Dec 06, 2021
Romantic

अवघाची संसार

Read Later
अवघाची संसार

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

अवघाची संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ।।

शिवानी आणि सतीशच्या लग्नाला बावीस वर्ष झाले होते.शिवानी सुशिक्षित,सुंदर आणि मेहनती मुलगी परंतु सतीशच्या आग्रहाखातर आणि वेलसेटल्ड बिजनेस यामुळे तिने होममेकर रहाणे स्वीकारले.शिवानीची पहाट आज रम्य च्याऐवजी जरा कंटाळवाणी झाली....कोरोनाच्या या थैमानाने आयुष्य अगदी बनधीस्त होऊन बसले होते... शिवानी ह्या रोजच्या रूटीनला वैतागली होती...सकाळची वॉर्म वॉटर थेरपी झाली,योगा झाल्या....सतीशचा आणि शिवानीचा मस्त मसालेदार वाफाळलेला चहा आटोपला.सतीश लगेच आज ब्रेकफास्टला गरमागरम उपमा कर अशी फरमाईश करून मॉर्निंग वॉकला निघून गेला.सतीश येईपर्यंत शिवानीने अंघोळ,पूजा आटोपून उपमा बनवून ठेवला....मुलांच्या रूममध्ये जाऊन आज तिने मुलांना देखील जरा रागानेच उठवले.इतके मोठे झाले तरी अजूनही उठवायला मम्मी लागते...हॉस्टेलमध्ये कसं होणार कुणास ठाऊक? किती तो पसारा, बेशिस्तपणा....शिवानी ह्या सगळ्याला कंटाळली होती.त्यात प्रत्येकजण घरी म्हणून आवडीचे पदार्थ गरमागरम करून खाऊ घालण्याचा  अट्टाहास तिचाच असायचा.म्हणजे पुन्हा त्यातपण तिचीच फरफट व्हायची....मुलांवर चिडली की मुलं म्हणायची किती चिडचिड करते ग मम्मा....cool...cool आणि सतीशवर आपला राग काढला तर वाद घालून तोही सुरू व्हायचा...कसली असते ग तुझी बडबड...जाऊ दे आमच्यासाठी काही करू नकोस बर तू....आज शिवानीने मनाशी पक्का निर्धार केला होता आठ दिवस घरच्या जबाबदारीपासून दूर कुठेतरी म्हणजेच तासभरावर असलेल्या माहेरी एकटी जाऊन राहण्याचा....आणि तसेही माहेर सुख हे प्रत्येक स्त्रीसाठी स्वर्गसुख असते. शेवटी मुल्ला की दौंड मस्जिद तक....

सतीश ब्रेकफास्टनंतर ऑफिसला जाण्यासाठी निघाला तर समोर...शिवानी छान red yellow combination चा सलवार सूटवर वन साइड लटकता दुपट्टा, मँचिंग हल्कीशी लिपस्टिक,गळ्यात शॉर्ट मंगळसूत्र, डाव्या मनगटावर महागडी वॉच सोबत खांद्यावर पर्स आणि ट्रॅव्हलिंग टॉली बॅग.सतीश शिवानीकडे बघताच hello gorgeous काय ग बरी आहेस ना? तू कुठे निघालीस? सतीश....ऑफिसला जाताना मला जरा आईकडे सोड...अग हो सोडतो की ...पण ही इतकी भली मोठी बॅग कशाला हवी सोबत? ऑफिसमधून येताना मी घ्यायला येईल की तुला....आणि तुझ्या ह्या बबड्यांच काय ? आज त्यांना उपाशी ठेवण्याचा विचार आहे का तूझा...एरवी तर तू मुलांची अनेक कारण देऊन नातेवाईकां कडचे कार्यक्रमच काय माहेरी जाणेसुद्धा टाळतेस... मग आज तूला अचानक....सतीश मिश्कीलपणे शिवानीची मजाक उडवत होता...शिवानीने रागानेच सतीशला प्रतिउत्तर दिले म्हणाली...मला ना तुम्हा सर्वांची सेवा करण्याचा कंटाळा आला आहे....मला थोडा ब्रेक हवा आहे....म्हणून मी काही दिवस आईकडे राहण्याचा निर्णय घेतला आहे...सतीश लगेच सुरु झाला...शिवानी आता तू अती करतेस...अग हे पार्ट ऑफ लाइफ आहे.मी बाहेर जाऊन तुमच्यासाठी पैसा कमवतो.... तू घर आणि मुलं सांभाळतेस.तू उगाच चिडतेस...कटकट करतेस...सतीश मुलांसमोर तुझ्या ह्या अशाच वागण्याने मुलांमध्ये मला उलट उत्तरं देण्याचे बळ येते.मला समजून घेण्याऐवजी सतत मुलांना सपोर्ट करत असतो.मला दागिने,पैसा,घर,बंगला ह्या ऐश्वर्यापेक्षा तुझी साथ,तुझे प्रेमळ शब्द ,तुझा सहवास हे माझ्यासाठी पर्वणी आहे...मी चिडले की माझी थट्टा करतोस,मजा घेतोस...पण तू दमलीस का...हे विचारणे तर दूर उलट बायको सायको असते अशी टिंगल करत बसतोस....तुझे सांत्वनेचे बोल माझ्या बायको म्हणून घेणाऱ्या अहंकाराला खतपाणी देतील.आज शिवानी मनात साठलेले व्यक्त करत होती.....

ओह... म्हणजे तुझा अपराधी मी आहे तर....सो सॉरी शिवानी....मुद्दाम नाही पण नकळत का होईना तुला गृहित धरले जाते....आता मला माझी चूक लक्षात आली....शिवानीला जवळ घेत सतीश ऑफिसला फोन करतो....अरे अविनाश....मला आज ऑफिसमध्ये यायला नाही जमणार...अरे सतीश आपली पार्टीसोबत मिटींग होती...तू सांभाळून घे...प्लीज...आज मला बावीस वर्षांनी माझी जुनी गर्लफ्रेंड भेटली आहे...विचार करतोय लगे हाथ आज तिला डेटिंगला नेतो आणि प्रपोज करतो...बरेच काही राहून गेले.तिला मिठीत घ्यायचे राहिले...तिच्यासोबत रोमँटिक गप्पा मारायचे राहिले....सतीशच्या ह्या सर्व बोलण्यावर शिवानी भाळून जाते.....एव्हाना तिच्या सर्व तक्रारी निवळल्या होत्या.हसमुख चेहऱ्याने त्याला नजरेच्या इशाऱ्याने गप्प बसवते...

सतीश आता फुल मूडमध्ये आला होता साथिया ये तूने क्या किया गाणे गुनगुनत मुलांना सांगतो...आम्हाला बाहेरून यायला उशीर होईल.चलो शिवानी ...'आज का दिन तुम्हारे नाम'.
मैत्रीणींनो...शिवानीच काय प्रत्येक स्त्रीला तिचं मन जाणून घेणारा तिला समजून घेणारा जोडीदार हवा असतो....आणि नवऱ्यांना स्त्रीच्या मनाची गुरूकिल्ली मिळाली की समझो  " सोने पे सुहागा ".

कथा आवडल्यास नक्की लाईक करा प्लीज.
तुमचे लाईक्स आणि कमेंट्स लेखनास मदत करतात.

धन्यवाद

©®Sujata Tambade.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now