अतरंगीरे एक प्रेमकथा भाग ९१

In mrathi

शौर्य स्वतःसाठी कार बुक करत नाशिकवरून मुंबईला यायला निघतो.. जर तु फ्री असशील तर प्लिज कॉल कर.. असा मॅसेज तो गाथाला करतो.. थोड्या वेळाने गाथा त्याला फोन करते..

गाथा : हाय ! गुडमॉर्निंग.. 

शौर्य : तु बिजी आहेस का??

गाथा : तुझ्यासाठी कधीच नाही.. तुझ्यासाठी तर माझ्याकडे वेळच वेळ आहे.. तु कुठे बाहेर आहेस का??

शौर्य : ते मी घरी येतोय आज.. पण मला टेन्शन आलंय ग खुप घरी जायला.. 

गाथा : शौर्य नको ना टेन्शन घेऊस.. एकदा बोलुन तर बघ घरी.. तस जिजु आणि दि पण आलेत ना..

शौर्य : काय बोलु?? आणि कोणाशी?? माझं 31st मे च तिकीट बुक केलंय विरने. मला नाही जायचय ग USA.. 

गाथा : It's ok शौर्य.. तिकीट केन्सल करता येते रे.. तु नीट घरच्यांशी बोलुन बघ.. 8 दिवस आहेत आपल्याकडे.. आज तु तुझ्या मनात जे आहे ते घरी बोलशील ओके.. जर नाहीच ऐकले तर आपण ह्यातुन काही तरी वेगळा मार्ग निघतो का बघुयात आणि शौर्य मी आहे ना तुझ्यासोबत.

शौर्य : तु आहेस म्हणुन तर मी आहे.. अशीच शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा आणि असच मला समजुन घे.. 

गाथा : तु पण तुझे सगळे प्रॉब्लेम माझ्यासोबत असेच मनमोकळे पणाने बोलत जा.. स्वतःला कधी एकट समजु नकोस शौर्य.. आणि घरी न सांगता तु कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नकोस... प्लिज काळजी घे तुझी.. आपण नक्कीच ह्यातुन काही तरी मार्ग काढु मला खात्री आहे ह्याची.

शौर्य : जर मम्मा नाहीच ऐकली तर??

गाथा : शौर्य जे होत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच आणि ह्यापुढे पण जे होईल ते ही आपल्या चांगल्यासाठीच.. हा आपल्या जगण्याचा नियम आहेरे.. त्यानुसार आपल्याला चालावं लागेलना.. बी पोजिटीव्ह.. सगळं चांगलं होईल..

शौर्य : हम्मम.. आय लव्ह यु..

गाथा : आय लव्ह यु टु जान..

शौर्य : घरी पोहचलो तर कळवतो तुला.. 

गाथा : हम्मम.. काळजी घे.. एन्ड मिस यु..

शौर्य : मिस यु टु.. बाय..

गाथासोबत बोलुन शौर्यला थोडं बर वाटत असत..

गाडी शौर्यच्या घराजवळ येऊन थांबते.. शौर्य घरात सगळीकडे आपली नजर फिरवतच एक एक पाऊल टाकत असतो.. कोणच त्याला दिसत नसत.. हातातील घड्याळात बघतो तर दुपारचे तीन वाजले असतात.. आपली बेग घेऊन तो सरळ आपल्या रूममध्ये जातो.. ब्रुनो विराजच्या रूममध्ये असतो.. नेहमीप्रमाणे शौर्य आलाय हे कळताच तो मोठमोठ्याने भुकु लागतो.. ब्रूनोच्या आवाजाने विराज आणि अनघाची झोप मोड होते.. विराज ब्रूनोला शांत करत गेलरीत ठेवतो आणि गेलेरीची काच लावुन पुन्हा अनघाच्या शेजारी येऊन झोपतो.. पण एकदा झोप मोड झाली की त्याला परत कसली झोप लागते.. तरी डोळे मिटुन तो अनघाच्या शेजारी पडुन रहातो. शौर्य रूममध्ये आल्या आल्या गाथाला पोहचलो म्हणुन कळवतो. कपडे चेंज करायला म्हणुन कपाट उघडुन त्यातुन दुसरे कपडे काढणार.. तोच त्याच लक्ष लॅपटॉपवर पडत.. कपड्यांसोबत तो लॅपटॉप पण बाहेर काढतो.. पटकन फ्रेश होऊन कपडे चेंज करून तो लॅपटॉप चालु करायला घेतो.. शौर्यने लॅपटॉप डायरेक्ट बंद केल्यामुळे तो चालु व्हायला खुप टाईम घेत असतो.. जवळपास पंधरा वीस मिनिटांनी लॅपटॉप चालु होतो.. बट बेट्री लॉ.. त्यादिवशी विरने चार्जर शोधुन दिलेलं पण कुठे ठेवलं मी.?? स्वतःच्याच मनाला प्रश्न करत तो चार्जर शोधु लागतो. ड्रॉवर वैगेरे शोधुनसुद्धा त्याला चार्जर काही मिळत नाही. त्यादिवशी जयरामला रूम आवरायला सांगितलेली.. तो सगळं सामान कपाटात भरत होता.. मे बी चार्जर पण त्याने कपाटात ठेवलं असेल.. स्वतःशीच पुटपुटत कपाटातील एक एक सामान उचलुन तो चार्जर दिसतो का बघतो.. आणि फायनली त्याला चार्जर मिळत.. पटकन लॅपटॉपला चार्जर कनेक्ट करतो.. आता जास्त वेळ वाया न घालवता तो आपल्या कॉलेजची साईट ऑपन करतो.. कॉलेज थ्रू दिलेला युजर नेम आणि पासवर्ड टाकतच आपलं लॉगिन तो त्या साईटमध्ये करतो.. भरपुर साऱ्या एक्टिव्हिटीज आणि इतर कोंपिटीशन रिलेटेड नोटिफिकेशन त्यात आल्या असतात.. त्याला ते वाचण्यात जरा पण इंटरेस्ट नसतो.. तो ते सगळं सोडून त्याच पोर्टलवर एडमिशन केन्सल संबंधित माहिती वाचतो.. संपुर्ण प्रोसिजर वाचुन होताच पाच दहा मिनिटं तो शांतपणे विचार करतो.. आत्ताच केन्सल करू का विर आणि मम्मासोबत बोलुन केन्सल करू.. जर आता केन्सल केलं तर विर मला USA मध्ये पाठवण्याचा प्रश्नच येत नाही.. काय कराव हे त्याच त्यालाच सुचत नसत.. जे होईल ते होईल.. अस विचार करत तो एडमिशन केन्सल करायला घेतो. मगाशी माहिती वाचल्याप्रमाणे एक एक फॉर्म भरत तो ऑनलाइन एडमिशन केन्सल करायला घेतो.. जवळपास तीस टक्के प्रोसिजर पूर्ण होते.. त्या पुढची करायला घेतो तर नेमकं नेटवर्क इस्यु येत.. शौर्य परत इंटरनेट डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट करतो.. आणि त्या पुढील प्रोसिजर चालु करायला घेतो.. 

इथे ब्रूनोला विराजने गेलरीत सोडलं होत पण तरी तो मोठं मोठ्याने भुकत होता.. कारण त्याला शौर्यला भेटायचं असत.. अनघा काल प्रवास करून आल्यामुळे दमली होती. तिची झोप मोड होऊ नये म्हणुन विराज ब्रूनोला गेलरीतुन बाहेर काढत रूम बाहेर पडतो.. ब्रुनो शौर्यच्या रूमजवळ येत मोठं मोठयाने भूकतो.. ब्रुनोचा आवाज ऐकुन शौर्य खुश होतच आपल्या हातातलं काम तसच ठेवत पटकन दरवाजा उघडुन त्याला उचलुन घ्यायला जातो तोच त्याच लक्ष ब्रुनो सोबत असलेल्या विर वर जात.. एक भीतीची लहर त्याच्या अंगात शिरते..

विराज : कधी आलास??

(शौर्य घाबरतच त्याच्याकडे बघत राहतो..)

तुला विचारतोय मी..

शौर्य : ते मगाशीच आलोय...

दरवाजा उघडा असल्यामुळे विराजच लक्ष शौर्यच्या बेडवर ठेवलेल्या लॅपटॉपवर जाते.. तो लॅपटॉपवर नजर फिरवतच शौर्यवर नजर फिरवतो.. 

