अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 82

In marathi

रॉबिन शौर्यला आपल्यासोबत घेऊन ठरलेल्या ठिकाणी येत असतो.. नैतिक आणि आर्यन रॉबिन राहिला कुठे हे बघायला बाहेर येतात.. तोच समोर त्यांना रॉबिन दिसतो.. दोघेही पळतच त्याच्याजवळ जातात..

नैतिक : ए मॅड तु ह्याला अस का घेऊन येतोयस??

आर्यन : बघ तर..

रॉबिन : आता उचलून कस घेऊ ह्याला..?? लहान आहे का तो उचलुन घ्यायला.. आय नो बर्थडे आहे त्याचा म्हणुन एवढे लाड मी नाही करू शकत.. सॉरी बॉस..

नुसते जॉक.. नुसते जॉक.. अस बोलत रॉबिनला आर्यन आणि नैतिक मिळुन मारू लागले..

रॉबिन : ए पागल लोक मी सिरियसली बोलतोय.. मारता कश्याला.. ए शौर्य सांगना यार ह्यांना..

शौर्य : वेरी गुड गाईज.. माझ्यावरच पण एक दोन मारा.

रॉबिन : ए शौर्य.. तुझा खरच मराठीचा प्रॉब्लेम झालाय.. I said help me. मला मदत कर अस बोललो.. तु काय त्यांना मला अजुन मारायला सांगतोयस..

शौर्य : आणि काल तु काय करत होतास.. हे दोघ मला मारत होते तेव्हा.. माझ्यावरच पण मारा अजून ह्याला अस कोण बोललं??

रॉबिन : सॉरी ना यार.. प्लिज शौर्य सांगना ह्यांना.. हात लागतोय यार ह्यांचा..

शौर्य : आर्यन आणि नैतिक प्लिज.. स्टॉप.. तुमचे हात सिरियसली लागतात यार.

नैतिक : SD तु बाजुला हो रे.. तुला नाही माहीत काही.. ए रॉबिन तुला गाथाने काय सांगुन पाठवलेलं..

रॉबिन : मला फक्त ह्याला तिथे घेऊन ये म्हणुन सांगितलेलं.. बाकी काही नाही बोलली ती..

आर्यन : पण कस घेऊन ये बोलली ती तुला??

रॉबिन : परत तुमच तेच..?? मी उचलुन कस घे..

ए रॉबिन तु सिरियसली बोलतोस का आता अजुन देऊ तुला??? मध्येच रॉबिनला तोडत आर्यन बोलतो.. आणि परत रॉबिनच्या डोक्यात मारू लागतो.

नैतिक : ए आर्यन तु कुठे ह्या मॅडच्या नादी लागतोयस.. रॉबिन सिरियसली यार तु एक काम नीट नाही करत.. महत्वाची काम ना तुझ्यावर कोणी सोपवु नये..

रॉबिन : एक मिनिट गाथा मला बोलली की शौर्यला आणि त्याच्या मित्रांना त्या रूममध्ये घेऊन ये..

आर्यन : डोळे उघडे आहेत त्याचे..

रॉबिन : ओहहह हा यार... सॉरी.. ते घाई घाईत.. मी येतो आता बरोबर.. तुम्ही लोक जावा आत..

नैतिक : अजिबात नाही.. तु ह्या लोकांना आत घेऊन जा.. आम्ही आणतो बरोबर त्याला..

आर्यन : ए गाईज तुम्ही लोक ह्या रॉबिनसोबत आत जावा.. आम्ही SD ला घेऊन येतो..

शौर्य : काय चाललंय तुमचं??

रोहन : शौर्य आम्ही जाऊ का ह्याच्यासोबत??

आर्यन : ए रोहन.. आम्ही चांगल्या घरची मुलं आहोत यार... अस तस काही करणार नाही आम्ही तुमच्यासोबत..

रोहन : तु अस का बोलतोयस..??

आर्यन : मग तो तुझा बॉयफ्रेंड असल्यासारखी परमिशन कसली घेतोयस. मी बोलतोय ना आत जावा..

नैतिक : ए गाईज प्लिज जावा लवकर. टाईम वेस्ट नका ना करू यार.. 

आर्यन : ए रॉबिन ह्या लोकांना जा लवकर घेऊन..

रॉबिन सगळ्यांना आत घेऊन जातो..

शौर्य : तुमचं काय चाललंय..??

आर्यन आपल्या खिश्यातुन रुमाल काढत शौर्यच्या डोळ्यांवर बांधतो.. नैतिक स्वतःसोबत घेऊन आलेल्या केमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड करत असतो..

शौर्य : आता हे काय आहे नवीन..

आर्यन : नैतिक तुझा रुमाल असेल तर दे ह्याच्या तोंडाला पण बांधतो.. मग तरी शांत बसेल हा..

शौर्य : नाही नको.. मी शांत बसतो..

नैतिक : शौर्य आर यु रेडी??

शौर्य : हम्म..

इथे दिल्ली गेंग रॉबिन सोबत आत जाऊ लागली.. 

रोहन : किती भारी सजवलय हे सगळ.

राज : हो ना.. एकदम भारी बर्थडे करतायत शौर्यचा..

रॉबिन : आम्ही आमच्या सगळ्या मित्र मंडळींचे बर्थडे असेच सेलिब्रेट करतो.. तुम्ही लोक काल यायला हवे होते.. काल रात्री 12 वाजता एकदम मस्त सेलिब्रेशन केलं आम्ही.. आणि आता पण मस्तच आहे... जस्ट सी एन्ड वॉच..

वृषभ : आम्हाला माहीत असत हा इथे आहे तर आम्ही आलोच असतो.. हा शौर्यचा फोटो??

(एन्टर करताना एक मोठासा फोटो लावला असतो.. तो फोटो बघतच वृषभ बोलतो)

रॉबिन : ए मॅड तो शौर्य नाही त्याचा बाबा आहे त्यांच्या हातात तो बाबु आहे तो शौर्य आहे आणि ती त्याची मम्मा.. त्याच्या 1st बर्थडेचा पिक आहे तो.. 

रोहन : मला तर शौर्यच वाटतोय..

राज : सॅम त्याच्या बाबा सारखा दिसतो ना..

वृषभ : हो ना.. 

सगळेच डेकोरेशन बघत आत इंटर करत असतात.. 

रॉबिन : अरे मित्रा खाली बघुन.. ते सगळं शौर्यसाठी आहे.. प्लिज बाजुने या..

सगळेच रॉबिनने सांगितल्याप्रमाणे बाजुने आतमध्ये जातात.. 

एक छोटासा काँफेरेन्स रूम शौर्यच्या मित्रमंडळींनी मस्त सजवलेला..

आत बाकीची इतर मित्रमंडळीपण असतात..

ज्योसलीन : ए रॉब तु शौर्यला घेऊन येणार होतास ना.. आणि एवढा लेट??

