अतरंगीरे एक प्रेमकथा भाग ९२

In marathi

विराज आणि अनघा शौर्य आता काय निर्णय घेतोय ह्या बाबत डिस्कस करत होते.. संध्याकाळचे 7 वाजत आले असतात पण शौर्य काही त्यांच्या रूममध्ये येत नाही.. 

विराज : अनु तुला खरच अस वाटत का की शौर्यने ऐरोस्पेस इंजिनिअर करावं??

अनघा : हो.. काही तरी वेगळं शिकायच ठरवतोय तो.. तुला तरी आफ्टर 10th अस काही आहे हे माहीत होतं का?? 

विराज आपली मान नकारार्थी हलवत अनघाला नाही म्हणुन बोलतो.

अनघा : मग विचार कर त्याने किती रिसर्च केलं असेल ह्या कोर्सबद्दल.. 

विराज : तो स्कुल थ्रू NASA मध्ये जाऊन आलाय. तेव्हापासून हे क्रेज आहे त्याच्या डोक्यात..

अनघा : ओहहह.. बट अस काही तरी वेगळं करायचं हे त्याच स्कुल टाईमला असतानाच ठरल असेलना. त्यावेळेला आपल्याला आपण आफ्टर 10th काय करणार हे सुध्दा साद आपल्याला माहीत नसतं विराज. तुम्ही लोकांनी शौर्य मधलं चांगल टेलेंट मिस केलंय. 

विराज : मी नाही मम्माने..

अनघा : आता तरी तु कुठे सपोर्ट करतोयस त्याला?? 

विराज : मला माझ्या भावाने तिथे NASA मध्ये जाऊन कोणाच्या हाताखाली काम करणे हे जरा पण पसंत नाही. मला पण त्याने गप्प USA मध्ये जाऊन शिकावं. तिथुन आल्यावर इथे मुंबईत येऊन मम्मासोबत बिजीनेसच करावा अस वाटत.

अनघा : तु का अस वागतोयस विराज?? 

विराज : अनु मी फक्त बोललो की मला अस वाटत.. त्याने तेच करावं असं नाही बोललो मी. 

अनघा : आणि बोलणार ही नाहीस.

विराज : ए हॅलो मी नवरा आहे तुझा.. तु मला धमकी कसली देतेयस..

(अनघाला थोडा नकटा राग दाखवतच तो बोलतो)

अनघा : हा मग ऐकत नाही म्हटलं तर काय करू सांग?? तु मला प्रॉमिज कर शौर्य जे डीसाईड करेल त्यात तु त्याला सपोर्ट करशील??

विराज : अजिबात नाही आणि डोन्ट फोर्स मी ओके.

अनघा : विराज प्लिज.. त्याला त्याचा निर्णय घेऊ दे. तो लहान नाही आहे. 

विराज : तुला नाही कळत ग.. मम्मा नाही ऐकणार.. 

अनघा : मी समजवेल त्यांना.. 

विराज : अजिबात नाही.. तु मम्मासोबत ह्या टॉपिकवर बोलणार नाहीस... 

अनघा : मग तु बोल..

विराज : मी बोललो ना मला पण अस वाटत की शौर्यने USA जावं.. इतरांच्या हाताखाली त्याने काम केलेले मला नाही म्हणजे नाही आवडणार. आणि तु सुद्धा हा टॉपिक परत परत नको काढुस प्लिज.. आणि मी तिकीट बुक करतोय त्याच.. 

विराज लॅपटॉप ओपन करतच अनघाला बोलला..

अनघा : विराज प्लिज. शौर्यला ठरवु दे ना त्याला काय करायचं ते.. दोन दिवस तरी दे त्याला विचार करायला.. प्लिज.. 

विराज काहीही न बोलता अनघाकडे बघतच आपला लॅपटॉप बंद करतो..

अनघा : मी आलीच..

विराज : कुठे चाललीस??

अनघा : काही तरी मोठा डिसीजन घेतेय.. मम्मीची परमिशन नको का घ्यायला..

विराज : अनु प्लिज तु शौर्यबद्दल मम्माशी बोलणार नाहीस..

अनघा : माय डिअर हब्बी.. मी उद्या माहेरी चाललीय.. पप्पा उद्या येणार आहेत न्यायला. थोडे दिवस तरी राहील तिथे.. त्याबाबतच मम्मीसोबत बोलायला चाललीय.

विराज : तु माहेरी का चाललीस??

अनघा : तशी पद्धत आहे विराज.. 

विराज : आणि माझं काय?? माझी परमिशन पण घ्यावी लागेल तुला..

(अनघाला आपल्याजवळ खेचतच तो बोलतो)

अनघा : तस मला माहिती माझा नवरा मला नाही बोलणार नाही. तसही मम्मीला विचारून मग मी तुझी परमिशन घेणारच होती.

विराज : ओके. मग किती दिवस जाणार??

अनघा : आता तु एवढं प्रेमाने विचारतोस मग चांगलं महिनाभर रहाते.. चालेलना??

अनघा अस बोलताच विराज अनघाला अजुन घट्ट आपल्याजवळ ओढतो.

विराज : चालेलना.. मग तुला पण हे चालवुन घ्यावं लागेल.. 

(अस बोलत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो..) 

अनघा : तु परत चालु झालास??

अनघा हसतच त्याला आपल्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करते. पण विराजने अगदी घट्ट पकडल्यामुळे तिला त्याच्या पकडेतून बाहेर निघायला जमत नव्हतं 

विराज : आता बायको महिनाभर माहेरी जायच बोलते म्हटलं तर काय करू सांग..

अनघा : तु सोड बघु मला..

विराज : अजिबात नाही.

अनघा : अस??

विराज : मग कस??

(विराज आपली भुवई उडवत तिला थोडं चिडवतच बोलतो)

अहो मम्मी बर झालं तुम्ही आलात.. आता मी तुमच्याकडेच येणार होती.. हो ना विराज.. अनघा विराजच्या पाठी बघतच बोलली.. आपली मम्मा आली हे कळताच विराज अनघाला पटकन सोडुन तिच्या पासुन दूर होतो.. आणि मागे वळुन दरवाजाकडे बघतो पण दरवाजाजवळ तर कोणी आलंच नव्हतं. विराज परत अनघाला पकडणार तस अनघा हसतच दरवाजा जवळ पळत जाते.. 

अनघा : काय मग मिस्टर नवरोबा.. कशी वाटली माझी आयडिया??

विराज : नंतर इथेच येणार आहेस तु.. विसरू नकोस..

अनघा : ते मी विचार करते कि.. आज मी माझ्या लाडक्या सासु बाईंच्याच रुममध्ये झोपते.. तु काय बोलतोस?? चालेल ना तुला??

विराज : तुला चालणार असेल तर ठीक आहे.. तस मी मम्मासोबत बोलतो..

अनघा : काय??

विराज : आता मम्माच्या रूममध्ये आपण झोपणार म्हटलं तर तिला आपल्या रूममध्ये झोपायला कनवेयन्स नको का करायला.. एक काम करतो मी पण येतो तुझ्यासोबत दोघेही एकसाथ जाऊयात मम्माकडे.. दोन्ही काम एकसाथ करू.

अनघा : पक्का बिजीनेस मॅन आहेस तु.. 

एवढं बोलत अनघा तिथुन जाणारच तोच तिचा बेडवर पडलेला फोन वाजतो.. 

विराज : काय टायमिंग आहे बघ.. आता तर तुला हा फोन उचलायला माझ्याजवळ यावच लागेल..

अनघाचा फोन विराज हातात पकडतच तिला बोलला..

अनघा : कोणाचा फोन आहे??

विराज : माझ्याजवळ येऊन बघ.. खुप म्हणजे खुप महत्वाच्या व्यक्तीने केलाय फोन..

अनघाकडे आता दुसरा कोणता ऑप्शन नसतो ती विराजकडे बघतच त्याच्या जवळ येते. विराजच्या हातातुन फोन घेत ती कोणाचा फोन आलाय ते बघते..

तोपर्यंत विराज तिला पाठूनच घट्ट मिठी मारतो.. 

हा गाथा बोल.. फोन उचलतच ती बोलते.

गाथा : कशी आहेस तु??

अनघा : आपण सकाळीच बोललोय गाथा.. तु नक्की मी कशी आहे हे विचारण्यासाठीच फोन केलायस ना?? आय मिन काही काम होत का??

गाथा : हम्मम..

अनघा : काय झालं?? घरी सगळं ठिक आहे ना??

गाथा : इथे सगळं ठिक आहे ग.. 

अनघा : मग??

