अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 89

In marathi

शौर्य : मम्मा एवढ्या रात्री तु अशी इथे का बसलीयस? झोपली का नाहीस अजुन??

अनिता : एवढ्या रात्री कुठे गेलेलास शौर्य तु?? 

शौर्य : ते मी.. मला झोप येत नव्हती म्हणुन इथे बाहेरच होतो..

अनिता : शौर्य मला खोटं बोलले अजिबात आवडत नाही हा.. पावणे बारा वाजता तु बाईक घेऊन घराबाहेर पडलायस.. ते ही घरात कोणालाही काहीही न सांगता.. 

शौर्य : तुला कस...

अनिता : मला कस माहिती ते महत्वाच नाही एवढ्या रात्रीच बाईक घेऊन कुठे गेलेलास तु?? एवढ्या रात्री बाहेर काय करत होतास??

शौर्य : ते.. मी फ्रेंडला भेटायला..

अनिता : कोणत्या फ्रँडला भेटायला गेलेलास तु ते कळेल का मला??

शौर्य : सगळ्याच..

शौर्य अस बोलताच अनिता रागातच शौर्यकडे बघत असते..

शौर्य : तु रागात नको ना बघुस.. खरच थोडं काम होत ग.. म्हणुन भेटायला गेलो..

अनिता : शौर्य आपलं घर म्हणजे तुला धर्मशाळा वाटते का..? कधी पण घराबाहेर पडशील आणि कधीही घरात येशील.. रात्री दीड वाजता घरी येतोयस तु?? USA वरून आल्यापासून तु काय लावल काय आहेस??

शौर्य : नको ना भडकुस अस.. खरच काम होत ग..

अनिता : काय काम होत एवढ्या रात्री कळेल मला??

(शौर्यला खर तर काय बोलायचं ते सुचत नसत.. तो तसाच विचार करत उभं असतो) 

अनिता : काय काम होत शौर्य?? मला ओरडायला लावु नकोस.. प्लिज..

शौर्य : ते अलिबाग जायच केन्सल झालं ना मग उद्या कुठे जायच फिरायला ते प्लॅन करत होतो.. 

अनिता : रात्री दीड वाजेपर्यंत तु असल्या नको त्या टॉपिकवर डिस्कस करत मित्रांसोबत घराबाहेर असतोस शौर्य.. तु रोजच अस उशिरा घरी येतोस का आज मला दिसलास म्हणुन मला माहितीय??

शौर्य : ए मम्मा प्लिज.. आता तु परत चालु नको ना होऊस.. कुठला टॉपिक कुठे नेतेयस तु.. रोज का बाहेर राहील मी अस..? ती तर आज.. आय मिन ट्रिप बद्दल डिस्कस करत होतो.. उद्या जायच म्हटलं तर आजच डिस्कस करणार ना..

अनिता : पुर्ण दिवस सोडुन एवढ्या रात्रीच काय डिस्कस करायचं होतं तुला..

शौर्य : ते आमच्या रात्रीच लक्षात आलंना ग.. मग अचानक ठरलं.. म्हणुन मी अचानक गेलो.. 

अनिता : शौर्य घरात आता सगळे झोपलेत म्हणुन एवढ्या शांतपणे तुझ्यासोबत बोलतेय.. ह्यापुढे एवढ्या रात्री घराबाहेर अजिबात जायच 
नाही हा.. आणि जायच जरी झालं तरी आपल्या घरी आपली आई आणि मोठा भाऊ राहतो हे माहीतच असेल तुला.. त्यांना विचारून मगच जायच.. मी काय बोलली ते कळलं तुला??

शौर्य : हम्मम.. 

अनिता : जाऊन झोप उद्या 9 ची फ्लाईट आहे विरची.. 8 वाजता तरी ते लोक इथुन निघतील.. जाणार आहेस ना सोडायला त्यांना एअरपोर्टवर?? 

शौर्य : हम्मम... आणि मम्मा ते मी पण उद्या फ्रेंड्ससोबत आपल्या लोणावळाच्या फार्म हाऊसवर जायच विचार करतोय.. सँडेला येईल.. जाऊ ना??

अनिता : हम्मम.. 

थेंक्स मम्मा...लव्ह यु... अनिताला घट्ट मिठी मारतच तो बोलतो..

अनिता : हा पण उद्या सकाळी विरला एकदा विचार..

शौर्य : त्याला का विचारु आता..?? तु बोलतेयस ना जा. 

अनिता : फार्म हाऊस त्याच आहे.. त्याची किल्लीपण त्याच्याकडेच आहे.. आणि आज बोललास परत अस नाही बोलायच.. आत्तापर्यंत तुला हवं नको ते सगळं तोच बघत होता.. कधी गरज लागली तर विरच दिसतो ना तुला?? तसही तुझ्याशी मी नंतर बोलणारच आहे ह्या सगळ्यांवर.. आता ह्या क्षणाला खरच वाद नकोयत मला. सगळे झोपलेत घरी तु पण आता जाऊन झोप.. 

शौर्य काहीही न बोलता गप्प आपल्या रूममध्ये येतो..

दुसऱ्यादिवशी विराज आणि अनघाला सगळे बाय करत असतात.. 

रोहन : हे विर आणि वहिनी.. तुम्हां दोघांनाही हॅप्पी जर्णी.. मे बी तुम्ही दोघ रिटर्न याल तेव्हा आम्ही नसु इथे.. 

विराज : एवढ्या लवकर कुठे जातायत घरी..? रहाना अजुन थोडे दिवस.. मस्त एन्जॉय करा मुंबई..

अनघा : हो ना.. तुमचंच घर समजा अगदी आणि तसही कॉलेजला पण सुट्टीच आहे ना.. 

अनिता : शौर्य एकदा USA गेल्यावर पुढील तीन चार वर्षे तरी इथे येणार नाही तो.. थोडे दिवस रहाना अजुन..

राज : आंटी आम्हांला पण आवडलं असत.. पण घरी एक तर न सांगता इथे अचानक आलोय आम्ही.. नंतर तो USA वरून आला की येऊ आम्ही त्याला भेटायला..

टॉनी : हो ना.. आणि तुम्हां दोघांना हॅप्पी जर्णी.. (विराज आणि अनघाकडे बघतच टॉनी बोलतो)

विराज : थेंक्स.. बट तरी मला अस वाटत तुम्ही अजुन थोडे दिवस रहाव इथे.. 

रोहन : थेंक्स.. बट खरच अजुन नको. तुझा आमच्यावर राग नाही ना अजुन??

विराज : अजिबात नाही.. आणि तुम्ही सगळ्यांनी पुढे खुप शिका..  आतापर्यंत जेवढा अतरंगीपणा केलात तेवढा बस झाला.. आता खरच मोठे व्हा..

हो..( सगळे हसत एकत्रच बोलतात..)

रॉबिन : नशीब तुम्ही लोक इथेच आहे...

आर्यन : हे गाईज सॉरी आम्ही लेट झालो.. 

शौर्यचे मुंबईचे मित्रमंडळी धापा टाकतच तिथे येतच बोलतात..

अनघा : तुम्ही लोक असे पळत का आले..??

आर्यन : पाणी ..

विराज : काय झालं?? कोणी मागे लागलेलं की काय??

रॉबिन : थंड पाणी..

नैतिक : मला पण.. एकदम थंड पाणी..

