नमस्कार वाचकहो, आज एका नवीन विषयावर लिहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय आशा आहे आपल्याला हा प्रयत्न आवडेल, यात असणारी पात्रे आपली वाटू लागलीत, यामधल्या घटना आपल्याही आयुष्यात घडाव्या असा वाटल्या तर ते मी माझं यश समजतो , तर सुरुवात करूया आजच्या कथेला, धन्यवाद ...
सsssमीर अरे आवर पटकन, घेतलंस का सगळं??? आणि अत्यन्त महत्वाचं म्हणजे केक कुठेय?? बर आणि रिया,मनस्वी, ओंकार, कुठे आहेत आणि त्यांना त्यांची काम नीट सांगितली आहेस ना तू???? काय नेहमी सारखं इथेही वेंधळेपणा केला आहेस ??? वेदश्री आपल्याचं नादात बोलत होती, समीर तिचं ते बोलणं शांत पणे ऐकून घेत म्हणाला,
समीर- अ गं वेदश्री जरा शांत हो सगळं नीट होणार आहे, तू काळजी करू नकोस, मी ओंकारला रिया आणि मनस्वीला pick up करायला सांगितलं आहे, तसंच बाकीचं जे काही साहित्य लागणार आहे, फुगे,स्टिकर्स,टोपी, खायचं सगळं, इतर साहित्य सगळं सांगितलंय,तो नीट करेल.
वेदश्री - अरे पण, यातलं "ऋग्वेद" ला काही कळता कामा नये, आणि हो तुम्ही केलं का सगळ्यांनी wish??समीर- हो सगळ्यांनी wish केलंय शिवाय तुझ्या...
वेदश्री - बिचारा त्याला वाटत असेल मी त्याचा वाढदिवस विसरले.
समीर - हम्मम, बर ऐक आपल्याला आता वाढदिवसाच्या ठिकाणी पोहचायला हवं तिथली तयारी करायला हवी काही कमी पडता कामा नये. (दोघेही गाडीवरून वाढदिवसाच्या ठिकाणी जायला प्रवास सुरू करतात) प्रवासात असताना, वेदश्री ओंकार ला फोन करून मनस्वी, रिया आणि त्याला त्या ठिकाणी यायला सांगतात...
सगळी तयारी पूर्ण होते आता वेदश्री ओंकारला सांगते की ऋग्वेद ला तुला आणायला जायचंय त्याला काही तरी थाप मार आणि कसही करून घेऊन ये , आणि समीर तू आणि रिया केक घेऊन या.केक 10 min.येईल आणि ओंकार ला आणि ऋग्वेद ला यायला 30 min लागतील, त्यामुळे समीर तू केक पटकन घेऊन ये त्यानंतर आपले जे सगळे guest आहेत त्यांना कार्यक्रम स्थळी आणायला ताईना मदत कर, okk ??
सगळेजण एका सुरात okkk वेदू ...
ओंकार ऋग्वेद च्या बिल्डिंग खाली येऊन त्याला फोन करतो,
ओंकार - अरे ऋग्वेद कुठे आहेस
ऋग्वेद - कुठे असणार, घरी
ओंकार - ऐक जरा पटकन ये बाहेर
ऋग्वेद - काय रे ?? काय झालंय
ओंकार - तू ये तर आधी मग सांगतो
ऋग्वेद - बर आलोच 5 मिनिटात
ऋग्वेद येतो , तसा ओंकार च्या चर्येवरील चिंता, भीती ओळखतो, तो विचारतो ,तसा तो उत्तर द्यायचं टाळतो सांगतो चल पुढे असं म्हणत म्हणत तो फार लांब आणतो , ऋग्वेद ला काहीच कळेनासं होतं, मधेच ओंकार त्याला परत wish करतो, विषयांतर करायचं म्हणतो
ओंकार - मग एका मुलाला त्याच्या अतीव प्रिय असणाऱ्या व्यक्ती ने wish केलं की नाही,
थोडासा नाराजीच्या सुरात , नाही ना केलं अजून, मी त्याचीचं तर आतुरतेने वाट पाहतोय, पण तिला त्याचं काहीच पडलेलं नाही, ऋग्वेद थोडासा रागातचं बोलला.
याचं ओंकारला मनोमनी हसू येत होत, तसं त्यानं ते control केलं, तो मुद्दामून चिडवायला म्हणला
हम्म जाऊदे रे विसरली असेल.
जाऊदे कस बघ तू मी तिला जाबचं विचारणार आहे तिला, ती फक्त भेटुदेत,
त्याचा तो त्रासलेला, रागातला चेहरा पाहून याला अजून आनंद होतं होता, एक क्षण वाटलं ओंकारला की सगळं सांगावं पण "वेदश्री" चा महाकालीचं रूप डोळ्यासमोर आलं आणि तो विचारंच सोडून दिला. आतापर्यंत ओंकार ला ऋग्वेद ला गुंतवून ठेवण्यात यश आलं पण काही काळ लोटला आणि ऋग्वेदने थोड्या रागातचं विचारलं
"ओंकार" मला नीट सांग काय झालंय ते,आणि ते ही आताच्या आता, मला कळलंच पाहिजे.
ओंकार ला समजून चुकलं आता याला काहीतरी सांगावं लागणार, तो ठरवून बोलून गेला की वेदश्रीचा अपघात झाला आहे, हे ऐकून त्याला धक्काचं बसला, तो फार घाबरला , आणि चिडून ओंकार ला म्हणाला तू हे आत्ता सांगतो आहेस ,तुला अक्कल आहे का? रागात तो खूप काही बोलून गेला, रागातच तो म्हणाला, केंव्हा, आणि कुठे झालं हे ?? शहराच्या बाहेर, त्या घनदाट जंगलात.., बर चल पटकन
एव्हाना ते शहर सोडून त्या घनदाट जंगलाच्या दिशेनं पुढे जात होते, तसं ऋग्वेदच्या डोक्यात विचारचक्र सुरू होतं. ही इथे काय करत होती?कोणासोबत आलेली? हे आणि असे अनेक प्रश्न त्याची शांतता भंग करत होते.
गाडी थांबली तशी विचारांची श्रुंखला तुटली समोर एक इमारत दिसत होतं नावं होत
"आपलं घर"
क्रमशः ...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा