अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 84

In marathi

सगळेच विराज आणि अनघाला वेलकम करायच्या तैयारीला लागले..

शौर्यची नजर कुणाला तरी शोधत असते.. तो गाथाकडे लक्ष न देता जाणुन बुजुन सगळीकडे आपली नजर फिरवत असतो..

गाथा : तु कुणाला तरी शोधतोयस का??

शौर्य : हम्मम..

गाथा : कुणाला??

शौर्य : माझ्या लाईफमधल्या सगळ्यात स्पेसिअल पर्सनला?? आज दिसतच नाही ती..

गाथा : ती???? तु कोणाबद्दल बोलतोयस??

शौर्य : आहे कोणी तरी.. भेटली की नक्की दाखवतो तुला..

बर.. गाथा पण हसतच त्याला बोलते आणि सर्वेश सोबत जाऊन उभी रहाते.. (तिला अस वाटत कदाचित त्याच्या फेमिली मधलं त्याची काकी नाही तर मामी वैगेरे कोणी तरी असेल..) शौर्य अधुन मधुन गाथाकडे बघत असतो.. आणि गाथा त्याच्याकडे..

वृषभ समोर उभं राहुन दोघांच काय चालु आहे ते बघत असतो.. शौर्यच लक्ष जात त्याच्याकडे.. 

चालू दे तुझं.. वृषभ इशाऱ्यानेच त्याला बोलतो.. तस शौर्य आपल्या केसांवरून हात फिरवत मान खाली घालुन लाजतो..

तोच मॅन डॉरमधुन श्री आणि प्रीती एंटर करते...

राज : हे दादा.. वेलकम..

रोहन : वेलकम वहिनी..

श्री : थेंक्स..

टॉनी : समीरा नाही आली??

प्रीती : नाही.. 

शौर्य : तुम्ही बसा ना.. प्लिज.. आता विर आणि वहिनी येतीलच.. (उगाच समीराचा विषय नको म्हणुन कोणी काही बोलायच्या आतच शौर्य बोलतो)

श्री आणि प्रीती आपल्या मित्रमंडळींना शोधतच त्यांच्या बाजूला जाऊन बसतात..

इथे अनघा आणि विराज एकमेकांच्या हातात हात घालुन एंगेजमेंटसाठी डेकोरेशन करून ठेवलेल्या गार्डनजवळ यायला निघतात.. खर तर अस हातात हात घालुन सगळ्यांसमोर येताना दोघेही थोडं लाजत असतात.. 

पुढे येताच अचानक लाईट जाते..

विराज : हे पुन्हा त्यादिवशी सारखच आहे.. 

अनघा : खर तर मी ही असच विचार केलेला.. काही तरी ट्विस्ट दोघांनी नक्कीच करून ठेवला असणार... अस सहजा सहजी कस येऊ देतील..

तोच दोघांच्या दोन्ही बाजुने स्काय शॉट फुटतात.. अचानक मोठा आवाज झाल्याने दोघेही एकमेकांना अजुन घट्ट पकडत एकमेकांच्या थोडे अजुन जवळ येतात.. समोरच असलेल्या फाउंटन मधुन पाणी बाहेर बहरू लागत.. फाउंटनवर लावलेल्या गुलाबीसर रंगाच्या लाईटमुळे पाण्याचा रंग देखील गुलाबी दिसत असतो..

सुंदर.. अनघाच्या तोंडुन बाहेर पडत.

येस.. अवेझम... विराज सुद्धा त्यावर आपली प्रतिक्रिया देतो..

दोघेही तसेच एकमेकांच्या हातात हात घालुनच पुढे येतात.. ते जस जसे पुढे येतात तस तस बाजुलाच असणाऱ्या लाईटी त्यांच्यावर फोकस करत असतात.. समोरच गेटवर विरघा म्हणुन लिहिलं असत.. सोबत लास्ट टाईमसारखे दोघांचे जुने फोटॉ.. 

दोघेही आपले जुने फोटो बघत त्यांनी एकमेकांसोबत घालवलेले ते क्षण आठवुन त्याबद्दल डिस्कस करतच पुढे जातात.. जस जसे पुढे जातात तस तस दोघांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होऊ लागतो.. दोघेही खुप खुश होत एकमेकांकडे बघतच पुढे जायला निघतात.. आणि फायनली गार्डनच्या एन्टरन्सजवळ येतात.. होम थिएटरवर त्यांच्या प्रीवेडिंगचे व्हिडीओ लावले असतात.. आणि समोर दिसणारा सुंदर असा स्टेज.. रिसेप्शनचा स्टेज बघुन तर दोघेही एकमेकांकडे बघत पुन्हा त्या स्टेजकडे बघतच रहातात.. मोठं मोठ्या काचा व त्या काचेच्या आतुन भहरणारे रंगीबेरंगी पाणी, सोबतच बाजूने केलेल रंगीबेरंगी फुलांच डेकोरेशन जणु निसर्गाने त्यांच्या रिसेप्शनला हजेरी लावलीय असे सांगत होत..

दोघेही फायनली रिसेप्शनच्या ग्राउंडमध्ये एंटर करतात...

तस शौर्य दोघांच्या समोर जाऊन उभं रहातो आणि सोबतच त्याची इतर मंडळी त्याच्या आजुबाजूला जाऊन उभी रहातात.. आणि गाणं वाजत..

वह वह रामजी
जोड़ी क्या बनायीं
भैया और भाभी को
बधाई हो बधाई

सब रस्मो से बड़ी है जग में
दिल से दिल की सगाई

म्युसिक सोबत शौर्य सुद्धा गाणं गात आपल्या भावासोबत वहिनीच सुद्धा तो हात जोडुन वेलकम करतो.. मित्रमंडळींसोबत दोघांभोवती गोल साखळी करतच एक गोल फेरी दोघांभोवती मारतच त्यांना हाताने पुढे जायला सांगतो.. विराज प्रेमाने शौर्यच्या गालांवर हात फिरवत अनघाचा हात पकडत पुढे जातो.

थोडं पुढे जाताच सर्वेश आणि गाथा असते.. आणि सोबतच शौर्यचे इतर मित्रपण

आपकी कृपा से यह
शुभ घड़ी आई
जीजी और जीजा को
बधाई हो बधाई

सब रस्मों से बड़ी है जग में
दिल से दिल की सगाई

ती लोक पण दोघांभोवती गोल फेरी मारून त्यांना पुढे जायला सांगतात..

पुढे जाताच पुन्हा गाणं वाजत.  

टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर देख 
टका टक टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर देख 
टका टकटुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर देख टका टक

जश्नबाज़ी की शाम है 
जश्नबाज़ी की शाम है 
तिरकिट ताल पे ठुमके लगाए ज़लिमा 
टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर देख टका टक 
टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर टुकुर देख टका टक

विराजच्या बाजूला रॉबिन आणि अनघाच्या बाजूला ज्योसीलिन उभं राहुन दोघांना एक एक स्टेप देत नाचालयला सांगत होते.. गार्डनमध्ये बसलेले सगळेच टाळ्या वाजवत दोघांना चिअर्प करत होते.. दोघांचे मित्र मंडळी तर अक्षरशः दोघांच्या नावाने ओरडत त्यांना नाचायला सांगत होते.. दोघेही जमेल तसं त्यांना साथ देत नाचतात.. गाणं संपताच ती लोक देखील त्यांना पुढे जायला सांगतात.. दोघेही एकमेकांचा हात पकडतच स्टेज च्या दिशेने जायला निघतात.. पुन्हा गाणं चेंज होत.. पुढ्यात निधी.. तिच्या सोबत शौर्यचे दिल्लीचे मित्र असतात..