सगळेच त्यांच अस वागणं बघुन एकमेकांकडे बघु लागतात..

काका येऊन सगळयांना पाणी देतात.. पाणी पिताच त्यांना बर वाटत.. 

विराज : पळत का आलात असे..??

आर्यन : आम्ही एअरपोर्टवर येतोयना सोडायला तुम्हा लोकांना.. म्हणुन..

विराज : हे अस??

आर्यन : मग काय करणार.. ह्या रॉबिनने लेट केला.. हा त्याच्या गाडीने आणणार होता आम्हांला म्हणुन आम्ही आरामात निघालो घरातुन.. ह्याच्या घरी जाऊन बघतो तर हा नुकताच अंघोळीला गेलेला.. पण ह्याची गाडी होती म्हणून आम्ही रिलॅक्स होतो.. 

नैतिक : पंधरा मिनिटं ह्याच्या गाडीतच बसलो आम्ही ह्याची गाडी कधी स्टार्ट होते त्याची वाट बघत. पण ती ह्याच्यासारखी पाहिजे तेव्हा चालुच झाली नाही..

प्रतीक : शौर्यला फोन लावला तर उचलत नव्हता.. ह्या रोहन आणि राजला पण फोन लावला पण ह्यांचा फोन लागतच नव्हता.. 

आर्यन : वृषभच्या ह्या वेळेला कानात पाणी गेलंल वाटत. फोन वाजुन तु उचलत नाहीस यार.. शॉ साठी घेतलाय का फोन??

रॉबिन : बहुतेक आर्यन तुझा नंबर बघुन उचलत नव्हता तो..

आर्यन : मला पण असच वाटत..

वृषभ : काहीही काय?? फोन वर्ती रूमवरच ठेवलाय मी.. चार्जिंग नाही त्यात..

टॉनी : मला करायचा ना फोन..

रॉबिन : मित्रा तु तर काही बोलुच नकोस.. भलताच कुठला नंबर दिलायस मला.. हॅलो टॉनी एवढं बोललो तर समोरचा माणूस मला कोणत्याही प्रकारच टॉनिक नकोय.. आणि ह्या पुढे कोणत्याही प्रकारचे प्रॉडक्ट वैगेरे विकायचे असतील तर ह्या नंबरवर फोन करू नका. एवढं बोलून माझं काहीही ऐकुन न घेता फोनच कट करून टाकला.. इज्जतच नाही काय..

(रॉबिन अस बोलताच सगळेच हसु लागतात)

विराज : मला तर करूच शकत होतात ना फोन.. मला का नाही केला फोन??

चौघेही एकमेकांकडे बघु लागतात..

रॉबिन : सुचलं नाही ते..

आर्यन : आता एवढे पाच पाच जणांचे नंबर लावण्यात आधीच वेळ फुकट गेला.. आम्हांला वाटलं तुम्ही लोक निघाले असाल.. जास्त वेळ वेस्ट न करता आम्ही पळतच आलो..

रोहन : मुंबईकरांना इंपोर्टन्ट गोष्ट नाही सुचत..

रोहन अस बोलताच सगळेच त्यांच्यावर हसु लागतात..

विराज : तरी लवकर आलात. पंधरा मिनिट आहेत तशी पण हा शौर्य किती वेळ लावतोय आज?? शौर्य... (विराज जोरातच त्याला आवाज देतो)

वृषभ : तो झोपुन होता. आम्ही त्याला उठवुनच खाली आलो.. येईलच तो.. फ्रेश होत असेल..

अनिता : रात्री दीड वाजता आलाय घरी.. मग कस लवकर उठेल तो..

विराज : कोण??

अनिता : शौर्य आणि कोण..  तुम्हा लोकांना एवढ्या रात्रीचं ट्रिप बद्दल डिस्कस करायचं होतं का?? आज सकाळी भेटुन पण डिस्कस करू शकत होतात ना तुम्ही..

रॉबिन : कोण आम्ही ..??

अनिता : मग कोण?? काल रात्री दीड वाजेपर्यँत शौर्य तुमच्या सोबतच होताना??

रॉबिन : हे तर आम्हांला तुमच्याकडूनच कळतंय..

अनिता : म्हणजे शौर्य तुमच्या सोबत नव्हता..??

आर्यन : आमच्यासोबतच होता.. हा रॉबिन सोडुन आम्ही सगळे होतो.. तुम्ही बोलतायत तस ट्रिपबद्दलच डिस्कस करत.. 

रॉबिन : आर्यन are you serious??

विराज : एक मिनिट.. शौर्य काल रात्री दीड वाजता घरी आलाय??

अनिता : मी UK च्या क्लाइन्ट सोबत फोनवर बोलत गेलरीत उभी होती.. तेव्हा तो घाईघाईत बाईक घेऊन कुठे तरी जाताना दिसला मला. मी फोनवर बोलत होती म्हणुन त्याला विचारु नाही शकली.. नंतर मी पण थोडं कामात बिजी होती.. काम होताच जवळपास एकच्या दरम्यान मी त्याच्यारूममध्ये जाऊन बघितलं तरी आला नव्हता तो.. मग इथे हॉलमध्येच बसून वाट बघत होती मी त्याची.. दीड वाजुन गेले तेव्हा तो आला.. (अनिता काल घडलेला प्रसंग विरला सांगु लागली)

विराज : रॉबिन तो तुमच्यासोबत होता??

रॉबिन : मी तर झोपलो होतो घरी.. आता हा आर्यन बोलतोय म्हणजे असेलच..

आर्यन : तो माझ्यासोबत होता.. (विराज एक संशयी नजरेने आर्यनकडे बघु लागला) माझ्यासोबत म्हणजे हा नैतिक, प्रतीक आणि महेश पण होता.. 

नैतिक : आणि रोहनपण होता.. हा वाला नाही इकडचा मुंबईवाला.. कालच आलाय ना गावावरून..

(नैतिक आर्यनची बाजु सावरतच बोलला)

विराज : नक्की??

नैतिक : तुला बोलायच काय आहे?? आम्ही खोटं बोलतोय..??

विराज : शौर्य आल्यावर कळेलच ते..

रॉबिन : मला का नाही सांगितलं तुम्ही??

आर्यन : मित्रा तुला नंतर बाहेर भेटल्यावर सांगतोना सगळं.. तुला का नाही सांगितलं ते.. ओके.??

विराज : काळ वेळ आहे का नाही.. नको त्या टाईमला नको ते डिस्कशन का करता.. आज सकाळी भेटुन पण करू शकत होते ना.. घरी कोण ओरडत नाही का तुमच्या?? एवढ्या रात्री घराबाहेर असता ते..

नैतिक : तुझ्या भावालाच विचार ते.. सगळा प्लॅन त्यानेच केलेला.. आम्ही फक्त तो बोलतोय म्हणुन त्याच्यासाठी तिथे होतो.. तो बघ आला..

गुड मॉर्निंग ऑल ऑफ यु.. शौर्य तिथे येतच बोलतो..

विराज : शौर्य रात्री दीड वाजेपर्यंत घराबाहेर थांबुन ट्रिपबद्दल डिस्कस करणं गरजेच होत का??

शौर्य : ए मम्मा तु सकाळ सकाळी काय कम्प्लेन्ट करत बसते ग माझी.. 

अनिता : काल केलेला पराक्रम कळायला नको का त्याला पण..