गाथा : ते शौर्यसोबत सकाळी बोलली मी. थोडा टेन्स मध्ये होता.. तस मी त्याला समजवल पण काळजी वाटते ग त्याची. तो आहेना बरा?? म्हणजे दुपारनंतर त्याच्याशी बोलणंच नाही झालं ग.. तु त्याला भेटली असशीलच ना?? कसा आहे तो??

अनघा : गाथा तु हे शौर्यला फोन करून विचारू शकत होतीसना??

गाथा : त्याचा फोन स्विच ऑफ येतोय ना ग.. जवळपास दोन तास तरी झाले असतील मी त्याचा फोन ट्राय करतेय.. आता अजुन रहावल नाही म्हणुन मी तुला फोन लावला..

अनघा : थांब मी बघते.. आणि तुला सांगते..

 तुला बोलायच असेलना त्याच्यासोबत?? 

गाथा : हम्मम

अनघा : तुला मी त्याच्या रूममध्ये गेल्यावर कॉल करू का??

गाथा : ओके मी वाट बघतेय तुझ्या फोनची...

अनघा गाथाचा फोन कट करते.. पण विराजने मात्र तिला अगदी घट्ट पकडलं असत..

अनघा : विराज शौर्यला एकदा बघुन येना.. त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय.. गाथा थोडं टेन्शनमध्ये आलीय. तिला त्याच्यासोबत बोलायचंय..

विराज : मीच मगाशी रागात त्याचा फोन स्विच ऑफ केलेला..

अनघा : विराज त्याच्या रूममधुन येऊन आपल्याला येऊन जवळपास दोन तीन तास तरी झाले असतील त्याने अजुन फोन स्विच ऑफ का ठेवलाय??

अनघा अस बोलताच विराज तिला सोडत शौर्यच्या रूममध्ये जायला निघतो. सोबत ती सुद्धा..

शौर्य… विराज त्याला आवाज देतच त्याच्या रूमची लाईट लावतो.. शौर्य ब्रूनोला घट्ट मिठी मारुन गेलरीत शांत बसला असतो.. कसला तरी खोल विचारात तो हरवुन गेला असतो..

विराज : शौर्य तु फोन अजुन स्विच ऑफ का ठेवलायस?? आणि अस अंधार करून का बसलेलास..??

पण शौर्य काहीच प्रतिक्रिया देत नाही..

विराज त्याच्या बाजुला जाऊन बसतो.. तरी शौर्यच लक्ष नसत..

विराज : कसला एवढा विचार करतोयस शौर्य.. लक्ष कुठेय तुझं?? ए शौर्य..

(विराज शौर्यच्या खांद्यावर हात ठेवतच त्याला बोलतो)

अचानक विराजचा हात त्याच्या खांद्यावर पडल्यामुळे तो थोडा घाबरतो.

शौर्य : तु कधी आलास??

विराज : कसला एवढा विचार करतोयस तु?? 

कसला नाही अस बोलत तो तिथुन उठतो.. तर पाठी अनघा उभी असते.

अनघा काही बोलणार तोच गाथाचा फोन तिला येतो..

अनघा : गाथा तुला फोन करतेय. तुझा फोन स्विच ऑफ येत होता म्हणुन तिने मला फोन केला. बोलशील तिच्यासोबत..??

शौर्य : हम्मम्म.

अनघाच्या हातातुन मोबाईल घेत गाथाचा फोन रिसिव्ह करतच शौर्य मोबाईल कानाला. 

गाथा : दि कसा आहे शौर्य?? बरा आहेना?? 

शौर्य : बरा आहे मी.

गाथा : शौर्य तु.. किती घाबरलस तु मला.. फोन स्विच ऑन करून मला फोन करशील.. प्लिज...

शौर्य : हम्मम

गाथा : मी वाट बघतेय तुझ्या फोनची. प्लिज मला फोन कर.. 

शौर्य : हम्मम

शौर्य फोन कट करून अनघाकडे देतो.

आपल्या खिश्यातुन फोन काढत तो स्विच ऑन करतो. आणि बेडवर बसतो..

विराज : तु काय ठरवलंस शौर्य??

शौर्य : नाही माहीत..

विराज : USA जातोयस ना?

अनघा : विराज प्लिज.. 

विराज : व्हॉट प्लिज?? मम्मा थोड्या वेळाने येईल विचारायला तिकीट बुक केलं का म्हणुन?? काय सांगु?? शौर्य तुच सांग ते सांगतो मी.

शौर्य : तुला जे वाटत ते सांग.. 

विराज : USA जातोयस म्हणुन सांगतो..

शौर्य : तु अजुन काय सांगणार विर.. मला तुझ्याकडुन तेच अपेक्षित आहे.. 

विराज : मग तु काय ठरवलंस ते तरी सांग तस सांगतो.

(शौर्य डोक्याला हात लावुन शांत बसुन असतो.. त्याला खरच काय करायच ते कळत नसत.. आयुष्यात पाहिलेलं खुप मोठं अस स्वप्न.. ते पूर्ण करायची सुरुवात करायला घरातुन आज परमिशन मिळेल अस कुठे तरी त्याला वाटत होतं आणि तो ते पूर्ण करेल असंही त्याला वाटत होत. पण गाथा पासुन लांब राहुन त्या मिळालेल्या यशात काहीच सुख नसणार असंही त्याच मन त्याला सांगत होतं. ऐरोस्पेस इंजिनीअर की गाथा तो हाच विचार करत बसला होता. पण त्याला काही निवडता येत नव्हतं..

अनघा : दोन दिवस तरी दे विराज त्याला.. प्लिज..

विराज : हवा तेवढा वेळ घेऊ दे आय डोन्ट केअर नाव्ह.. आय नो हिम.. तो त्याच तेच म्हणणं खर करणार.. तुला हवं ते कर शौर्य.. मी मम्मासोबत बोलुन येतो.. आणि तुझं एडमिशन पण केन्सल करतो.. मम्मा कशी रिएक्ट होईल हे तुला वेगळं सांगायला नको..

अनघा : विराज मी बोलु मम्मीसोबत..?

विराज : अनु मी तुला परत परत एक गोष्ट नाही सांगणार.. हे शेवटच सांगतोय प्लिज तु ह्या सगळ्यांमध्ये अजिबात पडु नकोस. आणि मी एकदा प्रयत्न करून बघतो..मम्मा समजली तर ठिक नाही तर शौर्य बेग भरून रेडी रहा.. काय तो निर्णय आज होऊन जाऊ दे. उद्यापासून मला वेळ नाही.. मी ऑफिस जॉईंट करतोय. आधीच महिनाभर सुट्टी झालीय.. काम किती आहेत हे तुला काही वेगळं सांगायला नको.

विराज शौर्यवर एक नजर फिरवतो आणि अनिताच्या रूममध्ये जायला निघतो.. अनघासुद्धा त्याला समजवत त्याच्या मागे शौर्यच्या रूममधुन बाहेर पडते..

अनघा : विराज प्लिज दोन दिवस दे शौर्यला.. मग बोल ना तु मम्मीसोबत..

विराज : तु रूममध्ये जा मी येतो मम्मीसोबत बोलुन.

अनघा : मी पण येते तुझ्यासोबत.

विराज : अजिबात नाही.. तु रूममध्ये जा.. माझं मी बोलतो बरोबर..

(अनिता अनघासमोर उलट सुलट आपल्याला काही बोलेल अस विराजला कुठे तरी वाटत असत म्हणुन तो अनघाला रूममध्ये जायला बोलतो)

अनघा : ओके.. रिक्वेस्ट कर त्यांना.. शौर्यला जे हवं ते करू दे. प्लिज..

विराज : हम्मम..

अनघा रूममध्ये येऊन विराजची वाट बघत बसते. 

शौर्य आपला मोबाईल आपल्यासोबत घेत रूमबाहेर पडत स्टेरकेजवर जाऊन बसतो.. आणि गाथाला फोन लावतो..

गाथा शौर्यने केलेला ऑडिओ कॉल कट करत त्याला व्हिडीओ कॉल लावते..

शौर्य वेळ वाया न घालवता तिचा फोन उचलतो.. दोघेही एक मिनिट शांत रहात एकमेकांकडे बघतच रहातात..

गाथा : रडलास ना खुप???

शौर्य आपली मान नकारार्थी हलवत जबरदस्तीच हसु आपल्या ओठांवर आणत नाही म्हणुन सांगतो..

गाथा : शौर्य मला तुझे डोळे खुप आवडतात कारण ते माझ्याशी कधीच खोटं नाही बोलत.. 

शौर्य आज गाथाच बोलणं फक्त ऐकत होता.. आणि फक्त तिच्याकडे बघतच असतो.

गाथा : तु नक्की बरा आहेस ना??

आपली मान हलवतच तो हो म्हणुन बोलतो..

गाथा : घरी बोललास??

शौर्य : हम्मम्म...