तू हो गयी वन टू टु (two) 
ओ कुड़िये व्हाट टू डू ओ 
हो गयी मुंडे दी तू तुरु तुरु 

पतंगां वर्गी तू 
ऐंवई उड़ दी 
ओह हो गयी मुंडे दी 
तू तुरु तुरु हिल्ला दे चलदी 
तुक तुक तू करदी 
मेक अप तू करदी यार 
अंग्रेजी पढ़दी गिट-पिट तू करदी 
जिम्मे क्वीन साड़ी विक्टोरिया
 तू घंटी बिग बांग दी पुरा 
लंदन ठुमकदा 
ओह जुड्डो नाच्चे पहं दी 
पुरा लंदन ठुमकदा

विराज आणि अनघा सुद्धा हसतच टाळ्या वाजवत त्यांचं कौतुक करत असतात.. गाणं संपताच सगळे बाजुला होत विराज आणि अनघाला थोडं पुढे जायला सांगतात..

पुढे निधी तिच्या एका बाजुला ज्योसलीन आणि एका बाजुला गाथा येऊन उभी राहते तस पुढील गाणं वाजत

उड़न छू छू है चिड़िया फिरंगी
बालम तू तू तू देसी मुसम्मी
उड़न छू छू है चिड़िया फिरंगी
बालम तू तू तू देसी मुसम्मी 

हे कडवं संपताच तिघी पुढे होतात तस शौर्य त्याच्या दिल्ली गेंग सोबत येतो.. आणि त्याच गाण्याच्या पुढील कडव्यावर ते डान्स करतात..

बोए तो दिल की आदतें 
बन्दर छाप हैं 
खाली पीली छत पे 
चढ़े चढ़ के उतर जाए 
हरदम मूड में 
लल्लन टॉप है 
गिनती में गिनता है 
एक दो तीन चार पांच

शौर्य आपल्या बाकीच्या मित्रांना पण बोलवत एकदम बेधुंद होऊन नाचु लागतो.. विराजचा हात खेचतच तो त्याला आपल्या सारख नाचायला लावतो.. 

एक दो तीन चार पांच 
चल धतिंग नाच धतिंग 
धतिंग धतिंग धतिंग धतिंग 
हे हो धतिंग धतिंग धतिंग 
धतिंग धतिंग नाच हाँ धतिंग 
धतिंग धतिंग धतिंग धतिंग नाच 
धा धा धा धा तिंग तिंग धा तिंग तिंग

विराज लाजत का होईना आपल्या भावासाठी थोडं नाचतो आणि अनघा सोबत जाऊन उभं रहातो.. सगळे नाचतच स्टेजवर जातात आणि पुढील गाण वाजु लागत तसे स्टेजवरच सगळे नाचतात.. ..

मैं डालूं ताल पे भंगड़ा
तू भी गिद्धा पाले  
चल ऐसा रंग जमा दे  
हम के बने सभी मतवाले  

मन कहे मैं आऊं  
चाँद और तारे सारे  
इन हाथों पर मैं चाँद रखूं  
इस मांग में भर दूँ तारे  

शौर्य विराजचा आणि गाथा अनघाचा हात पकडतच दोघांना स्टेजवर नाचायला घेऊन जातात..

हेल्लो हेल्लो तू फ्लोर पे जब है आई  
येल्लो येल्लो बट सॉलिड मस्ती छाई  
हेल्लो हेल्लो टू मच है तूने लगाई   
येल्लो येल्लो कंट्रोल करो मेरे भाई  
धक धक धक धक धड़के ये दिल  

शौर्य विराजला स्टेप दाखवत आपल्या सारख नाचायला सांगतो आणि इथे गाथा.. अनघा आणि विराज सोबत सगळेच तो क्षण एन्जॉय करत असतात.. मुळात अनघा आणि विराज..

छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ  
रात बड़ी है मस्तानी तो दिलबर जानी  
कर ले गल्लां गुड़ियाँ  ये बात मैंने मानी   
क्यों इतनी खुश है दीवानी 


फायनली गाणं संपत.. पण परत गिफ्ट देण्यासाठी स्टेजवर यायला नको म्हणुन शौर्यचे सगळे मित्र मंडळी विराज आणि अनघाला त्याच क्षणाला गिफ्ट देतात.. त्यांच्या सोबत फोटो क्लिक करतात.. दोघांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देत खाली उतरतात..

फायनली रिसेप्शन सोहळ्याला सुरुवात होते.. इथे पाहुणे मंडळी एक एक करून स्टेजवर येत दोघांना गिफ्ट देत लग्नाच्या शुभेच्छा देत असतात.. विराज आणि अनघाला खर तर हा क्षण कधी संपूच नये अस वाटत असतो...

गाथा लांबुन एकटक आपल्या दि च्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघत असते..

शौर्य : माझं लक्ष आहे तुझ्याकडे?? मला तु रडलेलं नाही आवडणार.. मग तुच ठरव रडायच की नाही ते..

गाथाजवळ जातच शौर्य तिला बोलतो..

गाथा : रडत नाही मी.. दि ला एवढं हॅप्पी मी आज पहिल्यांदाच बघतेय.. म्हणजे ती नेहमी हॅप्पीच असते पण आज वेगळाच ग्लो तिच्या चेहऱ्यावर आहे.. खुप छान जोडी आहे दोघांची..

शौर्य : हा म्हणजे माझा भाव आज थोडा जास्तच हँडसम दिसतोय..

(शौर्यला वाटत तो अस बोलताच गाथा थोडी रागवेल त्याच्यावर.. पण तिच्या चेहऱ्यावर जरा पण राग दिसत नाही त्याला.. )

गाथा : होना.. आणि माझी दि पण आज थोडी जास्तच ब्युटीफुल दिसतेय.. हँडसम प्लस ब्युटीफुल इज इक्वल टु.... वंडरफुल...

गाथा अस बोलताच शौर्य हसतो.. सोबत ती पण..

शौर्य : अग मी तुला सांगायलाच विसरलो.. 

गाथा : काय??

शौर्य : जिला मी मगाशी शोधत होतो ना ती भेटली मला.. 

गाथा : तुझ्या लाईफ मधली स्पेसिअल व्यक्ती का??

शौर्य मानेनेच हो बोलतो..

गाथा : कुठेय??

शौर्य : एकच्युअली माझा मगाशी थोडा गैर समज झालेला.. ते ती आज खुप म्हणजे खुपच सुंदर दिसतेय तर मी तिला ओळखुच नाही शकलो.. म्हणजे तस ती नेहमीच सुंदर दिसते.. पण आज खुपच छान दिसतेय ती.. मला तर वाटत ती माझ्यासाठीच तैयार होऊन आलीय आज.. म्हणजे तुझ्या दि च्या चेहऱ्यावर कसा ग्लो दिसतोय तुला तसाच सेम ग्लो मला तिच्या चेहऱ्यावर दिसतोय.. तु पण बघितलंना तिला तर तु पण माझ्यासारख तिच्या प्रेमात पडशील..

अच्छा??? गाथा थोडा प्रश्नार्थी चेहरा करत शौर्यकडे बघते..

शौर्य : थांब मी तुला दाखवतो.. ओहह शट.. आता ह्या गर्दीत कुठे शोधु मी तिला.. 

गाथा : शौर्य तु खरच प्रेमात पडलायस कुणाच्यातरी..??

