अव्यक्त

Expressing Feelings

         शांत वाटणाऱ्या पाण्याच्या खोलीचा जसा अंदाज येत नाही तस शांत वाटणाऱ्या माणसाच्या मनाच्या खोलीचाही अंदाज येत नाही. 
         कधी कधी हसणाऱ्या माणसाच्या हसऱ्या ओठांमधील वेदना बघण्यासाठी गरज असते ती हसऱ्या डोळ्यांमधील समदुःखी अश्रुंची... असंच कधीतरी बोलता बोलता ती नजर मिळावी व कुणाच्यातरी हसऱ्या ओठांमागील वेदना दिसावी.. हा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी येतोच नाही का..?? मलाही आला आहे.
         एक रात्र अशी जादुई आली अन दिवसभर किलबिल करणारं शहर अचानक शांत होऊन गेलं. मधेच कुठेतरी एखाद्या गाडीचा आवाज अन रातकीड्यांची किरकिर आणि फक्त गप्पा... भूतकाळाच्या, वर्तमानाच्या आणि भविष्याच्या.. निरव शांतता आणि फक्त हितगुज. मग बोलता बोलता व्यक्त झाल्या बराच काळ मनात साठलेल्या अनेक अव्यक्त भावना. भावनांचा पाऊस झाला आणि दोन्ही मने चिंब करून गेला... 
          असं मग कुणाला हसताना बघितलं की कैफिंची ओळ आठवते...
           तुम इतना जो मुस्कुरा रहे हो...
           क्या गम हैं जिसको छुपा रहे हो...

 तुम्हाला कुणाला आला आहे का असा अनुभव कधी??