रॉबिन : ते आर्यन आणि नैतिकमुळे.. तो आर्यन पाठीच लागला.. त्यालाच शौर्यला घेऊन यायच म्हणुन.. लहान मुलासारखं रडत होता यार अक्षरशः. काळ वेळ काही कळतच नाही दोघांना पण.. मग मीच म्हटलं ठिक आहे तुच घेऊन ये.. अजुन उशीर नको..

(रॉबिन अस बोलतात.. वृषभ आणि रोहन एकमेकांकडे बघत हसु लागत.. सोबत राज आणि टॉनी सुद्धा)

प्रतीक : लहान आहे का तो..?? नुसती मस्ती असते यार दोघांची.. सकाळी पण तेच चालु होत..

रॉबिन : बघ तर.. बर्थडे झाला ना की मग विचार तु त्याला.. वॉव्ह ब्रुनोला पण कॅप घातलीस?? 

(गाथाच्या हातात ब्रूनोला बघतच रॉबिन बोलतो)

आमच्या कॅप कुठे आहेत??

गाथा : त्या बघा टेबलवर आहेत.. गाईज तुम्ही लोकांनी पण घाला.. ओके.

वृषभ : हम्मम..

इथे आर्यन शौर्यला आत घेऊन येतो..

आर्यन : नैतिक पॉज दि व्हिडीओ..

आर्यन अस बोलताच नैतिक व्हिडीओ पॉज करतो..

आर्यन : SD.. मित्रा समोर नैतिक सगळं शुट करतोय.. इथुन तुझ सरप्राईज चालु होतय.. सगळं नीट बघ.. नैतिक सगळं शुट करतोय म्हणुन तो इथे तुझ्यासोबत थांबलाय.. प्लिज त्याला प्रश्न विचारत नको बसुस.. आणि हा सगळा प्लॅन तुझ्या लाईफमधल्या स्पेसिअल व्यक्तीने केलाय.. आणि आम्ही त्यासाठी मेहनत घेतलीय.. बघ आवडत का.. नैतिक रेडी बोलेलं तेव्हा तु डोळ्यांवरचा रुमाल काढ ओके..

शौर्य : ओके...

शौर्यच हृदय आता मात्र धडधडु लागलं असत..

आर्यन त्याला तिथेच सोडून आत निघुन जातो..

नैतिक : रेडी..

नैतिक रेडी बोलताच शौर्य डोळ्यावरील रुमाल काढतो.. आजु बाजूला फुग्यांनी बनवलेला गेट असतो.. सोबत सुंदर अशी लायटिंग.. सगळीकडे नजर फिरवत तो पुढे पुढे जातो.. सुंदर असा फुलांचा सुगंध त्याच्या नाकात शिरतो.. खाली हार्ट शेप मध्ये गुलाबांच्या पाकळ्या सर्वत्र पसरलेल्या असतात त्यावर चाफ्याच्या फुलांच्या सहाय्याने 1 नंबर लिहिलेला असतो.. ओठांवर हसु आणतच तो ते बघतो..  तोच समोर त्याचा त्याच्या बाबा आणि मम्मा सोबतचा पहिल्या बर्थडेचा फोटो त्याला दिसतो.. खुप वर्षांनी आपल्या बाबासोबतचा तो फोटो बघुन त्याला थोडं भरून येत.. फोटो दिसणाऱ्या आपल्या बाबाच्या चेहऱ्यावर हात फिरवतच तो थोड पुढे जातो.. 

पुन्हा तसच गुलाबांच्या पाकळ्यांनी सजवलेल हार्ट शेप आणि त्यावर चाफ्याच्या फुलांच्या मदतीने 2 नंबर लिहिलेला असतो.. पुढे जाताच त्याच्या दुसऱ्या बर्थडेचा फोटो असतो.. ह्या फोटोत त्याचा बाबा आणि तोच असतो.. बाबाच्या खांद्यावर बसुन बाबाचे केस तो ओढत असतो.. त्यात त्याच्या बाबाने बनवलेला फनी फेस बघुन हलकच हसु त्याच्या ओठांवर येत.. पुन्हा फोटोत दिसणाऱ्या बाबाच्या चेहऱ्यावर हात फिरवत तो पुढे येतो..

पुन्हा तसच हार्ट शेपमधील गुलाब.. आणि त्यावर ह्यावेळेला नंबर 3 असतो.. ह्या बर्थडेला पण त्याच्या सोबत त्याचा बाबा होता.. त्याच्या बाबाने आणि मामाने डोक्यावर बर्थडे कॅप घातली होती आणि मध्येच शौर्यला उभं करत त्याचा हात पकडत कॅक कट करतानाचा फोटो होता.. शौर्य खुप वेळ तो फोटो बघत बसतो..  

पुन्हा पुढे हार्ट शेपवर 4 नंबर असतो.. पुन्हा त्याच्या 4th बर्थ डे चा फोटो.. ह्या फोटोत फक्त तो आणि त्याचा बाबा.. त्याचा 4th बर्थडे बाबाने गोव्याला केलेला.. दोघांनीही सॅम शर्ट घालुन.. डोळ्यांत गॉगल लावुन हाताची घडी घालत एकमेकांकडे बघत एक सुंदर अशी पॉज देत गोवा बिचवर काढलेला तो फोटो असतो.. फोटोत दिसणाऱ्या बाबाच्या फेसवर हात फिरवत फोटोवर किस करत तो पुढे जातो.. 

पुढे पुन्हा हार्ट शेपवर नंबर 5.. शौर्यच्या गालावर एका बाजुने त्याची मम्मा आणि एका बाजूने त्याचा बाबा किस करताना काढलेला तो फोटो होता.. शौर्य तो फोटो बघुन हसतच पुढे जातो.. 

पुढे पुन्हा हार्ट शेपवर नंबर 6 लिहिलेला.. तो त्या नंबरकडेच बघत बसला.. त्याला त्या बर्थडेच्या मेमरिस आठवत होत्या.. त्याचा सहावा बर्थडे त्याच्या बाबाने सिंगापोरला केलेला.. त्याची आत्या, निधी, आजी, काका, काकी, मामा, मामी सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन सिंगपोरला मोठा असा बर्थडे केलेला.. हॉटेल मधल्या रेस्टोरेन्ट मध्ये सगळे जेवत होते.. बोलता बोलता आत्याने त्याच्या बाबाला विचारलं... 

आत्या : काय मग दादा.. लेकाचा हा बर्थडे तर आऊट ऑफ कन्ट्री केलास.. मग पुढचा बर्थ डे कुठे??

बाबा : मला तर वाटत आऊट ऑफ वर्ड.. बाबा हसतच बोलला.. 

आत्या : चंद्रावर वैगेरे घेऊन जातोस की काय आता कॅक कापायला?? 