गाथा : काय बोलले?? 

शौर्य : जे त्यांच्याकडुन मी एक्सेप्ट केलेलं ते..

गाथा एकटक शौर्यकडे बघतच रहाते..

गाथा : शौर्य तु आता भेटशील मला??

शौर्य : आता??

गाथा : हम्मम्म..

शौर्य : तु घरी काय सांगशील..?

गाथा : माझं टेन्शन नको घेऊस.. मी येईल बरोबर.. त्यादिवशी जिथुन पिकअप केलंस तिथेच भेट..

शौर्य : हम्मम.. 

शौर्य गाथाचा फोन कट करतच आपल्या रूममध्ये शिरतो.. रूममध्ये येताच बाईकची कि शोधत असतो तो.. पण भेटतच नसते त्याला. 

बाईक रॉबिनकडे दिली हे त्याला आठवत तो पटकन त्याला आत्ताच्या आत्ता बाईक घेऊन यायला सांगतो..

रॉबिन बाईक घेऊन येताच शौर्य रॉबिनला घरी सोडतो आणि तिथुन गाथाला भेटायला जातो..

इथे विराज अनिताच्या रूममध्ये येतो. अनिता गेलरीत त्याच्याकडे पाठ करून उभी असते

अनिताला शौर्यने मगाशी सुरज बद्दल जे सांगितलं ते ऐकुन रडु येत असत. आपण त्याच्या मुलाला अगदी आपल्या मुलाप्रमाणे प्रेम दिलं.. पण सुरज मात्र माझ्या शौर्यवर एवढा अन्याय करत आलाय.. आणि आपण पण कुठ तरी कमी पडलो ह्याची जाणीव तिला झाली असते.

विराज : मम्मा.. थोडं बोलायच होत..

विराजचा आवाज ऐकताच अनिता पटकन आपले डोळे पुसत त्याच्याकडे बघते..

अनिता : हम्मम बोल.. 

विराज : मला नाही वाटत शौर्य जाईल USA..

अनिता : तु समजवल नाहीस का त्याला??

विराज : ऐकेल अस नाही ग वाटत मला..

अनिता : तु दोन दिवसांनंतरच तिकीट बुक करून टाक. मी बघते तो कस नाही जात ते..

विराज : मम्मा त्याला हवं ते करू दे ना प्लिज.. तो जे करायचा विचार करतोय ते पण चांगलंच आहे ग. तो बीजीनेस मॅन व्हावा हे स्वप्न तुझं आहे पण त्याच काही तरी वेगळं स्वप्न आहे.. 

अनिता : विराज तुला कळत ना तु काय बोलतोयस ते. तो USA जातोय हे कन्फर्म आहे. 

विराज : मम्मा प्लिज एकदा त्याच्या मनाचा विचार कर.. मी त्याच एडमिशन केन्सल करतोय. मला अस वाटत त्याला जे वाटत ते त्याने करावं.

अनिता : विराज तुला झालं काय आहे?? काय फ्युचर दिसतंय तुला त्याने डीसाईड केलेल्या स्टडी मध्ये??

विराज : त्याने जे डीसाईड केलं ते काही तरी वेगळं आहे ग.. त्याला स्पेसवर वैगेरे जायचय. 

अनिता : तु त्याच एडमिशन वैगेरे केन्सल तर अजीबात करणार नाहीस.. त्याच तिकिट पण मीच बुक करेल. त्याला USA कस पाठवायच ते ही मी बघेल. ह्यापुढे शौर्यच्या बाबतीतले सगळे निर्णयसुध्दा मीच घेत जाईल. तु त्याच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीत आत्तापर्यंत त्याची साथ देत आलायस विराज. तुझ्याकडुन मला अजुन दुसरी काय अपेक्षा असणार?? सुरुवातीपासूनच मी नको बोलत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तु त्याला सपोर्ट करत राहतोस. तुझी मम्मा खुप वाईट आणि मी खुप चांगला हेच तु आत्तापर्यंत त्याला दाखवत आलायस.

विराज : मम्मा मी अस का करेल?? 

अनिता : अस का करेल नाही अस केलयस विराज तु.. आणि आत्ता इथे येऊन माझ्या समोर त्याची बाजु घेऊन तु परत त्याला हे दाखवुन देतोयस खरच तुझी मम्मा खुप म्हणजे खुप वाईट आहे.. शौर्यला तु सांगणार मी रेडी आहे तुला USA पाठवायला पण मम्मा नाही बोलत आहे.. म्हणजे शौर्यला परत त्याची मम्मा वाईट आहे हे दाखवुन देणार तु.

विराज : मम्मा प्लिज.. तु अस का बोलतेयस.. 

अनिता : खर तेच तर बोलतेय मी. आत्तापर्यंत तु तेच केलंसना विराज. माझ्या मनाविरुद्ध वागुण तु त्याला प्रत्येक चुकीच्या गोष्टीत मदत करून तु त्याला माझ्यापासुन लांब केलयस. मगाशी इथे येऊन मला काय बोलला माहिती तो, माझ्यासाठी माझी मम्मा आणि माझा बाबा विरच आहे. मला कस वाटलं असेल हे ऐकुन.. म्हणजे आई म्हणुन माझी काही किंमतच नाही ना त्याच्या नजरेत. 

विराज : मम्मा शौर्यला अस वाटत त्यात मी तुला चुकीचा वाटतो?? मी काय चुकीच वागलो मला कळेल.?? एक मोठा भाऊ जस आपल्या लहान भावावर प्रेम करतो तसच प्रेम केलंय मी त्याच्यावर. तो चुकत असेल तर मी त्याला ओरडतो मम्मा.. वेळ आली की मारतो सुध्दा. हे तुला पण माहिती आहे ना.. तरी सुद्धा तु अस बोलतेस. आता तु हे अस बोलुन मला हर्ट करतेयस..

अनिता : काही गोष्टी माझ्या मनाविरुद्ध जाऊन करतोस तु विराज. सुरुवातीला सुद्धा त्याला बाईक नको घेऊन देऊ बोललेली मी. शौर्यने हट्ट केला तु आणुन दिलीस बाईक. नुकतीच बारावीची परीक्षा दिलेली त्याने. खरच त्याला बाईक घेऊन द्यायची गरज होती विराज?? धड अठरा पण पूर्ण नाही झालेले त्याला. खुप दिवस तो माझ्या मागे लागलेला.. पण 18 वर्ष पुर्ण झाल्याशिवाय मी बाईक देणार नाही हे त्याला मी सांगितलं होतं.. पण दोन दिवसांनी बघते तर बाईक दारात हजर.. म्हणजे कोण वाईट झालं त्याच्या नजरेत मीच ना. मित्रांसोबत पाच सहा दिवस ट्रीपला जायची परमिशन मागायला यायचा. मी परमिशन नाही दिली तर तु यायचास त्याच्यासाठी माझ्याकडे परमिशन मागायला. आता जस समजवतोस मला तसच तेव्हा समजवायचास.. मग मी हो बोलली की आपला विर खुप चांगला आहे आपल्यासाठी मम्माकडे गेलेला आणि आपल्याला परमिशन मिळवुन दिली. पण आपली मम्मा का नको बोलते हे तु त्याला कधी पटवुन नाही द्यायचास. कॉलेजमधुन मारामारी करून आल्यावर जरा त्याला ओरडायला गेलं तर तु मध्ये येऊन त्याची बाजु घेऊन माझ्यासोबत भांडायचास. मग काय आपल्या मम्माला फक्त रागवताच येत आपल्यावर एवढंच त्याच्या मनात. दिल्लीतुन त्याला इथे आल्यावर परत दिल्लीत सुद्धा तुच पाठवायचं डिसीजन घेतलंस ना..?? मला तर तो इथेच रहावा अस वाटत होतं. पण विर त्याच्या सोबत आहे म्हटलं तर तो कस माझं ऐकेल. जास्त त्याच्या समोर चांगलं वागुण तु लांब केलयस मला त्याच्यापासुन. एक तर आधीच सुरजसोबत लग्न करून मी त्याला माझ्यापासुन लांब केल आणि आता तु..

विराज : मम्मा मला नाही माहीत मी त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा असा चुकीचा अर्थ तु काढत असशील. बट मला अजुनही अस वाटत की एकदा शौर्यचा विचार कर.. प्लिज.. त्याला नाही ग बिजीनेस मध्ये इंटरेस्ट निदान त्याला तरी त्याला हवं ते करू दे.