विराज : शौर्य दीड वाजता घरी यायचा टायमिंग असतो का?? (विराज रागातच त्याच्यावर ओरडतो)

शौर्य : विर अचानक आमच ठरलं रे.. म्हणजे हा रॉबिन..

अनिता : एक मिनिट..  रॉबिन तर बोलला तो नव्हता तुमच्यासोबत..

विराज : शौर्य तु नक्की ह्या लोकांसोबतच होतास ना..?? का दुसर कुठे गेलेलास.. खर काय ते सांगायच हा..

शौर्य : तेच सांगतोय मी विर.. हा रॉबिन सोडून..(शौर्य आर्यनकडे बघतो.. आर्यन विराजच्या नकळत अंगठा दाखवतच त्याला तु बरोबर बोलतोयस अस बोलतो.. ) हा रॉबिन सोडुन आम्ही सगळे डिस्कस करत होतो.. 

शौर्य आर्यनकडे बघतोय हे बघुन विराज लगेच आपली नजर आर्यनकडे फिरवतो.. तस आर्यन आपला अंगठा धरलेला हात केसांवर फिरवत दुसरीकडे बघु लागतो..

विराज : तुमचे काय इशारे चाललेत.. मला कळतील??

शौर्य : कुठे काय?? ते मी आर्यनला सांगतोय तुझ्यामुळे हे सगळं चाललंय.. ते त्यानेच प्लॅन केलेलंना म्हणुन.. तरी त्याला नको बोलत होतो मी काल. विर ओरडेल मला हे पण बोललो.. पण ऐकतच नव्हता तो.. वर बोलला जो विरचा ओरडा खायचा आहे तो मी खाईल.. हो ना आर्यन..

आर्यन : ए SD... तुला माझंच नाव सुचलं का..?? (आर्यन अस बोलताच विराज परत त्याच्याकडे बघु लागतो) आय मिन हा प्रतीक पण बोलत होता ना.. तु माझंच नाव कस घेतोस म्हणुन बोललो मी..

विराज : शौर्य ह्यापुढे रात्री दीड वाजेपर्यंत अस घराबाहेर अजिबात राहायच नाही हा.. आणि तुम्ही लोक पण.. एवढ्या रात्रीच ह्याला फोन करून तर अजिबात बोलवायचं नाही.. आणि शौर्य पॅरिसवरून येईपर्यंत मम्माकडुन परत मला तुझी कसली कम्प्लेन्ट वैगेरे नकोय.. कळल??

शौर्य मान हलवतच हो बोलतो..

विराज : आणि काल सांगितलेलं आहे ना लक्षात??

शौर्य : हो आहे लक्षात.. आणि विर आम्ही आज लोणावळा जायच प्लॅन करतोय..  तुझ्या फार्महाऊसवर.. जाऊ का?? तुला मी तिथे गेलेलं चालणार असेल तर...??

विराज : हम्म.. एन्जॉय कर.. आणि तुझा फार्म हाऊस नाही आपला फार्म हाऊस बोल.. ओके..?

शौर्य : ओके.. आपल्या फार्म हाऊसची किल्ली प्लिज??

विराज : माझ्या रूमच्या कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवली असेल.. नंतर घे तुझी तु.. 

अनघा : शौर्य प्लिज एवढ्या रात्रीच बाहेर नको जात जाऊस आणि काळजी घे तुझी.. तसही मला तुझ्याशी बोलायच आहे पण आम्ही पॅरिसवरून आल्यावर बोलूयात निवांतपणे.. आत्याची, आजीची आणि मम्मीची काळजी घे.. 

शौर्य : हम्मम.. 

आत्या : सांभाळुन जावा.. काळजी घ्या दोघांनी.. आणि पोहचल्यावर कळवा आम्हांला..

अनघा : हम्मम..

शौर्य आपल्या मित्रमंडळींना सोबत घेत विराज आणि अनघाला सोडायला एअरपोर्टवर जातो. एअरपोर्ट बाहेरच गाथा आणि तिची फेमिली उभी असते..

आपल्या फेमिलीला अस अचानक तिथे बघुन अनघाला खुप आनंद होतो.. ती गाडीतुन उतरून पळत जातच आपल्या फेमिलीला मिठी मारतच भेटते..

सर्वेश : दि कस वाटलं सरप्राईज??

अनघा : खुप छान..

गाथा : पोहचल्यावर कळव आम्हांला... काळजी घे.. आणि हॅप्पी जर्णी बोथ ऑफ यु..

विराज : थेंक्स.. सर्वेश आणि गाथा दोघांनीही आई आणि बाबांची काळजी घ्या. ओके...

सर्वेश : ते तर मी घेतच असतो जिजु.. तुम्ही माझ्या दि ची काळजी नीट घ्या.. 

सर्वेश अस गोड बोलणं ऐकुन सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक गोड अस हसु येत..

अनघा : ट्युशनला नीट जात जा.. मस्ती एकदम बंद.. ओके??

सर्वेश : हो ग दि..

गाथा : दि मी आहे लक्ष द्यायला त्याच्याकडे. तु नको टेन्शन घेऊस.. तु एन्जॉय कर..

अनघा : मंडे रिझल्ट आहे ना तुझा.. मला कळव फोन करून..

हम्मम्म.. अस बोलत गाथा शौर्यकडे बघते.. शौर्य एक गोड अशी स्माईल तिला देत तिच्याकडे बघतो.. 

सगळ्यांना बाय करत विराज आणि अनघा फायनली फ्लाईटमध्ये जाऊन बसतात..

आर्यन : हे सर्वेश आणि गाथा गुड मॉर्निंग.. तुम्ही लोक येतायत आमच्यासोबत लोणावळा..? आम्ही आज चाललोय..

सर्वेश : मला खर तर आवडलं असत.. बट माझे बोरिंग असे ट्युशन चालु झालेत.. मला नाही जमणार.. आणि ट्युशन सोडून पप्पा मला कुठे सोडणार पण नाहीत..

रॉबिन : एवढा अभ्यास नसतो करायचा रे..

(रॉबिन अस बोलताच गाथाचे आई वडील त्याच्याकडे बघु लागतात)

शौर्य : रॉबिन.. 12th ला आहे तो. प्लिज.. नको ते सजेशन देऊ नकोस त्याला.. सर्वेश तुझ्या दि ने काय सांगितलं लक्षात आहेना तुझ्या.. एकदम मन लावुन अभ्यास कर.. आऊट ऑफ इंडिया जायच असेल तर तस स्कॉरिंग पण लागत..

सर्वेश : ते तर मला मिळतीलच.

शौर्य : गुड.. (सर्वेश ला हाय फाय देतच शौर्य बोलतो)

आर्यन : गाथा तु तरी चल.. 

गाथा : मला पण आवडलं असत.. पण घरी पाहुणे आलेत.. आणि सर्वेशकडे पण थोडं लक्ष द्याव लागेल..  तुम्ही एन्जॉय करा.. आपण नंतर कधी तरी जाऊयात..

शौर्य : चला मग आम्ही पण निघतो.. लोणावळा चाललोय.. थोड्या वेळाने निघतोय.. 

गाथाचे वडील : सांभाळुन जावा.. 

शौर्य : हो..

सर्वेश : हॅप्पी जर्णी.. 

शौर्य : थेंक्स ड्युड..

सर्वेश : मग किती दिवस ट्रिप आहे तुमची??

शौर्य : संडे ईव्हीनींग घरी.. 