बाबा : आयडिया छान आहे.. तु बोलतेस तर मी नक्की विचार करेल..

आत्या : तिथे पण अशीच बुकिंग वैगेरे करावी लागत असेलना.. 
(आत्या मस्तीच्या सुरात बोलते)

बाबा : मग काय माझ्या चेम्प साठी मी स्वतः आधी पुढे जाऊन बुकिंग करेल.. (बाबा पण मस्तीच्या सुरात बोलतो)

आत्या : ए दादा आपल्या बहिणीला विसरू नकोस न्यायला..

बाबा : माय डियर सिस्टर.. आधी माझ्या लिटिल चॅम्पचा आपण हा बर्थडे तरी एन्जॉय करूयात.. काय माहीत पुढचा बर्थडे असा एन्जॉय करायला नाही मिळाला तर.. कल किसने देखा हे...

अनिता : शेखर काहीही का बोलतोस.. चांगल्या दिवशी..

मस्ती करतोय ग वहिनी तो.. त्याला सवयच आहे असे डायलॉग मारायची.. त्याची आत्या आपल्या भावाची बाजु सावरतच बोलली..

शौर्य पुढे येऊन बघतो तर सिंगपोरमध्ये बाबा सोबत हॉर्स रायडिंग करतानाचा फोटो होता.. दोघांनीही सॅम कॅप डोक्यावर घातलेली.. बाबाच्या पुढ्यातच बसत शौर्य त्याच्या लाडक्या बाबासोबत हॉर्स रायडींग करत होता.. पुन्हा बाबाच्या फेसवर हात फिरवतो.. एकटक त्या फोटोत बघत राहतो. डोळ्यांतुन येणार पाणी आता त्याला कंट्रोल नाही होत.. फोटोकडे बघत घुडग्यावर बसुन तो रडु लागतो... नैतिक व्हिडीओ पॉज करत पळतच त्याच्या जवळ येतो..

नैतिक : SD काय झालं रे?? आम्ही तु अस रडावं म्हणुन नाही केलं यार हे.. तु तुझ्या आयुष्यातली ती वीस वर्षे आठवावी म्हणुन हे केलं रे.. प्लिज रडु नकोना..

शौर्य : बाबाची आठवत येतेरे खूप.. ह्या बर्थडे नंतर तो मला एकट्याला सोडुन गेला.. 

नैतिक : ए SD तुझा बाबा इथेच असेल कुठुन तर तरी तुला बघत... तु रडु नकोसना.. डोळे पूस बघु.. प्लिज.. नाही तर मी पण रडेल हा आता..

नैतिक त्याला पकडतच उभं करतो.. शौर्य डोळे पुसतो आणि उभं रहातो..

नैतिक : रेडी??

शौर्य मानेनेच हो बोलतो..

नैतिक : एक छान स्माईल दे बघु..

शौर्य एक खोल श्वास घेत नैतिकला स्माईल देतो. आणि पुढे बघतो..

पुढे हार्ट शेप ठेवलेल्या गुलाबांच्या पाकळ्यांवर 7 नंबर असतो.. त्याचा फक्त एकट्याचा फोटॉ असतो.. कारण बर्थडे सेलिब्रेशन झालंच नसत.. जस्ट 5 महिन्या आधीच त्याचा बाबा त्याला सोडून गेला असतो... मला माझा बाबा पाहिजे कॅक नको अस शौर्य त्याच्या मम्माल ओरडुन ओरडुन सांगत होता.. रडून रडून त्याने घर डोक्यावर घेतल होत.. तो फोटो बघुन तो पुढे येतो..

नंबर 8.. त्याचा आणि विराजचा फोटो असतो.. विराज त्याला कॅक भरवत असतानाचा फोटॉ असतो...
 
पुढे हार्ट शेपवर नंबर 9.. समोर फेमिली क्लिक असतो.. त्यात सुरज, विराज, तो आणि अनिता असतात.. पण त्या फोटोत शौर्यच्या चेहऱ्यावरच हसु गायब असत..

नंबर 10.. ज्योसलीनच्या फॅमिलीसोबत फोटॉ क्लिक केला होता.. ज्योसलीनच्या डॅडने शौर्यसाठी बर्थडे सेलिब्रेशन केलेलं ते ही त्यांच्या घरी कारण त्याची लाडकी मम्मा ब्रांच व्हिजिटिंगसाठी आऊट ऑफ स्टेट गेली होती.. 

नंबर 11.. ह्यातपण फॅमिली फोटो असतो.. विराज आणि अनिता शौर्यचा हात धरून कॅक कट करत असतात.. पण शौर्य एकटक घाबरतच बाजुलाच उभं असलेल्या सुरजकडे बघत असतो.. त्याला त्यावेळी घडलेला प्रसंग आठवतो.. शौर्यचा बर्थडे म्हणुन संध्याकाळी लवकर यायसाठी अनिता सकाळी लवकर कामावर निघुन गेली असते.. विराज मित्र मंडळींसोबत खेळायला बाहेर गेला असतो.. 10 वाजुन गेले असतात.. शौर्य आपल्या रूममध्ये झोपुनच असतो.. घरी कोणी नाही हे बघुन सुरज त्याच्या रूममध्ये येतो.. त्याला जबरदस्ती उठवतो.. सुरजला अस आपल्या रूममध्ये बघून शौर्य घाबरला असतो.. 

हॅप्पी बर्थडे माय डिअर शौर्य.. चेहऱ्यावर खोटं हसु आणत आपला उजवा हात शौर्यसमोर धरतच तो बोलतो.. शौर्य मात्र त्याला हात मिळवत नसतो.. तो घाबरतच थोडं मागे सरकुन बसतो...

सुरज : तुला माझा हात दिसत नाही.. 

तरीही शौर्य घाबरतच एकटक त्याच्याकडे बघत असतो..

सुरज तसाच हात समोर धरून असतो.. शौर्य हात मिळवत नाही हे बघुन सुरज जबरदस्ती त्याचा हात आपल्या हातात घेतो..

हॅप्पी बर्थडे.. अस बोलत जोरातच त्याचा हात तो दाबतो..

आ.. डॅड हात दुखतोय.. प्लिज.. शौर्य कळवळतच सुरजला बोलत असतो.. पण सुरजला मात्र तो अस रडताना बघुन मज्जा येत असते.. 

सुरज : ह्यापुढे ह्या घरात तुझं बर्थडे सेलिब्रेशन मला नकोय.. समजलं?? कॅक कटिंग वैगेरे अजिबात नकोय मला..

शौर्य : मम्मा प्लिज लवकर ये.. विरचा डॅड त्रास देतोय.. आ... डॅड हात सोड दुखतोय.. प्लिज.. मम्मा..

शौर्य जोरजोरात ओरडत त्याच्या मम्माला आवाज देत होता.. पण त्याला माहितीच नसत त्याची मम्मा आज पण ऑफिसला गेलीय..

