Feb 26, 2024
वैचारिक

Awakening (अवेकानिंग) भाग 3 ब्रेकअप के बाद...

Read Later
Awakening (अवेकानिंग) भाग 3 ब्रेकअप के बाद...


प्रेमभंगाच्या यापेक्षा ही जास्त त्रासदायक अनुभवांना काही जणांनी तोंड दिलं असेलच. काहींच्या तर घरातूनच विरोध असल्याने, नाइलाज होऊन मनात नसतानाही बोहल्यावर चढतात हे ही आपण पाहिलं असेलच. असो.
आता आपण आपल्या कथेचा पुढचा भाग पाहू.

तिने आता तिच्या आई वडिलांसाठी आणि स्वतःसाठी जगायचं ठरवलं. ती एकुलती एक मुलगी होती तिच्या आई वडिलांची.  खूप मन लावून अभ्यास केला तिने आणि चांगल्या मार्कस् पास ही झाली. तिने तीच शिक्षण पूर्ण केलं.
त्रासदायक भूतकाळातून हळू हळू बाहेर येत होती.
खुप प्रयत्न करून एके ठिकाणी ती चांगल्या पगारावर नोकरीला लागली. तिच्या वागण्याबोलण्यात खूप समंजसपणा आला होता.
घरचे आता लग्नासाठी तिच्या मागे लागले होते पण तिला इतक्यात लग्न करायचं नव्हत. तिचा पूर्ण focus तिच्या career वर होत.
काही महिन्या नंतर तिच्याच ऑफिस मध्ये एका नवीन मॅनेजर ची एन्ट्री झाली. मॅनेजर अर्थातच तरुण आणि हँडसम होता. आपल्या मॅडम पण दिसायला गोड. सुरुवातीला त्यांचे कामावरून खटके उडायचे मग मात्र हळू हळू दोघांची मैत्री झाली.
त्याला तिच्या विषयी प्रेम आणि आदर वाटू लागलं. पण त्याला भीती वाटत होती की हिला माझ्या मनातलं सांगू तरी कसं की ही मला आवडते म्हणून. उगाच तिचा काही गैरसमज झाला तर... शेवटी एकेदिवशी त्याने तिला प्रपोज करण्याचं ठरवलं आणि  ऑफिस सुटल्यावर तो तिला कॉफी पिण्यासाठी घेऊन गेला, कॉफी तर फक्त निमित्त होत.
थोड्यावेळ दोघे ही शांत होते.
तो -  Actually मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं.
ती - हा बोल ना.
तो - actually.... ते...(शेवटी खूप धीर एकवटून तो एका दमात म्हणाला)तू मला आवडतेस अगदी पहिल्या दिवसा पासून, माझ्याशी लग्न करशील?
वेटर कॉफी टेबलावर ठेऊन त्याने दोघांकडे एक नजर टाकली.  त्याने पण वेटर कडे पाहिलं आणि एक smile दिली.
मग तिच्या कडे पाहिलं.
ती स्तब्ध बसली होती.
तो - कॉफी घे. थंड होतेय.
ती काहीच न बोलता कॉफी पित होती, पण मनात खूप विचारांचं युद्ध चालू होतं.
काय बोलावं तिला कळेलच ना.
शेवटी त्याने पुन्हा विचारलं तुला आवडलं नाही का? नको म्हणालीस तरी चालेल पण प्लीज रागावू नकोस आणि आपली मैत्री ही तोडू नकोस.
तोंड एवढंस करून तो बोलत होता.
तिला मनातच हसू आलं पण लगेच ती गंभीर झाली.
ती - मला बोलायचं आहे...माझ्या भूतकाळावषयी.
ती बोलत होती. तो शांत ऐकत होता.  तिने तिच्या प्रेमभंगा विषयी सगळं खर त्याला सांगितलं.
तो - तूझी तर ईथे काहीच चूक नाहीये, मग तुला अपराधी भावना मनात ठेवायची गरजच काय? असे पण एक प्रकारे बरच झालं ना, तो गेला तुझ्या आयुष्यातून ते..sorry to say but... माझ्या लाईफ मध्ये तुझ्यासारखी गोड मुलगी नसती आली ना मग ...त्याला तर उलट thank you म्हणायला हवयं. तो मिश्किलपणाने म्हणाला.
हे बघ माझं खरच प्रेम आहे तुझ्यावर. आता तू हो म्हणालीस तर ठीक नाहीतर....
ती - नाहीतर...(ती थोड्याशा रागात)
नाहीतर मी वाट पाहेन तुझ्या होकाराची....सिंपल... तो हसत म्हणाला.
ती - मला थोडा वेळ लागेल ( गालातल हसू आवरत)
तो- ठीक आहे, हवा तेवढा वेळ घे.