गाथा : ज्यो नाही आली.?

रॉबिन : तीच्या मामाला बर नाही.. ती तिच्या मॉम डॅड सोबत तिथे गेली..

गाथा : बर.. सांभाळुन जावा.. आणि मस्त पैकी एन्जॉय करा ट्रिप.. ओके..

ओके.. सगळे एकत्रच बोलतात..

गाथाच्या वडिलांच्या नकळत शौर्य गाथाला बाय करतो.. आणि ती त्याला..

सगळे गाडीत जाऊन बसतात..

आर्यन : लोणावळा जायच कधी ठरलं तुझं??

शौर्य : काल रात्रीच..

नैतिक : दीड वाजेपर्यंत होतास कुठे तु??

राज : म्हणजे हा तुमच्यासोबत नव्हता??

आर्यन : मी काल घरी गेल्या गेल्या झोपलो.. 

नैतिक : विर पॅरिसला जाता जाता ह्याला हॉस्पिटलमध्ये भरती वैगेरे करून जायला नको म्हणुन आम्ही सगळे खोट बोलत होतो..

रोहन : कसले भारी आहे यार तुम्ही.. शौर्य मगाशी वाचलास तु ह्या लोकांमुळे..

शौर्य : आत्ता पर्यंत ही लोकच वाचवत आलीत मला.. पुढे पण असेच वाचवत रहा.. 

नैतिक : डायलॉग मारन बंद कर आणि होतास कुठे दीड वाजेपर्यंत ते आधी सांग..

शौर्य : मला दहिवडे खावेसे वाटत होते.. म्हणून गाथाच्या घरी गेलेलो..

रोहन : ए शौर्य एवढ्या रात्री तु तिच्या घरी गेलेलास?? कोणी बघितलं तर..??

शौर्य : घरी म्हणजे तस घरी नाही.. तिला घराबाहेर बोलवलं.. तिने माझ्यासाठी आणलेले दहिवडे खाल्ले नि आलो..

रॉबिन : ए शौर्य तु सिरियसली USA टाईम फॉलो करतोस का?? अरे मित्रा इथे खरच रात्र असते त्या टाईमला.. तुला एवढ्या रात्रीच तिला भेटताना तिच्या घरी कोणी बघितलं असत तर??

शौर्य : नाही ना बघितलं पण.. तु आता विर सारख लेक्चर नको देत बसुस यार.. 

वृषभ : शौर्य तो सिरियसली काही तरी बोलतोय. एवढ्या रात्री जायची खरच गरज होती का..?  जर खरच तिच्या घरी कोणी बघितलं असत तर?? खुप इस्यु झाले असते. नको नको ते विचार करायला लागले असते तुझ्याबद्दल.. कळतंय तुला??

शौर्य : तुम्ही ज्या गोष्टी नाही झाल्यात त्याबद्दल का डिस्कस करतायत.. ज्या गोष्टी आता घडणार आहेत त्याबद्दल डिस्कस कर.. आता आपण लोणावळा जातोय.. त्याबद्दल डिस्कस करा.. कोण कोण येतय लोणावळा ते बघा.. सँडे ईव्हीनींगला आपण इथे येतोय.. 

आर्यन : आपण बॉईज लोकच जाऊयात यार.. गाडीत जागा नाही होत.. त्यात रॉबिनची गाडी खराब आहे..

शौर्य : विरची गाडी आहे ना आपल्याकडे.. गाडीच टेन्शन नको घेऊस.. आपल्या ग्रुपवर टाकुन बघ कोण कोण येतंय ते.. 10 वाजता निघतोय आपण.. 

नैतिक : दोन दोन गाड्या नको.. ह्या गाडीत जेवढे बसतील तेवढेच जाऊयात.. आता आपण आहोत तेवढेच जाऊयात.. बाकीचे जाऊदेत.. रोहन कालच गावावरून आलाय तो येणार नाही.. महेश पण आज त्याच्या बहिणीकडे जाणार आहे तो पण येणार नाही.. 

प्रतीक : मला नैतिकच म्हणणं पटतय आपण लोकच जाऊयात..

रॉबिन : मला पण असच वाटत..

सगळेच एकमेकांच्या बोलण्यावर होकार दर्शवतात..

आपापल्या बेगा भरून लोणावळा फार्म हाऊसवर जायला निघतात.. शौर्य आपल्या सोबत आपल्या ब्रूनोला पण घेऊन जातो..

दोन दिवस मस्त पैकी मज्जा मस्ती करतात.. शौर्य मज्जा मस्ती सोबतच गाथाला सुद्धा वेळ देत होता. तिच्यासोबत तिला वेळ असेल तेव्हा फोनवर बोलणं, चॅटिंग करणं हे सगळं चालुच होत त्याच.. सोबतच आपल्या ब्रूनोची पण काळजी तो घेत असतो आणि अश्यातच संडेचा दिवस उजाडतो.. 

सगळे आपापल्या बेगा भरत पुन्हा मुंबईला यायला निघतात.

रोहन, राज आणि टॉनी एकमेकांसोबत काही तरी बोलत असतात.. 

रॉबिन : गाईज शेम ऑन यु..

रोहन : काय झालं??

रॉबिन : आमच्या मागुन आमच्याबद्दल अस बेक बिचिंग का करताय यार. जे आहे ते सामोरा समोर बोला ना.. 

राज : ए रॉबिन काहीही काय असत तुझं??

रोहन : बेक बिचिंग का करू.. कालची उतरली नाही का काय तुझी??

रॉबिन : ए हॅलो मी घेतलीच नाही काल..

टॉनी : फक्त टेस्ट करत होतास का मग??

रॉबिन : तसच काहीस..

शौर्य : रॉबिन ह्यासाठी तु गर्ल्स नको बोललास का?? म्हणजे ज्यो ला कळणार नाही. 

रॉबिन : ए शौर्य दारू वैगेरे नाही घेतली फक्त वाइन घेतली यार.. तस पण चर्चमध्ये आम्ही घेतो कधी कधी.. टॉनीला विचारू शकतोस खोट वाटत असेल तर..

शौर्य : टॉनीला कश्याला ज्योला विचारेल मी ते.. आणि तुम्हा तिघांच काय चालु आहे?? चला बसा बघु गाडीत.. 

रोहन : शौर्य आम्ही निघतोय इथुनच.. डॅड मिस करतोय मला.. आणि मला पण त्याच्याशिवाय अजून इथे नाही जमत यार रहायला.. 

राज : मला पण एका लग्नाला जायचंय रे.. तु USA वरून आलास ना की आम्ही परत येतो तुला भेटायला.. 

टॉनी : प्लिज जाऊ दे आता आम्हांला.. प्लिज.. 

आर्यन : अजुन रहा ना थोडे दिवस.

रोहन : तुम्ही लोक या ना दिल्लीला.. मस्त एन्जॉय करूयात तिथे पण.. मी फिरवतो तुम्हाला दिल्ली..

आर्यन : गाईज नेक्स्ट व्हेकेशन दिल्लीत.. 

रोहन : पक्का???

रॉबिन : एकदम पक्का..

शौर्य : तुम्ही लोक खरच चाललात??

राज : ए शौर्य समजुन घेना.. प्लिज..

शौर्य : हम्मम.. मी तिकीट बुक करतो तुमचं..

राज : आमचं आम्ही करतो.. तु राहू दे.. आधीच खूप खर्च केलायस तु आमच्यावर..