कम्प्लेन्ट करतोस माझी?? अस बोलत सुरज शौर्यचा हात अजुन जोरात दाबत , सोबत त्याचे केस ओढत त्याला त्याच्या रूममधुन ओढतच स्टोररूमध्ये घेऊन जातो.. घरातील नोकर मंडळी सुरजला शौर्यला असं ओढत घेऊन जाताना बघतच बसतात.. पण ती लोक पण सुरजला खुप घाबरतात.. म्हणुन कोणी काहीच बोलत नाही.. आणि अनिताला हे सगळं सांगायची त्यांची हिंमत पण होत नसते.. सुरज शौर्यच्या केसांना पकडतच त्याला स्टोररूममध्ये ढकलतो आणि रूम लॉक करून घेतो..

डॅड प्लिज परत नाही करणार.. मला भीती वाटते इथे.. प्लिज बाहेर काढ.. मम्मा.. विर.. शौर्य आतुन ओरडत होता... पण शौर्यचा आवाज ऐकुन न ऐकल्यासारखं करत तो तिथुन निघुन जातो.. चार वाजता अनिता येणार हे सुरजला माहीत होतं.. म्हणुन 3 वाजता शौर्यला त्याने अंधारभऱ्या रूममधुन बाहेर काढलं असत.. 

बर्थडे सेलिब्रेशन नकोय मला.. कॅक कटिंग तर अजिबात नकोय.. आणि जर मम्माकडे माझी कम्प्लेन्ट केलीस तर ह्याच्या डब्बल मी तीला त्रास देईल.. त्याचे केस ओढतच त्याची मान आपल्याकडे करत त्याला धमकी देत त्याने त्याला बाहेर काढलं.. पळतच शौर्य तिथुन आपल्या रूममध्ये जाऊन बाबाच्या फोटॉला मिठी मारून रडतो.. बाबाचा फोटॉ तसाच ठेवत फ्रेश होऊन पळतच ज्योच्या घरी जाऊन लपुन बसला.. पण अनिताने ऑफिसमधुन येतानाच त्याच्यासाठी कॅक आणला होता.. विराज जबरदस्ती त्याला ज्योसलीनकडुन घेऊन येतो. पण सुरजच्या भीतीने तो कॅक कापत नसतो.. शेवटी अनिता आणि विराज जबरदस्ती त्याचा हात पकडत कॅक कापतात.. आणि शौर्य घाबरतच सुरजकडे बघत असतो.. आणि तोच फोटोग्राफर फोटो क्लिक करतो.. शौर्यला तो फोटो बघून ते सगळंच आठवत असत..

पुढे नंबर 12.. विराजच्या नवीन मोबाईलमध्ये विराजने त्याचा आणि शौर्यचा फोटो क्लिक केला असतो.. आणि अनिताला तेव्हा पण शौर्यसाठी वेळ नाही हे बघुन विराज आपल्या भावाला घेऊन हॉटेलमध्ये जातो.  

पुढे नंबर 13.. फक्त शौर्यचा एकट्याचा गिटार वाजवतानाचा फोटॉ होता.. अनिता कामात बिजी.. आणि विराज त्याच्या डॅडसोबत बाहेर गेलेला . तो बर्थडे पण त्याचा असाच गेला..

पुढे नंबर 14... ह्यात त्याचे सगळे मित्र मंडळी होते.. पॉकेटमनी मधुन शौर्यसाठी कॅक घेतलेला.. आणि घराजवळच असलेल्या समुद्र ठिकाणी बसून शौर्यने कॅक कट केलेला.. ज्योसलीनने फोटॉ क्लिकसाठी तिच्या डॅडचा फोन मागुन आणलेला.. आणि त्या मोबाईलमध्ये क्लिक केलेला फोटॉ होता तो.. आपल्या मित्रमंडळींचे तेव्हाचे चेहरे बघुन शौर्यला हसु येत..

पुढे नंबर 15.. ह्या बर्थडेला त्याच्या मम्माने त्याला मोबाईल गिफ्ट दिलेला.. शौर्यने आपल्या मोबाईलमध्ये स्वतःचाच सेल्फी क्लिक करताना फोटो काढलेला..

पुढे नंबर 16.. त्याला आठवत असत तो त्याच्या मम्माच्या मागे लागलेला बाईक घे म्हणुन.. पण अजुन लहान आहेस अस बोलुन अनिता टाळत होती.. पण त्याच्या विरने त्याच्यासाठी त्याच्या बर्थडे ला बाईक गिफ्ट केली असते.. पण कॉलेजमध्ये वैगेरे घेऊन जाणार नाहीस अशी वॊर्निंग त्याला दिली होती.. त्याच बाईकवर बसुन काढलेला तो फोटो होता..

पुढे नंबर 17.. हॉटेलमध्ये मित्रांसोबत बर्थडे पार्टी करतानाचा फोटो होता..

पुढे नंबर 18.. USA मध्ये त्याने ठेवलेल्या त्याच्या नवीन लुकसोबत फोटॉ होता..

पुढे नंबर 19.. त्यात पण USA मध्ये तिकडच्या मित्रमंडळींसोबत कॅक कटिंग करतानाचा फोटॉ होता..

नंबर 20 हा काँफेरेन्स रूमबाहेर मोठ्या अश्या हार्टशेपमध्ये लिहिलेला होता.. तो त्या हार्टशेपवर उभं रहातच गुलाबांच्या पाकळ्या त्याच्यावर पडतात..

तो सरळ आत जातो.. तस वर्ती अडकवलेला मोठा बलुन फुटतो.. त्यात भरलेली चमकी शौर्यच्या अंगावर पडते..

वन्स अगेन हॅप्पी बर्थडे शौर्य... सगळे जोरात ओरडतात.. शौर्यच लक्ष समोरच गाथा आणि तिच्या हातात असलेल्या ब्रुनोकडे जात.. एक गोड स्माईल देत तो आपल्या सगळ्या मित्रमंडळींकडे बघतो.. सगळ्यांनी बर्थ डे कॅप घातल्या असतात..

शौर्य सगळ्यांनी मिळुन डेकोरेट केलेली रूम बघतच रहातो.. 

शौर्य : गाईज किती छान आहे यार हे.. थेंक्यु सो मच..

हे आमच गिफ्ट अस बोलत.. बाकीची मंत्रमंडळी त्याला गिफ्ट देतात.. सगळेच शौर्यसोबत मस्त फोटो शुट करतात..

ज्योसलीन : शौर्य तुझ्या आवडीचा डिनर आम्ही अरेंज नाही करू शकलो यार.. म्हणजे वेळ नाही मिळाला.. 

