Login

अविस्मरणीय वाढदिवस भाग - 2

Birthday
नमस्कार वाचकहो, काय ? कथा एन्जॉय करताय ना ?? तर जास्त वेळ न घेता आपण पुढे जाऊयात .. तर मागील भागात आपण पाहिलं की ऋग्वेद आणि ओंकार एका घनदाट जंगलात पोहचलेत आणि समोर एक आपलं घर नावाची इमारत दिसतेय आता पुढे ....

      "आपलं घर" ची वास्तू ही कोकणी पद्धतीची  कौलारू अशी होती.फार सुंदर होती ती वास्तू, असं वाटत होत की असं एक आपलं घर असावं निसर्गाच्या सानिध्यात, ऋग्वेद त्या विचारात  असतानाच मागून पाठीवर ओंकार ची थाप पडली तसा तो त्या विचारातून बाहेर पडला.
      ओंकार, कुठे आहे वेदश्री ?? सांग लवकर .
      ऋग्वेद अरे ती त्या इमारतीच्या आत आहे, त्याची पाऊलं त्या इमारतीच्या दिशेने पडत होती ....

     इकडे या सगळ्यांची संपूर्ण तयारी झाली होती, पण सगळं कसं सुरळीत चालू असताना एक गडबड झाली समीर अजून आलाच न्हवता.
   मनस्वी अजून कसा आला नाही समीर??? यानं काहीतरी घोळ घालून ठेवला नाही नाही ना ??
   मनस्वी : अ गं तू जरा शांत हो तो येईल वेळेत ,
   वेदश्री :  कशी शांत होऊ मी ?? एव्हाना त्यानं पोहचायला हवं , ओंकार चा मिसकॉल आलेला म्हणजे ते दोघे आलेत, थांब त्याला फोन करते.
   मनस्वी : थांब मी करते, तू टेन्शन घेऊ नको म्हणत मनस्वी समीर ला फोन करते ,
   समीर : हा बोल मनु
   मनस्वी - अरे काय मनु, कुठे आहात तुम्ही, किती वेळ, अरे ते दोघे आता पोहचलेत इथे, आणि तुझा अजून पत्ता नाही, तुला कळतंय का वेदू ने किती टेन्शन घेतलंय??
   समीर -  अ गं मी थोडं बोलू का ?
   मनस्वी - बोला ,समीर महाराज बोला
   समीर - माझी bike बंद पडलीय ,मी... (मनस्वी मध्येच त्याला तोडत)
   मन्सवी - अरे देवा म्हणजे शेवटी तू घोळ घातलासच, तरीच वेदू न बजावलं होतं ,
   समीर - अ गं माझी आई माझं बोलणं पूर्ण ऐक, bike बंद पडलीय, ती इथे जवळचं पडलीय ,पण मी आणि रिया गाडी तशीच सोडून आता धावत येतोय ,
   मनस्वी - काही कर पण तो पोहचण्याच्या आत ये रे बाबा.
   समीर - हो येतोय, तू ठेवशिल का आता? , बोलण्यात  वेळ नको जायला ,
   मनस्वी - हो ठीक आहे, म्हणत फोन कट करते ...
    मनस्वी काय झालंय, काय म्हणत होता समीर ??  वेदु काही नाही झालं  समीर येतोय ,  मनस्वी खोटं नको बोलू काय झालंय ते खरं सांग.
    मनस्वी - अ गं , वेदु समीरची bike बंद...
    वेदु - काssssय, शेवटी या मुलाने गडबड केलीच , तरी याला म्हणलं होतं, की व्यवस्थित कर सगळं,पण नाही, म्हणतं होता, वेदु काळजी करू नको मी आहे, आहे म्हणे , आता हे कोण सांभाळणार?? मूर्ख कुठला
    मनस्वी - वेदु जरा ऐक, त्याची bike  जरी बंद पडली असली तरी ते दोघे  जवळपास आहेत, आणि ते धावत येतायेत ...
    वेदु- पण तो वेळेत पोहचायला हवा, नाहीतर सगळं केलेलं विस्कळीत होईल,
    मनस्वी - हो, येईल तो, काळजी करू नको ,
     तशी दोघींच्या चर्येवर थोडीशी चिंता जाणवत होती ..
     मनु एक काम कर आपले जे सगळे गेस्ट आहेत त्यांना पटकन, हॉल मध्ये घेऊन ये मी पण मागोमाग येते.
     मनु ,ताई सगळ्यांना हॉल मध्ये घेऊन आलेत आपण जाऊया पटकन ,तश्या त्या दोघी हॉल कडे निघून जातात.

ऋग्वेद आणि इमारतीतलं अंतर कमी कमी होत होतं तसं त्याची स्पदनं वाढत होती, आणि इकडे मनस्वी आणि वेदूचीही ..

 
   ऋग्वेद दरवाज्याजवळ येऊन पोहचला होता, त्यानं डोअर बेल वाजवली त्या आवाजानं वेदु चं हृदय अजून धडधडायला लागतं, दरवाजा उघडायला तिथले कर्मचारी पुढे होतात, वेदु काय होईल या भीतीनेच डोळे घट्ट मिटून घेते, तेवढ्यात मागच्या दाराने आलेला समीर  तिला मागून तिच्या खांद्यावर tap करतो तशी ती मागे बघत डोळे उघडते, नि समीर ला समोर पाहून आनंदी होते, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लकाकी येते, इथं एक अध्याय संपला होता ....
  
     समीर नं आणलेला तो केक टेबलवर ठेवला, त्याला पटकन सजवलं गेलं, चॉकलेट फ्लेवर चा तो  केक फार आकर्षक होता, ऋग्वेद ला  फार फार आवडायचा म्हणूनच तर वेदश्री ने खास करून मागवला होता.
      सगळी तयारी झालेली, दरवाजा उघडला जाणार इतक्यात ,  वेदु ने इशारा करत लाईट स्विच जवळ थांबलेल्या रिया ला  बंद करण्याबद्दल सांगितलं, तशी ती पुढे झाली आणि लाईट बंद झाली.

ऋग्वेद ने दरवाजा हळूच उघडला, समोर फक्त काळोख होता आणि मनात भीती , कुठे आहे  माझी वेदश्री??  भीतीने अंग थरथरत होतं....