अविस्मरणीय.. अनुभव

Avismarniya



गोष्ट छोटी डोंगराएवढी.

विषय - माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण, अनुभव, प्रसंग.



अविस्मरणीय अनुभव लिहायला घ्यायला हवा.. तर नक्की कोणता लिहायला हवा.. डोळ्यासमोर एक एक यायला लागले. माझ्या आयुष्यात इतके आहेत त्यातला नेमका कोणता इथे सांगावा असा प्रश्न पडला.



बालपणीच्या गोड आठवणी अनुभव, मी माझ्या आई बाबांना लग्नानंतर सतरा वर्षानी झाले होते. त्यांचे वय जास्त होते पण माझ्या कमी वयात माझ्या अवघ्या बावीसाव्या वर्षी वडील देवाघरी गेले. आई तेहतीस चालू असताना गेली. आई कशाने गेली अनेक अविस्मरणीय अनुभव आहे. निदान आईने माझे लग्न केले आणि एक नातू पाहिला 7 वर्षापर्यंत. मला भाऊ नाही. माहेरच नाही. त्या पोकळीचे अनेक आठवणीचे अविस्मरणीय क्षण आहे. एकच मोठी सख्खी एकुलती एक बहीण असून नसून सारखीच आहे. नातेवाईकांचे भरपूर वाईट अनुभव, दोन्ही कठीणच सिझेरियन माझे झालेले. त्याचे अविस्मरणीय अनुभव.. सासूबाई आणि कामवाल्या बायकांनी केलेले माझे बाळंतपण. माझ्या अहोच्या क्लास वनच्या सरकारी नोकरी मध्ये असलेले पंधरा वर्षापासून अनंत अडचणी, खुपच त्रारासदायकच अनुभव त्यांना दिलेले तोंड. स्त्री म्हणल की थोडाफार अनुभवलेला सासुरवास, मी 3 खाजगी कंपनीत नोकरी केली त्यात अनेक त्रासदायक अविस्मरणीय अनुभव आहे. मी इन्शुरन्स काढला आहे त्यात अनेक अविस्मरणीय अनुभव आहे. माझे शिक्षण मी सासरी, नोकरी, सिझेरियन झाले असताना पुर्ण केले आहे. फर्स्ट क्लास मिळवला आहे. डबल पोस्ट ग्रॅज्युएट झाले. माझ्या अहोनी मला दिलेली साथ.... मी माझ्या नवऱ्याला दिलेली साथ.. 2 जिवलग मैत्रीणीनी मला दिलेली साथ अविस्मरणीय अनुभव आहे.


मनाच्या कोपऱ्यात असलेले वाईट अनुभव जे उघड करायला कोणी नाही आणि उघड करता येत नाहीत असे किस्से आहेत.. मग माझ्या 2-3 मैत्रीणी आणि माझी जवळची मैत्रीण झाली माझी डायरी. माझ्या 5-7 डायऱ्या भरल्या. घडत गेलेले मोकळेपणाने मी डायरीत लिहून मला लिखाणाची आवडच लागली.



माझ्या आयुष्यात संघर्ष, अडचणी, वाईट अनुभव कमी वयात खुपच आले पण वाईट अनुभवातून आपण शिकत जातो. संकटात आपले कोण समजते. तुम्ही खंबीर होत जातात. हे मात्र खरे आहे. तुमचे अनुभव तुम्हाला जीवनाचे सार उलगडून दाखवतात. तुमच्या नकारात्मक अनुभवातून तुम्हाला शिकायला मिळते. तुम्हाला कोणी शिकवत नाही जितके अनुभव शिकवतात. अनुभवातून मिळालेली शिकवण अविस्मरणीयच असते..



मला असा अविस्मरणीय अनुभव लिहायचा आहे. ज्याने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. मला ध्येयाचा रस्ता दिसू लागला. असा किस्सा म्हणजे मी डायरी लिहायला लागले लहानपणापासून आणि कधी लेखिका, कवयित्री झाले माझे मला कळले नाही. मला इरा ब्लॉगिंग हा लिखाणाला पहिला चांगला मंच मिळाला आहे. यावर एक एक करत मी लिहिलेल्या कविता पोस्ट करू लागले. हळूहळू लेख लिहायला लागले आणि इरा ब्लॉगिंग वर लिहीत असताना एक स्पर्धा आयोजित केली होती. कथामालिका 10 भाग लिहायचे मी तर पहिल्यांदाच मालिका लिहीत होते. मी नवीनच माझी पहिलीच कथामालिका त्या मालिकेला दुसरे बक्षिस मिळाले. माझ्या घरी सर्टिफिकेट आणि ट्रॉफी आली आणि मी लेखिका आहे मला कळले.. स्वत्वाची जाणिव मला इरा मुळे झाली. मी थोडेफार बरे लिहू शकते हि जाणीव झाली. माझे माहेर नसताना मला कौतुकाची थाप देणारे इरा माझे माहेर वाटू लागले, माझ्या लिखाणाला प्रोत्साहन मिळणे याच इराच्या मंचावरील स्पर्धामुळे शक्य झाले. इराच्या लेखकांचा व्हॉटस् अँप गृप वर सगळे खूप मनमोकळ्या गप्पा मारत असतात मीही माझे मन मोकळे करू लागले. याच गृपवर हसणे, मजा, आनंदाचे वातावरण असते यात मीही खळखळून हसू लागले. इरा माझे माहेर झाले. इरा ने मला समृद्ध केले आहे. इराचा अनुभव अविस्मरणीय अनुभव आहे. लेखिका झाले मानधन मिळत आहे. सर्टिफिकेट, ट्रॉफी मिळवण्यासाठी लिखाणाला हळूहळू आकार येत आहे. लिखाणात तुम्ही व्यक्त होत असतात, धन्यवाद इरा ब्लॉगिंग मंच अनेक धन्यवाद. संजना मॅडमचे मनापासून आभार.
.


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे.
©® 24.9.2022