शौर्य : ए ज्यो.. बस ना अजुन किती काय करणार यार तुम्ही.. मी खरच खुप हॅप्पी आहे आज.. बाबा गेल्यानंतरचा हा माझा पहिला बर्थडे एवढा छान सेलिब्रेट झालाय.. खरच मी हे सगळं इमॅजिन पण नाही केलेलं.. मी तुम्हांला जेवढं थेंक्स बोलेल ना तेवढं कमीच वाटेल मला. मी खरच खुप खुश आहे आज.. तुम्ही ही माझ्यासाठी घेतलेली मेहनत, हे सरप्राईज.. खरच छान.. आज हे स्पेसिअल गिफ्ट पण मिळालं मला..(आपल्या दिल्लीच्या मित्रमंडळींकडे हात करत तो बोलतो).. आणि गाथा स्पेसली थेंक्स टु यु.. सकाळ पासुन ते आत्तापर्यंत मी कस हॅप्पी राहील ह्याचा तु विचार करतेयस त्याबद्दल.. आणि तुम्हा सगळ्यांनाच पुन्हा एकदा थेंक्स..

आर्यन : तुझी फॉर्मेलिटी झाली असेल तर चला लंच करूयात..

सकाळप्रमाणेच आत्ताही एका सुंदर अश्या टेबलवर शौर्यच्या जेवणाची व्यवस्था केली असते.. गुलाबांच्या पाकळ्या व त्यावर ठेवलेलं ताट..

प्लिज सर तुम्ही इथे बसा.. रॉबिन रिक्वेस्ट करतच शौर्यला त्या टेबलवर बसायला सांगतो.. 

शौर्य : ओके रॉबिन सर.. अस बोलत शौर्य चेअरवर बसतो..

बाकीचे मंडळी त्याच्या बाजूला असलेल्या चेअरवर बसतात.. गाथा शौर्यच्या बाजूलाच असलेल्या चेअरवर जाऊन बसते..

आर्यन : गाईज जे व्हेज आहेत त्यांनी SD च्या राईट साईडला बसा जे नॉन व्हेजी टेरियन आहेत त्यांनी लेफ्टला..

रॉबिन : ए आर्यन, मॅन कमऑन यार.. आता बसलेत तर बसु दे ना.

आर्यन : अरे त्या वेटरला वाढायला बर पडेल.. 

सगळे आर्यनने सांगितल्याप्रमाणे जागा बदलून परत बसतात..

वेटर येऊन सगळ्यांच्या ताटात जेवण वाढु लागतो.. चुकुन शौर्यच्या ताटात तो चुकुन नॉन व्हेज वाढतो..

शौर्य : एक मिनिट.. मी व्हेजिटेरेयन आहे.. मला हे चिकन वैगेरे नको.. आणि ही प्लॅट पण नको आता.. प्लिज प्लॅट पण बदला..

वृषभ : तु व्हेजिटेरेयन कधी पासुन झालास?? दिल्लीत तर खायचास ना??

शौर्य : मला USA ला गेल्यापासून नाही खावस वाटत.. 

नैतिक : म्हणजे त्यादिवशी तु खर बोलत होतास तर..

शौर्य : ए नैतिक मी नेहमी खरच बोलतो..

नैतिक : हे तु खर बोलतोयस ना..??

नैतिक अस बोलताच सगळे हसु लागतात..

रोहन : तु खरच नॉन व्हेज नाही खात..

शौर्य : नाही.. दोन वर्ष झाली..

रॉबिन : त्याने सोडलं मग तु पण सोडतोस कि काय??

रोहन : नाही रे.. मी का सोडु.. मला तर नॉनव्हेज खुप आवडत..

राज : शौर्य बोलला तर तो सोडेल पण त्याच्यासाठी.. काय रोहन??

रोहन : त्याच्यासाठी काय पण.. शौर्य सोडु काय बोल??

शौर्य : तुला आवडत तर खा बिनदास्त..

वृषभ : तु कायमच बंद केलंस का??

शौर्य : तस काही ठरवलं नव्हतं रे... बट आता हो कायमचंच बंद केलं.

(गाथाकडे बघतच शौर्य बोलतो)

रॉबिन : ए गाईज पटकन जेवा आपल्याला निघायचंय..

प्रतीक : कुठे रे??

आर्यन : तुला नाही माहीत प्रतीक??

प्रतीक : काय??

नैतिक : अरे हा SD पण आता भावाच बघुन लग्न करायच बोलतोय.. त्याची तैयारी नको का करायला..

प्रतीक : काय बोलतोस?? SD कोणाशी रे??

रॉबिन : अरे गाथा...

(रॉबिनने गाथाच नाव घेताच शौर्यला ठचका लागतो..)

रॉबिन : तुला काय झालं?? पाणी पी..

शौर्य : तेच मी तुला विचारतोय.. तुला काय झालं..??

रॉबिन : मला कुठे काय झालं.. अरे गाथा.. रसमालाई छान आहे.. तुच ऑर्डर दिलेलीस ना. अस बोलणार होतो गाथाला. पण तुला काय झालं??

शौर्य : रॉबिन तु पुर्ण बोलत जा ना.

ज्योसलीन : शौर्य तो पुर्णच बोलत होता. तुच त्याला पुर्ण बोलु दिलं नाहीस.. हो की नाही रे रॉब??

(रॉबिनला हसतच टाळी देतच ज्योसलीन बोलली.. गाथा ज्योसलीनच बोलणं ऐकुन गालातल्या गालात हसत असते.)

रॉबिन : होणं..

शौर्य : जोडी शोभून दिसते दोघांची.. 

रॉबिन : ए फॉरेनर.. She was correct.. and you know what??

(अस बोलत रॉबिन मध्येच थांबतो..)

शौर्य : what??

रॉबिन : That's the same i am asking to you men?? you know na what??

शौर्य : but wha... t??

आर्यन : but what नाहिरे only what..

शौर्य : तुला बोलायच काय आहे ते नीट बोल.. मराठीत..

रॉबिन : अरे तुझा मराठीचा प्रॉब्लेम झालाय म्हणुन आम्ही इंग्लिश मध्ये बोलतोय.. 

गाथा : शौर्यपेक्षा ना तुम्ही लोकच जास्त इंग्लिश बोलता.. तो मराठीतच बोलतो.

ज्योसलीन : येहहह रॉब व्ही व्हीन..

रॉबिनला टाळी देतच ज्योसलीन बोलते..

आर्यन डोक्यावर हात लावुन बसतो..

शौर्य : काय चालल काय आहे तुमच..??

ज्योसलीन : तुला नाही कळणार.. जेवा तुम्ही लोक..

रॉबिन : आर्यन सँडे फिक्स मग.. 

आर्यन अंगठा दाखवतच हो बोलतो..

सगळे मज्जा मस्ती करत जेवण आटोपतात..

रॉबिन : गाईज चला जाऊयात शॉपिंगला..?? मग दुकान बंद होतील.. शौर्य तु पण चल ना..