(गाथा एकदम सिरीयस चेहरा करतच बोलते)

शौर्य : अस का विचारतेयस.?? मी परत प्रेमात नाही पडू शकत का??

तुझ्या हृदयाला जर पटत असेल तर पडु शकतोस.. पण खुश रहा.. म्हणजे खुप खुप खुश रहा.. शौर्यपासुन आपली नजर लपवतच ती त्याला बोलते..

शौर्य : थेंक्स..

गाथा : नंतर मला दाखव.. मला आवडेल तिला भेटायला..

शौर्य : माझ्याकडे फोटॉ आहे तिचा थांब दाखवतो..

ओहह नो यार...(शौर्य खिश्यात हात घालतच बोलतो..)

गाथा : काय झालं??

शौर्य : सॉरी... मोबाईल मी ज्योसलीनकडे दिलेला.. ते मगाशी सॉंग लावायला घेऊन गेली ना ती.. तुला ती दिसलीना तर तु तिच्याकडुन मोबाईल घेऊन बघु शकतेस... तस मोबाईल अनलोक आहे माझा.. आणि मी रूमवर जातोय.. मला पेकिंग करायचीय.. चॅकआऊट करायचय ना आज.. बाय भेटूच नंतर..

हम्मम.. बाय... गाथा नाराज होतच शौर्यला बोलते.. शौर्य मात्र गालातल्या गालात हसत.. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत तिथुन निघतो..

गाथा बाजुलाच असलेल्या चेअरवर बसुन शौर्यचा विचार करण्यात हरवुन जाते..

सर्वेश : ए माई तु इथे अशी का बसलीयस.. मामा मामी निघतायत.. तुला बोलवतोय मामा.. चल भेट त्याला..

गाथाच सर्वेशच्या बोलण्याकडे लक्षच नसत..

अग माई चल.. सर्वेश तिचा हात पकडतच तिला आपल्यासोबत मामा मामीला भेटायला घेऊन जातो..

तोच गाथाच लक्ष ज्योसलीनकडे जात.. मित्र मंडळींसोबत गप्पा मारत ज्युस पित असते..

सर्वेश मी दोन मिनिटांत आलीच अस बोलत सर्वेशचा हात सोडुन ती तिथुन निघुन जाणार पण सर्वेश तिचा हात घट्ट पकडतो..

सर्वेश : कुठे चाललीस?? तु एकदा गेलीस की गायब होतेस.. मग मला ओरडा पडतो मम्मीचा..

गाथा : बच्चा दोन मिनिटं.. मी आलीच..

सर्वेशच्या गालावर हात फिरवतच ती त्याला बोलते..

तस सर्वेश तिचा हात सोडतो.. ती ज्योसलीन जिथे तिला दिसलेली तिथे बघत तिच्याकडे जाणार पण ज्योसलीन आता तिथे नसतेच.. ती संपुर्ण गार्डनभर आपली नजर फिरवते.. पण तिला ज्योसलीन नाही दिसत..

गाथा : चल मामाला भेटुन येऊयात..

(नाराज होतच ती सर्वेशला बोलते)

सर्वेश : काय झालं??

गाथा : काही नाही.. 

नाराज होत ती तिथुन निघुन जाते.. पण सर्वेश सोबत जाताना ती वारंवार पाठी वळुन ज्योसलीन कुठे दिसते का ते बघत असते.. पण ती दिसतच नाही.. आपल्या मामा मामीला भेटायला जाते..

मामा मामीला बाय बोलुन ती पुन्हा ज्योसलीनला शोधु लागते.. ज्योसलीन तर दिसत नाही पण रॉबिन मात्र तिला दिसतो..

ज्यो कुठेय?? त्याच्याजवळ जाताच ती त्याला विचारते..

रॉबिन : मी माझ्या फियांसीवर कोणत्याही प्रकारचे रुल्स वैगेरे नाही लावलेत ग गाथा.

रॉबिन अस बोलताच गाथा प्रश्नार्थी चेहरा करत त्याच्याकडे बघते..

रॉबिन : अग एवढ मोठं क्वेशन मार्क तोंडावर आणुन बघु नकोस.. एक्साम मध्ये फेल होशील नाही तर..

आर्यन : ज्यो कुठेय ते तिला नीट सांगतोयस का आता खातोस माझ्या हातुन मार..

रॉबिन : ज्यो कुठे जाते, काय करते हे ती मला तिला सांगावस वाटलं तेव्हा सांगते.. पण आज नाही सांगितलं तिने मला. तुझं काही काम होत का?? मी करतो हवं तर..

गाथा : नाही.. राहू दे.. 

रॉबिन : नक्की ना??

गाथा : हम्मम..

गाथा संपुर्ण गार्डनवर आपली नजर फिरवतच ज्योसलीनला शोधु लागली.

शौर्य : कोणाला शोधतेयस??

ज्योला मागे.. वळतच ती बोलते.. बघते तर शौर्य.. त्याला अस मागे वळुन तीच हृदय धडधडू लागत.. आता ह्याला काय उत्तर द्यायच ह्या विचाराने..

शौर्य : ती काय तिथे उभी आहे..

शौर्य ज्योसलीनकडे बोट दाखवतच तिला बोलतो..

गाथा : थेंक्स...

शौर्य : काही काम होत का??

गाथा : तु रूमवर जाणार होतास ना..?? पेकिंग करायला??

शौर्य : हो.. बट विरकडे त्याच्या रूमची कि मागायला आलोय.. त्याच पण काही सामान भरायच का बघतो.. म्हणजे हाता बरोबर सगळच होऊन जाईल.. तुझ काही काम होत का ज्यो कडे???

गाथा : हो म्हणजे ते फो.....टॉ..

शौर्य : ओहहह तु अजुन बघितला नाहीस.. ती स्पेसिअल व्यक्ती इथेच आहे ग.. तु फोटो कसले बघत बसतेस.. थांब मी तुला दाखवतोच.. (शौर्य संपुर्ण ग्राउंडवर आपली नजर फिरवु लागतो) कुठे गेली ही.. आत्ता तर त्या तिथे कोणासोबत तरी बोलत होती..

शौर्य एकटिंग करत बोलत होता आणि गाथा एक संशयी नजर त्याच्यावर फिरवते..

गाथा : शौर्य माझं मन मला बोलतंय तु खोटं बोलतोयस माझ्यासोबत.. सॉरी बट अस फील होतय मला..

(गाथा अस बोलताच शौर्य तिच्याकडे आधी बघतच रहातो.. एवढं परफेक्ट कस काय ओळखु शकते ही?? असा प्रश्न त्याच मन त्याला करत असत..)

गाथा : शौर्य सॉरी मला तुला अस खोटारडा वैगेरे नाही बोलायच होत बट आय डोन्ट नो मला तुझ्याकडे बघुन अस फील होतय की तु...

शौर्य : अग गाथा (मध्येच गाथाला तोडत शौर्य बोलतो) विरची शप्पथ मी खरच प्रेमात पडलोय तिच्या.. माझ्या भावाची खोटी शप्पथ मी नाही घेत कधी.. आणि हे वाल प्रेम खर आहे माझं.. म्हणजे पहिलं वाल पण खरंच होतं ग.. बट वन साईड होतना.. तु बघितलंच असशील.. आणि हे वाल बोथ साईड आहे.. आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी ती पण इथेच आहे ग.. इव्हन विरच्या एंगेजमेंटला पण आलेली ती.. मेहेंदीच्या फंक्शनला पण होती वाटत.. होती का??

गाथा : मला कस माहीत असणार शौर्य..?? 