अनिता : मी आणि शेखरने काही तरी स्वप्न बघितलीत त्याच्यासाठी. मी माझी स्वप्न एकवेळ विसरून जाईल. पण शेखर ने जी स्वप्न त्याच्यासाठी बघितलेली ती मी त्याच्याकडुन पुर्ण करून घेईलच. आय नो मी चुकीची वागतेय.. बट मला शेखरची इच्छा पूर्ण करण्यासाठी तस वागावं लागतंय. त्याला त्याच्या चॅम्पला मोठं बिजीनेस मॅन करायचं होतं. आणि शौर्यला पण ते एक्सेप्ट करावं लागेल. तु ह्यात मध्ये नको पडुस. आणि ह्या पुढे शौर्यची बाजु घेऊन मला समजवायला सुद्धा नको येऊस.. 

विराज : ओके... तुझा मुलगा आहे तो. तु घेशील तो डिसीजन योग्यच असेल. मी सावत्र आहे. त्याच्यासाठी पण आणि तुझ्यासाठी पण ह्याची काळजी मी ह्यापुढे नक्की घेईल..

एवढं बोलून तो तिथुन निघाला. अनिता ने सुद्धा त्याला आज अडवलं नाही.. आणि हे अस काही होणार हे विराजला माहीत होतं. तो गप्प त्याच्या रूममध्ये जातो. 

विराज रूममध्ये आल्या आल्या अनघा त्याला काय झालं म्हणुन विचारू लागते..

मम्मा नाही ऐकणार अस बोलुन तो लॅपटॉप ऑपन करून त्यात ऑफिसमधलं काम करू लागला.. पण अनिताच्या आजच्या बोलण्याने तो खुप म्हणजे खुप हर्ट झाला होता.. त्याची खुप चिडचिड होत होती.. अनघासमोर तो तस दाखवत नव्हता. 

अनघासुद्धा उद्या जाणार म्हणुन आपलं सामान भरायला घेत होती. 

विराज मात्र वेगळ्याच विचारांत हरवुन गेलेला. त्याला त्याच्या मोठ्या पप्पांचे शब्द आठवु लागले.. सावत्र आहेस तु.. कळेल तुला एक दिवस. त्याचे मोठे पप्पा जाता जाता त्याला तस बोलुन गेलेले. त्याला आज कुठे तरी त्यांच्या बोलण्यात तथ्य वाटत होतं.

इथे शौर्य गाथाला घेऊन एका पार्क मध्ये येतो..

गाथा : जेवलास दुपारी??

शौर्य काहीच बोलत नाही..

बेगेतुन त्याच्यासाठी ती कॅक घेऊन आली असते. कॅकचा छोटा पिस स्पुनमध्ये पकडत ती स्पुन त्याच्यासमोर धरते.. शौर्य निशब्द होत तिच्याकडे बघत रहातो.. गाथा इशाऱ्यानेच त्याला हे खा बोलते.  

शौर्य : तु जेवलीस??

गाथा : तुझा काही मॅसेजच नाही आला ना शौर्य.. मला तु नीट आहेस की नाही हे कळतच नव्हतं. एवढं टेन्शन असेल तर मला नाही लागत भूक. 

शौर्य तिच्या हातातुन स्पुन घेत तिला आधी आपल्या हाताने कॅक भरवायला घेतो.. आणि त्याच स्पुनने कॅक खातो..

पाणी पी थोडं अजुन जास्त भर वाटेल.. अस बोलत आपल्या बेगेतुन पाण्याची बॉटल काढत ती त्याला देते..

गाथा : बर वाटतंय..

शौर्य : हम्मम्म..

गाथा : काय झालं सांगशील आता?? ऐकले घरचे..

शौर्य काहीच नाही बोलत.. शांत बसुन असतो..

घरचे जास्त ओरडले का तुला?? गाथा शौर्यचा हात आपल्या हातात घट्ट पकडतच त्याच्याकडे बघत त्याला बोलते..

शौर्यला तिला काय बोलाव ते सुचत नव्हतं..

शौर्य : मला ऐरोस्पेस इंजिनिअर वैगेरे व्हायचंय होत हे मी माझ्या डोक्यातुन काढुन टाकतोय.. मी अस विचार करतोय मी अस कुठलंच स्वप्न नाही बघितलं. मला नाही ऐरोस्पेस इंजिनिअर वैगेरे बनायचं. माझं स्वप्न हे स्वप्नच रहाणार ग. आपण खुप स्वप्न बघतो सगळीच पुर्ण नाही ना होत अस विर बोलला. मला पण पटलं त्याच हे म्हणणं. 

(शौर्यच्या डोळ्यांतुन पाणी येऊ लागत)

गाथा : तु असाच काही तरी डिसीजन घेशील हे मला माहित होतं शौर्य म्हणुन मी सुद्धा काही तरी डीसाईड केलंय.. 

गाथा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघत रहातो.. आणि ती त्याच्याकडे..

गाथा : तुझं स्वप्न मी पुर्ण करेल शौर्य..

(शौर्यचे डोळे पुसतच ती त्याला बोलते)

शौर्य : तु कस??

गाथा : मी PMC थ्रू 12th केलंयना. मी माझं डॉक्टर व्हायच स्वप्न स्कीप करते. तुझ्यासारखी पाच वर्षे वेस्ट नाही होणार माझी. 3 वर्षच वेस्ट होतील. माझे पप्पा मला हो बोललेत म्हणजे मी काल त्यांना तस विचारलसुद्धा. ते मला सपोर्ट करतायत. ऐरोस्पेस इंजिनिअर तु केलं काय आणि मी केलं काय एकच आहे ना. मला आवडेल तुझं स्वप्न पूर्ण करायला. मी करेल तुझं स्वप्न पुर्ण..

गाथा हसतच शौर्यकडे बघत त्याला बोलते.

शौर्य : आणि तुझं स्वप्न..

गाथा : तुझ स्वप्न ते माझं स्वप्नना शौर्य.. आणि आपण बघतो ती सगळी स्वप्न नाही ना पुर्ण होत.. मला एवढं नाही काही वाटत. तु खुश रहा म्हणजे खुप खुप खुश रहा.. अस रडु नकोस..

शौर्य : गाथा तुला मोठं डॉक्टर झालेलं मला बघायचंय. आणि मला ह्या वेळेला माझ्या घरचे ऐकतील अस वाटतंय. पण मला नाही करायचं.

गाथा : का??

शौर्य : जर मी NASA मध्ये गेलो तर मी USA मध्येच रहाणार ते ही कायमच. तु रहाशील इथे माझ्याशिवाय..?? 

गाथा खुप वेळ निशब्द होऊन शौर्यकडे बघत रहाते. 

गाथा : तुझ स्वप्न आहे ना शौर्य. मग तु माझा नको विचार करुस. आपण फोन वर बोलत जाऊ.. मी तुला भेटायला येतं राहील तु मला भेटायला येत जा.. मी मला स्वतःला समजवेल तस. तु तुझं स्वप्न पूर्ण कर.

शौर्य : मला सुरुवातीपासून अस प्रोफेशन नकोय ग जे मला माझ्या प्रेमापासून माझ्या फेमिलीपासून लांब करेल. मी स्वप्न बघितलं ते पुर्ण ही करेल मी पण त्या नंतरचा विचार मी नाही केला. 8th ला असताना स्कुल मधून गेलेलो NASA मध्ये. स्कुल मधुन फक्त 30 स्टुडंन्टच सिलेक्शन झालेलं त्यात माझं आणि आर्यनच नाव होतं.. खुप एक्साईट होतो मी NASA मध्ये जायला. रात्रभर झोपलोच नव्हतो. पहाटे 4 वाजताची फ्लाईट होती आमची. मम्मा सोडायला आलेली मला. फ्लाईटमध्ये मात्र झोपून गेलो. एक मोठी बस अरेंज केलेली. पूर्ण वॉशिंग्टन फिरून फायनली NASA मध्ये नेलं आम्हांला. तिकडच्या वेगवेगळ्या टेक्निक्स, मशिनरी, रॉकेट्स एन्ड ऑल सगळ्यांनी मनात एक वेगळीच जादु केलेली. बाहेरून आपलइ पृथ्वी कशी दिसत हे पण मी तिथे बघितलं. तेव्हा ठरवल मला ह्यातच करिअर करायचं. तिथुन परत आलोना दोन तीन महिने मला स्वप्नात सुद्धा NASA दिसत होतं ग. मुळात मी तिकडे असणारे डॉक्टर आणि इंजिनिअर चा खूप फेन झालेलो. आपण पण त्यांच्यासारखच बनायचं अस मी ठरवलं. बट आता मी हे सगळं डोक्यातुन काढून टाकायच ठरवलं. तु माझ्या बर्थडेला मला नकळत बोलुन गेलेलीस. तु पण तुझ्या बाबासारखा बन. म्हणजे तुला पण अस बोलायच होत ना की मी फेमिलीला टाईम द्यावा. मी ठरवलं मी बाबा सारखाच बनणार. मला नाही ऐरोस्पेस इंजिनिअर करायच. मी आहे तेच शिकणार. 