शौर्य : तु झोपला नाहीस??

विराज : ह्या ब्रूनोमुळे झोप मोड झाली..

शौर्य : मी बघतो त्याला तु जाऊन झोप..

विराज : तु दिसल्यावर तर माझी होती नव्हती सगळी झोप उडुन गेली.. तस पण तुझीच वाट बघत होतो मी.. आत रूममध्ये जाऊन बोलूयात.. ??

शौर्य : काय झालं??

विराज : तु आत तर चल तुला सगळं सांगतो काय झालं ते...

विराज शौर्यला आत घेत रूमचा दरवाजा लावून घेतो.. विराज अस रूममध्ये आलाय हे बघुन शौर्यच हृदय अगदी जोर जोरात धडधड करू लागलेलं.. विराज बेडवर जाऊन बसतो.. शौर्य त्याच्या समोरच उभं रहातो.. लॅपटॉप हा विराजच्या शेजारीच असतो..पण विराजच लक्ष लॅपटॉपमध्ये नसुन शौर्यकडे असत. लॅपटॉप त्याच्या पुढ्यात बंद केला तर त्याला नक्कीच संशय येईल.. काय करावं ते शौर्यला सुचत नव्हतं.. आजचा दिवस खुप बेकार जाणार ह्याचा अंदाज शौर्यला आला असतो..

विराज : तुला मी पॅरिसला जाताना सांगुन गेलेलो रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं नाही म्हणुन..

शौर्य : हा मग..

विराज : मग म्हणजे??? तु मलाच उलट विचारतोयस?? सँडेला रात्री किती वाजता घरी आलास??

शौर्य : दहा वाजता.. आम्ही ट्रीपला गेलेलो ना विर.. मग दहा तर वाजतीलच ना.. 

विराज : शौर्य मम्मा बोलली तु बारा वाजुन गेले तरी तुझ्या रूममध्ये नव्हतास..

(तोच शौर्यचा फोन वाजतो.. शौर्य बेडवर पडलेला त्याचा फोन उचलायला जाणार तोच विराज तो फोन घेतो.. शौर्यकडे रागात बघतच फोन सरळ स्विच ऑफ करून टाकतो)

शौर्य : कोणाचा फोन होता ते तरी बघ..

विराज : असेल कोणाचा तरी.. माझं बोलुन झाल्यावर बघ आणि ज्याचा फोन होता त्याला कर.. ओके. आत्ता मी काय विचारतोय ते सांग.. कुठे होतास रात्रीच??

शौर्य : विर मी मम्माला दुसऱ्यादिवशी ह्या प्रश्नाच उत्तर दिलंय.. हे सगळं ती तुला सांगते मग मी जे सांगितलं ते पण सांगितलंच असेलना.. तरी का तु विचारतोयस..

विराज : मला तुझ्याकडुन ऐकायचं म्हणुन..

शौर्य : वृषभसोबत होतो त्याच्या रूममध्ये.. ते रोहन वैगेरे त्याच दिवशी आपापल्या घरी गेले ना मग त्याला एकट्याला झोप लागणार नाही म्हणुन त्याच्यासोबत थोडं गप्पा मारत बसलेलो.. 

विराज : ओके.. पण तु त्यादिवशी मम्मासोबत डिस्कस करणार होतास ना?? आणि तुझ तिकीट तुच बुक करणार होतास?? त्याच काय झालं?? मित्र एकटा पडेल त्याची काळजी.. स्वतःच्या फ्युचरची काळजी नाही का तुला??

शौर्य : त्यादिवशी मी खरच विसरलो रे..

विराज : मग दुसऱ्यादिवशी??

शौर्य : ते.. मम्मा ऑफिसला गेली.. आणि मी पण थोडं बिजी होतो.. 

विराज : शौर्य खोट बोलु नकोस हा.. आदल्या दिवशी रात्रभर ती तुझी वाट बघत होती. तु आता येशील नंतर येशील हा विचार करत ती बिचारी खाली हॉल मध्येच तुझी वाट बघत झोपली. पण तु मात्र मस्त रूममध्ये झोपलेलास.. आणि एवढं सगळं होऊन नेक्स्ट डे मम्मा सकाळी तुझ्या रूममध्ये तुझ्याशी बोलायला आलेलीना.. तेव्हा तरी पाच मिनिटं वेळ काढुन बोलु शकत होतास ना तिच्यासोबत आणि सकाळ सकाळी कोणत्या मित्राला भेटायला गेलेलास??

शौर्य : विर प्रत्येक गोष्ट तुला सांगु का मी..?? मी कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो एन्ड ऑल.. सगळंच तुला का माहिती करून घ्यायच असत यार..? मला पर्सनल लाईफ नाही का माझी स्वतःची अशी.. प्रत्येक गोष्टीत का तुम्ही लोक मला टॉर्चर करत रहाता. मम्मा झाली की तु.. तु झालास की परत मम्मा..

विराज : तु परत लास्ट टाईम सारखे नखरे करणार आहेस आता.. आणि नेहमी आम्हाला ब्लेम करण्यापेक्षा तु काय वागतोस ते बघ जरा.. रात्री एक दीड वाजेपर्यंत घराबाहेर दोन केटेगरीतील लोक रहातात शौर्य.. एक जे कामावरून आपली शिफ्ट संपवुन घरी येणारे एम्प्लॉयी, पोलिस, डॉक्टर, वॉचमेन म्हणजे जे मेहनतीसाठी किंवा आपल्या फेमिलीसाठी घराबाहेर असतात ती.. ही झाली पहिली केटेगरी आणि दुसरी केटेगरी म्हणजे टवाळक्या करत, नको ती व्यसन करत, अश्लील भाषेत बाहेर एकमेकांसोबत गप्पा मारत असणारी लोक.. तु पहिल्या केटेगरीत तर येत नाहीसच.. मग राहिली कोणती दुसरी केटेगरी.. रात्री दिड वाजता तुम्हा लोकांकडे फोन असताना तुम्ही लोक भेटुन खरच ट्रिप बद्दलच डिस्कस करत होतात का?? मला तर त्या आर्यनच्या बोलण्यावर पण डाऊट वाटत होता. त्याच्या बोलण्यावरून तर अस वाटत होत की तु त्या लोकांसोबत नव्हताच.. पण माझा भाऊ बोलतोय म्हणुन मी विषय जास्त नाही ताणत बसलो.. त्यावेळेला ठेवला विश्वास मी.. त्याच्या आधी ह्या लॅपटॉपवरून तुझ काय चालु होत?? विराज लॅपटॉप हातात घेतच शौर्यला बोलतो.. तस शौर्य त्याच्या हातातुन लॅपटॉप खेचुन घ्यायला पुढे जातो..

शौर्य : विर प्लिज तो लॅपटॉप दे इथे.. माझ्या पर्सनल वस्तुंना नको हात लावत जाऊस.. मला नाही आवडत..

शौर्य विराजच्या हातुन लॅपटॉप खेचुन घेतच बोलु लागला.. विराज रागातच त्याचा हात झटकत त्याला लांब ढकलतो..

विराज : तुझं जास्त ऐकुन घेतोय म्हणुन जास्त बोलु नकोस कळलं?? आणि ह्या लॅपटॉप पासुन आज तु लांबच रहायच.. मला डाऊट होताच.. तुझ काही तरी चाललंय ह्या लॅपटॉपमध्ये पण तुझ आत्ताच वागणं बघुन माझी तर खात्रीच पटली.. तसही मी हा लॅपटॉप चॅक करणार नव्हतोच बट माझ्या मनात नसताना तु मला चॅक करायला भाग पाडतोयस आता..

शौर्य : ए विर प्लिज यार.. तु माझा लॅपटॉप चॅक करणार नाहीस तुला माझी..

विराज : शप्पथ तर तुला माझी आहे.. जर मला आज कोणतीही शप्पथ घातलीस तर.. कळलं.. एक दम शांत बसायच आणि माझ्यापासुन लांब उभं रहायच.. नाही तर मी काय करेल हे तुला वेगळं सांगणार नाही करून दाखवेल. (मध्येच शौर्यला तोडत विराज बोलतो)

विराज शौर्यकडे रागात बघतच त्याच्या लॅपटॉपमध्ये तो काय लपवतो ते बघु लागला.. 

