अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 77

In marathi

रॉबिन गाडी ड्राइव्ह करत असतो.. आर्यन त्याच्या बाजुला बसुन रागातच त्याच्याकडे बघत असतो.

रॉबिन : प्रेमात वैगेरे पडशील मित्रा.. अस बघत नको बसुस यार..

आर्यन : ए ज्यो तु कस ह्याला मॅनेज करते ग.. प्रत्येक गोष्टी हा हसण्यावारी घेत असतो.. सिरीयसनेस कश्याचाच नाही ह्याला..

रॉबिन : लाईफ एन्जॉय करून जगायच रे.. तुझ्या सारख रडत जगायला नाही आवडत मला.. 

गाथा : हे रॉबिनच बोलणं मला करेक्ट वाटत..

रॉबिन : थेंक्स गाथा.. बाय दि वे तु काही गिफ्ट घेतलंस का नाही आमच्या शौर्यसाठी..

(रॉबिन अस बोलताच सगळे तिच्या तोंडाकडे बघु लागले)

गाथा : घेतलंयना..

ज्योसलीन : काय??

गाथा : सरप्राईज.. उद्या कळेलच.. रात्री 12 वाजता..

नैतिक : तु गिफ्ट घेतलंस मग आमच्यासोबत का आलीस??

गाथा : ते अजुन काही आवडत का बघायला..

रॉबिन : एवढे गिफ्ट तर ज्यो तु पण मला नाही देत.. काही तरी शिक जरा गाथाकडुन..

ज्योसलीन कसल्या तरी विचारात हरवुन गेलेली असते..

नैतिक : रॉबिन इथे असताना तु कोणाच्या विचारात हरवलीस..

ज्योसलीन : ते शौर्यचा बर्थडे नक्की नीट होईल ना?? आय मिन समीरा आली लग्नात तर.. बिचाऱ्याचा बर्थडे स्पोईल होईल यार.. म्हणजे तस आपण उद्या 12 वाजता करणारच आहोत.. बट विरने त्याच्या वेडिंगच्या आधी पण कॅक वैगेरे कापायचा ठरवलायना. ते सगळं नीट होऊ दे म्हणजे झालं..

आर्यन : तुम्ही लोक एवढं का घाबरता तिला मला तेच कळत नाही.. चुडेल वैगेरे तर नाही ना ती..?? म्हणजे चुडेलला पण एवढे कोण एवढं घाबरत नसेल तेवढं तुम्ही लोक त्या समीराला घाबरताय..

ज्योसलीन : अरे ती किती रागीट आहे यार.. तिथे सगळ्यांसमोर येऊन काहीही बोलेल.. मला पण फोन करून ती तोंडाला येईल ते बोललीय..

रॉबिन : व्हॉट..?? तुला काय बोलली ती.. आणि कधी?? तु मला का नाही बोललीस?? 

ज्योसलीन : सॉरी बट मला नाही सांगावस वाटलं.. म्हणजे तुला कस सांगणार तेच मला कळत नव्हतं.. परत तु मलाच ओरडला असतास काय गरज आहे तुला तिला फोन करायची एन्ड ऑल..

रॉबिन : तु फोन केलेलास तिला..??

ज्योसलीन : हा बट ते सगळं करून जमाना झाला रॉब.. आय मीन दोन वर्षे झाली त्याला.. 

रॉबिन : पण ती तुला काय बोलली

ज्योसलीन : ते मी तुला नंतर सांगते.. 

रॉबिन : नो.. आत्ताच..

(ज्योसलीन गाथाकडे एक नजर फिरवतो.. गाथापण एकटक ती तिच्याकडेच बघत असते)

नैतिक : सांग ना..

रॉबिन : बघ तर.. ह्या मुली ना बोलताना खुप मोठा पॉज घेतात यार.

ज्योसलीन : ते लास्ट टाईम शौर्यने ड्रिंक केलेलं.. तेव्हा तु आणि नैतिक ने त्याला माझ्या घरी सोडलस मग तुम्ही निघुन गेलात.. मग मीच समीराला फोन लावलेला.. माझ्याकडे होता तिचा नंबर.. तिला कॉल करून विचारलं की शौर्यला काय झालं?? तो अस रडतो का आहे?? तर ती उलटं माझ्यावरच भडकली. तुझा फियांसी आहेना तो तुला माहिती असायला हवं त्याला काय झालं ते.. तु त्याला व्हिडीओ कॉल केला असशील नाही तर त्यानेच तुला केला असेल.. नाही तर तुला कस कळलं असणार की तो रडतोयस एन्ड ऑल.. आणि अजुनही खुप काही बोलत होती.. तिला मे बी माहीत नव्हतं हा दिल्ली सोडु इथे आलाय ते.. बट मला तर रडुच आलेलं तीच अस बोलणं ऐकुन.. मी विरला पण सांगितलं अस कस बोलु शकते यार ती.. त्यांनतर शौर्यला भेटायला आली होती तेव्हा विर ओरडला मग तिला..