गाथा : परत विचार कर शौर्य.. तु जे करशील किंवा तु जे करायचा डिसीजन घेशील त्या तुझ्या प्रत्येक डिसीजन मध्ये मी तुझ्यासोबत असेल.

शौर्य : गाथा तुझ्याएवढं प्रेम करणार मला कोणी दुसर नाही भेटणार ग. माझ्यासाठी तु तुझं स्वप्न विसरू शकतेस फक्त मी खुश राहावं म्हणुन मग मी तुला नेहमी खुश बघण्यासाठी मी बघितलेलं स्वप्न विसरून तुझ्यासोबत इथे इंडियात राहु शकतो ना ग. मला तु लाईफटाईम माझ्या सोबत हवीस. मी नाही राहु शकणार तुझ्याशिवाय. ही पुढील दोन वर्षे मी कशी राहील आय डोन्ट नॉ. बट तु बोलतेस तस करिअरकडे पण थोडं लक्ष द्यायला हवं ना.. म्हणुनमी USA जायला तैयार झालोय.

गाथा : आता जे ठरवलस ते फायनल आहे ना??

शौर्य : हम्मम.. 

एक स्माईल प्लिज... गाथा मोबाईल दोघांच्या समोर धरतच बोलते..

शौर्य : अचानक सेल्फी??

नवीन स्वप्न बघितलस ना आज.. एक आठवण म्हणुन.. तु स्माईल दे बघु..

दोघेही गोड स्माईल देत एक छानसा फोटॉ घेतात..

गाथा : बर झालं ना तु आज आलास?? आपल्याला आज अस भेटता आलं.

शौर्य : तु घरी काय सांगितलंस??

गाथा : आज एका फ्रेंडचा बर्थडे आहे. तिथे जाते अस सांगितलं.

शौर्य : खोट भारी बोलतेस..

गाथा : खोट कुठे बोलली.. खरच फ्रेंड्सचा बर्थडे आहे. मी तिला भेटुन. तिला गिफ्ट वैगेरे देऊन मग आपल्या ठरलेल्या ठिकाणी आली. हा आता तिथुन तुला भेटायला येते अस नाही सांगितलं मी घरी. 

शौर्य : किती त्रास करून घेतेस??

गाथा : एकदा तु USA गेलास मग दोन वर्षे अस नाही ना भेटता येणार..

शौर्य : ही दोन वर्ष 200 वर्षासारखी वाटतील मला तर. 

गाथा : मला पण. बाय दि वे उद्या माझी दि येतेय घरी.

शौर्य : का?

गाथा : का म्हणजे? तशी पद्धत आहे. थोडे दिवस ती आमच्यासोबत राहील. निदान चार पाच दिवस तरी.

शौर्य : किती पद्धती असतात ग ह्या.. मी नाही अस काही फॉलो वैगेरे करणार.. मी आपलं लग्न झालं की तुला माहेरी वैगेरे नाही सोडणार. आणि जर तु जायच बोललीस तर मी पण तुझ्यासोबत तिथे येईल..

शौर्य अस बोलताच गाथा त्याला हसु लागते.

गाथा : ओके.. तसही मला पण तुल सोडुन रहायला नाही जमणार..

शौर्य : आपण मी USA जाण्याआधी कुठे तरी फिरायला जाऊयात??

गाथा : हम्मम.. कधी जाणार आहेस??

शौर्य : आता जर घरी लवकर नाही गेलो तर मे बी पर्वाच जाईल..

गाथा : तु खरच खुश आहेस ना??

शौर्य : खुप खुप खुश..

गाथा : मला खर खुश तु कधी वाटलास माहिती?? नाशिकला असताना.. एक वेगळंच तेज तुझ्या चेहऱ्यावर होत.

(गाथाने नाशिकच नाव घेताच शौर्यला त्याच्या काकाची आठवण येते आणि मगासचा मम्माचा तो रुद्र अवतार ते सगळं आठवुन तो आपल्या गालावर हात लावतो..)

गाथा : काय झालं??

शौर्य : कुठे काय..

गाथा : निघुयात??

शौर्य : हम्मम..

शौर्य गाथाला नेहमीच्या ठिकाणी ड्रॉप करतो.. 

गाथा : सांभाळुन जा.. लव्ह यु..

लव्ह यु टु.. अस बोलत शौर्य तिथुन निघुन आपल्या घरी येतो.

तो आपल्या रूममध्ये जायच सोडुन विराजच्या रूममध्ये जायला निघतो. विराजच्या रूमचा दरवाजा नॉक करतच तो त्याला आत येऊ का म्हणुन विचारतो..

विराज लॅपटॉपमध्ये डोकं घालुन असतो.. अनघा विराजकडे बघते तिला अस वाटत की तो ये बोलेल पण तो काही बोलतच नाही हे बघुन अनघा दरवाजा उघडत शौर्यला गोड स्माईल देत हसतच आत ये बोलते..

अनघा : बस.. 

शौर्य : थेंक्स..

अनघा : कश्याबद्दल??

शौर्य : असच मला बोलवस वाटलं..

अनघा : हा आमच्या गाथाचा डायलॉग आहे..

अनघा अस बोलताच शौर्य थोडं हसतच तिच्याकडे बघतो.

अनघा : मग काय ठरलं तुझं..?

शौर्य : USA..

अनघा : नक्की??

शौर्य : हम्मम.. विर आय एम सॉरी.. 

विराज : घरात तमाशा करून मग सॉरी बोलायची तुझी सवयच आहे ती.. तुझं झालं असेल तर तु जाऊ शकतोस.

शौर्य : विर तु रागवलायस??

विराज : शौर्य मी कोण आहे तुझा तुझ्यावर रागवायला??

अनघा : विराज काय झालं??

विराज : ह्याला सांग मला काम आहे मी नंतर बोलेल. मला डिस्टरब नको करुस.

शौर्य : ओके.. डिनर करायला तरी चल. मग काम कर तुझं.

विराज : हम्म तु जा मी येतो.

शौर्य : वहिनी तु पण ये..

अनघा हसतच शौर्यला हो बोलते.. शौर्य जाताच ती दरवाजा लावते आणि विराजला काय झालं म्हणुन विचारते. पण विराज तिच्या प्रश्नांची टाळाटाळ करतो आणि तिला घेऊन खाली डिनर करायला घेऊन जातो.

अनिता आणि शौर्य दोघांची वाट बघत बसले असतात..

अनिता : आज उशीर का झाला एवढा??

अनघा : ते विराज थोडं कामात बिजी होता..

अनिता : उद्या तु माहेरी जातेयस ना??

अनघा : हो म्हणजे तुम्हांला मी विचारायला येणार होती.. विराज तु विचारलस पण?

अनिता : विराजने नाही शौर्यने सांगितलं मला.

अनघा : तुला माहिती??

अनिता : विराजने सांगितलं असेल..

विराज : मी नाही सांगितलं..

अनिता : शौर्य तुला कस कळलं मग.?

शौर्य : ते वहिनी मगाशी बोललीस ना तु. मी तुमच्या रूममध्ये आलेलो ते.. (शौर्य अनघा डोळा मारतच बोलला)

अनघा : अरे हो मी विसरलेच.. मीच सांगितलं त्याला.. हो ना शौर्य..

शौर्य : हो ना. पण तु विसरू नकोस म्हणजे झालं.

अनिता : उद्या सकाळी येतील ना तुझे पप्पा तुला न्यायला..

अनघा शौर्यकडे बघु लागते

शौर्य : हे मी नाही सांगितलं. मम्मा जस्ट कन्फर्म करून विचारते. म्हणजे तिला तस ऑफिसला जायला..

अनघा : दहा पर्यंत येतील.. तुम्ही लोक जावा ऑफिसला. तुम्हांला त्यासाठी घरी थांबायची काही गरज नाही.

शौर्य : तसही मी वहिणीसोबत असेल..

अनिता : शौर्य तु बेग भरलीस??

शौर्य : 31 स्ट च तिकीट बुक कर.. मी एक आठवडा इथे राहील अजुन..

अनिता : मी पर्वाच बुकिंग केलं तुझं तिकिट..

शौर्य : मम्मा प्लिज.. पोस्टपोंड कर..

अनिता : शौर्य पर्वा जातोयस तु.. सारख एकच काम नाही माझ्याकडे तिकिट बुक करा केन्सल करा..

शौर्य : विर प्लिज.. 31st मे ला जातो ना मी.. मम्माल सांग ना पोस्टपोंड करायला.

विराज शौर्यकडे न बघताच सरळ ताटात बघुन आपलं जेवण जेवतो.

अनघा : मम्मी थोडे दिवस राहू दे ना त्याला इथे.

