* धुकं.*

निसर्गाचे लोभस रूप.. धुकं
*धुकं*

रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला उभे असताना ,रस्त्याच्या पलीकडच्या बाजूचे किती स्पष्ट दिसते,यावरून धुकं किती जास्त किंवा कमी आहे हे ओळलखण्याचे अगदी साधं सोपं गणित आहे....

.नोव्हेंबर संपताना वेध लागतात ते डिसेंबर च्या आगमनाचे.
वर्षाचा शेवटचा महिना ,हे ह्या महिन्याचे महत्व.पण त्याच बरोबर डिसेंबर म्हणजे ख्रिसमस .आणि ख्रिसमस म्हणजे कडाक्याची थंडी.

आणि ह्या थंडीचे वैशिष्ट म्हणजे थंड,गारेगार,आल्हाद दायक जाणवणार धुकं..!!

जनुकाय सुंदर,हलके फुलके, ढगच अवतरत असतात जमिनीवर..!!!

बाग बगीचे,झाडे झुडपे,फुले , पाने,खाली जमिनीवरचे कोवळे हिरवे गार गवत, कसे धुक्याच्या दवबिंदू मुळे ओलसर झाल्याचे दिसतात...!

निसर्गावर एक वेगळाच तजेला आलेला असतो.
वर्षभर अतिवृष्टीचा पावसाळा,अन् कडक तळ पवनारा उन्हाळा,सहन करून थकलेली सृष्टी,ह्या मोसम मध्ये फ्रेश,टवटवीत दिसत असते.

निसर्गाचं हे अनोखं रूप बघण्यासाठी पहाटे पहाटे उठून ,मस्त गरम कपडे खालून,घराबाहेर चालायला,किंवा लहान मुलांनी खेळायला जावे लागते...बस..!!


"रोझमेरी." .... तिला सगळे " रोझ" म्हणायचे.

आज जणु काय ," रोझ" रस्त्याच्या अलीकडे उभी आहे.अन् पलीकडील बाजूस तिचे बालपण तिला अगदी च गडद,पांढऱ्या शुभ्र धुक्यामुळे खूपच
धुसरस् दिसत आहे असं वाटतेय.

अस्पश्ट तरीही आनंद देणारं.....!!

" रोझ" च्या राहत्या घरापासून अगदी थोड्या अंतरावर एक "मिशन हायस्कूल"होते.आता तीला नावही आठवत नाहीये;अन् ते आता तिथं आहे की नाही हे देखील अवगत नाहीये;पण मिशन हायस्कूल हे नाव तिच्या स्मरणातून गेले नाही कधीच...!!

मिशन हायस्कूल, हॉस्टेल,बोर्डिंग स्कूल,चे व्यवस्थापन एक मिशनरी मडम बघायची.तिचे परदेशी म्हणजे तिच्या माय देशी येणे जाणे असायचे.विशेष करून डिसेंबर मध्ये असणाऱ्या ख्रिसमस ची मोठीच तयारी करून ठेवायची ती.

मिशन हायस्कूल च्या भल्या मोठ्या परिसर मध्ये कधी महिलांसाठी,तर कधी सगळ्या कुटुंबासाठी ,कधी लहान मुलांसाठी ,ख्रिसमस पार्टीज ठेवायची ती.

आणि मग सांता क्लॉज चे लाल कोट,मुखवटा,टोपी घालून सगळ्यांना गिफ्ट बक्षिसे द्यायची.
" रोझ च्या" आईने तिच्या कडूनच सगळ्या साठी लाल, निळे,हिरवे, रंगाचे "हुडी जॅकेट"घेतले होते.

" रोझ." चे लाल रंगाचे ते हूडी जॅकेट खूपच आवडायचेतिला.
.वरून लाल अन् आतून मऊ, लुसलुशीत पांढरी लोकर,अंगात घातल्या वर जो काही आनंद तिला व्हायचा तो आजही अंतर मनात जाणवतोय तिला...
आई पहाटे पहाटे लवकर उठवायची.
ख्रिसमस जवळ आलाय या आनंदातच पटकन उठायचे सगळी भावंडे.....तयार होऊन ते टोपी वाले हूडी जॅकेट घालून , उड्या मारत ,हसत खेळत,मिशन हायस्कूल च्या आवारात खेळायला जायचे.....!!!

