अविश्वासाचा दाह भाग २

पण म्हणतात ना सत्य हे कधी ना कधी बाहेर येते.एक दिवस स्वाती स्वतःचे कपाट आवरत होती. तिच्या पर्समध्ये आतल्या बाजूला एक कागद सापडला . त्यावर काहीतरी लिहिले होते. तिने नीट पाहिले तर त्यावर काहीतरी लिहिले होते कोमलचं अक्षर होते. स्वातीने तो कागद हातात घेतला आणि वाचू लागली.


"बाबा,आईला काय झाले आहे,आपण हॉस्पिटलमध्ये का आलो?" हा निरागस प्रश्न कोमलचा लहान मुलगा प्रतीक विचारत होता.

कोमलच्या कानावर प्रतीकचा आवाज आला आणि तिने जीव सोडला. त्या आईने जणू आपल्या लेकराचा आवाज ऐकण्यासाठी जीव थांबवून ठेवला होता.

कोमल गेल्याची बातमी दिली तसे सर्वच रडू लागले. दवाखान्यात आक्रोश पसरला. रडारड पाहून प्रतिकही घाबरला. त्यालाही रडू आले. किशोरला म्हणत होता "मला आईकडे जायचे आहे .मला आईकडे जायचे आहे." किशोरने त्याला मिठीत घेतले आणि तोही रडू लागला.

प्रतिकला माहीत नव्हतं त्याची आई आता कधीच त्याला दिसणार नव्हती. जे झाले ते वाईट झाले. कोमलचे सर्व कार्य उरकले.

पोलिसांना किशोरवर त्याच्या घरच्यांवर शंका होती. चौकशीसाठी स्वाती,किशोर आणि किशोरचा लहान भाऊ मयूर तिघांना सतत चौकशीसाठी बोलावत होते.

किशोरकडे चौकशी केली असता तो म्हणाला :"माझं आणि कोमलचा प्रेम विवाह झाला होता. आम्हाला लहान मुलगा आहे. आमच्यामध्ये काहीच भांडण नाही. तिने असे का केले मलाच ह्याचे उत्तर सापडत नाही."

स्वाती म्हणाली:"आम्ही दोघी जावा नेहमी बहिणीसारख्या राहिलो. सासू आणि सासरे वारल्यावर आम्ही दोघी मिळून घर संभाळत होतो. ती नेहमी खुश असायची. मध्यंतरी तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती जास्त बोलायची नाही. रूममध्ये असायची.


मयूर:"माझी वहिनी ही खूप प्रेमळ होती. सर्वांच्या आवडीनिवडी जपायची नेहमी हसरा चेहरा होता. हल्ली तब्येत बरी नसल्याने ती शांत होती.


पोलिसांनी विचारल्यावर कळलं की तिला डोकं दुःख, चक्कर येणे असा त्रास होत होता.


मयूर आणि स्वातीनेच तिची तब्येत बरी नसल्याचे सांगितले.

किशोर तसं काही म्हणला नाही . किशोरला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा तो मी हे सांगायला विसरलो असे म्हणाला.


शंकेची सुई किशोरवर गेली होती.
नक्कीच काहीतरी गडबड आहे आता कळून चुकले होते.

जसं मंदारचा भाऊ म्हणाला कोमल भित्री होती असे काही पाऊल उचलणार नाही. काही तरी लपवाछपवी होत आहे हे मात्र नक्की.

पोलीस तपास करत होते.
कोमलच्या आई वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनीही सांगितले "ती किशोर सोबत खुश होती. सासरी कधी त्रास होतो आहे ही कधीच तक्रार नाही. घरातली माणसं देखील चांगलीच म्हणायची. स्वातीला तर अगदी लहान बहीण मानायची.

मंदार:"ताई, असे विनाकारण करणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असावे."

त्याने पोलिसां समोर हात जोडले आणि म्हणाला.

"साहेब, माझी बहीण गेली. तिला न्याय द्या तिला न्याय द्या."

पोलीस कसून चौकशी करत होते.

स्वातीसोबत ती जास्त वेळ असायची. किशोर आणि मयूर कामाला गेले की दोघी सोबतीला असायच्या.
शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता कळले की
सुखी कुटुंब होतं, स्वाती आणि कोमल दोघींचे नाते छान होते. किशोर आणि कोमल देखील एकमेकांवर प्रेम करायचे. आदर्श जोडपे होते. स्वाती येण्याच्या आधी कोमलने घर सांभाळले होते.

सगळेच शॉक होते. असे एकाएकी कोमल काही करेन वाटले नव्हते.

पण म्हणतात ना सत्य हे कधी ना कधी बाहेर येते.एक दिवस स्वाती स्वतःचे कपाट आवरत होती. तिच्या पर्समध्ये आतल्या बाजूला एक कागद सापडला . त्यावर काहीतरी लिहिले होते. तिने नीट पाहिले तर त्यावर काहीतरी लिहिले होते कोमलचं अक्षर होते.

स्वातीने तो कागद हातात घेतला आणि वाचू लागली.

क्रमशः
©®अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all