विराज : अनघा तुला मी बोललो ना शौर्य बाबत तु कोणतच डिस्कशन नाही करणार म्हणुन.. का ऐकत नाही तु माझं.. मला आठवतंय ही गोष्ट तीनदा रिपीट केलीय तुला.. 

शौर्य : विर तु अस वहिनीवर का भडकतोयस.? 

विराज : अनघा प्लिज माझं ऐकत जा.

विराज तसाच ताटावरून उठुन आपल्या रूममध्ये जातो. 

सॉरी मी आलेच अस बोलत अनघा सुद्धा त्याच्या रूममध्ये जाते..

शौर्य सुद्धा उठुन त्यांच्या मागे जाणार तोच अनिता त्याचा हात पकडुन त्याला थांबवते. 

अनिता : नवरा बायको बघुन घेतील तु मध्ये पडु नकोस. जेवून घे.

शौर्य : विर जेवला नाही जरा पण आणि वहिनी पण

अनिता : अस भरल्या ताटावरून उठु नये शौर्य. जेवुन घे.

शौर्य : माझा भाऊ नाही जेवलाय मम्मा मला कस जेवण जाईल. तो जेवेल मग मी जेवेल. ताटाच्या पाया पडतच शौर्य तिथुन उठुन जातो.

अनिता : शौर्य..

शौर्य : मी माझ्या रूममध्ये जातोय त्याच्या नाही.

इथे विराज येऊन गेलरीत उभा रहातो..

अनघा त्याला समजवतच त्याच्याजवळ जाते. ती जवळ आली हे बघताच विराज तिला घट्ट मिठी मारत सॉरी बोलतो..

अनघा : विराज तुला काय झालंय प्लिज सांगशील मला..

विराज मगाशी त्याच्यात आणि अनितमध्ये झालेलं बोलणं तिला सांगतो. विराजला ते सांगताना खुप रडु येत असत. अनघा मिठी मारतच त्याला शांत करते. 

अनघा : इट्स ओके विराज... मे बी शौर्यमुळे त्या थोड्या रागात बोलल्या असतील.. आणि मी आहे ना तुझ्यासोबत.. आपला शौर्य आहे.. तु का स्वतःला परक समजतोस.. तु एकटा अजिबात नाहीस आणि रागात माणुस काहीही बोलतरे. तु पण किती बोलतोस.. 

विराज : आय नॉ मम्मा वेरी व्हेल शौर्य तिला सोडुन मला जास्त इंपोर्टन्ट देतोय हे तिला आता सहन नाही होत आहे. 

अनघा : अस काही नाही विराज. तु गैरसमज करून नको घेऊस प्लिज...

जवळपास अर्धा तास होऊन जातो. अनघा विराजची समजुत काढत गेलरीतच बसुन असते..

शौर्य डॉर नॉक करत आत येतो.. हातात दोन ताट असतात.

शौर्य : विर आणि वहिनी दोघांनी जेवुन घ्या. मी दोघांच ताट घेऊन आलोय इथे..

विराज : नकोय मला..

शौर्य : विर मला सिरियसली भूक लागलीय यार.. प्लिज तुम्ही दोघांनी जेवुन घ्या.. प्लिज..

अनघा : तु पण नाही जेवलास??

शौर्य : माझा भाऊ नाही जेवला तर मी कस जेवू?? विर प्लिज जेवुन घे..

अनघा : विराज तो पण उपाशी आहे.. आता तुझ्या मुळे आम्ही दोघे उपाशी राहू बघ...

विराज : त्याला जायला सांग माझं मी जेवतो.

विराज प्लिज.. अनघा हळुच त्याला बोलते..

शौर्य : विर आय एम सॉरी ना.. परत नाही करणार यार अस.. किती राग करतोस माझा. तसही लांब चाललोच आहे मी. मग कोणावर एवढं राग काढणार तु..

विराज : अनघा ह्याला इथुन प्लिज जा बोल..

शौर्य : ओके मी जातो. तु जेवून घे.. वहिनी तु पण जेवुन घे..

अनघा : तु सुद्धा जेव.. ओके??

शौर्य : हम्मम.. गुड नाईट..

अनघा : गुड नाईट..

शौर्य रूममध्ये येत आपली बेग भरायला घेतो..

थोड्याच वेळात अनिता त्याच्या रूममध्ये येते.. हातात जेवणाचा ताट  स्वतःसोबत घेऊन ते एका टेबलवर ठेवते.

अनिता : काय करतोयस??

शौर्य : तुला मी नको झालोय तर काय करू?? बेग भरतोय..

अनिता : 31st मे च करते मी तिकीट बुक..

शौर्य : मम्मा जर हेच तु मगाशी ऐकल असतस तर एवढा खाली तमाशा नसताना झाला ग..

अनिता : थोड विचार करायला नको का मला. तु खुश आहेस ना..

शौर्य : हम्मम..

अनिता : मग जेवुन घे...

शौर्यला जबरदस्ती बेडवर बसवत ती आपल्या हाताने त्याला जेवण भरवते.. शौर्यला अनितामध्ये आज वेगळाच फरक जाणवत होता. शौर्य खुप वर्षांनी तिच्याकडुन मिळणाऱ्या प्रेमाचा आनंद घेत होता.

दुसऱ्यादिवशी अनघाच्या घरची मंडळी येणार म्हणून अनिता घरीच थांबुन होती. अनघाचे वडील आणि सर्वेश तिला न्यायला येतात. वहिनी जाताच शौर्य आपल्या रूममध्ये जातो. विराज कामावर जायला निघतो.

अनिता : विराज.. काल मी थोडं रागात तुला जास्तच बोलली..आय एम सॉरी.

विराज : इट्स ओके..पण नेक्स्ट टाईम मी काळजी घेईल. 

अनिता : त्याची काही गरज नाही.. 

विराज : मला वाटते. उशीर होतोय.. बाय..

विराज अनिताकडे न बघताच निघुन जातो. अनिताला सुद्धा त्याचा राग माहिती असतो.. ती कामावर पोहचाताच मोबाईलवर आपलं लक्ष ठेवुन असते.. आणि तिचा फोन वाजतो..

विराजच नाव मोबाईल स्क्रिनवर बघुन तिच्या चेहऱ्यावर हसु येत..

अनिता : झाला का राग शांत माझ्या विरचा??

विराज : हम्मम्म.. सॉरी..

अनिता : आय एम सॉरी.. एन्ड आय लव्ह यु लॉट.. यु नॉ युअर मम्मा वेरी वेल.

विराज : हम्मम्म..

अनिता : संध्याकाळी घरी नीट बसुन बोलु.

विराज : हम्मम.. बाय..

मम्मासोबत बोलुन विराजला थोडं बर वाटत होत. काल पासुनचा राग त्याचा थोडा कुठे तरी कमी झाला असतो..

इथे शौर्य रूममध्ये आल्या आल्या त्याच्या आत्याला फोन लावून काका आणि त्याच्या मम्मा मध्ये नेमकं काय झालं हे विचारत असतो.. आत्या नेहमीच तेच कारण देऊन शौर्यला टाळत असते.. शौर्य मात्र एकच गोष्ट धरून बसला असतो.. शेवटी ती त्याच्यावर रागातच ओरडुन फोन कट करून टाकते. शौर्य तिला सारख सारख फोन करतो पण ती काही उचलत नाही.. तो पण आत्याला जास्त त्रास नको द्यायला असा विचार करत स्वतःला शांत करतो..

अश्यातच संध्याकाळ होते.

शौर्य USA जाणार म्हणुन गाथा त्याच्यासाठी थोडी फार शॉपिंग करायला आपल्या दि सोबतच बाहेर येते.. दोघीही मॉलमध्ये फिरत असतात.. आणि नेमकी समीरासुद्धा आपल्या वहिणीसोबत त्याच मॉलमध्ये येते. अनघा आणि गाथाच लक्ष नसत.. पण प्रीतीच लक्ष जात तिच्याकडे. अनघाला आवाज देत ती समीराला सोबत घेतच तिच्याजवळ जाते.

प्रितीला अस अचानक बघुन अनघाला खुप आनंद होतो.. दोघीही एकमेकांना घट्ट मिठी मारतच भेटतात..

गाथा : कशी आहेस समीरा??

समीरा : एकदम म्हणजे एकदम मस्त..

(एवढं बोलुन ती तिचा मोबाईल काढत त्यात काहीतरी करत बसते)

अनघा आणि प्रीती एकमेकांसोबत गप्पा मारत तिथे उभं रहातात.. गाथा मात्र समीराकडेच बघत असते. समीरा मात्र तुला इग्नोर करत असते.

समीरा : वहिनी मी निघु?? नाही म्हणजे तु बस इथे गप्पा मारत मला बॉर होतय.