माऊसवर क्लिक करताच एडमिशन केन्सल वाला फॉर्म ऑपन होतो.. जो शौर्य फील अप करत होता.. शौर्यने अर्धा फॉर्म भरलेला.. विराजला ते सगळं बघुन धडकीच भरते.. 

विराज : तु काय करत होतास हे..?? (विराज जोरातच शौर्यवर ओरडतो.. ) म्हणुन लॅपटॉप लपवत होतास तु.. 

शौर्यने केलेली सगळी फॉर्मेलिटी तो एक एक करून केन्सल करून टाकतो..

विराज लॅपटॉप बाजुला ठेवतच शौर्यच्याजवळ जाऊ लागतो. शौर्य आता घाबरतच विराजकडे बघत रहातो.. 

विराज : एडमिशन का केन्सल करत होतास??

शौर्य : ते मला USA नाही जायचयरे म्हणुन मी..

विराज : तु काय चालवल काय आहेस शौर्य?? शिकायचं नाही का तुला पुढे?? तु घरी काही न विचारता एडमिशन कस काय केन्सल करू शकतोस.. का मला राग देतोयस यार... आणि आता जर मी तुझ्या रूममध्ये आलो नसतो तर.. तु एडमिशन केलं असतस ना केन्सल..?? तु जे शिकतोयस त्याची एन्युअल फिस ना शौर्य 23 लाखाच्या आसपास जाते. तुझा व्हिसा फ्लाईट तिकीट ह्या सगळ्याचा खर्च पकडलास ना तर 25 लाख आरामात होतात. एडमिशन केन्सल केलंस तर त्याचे 30% कट करणार ती लोक.. म्हणजे जवळपास सात लाखाच नुकसान.. हे सात लाख कमवायला मम्मा किती मेहनत घेते ते नाही माहीत तुला.. स्वतःला अजुन दोन पैसे कमवायची अक्कल नाही.. वर मम्मा आपल्यासाठी जे काही करते त्याची कदर नाही तुला.. तुला आयत शिकायला भेटतय.. नाही तर त्या वृषभच उदाहरण घे. आपल्या फॅमिलीची किती काळजी आहे त्याला. शिकण्यासाठी किती धडपडतोय तो.. तु जे मम्माच 7 लाखाच नुकसान करतोयस ना त्याची वेल्यू त्याला जाऊन विचार तो सांगेल तुला.. तुला मम्मा जे तुझ्यासाठी करते त्याची किंमत तर नाहीच वर तुला शिक्षणाची सुद्धा वेल्यू नाही.. मनाला येईल ते करतोयस तु आणि तस वागतोयस तु..

शौर्य : मला इथे राहुनच शिकायचं.. मला USA नाही जायच..

विराज : माझं लग्न होईपर्यंत तर तु USA जायला तैयार होतास.. आता अचानक काय झालं?? परत प्रेमाचं भुत शिरलय का डोक्यात तुझ्या.? नाही म्हणजे पहिल्या प्रेमाने USA जायला शिकवलं दुसर प्रेम इंडियातच रहायला शिकवतय. अस काही आहे का?? का इथे मित्रांसोबत रात्री दीड दोन वाजेपर्यंत टपोरी गिरी करत घराबाहेर फिरायचं असत तुला..

शौर्य : विर माझे मित्र कसे आहेत हे तुला पण चांगलंच माहिती आहे. उगाच सारख सारख टपोरी का बोलतोयस आणि गाथासाठी वैगेरे मी नाही रहात आहे इथे. ते मी काही तरी वेगळं शिकायचं ठरवलंय.. आणि ते इंडियात राहुन मी शिकु शकतो म्हणुन मला इथे राहुन शिकायचंय.. 

विराज : मग हे USA जाण्याच्या आधी बोलायच होतंस.. आम्ही तुला कोणतीही जबरदस्ती नव्हती केलेली USA जायला.. तु स्वतःच्या मर्जीने गेलेलास.. ही गोष्ट लक्षात ठेव.. मला USA जायचय विर, मला इथे नाही रहायच अस तु स्वतः रडत बोललेलास मला.. आठवतय ना?? 

शौर्य : मग आता मी बोलतोय मला इथेच शिकायचं.. ही पण गोष्ट ऐक माझी जशी ती गोष्ट ऐकलीस तशी.. प्लिज.. 

विराज : शौर्य किती नुकसान होणार आहे तुझ्या अश्या निर्णयामुळे कळतंय तुला?? आणि आता इथे राहुन काय करणार तु??

शौर्य : ते तु माझं एडमिशन केन्सल कर मग मी सांगतो..

विराज : शौर्य मला आता सिरियसली खुप राग येतोय.. मी तुझ्यावर हात वैगेरे उचलायचा नाही अस ठरवलंय.. पण तु ना माझा अंत बघतोयस यार.. सरळ सांगणार आहेस का काय करायचं ठरवलयस तु??

शौर्य : तु एडमिशन केन्सल कर मगच मी सांगेल..

शौर्य... विराज जोरातच त्याच्यावर ओरडतो..

तोच अनिता फोनवर बोलत शौर्यच्या रूमचा दरवाजा उघडत त्याच्या रूममध्ये येते..

हो आलाय तो.. हम्मम... बाय.. एवढं ती कोणाला तरी सांगुन फोन कट करते..

अनिता : कधी आलास तु?? आणि फोन का स्विच ऑफ करून ठेवलायस? आत्या विचारत होती तुझी..

शौर्य : मगाशीच आलोय मी.. फोन मी नाही विर ने स्विच ऑफ केलाय.. 

अनिता : माझे फोन का उचलत नव्हतास तु??

शौर्य : असच.. 

अनिता : काय असच?? तुला आत्या भेटल्यावर माझ्याशी बोलवस नाही वाटत का??

शौर्य : तुला पण मला आत्या भेटल्यावर माझ्याशी बोलावस वाटत का??USA ला असताना एक फोन नसतो तुझा. इथे आत्याकडे गेलो ना गेलो तुझे दिवसाला दहा बारा फोन यायला चालु झाले.. का अस वागतेस??

विराज : शौर्य खुप बोलतोयस तु आज. लिमिट क्रॉस करुन नको ना बोलत जाऊस.. शांत बस एकदम.. 

शौर्य : मग मम्मा पण तशीच वागते ना विर.. का मग सारख सारख फोन करत होती आत्याकडे गेल्यावर..??

विराज डोक्याला हात लावुन स्वतःलाच शांत करण्याचा प्रयत्न करत होता..

अनिता : बर झालं विर तु इथेच आहेस ते.. नाही म्हणजे तुच मला बोलतोस ना की ह्याच्याशी प्रेमाने बोलत जा.. प्रेमाने बोललं की अशी उत्तर मिळतात ह्याच्याकडून.. आणि प्रेमाने बोललेलं ऐकतो का हा मुलगा?? आपल्या आईच काहीही ऐकायच नाही हे सुरुवातीपासूनच ठरवलंय ह्याने. 

शौर्य : मम्मा प्लिज.. आत्तापर्यंत तुझं आणि विरच सगळं ऐकत आलोय मी.. हे तुला पण चांगल माहितीय..

अनिता : दोन दिवस आत्याकडे रहा आणि घरी ये.. अस मी तुला परत- परत फोन करून सांगितलेलं शौर्य.. सांगितलेलं की नाही..?? तु गुरूवारी घरी येतोयस हे पण तुला बोलली मी.. ऐकलस तु?? मुळात मी तुला तर तेव्हाच रिटर्न ये बोलली.. ते पण नाही ऐकलस?? काय ऐकतोस तु माझं ते सांग?? आणि तुझ्या आत्याचा फोन लागत नव्हता.. तु नाशिकला आहेस की घरी यायला निघालास ते कळत नव्हतं मला.. म्हणुन मी सारख सारख फोन करत होती तुला.. आत्या भेटली म्हणुन नव्हती करत फोन तुला. कळलं??

विराज : मम्मा एकटी असताना आत्यासोबत जायची खरच गरज होती का??

शौर्य : आजीची तब्येत ठिक नव्हती ना विर.. अचानक रस्त्यात काही झालं असत मग??