मॅनेजर मुलगा खूप चांगला होता, चांगल्या घरातला होता. त्याचे विचारही चांगले होते. तिच्याशी मित्राप्रमाणे च वागायचा तिची कायम मदत करायचा. तिला support करायचा. तिला comfortable कसं वाटेल याची पुरेपूर काळजी घ्यायचा. तिच्या वर खूप मनापासून प्रेम होत त्याचं. तिच्या चेहऱ्यावर हसू टिकवण्यासाठी त्याचे सगळे प्रयत्न असायचे. त्याने आशा सोडली नव्हती आणि प्रयत्न ही.
ही मुलगी तिच्या भूतकाळातील आठवणी मधून बाहेर आली तर होती पण तिच्या मनात भीती होती, आधी जशी फसवणूक वाट्याला आली तसं परत तर होणार नाही ना?  परत तसंच झालं तर.....नाही...नकोच. म्हणून ती माघार घेत होती...
तिला ही तो आवडत होता. त्याचे सगळे प्रयत्न ही तिला दिसत होते. पण त्याच्याविषयी विश्वास वाटत नव्हता.
2 वर्षाच्या मैत्री नंतर हळू हळू तिला ही त्याच्याविषयी विश्वास आणि प्रेम दोन्ही वाटू लागलं होत. तिला समजेना की आता त्याला सांगावं कसं. अजूनही मी त्याला आवडत असेल का? दुसरी कोण त्याच्या आयुष्यात आली तर नसेल ना? असेल तर.....नसेल, तसं असत तर त्याने मला सांगितलं असत. तो माझ्या आयुष्यातून निघून गेला तर.. काय करू?... तीच एक मन तिला नको म्हणत होत पण दुसर मन त्याच्या कडे ओढ घेत होत. विचार करून तीच डोकं दुखायला लागलं. तिने शेवटी विचार केला जे होईल ते होईल... त्याला आता सांगावं. ऑफिस सुटल्यावर नेहमी दोघं एकत्रच घरी यायला निघत. तीच वेळ साधून तिने त्याला कॉफी साठी विचारलं.
ती - एक कॉफी घेऊया का?
तो - (खूश होत)why not? .. आज चक्क तू कॉफी साठी विचारतेस म्हणजे तर जायलाच हवं.
रेस्टॉरंट मध्ये दोघे ही बसले होते.
ती त्याच्या कडे पाहत होती. कसं बोलावं तेच तिला सुचत नव्हत.
ती - actually मला जरा बोलायचं होत. ते... Actually.......कसं बोलू तेच कळत नाहीये.
तितक्यात कॉफी आली. तोच वेटर पुन्हा जाता जाता दोघांकडे बघत गेला. ती बोलायची थांबली.
गरम कॉफी चा एक घोट घेतला. आणि धीर करून बोलली...माझा होकार आहे.
त्याचं लक्ष गरम गरम कॉफी कडे होत. त्याने कॉफी पित पित विचारलं " कशासाठी?"
ती - लग्नासाठी.
तो एकदम नाराज झाला त्याला वाटलं तीच लग्न ठरलं. हातातल्या कॉफी कडे पाहत म्हणाला "ohh...finally तू लग्नाला तयार झालीस तर..कोण आहे तो नशीबवान"....
ती - तुच..आहेस.....माझ्याशी लग्न करशील? ती एका दमात बोलून गेली.
तो - (कॉफी पिता पिता) काय य..... कॉफी चा जोरात ठसका लागला त्याला.
ती पटकन उठली आणि तिने त्याच्या पाठीवर हळू हळू थाप मारली.
त्याला स्वप्न वाटत होत सगळं... काय करू काय नको...काहि सुचेना झालं होत त्याला. तिला उचलून घ्यावं की काय करावं असं वाटतं होतं.  त्याच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण होता तो.
त्याच्या डोळ्यातला आनंद पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं.
तो - खरच..या दिवसाची मी किती वाट पाहत होतो मी सांगू नाही शकत. त्याने तिचा हात हातात घेतला आणि  love you so much dear... तिने सुध्दा love you too म्हणून टाकलं.
नंतर घरच्यांच्या संमतीने छान थाटामाटात लग्न झालं आणि दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला.
आज ती खूप सुखात आहे. दोघं ही स्वतःच करिअर सांभाळून छान संसार सांभाळत आहेत. दोन जुळी मुलं सांभाळताना दोघांचीही तारेवरची कसरत होत आहे पण दोघांचं प्रेम जराही कुठेच कमी नाही झालंय, एकमेकांना छान वेळ देत आहेत.