प्रीती आणि अनघा एकमेकांकडे बघतच तिच्याकडे बघतात..

प्रीती : नाही थांब एकत्रच जाऊयात. अनघा आपण फोनवर बोलुयात मग.. चालेल?

अनघा : हम्मम.. तुझी शॉपिंग झाली वाटत??

प्रीती : शॉपिंग कसली समीरा बॉर होत होती म्हणुन असच थोडं बाहेर फिरायला म्हणुन ती मला तिच्यासोबत घेऊन आली.. फार नाही काही घेतलं एक दोन ड्रेस.. तुमची झाली शॉपिंग?

अनघा : आम्ही जस्ट आलोय.. माझा दिर USA जातोय. त्याच्यासाठी थोडी शॉपिंग करायला आलोय.

समीरा : वहिनी प्लिज..

प्रीती : मी करते तुला फोन.. ओके.. बाय..

अनघा : बाय.. काळजी घे.

गाथा : बाय समीरा.. बाय प्रीती दि..

प्रीती : बाय..

समीरा : बाय..

अस बोलत समीरा तिथुन निघुन जाते..

अनघा आणि गाथा प्रितीला समीरासोबत जाताना बघतच रहातात..

अनघा : शौर्य खरच हिच्या प्रेमात होता?? 

गाथा : दि आता तु चल बघु इथून. खरच बॉर होत असेल ग ती.. आपल्याला शॉपिंग करायचीय अजुन.. दोघीही मस्त पैकी शॉपिंग करतात आणि आपल्या घरी जायला निघतात..

अनघा गाडीत बसल्यावर विराजला फोन करून तो घरी गेलाय का ते बघते.. पण विराज फोनच उचलत नसतो.. मे बी बिजी असेल तो असा विचार करत ती त्याच्या फोनची वाट बघते..

जवळपास 10 च्या सुमारास विराज तिला फोन करतो..

विराज : फोन केलेलास??

अनघा : हम्मम.. आहेस कुठे??

विराज : जस्ट निघतोय ऑफिसमधुन..

अनघा : 10 वाजलेत विराज..

विराज : आता एवढे दिवस सुट्टी घेतली म्हटलं तर अस होणारच ना.. त्यात उद्या मिटिंग सुद्धा आहे.. तु जेवलीस??

अनघा : मी उद्या पासुन येते ऑफिसला..

विराज : नाही नको.. मी करतो मॅनेज. तु तुझ्या फॅमिलीसोबत एन्जॉय करत थोडे दिवस आणि थोडं आराम पण कर.. जेवलीस का??

अनघा : ते मी आणि गाथा शौर्यसाठी थोडं शॉपिंग करायला गेलेलो USA जातोय ना तो म्हणुन. मग बाहेर थोडं स्नेक्स वैगेरे खाल्लं. आता कसली लागते भुक.

विराज : ओके. बाय... मी घरी गेल्यावर फोन करतो तुला..

अनघा : हम्ममम..

विराज केबिनमधुन बाहेर पडतो.. थोडा फार स्टाफ अजुनही काम करत असतो.. तो त्यांनापण घरी जायला सांगतो.. ओके सर बोलुन ते विराजला बाय करतात.. विराज पुढे येऊन बघतो तर वृषभ सुद्धा काम करत असतो..

तु घरी नाही गेलास?? विराज त्याच्याजवळ जातच त्याला विचारतो..

वृषभ : थोडं काम आहे.. उद्या मिटिंग आहे ना त्याच PPT बनवतोय.

विराज : घरी जाऊन कर.. 10 वाजुन गेलेत. चल मी तुला ड्रॉप करतो..

वृषभ : नाही नको. मी हे कम्प्लिट करून मगच निघतो. माझ्याकडे लॅपटॉप नाही ना आणि इंटरनेट पण लागेल.. थोडसच  काम बाकी आहे.. तु जा घरी.. मी हे झालं की निघतो लगेच.. गुड नाईट..

विराज : ओके.. आणि अजून एक. तुझा पासपोर्ट आहे ना??

वृषभ त्याच्याकडे बघत त्याला नाही म्हणुन सांगतो..

विराज : काढून ठेव..

वृषभ : हम्मम..

विराज ऑफिसमधून निघुन सरळ आपल्या गाडीत येऊन बसतो. गाडीत बसल्या बसल्या शौर्यचा त्याला फोन येतो. तो त्याचा फोन उचलत नाही.. शौर्य पुन्हा त्याला फोन करतो तो तरीही त्याचा फोन नाही उचलत. डोळे मिटुन काल अनिता जे बोलली ते तो आठवत असतो..

अनिता आणि शौर्य दोघेही डायनिंग टेबलवर बसुन त्याची वाट बघत असतात.

शौर्य : हा फोन का नाही उचलत??

अनिता : गाडीत असेल.

शौर्य : तो थोडीना ड्राइव्ह करणार कार? एक फोन उचलुन कुठेय ते सांगु शकतो ना..

अनिता : थांब मी बघते एकदा..

शौर्य : मम्मा माझा फोन उचलत नाही तर तुझा कसा उचलेल तो.. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच गेलाय ऑफिसमध्ये आणि एका दिवसात बिजी मेन झालाय पुर्ण.

अनिता आपला फोन घेऊन विराजला फोन लावते.

आपल्या मम्माचा नंबर बघुन विराज फोन उचलतो..

अनिता : आहेस कुठे??

विराज : आलो पाच मिनिटांत. तु जेवून घे.

अनिता : आम्ही वाट बघतोय. ये लवकर..

विराज : मी जेवुन आलोय. तुम्ही लोक माझी वाट नका बघु.

अनिता : बर..

अनिता विराजचा फोन कट करत शौर्यकडे बघते.

अनिता : विराज येईलच पाच मिनिटांत. आणि तो जेवुन येतोय. आपल्याला जेवायला बोलला तो.

शौर्य : माझा फोन का नाही उचलत होता तो??

अनिता : बिजी असेल मे बी.. तु जेवुन घे..

शौर्य : नको मला.. विर सोबत बोलुन जेवेल मी.. तु जेव..

अनिता : आज न जेवता अजिबात उठायचं नाही हा शरु..

शौर्य आपल्या मोबाईल मधुन विराजला फोन लावतो पण विराज त्याचा फोन नाही उचलत.. आपल्या मम्माकडे रिक्वेस्ट करत तो तिचा फोन घेत त्यावरून विराजला फोन लावतो. विराज लगेच फोन उचलतो. शौर्य त्याच्याशी न बोलता फोन कट करून टाकतो.

Sorry ना विर किती राग करतोस तु.. परत नाही करणार अस.. शौर्य मोबाईलमध्ये मॅसेज टाईप करतच विराजला सेंट करतो.

विराज शौर्यने मॅसेज केलाय म्हणुन मोबाईल काही बघत नाही.

शौर्य जेवत नाही हे बघुन अनिता जबरदस्ती त्याला आपल्या हाताने भरवायला घेते. शौर्य नको बोलत असताना ती त्याला जबरदस्ती भरवते.. थोड्या वेळांत विराज येतो. अनिताला अस शौर्यला भरवताना तो बघतो. 

अनिता : आलास तु??

विराज : हम्मम.

शौर्य : विर.. जेवुन घे ना थोडं..

विराज : उद्या एक महत्वाची मिटिंग आहे. मला काम आहे.. मम्मा गुड नाईट..

एवढं बोलुन विराज आपल्या रूममध्ये निघुन जातो. शौर्य त्याला जाताना फक्त बघत रहातो..

जवळपास अर्ध्या तासाने शौर्य त्याच्यासाठी जेवण घेऊन त्याच्या रूममध्ये जातो.

विराज कोणाशी तरी फोन वर बोलत असतो.. शौर्यला बघुन तो फोन कट करून बाजुला ठेवतो आणि लॅपटॉपमध्ये काम करत राहतो..

शौर्य : जेवुन घे..

विराज : तु आज पोटभरून जेवलास ना.. मग माझं पण पोट भरलं. तसही मी जेवुन आलोय.

शौर्य : वृषभला फोन करून विचारलं मी.. तु 10 वाजता ऑफिसमधून निघालास. पंधरा मिनिटांत इथे हजर होतास. मग कधी जेवलास..??

तोच विराजचा फोन वाजतो.. मोठे पप्पा हे नाव त्याच्या मोबाईल स्क्रिनवर दिसत असत.. शौर्य विराजकडे बघत रहातो. विराज फोन घेतच गेलरीत जातो. शौर्य त्याला फक्त बघतच रहातो..  फोनवर बोलुन होताच तो बेडवर येऊन लॅपटॉप हातात घेऊन बसतो.

शौर्य : विर आय एम सॉरी.. परत नाही करणार रे..