शौर्य : इथे काम आहेरे..

गाथा : मी आहे ना मी करते मॅनेज.. तसही तु सोबत असल्यावर त्यांना बर वाटेल.. 

वृषभ : हो ना.. शौर्य चल ना तु पण..

शौर्य :  बर.. (शौर्य थोडं विचार करतच बोलतो)... ब्रूनोला दे इथे मी रूममध्ये ठेवुन येतो.. रूमची कि रॉबिन तुझ्याजवळ आहेना??

रॉबिन : तु रूमवर का जातोयस??

शौर्य : कारची की नको आणू का??

रॉबिन : बर ये लवकर.. 

शौर्य ब्रूनोला रूममध्ये ठेवत कारची किल्ली घेऊन येतो..

इथे अनघा आणि विराजच जेवण आटोपुन झालं असत..

श्री : वरकुल आम्ही दोघ निघतो.. उद्या येतो..

अनघा : तु रहाणार होतास ना?? नाही म्हणजे प्रीती बोलली मला तस..

प्रीती : हो रहाणार होतो पण..

श्री : ते माझ्या बहिणीला थोडं बर नाही वाटत.. आम्ही उद्या येतो.. रिसेप्शनला.. 

विराज आणि अनघा एकमेकांकडे बघतात.. 

विराज : बर.. उद्या नक्की या दोघांनी.. मी वाट बघतोय..

श्री : हम्मम.. बाय.. आणि पुन्हा एकदा काँग्रेस.. लग्न एकदम भारीच झालंय.. उद्याच रिसेप्शन बघायची एकसाईटमेंट आहे आम्हाला..

विराजला मिठी मारतच श्री बोलतो..

विराज : आम्हां दोघांना पण.. अजुन काय काय सरप्राईज शौर्यने ठेवलेत गॉड नॉज..

श्री : शौर्य भेटलाच नाही रे मला... आहे कुठे?? 

विराज : मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेट करतोय.. उद्या येशीलच ना.. मग भेट त्याला..

दोघेही विराज आणि अनघाचा निरोप घेऊन तिथुन निघतात..

श्री ची समीराला घेऊन खर तर खुप चिडचिड होत असते..

श्री : मला अस वाटत मी उगाच हिला चल बोललो ग.. किती वर्षांनी अस मित्रमंडळींसोबत गप्पा मारत बसलेलो आपण..

प्रीती : इट्स ओके श्री.. तीच डोकं दुखतंय.. मे बी ट्रॅव्हलिंगमुळे असेल.. घरी जाऊन आराम तरी करेल ती.. तस पण आपण उद्या येऊच.. 

दोघेही बोलत बोलत गाडीजवळ येतात..

तोच श्री ला शौर्य दिसतो.. समीरा आपल्या भावाच्या गाडीत त्याची वाट बघत बसली असते. शौर्य आपली गाडी काढत असतो.. समीरा गाडीतुनच त्याच्याकडे एक टक बघत असते.. शौर्यला मात्र ती दिसत नसते कारण समीराने विंडो बंद केली असते. 

श्री : शौर्य...

शौर्य गाडीचा डॉर ऑपन करून आत जाणार तोच श्री शौर्यला आवाज देत आपल्याकडे बोलावतो..

शौर्य : अरे दादा कसा आहेस??

श्री : किती बिजी यार तु.. आम्हाला बघुन पण इग्नोर करतोस..

शौर्य : अरे तस अजिबात नाही हा.. मी खरच नाही बघितलं..

श्री : प्रीती आपल्या वरकुलचा छोटा भाऊ.. आणि आपल्या समीराचा मित्र शौर्य.. आपल्या लग्नाच्या वेळेला मला खुप मदत केली ह्याने..  मी आत्ताच वरकुल आय मिन विराजला तुझ्याबद्दल विचारत होतो.. बाय दि वे हॅप्पी बर्थडे..

शौर्य : थेंक्स..

प्रीती : तु डान्स खुप छान करतोस.. आणि हॅप्पी बर्थडे..

(प्रीती शौर्यला हात मिळवतच बोलली)

श्री : अरेंजमेंट पण सुंदरच केलीस.. वरकुल बोलला तुझं प्लॅन आहे हे सगळं..

शौर्य : हो म्हणजे वहिनीची बहीण आणि माझं.. दोघांनी मिळुन केलंय प्लॅन.. बाय दि वे तुम्ही लोक कुठे चालले??

श्री : ते समीराला थोडं बर वाटत नाही.. म्हणुन घरी जातो.. उद्या भेटु रिसेप्शनला..

(समीरा त्यांच बोलणं ऐकत असते.. तिला वाटत शौर्य तिच्या दादाला विचारेल तिला काय झालं म्हणुन पण शौर्य तस नाही विचारत.. त्यामुळे ती नाराज होते)

शौर्य : बर ठिक आहे.. उद्या भेटुयात.. आता मी पण थोडं बिजी आहे.. उद्याची तैयारी चालु आहे ना.. तुम्ही सांभाळुन जावा..

श्री : हो बाय.

शौर्य : हम्म बाय.. गुड नाईट

शौर्य आपली गाडी काढतच गेटजवळ येतो.. मित्रमंडळी तिथेच उभी असतात..

शौर्य : रॉबिन ड्राइव्ह करना.. मला फोन येतोय..

शौर्य गाडीतुन उतरत फोन रिसिव्ह करतच बोलतो.. व्हिडीओ कॉल असतो.. फोनवर बोलतच तो रॉबिनच्या बाजुला येऊन बसतो..

शौर्य : हेय जस व्हाट्सएप मेन..

जस : where are you men?? कबसे फोन लगा रहे थे तुझे..

शौर्य : थोडा बिजी था यार.. अरे आर्यन तु पण आहेस तिथे..

आर्यन : Happy birthday यार..

शौर्य : तुम्हा लोकांच्या लक्षात होत..

आर्यन : बस काय.. तुझा बर्थडे कस विसरू.. बाकी गेंग पण होती इथे.. तु फोन उचलत नाही हे बघुन निघुन गेली प्रॅक्टिसला..

शौर्य : बिजी होतो रे थोडं.. आणि फोन कधी येऊन गेला तेच कळल नाही.. पण तु नाही गेला का प्रॅक्टिसला?? ह्या टाईमला रूमवर काय करतोस??

आर्यन : पाय फ्लेक्चर..

शौर्य : how??

आर्यन : अरे बेक फ्लिप मारताना बेलेन्स गेला.. 

शौर्य : ओहह.. टेक रेस्ट..

जसविंदर : Hey SD happy birthday men.. 

शौर्य : थेंक्स ड्युड..

जसविंदर : कब आ रहा हे इधर??

शौर्य : मे बी 1st जून..

आर्यन : ए यार प्लिज लवकर ये ना..