शौर्य : राज मैत्रीत अस पैस्यांचा हिशोब काढला ना तर मला खुप राग येतो हा..  मुळात तुमचा महत्वाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी खर्च केलात.. त्याच्यापुढे मी केलेल्या खर्चाला काहीच वेल्यु नाहीरे.. तसही मी सांगतोय तुम्हांला मी तुमच तिकीट बुक करतोय.. मी विचारत नाही आहे.. 

राज : हे मीच शिकवलय ना तुला.. दिल्लीत असताना.

शौर्य : हो का?? आणि तुच विसरलास.. 

रोहन : वय झालं रे त्याच.. होत अस कधी कधी.. समजुन घे.

(सगळे राजकडे बघत हसु लागतात)

शौर्य तिघांच तिकीट बुक करतो. सगळे त्यांना सोडायला एअरपोर्टवर जातात..

फायनली तिघे आपापल्या घरी जायला निघतात..

वृषभ, शौर्य, राज, टॉनी आणि रोहन एकत्रच गळे मिळतात.. एकमेकांपासून परत लांब जाणार म्हणुन खुप रडु येत असत सगळ्यांना..

शौर्य : काळजी घ्या.. कधी गरज लागली की बिनदास्त सांगा. ह्या वृषभसारख नका करू. खुप मिस करेल मी तुम्हांला.. 

राज आणि टॉनी मज्जा मस्ती करतच आयुष्य जगा.. पण तेवढाच सिरियसली अभ्यास पण करा रे.. खुप मोठे व्हा लाईफमध्ये.. असच येत जावा भेटायला.. 

रोहन एक शेवटच ऐक.. प्लिज ड्रिंक घेणं बंद कर.. खुप जास्त ड्रिंक करतोस यार तु.. ह्या दोन दिवसात तुझे सगळे नकरे बघतोय मी.. थोडं करिअरकडे लक्ष दे.. आणि काही तरी वेगळं कर.. जे तुला खुप आवडत ते.. खुप हुशार आहेस तू.. फक्त ती हुशारी तुला जे आवडतना त्यात दाखव.. आणि अजुन एक.. खुप छान कोणीतरी तुला नक्की भेटेल जी तुझ्यावर तुझ्यासारख प्रेम आणि विश्वास ठेवणारी असेल.. ओके.. पण प्लिज ड्रिंक घेणं बंद कर.. प्लिज..प्लिज आणि खरच प्लिज.. माझ्यासाठी..

रोहन : फक्त तुझ्यासाठी आज पासून ड्रिंक घेणं एकदम बंद.. आठवण आली की फोन करत जाईल मी तुला.. तस तर रोजच आठवण येईल तुझी.. पण घाबरू नकोस रोज नाही करणार फोन..

शौर्य : बस काय रोहन.. तुला जेव्हा माझ्याशी बोलवस वाटलं तेव्हा फोन कर.. मला आठवण आली की मी पण करत जाईल.

रोहन : वृषभ काळजी घे मित्रा.. जॉब नीट कर.. तुला पण खुप मिस करेल यार.. बघु परत अस एकत्र कधी भेटता येतंय ते.. 

राज : वृषभ प्लिज कधी काही गरज लागली की आम्हाला फोन कर.. आता वागलास तस नको वागुस..

टॉनी : हो ना.. शौर्य नसता तर तु बोललाच नसतास..

वृषभ : मी पण खुप मिस करेल यार तुम्हा सगळ्यांना.. 

परत सगळे एकमेकांना रडतच मिठी मारतात..

रॉबिन : ए गाईज.. आम्हाला पण भेटा यार. 

आर्यन : आम्ही पण मिस करू तुम्हाला..

रोहन : शौर्य सिरियसली खुप छान आहेत रे तुझे हे मुंबईचे मित्र.. मला आपले हे कॉलेजग्रुपमध्ये सोडले की कोणी एवढ छान नाही भेटलरे.. तुम्हांला पण मी खुप मिस करेल गाईज.. तुम्ही पण आमचे खास मित्र झालात.. आठवण आली की मी फोनसुद्धा करेल तुम्हांला.. तस पण नेक्स्ट व्हेकेशन येतायत ना दिल्लीत??

नैतिक : तुझ्यासाठी काही पण मित्रा..

नैतिक अस बोलताच रोहन हसु लागतो..

रोहनच्या फ्लाईटची अनाऊन्समेंट होते..

सगळ्यांना तो मिठी मारतो.. आणि शेवटी वृषभ आणि शौर्यला..

रोहन : तुला माहिती ना मी खूप चूका करतो रे लाईफमध्ये.. पण खरंच रे मुद्दामुन नाही करत रे मी चुकुन होतात माझ्याकडुन.. पण परत अस कधी झालं तर तुझा समजुन माफ करत जा यार मला.. मला लांब नको करुस तुझ्यापासुन.. आणि परत एकदा सॉरी तुला..

शौर्य : रोहन प्लिज झालं गेलं नको ना आता काढुस.. आपण लवकरच भेटु परत.. तुला कधीही माझी गरज लागली तर फोन कर.. तुझ्यासाठी तु बोलशील तिथे हजर असेल मी. तु बोलशील ते करेल तुझ्यासाठी फक्त ते बिअर वैगेरे पियायला नको सांगुस म्हणजे झाल..(शौर्य अस बोलताच रोहनच्या चेहऱ्यावर हलकेच अस हसु येत) अस हसताना छान दिसतोस तु.. लव्ह यु.. आणि काळजी घे.. 

रोहन : लव्ह यु 2 यार.. शौर्य आणि गाथा खरच परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.. खूप प्रेम करते तुझ्यावर.. शेवट पर्यंत असेच एकत्र रहा. सिरियसली यु गाईज मेड फॉर इच अदर.. तिला पण विचारलं म्हणुन सांग.. आणि बाय म्हणुन पण सांग..

शौर्य : थेंक्स..

रोहन : वृषभ काळजी घे. गरज लागली की प्लिज सांग.. मी असेल तुझ्यासोबत.. एकट नको समजुस स्वतःला.. तु एक फोन कर तुझ्यासाठी मी लगेच हजर रहातो की नाही बघ.. खूप मोठा हो..

वृषभ सुद्धा रोहनला मिठी मारत रडतो..

राज आणि टोनी मी तुम्हांला पण मिस करेल.. तस पण तुम्ही दिल्लीत येणारच आहात शिकायला.. भेटत राहू आपण..

रोहन आपली बेग चॅक करत आत जातो.. सगळे त्याला हात दाखवतच बाय करत असतात.. थोडं पुढे गेल्यावर तो मोठ्याने ओरडतो.. ए मुंबईकर.. यु ऑल आर रॉक मॅन.. आय लव्ह यु गाईज.. एन्ड खुप मिस करेल मी तुम्हांला.. बाय.. 

व्ही लव्ह यु 2 रोहन.. शौर्य सोबत त्याची इतर मित्र मंडळी एकत्र ओरडतच त्याला बोलतात.. एअरपोर्ट वरचे सगळे त्या लोकांकडे बघत असतात.. 

आणि फायनली रोहन सगळ्यांना बाय करत तिथुन निघून जातो..

राज आणि टॉनीची फ्लाईट वेगवेगळी असते पण सेम टायमिंगला असते.. ते सुद्धा सगळ्यांना मिठी मारतात.. शौर्यला परत एकदा सॉरी बोलतात..