विराज : ओके... मग मम्मा बोलते तस दोन दिवस तु तिच्यासोबत राहुन पण येऊ शकत होतास ना.. आणि मम्मा बोलली ना गुरुवारी रिटर्न ये.. मग का नाही आलास?? का ऐकत नाही तु तिचं??

शौर्य : गुरुवारी तर आत्याच्या घरी गेलो ना मी..

विराज : मग त्याआधी कुठे होतास तु..??

शौर्य : कुठे म्हणजे का...(शौर्य आता घाबरतच अनिताकडे बघु लागतो.. अनिता रागातच शौर्यजवळ येते.. ) आत्याकडेच होतो..

अनिता : शौर्य तु काकाकडे गेलेलास.??

शौर्य घाबरतच मानेनेच नाही बोलतो..

अनिता आणि विराज एकमेकांकडे बघत शौर्यकडे बघतात.

विराज : शौर्य तु माझ्याकडे बघ बघु..(विराज शौर्यच तोंड आपल्याकडे करतच त्याला बोलतो).. तु काकाकडे नाही ना गेलेलास??

शौर्य विराजकडे बघत आता अनिताकडे बघु लागतो..

अनिता : तो तस नाही बोलणार.. त्याच्या आत्यासोबतच बोलावं लागेल मला.. मी नाही बोलत असताना कस काय ती ह्याला घेऊन जाऊ शकते त्या माणसाकडे?? अनिता हातात फोन घेतच आत्याला लावते..

मम्मा प्लिज.. आत्याला का तु बोलतेस.. मी बोललो ना मी आत्याकडेच होतो.. शौर्य अनिताच्या हातातुन फोन खेचुन घेत तिने आत्याला लावलेला फोन कट करतच बोलला..

अनिता : खर सांगायच शौर्य.. तु काकाकडे गेलेलास की नाही??

शौर्य : सॉरी..

अनिताचा हात शौर्यच्या गालावर उठतो..

तुला नाही जायच बोलली ना मी त्या माणसाकडे.. का गेलास तु?? अस बोलत ती वारंवार शौर्यवर हात उचलते.. आतापर्यंतचा संपुर्ण राग ती शौर्यवर काढत असते.. अजुन पर्यंत तिने शौर्यवर कधी अस हात उचलला नव्हता.. पण आज मात्र शौर्यने सगळी हद्दच पार केली म्हटलं तर तिला सहनच नाही झालं..

विराज : मम्मा काय करतेस तु.. प्लिज शांत हो.. आणि इथे बस बघु..

(विराज कसबस अनिताला पकडतच बेडवर बसवत बोलला)

अनिताला रडुच यायला लागत.. 

मम्मा तु रडु नकोस ना अस.. विराज तिचे डोळे पुसत तिला शांत करत बोलतो..

अनिता : का अस वागतो हा..?? दोन तीन वेळा सांगितलं मी ह्याला त्या माणसाकडे जाऊ नकोस म्हणुन.. का ऐकतच नाही हा माझं.. तु फोन करून बोलवलंस म्हणुन तो आज आलाय इथे.. हेच जर मी त्याला मी फोन करून बोलवलं असत तर नसता आला तो.. आई म्हणजे कचरा वाटते ह्याला.. ज्या माणसाच मला तोंड सुद्धा बघावस वाटत नाही त्या माणसाच्या दारावर हा मुलगा जातो.. सगळीकडुन मलाच कमीपणा.. ते ही ह्या मुलामुळे.. मुळात हा मी जे सांगितलं त्याच्या विरुद्धच का वागतो.. 

विराज : मम्मा तु शांत हो प्लिज.. मी बोलतो त्याच्यासोबत..

शौर्य : मम्मा भांडण तुझ आणि काकाच आहे ना ग.. तु मला का मध्ये घेतेस तुमच्या भांडणात.. किती वर्षे तु मला लांब ठेवलस त्याच्यापासुन.. तो एवढा पण नाही ग वाईट जेवढं तु समजतेस.. आणि मुळात माझा काका वाईट नाहीच आहे.. जर तो वाईट असता तर तु सांग त्याने आजी आणि आत्याला विरच्या लग्नात का पाठवलं असत.. कुठे तरी त्याला पण वाटतंय ना तो चुकला आहे हे. 

अनिता : चांगलंच शिकवुन पाठवलंय तुझ्या आत्या आणि काकाने तुला..

शौर्य : मी लहान आहे का ग मम्मा ती लोक मला काही शिकवायला.. आणि का शिकवतील ते लोक मला..? काकाला लहानपणापासून ओळखतो ग मी. तेव्हा जसा होता ना आत्ताही तसाच आहे तो.. काहीच फरक नाही त्याच्यात.. मला नाही माहीत तु का एवढा राग करतेस त्याचा. आत्याला पण मी विचारत होतो मम्मा का राग करते काकाचा?? पण तिने सुद्धा काही नाही सांगितलं मला..

अनिता : कस आणि कोणत्या तोंडाने सांगेल ती?? आपल्या भावाबद्दल काही सांगायला तोंड हवं ना तिच्याकडे.. आणि तु तुझ्या काकाकडे जाऊन आपल्यातल नात संपवलंस अस मला आता वाटत.. मला ह्यापुढे तु ह्या घरी नकोयस.. आत्ताच्या आत्ता बेग भरायची आणि कायमच तुझ्या काकासोबत राहायला जायच.. 

शौर्य : मम्मा प्लिज.. अस नको ना बोलुस.. 

अनिता : तु बेग भरतोस का मी भरू??

शौर्य : विर सांग ना मम्माला.. परत नाही जाणार कधी काकाकडे.. आय एम सॉरी.. 

अनिता : हे तु काकाकडे जायच्या आधी विचार करायला हवा होतास..

विराज : मम्मा परत नाही करणार ग तो अस.. प्लिज तु तरी थोडं शांत रहा..

अनिता : तु अति लाड करतोयस ना त्याचे म्हणुन हे सगळ होतय विर.. प्रत्येक वेळेला त्याची बाजु घेऊन येतोस माझ्यासोबत बोलायला.. आता पण तेच करतोयस.. तुला नाही कळणार ह्याने त्या माणसाच्या दारावर जाऊन मला किती हर्ट केलंय ते.. वर त्या माणसाची बाजु घेऊन मी किती चुकतेय हे सांगतोय हा मला.. तसही एवढे दिवस आत्यासोबत राहिला.. मग हे अस होणारच..

शौर्य : तु विर आणि आत्याला का बोलतेस?? 

विराज : शौर्य तु तर आता एक शब्दपण बोलायचा नाहीस मी पाया पडतो यार तुझ्या प्लिज शांत रहा. मम्मा आय एम सॉरी.. ओके.. तु पण प्लिज शांत रहा.. माझं सिरियसली डोकं खुप दुखू लागलंय आता.. 

दोन मिनिटं विराज डोक्याला हात लावुन तसाच बसुन असतो..

विराज : शौर्य तु बेग भरायला घे.. तु USA जातोयस..

शौर्य एकटक विराजकडे बघत रहातो.. 

विराज : मम्मा आर यु हॅप्पी नाव्ह..

अनिता : जमलं तर आत्ताच पाठव त्याला.. 

शौर्यकडे न बघताच ती त्याच्या रूममधुन बाहेर पडु लागते..

शौर्य : विर मला नाही जायचय यार USA. मी बोललो ना तुला मला इथेच राहुन शिकायचं.. मम्मा मी काही तरी वेगळं करायचं ठरवलंय.. प्लिज.. 

विर तिकिट बुक झाली की मला सांग. तिकिटचे पैसे मी तुझ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करते.. अनिता रागातच एक नजर शौर्यवर फिरवते आणि तिथुन निघुन जाते..

अनिता तिथुन निघुन जाताच शौर्य रागातच आपल्या हाताची मूठ करत जोर जोरात भिंतीवर मारतो.. विराज त्याला घट्ट पकडत कसबस शांत करतो..

मला नाही जायचय यार USA.. का तुम्ही दोघ अस वागतायत माझ्यासोबत.. शौर्य रागातच विराजवर भडकत त्याला बोलतो..

विराज : शौर्य तुला काय झालंय.. तु का अस वेड्यासारखं वागतोयस यार?? इथे माझ्या पुढ्यात बस बघु.. आणि काय झालंय तुला ते सांग..