रॉबिन : आणि तु हे आता सांगतेस..

ज्योसलीन : तेव्हा सांगुन काय केलं असतस तु??

रॉबिन : ते पण आहेच म्हणा.. मी काय करणार होतो..

आर्यन : रॉबिन तु एवढा कुल कसा काय आहेस..?

रॉबिन : आता त्या नकोत्या मुलीसाठी मी माझा बीपी वाढवु अस तुला वाटतं असेल तर मला ते जमणार नाही कारण मला औषध वैगेरे घ्यायला नाही आवडत यार.. प्लिज ट्राय टु अंडरस्टेन्ड..

आर्यन : काय?? इथे औषधांचा काय संबंध..

रॉबिन : बीपी चा त्रास सुरू झाला की औषध घ्यावी लागतात मित्रा.. हो ना ग गाथा..

(गाथा मात्र वेगळ्याच विचारांत हरवली असते)

आर्यन : ह्यात पण तुझा जॉक.. 

(आर्यन जोर जोरात रॉबिनला मारू लागला)

नैतिक : ए मॅड तो ड्राइव्ह करतोयना.. आणि अस एकट नको मारुस.. नंतर दोघ मिळुन मारुयात.

रॉबिन : काय दोघे मिळुन मारुयात..?? उठ सूट नुसते मारत असता मला.. तो शौर्य एक आणि तुम्ही दोघ एक.. तुम्हां लोकांसारख उगाच नकोत्या गोष्टींचा त्रास करून घ्यायला मला नाही आवडत.. माझा माझ्या ज्यो वर विश्वास आहे.. त्या समीराचा शौर्यवर नव्हता तो तिचा प्रॉब्लेम होता.. अविश्वास दाखवून तिने शौर्यसारख्या मुलाला गमावलय.. हीच तिने माझ्या ज्यो ला रडवल्याबद्दलची शिक्षा गॉड ने तिला दिली. इट्स इनफ मेन.. 

नैतिक : ग्रेट यार..

गाथा : ज्यो तु भेटलीस का ग तिला??

ज्योसलीन : कोणाला समीराला??

गाथा मानेनेच हो बोलते..

ज्योसलीन : हो भेटलीय..

गाथा : कशी दिसते ती??? आय मिन कशी आहे ती??