शौर्य : गाईज सांभाळुन जावा.. आणि खुप मोठे व्हा.. काही तरी मोठं स्वप्न बघा.. आणि ते पूर्ण करायच्या मागे पळा.. असेच सगळ्यांना हसवत रहा.. आणि तुम्ही पण खुप हसत रहा.. भेटुच आपण लवकर.. पोहचल्यावर मला कळवा..

फायनली राज आणि टॉनीसुद्धा तिथून निघुन जातात..

तिघ मित्र आपापल्या घरी गेल्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटत असत..

रोहन गेल्यामुळे शौर्यला आणि वृषभला खुप जास्त वाईट वाटत असत.. 

दोघेही गाडीत शांत बसुन असतात.. रॉबिन गाडी ड्राइव्ह करत असतो.. शौर्य आणि वृषभ एकटक खिडकी बाहेर बघत काही तरी विचार करत असतात..

रॉबिन : तुम्ही दोघ अस तोंड नका ना पाडू यार.. आज ना उद्या ते लोक त्यांच्या घरी जाणारच होते ना.. 

शौर्य : रोहनची काळजी वाटतेरे.. राज आणि टॉनी सोबत त्यांचे मम्मी पप्पा आहेत.. त्यांची फॅमिली आहे त्यांना हवं नको ते बघायला. त्यांच नाही एवढ काही वाटत.. रोहनला समजुन घेणार कोणी नाही तिथे.. जी होती तिने पण कधीच त्याला समजुन नाही घेतल. त्यात त्याचा डॅड पण जास्त त्याच्यासोबत नसतो.. तेव्हा हा वृषभ आणि बाकी मंडळी होती.. आता परत एकटा आहे तो.. वेड्यासारखं काहीही करतो यार तो. कोणतीच गोष्ट विचार करून करतच नाही तो कधी.. 

वृषभ : आपण रोज व्हिडीओ कॉल करत जाऊ त्याला.. सकाळच तु कर.. रात्रीच मी करत जाईल.. त्याला तो एकटा आहे अस फील नाही होणार..

आर्यन : अधुन मधुन आम्ही पण करत जाऊ व्हिडीओ कॉल.. तस बघायला गेलं तर आमचा पण खास मित्र झालाय तो.. मस्त आहे पण..

शौर्य : खुप छान आहे तो.. पैसा, प्रॉपर्टी वैगेरे सगळं आहे त्याच्याकडे.. पण माझ्यासारखच.. फॅमिली नाही त्याला.. तो पण माझ्यासारखच मित्रांमध्ये प्रेम शोधत रहातो.. मला तर विर आणि तुम्ही लोक होते म्हणा त्याच ते पण नाही ना.. 

रॉबिन : तु आम्हाला रडवायच ठरवलंस का??

शौर्य : नाही रे बट सिरियसली रोहनची काळजी वाटते रे.. 

रॉबिन : आम्ही बोललो ना आम्ही पण करत जाऊ त्याला फोन.. रोज कॉल करून सतवत जाऊ त्याला... मग तर झालं..

आर्यन : हो ना.. जीसका कोई नाही उसके लिये हम ही सही..

वृषभ : क्या बात हे आर्यन.. एक नंबर..

आर्यन : बस काय मित्रा तुला आवडलं ना.. तुझ्यासाठी काय पण.. बाय दि वे वृषभ तु ऑफिस कधीपासून जॉईंट करतोयस??

वृषभ : उद्या पासून..

शौर्य : रॉबिन आपण मॉलमध्ये जातोय.. मस्त पैकी थोडं फिरू तिथे.. थोडी शॉपिंग करू, डिनर करून मग घरी जाऊयात.. 

रॉबिन : आत्ताच तर शॉपिंग केलीस ना तु?? अजून किती करतोस..

शौर्य : माझ्यासाठी नाही रे.. ह्या वृषभसाठी.. ऑफिसमध्ये घालायला छान छान कपडे नकोत का?? 

वृषभ : शौर्य पण मी माझ्या पैस्यांनी शॉपिंग करेल.. तु अजिबात पैसे देणार नाहीस.. मला पप्पांनी दिलेत पैसे.. त्यातुन मी थोडे कपडे घेईल. थोडे पेयमेंट आल्यावर घेईल..

शौर्य : अजुन??

वृषभ : इथे जवळपास हॉस्टेल आहे का?? 

शौर्य : माझ्याच घरी रहा ना.. हॉस्टेल मध्ये का रहातोस तु.. माझ्या घरचे कोणी काही बोलणार नाहीत तुला.. कायमच राहू शकतोस तु.. आणि मुळात माझं घर असताना तु इतर कुठे कश्याला रहातोस..

वृषभ : शौर्य प्लिज यार.. समजुन घे.. मी अजुन नाही राहू शकत रे तुझ्या घरी. इथे जवळपास हॉस्टेल नाहीतर PG असेल तर सांग.. मी तिथे राहील..

आर्यन : मग माझ्या घरी चल. आमच्या वरची रूम खालीच आहे.. माझी मम्मा जेवण पण देत जाईल तुला..

वृषभ : तु पैसे घेणार असशील तर.. किती होतील महिन्याचे ते तु तुझ्या घरी विचारून मला सांग.. मला अफॉरडेबल वाटत असेल मगच मी येईल..

आर्यन : रूम तशीही खालीच होती म्हणजे आम्ही कधीच कोणाला भाड्याने वैगेरे पण नाही दिली.. जास्तीच सामान आम्ही त्या रूममध्ये ठेवलेलं.. माझ्या सिस्टरची 12th आणि माझी टी वाय होती. अभ्यासासाठी म्हणुन डॅडने ती खाली केली. तु फ्री मध्ये राहू शकतोस.. आणि माझी मम्मी जेवनाचे पैसे वैगेरे पण नाही घेणार रे. ह्या SD ला विचार.. 

वृषभ : मग राहू दे. मी दुसरीकडे बघतो.. 

रॉबिन : तुला काल अंबानी वैगेरे भेटलेला की काय?? तो बोलतोय ना रहा तिथे मग का नकरे करतोय तु.. नाही तर माझ्या घरी चल.. 

नैतिक : माझ्या घरी पण राहू शकतोस तु.. बिनदास्त..

प्रतीक : आणि माझ्यापण..

वृषभ : मला कोणाच्याच घरी फुकट म्हणुन नाही रहायच.. मी गरीब आहे पण स्वाभिमानी आहे यार.. मला फुकट नकोय कोणाच.. माझ्या घरच्यांना पण नाही आवडणार अस फुकट कोणाकडे मी राहिलो तर.. प्लिज..

शौर्य : आर्यन एकदा घरी बोलून बघ.. तुझी मम्मा असताना मला ह्याच कसलंच टेन्शनच नाही रहाणार मग. 

आर्यन : जास्तच स्वाभिमानी आहे यार हा. 

शौर्य : मला पण हल्ली हल्लीच कळलं ते. तु विचारशीलना घरी..

आर्यन : ए तुला माझ्या घरचे कसे आहेत माहिती.. जर पैसा कमवायचा असता तर आम्ही वरची रूम भाड्याने नसती का दिली.. तुला माहिती ना मम्मी कशी आहे.. ती नाही रेडी होणार यार अस पैसे घेऊन ह्याला ठेवायला.. फुकट राहु शकतो ना. आणि एवढं सांगुन पण जर तु मला माझ्या घरी विचार म्हणुन सांगणार असशील तर SD तु स्वतः ये आणि घरी विचार. माझे मम्मी पप्पा माझा स्वाभिमान बाहेर काढायचे मी अस काही विचारायला गेलो तर..