विराज शौर्यला पकडतच आपल्या समोर बसवतो..

विराज : मम्मा नको बोलत असताना तु का गेलास काकाकडे?? का ऐकत नाही तीच तु??

शौर्य : नव्हतो जात.. मी आत्याला गाडीत बोललो पण मम्मा नको बोलतेय काकाकडे जायला आपण नको जाऊयात. मी तुझ्याघरी गेल्यावर काकासोबत फोनवर बोलेल हवं तर पण घरी नको हे सुद्धा बोललो.. आत्या तेव्हा काहीच बोलली नाही.. मला वाटलं आत्या तिच्याच घरी नेईल.. मी इथे मुंबईत आल्यावर काका आजीला घेऊन जाईल मग काकाला भेटायचा संबंध येत नाही.. तसही पहिल्यांदाच नाशिकला गेलेलोना. मला काका कुठे रहातो ते पण नाही माहीत.. लहानपणी बाबासोबत वैगेरे गेलो असेल तर मला आठवत पण नाही पण जेव्हा गाडीतुन आजीला धरतच उतरलो तर समोर काका आणि काकी होते.. तेव्हा कळलं की आत्याने फसवुन काकाकडेच आणलं मला.. मी ठरवुन नाही गेलो रे.. तुझी शप्पथ..

विराज : तिथे गेल्यावर कळलं ना तुला तु कुठे आहेस मग परत का नाही आलास??

शौर्य : एवढ्या वर्षांनी तो मला दिसला मग मला पण त्याला भेटावस वाटणार ना.. तु अस कस बोलु शकतो यार.. लहानपणी खुप केलंय त्याने माझं.

विराज : ओके ग्रेट.. मग हे सगळं तु मम्माला का नाही सांगितलं.?

शौर्य : मम्मा आत्यावर भडकेलं ना विर.. आत्याला मनापासुन अस वाटत होतं की मी एकदा काकाला भेटावं.. तिला आपली फेमिली परत एक व्हावी अस वाटतय रे.. आणि मला पण.. बट मम्मा समजुनच घेत नाही आणि माझा काका खरच चांगला आहे रे.

विराज : ते मम्माला ठरवु दे ना.. तु नको ठरवुस.. 

शौर्य : विर तुझे मोठे पप्पा एवढे वाईट असुन मम्मा त्यांच्यासोबत नीट बोलु शकते फक्त तुला बर वाटावं म्हणून मग माझ्या काकासोबत का नाही बोलु शकत.. निदान मला बर वाटावं म्हणुन तर बोलूच शकते ना ती.. आणि मुळात मी तिला बोलायला सांगतच नाही.. मला बोलु दे काकासोबत हेच सांगणार होतो..

विराज : मलाना सिरीयसली तुझ्यासोबत बोलायला नाही जमत आहे शौर्य.. तु नक्की शौर्यच आहेस ना हा डाऊट येतोय मला.. मी तुझं तिकीट बुक करतो.. तेही उद्याच.. बेग भरायला घे. हा लॅपटॉप आणि तुझा मोबाईल माझ्याकडेच राहील. घाबरू नकोस.. चॅक वैगेरे नाही करत.. पण तु परत एडमिशन केन्सल वैगेरे करशील म्हणुन सोबत घेऊन जातोय.. उद्या USA जाताना देईल परत तुला..

शौर्य : विर प्लिज यार... मोबाईल मधुन साईट नाही ऑपन होत ती. जर तस होत असत तर मी लॅपटॉप मधुन का करत बसलो असतो. मला मोबाईल दे माझा.. 

विराज : जर हे एडमिशन तु केन्सल केलंस तर मला एक भाऊ होता मी हे विसरून जाईल..

(अस बोलत विराज शौर्यचा मोबाईल त्याला देतो.. पण लॅपटॉप तो स्वतःजवळ ठेवतो..)

शौर्य : विर मला वेगळं काही तरी शिकायचंय. प्लिज समजून घे प्लिज.. मला त्या स्टडीमध्ये इंटरेस्ट नाही आहे.. प्लिज ना विर.. तु मम्माला समजव..

विराज : काय शिकायचंय तुला??

शौर्य खुप वेळ शांत बसुन असतो..

विराज : काय शिकायचय बोलशील??

शौर्य : ऐरोस्पेस इंजिनिअर..

विराज : आर यु मॅड.?? तुझ्या डोक्यातुन ते वेड गेलंच नाही का अजुन?? 

शौर्य : विर मम्माने जबरदस्ती मला कॉमर्स साईडला टाकलंय यार.. हे तुला पण माहिती. मला नाही ह्या स्टडीत इंटरेस्ट. मला ऐरोस्पेस इंजिनिअर व्हायचंय.. मला इकडच्या कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायचय.. माझं ते एडमिशन केन्सल कर. मला जे करायच ते करू दे प्लिज..

विराज : मम्माला जाऊन सांग. ती रेडी असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही.. तसही मला तर तुझा कोणताच निर्णय नाही पटत.. तु कसा आहेस माहिती जे आहे त्यात तु कधी सुख मानतच नाहीस.. जे आपल्याला मिळणार नाही ह्याची गैरेंटी आहे तरी त्याच्या मागे तु पळत रहाणार.. स्वतःला त्रास तर करून घेतोसच पण तुझ्यासोबत आम्हांला पण त्रास होतो ह्याचा विचार नाही करत आहेस तु.. ह्याला स्वार्थपणा म्हणतात शौर्य.. कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा बिजीनेस कर तेही इतरांना आपल्या हाताखाली कामाला लावुन.. इंजिनिअरिंग आणि बिजीनेस दोन्ही गोष्टी सेम आहे हे तुला त्या फिल्ड मध्ये आल्यावर कळेल.. फक्त कामाची पद्धत थोडी वेगळी आहे.. आणि मला मनापासुन वाटत की तु तुझं ते इंजिनिअर बनण्याच स्वप्न डोक्यातुन काढुन टाकावं.. काही गोष्टी स्वप्न म्हणुनच छान असतात. प्रत्यक्षात त्या त्रासदायक असतात.. आणि मला तुझी जरा पण गैरेंटी वाटत नाही.. बीकॉम पण तु अर्ध्यावर सोडलस.. कारण तुझ्या मनाला वाटलं तु केलंस.. USA पाठव बोललास. ममासोबत डिस्कस करून तुला USA पाठवल.. ते पण तु अर्ध्यावर सोडायच बोलतोयस.. आता तुला ऐरोस्पेस इंजिनिअर व्हायच. मी तु खुश रहावा म्हणुन मम्मा सोबत बोलेल सुद्धा पण तुझी गैरेंटी नाही ना तु ते तरी कम्प्लिट करशील म्हणुन.. 

शौर्य : मी ह्या वेळेला नाही सोडणार अर्ध्यावर.. तु फक्त माझं एडमिशन केन्सल कर..

विराज : मम्मासोबत बोलुन ये.. जर ती हो बोलली तरच मी एडमिशन केन्सल करेल.. आणि मला नाही वाटत मम्मा तुला हे नको ते उद्योग धंदे करायला परमिशन देईल.. आणि मला पण वाटत ती ह्या वेळेला मी तिच्या जागी बरोबर आहे. मला अस वाटत तु हे सगळं करण्यात तुझा वेळ वाया घालवतोयस.. त्यापेक्षा गप्पपणे बेग भरायला घे..

शौर्य : तु 31st च तिकीट बुक केलेलंस ना??

विराज : तु इथे यावं म्हणुन बोललो मी.. तिकीट उद्याच बुक करतोय मी तुझं.. ते ही बुक होईल की नाही डाऊट आहे.. तरी बेग घे भरायला..

शौर्य : विर तु तिकीट बुक नाही हा करणार.. जर तु तिकीट बुक केलंस तर...

विराज : शौर्य ब्लॅकमेल वैगेरे अजिबात करायच नाही हा मला.. मी शांत आहे मला शांतच राहू दे.. आणि गप्पपणे बेग भरायला घे... 

शौर्य : विर प्लिज..

विराज : बेग भरशीलना तुझी तु.. का मदत करू भरायला..??

शौर्य विराजसोबत काहीही न बोलता सरळ रूम बाहेर पडतो.. 

विराज : कुठे चाललास??

