार झाली होती. त्यामुळे डाव्या पायाच्या करंगळीला इजा झाली होती. वडिलांनी आणि गाड्यांनी रणजितला पटकन उचललं आणि शेतातून मधल्या वाटेने रस्त्यावरती आणले.लागलीच डॉक्टरांच्या कडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासले. रक्त खुप गेलं होतं त्यामुळे रणजितला थकवा जाणवत होता. डॉक्टरांनी लगेच औषध उपचार केले. आणि पायाला मलम पट्टी केली आणि त्याला विश्रांती घ्यायला सांगितलं .

आता विश्रांती म्हटल्यानंतर रणजितला खूप वाईट वाटलं. त्याचे बाकीचे मित्र सुद्धा पळत त्याच्या घरी आले होते. " ए बाबा, असं काय केलं? तुला काम जमत नव्हतं जायचं कशाला?" गावातील म्हातारी माणसं बोलत होती. पण रणजितच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते जे त्याच्या मित्रांनी ओळखले. मित्रांनी सांगितले "तू काही काळजी करू नकोस ,आम्ही सरांना सांगतो. नाही तर राहुदे ती सहल .आपण पुन्हा केव्हा तरी फिरायला नक्की जाऊ." पण रणजित म्हणाला ,"असं नाही, एक तर आपण खुप दिवसानंतर गावाच्या बाहेर, शहराच्या बाहेर कुठेतरी फिरायला जाणार होतो. पण ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं !" बाकीच्या मित्रांनी पण शेतामध्ये जाऊन आई-वडिलांना मदत केली होती. त्यामुळे तेसुद्धा खूपच कंटाळले होते. पण रणजितच्या बाबतीत मात्र भलतंच झालं होतं झालं.

रात्र झाली सगळे झोपी गेलेत पण रणजीत मला मात्र झोप अजिबात येत नव्हती. रात्री आई उठली तिने रणजितला कोरा (ब्लॅक टी) चहा तयार करून दिला. रात्रीचे काहीतरी अडीच-तीन वाजले असतील .रणजितला मायेने जवळ घेतले आणि विचारले ," बाळा, काळजी करू नकोस .तुला सहलीला जायचं आहे की नाही ? मग मी तुझ्या कॉलेजात येऊन सांगतो. तू काळजी करू नकोस!"

दुसऱ्या दिवशी रणजित शिवाय त्याचे मित्र कॉलेजमध्ये गेले. आज रणजित सोबत नव्हता त्यामुळे त्याच्या मित्रांना सुद्धा करमत नव्हते .कॉलेजमध्ये पहिला तास झाला, दुसरा तास झाला तिसरा तास झाला तरीपण कोणत्या सरांनी किंवा मॅडमनी सहलीचे नाव सुद्धा काढले नाही. बाकीची मुले -मुली विचार करायला लागली . आम्ही तरी सहलीला जाणार आहे पण सरांनी किंवा मॅडमनी कोणीच कसं काय विचारलं नाही ? शेवटच्या तासाला अर्थशास्त्राचे सर आले .त्यांनी सहलीला येणाऱ्या मुलांची नावे विचारली आणि लिस्ट बनवायला सुरुवात केली. रणजितचे मित्र मात्र शांत बसले होते. त्यांच्यापैकी कोणीच आपली नावे सरांना सांगितली नाहीत. त्यामुळे सरांनी मुलांना विचारले ,"अरे बाळांनो , तुम्हाला सहलीला यायचं नाही का ? बाकीचे सगळे येत आहेत मग तुम्ही का येत नाही आहात ?" तेव्हा त्या मुलांनी रणजितच्या बाबतीत घडलेली ती कालची घटना सरांना सांगितली. सरांना पण खूप वाईट वाटले .वर्गामध्ये सर्व मुलं-मुली रणजितची चौकशी त्याच्या मित्रांच्याकडे करू लागलीत. कोकणातील ती मुलं म्हणाली की, आम्ही रणजितला बघायला गावी येतो.

कॉलेज सुटल्यानंतर सर्वजण रणजितला बघायला त्याच्या घरी गेले. सोबत सर आणि मॅडम सुद्धा होत्या. सर्वांनी रणजितची विचारपूस केली. आई-वडिलांची विचारपूस केली.

वडील म्हणाले," या बाबाला शेतात काम करायची सवय नाय आणि कशाला आला असेल बघा शेतात काम करायला ?" सहकाराच्या मॅडम म्हणाल्या, "अहो बाबा ,काळजी करू नका होईल ,रणजित नक्की बरा होईल. आणि मुलांना शेतातील कामाची सवय हे पाहिजेच !"