शौर्य : अरे हो.. तु नाही ना बघितलस.. मला वाटत तु पण बघितलं असशील तिला.. पण तुला आठवत नाही आहे आता.. आणि हो.. ती ना होती मेहेंदीच्या फंक्शनला.. मला तिने तिच्या हातावर काढलेली मेहेंदी पण दाखवलेली.. हा कन्फर्म होती ती आणि अजुन खोट वाटत असेल मग ज्योकडे मोबाईल आहे त्यात बघ तिचा पिक भेटेल.. आज माझा एक जवळचा म्हणजे एकदम खास मित्र आलाय लग्नात तिच्यासोबत. तो , मी आणि तिने सोबत फोटो काढलाय.. ती बघ ज्यो आहे तिथे.. चल मीच येतो तुझ्यासोबत.. तुला प्रूफ दाखवतोच मी आता..

शौर्य आणि गाथा एकत्रच ज्योकडे जाऊ लागले..

वृषभ : अरे शौर्य.. काम आहे तुझ्याकडे.. कधीच शोधतोय तुला.. चल बघु इथुन...

शौर्य : अरे दोन मिनिटं..

वृषभ : प्लिज.. हे जरा जास्त महत्वाच आहे.. गाथा प्लिज.. तुला प्रॉब्लेम नसेल तर घेऊन जाऊ ह्याला..

गाथा : ओके.. (गाथा थोडं तोंड पाडतच शौर्यला बोलते)

वृषभ शौर्यला घेऊन तिथुन निघुन जातो.. दोघेही मागे वळून गाथाचे एक्सप्रेशन बघत असतात..

गाथा ज्योसलीनकडे जाते..

ज्योसलीन : कुठे होतीस.. डान्स करून गायबच झालीस..

गाथा : तुलाच शोधत होते मी.. बर ते जाऊ दे.. शौर्यचा फोन तुझ्याकडे आहे??

ज्योसलीन : हो.. म्हणजे होता.. आता नाही.. तो मी रॉबिनकडे दिला ठेवायला.. एक तर मी आज जिन्स नाही घातलीय.. मी माझा मोबाईल पकडु की त्याचा.. मग रॉबिनकडे दिला ठेवायला.. पण तुला का हवाय..??

गाथा : असच.. 

ज्योसलीन : काही प्रॉब्लेम झालाय का??

गाथा मानेनेच नाही बोलते..

गाथा : रॉबिन कुठेय??

ज्योसलीन : असेल इथेच कुठेतरी..

गाथा : त्याला फोन करून बघ ना तो कुठेय ते.. प्लिज..

नाही ग उचलत आहे तो.. ज्योसलीन रॉबिनला फोन लावतच बोलते..

गाथा : इट्स ओके मी शोधते त्याला..

ज्योसलीन : गाथा खरच काही प्रॉब्लेम नाही ना ग.. तस असेल तर सांग मला.. आय विल हेल्प यु..

गाथा : हम्मम.. 

ज्योसलीनचा हात पकडतच ती तिला बाजुला नेते..

ज्योसलीन : काय झालं?? 

गाथा : शौर्य परत प्रेमात पडलाय..??

ज्योसलीन : हो बोलला मला तो.. मगाशी फोटो पण दाखवला तिचा त्याने.. तुला कोण बोललं तोच का??

गाथा : ज्यो खरच तो प्रेमात पडलाय??

ज्योसलीन : तु क्वेशन रिपीट केलास तरी माझं अन्सर होच असणार आहे ग..

गाथा : कोणाच्या??

ज्योसलीन : अग इथेच होती आता.. थोड्या वेळापूर्वी शौर्य तिच्यासोबत बोलत होता.. खुप सुंदर आहे ती.. त्याला खुप समजुन घेते.. मुळात हे ना त्याच इंडियात आल्यापासुन चालु आहे.. बट तो मला आजच बोलला.. म्हणजे आम्हांला थोडं वाटत होतं हा तिच्या प्रेमात आहे.. बट तो मान्यच करत नव्हता.. फायनली त्याने मान्य केलच..

गाथा : ज्यो.. ती त्याला समजुन नक्की घेईलना..?? का परत त्या समीरासारख त्याला त्रास देईल..

ज्योसलीन : ही तिच्यासारखी नाही ग.. खुप म्हणजे खुपच समजूतदार आहे ती.. आणि शौर्यवर तर जीवापाड प्रेम करते.. मुळात शौर्य तिच्यावर जीवापाड प्रेम करतो... तु एकदा भेटलीस ना तर तुच बोलशील की शौर्यसाठी एकदम परफेक्ट आहे ती..

गाथा : आणि परत अर्ध्यावर सोडुन गेली तर..

ज्योसलीन : नाही ग जाणार.. तु का एवढं टेन्शन घेतेस..

गाथा : शौर्यला त्रास होईल पुन्हा म्हणुन.. मला तिला भेटायचंय.. 

ज्योसलीन : इथेच आहे ग ती.. मला दिसली की दाखवते मी तुला..

गाथा एकटक कसल्या तरी विचारात हरवुन जाते.. ज्योसलीनच बोलणं ऐकुन तिला खरच अस वाटू लागतं की शौर्य कुणा दुसऱ्याच्या प्रेमात पडलाय.. शौर्य आपल्यापासून अस लांब जातोय हा विचार करून तिला त्या क्षणी खूप रडु येत असत..

मी तुझ्याशी बोलतेय.. कुठे हरवलीस तु.. गाथा एकटक कुठे तरी हरवलीय  हे बघुन ज्योसलीन तिचा हात पकडतच तिला बोलते..

गाथा : कुठे नाही.. मला एक काम आहे आपण मग भेटुयात अस बोलत गाथा नाराज होतच तिथून निघते..

अग गाथा.. कुठे फिरतेयस तु.. एकदा तुझ्या आणि दि च्या रूमवर जाऊन बघुन ये सामान वैगेरे सगळं नीट भरलंय का ते... थोड्या वेळाने जेवुन निघायचंच आहे मग घाई नको.. गाथाची आई तिच्या जवळ येत तिच्या हातात रूमची किल्ली देतच तिला बोलते..

खाली बघुनच मानेने हो बोलत ती तिथुन आपल्या रूमवर यायला निघते..

आपलं प्रेम आपल्यापासुन लांब गेलं म्हणुन तिला रडु येत असत..

गाथा आधी आपल्या दि च्या रूममध्ये जाऊन बघते तिने सामान वैगेरे सगळं भरलंय का ते.. तिच्या रूममधून ती सरळ आपल्या रूममध्ये येते.. आपल्या रूम मध्ये येताच रूम आतुन लॉक करत रडतच आपलं उरल सुरल सामान बेगेत भरू लागते.. सामान भरून होताच ती तिथेच बेडवर बसुन रडत आपलं मन हलकं करते.. 

इथे शौर्य तिला ग्राउंडवर शोधत असतो पण ती कुठे दिसतच नसते..

गाथा कुठेय??? सर्वेश दिसताच तो त्याला विचारतो..

सर्वेश : इथेच तर होती.. असेल इथेच कुठे तरी..

शौर्य : बर..

सर्वेश : काही काम होत का??

शौर्य : हो.. ती भेटल्यावर बोलतो तिच्याशी..

ओके.. अस बोलून सर्वेश तिथुन निघुन जातो पण शौर्य गाथाला शोधण्यात बिजी असतो..

अनिता : कुठे होतास तु??

शौर्य : इथेच तर आहे.. काय झालं??