ज्योसलीन : दिसायला आहे तशी सुंदर बट आमचा शौर्य तिच्यापेक्षा जास्त हॅन्डसम आहे.. आणि जेव्हा पहिल्यांदा भेटलेलीना तेव्हा पासूनच कधीच नाही आवडली मला.. शौर्य किती घाबरायचा यार तिला.. आता जसा घाबरतोय ना तसच त्यादिवशी पण घाबरत होता.. जेव्हा तो मला मॉलमध्ये भेटलेला.. एक तर शौर्य अचानक दिल्लीला शिफ्ट झालेला.. जवळपास चार पाच महिन्यांनी तो मला मुंबईतल्या मॉलमध्ये भेटलेला.. ते ही अचानक.. माझा तर आधी विश्वासच बसत नाही की तो शौर्य आहे म्हणजे मला एवढा आंनद झालेला की तुम्ही विचारच करू नाही शकत.. I Just hug him as normal like a freind.. ती समीरा एवढी काही माझ्याकडे आणि त्याच्याकडे रागात बघायला लागली विचारुच नकोस.. इट्स ओके.. मे बी तिला माहीत नसेल की मी त्याची फक्त मैत्रीण आहे.. बट तिच्या भावाच्या हळदीला तिनेच इन्व्हाईट केलं म्हणुन मी गेलेली.. कारण त्या निमीत्ताने का होईना थोडा टाईम मी शौर्य सोबत स्पेन्ड करू शकणार होती..हळदीला आम्ही दोघे नाचत होतो.. म्हणजे बाकीचे मित्र मंडळी पण होते त्याचे.. बट मी त्यांच्यात एकटी पडु नये म्हणुन शौर्य माझ्यासोबत नाचत होता.. तेव्हा ती अचानक आमच्यामध्ये येत सगळ्यांसमोर त्याचा हात पकडत त्याला तिथुन घेऊन गेली.. मला अस वाटलं की तेव्हाही तिला कदाचित माहीत नसेल की मी त्याची फक्त फ्रेंड आहे ते.. पण नंतर मी घरी जायला निघाली तेव्हा दोघेही नॉर्मल वाटत होते.. मे बी शौर्यने नंतर तिची समजुत काढली असावी.. पण जस दिल्लीत गेलाना तर माझ्याशी बोलणं पण तो टाळायचा.. मग मी पण नंतर नंतर त्याच्याशी बोलणं टाळू लागली.. मग तोच कधी तरी स्वतःहुन विचारायचा.. कशी आहेस एन्ड ऑल.. हळूहळू ते ही बंद केलं त्याने.. मग शौर्य कायमचा मुंबईत येणार होता म्हणुन त्याच्यासाठी आम्ही गोव्याला जायच प्लॅन करत होतो. तेव्हा मग मीच त्याला व्हिडीओ कॉल केलेला ते ही हे लोक होते सोबत.. पण तेव्हासुद्धा आधी तर त्याने फोन उचलाच नाही.. मग मी परत फोन लावला.. व्हिडीओ कॉल का केलास?? असा प्रश्न त्याने फोन उचलल्या उचलल्या मला केला.. मी ही रागातच बोलली.. नको करू का?? मग तोच माझी समजुत काढत बोलला.. तस नाही ग, काही काम आहे का?? खर तर आधी मला एकटीला व्हिडिओ मध्ये बघुन तो घाबरलेला.. त्याच्या चेहरा बघुनच कळल मला.. मला अस वाटत ना तेव्हा समीरा त्याच्यासोबतच असणार.. पण जसे ही लोक पण त्याला दिसली ना तस तो नॉर्मली बोलु लागला..

नैतिक : एक मिनिट.. काही नॉर्मली वैगेरे बोलला नव्हता. गाथा तेव्हा पण तो आमच्याशी नीट नाही बोललेला.. मी बिजी आहे अस बोलुन फोन ठेवुन पण दिला लगेच.. मला खर तर खुप राग आलेला त्याचा.. पण नेक्स्ट डे आम्ही रिसेसमध्ये बसून त्याच्याबद्दलच डिस्कस करत होतो आणि नेमका तेव्हा त्याने स्वतःहुन आम्हांला व्हिडीओ कॉल केला मग आमचा राग शांत झाला.. इव्हन मुंबईत यायचा ना तेव्हापण न भेटताच जायचा आम्हाला.. 

आर्यन : पण दिल्ली सोडलीना त्यानंतर असा एक पण दिवस नाही SD व्हाट्सएप ग्रुपवर आमच्यासोबत बोलला नाही.. 

ज्योसलीन : हो.. माझ्यासोबत पण तो अगदी पहिल्यासारखा बोलु लागला..

रॉबिन गाडी मध्येच थांबवतो..

नैतिक : काय झालं?? तु गाडी का थांबवलीस??

रॉबिन : एक काम करूयात.. तुम्ही लोक इथेच उतरा. शौर्यसाठी छानस गिफ्ट घ्या. इथे दुकान आहेत खुप सारी.. बघा काही आवडत का?? मी आणि आर्यन पुढे जाऊन फेटे आणि आपल इतर सामान घेतो. 

नैतिक : ओके..

ठरल्याप्रमाणे सगळेच पटापट शौर्यसाठी शॉपिंग करतात.. आणि परत रिसॉर्टवर यायला निघतात..

शौर्य ब्रूनोला सोबत घेऊन एका चेअरवर बसुन आत्या सोबत गप्पा मारत असतो.. 

आत्या : मग पर्वा काय प्लॅन आहे??

शौर्य : तुझ्या लक्षात आहे??