रणजितला खूप छान वाटत होतं. कारण त्याचे मित्र मैत्रिणी , सर आणि मॅडम सगळे त्याला बघायला त्याच्या घरी आले होते .सरांनी सांगितले ," रणजित, आज तुला सांगतो ,तू जोपर्यंत बरा होत नाहीस तोपर्यंत आपण आपल्या कॉलेजची सहल न्यायची नाही. रणजित म्हणाला, सर असं नका करू, माझ्यासाठी तुम्ही सहल कशाला कॅन्सल करता ?त्यापेक्षा तुम्ही सर्वजण सहलीला जावा. बारावीला गेल्यानंतर मी नक्की तुमच्यासोबत येईन .काय रे मित्रांनो?" पण त्याचे मित्र सुद्धा ऐकायच्या मनस्थितीत नव्हते .त्यांनी सांगितले सर अगदी बरोबर बोलतात तू जोपर्यंत बरा होत नाही तोपर्यंत जायचं नाही. रणजित च्या आई-वडिलांना खूप बरं वाटलं. रणजित च्या बहिणीने सर्व मुला-मुलींसाठी, सर आणि मॅडम साठी शिरा आणि चहा बनवला. त्यानंतर थोडा वेळ थांबून सर्वजण निघून गेले. त्या सर्वांना रणजितचे मित्र फाट्यापर्यंत घालवून आले आणि घरात येऊन नाचून दंगा करायला लागले .कारण रणजित त्यांच्यासोबत सहलीला सोबत असणार होता .सहल रद्द झाली होती .

दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जसं समजले की रणजितमुळे सहल पुढे ढकलली तेव्हा बाकीच्या त्याच्या मित्र-मैत्रिणींनी पण विचार केला, अरे असू दे ! आपलाच मित्र आहे .त्याला जेव्हा बरे वाटेल तेव्हा आपण सर्वजण जाऊ .सहल काय आज किंवा उद्या होईलच .पण आपला मित्र बरा झाला पाहिजे.

रणजितला जेव्हा हे कळालं तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तो आपल्या आईला म्हणाला ,

"आई ,माझं नशीब खूप चांगला आहे म्हणून अशी माणसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला भेटत आहेत !"

आई म्हणाली ," बाळा तुझा स्वभाव खूप गोड आहे, तू सर्वांशी मिळून मिसळून राहतोस म्हणून हे लोक नेहमी तुझ्या सोबत आहेत आणि तू नेहमी असाच राहा!"

काही दिवस निघून गेले रणजितला आता खूप बरं वाटत होतं .पाय आता जवळ जवळ बरा झाला होता. कारण रणजित ची आई त्याला दररोज तेलाने मालिश करून आंघोळ घालायची. हळद आणि दुध त्याला प्यायला द्यायची .कधी कधी खडक्या कोंबडीची अंडी खायला घालत होती.(खडकी कोंबडी म्हणजे गावठी कोंबडी बॉयलर नव्हे) त्यामुळे त्याचा पाय खडखडीत बरा झाला .

एक महिन्यानंतर रणजित जेव्हा कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याच्या मित्र-मैत्रिणींनी त्याचं जोरात स्वागत केले. रणजितच्या मित्रांनी तर अख्या कॉलेजमध्ये साखर वाटली होती.रणजितला हे अती होत आहे असं वाटत होतं. पण मित्रांच्या पुढे तो काहीच करू शकत नव्हता .सरांनी, मॅडमनी आणि प्राचार्यांनी त्याची चौकशी केली आणि काळजी घे म्हणून सांगितलं.

त्याच दिवशी सहलीची तारीख निश्चित केली .पुढील आठवड्यात शनिवारी रात्री दहा वाजता सहलीला निघायचं निश्चित केलं. संपूर्ण पुणे दर्शन ,त्यानंतर शिर्डी साईबाबा ,अजिंठा-वेरूळ ,दौलताबाद,औरंगाबाद, खुलताबाद असा दौरा ठरला होता .रणजित आणि त्याचे मित्र फाट्यावरुन घरामध्ये येताना अक्षरशः उड्या मारतच आले होते. रणजितला पायाला काहीतरी लागलं होतं याची सुद्धा शुद्ध नव्हती .आता त्यांना वेध लागले होते सहलीचे...............


क्रमशः

खेडेगावातील एका मुलाच्या आयुष्यावर ,जीवनप्रवासावर आधारित ही कथा आहे.त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न करत आहे.आशा आहे की,आपल्याला माझा हा प्रयत्न नक्की आवडेल. धन्यवाद??


क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?क्रमश :

तळटीप : कथा एका गावातील लहान मुलाच्या जीवन प्रवासावर आधारित आहे. त्याचा संघर्ष मी इथे रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपल्याला माझा हा प्रयत्न आवडेल. धन्यवाद ?