अनिता : आजीचा जेवायचा टाईम झालाय.. औषध घ्यायचीयत तिला.. दि तिथे रूम आवरतेय मी तिला जाऊन मदत करते.. प्लिज आजीला बघ जरा. आत्या एकटीच आहे..

शौर्य.. लांबुनच आत्या शौर्यला हात दाखवतच आपल्याकडे बोलवते.. एका हाताने तिने शौर्यच्या आजीला पकडलं असत.. 

शौर्य पळतच तिच्याकडे जातो..

आजीला धरतच तो बाहेर एका चेअरवर बसवतो.

मी जेवण घेऊन येतो.. अस बोलत आपल्या आजीसाठी जेवण घ्यायला तिथुन निघुन जातो.. आजीसाठी जेवणाच ताट घेऊन तो तिथेच आत्यासोबत गप्पा मारत बसतो..

इथे जवळपास एक दिड तासाने सर्वेश गाथाला आवाज देतच तिची रूम नॉक करतो.. डोळे पुसतच ती दरवाजा उघडते..

सर्वेश : माई.. तु रडत होतीस.. काय झालं??

गाथा शांतच बसुन असते..

दि जातेय म्हणुन तुला पण वाईट वाटतंय ना???सर्वेश अस बोलताच ती त्याला मिठी मारून रडु लागते..

सर्वेश : माई मला पण रडु येईल हा.. प्लिज.. दि ला आवडणार नाही आपण अस रडलेलं.. तुच मला मगाशी बोलत होतीस ना.. नको ना रडुस..

गाथाचे डोळे पुसतच तो तिला बोलतो.. बाजुला ठेवलेल्या बॉटल मधलं पाणि तो तिला पियायला देतो..

सर्वेश : बर वाटतंय??

गाथा : हम्मम.. थेंक्स..

सर्वेश : खाली जेवायला वाट बघत आहेत सगळे आपली.. तु सामान नीट भरलस ना?? मम्मी विचारत होती..

गाथा : हो भरलं.. 

दोघेही रूम लॉक करत रिसेप्शनच्या ग्राऊंडजवळ यायला निघतात..

गाथा : सर्वेश, मम्मी पप्पांना अजिबात त्रास नको देऊस हा.. मी तीन चार दिवसांनी येणार आहे.. प्लिज त्यांना नीट सांभाळ.. मम्मी खूप इमोशनल झालीय आतुन.. आणि पप्पा पण..

सर्वेश : नाही ग त्रास देत.. तु तुझी आणि दि ची काळजी घे.. आणि मला फोन करत जा.. मला तुम्हां दोघींशिवाय नाही करमणार..

गाथा : तुझ्याशी न बोलता मला पण नाही करमणार रे.

दोघेही बोलत मोठ्याश्या डायनींग टेबलवर येऊन बसतात.. विराज आणि अनघा आधीच तिथे येऊन बसले असतात..

सर्वेश आणि गाथाला एकत्र बघताच अनघा इशाऱ्यानेच सर्वेशला काय झालं म्हणुन विचारते.. सर्वेश आपल्या डोळ्यांना हात लावत ती रडत होती अस सांगतो.. सर्वेश गाथाला घेऊन आपल्या मम्मी पप्पांच्या बाजुला जाऊन बसतो..

इथे शौर्य आणि बाकीची मंडळी पण मज्जा मस्ती करत जेवायला येऊन बसतात. 

रॉबिन : शौर्य तुझी गाथा बघ.. फायनली आऊट केलसच तु तिला..

रॉबिन अस बोलताच सगळे हसु लागतात.. शौर्य बरोबर गाथाच्या समोरच येऊन बसतो.. पण गाथाच लक्ष त्याच्याकडे नसत..

शौर्य एकटक गाथाकडे बघत असतो.. पण ती मात्र तिच्या समोर असलेल्या ताटात बघत असते..

शौर्य : हे सर्वेश.. तु आज माझ्या समोरच बसलायस..

सर्वेश : हम्म

तुला गाथाला सांगायच का तु तिच्या समोर बसलायस ते... बाजूला बसलेली आत्या हळुच शौर्यच्या कानात बोलते..

आत्या तुच समजू शकतेस माझ्या भावना... हसतच आत्याला बोलतो..

आत्या सोबत बोलताना शौर्यच संपुर्ण लक्ष गाथाकडे होत.. शौर्यचा आवाज ऐकताच गाथापण समोर बघते.. शौर्य इशाऱ्यानेच गाथाला काय झालं म्हणुन विचारतो.. गाथा नकारार्थी मान हलवतच काही नाही म्हणुन सांगते..

आपल्या डोळ्यांवर हात लावत तो तिला तु रडलीस का म्हणुन विचारते..

गाथा मानेनेच नाही बोलत समोर असलेल्या ताटात फक्त बघत असते पण जेवत नसते..

शौर्य त्याच्या दुसऱ्या बाजुला बसलेल्या ज्योसलीनच्या कानात काही तरी सांगतो..

ज्योसलीन : गाथा.. तु बोलली नाही मला तु आज फास्टिंग वर आहेस ते..

गाथा प्रश्नार्थी चेहऱ्याने ज्योसलीनकडे बघते...

ज्योसलीन : तु जेवत नाहीस म्हणुन विचारतेय आणि शौर्य तु पण सांगितलं नाहीस तु पण आज फास्टिंगवर आहेस ते.. नाही म्हणजे तु पण जेवत नाही आहेस म्हणुन विचारलं..

(ज्योसलीन अस बोलताच गाथा शौर्यच्या ताटात बघते.. )

विराज : ह्यांच काही तरी झालंय वाटत..

(विराज हळुच अनघाला ऐकु जाईल अस बोलतो..)

अनघा : मला पण तेच वाटतंय.. 

कोणाच लक्ष नाही हे बघून शौर्य आपले दोन्ही हात जोडत इशाऱ्यानेच गाथाला जेव म्हणुन सांगतो.

गाथा स्पून हातात घेते तस शौर्य पण घेतो.. आणि तिला दाखवतो की तुझं बघून मी सुद्धा स्पून हातात घेतलाय.. गाथाला त्याच्या वागण्यावर थोडं हसु येत असत.. ती जस आणि जेवढं जेवते तेवढंच शौर्य जेवतो.. गाथाला शौर्यच अस वागणं बघुन खात्री पटते की हा मगाशी बोलला ते नक्कीच खोटं होत.. पण त्याने त्याच्या भावाची शप्पथ घेतलेली ते.., हा बट तो प्रेमात पडलाय हे सांगायला शप्पथ घेतलेली.. गाथा मनातल्या मनात स्वतःच प्रश्न करते आणि स्वतःच प्रश्नांची उत्तरं देत असते

नैतिक : तुम्ही लोक एकमेकांच्या ताटात बघुन का जेवताय.. 

नैतिक अस बोलताच सगळेच त्याच्याकडे बघु लागतात..

रॉबिन : तु कोणाला बोलतोयस??

नैतिक : समजने वालोंके लिये इशारा काफी हे मेरे दोस्त.. काय SD बरोबर ना??

शौर्य : नैतिक तु तुझ्याच ताटात बघत जेव नाही तर चुकुन आर्यनच्या ताटात हात घाशील.. आर्यन मित्रा सांभाळुन हा..

शौर्य अस बोलताच सगळे नैतिकला हसतात..

मज्जा मस्ती करतच सगळे जेवण आटोपुन घेतात.. गाथा आणि सर्वेश आता त्यांच्या दि सोबतच असतात..

शौर्यपण विराजजवळ जातो..