तिने break-up मधून बाहेर यायला वेळ घेतला खरा पण दुसऱ्या व्यक्ती वर प्रेम करण्यासाठी जेव्हा ती मानसिकरित्या पूर्ण तयार झाली तेव्हाच तिने तिचा योग्य जोडीदार निवडला. उलट आधीच्या मुलापेक्षा कितीतरी चांगला जोडीदार तिला मिळाला आणि आता दोघंही सुखाने संसार करत आहेत.

आज काल सगळीकडेच ब्रेकअप होतात, त्यात काय नवीन! असे सगळेच म्हणत असले तरीही, ब्रेकअप च दुःख असंख्य वेदनांपेक्षाही वेदनादायक असतं. ह्या वेदना खूप खोल असतात, कायम मनात घर करून राहतात, त्यात कोणीतरी आपला विश्वासघात केला किंवा माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणूनच समोरच्या ने मला नाकारलं ही बोचणी मनात कायम घर करून असते, आणि याचा च परिणाम म्हणून आपल्या हृदयामध्ये (नकारात्मकता)negativity येते ,  परिणामी पुढचा जोडीदार निवडताना मनात भीती आणि काहीसा राग ही निर्माण झालेला असतो. हृदय कायमस्वरूपी heal झालेलं नसतं. आतल्या वेदना बऱ्या झालेल्या नसतात. कदाचित त्यामुळेच की काय कधी कधी आपण आपल्या आयुष्यात नंतर चुकीचा जोडीदार निवडतो. आणि किंवा निवडलेल्या जोडीदाराची आपोआपच आधीच्या जोडीदाराशी म्हणजेच तुमच्या Ex बरोबर तुलना करू लागतो. बरोबर ना? काही जण किंवा जणी दुःखदायक (painful) आठवणी मधून बाहेर पडता यावं म्हणुन सुध्दा नवीन जोडीदार शोधत असतात. तुम्हाला वाटत असेल, काय बोलतेय ही.... आम्ही तर लग्न करून move on पण झालोय. मग विचारा एकदा स्वतःला. त्या व्यक्तीचं नाव घेताच आज ही तुमच्या मनाला त्रास होतो का?आणि तुम्ही त्या व्यक्तीला आजही माफ करू शकता का? उत्तर हो आलं तरच समजा की तुमची Awakening झाली आहे.

समाप्त.

माझी जेवढी समज आहे त्यानुसार लिहिण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा प्रयत्न आवडला तर नक्की कळवा.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//