धुकं कापत कापत चालताना ,किती लांब पर्यंत स्पश्ट दिसतेय हे बघण्यामध्ये एक वेगळाच उत्साह मनामधे यायचा
.मिशन हायस्कूल च्या आवारामध्ये असलेले दगडी चर्च,आणि मिशनरी मडम चा दगडी बंगला , चर्च च्या वर असलेला लाल लायटिंग चा मोठ्ठा क्रॉस,धूक्या मधून चमकताना बघून ,काय भारी वाटायचं हे सांगताच येत नाही शब्दात.

तीन ते चार वय वर्ष म्हणजे निव्वळ , खरं खुर ,कोमल बालपण....!!

मिशनरी मड्म ने बनवलेल्या लाल मातीच्या मैदानावर खेळताना,पळताना,भारीच मजा वाटायची " रोझ ला"....
.सगळ्यात जास्त कुतूहल असायचं ते म्हणजे अधून मधून तोंड उघडायचे आणि तोंडातून गरम वाफ बाहेर सोडायची; धुकं जितकं जास्त,तितकी जास्त मजा. जसं जसा दिवस चढत जायचा, तस् तसा कधी पांढरा,तर कधी केशरी छटामधून लाल सूर्याची किरणे उठावदार दिसायला लागायची.....


थोडंसं नीटसं आठवतंय,पण बरच काही आठवतच नाही असं ते बालपण....!!!

सूर्याची किरणे प्रखर होत जातात अन् दाट धुकं धूसर होत जातं.
आसमंतात विलीन होऊन जातं....
पुन्हा दिवस चढतो,तसाच उतरतो ही,पुन्हा गारवा वाढायला लागतो,थंडी पडते,रात्र लवकर होते,....
आणि पहाटे पहाटे च्या सुमारास " रोझ" उठते.....
बाहेर बघते....
आज ही तसेच दाट धुकं दिसतंय.....

.रस्त्याच्या पलीकडचे न दिसणारे......
आई उठवायची आणि "लाल जॅकेट घालून जायचं ना धुक्यात खेळायला" असं विचारायची....
आणि " रोझ" उठायची अन् बाहेर बघायची ना तशीच बघते........

.....आणि बाहेर आजही तसेच दाट ,आल्हाद दायक ,पांढरे ढग जमिनीवर उतरल्या सारखं धुकं तिला दिसतंय.....

दगडी मिशन हायस्कूल दिसतंय.....

दगडी चर्च अन् लाल चमकणारा क्रॉस दिसतोय.........

छोट्याश्या तोंडामधून येणारी छोटीशी गरम वाफ दिसतेय......

आणि लाल रंगाचं ,आतून पांढरेशुभ्र मऊ लुसलुशीत लोकरी चे जॅकेट घातलेलं " रोझ" च गोंडस बालपण दिसतंय.....
.थोड्याच दिवसात येणाऱ्या ख्रिसमस ची वाट बघत.......!!!!

"धुकं" निसर्गाची अति सुंदर कलाकृती च ती.......
.सांगत असते मानव जातीला.......
_माणसांचं जीवन एका पहाटेच्या धुक्या सारखं असते........
बालपण येतं; धुक्या सारखं धूसर होत निघून जातं;.......
तसेच आयुष्यात अनेक सुख दुःख चे प्रसंग येतात ,अन् हळु हळू ते ही दाट धुक्या सारखे भासवत,धूसर होऊन निघून जातात.......

जीवनातील वाईट अन् कटू आठवणींना धूसर करत करत विसरून जायचं,......
अन् मनाला आनंद देणाऱ्या आठवणींना मात्र डिसेंबर च्या दाट धुक्या मध्ये येणाऱ्या ख्रिसमस ची आठवण करून आनंद करायचा.!!!!!*हाच तर उददेश अन् सल्ला ही देत असते ना धुकं आपल्याला.*-
©® Sush.*