शौर्य : विर तुमची गाडी रेडी आहे.. रूममधलं सामान मी गाडीत नेऊन ठेवलय.. मी पुढे जातोय.. आपल्या गाडर्नजवळ तुझी गाडी आली की मला एकदा फोन करून इंफॉर्म कर.. माझा फोन स्विच ऑफ लागला तर ज्यो किंवा आर्यनच्या फोन वर कॉल कर..

विराज : तु पुढे कुठे पळतोय.. तु माझ्या बरोबरच येतोयस घरी..

शौर्य : मला काम आहे रे.. आत्याला आधी घरी घेऊन जावं लागेल ना..   वहिनी पहिल्यांदाच घरी येतेय माहिती ना.. नीट वेलकम वैगेरे नको का करायला तीच.. आणि माझे दिल्लीवाले फ्रेंड्स पण थोडे दिवस माझ्यासोबत रहाणार आहेत इथे.. त्यांना पण पुढे घेऊन जातो.. वरात पण काढायचीय.. आणि तुझी लाडकी मम्मा असणार विर तुझ्यासोबत.. 

विराज : बर..

शौर्य : तुझं काही काम नाही ना अजुन?? 

विराज : नाही.. तस काही वाटलं तर कॉल करेल मी.

शौर्य : बर बाय.. 

विराज : कार नीट ड्राइव्ह कर.. 

शौर्य : हो रे..

शौर्य पळतच आपल्या गाडीजवळ येतो..

ए रॉबिन तु ह्या गाडीत काय करतोयस.. बाहेर निघ बघु.. रॉबिनला आपल्या गाडीत बघुन शौर्य त्याला बोलतो..

रॉबिन : मी कस येऊ मग??

शौर्य : तुझ्या सासु सासऱ्यांची एवढी मोठी गाडी असताना तु माझ्या गाडीतुन कुठे येतोयस.. ज्यो वाट बघतेय तुझी त्या गाडीत.. गर्ल्स तुम्ही पण त्या गाडीत जावा.. माझा ब्रुनो आहे ना गाडीत??

आर्यन : आहे रे बाबा.. आणि SD आता बसलेत ना.. होतेय जागा.. तु कुठे शिफ्टिंग करत बसतोयस..

शौर्य : अरे आत्या, आजी आणि निधी दि पण येतेय.. आजीला त्रास होईल आणि ज्योच्या गाडीत भरपुर जागा आहे.. रॉबिन तु आधी उतर बघु..

अस बोलत शौर्य त्याच्या आजीला आणायला जातो..

रॉबिन : गाईज जमलं तर भेटूच आपण परत..

वृषभ : तु अस का बोलतोयस..??

रॉबिन : मी माझ्या सासु सासऱ्यांसोबत येतोय..

रोहन : मग त्यात काय झालं..??

रॉबिन : सासू सासऱ्यांसोबत दीड तास प्रवास करन म्हणजे पाण्यामध्ये समोसा तळायला घेण्यासारखं आहे यार..

रॉबिन अस बोलताच सगळे हसु लागतात..

वृषभ : बेस्ट ऑफ लक रॉबिन..

रॉबिन : थेंक्स यार.. 

नैतिक : ए रॉबिन असेच जॉक्स आपल्या सासु सासऱ्यांना पण ऐकवं तुझ्या दिड तासाच्या प्रवासात.. 

राज : आणि जमलं तर पाण्यामध्ये समोसे नक्की तळ ह्या दिड तासाच्या प्रवासात.. 

टॉनी : तेवढेच सासू सासरे इंप्रेस होतील तुझे..

आर्यन : आणि समोसे उरले तर घेऊन ये.. तस पण हा राज डायटिंगवर आहे.. तु तळलेले पाण्यावरचे समोसे नक्की खाईल हा..

पुन्हा सगळे हसु लागतात..

बाय गाईज.. सगळ्यांना बाय करत रॉबिन आणि सोबत बाकीच्या मुली पण उतरतात आणि ज्योच्या गाडीत जाऊन बसतात..

शौर्य आजीला व्यवस्थित आपल्या गाडीत बसवतो.. सोबत आत्या आणि निधी पण असतात त्याच्या आजीला बघायला..

आणि फायनली रिसॉर्टला बाय करत सगळे घराच्या दिशेने आपल्या वहिनीच स्वागत करायला निघतात.

इथे अनघा पण आपल्या आई वडिलांचा निरोप घेत होती.. आई वडिलांना रडतच मिठी मारत ती त्यांचा निरोप घेत असते.. सर्वेश पण आपल्या दि ला मिठी मारत रडत असतो.. गाथाला पण आता रडु आवरत नसत.. ती सुद्धा तिच्या बहिणीला मिठी मारून रडते..

काळजी घ्या माझ्या लेकीची.. विराजच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच अनघाचे वडील त्याला बोलतात..

विराज : बाबा तुमची मुलगी तुमच्या घरी जशी सुखी होती तशीच सुखी ती माझ्यासोबत आमच्या घरी राहील.. आणि जास्त लांब नाही.. तुम्हांला जेव्हा आठवण येईल तेव्हा अगदी हक्काने तिला भेटायला येत जावा.. नाही तर ती भेटायला येत जाईल..

गाथा आपल्या दि चा हात पकडतच तिला गाडीत बसवते.. आणि तिच्या बाजुला जाऊन बसते.. विराज पण अनघाच्या बाजूला जाऊन बसतो.. ड्रायव्हरच्या बाजुला अनिता बसते..

गाथा : शौर्य कुठेय??

विराज : तो पुढे गेला मित्रांसोबत.. 

गाथा : दि तुला पाणी हवंय??

अनघा मानेनेच नाही बोलते..

विराज अनघाचा हात आपल्या हातात घट्ट पकडत तिला थोडा धीर देत असतो.. अर्ध्या रस्त्यात पोहचल्यावर अनघा थोडं नॉर्मल होते..

इथे शौर्य सामान आणि गिफ्ट तात्पुरत एका रूममध्ये शिफ्ट करतो.. मित्रमंडळींना पण त्यांच सामान ठेवायला एक रूम देतो... आत्याला जमेल तशी मदत करत मित्रमंडळींना घेऊन पळतच तिथुन गार्डनच्या इथे जाऊन उभं रहातो..

रॉबिनच्या फोनवर विराजचा फोन येतो.. गाडी गार्डनजवळ येतेय..

आर्यन लांबुनच शिटी वाजवतच बेन्जो वाल्याला तैयार रहा म्हणुन इशारा करतो. शौर्य आणि सोबत इतर मित्रमंडळी नाचण्यासाठी अगदी उतावळी झाली असतात.. कधी नवरा नवरी येतायत ह्याचीच वाट बघत असतात.. आणि थोडयाच वेळात विराजची गाडी त्यांना दिसते..

तसे बेन्जो वाले बुलबुलच्या तारांवर सूर धरत मोठं मोठयाने ढोल वाजवु लागतात.. शौर्य आणि त्याचे मित्र अगदी तल्लीन होऊन नाचत असतात..

गाडी घराजवळ जाताच शौर्य सगळ्यांना गाडीतुन बाहेर उतरवतो..

विराज आणि अनघा एकमेकांचा हात पकडुन उभे असतात.. गाथा आपल्या दि सोबतच उभी असते.. शौर्य अनिताचा हात पकडतच तिला नाचायला सांगतो.. अनिता शौर्य सोबत थोडं नाचते आणि घरी जाते.. आजु बाजूचे शेजारी सुद्धा विराजच्या वरातीत नाचत असतात..