शौर्य : will try.. आणि बाकी गेंगला विचारलं म्हणुन सांग.. आता ठेवतो.. थोडं कामात आहेरे..

आर्यन : हो.. चल बाय..

शौर्य सगळ्यांना बाय करत फोन ठेवतो..

राज : तुझे तिथे पण मित्र झालेत ना??

शौर्य : हम्मम..

रॉबिन : लवकर फोन केला.. बर्थ डे विश करायला.. अजुन दोन तासांनी करायला सांगायच ना..

शौर्य : ए रॉबिन.. ते लोक 4 तासंपूर्वी फोन करत होते.. आणि मुळात त्यांना माझा बर्थ डे लक्षात पण आहे.. 

रॉबिन : 4 तासंपूर्वी??

शौर्य : तु बरा आहेस ना.. तिथे ह्या टायमिंगला दुपारचे 12 वाजले असतील.. म्हणजे सकाळी 8 वाजता ते लोक फोन करत होते. तिथे सगळ्यांची लाईफ पूर्ण बिजी असते रे.. त्यात वेळ काढुन ते लोक फोन करत होते..

रॉबिन : मी विसरलोच तु USA ला असतो ते.. 

शौर्य : गाईज पेपर कसे गेले तुम्हाला..

( शौर्य मागे तोंड करत आपल्या मित्रांना विचारतो)

रोहन : माझं बोलशील तर ठिक ठाक..

आमचं पण तसच.. सगळे एकत्र बोलतात..

वृषभ : तु डान्स भारी करतोस यार.. 

टॉनी : कसली ब्लॅकफ्लिप मारतोस यार तु..

शौर्य : मला ना USA ला जाऊन डान्समध्ये इंटरेस्ट येऊ लागला.. शॉ असतात तिथे.. मज्जा येते खुप..

रोहन : कस आहे तिथे??

शौर्य : खुप भारी.. मला यावस नाही वाटत तिथुन इथे.. सगळंच छान आहे.. कॉलेज, हॉस्टेल, मित्र परिवार, ऍक्टिव्हिटीस एन्ड ऑल..

रॉबिन : ए तु परत येणार आहेस ना?? नाही म्हणजे आम्हांला बोलत होतास ते मी तिथेच रहाणार.. मी नाही येणार एन्ड ऑल..

शौर्य : मला आधी तिथे जाऊ तर दे.. मग ठरवेल यायच की नाही ते.

रॉबिन : ओहह हो.. म्हणजे तिच्यासाठी काही पण.. USA केन्सल करतोस की काय??

शौर्य : ए रॉबिन प्लिज तु चिडवन थांबव हा.. एक तर अजुन कश्यात काही नाही.. आणि आज तुम्ही लोक तिच्यासमोर चिडवत बसलेले..

वृषभ : शौर्य ती तुझ्यासोबत डान्स करत होती ती..???

रॉबिन : तीना आपल्या शौर्यची गाथा.. (वृषभला मध्येच तोडत रॉबिन बोलतो). शौर्य लग्न करणार आहे तिच्यासोबत तस तो मला दुपारी बोललाय.. शौर्य तरी तुला बोलत होतो.. ते भटजी गाणी गात होते तेव्हा विरच्या बाजुला हार घेऊन उभं रहा.. फक्त तुला हारच घालायचा होता यार गाथाच्या गळ्यात... मग झालं असत तुझं पण लग्न.. मस्तपैकी विरसोबतच तु पण गेला असतास पेरिसला..

शौर्य : तु जरा गाडी बाजूला घे..

रॉबिन : का? काय झालं??

शौर्य : ते तु गाडी बाजुला घेतल्यावर सांगतो मी तुला..

रॉबिन : तुझ्या सारखा वेडा वैगेरे वाटलो का काय मी तुला.. गाडी अजिबात बाजुला घेणार नाही मी.. काय बोलायच ते असच आणि लांबुनच बोल.. 

शौर्य : तुला चालत्या गाडीतच माझा मार खायची हौस आली तर तुझी इच्छा..

रॉबिन : मी गाडी कुठे पण ठोकेल हा शौर्य.. जर मला मारलं वैगेरेस तर.. मी आधीच सांगतोय तुला. 

(शौर्य रॉबिनची मान पकडुन त्याला मारायला लागणार तोच रॉबिन त्याला बोलतो)

शौर्य : ब्लॅकमेल करतोस तु..??

रॉबिन : ह्याला ब्लॅकमेल करणं बोलतात?? तु बोलतोयस म्हणजे बोलत पण असतील.. मी जस्ट स्वतःला तुझ्यापासुन वाचवाव म्हणुन आपलं सहज बोलत होतो.. बर झालं सांगितलंस ते..

शौर्य : रॉबिन ती ज्यो कस तुला सहन करते रे..??

रॉबिन : जस तु आता मला करतोयस अगदी तसच.. आणि तु उलट बोलतोयस मी कस सहन करत असेल तिला अस बोल..

शौर्य हातात मोबाईल घेऊन कोणाला तरी फोन लावत असतो..

रॉबिन : कोणाला फोन लावतोयस..??

शौर्य : ज्योला.. तिला विचारायला नको का ती कस सहन करते तुला ते.

अजिबात नाही हा.. फोन दे बघु इथे.. रॉबिन शौर्यच्या हातातुन मोबाईल खेचतच बोलु लागला..

रोहन : अरे ए रॉबिन तु स्टेरिंग वरून हात का काढतोयस.. समोर बघुन गाडी ड्राइव्ह कर यार..

रॉबिन : मग ह्याला आधी फोन ठेवायला सांग..

वृषभ : ए शौर्य जाऊ दे ना मस्ती करतोय तो.. आपल्या राजची कॉपी आहे हा.. आणि रॉबिन ते भटजीना मंगलाष्टका बोलत होतेरे.. त्याला गाणं नाही बोलत..

रॉबिन : तेच ते रे.. पण तेव्हा हा उभं राहिला असता तर विरघा सोबत शौर्यगाथा पण बघायला भेटलं असत ना आपल्याला..

शौर्य : रॉबिन तुझ परत तेच.. 

रोहन : शौर्य नवीन फियांसी ना?? 

शौर्य : फियांसी अजुन झाली नाही रे. 

रॉबिन : पण होईल ना??

वृषभ : म्हणजे ते डान्स वैगेरे सगळं नाटक होत??

शौर्य : समीरा येईल अस वाटत होत मला म्हणुन तिला अस वाटावं ती माझी फियांसी आहे म्हणुन आम्ही एकटिंग करत होतो.. मला अस वाटलं की ती मला इतर मुली सोबत बघुन तिथुनच निघुन जाईल.. पण काही तरी भलतंच झालं..

राज : तु सुधारला नाहीस अजुन..

शौर्य : तस नाही रे राज. पण मला खुप त्रास होत होता.. विचार ह्या रॉबिनला.. 

