अवघड वाट

@ सपना कद्रेकर माझे विचार मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  राखी, तिची लहान बहिण आणि मोठी दोन भावंड. दोन भावानंतर राखीचा ज्न्म म्हणजे लक्ष्मिच जन्माला आली. आई वडील खुश होते. राखी खूप हुशार नव्हती पण सगळ शिक्षण पूर्ण केल तिने.मग छोटी मोठी नोकरी करु लागली. लग्नाच वय झालं होत, वर संशोधन चालू होत. होय नाही म्हणता म्हणता एक राजबिंडा, एकुलता एक मुलगा,  आणि तो ही मल्टी नेशनल कंपनीत काम करणारा " राजा" नावाचा मुलगा वर म्हणून मिळाला. आता मात्र राखी ही ह्या राजाची राणी झाली.

     राजा राणीचा संसार फुलला. राजाचे आईवडील आणि एक बहिण अस चौकोनी कुटुंब होत.राखीसुद्धा लहानपणापासून एकत्र कुटूबातच वाढलेली होती. तिच्या घरात तर दोन वहिन्या पण होत्या. सगळ छान चालल होत. पण राखीला काहीतरी खटकत होत, काय त्रास होता, तिच तिलाच माहीत ......... ! तिला कदाचित ते सुख सोसवत नव्हत. तिला वेगळा संसार थाटायचा होता. तस म्हटल तर राजाच्या बहिणीच्या लग्नानंतर तर ते घर दोघांचच होणार होत. पण राखीच्या वहिन्याही तिला वेगळा संसार थाटायला भर घालत होत्या….. कुणाला कशात सुख दिसत ते त्याच त्यालाच माहित.... !!! पण अस करता करता दोघांचे खटके उडत होते. या खट्क्यांचा परामर्श पुढे भांडणात होवु लागला. असे खट्के प्र्त्येकाच्या संसारात कधी ना कधी उड्तच असतात. त्याशिवाय प्रेम फुलत नाही म्हणतात. अशातच राखीला दिवस गेले.

     राखीला मुलगा झाला. दोन्ही घरामधे आनंदोत्सव साजरा झाला. बाळंतपण सुखा सुखी पार पडलं. सगळे आनंदात होते. पण राखीच्या डोक्यात अजूनही तोच किडा वळवळत होता. सासू सासरेही त्यांच्या या भांडणाला कंटाळले होते. बेडरूम मधली भांडणं आता बाहेर येऊ लागली. मग मात्र एकदा या भांडणाचा विस्फ़ोट झाला. राखीचा कायदेशीर घटस्फ़ोट झाला. आता काय? वेगळा संसार राहिला बाजूलाच..... पुर्णपणे वेगळेपण आल, तिच्या नशिबात.

     आता खरी परीक्षेची वेळ होती. माहेरी आली रहायला, दोन्ही वाहीन्यांनी हात वर केले. कोण सांभाळणार हिला आणि ते ही तिच्या मुलासकट. हिला स्व्तःचा नोकरीधंदा नाही. कारण घरच्या भांडणात ही नोकरी सोडून बसलेली.

     आता मात्र पश्चातापाची वेळ राखीवर आली होती......

     समाजात अशा कित्येक राखी आहेत की ज्याना आपल सुख कशात आहे हेच कळत नाही. यात आईवडिलांच्या संस्काराचा प्रश्नच नसतो. ते बिचारे कुठे कमी पडत नाहीत. पण आपण कुठल्यावेळी काय करायला पाहिजे?..... कोणता निर्णय बरोबर आहे कोणता चूक.... कधीतरी थोडी कच खाल्ली तर, अहंकार बाजूला ठेवला तर बरेच प्रश्न चुटकीसरशी सुटतात. अशावेळी आजुबाजुच्या जगाचं ज्ञान असाव लागतं. तेच ह्या मुली विसरून जातात.

     म्हणून शाळेच्या शिक्षणाबरोबरच हे ही शिक्षण असणं गरजेच असत.