शौर्य गाथाला इशाऱ्यानेच नाचायला ये बोलतो.. ती मानेनेच नाही बोलते.. शौर्य पण तिला जास्त फोर्स नाही करत.. नवरा नवरी घराच्या गेटजवळ येऊन फायनली उभे रहातात.. शौर्य बेंजो वाल्याच्या कानात जाऊन काही तरी सांगतो.. आणि पळतच मित्रांजवळ जाऊन उभं रहातो.. बेंजो वाले शौर्यने वाजवायला सांगितलेलं गाणं वाजवतात.. धुन वाजत असते पण शौर्य गाथाकडे बघत गाणं बोलत त्या गाण्यावर डान्स करत असतो.. 

आर अस काय करताय
डोळ्यात बोलताय
है दिल मै क्या क्या शुरू?
गुपचूप देखे आँखों मै झांके
है दिल मै क्या क्या शुरू?

रॉबिन आणि आर्यन जोर जोरात शिटी वाजवत गाथा आणि शौर्यला चिडवत असतात. विराज आणि अनघा गाथाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत होते.. गाथा एकटक हसतच शौर्यचा डान्स बघण्यात हरवुन गेलेली.. रोहन आणि वृषभ शौर्यच तोंड आपल्याकडे करत त्याला नाचायला सांगतो

मुझे बता जरा केहेता क्या दिल?
तेरा इश्क़ का रंग

अग बाई बाई बाई बाई
उधळ उधळ उधळ हो
उधळ उधळ उधळ हो
उधळ उधळ उधळ हो
उधळ उधळ उधळ हो


शौर्य ब्लॅकफ्लिप... रोहन त्याला इशारा करतच बोलतो.. नैतिक पण त्याला ब्लॅकफ्लिप मारायला सांगतो.. बेन्जो वाले झिंगाट गाणं वाजवायला घेतात.. नैतिक आपल्या खांद्यावर शौर्यला उचलुन घेतो.. शौर्य नैतिकच्या खांद्यावर बसतच मित्रांकडे बघत नाचत असतो.. अधुन मधुन गाणं गातच तो गाथाकडे बघत असतो.. आणि मध्येच विराजकडे बघत त्याला नाचायला बोलावतो.. विराज मानेनेच नाही म्हणुन बोलतो..

उरात होतंय धडधड w0लाली गालावर आली... 
आन अंगात भरलाय वार हि पिरतीची बाधा झाली...
आता अधीर झालोय, बघ बधीर झालोया...
आन तुझ्याचसाठी बनून मजनू, माग आलोया....

टॉनी पुन्हा त्याला इशारा करत ब्लॅकफ्लिप मारायला बोलतो.. नैतिक त्याला एक हात देत आपल्या खांद्यावर उभं करतो.. 

विराज, अनघा आणि गाथा शौर्यला अस नैतिकच्या खांद्यावर उभं राहून डान्स करताना बघतच रहातात.. गाण्याच्या पुढील लिरिक्स विराजकडे बोलतच... त्याला हात दाखवत आपल्याकडे बघायला सांगतो..

आन उडतोय बुंगाट...पळतोय चिंगाट...रंगात आलया...झाल... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट... झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग... झिंगाट...


एक उंच अशी ब्लॅकफ्लिप तो मारतो.. त्याला अशी एवढ्या उंचावरून ब्लॅकफ्लिप मारताना बघुन विराज थोडं घाबरतच अनघाला सोडुन त्याच्या जवळ येतो.

शौर्य... गाथापण जोरातच ओरडते..

अनघा सुद्धा थोडी घाबरून जाते..

पण शौर्यसाठी हे काही नवीन नसत.. तो व्यवस्थित खाली उडी मारतच उभं राहतो आणि नाचु लागतो.. तस सगळ्यांच्या जिवात जीव येतो.. रॉबिन तर शिटी वाजवत त्याच कौतुक करतो.. विराजजवळ आलाय हे बघुन रॉबिन विराजला हात पकडतच नाचायला सांगतात.. शौर्यसुद्धा भावाजवळ जात डान्स करू लागतो.. 

बेन्जो वाले एक एक गाणं वाजवत असतो.. सगळे बेभान होऊन नाचत असतात.. फायनली बेन्जो वाजायचा थांबतो..

इथे आत्या, निधी, ज्योसलीनची आई आणि इतर आजु बाजुचे शेजारी अनघा आणि विराजच स्वागत करण्यासाठी तैयार असतात..

शौर्य आणि त्याची इतर मंडळी अनघा आणि विराज आत जायच्या आधी त्यांच्या आधी आत जातात..

घराच्या अंगणात सगळीकडे गुलाबांच्या पाकळ्या पसरल्या असतात...

घराच्या एन्ट्रन्सला सुद्धा फुलांनी डेकोरेट केलेलं असत..

हे नक्की आपलंच घर आहे ना...?? असा विराजला खर तर डाऊट येत असतो.. पण समोर आत्या आणि त्याच्या लाडक्या मम्माला बघुन त्याची खात्री पटते..

शौर्य : ए विर तुझंच घर आहेरे.. ये लवकर आत.. 

वेलकम होम वहिनी... सगळे एकत्र ओरडतात..

निधी आणि ज्योसलीन एकमेकांचा हात पकडतच नवरा नवरीची वाट अडवत असतात..

विराज : आता हे काय आहे??

आत्या : आधी होणाऱ्या सुनेने आपल्या नवऱ्याच सुंदर अस नाव घ्यायच.. 

निधी : मग विर ब्रो तु पण तुझ्या बायकोच नाव घेणार..

आत्या : आणि मग समोर दिसणार माप ओलांडुन सरळ आत..

ज्योसलीन : वहिनी लेट्स स्टार्ट..

शौर्य : कमॉन वहिनी...

अनघा : तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खुण... तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून... विराज रावांच नाव घेते कुलकर्णी घराण्याची सून.

ओहहह हो.. सगळे टाळ्या वाजवत अनघाच कौतुक करतात..

रॉबिन : काय मग विराजराव तुम्ही पण नाव घ्या आता.. वाट कसली बघतायत..

शौर्य : विर कमॉन ब्रो.. होऊन जाऊ दे..

विराज : नाशिकची संत्री.. गोव्याचे काजु.. अनघाच नाव घ्यायला मी कश्याला लाजु..

आर्यन : पण नाव घेताना किती लाजतोयस रे तु..

आर्यन अस बोलताच सगळे विराजला हसु लागले.. 

रॉबिन : गाथा तु पण घेते का??

रॉबिन अस बोलताच सगळे त्याच्याकडे बघु लागतात..

आर्यन : रॉबिन मित्रा नको तिथे नको ते का बोलतोयस तु.. ??

अस बोलत आर्यन जोरातच रॉबिनच्या डोक्यात मारतो..

शौर्य : तु भेटच मला बाहेर.. आज सोडतो का बघ तुला..

शौर्य राग दाखवतच रॉबिनला बोलतो.. तोच त्याच लक्ष त्याच्या मागे उभ्या असलेल्या त्याच्या मम्माकडे जात.. ती रागातच त्याला काय बोलतोयस म्हणुन विचारते..

शौर्य : तो काय बोलतोय बघ ना..

एकदम चुप.. आणि पुढे बघ.. हळुच शौर्यला राग दाखवत ती शांत बसायला बोलते..

शौर्य रॉबिनवर नजर फिरवतच पुढे बघतो.

विराज : आत्ता तर आत येऊ शकतो ना आम्ही??

निधी : अस कस.. आम्हांला काही तरी द्यावं लागणार तुला.. त्याशिवाय नाही येऊ शकत तु.. 