वृषभ : जर मला फुकट रहायच असत तर मी शौर्य तुझ्याकडेच राहिलो असतो ना.. राहू दे आर्यनच घर.. मी गुगल करतो.. PG मध्ये रहाणारे असतील खुप जण.

शौर्य : ए वृषभ जरा दोन दिवस तर दे मला.. अजुन दोन दिवस तर तु राहू शकतोस ना माझ्या घरी.. मी उद्या आर्यनकडे जातो.. त्याच्या मम्मीसोबत बोलतो.. ओके..??

वृषभ : हम्मम बट..

पैसे घेणार असतील तर.. सगळे एकत्रच त्याला बोलतात..

तस वृषभ हसु लागतो..आणि सोबत बाकी सगळेच..

सगळे मस्त पैकी मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करतात.. आणि आपापल्या घरी जातात..

वृषभ आणि शौर्य एकमेकांसोबत बोलतच घरी येतात.. शौर्यची मम्मा आणि आत्या जेवत असतात..

अनिता : आलात तुम्ही लोक.. बाकीची मंडळी कुठे आहेत??

शौर्य : ते गेले घरी..

अनिता : थोडे दिवस अजुन राहिले असते ना..

शौर्य : नाही ना ऐकत होते.. तुम्ही दोघ एवढ्या लेट का जेवतायत..??

आत्या : आजीला थोडं बर वाटत नव्हतं.. जस्ट डॉक्टर येऊन तिला तपासुन गेलेत..

शौर्य : काय झाल??

आत्या : थोडं श्वास घ्यायला त्रास होत होता.. आता ठिक आहे.. डोन्ट वरी.  तुम्ही दोघ या बघु जेवायला बसा..

वृषभ : थेंक्स बट आम्ही डिनर करून आलो..

आत्या : ट्रिप कशी होती??

शौर्य : एक दम मस्त..

आत्या : चेहऱ्यावरून तर दोघे खुप दमलेले दिसतायत मला.. 

वृषभ : हम्मम

आत्या : आराम करा मग.. गुड नाईट..

गुड नाईट.. दोघेही एकत्रच बोलतात.. आणि आपापल्या रूमवर जायला निघतात..

अनिता : शौर्य तु तिकीट बुक कधी करतोयस?? USA जायच आहे ना??

शौर्य : मम्मा ते मी नंतर तुझ्या रूममध्ये येतो.. 

अनिता : हे तु गेल्या पाच सहा दिवसांपासुन मला बोलतोयस..

शौर्य : तुझ जेवुन झालं की येतो ग..

अस बोलत शौर्य आपल्या रूममध्ये जातो.. वृषभच्या शॉपिंग बेग तो चुकुन आपल्यासोबत आपल्या रूममध्ये घेऊन आला असतो.. फ्रेश होऊन तो वृषभच्या रूममध्ये जातो त्याच्या शॉपिंग बेग त्याला द्यायला.. शौर्य रूममध्ये येताच वृषभ रोहन, राज आणि टॉनीला व्हिडीओ कॉल लावतो.. खुप वेळ एकमेकांसोबत गप्पा गोष्टी करत असतात.. जणु खुप वर्षांनी आपण भेटलोय असा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर असतो..

इथे अनिताच जेवुन होताच ती आपल्या रूममध्ये जाऊन शौर्यची वाट बघत रहाते.. लॅपटॉपमध्ये काम करतच ती अधुन मधुन घड्याळात बघत असते.. बारा वाजत आले असतात तरी शौर्य काही येत नाही.. शेवटी ती रागातच त्याच्या रूममध्ये जाऊन बघते.. पण शौर्य रूममध्ये पण नसतो.. परत हा मुलगा घरी काहीही न सांगता बाहेर गेला असा विचार करत ती त्यादिवशी सारखच लॅपटॉप हातात घेत खाली हॉलमध्ये येऊन शौर्यची वाट बघत बसते..

शौर्य वृषभ आणि इतर मित्रमंडळींसोबत गप्पा गोष्टी आटोपुन स्टेरकेजवर त्याच्या नेहमीच्या जागेवर बसुन गाथा कधी मॅसेज करते ह्याची वाट बघत असतो.. आणि फायनली गाथाचा मॅसेज येतो..

गाथा : हॅलो स्वीट जान..

शौर्य : तुझ्या ह्या गोड अश्या मॅसेजची मी कधी पासुन वाट बघतोय ग..

गाथा : सॉरी... खुप उशीर झाला ना मला. एकच्युअली ते मी दि आणि जिजूंसोबत बोलत होती.

शौर्य : हम्मम... आपण मॅसेजवर बोलण्यापेक्षा कॉलवर बोलुयात आता.?? तुला चालणार असेल तर.

आपल्या ह्या मॅसेजवर गाथा काय रिप्लाय देते ह्याची वाट शौर्य बघत असतो.. नेहमीप्रमाणे गाथाचा मॅसेज न येता डायरेक्ट कॉलच येतो त्याला..

शौर्य : सॉरी..  मी तुला खुप त्रास देतो ना?? पण तुझा आवाज ऐकल्यावर खुप छान वाटत मला. 

(शौर्य फोन उचलल्या उचलल्या गाथाला बोलतो..)

गाथा : तुला चालणार असेल तर आपण कॉलवरच बोलत जाऊयात रोज..

शौर्य : मला तर खुप आवडेल..

गाथा : तु उद्या माझ्यासोबत माझ्या कॉलेजमध्ये येशील?? जर तुला वेळ असेल तर..

शौर्य : तुझ्यासाठी तर वेळच वेळ आहे माझ्याकडे.. तु बोलशील तिथे तुझ्यासाठी मी हजर असेल राणी सरकार..

गाथा : डायलॉग छान आहे..

शौर्य : गाथा मी सिरियसली बोलतोय ग... बाय दि वे किती वाजता येऊ तेवढं सांग??

गाथा : साडे दहा वाजता.. 

शौर्य : ओके.. आणि उद्याचा कलर??

गाथा : तु ठरव ना.

शौर्य : तुझा स्पेसिअल डे आहे तु ठरव..

गाथा : स्पेसिअल डे दिवशी तु स्पेसिअली सोबत असणारना माझ्या मग तुच ठरव.. प्लिजजज्ज..

शौर्य : नेव्ही ब्ल्यु चालेल??

गाथा : ओके...

शौर्य : मी तुला पिक अप करू?? म्हणजे घराजवळ नाही येत घाबरू नकोस.. घरापासुन थोडं लांब.. तुला चालणार असेल तर..

गाथा : ओके.. मग लास्ट टाईम जिजु आम्हांला जिथुन पीक अप करायचे तिथेच भेटुयात आपण.. मग 10 वाजेपर्यत ये तिथे.. मी वाट बघते तुझी..

शौर्य : डन..

गाथा : रोहन वैगेरे नीट पोहचले ना घरी??

शौर्य : हो...

गाथा : मिस करत असशील ना त्यांना??

शौर्य : खुप..

गाथा : फोन करायचा ना मग..

शौर्य : जस्ट व्हिडीओ कॉलवर बोललो आम्ही सगळे.. तरी आठवण हि येणारच ना ग.. बाय दि वे विर आणि वहिनी कसे आहेत??