विराज : हम्मम.. 

शौर्य : जेवुन घे.. मी भरवु तुला??

विराज : नको.. 

शौर्य : मग लॅपटॉप ठेव आणि जेव बघु.

विराज : तु जा माझं मी जेवेल.. प्लिज त्रास नको देऊस..

शौर्य : विर मी थोडे दिवसच आहेना आता इथे. मग नाही त्रास द्यायला तुला. आहे तेवढे दिवस तरी नीट बोल. प्लिज.. तुला माहितीना तु निट नाही बोललास मग त्रास होतो रे मला. प्लिज विर. 

विराज : मी तुझ्याशी नीट बोललो की तुझ्या मम्माला त्रास होतो शौर्य आणि माझ्या अश्या वागण्याची सवय करून घे तु. मला आता माझी फॅमिली आहे. नेहमीच तुझ्यापाठी फिरत बसायला मला वेळ नाही. मला माझी फॅमिली आणि माझा बिजीनेस महत्वाचा आहे. तुझं सगळं बघायला तुझी मम्मा आहे. जस माझ्यासोबत बोलतोस तस तु तिच्यासोबत बोलत जा. मला तुझ्या व्यतिरिक्त इतर काम असतात शौर्य.. 

शौर्य : माझ्यासाठी माझी फॅमिली तुच आहे ना विर. मी तुला अस कुठे बोलतोय तु तुझी फॅमिली आणि तुझा बिजीनेस सोडुन माझ्यासाठी माझ्या मागे फिरत बस. फक्त नीट बोल बोलतोयना.

विराज : तु प्लिज तुझ्या रूममध्ये जा आणि झोप बघु..

शौर्य : जेवुन घे.

विराज : हम्मम

शौर्य : आत्ता माझ्या पुढ्यात जेव विर.

विराज : प्रत्येक गोष्टीत का हट्टीपणा करतोयस तु?? मला जेव्हा जेवावस वाटेल तेव्हा मी जेवेल. मी अजुन काही बोलायच्या आत तु जा बघु इथुन. 

(विराज लॅपटॉप बाजूला ठेवतच बेडवरून उठतो)

शौर्य : अकरा वाजत आले ना विर म्हणुन जेवायसाठी जबरदस्ती करतोय तुला. तो पण तुला हट्टी पणा वाटतो आता. 

विराज : तु हट्टीच आहेस शौर्य.. आणि तुझ्या ह्या अश्या वागण्याला मम्मा जेव्हा तेव्हा मला जबाबदार ठरवत असते. तुझ्यामुळे काल ती मला हवं नको ते बोललीय शौर्य. मला खरच अस वाटतंय की मी ह्या घरातला नाही.. 

शौर्य : विर आय एम सॉरी.. प्लिज अस नको ना काही बोलूस. मी मम्मासोबत बोलतो.

विराज : म्हणजे तिला अजुन अस वाटु दे की मी तुला खरच तिच्या बद्दल भडकवुन तुला तिच्यापासून लांब करतोय जस तिला माझ्याबद्दल वाटत. मी कधी तुला अस भडकवल किंवा शिकवलं आपली मम्मा वाईट खुप वाईट आहे आणि मी खुप चांगला. मग ती का अस मला बोलत होती काल?? 

शौर्य : विर प्लिज शांत हो.. 

(शौर्य विराज जवळ जात त्याला शांत करत बोलतो पण विराज रागातच त्याला लांब ढकलुन देतो)

विराज : लांब रहा तु माझ्यापासुन. माझ्याजवळ अजिबात नाही यायच तु. तुझ्या मम्माला ते अजिबात आवडणार नाही. ह्यापुढे मी तुझ्याशी नाही म्हणजे नाही बोलणार. परत अजुन गैरसमज नको व्हायला. प्लिज तु जा इथुन.

शौर्य : विर तु एवढं मनाला का लावुन घेतोयस यार.. मम्मा तुझ्यासारखीच आहे. रागात काहीही बोलते ती. बट तुझ्यावर खुप प्रेम करतेरे ती. तु काय नको ते डोक्यात घेऊन बसलायस. प्लिज शांत हो आणि अस रडु नकोस यार.

शौर्य पुन्हा त्याच्या जवळ जात त्याचे डोळे पुसणार तोच विराज परत रागात त्याला लांब ढकलुन देतो.. मागे असलेल्या कपबोर्डवर शौर्य जोरात आपटतो.. त्याच्या पाठीला कपबोर्डचा कोपरा जोरातच लागतो. पण तो विराजला तस दाखवत नाही..

विराज : लांब रहा प्लिज.

शौर्य : विर किती राग करतोयस यार तु..? प्लिज शांत हो..

विराज : मग मी बोलतोय ना मला नाही बोलायच तुझ्याशी मग का जवळ येतोयस तु माझ्या. प्लिज तु जा इथुन.. मला सिरियसली राग येतोय तुझा. माझं डोकं शांत होईल तेव्हा मी तुझ्याशी बोलायला येईल. तु प्लिज इथुन जा.

शौर्य : 31st च्या आत होईल ना शांत?? 

विराज : अरे वाह तिकिट पोस्टपोंड पण केलं तुझं.. ग्रेट. फस्ट टाईम मम्माने ऐकलं म्हणुन खुप खुश असशील ना?? पण अजुन हे 7 दिवस तु मला दिसणार. 


शौर्य : विर तुला मी नकोय का इथे रहायला??

विराज : ते पण तुला माझ्या तोंडुन ऐकायचय??

शौर्य : खुप हर्ट करतोस यार तु. तुला माहिती तु अस काही वागलस तर मला नाही सहन होत तरी तु अस वागतोस. मग येशील परत सॉरी बोलायला. 

विराज : ह्या वेळेला नाही येणार मी.. कारण ह्या वेळेला तु आणि तुझी मम्मा चुकलीय शौर्य.. ह्यापुढे तुझं सगळं काही मम्मा बघत जाईल. सो माझा आणि तुझा काहीच संबंध येणार नाही..

शौर्य : विर प्लिज. अस नको ना बोलुस. मी परत अस नाही वागणार रे. तसही मी आता नसणार ना इथे तुला पण माहिती. हे सात दिवस तरी तु नीट बोलु शकतोस ना. 

विराज : जमल्यास उद्याच जा USA. 

शौर्य : ओके.. जातो.. जेवुन घे तु.. बाय.. गुड बाय..

शौर्य आपल्या रूममध्ये येऊन आपल्या बाईकची की घेत घराबाहेर पडला.

बाईकवर बसुन आत्याला फोन लावत होता. पण आत्या शौर्यचा फोन काही उचलत नव्हती. शौर्य कँटीन्युअसली तिला फोन लावत होता. शेवटी आत्याला पण रहावत नाही. ती उचलते त्याचा फोन..

शौर्य : आत्या मी तुझ्या घरी यायला निघालोय. मला तुला भेटायचं. मला इथे नाही रहायच.

आत्या : ए बच्चा काय झालं?? घरी सगळं ठिक आहे ना??

शौर्य : मी येऊना??

आत्या : हम्म. मी वाट बघतेय तुझी. 

आत्या हो बोलताच फोन खिश्यात टाकत तो घरी कोणालाही काहीही न सांगता नाशिकला जायला निघतो. 

पहाटेची 4 वाजून जातात विराजचा फोन वाजतो.. डोळे चोळतच तो मोबाईल हातात घेऊन बघतो. आत्याचा फोन असतो. ह्या टाईमला आत्या का फोन करते.?? स्वतःच्या मनाला तो प्रश्न करतो..

हा आत्या बोल.. विराज फोन कानाला लावतच तिला बोलतो.

आत्या : शौर्य अकराच्या सुमारास इथे यायला निघालेला अजुन आला नाही.. फोन पण नाही उचलत तो माझा. कुठे राहिला काहीच कळत नाही.. एकदा घरी आहे का बघ..

आत्या अस बोलताच विराज घाबरून जातो.. तो पळतच त्याच्या रूममध्ये जाऊन बघतो तर तो तिथे नसतो..

रूममध्ये नाही तो.. आत्याला फोनवरच तो सांगतो..

आत्या : एवढ्यात यायला हवा ना तो.. घरी काही झालंय का? त्याच्या आवाजावरून तो रडतोय अस वाटत होतं मला.

विराज : ते.. मी मम्मामुळे त्याच्यावर थोडं रागावलो.. मी एकदा फोन करून बघतो त्याला.. थांब..

क्रमशः
(आपल्या पासुन लांब गेलाय हे कळताच अनिता जे विराजला बोलली ते योग्य होत का?? अनिताच बोलणं ऐकुन विराज जे शौर्य सोबत वागला ते योग्य होत का?? आता शौर्य कुठे असेल?? पाहुया पुढील भागात. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all