Login

अविस्मरणीय वाढदिवस भाग 3 (शेवटचा)

Birthday

प्रथमतः सर्वांना शुभ दीपावली ?️?️ तर आता पुढे


ऋग्वेद त्या इमारतीमध्ये आलाय,...

त्या काळोखाची  फार भीती वाटत होती, "वेदश्री" अशी त्यानं काकुळतीला येऊन हाक मारली, पण सगळीकडे स्मशान शांतता, त्या शांततेने त्याला रडू कोसळलं, त्यानं रडत रडत परत हाक मारली वेदश्री प्लिज बोल कुठे आहेस तू ?? काहीच उत्तर नाही, तो चाचपडत चाचपडत लाईट स्विच जवळ आला, त्याने लाईट स्विच ऑन केला, आणि सगळीकडे लख्ख प्रकाश पडला त्या प्रकाशात त्याला  दूर उभी असलेली वेदश्री दिसली  तसा तो तिच्या दिशेने धावला , त्याच्या डोळ्यात अश्रू होते तो तिच्या जवळ गेला, आणि मिठीत विसावला, वेदश्रीच्या सुद्धा नेत्रकडा पाणावल्या, तिचे अश्रू ऋग्वेद च्या पाठीवरून ओघळत होते,
    स्वतःला सावरत तिने "happieest bdaiee dear "  म्हणताच, एकाच सुरात, मोठ्या आवाजात बाकीच्या सगळ्या मित्रांनी आणि ते गेस्ट म्हणून आलेल्या सगळ्यांनी "happy birthday rugved " असं म्हणून wish केलं त्या आवाजानं मागे वळला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला सगळे आजी आजोबा दिसले त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य दिसलं, त्यानं परत वेदश्री कडे वळून पाहिलं त्यावेळी तिच्या पाठीमागे असणारी "आपलं घर" संचलित "आनंदवन वृद्धाश्रम" ही पाटी दिसली , त्याला सगळ्या गोष्टींची उमजत गेल्या , परत एकदा प्रेमाने त्यानं वेदश्री ला मिठीत घेत इतकं प्रेम माझ्यावर का करतेस तू ?? तशी ती म्हणाली,  मंद आहेस ना म्हणून , बर चलं आता केक कट कर .
त्या आश्रमाच्या अध्यक्षा सुलोचना ताई  गेली कित्येक वर्ष ते आजी आजोबांची अविरतपणे  सेवा करतायेत.
  सुलोचना ताईंनी पहिल्यांदा ऋग्वेद चं औक्षण केल, मग बाकीच्यांनी केलं, त्यानंतर  केक कट केला, प्रेमाने वेदश्री ने ऋग्वेद ला केक भरवला, त्यानेही तिला केक भरवला दोघेही एकमेकांकडे बघण्यात हरवले होते, तितक्यात समीर आम्हालाही ठेवा हा केक, असं म्हणताच सगळेजण हसले,  सगळेजण खुश होते. नंतर सगळ्यांना केक आणि फळांचं वाटप करण्यात आलं, त्यांचा तो ग्रुप सगळ्या आजी आजोबांना  भेटू लागला आशीर्वाद घेत होता, फार मायेनं आणि आपुलकीने ते आजी आजोबा त्यांच्याशी बोलत होते त्यांना आपलेच नातू , नात आहेत असं जाणवत होतं.

सगळ्यांची भेट झाली तश्या सुलोचना ताई जेवणासाठी बोलवू लागल्या , पानं वाढली गेलेली , सगळे आजी आजोबा तिथला सगळा स्टाफ एकत्र बसून जेवायला बसली. हे असं एकत्र  जेवण आणि तेही या सगळ्या आजी आजोबांनबरोबर , हे फार फार आनंददायी आणि वेगळं होतं. सगळ्यांची जेवण आटोपली .
    निरोप घेण्याची वेळ आली होती, वेदश्री पुढे झाली तिने पर्स मधून काही पैसे काढले आणि सुलोचना ताईंना दिले ,  ताई हे आमच्याकडून छोटीसी मदत तुम्ही करत असलेल्या श्रेष्ठ कार्यासाठी, सुलोचना ताई ती मदत घेत  म्हणाल्या तुमच्यासारखी संवेदनशील मुलं आहेत म्हणून आम्ही हे कार्य करत आहोत, तुला खूप आशीर्वाद, खूप मोठी हो, आणि लग्नाला बोलवा आम्हाला असं मिश्किल पणे बोलल्या, त्यावर वेदश्री गोड लाजली ..
    निरोपाची वेळ झाली सगळ्यांचा निरोप घेतला , परत नक्की येऊ हे वेदश्री सांगायला विसरली नाही...
   वेदश्री नं ऋग्वेद च्या आयुष्यातला अविस्मरणीय वाढदिवस साजरा केला, याचं ऋग्वेद फार फार अप्रूप वाटलं....
समाप्त

© सुहास निळकंठ (गुरव)


🎭 Series Post

View all