शौर्य विराजच्या प्रश्नाच उत्तर न देता सरळ अनिताच्या रूममध्ये जातो.. 

अनिता डोळे मिटुन बेडवरच बसुन कसल्या तरी विचारात हरवुन गेली असते..

शौर्य : मम्मा मला नव्हतं माहित तु एवढं हर्ट होशील ते.. प्लिज आय एम सॉरी..

अनिताचा हात पकडतच शौर्य बोलतो.. अनिता काहीही न बोलता सरळ त्याच्या हातातुन आपला हात काढुन घेते..

शौर्य : मम्मा प्लिज बोलणा ग.. तुला वाटत ना मी निघुन जावं इथुन तर खरच निघुन जातो मी?? तसही मी निघुन गेलो तर तुला काहीच फरक नाही पडणार मला माहिती आहे.. तुला काय विर आहे.. आणि मला पण नव्हतं जायच ग काकाकडे बट आजीला काकाकडे सोडुन मग आत्याकडे जाणार होतो ना म्हणुन गेलो ग.. आणि माझा काका खरच चांगला आहे.. विरच्या मोठ्या पप्पांसारखा नाही.. ना विरच्या डॅड सारखाही.. मम्मा बाबा गेला ना सोडून मला तेव्हा पासुन मला आत्या आणि काकासोबतच राहायला जावस वाटायच.. कारण खुप त्रास होत होता ग मला इथे.. एक दिवस असा नाही गेलाय माझा की विरच्या डॅडने मला त्रास दिला नसेल.. सोबत त्याचे मोठे पप्पा पण.. तुझ्या मुलाला एवढ्या मरण यातना देणारे लोक ह्या घरात येऊ शकतात.. आणि तु पण त्यांचं अगदी हसत स्वागत करतेस.. त्यांच्यासोबत बोलतेस.. मग माझ्या काकाचाच का एवढा राग करतेस तु..??

अनिता : सुरज तुला त्रास द्यायचा हे मला नव्हतं माहीत शौर्य..

शौर्य : नंतर तर माहिती पडलं ना मम्मा तुला?? माझी काही चूक नसताना मला लांब पाठवुन दिलंस तु.. पण त्याला मात्र आपल्या सोबतच ठेवलस.. त्याच्या शेवटच्या क्षणाला त्याच्याजवळच बसून होतीस तु. कारण त्याने त्रास तर मला दिलेला ना तुला कुठे काही फरक पडत होता.. स्टोररूमधल्या अंधारात तर तो मला कोंडुन ठेवायचा.. उठ सूट माझी चूक नसताना तो मला मारायचा.. पट्ट्याने तर पट्ट्याने मारायचा जखम मला व्हायची ग तुला थोडी ना झाली कधी. मी झालेल्या गोष्टी काढत नाही मम्मा.. पण एवढा त्रास दिलाय त्या माणसाने.. तरी मी तुला अस कधी बोललो नाही की तु त्याच्यासोबत बोलू नकोस किंवा त्याच्यासोबत राहू नकोस.. माझा काका एवढं वाईट तुझ्यासोबत वागला असेल अस मला तर नाही वाटत.. तरी तु मला त्याच्यापासुन लांब ठेवलस.. आणि तो पण कस काय तैयार झाला लांब रहायला मला पण तेच नाही कळत..

अनिता : सुरज तुला अस त्रास द्यायचा ह्याविषयी तुला मला कधी सांगावस नाही वाटलं का?

अनिता रडतच शौर्यला विचारू लागली..

शौर्य : तुझ्याकडे वेळ होता माझ्यासाठी?? आणि खर सांगु मला तर कधी माझा एकदाचा जीव जातोय अस वाटायच. रोज मरत जगुन मी कंटाळुन गेलेलो ग. आपला मुलगा घरापासुन एवढं लांब का पळतो, घरात घाबरून घाबरून का असतो? हा पण विचार नाही केलास तु. बाबा नंतर पुर्ण लाईफ खराब गेली ग माझी ते ही USA जाईपर्यंत.. आई बाप नसल्यावर मुलगा कसा जगतो तस जगलोय मी.. ते ही माझी मम्मा जिवंत असताना.. पण विर होता माझ्यासोबत.. अजुनही आहे.. तेव्हाही खुप काळजी घ्यायचा इव्हन आत्ता पण घेतो म्हणुन तर तुझ्यापेक्षा थोडं जास्त महत्व मी त्याला देतो.. त्याला नाही दुखवत मी कधी.. त्याच सगळं ऐकतो कारण तेवढं त्याने केलंय ग माझ्यासाठी.. फादर्स डे आणि मदर्स डे पण असेल ना ते सगळ त्याला विश करून सेलिब्रेट करतो मी.. कारण माझ्यासाठी माझी मम्मा आणि बाबा तोच वाटतो मला.. काहीही करायला तैयार असतो तो माझ्यासाठी.. मी नाराज असेल, मी टेन्शन मध्ये असेल तर त्याला लगेच कळत ग.. पण तुला नाही कळत ते.. म्हणजे इतर फ्रेंड्स लोकांची मम्मा आणि माझी मम्मा ह्यात खुप फरक आहे.. ती रॉबिनची मम्मा बघ.. त्याला साद खरचटलं ना तरी पुर्ण घर डोक्यावर घेते ती.. आपल्या मुलाच्या प्रत्येक गोष्टीवर ती विश्वास ठेवते मम्मा.. भले तो चुकीचा असेल तरी.. तुझ्यासारख नाही इतरांसमोर आपल्या मुलाची चुकी नसताना ओरडुन त्याचा सगळ्यांसमोर इन्सल्ट करून तिथुन निघुन जाते.. त्या नैतिकची मम्मा...सकाळी जबरदस्ती त्याला नाश्ता भरवते.. त्याशिवाय त्याला घराबाहेर सोडत नाही. ती पण जॉब करते तुझ्यासारखच. पण नैतिककडे पूर्ण लक्ष असत तीच.. तुला तर मी नाश्ता केला की नाही हे सुद्धा साधं माहिती नसत ग मम्मा.. लक्ष देणे तर दूरच.. त्यादिवशी त्या आर्यनची मम्मा मला जबरदस्ती जेवायसाठी थांबवत होती तिथे पण मला नाही जमत आर्यनच्या घरी जेवायला कारण त्याची मम्मा एवढा मोठा झाला ना तरी कधी कधी त्याला त्याच्या बाजुला बसुन आपल्या हाताने भरवते.. त्याच्यासोबत मज्जा मस्ती करत जेवत असते.. दिवसभर काय काय केलं हे त्याला विचारत असते..  मला ते पहायला नाही जमत कारण माझी मम्मा माझ्यासोबत कधी अस वागलीच नाही यार.. आणि अशी अपेक्षा पण नाही ठेवु शकत मी तिच्याकडुन.. कारण जेवताना पण ती आणि तिचा लॅपटॉप.. मम्मा मला तर तु लास्ट कधी भरवलेलं ते आठवत पण नाही गप्पा गोष्टी तर दूरच राहिल्या. आपली ज्यो.. ज्यो नाराज असेल ना अंकल आंटी ती जेवत नाही तोपर्यंत ते लोक जेवत नाहीत ग.. ती जे बोलेल ती प्रत्येक गोष्ट तिला तिच्या मर्जी नुसार करू देतात.. अंकलचा पण बिजीनेसच आहे.. पण त्यांनी ज्यो ला फोर्स नाही केला कधी की कॉमर्स घे सायन्स नको घेऊस.. तुला जे वाटत ते कर.. अस बोलले होते अंकल.. पण माझ्या बाबतीत आत्तापर्यंत सगळं उलटंच घडत आलंय ग..

