Login

ओढ

Her attraction is like wind in dessert .

अंधारातही प्रकाश देणारी तिची ओढ 

माझ्या उदास चेहऱ्यावर स्मित पसरवणारी तिची ओढ 

तहानलेल्या गळ्याला पाण्यासारखी वाटणारी तिची ओढ 

न सांगताही खूप काही सांगून जाणारी तिची ओढ 

जगण्यासाठी कारण देणारी तिची ओढ 

एकटा असूनही माझ्या सोबत असणारी तिची ओढ 

रागातही शांत करून जाणारी तिची ओढ 

मृत्यतही जीवनाची इच्छा जगवणारी तिची ओढ 

रडण्यासाठी अश्रू आणणारी तिची ओढ 

त्याच अश्रूंना पुसणारी तिची ओढ 

ऋषिकेश मठपती