रॉबिन : ती येईल म्हणुन हा USA ला पळत होता.. बट नेमकं विर ला कळलं.. मग काय आम्हां सगळ्यांसमोर अगदी प्रेमाने समजवल त्याला.. गालावर पाच बोट उठलेली शौर्यच्या..वर आम्हांला सुंदर आहे पर्सनल डेव्हलोपमेंटच लेक्चर दिलं ते वेगळंच.. विर पुढे ह्याच कुठे चालत.. मग शेवटी शौर्यनेच केन्सल केलं..

शौर्य : ते पण ह्या रॉबिनमुळे झालं.. नाही तर मी USA ला असतो आज. 

राज : अजून पण मार खातोस तु??

रॉबिन : मग काय.. विर तर चांगलाच धुतो ह्याला..

शौर्य : रॉबिन काहीही बोलू नकोस रे.. प्लिज गाडी बाजुला घे.. तिथे बघ शॉप ऑपन आहेत.. 

सगळे गाडीतुन उतरून शॉपिंगसाठी दुकानात जातात..

शौर्य : उद्या रिसेप्शन आहे आम्ही सगळे ब्लेझर घालणार आहोत.. तुम्ही पण तेच घ्या.. आणि इतर कपडे पण घ्या.. तुम्हांला आवडतील तसे..

वृषभ : ब्लेझर??

(वृषभ शौर्यकडे प्रश्नार्थी चेहरा करत बघु लागला)

रॉबिन : तुला ब्लेझर नाही माहीत..

वृषभ : माहिती आहेरे.. पण सिंपल काही तर घेऊयात ना..

शौर्य : वृषभ टाईम वेस्ट नको करुस यार.. सांगतो तेवढं कर..

वृषभ : अरे शौर्य पण..

शौर्य : प्लिज ना..

सगळेच शौर्य सांगेल तस शॉपिंग करत होते.. वृषभ स्वतःसाठी काही घेणार नाही हे बघुन शौर्यच त्याच्यासाठी शॉपिंग करत असतो..

काऊंटरवर येताच सगळेच आपापल्या खिश्यातुन पैसे काढु लागतात..

शौर्य : एक मिनिट.. हे सगळ माझ्याकडुन आहे.. तुम्ही लोक माझ्यासाठी माझ्यासोबत रहायला तैयार झालेत म्हणुन माझ्याकडुन तुम्हां लोकांना गिफ्ट..

रोहन : ए शौर्य.. उलट आम्हाला चांगलं वाटतंय तुझ्यासोबत आम्हांला परत पहिल्यासारख रहायला मिळतंय हे बघुन.. आणि आमच आम्ही देतो पैसे.. तु राहू दे..

राज : हो..

शौर्य : प्लिज नका ना टाईम वेस्ट करू.. 

आपल्या खिश्यातुन आपलं क्रेडिट कार्ड काऊंटरवर देतच तो बोलतो..

चौघेही एकमेकांकडे बघतच रहातात..

शॉपिंग आटोपुन पुन्हा रिसॉर्टवर जायला निघतात..

इथे गाथा आणि सोबत इतर जण नैतिकने केलेला व्हिडीओ बघायल बसतात..

गाथा : नैतिक मला नंतर पाठव हा व्हिडीओ..

नैतिक : हम्मम.. फोटो कोणी सिलेक्ट केलेले??

गाथा : मी आणि ज्योसलीनने मिळुन केलेले?? काय झालं??

नैतिक : व्हिडीओ बघ पुढे मग कळेल..

सगळेच व्हिडीओ बघु लागतात..

ज्योसलीन : शौर्य रडला का??

नैतिक : त्याला बाबाची आठवण आली त्याच्या म्हणुन.. त्याच्या बाबासोबतचे फोटॉ लावायची खरच गरज होती का??

गाथा : सॉरी.. पण मला नव्हतं माहीत अस काही होईल.. त्याच्या बाबासोबतच्या प्रत्येक फोटोत तो खुप हॅप्पी दिसत होता म्हणुन मी ते सिलेक्ट केलेले.. 

नैतिक : ए गाथा तु मला सॉरी का बोलतेस.. मी जस्ट बोलतोय.. प्लिज तु मनाला लावुन नको घेऊस.. 

आर्यन : तुम्ही लोक गप्पा कसले करताय.. काम बघा किती आहेत ती.. गाथा टीजर साठी होम थिएटर कुठे कुठे लावायच ते सांग.. तशी अरेंजमेंट करायला..

गाथा डेकोरेशन वाल्याला त्यांनी जस ठरवलं तशी आयडिया देत असते..

ज्योसलीन : उद्याच फंक्शन तर थोडं जास्तच हटके असेल ना..

नैतिक : मला तर असच वाटत.. म्हणजे आजची रात्र ही ह्या रिसॉर्टमधली आपली शेवटची रात्र आहे ना??

ज्योसलीन : हो यार.. बट खुप एन्जॉय केलं. मी तर उद्याच्या डे ची स्पेसिअली वाट बघतेय..

(कसा असेल उद्याचा दिवस?? बघुयात पूढील भागात.. खुप प्रश्न तुम्हा वाचकांच्या मनात आहेत ह्याची जाणीव मला आहे.. मनवीच आणि फैयाजच पुढे काय झालं?? ते ही कळेलच तुम्हांला.. आणि काहींना शौर्यसोबत अजुनही समीराच हवी असे देखील वाटत आहे.. बट प्लिज समजुन घ्या ही एक काल्पनिक कथा आहे.. पहिलं प्रेम हे खरं असत पण पहिलं प्रेम अस त्रास दायी असेल, जेव्हा गरज असेल तेव्हा सोबत नसेल आणि मुळात समजुन घेणारच नसेल तर ते प्रेम नसतंच.. समीरा नेहमी शौर्यकडुनच अपेक्षा ठेवत आलीय की त्याने काही तरी करावं तिच्यासाठी.. पण त्याची आपल्याकडून काय अपेक्षा आहे ह्याचा सादा विचार सुद्धा तिने कधी केला नाही.. आणि मुळात जर व्यक्ती ही शौर्यसारख्या हळव्या मनाची असेल आणि खरच शौर्यसारख मनापासुन समोरच्यावर प्रेम करणारी असेल तेव्हा प्रेमभंग झाल्यावर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबियांना काय त्रास होतो हे ह्या स्टोरीतून दाखवायचा उद्देश होता माझा.. ज्यांना स्टोरी पटली त्यांना खरच शौर्य गाथा पटेल आणि मुळात शौर्यचा निर्णय हि पटेल.. प्लिज कथे मागिल उद्देश समजण्याचा प्रयत्न करा.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.. आता थेट रिसेप्शनलाच भेटूयात. बघु कसा पार पडतोय पुढील सोहळा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all