गाथा : एन्जॉय करतायत.. फ्रायडे मॉर्निंग येतील ती लोक.. तु आज फोन नाही केलास का??

शौर्य : आज पूर्ण दिवस बिजी होतो ग.. उद्या करेल.. तसही तुझ्याकडुन कळलं ना ते लोक खुश आहेत ते.. अजुन मी फोन केला तर उगाच डिस्टरब होईल दोघांना...

गाथासोबत गप्पा मारत शौर्य तिथेच बसतो.. जवळपास दिड वाजुन जातो.. तस तो फोन ठेवुन स्वतःच्या रूममध्ये जाऊन झोपतो.. इथे अनिता शौर्यची वाट बघत खाली हॉलमध्येच सोफ्यावर डोकं टेकुन झोपते..

सकाळी 8 वाजता वृषभ शौर्यच्या रूममध्ये येतो.. शौर्य अगदी गाढ झोपला असतो.. त्याला उठवतच तो त्याला मी निघतो अस सांगतो..

शौर्य : थांब मी तुला सोडायला येतो..

वृषभ : तु झोप. माझं मी जातो.. तु फ्रेश व्हायला एक तास घेशील. मला लवकर बोलवलंयरे आज.. डॉक्युमेंट द्यायचेत ना..

शौर्य : तुझा आज पहिला दिवस आहे ना. मी येतो तुला सोडायला.. अंघोळ वैगेरे मी घरी येऊन करेल. फक्त तोंड तरी धुवु दे.. तसही मी वर्ती तुला सोडायला नाही येणार.. खाली गेटजवळ तुला सोडेल आणि मी रिटर्न येईल..

वृषभ : तु का एवढा त्रास करून घेतोयस.. मी जाईल..

शौर्य : तुला मी नकोय सोबत तर सांग तस..

वृषभ : तस नाही रे.

शौर्य : तु माझ्याशी बोलण्यात तुझा आणि माझा अस मिळुन आपल्या दोघांचा वेळ वाया घालवतोयस.. खाली जाऊन ब्रेकफास्ट कर.. मी आलोच..

वृषभ : नाही नको ब्रेकफास्ट.. 

शौर्य : का?? काय झालं??

वृषभ : टेन्शन आलय थोडं.. ते पहिलाच दिवस आहे ना आज.. मला खरच भुक पण नाही.. प्लिज फोर्स नको करुस आज. तु पटकन फ्रेश हो बघु..

शौर्य : ओके..

शौर्य पटकन फ्रेश होतो.. आणि वृषभला ऑफिसमध्ये सोडतो..

शौर्य : बेस्ट ऑफ लक.. 

वृषभ : थेंक्स..

शौर्य : ए वृषभ घाबरू नकोस ना अस बिनदास्त रहा.. आणि केंटींग आहे.. भूक लागली की खाऊन घे तिथे.. मी फोन करेल तुला.. ओके.. आणि नीट काम शिकुन घे.. 

वृषभ शौर्यला एक घट्ट अशी मिठी मारतच पुन्हा एकदा थेंक्स बोलतो आणि आत निघुन जातो..  शौर्य तो आत जाईपर्यंत त्याला बघत असतो.. तोच गाथाचा नेहमीप्रमाणे त्याला मॅसेज येतो.. सोबतच तिचा कॉफीचा कप हातात घेऊन एक छानसा फोटो ती शौर्यला पाठवते.. शौर्यपण बाईकवर बसून आपला एक सेल्फी घेत तिला पाठवतो..

गाथा : तु निघालास की काय?? आणि नेव्ही बक्यु बोललेलास ना?? मग व्हाईट शर्ट??

शौर्य : अग ते वृषभला ऑफिसमध्ये सोडायला आलेलो ग.. त्याचा आज 1स्ट डे आहे ना ऑफिसमधला.. आता घरी जाईल... फ्रेश होईल मग काल सांगितल्या प्रमाणे नेव्ही ब्ल्यु कलरच शर्ट घालेल.. आणि मग माझ्या स्वीट अश्या जान ला भेटायला येईल.. ओके..

गाथा : ओके.. मी वाट बघेल तुझी 10 वाजता आपल्या ठरलेल्या ठिकाणी.. 

शौर्य मोबाईल खिश्यात ठेवतच बाईकला किक मारतच बाईक आपल्या घराच्या दिशेने पळवतो.. जवळपास 2 दिवसांनी दोघेही एकमेकांना भेटणार असतात. जणु आपण दोन वर्षांनी एकमेकांना भेटतोय एवढा आनंद दोघांना झालेला. 

गाथा आज तैयार व्हायला थोडं जास्तच टाईम घेत असते. वारंवार केसांवरून कंगवा फिरवत ती एकटक आपलं आरश्यात दिसणार रूप न्याहाळत होती.. हातात आपलं नेहमीच घड्याळ घालतच ती त्यात टायमिंग बघत असते.. कधी 9.50 होतायत आणि आपण घरातुन निघतोय अस तिला झालं असत.. पण तिच्या हिशोबाने आज घड्याळ अगदी हळु पळत होत.. ती नाराज होतच घड्याळाकडे बघत होती.. आत्ताशी सव्वा नऊच होत होते..

इथे शौर्य पटकन आपली अंघोळ वैगेरे आटोपुन गाथाला सांगितल्याप्रमाणे नेव्ही ब्ल्यु कलरचा शर्ट घालत तो ही आरश्यात आपण कसे दिसतोय हे आरश्यात बघत बसतो. हातात जेल घेत आपले केस सेट करतच बाजुलाच असलेला परफ्युम आपल्या शर्टावर फवारत, हातात घड्याळ घालतच तो त्यात टाईम बघतो.. साडे नऊ वाजले असतात.. 

बाईकची की घेत तो रूमबाहेर पडणार तोच अनिता आपल्या हाताची घडी घालत त्याच्या समोर उभी रहाते.. तिच्या डोळ्यांत आपल्या बद्दलचा राग त्याला स्पष्ट दिसत असतो.

त्याचा हात पकडत ती त्याला परत त्याच्या रूममध्ये घेते.. आणि दरवाजा लावुन घेते..

अनिता : परत काल रात्री कुठे गेलेलास शौर्य??

शौर्य : कुठे जाऊ?? घरीच तर होतो..

अनिता : शौर्य डोन्ट लाय.. तु रूममध्ये नव्हतास.. किती वाजता आलायस घरी तु.. 

शौर्य : अग मम्मा मी घरीच होतो. वृषभसोबत त्याच्या रूममध्ये.. 

अनिता : काल काही तरी डिस्कस करायला तु माझ्या रूममध्ये येणार होतंस..

शौर्य : विसरलो.. सॉरी.. बट मम्मा मी बिजी आहे ग आता. आपण नंतर बोलुयात ना.. प्लिज.. 

अनिता : अजिबात नाही.. तु माझ्याशी नीट काय ते बोलल्या शिवाय ह्या रूमबाहेर अजिबात पडणार नाहीस हा.. 

शौर्य हातातील घड्याळात बघतो तर 9.35 झाले असतात.. गाथाकडे पोहचायला त्याला अर्धा तास तरी लागणार असतो.. 

हातातील घड्याळात बघतच तो त्याच्या मम्माकडे बघतो..

(भेटु शकेल शौर्य गाथाला?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all