अनिता : शौर्य तुझ्या प्रत्येक मित्रांच्या आईच्या पाठीशी एक पुरुष उभा आहे.. माझं तस नाही आहे.. मी एकटीच आहे ही गोष्ट लक्षात ठेव तुझ्या. मला ऑफिससोबत इतर गोष्टींकडे पण लक्ष द्याव लागतरे. तुझं शिक्षण, घरात काम करणाऱ्या नोकर मंडळींवर लक्ष द्याव लागत, ऑफिसमध्ये गेल्यावर वेगळी काम, घरी आल्यावर आपली UK ला ब्रांच आहे तिकडचे फॉलोअप घ्यावे लागतात.. आणि मला खरच नव्हतं माहिती की सुरज माझ्या नंतर तुला असा त्रास देत असेल.. नेहमी आपला शौर्य आपला शौर्य करून बोलायचा रे तो माझ्याशी.. स्वतःहुन ऑफीसमध्ये मला फोन करून कळवायचा तुझ्याबद्दल.. शौर्य नुकताच जेवलाय, जस्ट झोपलाय.. सुरजच्या बोलण्यावरून मला त्यावेळेला अस वाटायच की तो खुप काळजी घेतोय जस शेखर घ्यायचा अगदी तसाच. मी घरात काम करणाऱ्या लोकांना पण विचारायची की मी ऑफिसमध्ये गेल्यावर इथे सगळं नीट असताना.. ती लोक पण सुरजबद्दल चांगलंच सांगायचे.. कधी तुझ्या रूममध्ये तुझ्याशी बोलायला आली तर तु सुद्धा कधी त्याच्याबद्दल मला बोललासच नाहीस.. मला कस कळणार सांग.. माझा मुलगा सेफ आहे म्हटलं तर मी शेखरच स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागली.. आणि अजूनही तेच स्वप्न पुर्ण करायच्याच मार्गावर आहे मी.. त्याच्या मनाप्रमाणे त्याने उभारलेली छोटी कंपनी ही एक मोठी कंपनी झाली.. खुप साऱ्या ब्रांचेस झाल्यात कंपनीच्या.. फक्त एकच स्वप्न त्याच माझ्याकडुन पुर्ण करायचं राहून गेलंय ते म्हणजे सिंगपोरमध्ये एक ब्रांच कंपनीची काढायची.. ते ही काही वर्षात पूर्ण करेलच मी.. आज ना उद्या जाऊन त्याला भेटेल ना मी मग हिशोब मागत बसेल माझ्याकडे..

मम्मा नको ना ग अस बोलुस.. शौर्य रडतच अनिताला मिठी मारत बोलतो..

अनिता : मला जरा जरी कळलं असत की सुरज तुला एवढं टॉर्चर करतोय तर त्याच वेळेला त्याला ह्या घरातुन हकलवुन दिलं असताना शौर्य.. माझ्या मुलाला कोणी त्रास देत असेल अश्या माणसाला मी कस घरात ठेवलं असत.. पण मला कोणी तस कळु दिलं नाही रे.. तु दिवसभर स्वतःला एवढ्या एक्टिव्हिटीमध्ये बिजी केलेलंस मला वाटायच थकुन जात असशील म्हणुन तु शांत शांत असशील.. आणि असही नाही ना की मी तुला विचारलं नाही की तुला सुरज आवडतो वैगेरे?? पण तु सुद्धा होकारार्थी मान हलवुन आवडतो म्हणुन बोलायचास ना.. तेव्हा का नाही कधी बोललास तु.. 

शौर्य : तुला मारून टाकल असत ना ग त्याने म्हणुन नाही बोललो मी.. आणि मला ते सगळं नाही काढायचय.. तो टॉपिक ठेव बाजूला.. तु माझ्यावर अजुन रागवलीयस??

अनिता : तु चूकच एवढी मोठी केलीस ना शौर्य ती माफीच्या लायक नाही.. काय गरज होती त्या माणसाकडे जायची तुला?? 

शौर्य : का राग करतेस तु एवढा काकाचा.??

अनिता : सगळया गोष्टी नाही सांगु शकत तुला मी.. तु बेग भरलीस??

शौर्य : मला नाही जायच USA. मी इथेच शिकायच ठरवलय..

अनिता शौर्यला काही बोलणार तोच विराज लॅपटॉप घेऊन अनिताच्या रूममध्ये येतो.. विराजला बघताच शौर्य आणि अनिता आपले डोळे पुसुन त्याच्याकडे बघतात..

विराज : तु रडत होतीस का??

अनिता : नाही.. तुझ काही काम होत..??

विराज : उद्याच तर तिकीट नाही पण दोन दिवसा नंतरच तिकीट बुक होईल.. ते चालेल का हे विचारायला आलोय..

अनिता : करून टाक.. 

शौर्य : मम्मा मी नाही जात आहे कुठे.. मला ऐरोस्पेस इंजिनिअर करायचंय.. आणि मी तेच करणार.. 

अनिता : तुझं डोकं ठिकाणावर आहेना शौर्य?? काय एक एक नवीन तु काढत बसलायस आज?? तु आहे तीच स्टडी पूर्ण करणार आहेस.. 

शौर्य : मला नाही ना ग त्या स्टडीत इंटरेस्ट.. 

अनिता : इंटरेस्ट म्हणुन नाही फ्युचर म्हणुन विचार कर.. आणि मला ह्या टॉपिकवर परत डिस्कशन नकोय.. तु जाऊन बेग भरायला घे..आणि विर तिकिट बुक करून टाक..

शौर्य : मी निघुनच जातो ह्या घरातुन.. मग करा जबरदस्ती ज्याच्यावर करायची त्याच्यावर.. 

विराज : शौर्य का हट्टीपणा करतोयस?? दोन वर्षांचा प्रश्न आहे फक्त..

शौर्य : विर आधीच पाच वर्षे वेस्ट केलीत तुम्ही लोकांनी माझी. त्यात अजुन ही दोन वर्ष. मला सिरियसली काही तरी करायचं यार.. तेव्हा पण मम्मा तु असच केलंस.. तेव्हा पण नाही ऐकलीस.. बट आता मी तुझं नाही ऐकणार.. 

अनिता : विर तिकिट बुक झाली तर मला सांग..

विराज : ओके..

शौर्य : व्हॉट ओके विर?? तु तरी समजुन घे यार.. 

विराज : तु जो मूर्खपणा लावलाय तो मी समजुन घेईल अस वाटत का तुला??

मूर्खपणा आता बघशील माझा.. शौर्य रागातच अनिताच्या रूममधुन निघुन आपल्या रूममध्ये जातो.. 

अनिता : काय लावलय ह्या मुलाने..??

विराज : मलाच नाही कळत हे परत अचानक नको ते वेड त्याच्या डोक्यात कुठुन आलय ते?? मी एकदा समजवतो त्याला समजला तर ठिक नाही तर आपल्यालाच तो जे बोलतो ते समजुन घ्यावं लागेल.. 

इथे शौर्य आपल्या रूममध्ये येऊन आपलं पॉकेट आणि मोबाईल सोबत घेतो.. ब्रूनोला घट्ट मिठी मारत आपल्या रूमबाहेर पडतो..

कुठे चाललायस शौर्य.. विराज त्याच्या समोर येतच त्याला विचारतो..

शौर्य : नाही माहीत..

विराज : मला तुझ्याशी बोलायचंय.. आत चल बघु..

शौर्य : मला नाही बोलायचंय विर.. मला माहिती तु मलाच समजवणार.. आणि मला परत USA पाठवणार.. आतापर्यंत तु मम्मा बोलते तसच वागतोस. माझा जरा पण विचार नाही करत तु.. 

विराज : मग काय करू मी... तु सांग.. ते करतो मी

(विराज शौर्यच्या रूम बाहेरच मोठ्याने त्याच्यावर ओरडतो.. अनिता आणि अनघा दोघेही त्याचा आवाज ऐकुन बाहेर येतात) 

जस तुला वाटत ना मी तुला समजुन घ्यावं तस मला वाटत की तु मला समजुन घ्यावं यार. आल्यापासुन तु नाटकी लावलीयस.. शांतपणे बोलेल तुला कळत नाही का?? ह्या वेळेला खरच तु चुकीचा निर्णय घेतोयस शौर्य.. का कळत नाही तुला..

अनघा : विराज काय झालं?? तु शौर्यवर का भडकतोयस??

विराज : विचार ह्यालाच.. USA नाही जायच बोलतोय.. इथेच राहुन शिकायचंय त्याला..

अनघा : शौर्य.. खरच तुला USA नाही जायच का??

शौर्य : मला वेगळं काहीतरी शिकायचं ग वहिनी.. मला त्या स्टडीत इंटरेस्ट नाही अजिबात.. 

विराज : काय शिकायचं ते पण सांग तिला.. राहू दे मिच सांगतो.. अनु ह्याला ऐरोस्पेस इंजिनिअर करायचय.. म्हणजे हा परत FYJC पासुन सुरुवात करणार.. 