आत्या : मग काय.. तुझा बर्थ डे मी कस विसरेल?? दरवर्षी ह्या दिवशी दादाची आठवण येते खुप.. काय खुश झालेला तुला बघुन तो.. म्हणजे नॉर्मली तो नेहमीच खुप खुशच असायचा पण तु झाल्यावर एक वेगळच तेज त्याच्या चेहऱ्यावर झळकत होत.. एक वेगळाच आनंद.. त्याचा तो चेहरा आठवतो डोळ्यांसमोर.. तु सेम माझ्या दादा सारखाच दिसतोस.. अशीच खळी त्याच्या गालावर असायची.. तेच ते डोळे.. सॅम टु सेम दादाची कार्बन कॉपी.

शौर्यचे गाल खेचतच त्याची आत्या त्याला बोलते..

(शौर्य मान खाली घालुन बसतो..)

आत्या : ए बच्चा काय झालं?? इथे बघ बघु..

शौर्य : ते बाबाची आठवण आली..

आत्या : तु अस रडणार असशील तर मी जाते बघ निघुन..

शौर्य : नको ना ग जाऊस मला सोडून.. एक तर इतक्या वर्षांनी मला भेटलीस.. मी तुला जाऊच देणार नाही तस पण.. तु भले कितीही जायच बोल..

आत्या : अग माझा बच्चा तो.. लहानपणी पण असच करायचास.. घरच्यांची परमिशन घेऊन दोन दिवस तुझ्यासोबत रहायला यायची पण अख्ख घर डोक्यावर घेऊन मला आठवडाभर ठेवुन घ्यायचास..

आत्या अस बोलताच शौर्य हसु लागतो.. तो हसतोय हे बघुन त्याची आत्या पण हसते..

शौर्यचे मित्र मंडळी पण त्याच्या बाजुला चेअर घेऊन बसतात..

शौर्य : आलात पण फेटे घेऊन..??

रॉबिन : हो.. आणि ही तुझ्या कारची किल्ली..

शौर्य : फेटे कुठेत??

रॉबिन : आता एवढे फेटे खिश्यात घेऊन फिरू का?? रूमवर नेऊन ठेवलेत.

शौर्य : नक्कीना??

नैतिक : हो रे.. मग दाखवतो.. बिल पण आहे.. ते पण बघ..

शौर्य : नैतिक काहीही काय बोलतोयस. मी बिल वैगेरे मागितलंय का.. बर ते जाऊ दे... ही माझी स्वीट स्वीट आत्या.. 

मित्रांना आपल्या आत्यासोबत ओळख करून देतच शौर्य बोलतो..

सगळे शौर्यच्या आत्यासोबत गप्पा गोष्टी करत तिथेच बसले असतात.

अनिता : चला सगळे जेवुन घेऊयात.. 

अनिता तिथे येऊन सगळ्यांना जेवणासाठी आपल्यासोबत घेऊन जाते..

एका मोठ्या अश्या डायनींग टेबलवर फेमिलीसाठी जेवणाची अरेंजमेंट केली असते.. विराज आणि अनघा मधोमध बसले असतात.. 

इथे बस ना.. गाथाची आई तिला आपल्या बाजुला बस म्हणुन सांगत होती.. गाथाला मात्र शौर्यच्या समोरच्या सीटवर बसायच होत.. पण आपल्या आईच मन तिला मोडावस वाटत नव्हतं.. ती आईच्या बाजुला जाऊन बसणार तोच सर्वेश गाथाला जीभ दाखवतच आईच्या बाजुला जाऊन बसतो.. गाथा मात्र मनातुन खुप खुश होते.. मध्ये दोन तीन चेअर रिकामीच असतात.. आपल्या मैत्रिणींना ती त्या चेअरवर बसवत बरोबर शौर्यच्या समोर असलेल्या चेअर वर जाऊन बसते..

शौर्य आपल्या आत्याच्या बाजुला बसुन तिच्याशी गप्पा मारत असतो.. आपल्या समोर बसलेल्या गाथाकडे त्याच लक्षच नसत.. गाथा मात्र त्याच त्याच्या आत्यासोबत चालु असलेलं दिलखुलास अस वागणं आणि बोलणं बघुन त्याच्या आणखीनच प्रेमात पडत होती.. पण शौर्यच आपण त्याच्यासमोर बसलोय तरी लक्ष नाही हे बघुन ती थोडी अस्वस्थ होत होती.. तोच वेटर जेवण घेऊन सगळ्यांच्या जागेवर जाऊन त्यांच्या ताटात वाढु लागला..

भाजी??? वेटर गाथाला विचारत होता... पण गाथाच मात्र लक्षच नव्हतं.. 

मॅडम भाजी..?? वेटर पुन्हा तिला विचारू लागला..

