अवघड,अडखळ असं बाईपण...

स्ञीची कहाणी
बाईपण  अवघड व संवेदनशील असल ,तरी एक उर्मी जागवणार अस असतं तिच आस्तित्व नाही का?...सगळ घर थांबलेल असल तरी,लगबघ फक्त तिची एकटी. संसारासाठी, पिलांसाठी,घराच्या भल्यासाठी, नवर्याच्या कर्तबगारीसाठी. कुठेतरी आपल्या भावना व वेदना थांबवून जगते.
ती थांबते मग घडतात अनेक सुखावह व नवलौकिक घटना....

स्वत्व विसरून सकाळचा आराम जरी करायचा असला तरी, ती उठते लगबगीने ...घरासाठी.देवाची पुजा, मुलांच्या शाळेच्या वेळा,यजमानांचे ऑफिस,सासुसारर्यानचे वेळेवरचे खाणपान,पथ्य.. किती तो सुटसुटीतपणा तिच्या अंगी....न चुकता ,न थकता स्वतः ला थांबवून करण्याची कला व गुण फक्त आणि फक्त बाईतच....

नवर्याच्या संसाराला आधार देतांना ती स्वतः चे ध्येय विसरते .पळते नवर्यामागे व त्याला आधार देत.नवर्याला एका उंचीवर बघण्याचे स्वप्न बघते...नवर्याच्या किर्तीचे  स्वप्न बघणारी ती........बाईच ...हं!!,

आता परत दुसरा रोल तोही नसे थोडका...आईपणाचा स्वतः हालहाल होऊन मुलांना घडवणे,खरतरं किती जिकरिचे काम .पण तीचे ते कर्तव्य कधीच विसरत नाही ती....मुल जरी झाली जाणती तरी मागे उभे राहाणे ही सवयच होते तिची जणु...बाथरुम बाहेर उभे राहून..., अभ्यास करतांना त्यांच्या सोबत जागुन..., पालकसभा,विविध स्पर्धा ह्यात मुलांची हिम्मत वाढवत ती आपले बालपण जगत असते...प्रसंगी कंबरदुखी, कॉल्शिअमची कमतरता,सांधेदुखी.. कितीही असूदे....मुलांसाठी काहीपण हा त्याग  फक्त बाईच करु शकते ...हं??...

मुलं कितीही म्हणु देत..."आगं कळतयं आम्हाला आता छोटे नाही राहिलोत "....
पण बाईसाहेबांसाठी ते छोटेच असतात....

घरातील सगळ्याच्या तब्बेती सांभाळत .गरमागरम जेवण वाढणे ...हा तिचा आवडता शौक...??
पोटात कळ येवो कि पायाला वात येवो...तव्यावरची पोळी निट भाजल्याशिवाय हिला चैन येईल थोडिच... त्यानंतर सगळ्यांचे जेवण आवरेल मग हिला शेवटी जेवायचं.... दुध तापवण,सगळ्या भाज्या निटनेटक्या कापण,व सगळ आवरलं का मग हिच जेवणं ..परत सासर्यांचा आवाज आला कि हि पाण्याचा लोटा घेऊन जेवणाच्या ताटावरून उठली म्हणून समजा....ती पळतेच.नुसती लगबघ ....लगबघ तिची....

सकाळी लवकर उठलेली ती ,शेवटी किचन आवरेल, तेही निटनेटक...सगळे झोपीही जातिल मग ही सगळ्यांच्या रुममध्ये जाऊन बघणार ...लाईट बंद करणार सगळे झोपलेत का मग शेवटी हिची झोप...तीही उद्याच्या दिवसाचा विचार करतच....अशी ही बाई नाही का?
किती हे आवघड बाईपण ...तरीही ती कुठे काय करते हा समाजाचा प्रश्न.... बदल घडलेत,बदल घडताहेत पण हे तिचे बाईपणाचे जगणे न ती सोडेल न सुटणार.... आनंदाने जगणारी हि ग्रेट बाई....


सार्या मैत्रिणींना समर्पित... 

®© वैशाली देवरे...