अनघा : शौर्य तु आधीच का नाही ती साईट चुज केलीस..?? माणसाने पुढे जावं रे. तु परत मागे कुठे जातोयस??

शौर्य : विरलाच विचारना सांगेल तो आणि विर आत्ता जस ओरडुन सांगत होतासना तस हे पण ओरडुन सांग.. का मी सांगु..??

विराज : आत चल मग सांगतो मी..

शौर्य : मला नाही यायच आत.. आणि माझा निर्णय झालाय. मी USA नाही म्हणजे नाही जात.

अनघा : शौर्य प्लिज... दोन मिनिट माझ्यासाठी आत चल.. प्लिज.. आय एम रिक्वेस्टिंग यु..

शौर्य विराजकडे बघतच गप्प रूमच्या आत जातो..

अनिता तिथुनच आपल्या रूममध्ये निघुन जाते..

अनघा : विराज शौर्यला कॉमर्स साईटला का घातलं जर त्याला वेगळं काही करायचं होतं तर.

विराज : मम्माने त्याला जबरदस्ती कॉमर्सला टाकलं.. त्याला सुरुवातीपासून ऐरोस्पेस इंजिनिअर करायच होत. आय नो मी तेव्हा त्याला साथ नाही दिली.. कारण तेव्हा मी पण जास्त मोठा नव्हतो. डॅडच्या शब्दाबाहेर सुद्धा नव्हतो तुला माहिती आहे ना सगळं.. मला नाही जमलं त्याला ह्या बाबतीत सपोर्ट करायला.. बट इट्स ओके ना. आपण खुप स्वप्न बघतो.. सगळीच पूर्ण नाही ना ग होत.. 

अनघा : इट्स नॉट ओके फ्रॉम हिस साईट विराज.. तुला नाही माहीत तो खुप टलेंटेड आहे.. USA सारख्या कन्ट्रीत अस टॉप येन इट्स नॉट जॉक.. तुम्ही तेव्हाच त्याला सायन्स साईटला घातल असत मे बी पूढील दोन तीन वर्षांनी तो खरच मोठा ऐरोस्पेस इंजिनिअर बनु शकला असता.. 

विराज : मग आत्ता काय करायच ते सांग.. तु बोलतेस तस परत ह्याला FYJC मध्ये एडमिशन घ्यायला देऊ का.. आणि मम्मा ऐकेल अस वाटत.. आधीच ह्याचे सगळे हट्ट पुरवत बसतो म्हणुन मला ती नेहमी ओरडत असते... ह्याने पण थोडा फ्युचर बाबत विचार नको का करायला..

अनघा : शौर्य तु ऐरोस्पेस इंजिनिअर करून काय करणार पुढे..??

शौर्य : मला NASA मध्ये जायचय.. 

अनघा : तुझं हे ठरलंय??

शौर्य : हम्म..

अनघा : नक्की??

शौर्य  : हो..

अनघा : शौर्य मी विराजकडून तुला आधी सॉरी बोलते.. कारण तो तेव्हा तुला नाही मदत करू शकला.. कारण खरच तेव्हा सिच्युएशन पण खुप वेगळी होती तु समजु शकतोसना तुझ्या भावाला.. आणि तु खुप हुशार आहेस आय नो.. बट तुला माझ्या बहिणीबद्दल आणि माझ्या फेमिलीबद्दल सांगते मी.. गाथाला फॅमिली शिवाय खरच नाही जमत रहायला.. ती पण तुझ्यासारखी खुप हुशार आहे शौर्य.. तिला पप्पा आणि मी खुप समजवत होतो की UK ला जाऊन स्टडी कर.. तिच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मध्ये एडमिशन सुद्धा झालं असत.. 12th ला 97% स्कॉरींग केलंय तिने.. बट मला माझी फॅमिली हवी अस बोलुन ती इथेच राहिली.. ती तुझ्याशिवाय एकटी नाही राहू शकत.. थोड्या वर्षांचा प्रश्न असता तर ती एडजस्ट करेल शौर्य नाही तर ती नाही करणार.. आम्हा तिघा भावंडांमध्ये खुप म्हणजे खुप हळवी आहे ती.. माझं लग्न जमलं ना.. मी तिच्यापासुन लांब जाणार हे कळताच चार महिने आधीपासूनच रडु लागलेली ती.. तु USA जातोयस म्हणुन ती तीच एडमिशन तिथे USA मध्ये घायच बोलत होती मला.. कारण आता ती तुझ्यात गुंतली आहे. ती तुझ्याशिवाय नाही राहु शकणार इथे हे तिला पण कळत होतं. मी तिला समजवल तेव्हा कुठे ती समजली. मला अस वाटत तु तिला अजुन नीट नाही ओळखलस..  तु NASA मध्ये जॉब करणार मग तुला USA रहावं लागणार शौर्य.. आणि माझी फॅमिली तुझ्या आणि गाथाच्या लग्नासाठी तैयार नाही होणार रे.. कारण ते गाथासाठी असा मुलगा शोधतील जो इथे इंडियातच असेल.. तिच्या कायम सोबत.. मला तुझ्या ऐरोस्पेस इंजिनिअर बनण्याबद्दल काहीच प्रॉब्लम नाही शौर्य..  त्या नंतर पण जो तु निर्णय घेतलास ना मला त्याबद्दल पण खरंच प्रॉब्लेम नाही शौर्य.. बट माझी गाथा खरच एकटी नाही रहाणार रे.. आणि मला काय वाटत माहिती प्रोफेशन अस निवडाव जो आपल्या फेमिलीला टाईम देईल.. विराजला पण मी तेच बोलते.. लाईफ जगण्याचा खरा आनंद फॅमिली सोबत आहेरे.. तु ऐरोस्पेस इंजिनिअर करशील.. NASA मध्ये जॉबला सुद्धा लागशील.. जॉब करून दोन तीन वर्षे झाली ना की तुलाच अस वाटेल की तु घेतलेला निर्णय कुठे तरी चुकला आहे. कारण तु पण गाथा सारखाच आहेस.. तुला सुद्धा फॅमिली शिवाय रहायला नाही जमत.. मी तुझ माईंड डायव्हर्ट करते असा विचार नकोस करुस हा शौर्य.. तु जे करशील ते तु खुप विचार करून करून करावं असं मला वाटत.. मी फक्त तुला पुढे येणारी सिच्युएशन सांगतेय.. तुला ऐरोस्पेस इंजिनिअर करायचं ना तर कर बिनदास्त.. मी तुला सपोर्ट करेल. पण तु जी फिल्ड निवडतोस ना त्याने शौर्य एकीकडे आणि गाथा एकीकडे राहील.. शौर्य गाथा एकत्र बघायला मला आणि विराजला आवडेल.. बघ विचार कर.. तुझा विचार झाला ना तर मला आणि विराजला तु आमच्या रूममध्ये येऊन सांगशील.. तस मग मी मम्मीसोबत बोलेल तुझ्यासाठी..

अनघा विराजला घेऊन आपल्या रूममध्ये घेऊन जाते..

शौर्य अनघाच्या बोलण्याचा विचार करु लागतो..

(शौर्य काय निर्णय घेईल?? USA जाईल का इंडियात राहुन ऐरोस्पेस इंजिनिअर करेल?? पाहुया पुढील भागात??पण हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा? आणि एक रिक्वेस्ट ज्यांना खरच स्टोरी वाचुन बॉर होत असेल तर अश्या खुप साऱ्या कथा आहे त्या वाचायला घ्या.. पण कधीच कोणत्याही लेखकाने लिहिलेल्या कथेवर निगेटिव्ह कमेंट नका देऊ.. त्याने लेखकाचे मन खरच विचलित होते.. आणि करिअर मधला हा प्रसंग प्रत्येकाच्या बाबतीत येतोच येतो. काहींना तर आपण अर्ध शिक्षण पुर्ण केल्यावर कळत की आपल्याला ह्यात इंटरेस्ट नाही.. त्यावेळेला फॅमिली मधुन मिळणाऱ्या रिएक्शन ह्या अश्याच असतात.. त्या ह्या भागातुन दाखवण्याचा उद्देश.. धन्यवाद)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all