निधी आणि ज्योसलीन दोघीही हातात मोठासा कपडा पकडतच त्याला बोलतात..

ज्योसलीन : विर आणि कंजूसपणा नकोय हा.. आम्ही खुप मेहनत घेतलीय..

विराज खिश्यातुन पॉकेट काढत.. पाच हजार त्यांनी धरून ठेवलेल्या कपड्यात टाकतो..

ज्योसलीन : गाईज पाच हजार.. काय बोलताय सोडु आत??

आर्यन : सोड सोड.. तस पण SD पार्टी देणारच आहे आपल्याला.. काय SD..

शौर्य : हा देतो पार्टी.. आता बस झालं येऊ द्या माझ्या भावाला आत..

निधी आणि ज्योसलीन बाजुला होतात.. आत्या अनघा आणि विराजला ओवाळून घेते.. अनघाला पुढ्यात ठेवलेलं माप उजव्या पायाने ओलांडुन आत यायला सांगते.. 

अनघा आत्याने सांगितल्याप्रमाणे माप ओलांडुन आत येते..

शौर्य : विर आणि वहिनी मी तुम्हांला तुमची रूम दाखवायला घेऊन जातो.. चला..

विराज : शौर्य.. मला माहित आहे माझी रूम..

शौर्य : तरी मी दाखवतो ना..

आत्या : फक्त रूम बघायचीय विर तुला.. नंतर तुला शौर्यच्याच रूममध्ये झोपायचंय… ओके.. 

विराज अनघाकडे बघतच आत्याकडे बघतो...

आत्या : जो पर्यंत गाथा इथे आहे तो पर्यंत तुला शौर्यच्या रूम मध्येच झोपायचय.. 

शौर्य : ए आत्या आता हे काय नवीन.. लग्न झालय ग त्याच..

अनिता : शौर्य मोठे बोलतात तिथे तुला बोलणं गरजेचच आहे का?? शांत नाही का बसता येत तुला.. 

(अनिता अस बोलताच गाथा तिच्याकडे बघत शौर्यकडे बघते.. शौर्य तोंड पाडुन एकटक त्याच्या मम्माकडेच बघत असतो)

आत्या : वहिनी तु भडकतेस का त्याच्यावर.. त्याला नाही माहीत म्हणुन विचारतोय तो.. शौर्य तशी पद्धत आहे अस समज हवं तर.. विर तुला मी काय बोलली ते लक्षात आहे ना.. आता माझा हा बच्चु तुम्हा दोघांना रूम दाखवायला नेतो.. अनघा नीट रूम बघुन घे हा..

अनघा मानेनेच हो बोलते..

शौर्य विराजचा हात पकडतच त्याला आणि अनघाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो.. आपल्या रूममध्ये त्याचे आणि अनघाचा फोटो बघुन विराजला थोडं आश्चर्य वाटत.. 

विराज : हे कधी केलंस तु??

शौर्य : हे सगळं रॉबिनने एकट्याने केलंय.. अरे रॉबिन वरून मला आठवलं.. तुम्ही बघा रूम मी आलोच..

गाथा : कुठे चाललास??

शौर्य : आलोच..

शौर्य तिथून पळतच आपल्या रूममध्ये जात बाईकची कि घेतच खाली आला..

त्याचे मित्र मंडळी बाहेर उभं राहुन एकमेकांशी गप्पा मारत असतात.. रॉबिन सुद्धा असतो..

शौर्य त्याचा लक्ष नाही हे बघुन हळुच त्याचा मागे जात त्याचा हात पाठी पिरगळतो..

रॉबिन : काय झालं??

शौर्य : नको तिथे नको ते का बोलतोस तु.. शांत का नाही बसत.

रॉबिन : ए शौर्य आता काम झालं तस मारायला चालु काय तुझं.. इथुन माझं घर लांब नाही हा मी माझ्या मम्माला घेऊन येईल एवढं लक्षात ठेव..

शौर्य : धमकी देतो तु. 

आर्यन : आणि काय नुसतं मम्माला घेऊन येत असतोरे उठ सूट..लहान आहेस का??

रॉबिन : घेऊन तर नाही ना आलो.. मस्ती करतोय.. ए शौर्य चुकुन बोललो यार.. आर्यन सांग ना ह्याला..

आर्यन : पण तु चुकुन पण नको ती मस्ती का करतोस..₹?

वृषभ : शौर्य बस यार हात दुखेल त्याचा सोड बघु.. आणि चुकुन बोलला यार तो..इट्स ओके..

शौर्य हात सोडुन देतो..

रॉबिन : नुसतं हात काय पिरघळत असतो यार.. एकदा तरी तु माझा हात मोडणार हे नक्की..

शौर्य : थोडं मोठा हो यार.. प्रत्येक गोष्ट तु लाईटली घेतोयस..  थोडा बदल कर स्वतः त

रॉबिन : मी असाच आहे आणि मी असाच रहाणार कारण माझ्या ज्यो ला मी जसा आहे तसा आवडतो..

रोहन : ह्याला बदलण्यासाठी आपल्याला ज्यो ला बदलावं लागेल.

शौर्य : त्यापेक्षा हा आहे तसाच बरा आहे.. 

रोहन : अस का बोलतोयस.??

आर्यन : ज्यो को बदलना मुश्किल ही नही ना मुनकीन हे ।

आर्यन अस बोलताच परत सगळे हसतात.

नैतिक : ए SD आम्ही निघतो.. घरचे वाट बघत असतील..

रोहन : ए गाईज थांबाना इथेच.. आम्हांला बॉर होईल..

टॉनी : हो ना..

आर्यन : उद्या सकाळी भेटुयात.. तस पण आज आपण सगळेच दमलोय यार..

रॉबिन : मी तर पडल्या पडल्या झोपेल आज..

शौर्य : उद्याच प्लॅनिंग आहे ना लक्षात??

नैतिक : हो रे.. उद्याच तैयारी करू.. पण आता लेट खुप होतोय आम्ही निघतो.. गाईज भेटुयात उद्या.. शौर्यचा स्पेसिअल डे आहे..

शौर्य : बस बस.. आर्यन ही धर बाईकची की.. बाईक घेऊन जावा.. 

आर्यन : थेंक्स यार.. 

शौर्य सगळ्यांना बाय करतच आपल्या मित्रांना घेऊन घरी येतो..

राज : केवढा मोठा बंगला आहे यार तुझा..

शौर्य : येत जावा अस माझ्यासोबत रहायला.. मग मला ह्या बंगल्यात रहायला आवडेल..

रोहन : मला तर आवडेल तुझ्यासोबत रहायला यायला..

वृषभ : मला पण..

शौर्य मित्रांसोबत बोलतच त्यांच्या रूममध्ये जातो..

शौर्य : तुम्ही चौघे एकाच रूममध्ये झोपणार??

टॉनी : आता कॉलेजपण संपलना मित्रा.. परत कुठे असले क्षण एन्जॉय करायला मिळणार..

ए वृषभ तुझ्या घरून फोन येतोय.. रोहन आपला मोबाईल रोहनकडे देतच बोलतो..

रोहन : कट करून लाव हवं तर.  मला फ्री आहेत कॉलिंग..

ओके अस बोलत वृषभ रोहनच्या हातुन फोन घेतच गेलरीत जातो..

शौर्य : ह्याचा फोन काय झाला??

शौर्य अस बोलताच तिघेही एकमेकांकडे बघु लागतात..

काय झालं तुम्ही अस एकमेकांकडे का बघतायत??

(काय झाला असेल वृषभचा फोन?? पाहुया पुढील भागात.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all