गाथाची मैत्रीण तिच्या हाताच्या कोपऱ्यावर आपल्या हाताचा कोपरा मारतच तिला लागलेली तंद्री दुर करते.

थोडी?? समोर असलेल्या वेटरला गाथा बोलते..

आर्यन : ही गाथा पण SDच्या प्रेमात पडलीय.. बघ ना कशी एकटक बघतेय त्याच्याकडे..

नैतिक: मला पण असच वाटतंय..  पण ती फक्त बघुन काय उपयोग. ह्या SD च लक्षच नाही तिच्याकडे.. आत्याशी गप्पा मारण्यात बिजी आहे..

रॉबिन : मग आपण कश्याला आहोत..

ज्योसलीन : आपण काय करणार??

एकमेकांना इशारा करतच ते काही तरी बोलले..

ए गाथा?? रॉबिन जोरातच ओरडतो..

गाथा : काय झालं??

रॉबिनने गाथाच नाव घेताच शौर्यच लक्ष समोर बसलेल्या गाथाकडे जात..

ज्योसलीन : तु आमच्या समोरच बसलीयस.. पण तुझं आमच्याकडे लक्षच नाही.. बासुंदी छान आहे.. ट्राय करून बघ ना..

गाथा : ओके.. मी ट्राय करते..

गाथा शौर्यकडे बघतच बोलते.. शौर्यपण तिच्याकडे बघत असतो..

आत्या : खरच बासुंदी छान आहे.. शरू ट्राय कर तु पण..

पण शौर्यच आता संपुर्ण लक्ष गाथाकडेच असत..आत्याच्या बोलण्याकडे तो लक्षच देत नाही..

आत्या एक नजर त्याच्याकडे फिरवते.. एवढं एकटक कोणाकडे बघतोय म्हणुन शौर्यची आत्या तो बघत असलेल्या दिशेने बघते.. समोर गाथा पण त्याच्याकडे बघत असते.. आत्या पण गालातल्या गालात हसत आपल्या ताटात बघते..

लांबुन विराज पण अनघासोबत बोलताना शौर्य आणि गाथाच काय चालु आहे ते बघत असतो..

नैतिक : ए SD.. काय करतोयस??

शौर्यच्या बाजुलाच बसलेला नैतिक जोरातच ओरडतो.. तस तो घाबरतच आपली मान नैतिककडे फिरवतो..

शौर्य : काय झालं?? आणि हळु बोलना.. घाबरलो ना मी..

नैतिक : तु खरच घाबरलास?? बाय दि वे... काय करतोयस तु??

शौर्य : ड्रायव्हिंग करतोय..

नैतिक : काय??

शौर्य : दिसतय ना जेवतोय ते..

नैतिक : मग तुझ्या ताटात बघुन जेव ना.. तिच्या ताटात पण तेच वाढलंय जे तुझ्या ताटात आहे..

शौर्य : Ohh realy.. I didn't know about that.. Thanks for informing..

नैतिक : बाय दि वे.. ड्रायव्हिंग करतोयस म्हणुन बोलतो गियर नीट टाक.. नाही तर मोठं एक्सिडेंट होईल आणि प्रेमात वैगेरे पडशील..

नैतिक अस बोलताच रॉबिन आणि आर्यन तोंडावर हात ठेवुनच शौर्यला हसु लागतात..

तुला तर ना... आपला हात नैतिकजवळ नेतच शौर्य त्याला बोलतो..

नैतिक : ए SD हात लांब ठेव हा तुझा.. सदरा खराब करशील माझा. काय भरोसा उद्या तु त्या गाथा सोबत एंगेजमेंट करायच बोललास मग.. हाच सदरा घालेल ना..

(आपली चेअर शौर्यपासुन लांब घेतच नैतिक त्याला बोलतो..)

शौर्य : जेवताना तरी नीट जेवू दे..

नैतिक : ती बघतेय तुझ्याकडे. काही हवंय का विचार ना तिला..

शौर्य लगेच आपली नजर गाथाकडे नजर फिरवतो.. गाथा मैत्रिणीसोबत बोलत असते..

आत्या मात्र आता जेवण सोडून गाथाला ओब्जर्व करत असते..

गाथा मैत्रिणीसोबत बोलताना अधुनमधुन शौर्यकडे बघत असते.. आणि शौर्यसुद्धा तिच्याकडे बघत असतो..

आत्या : शरू छान आहे हा खुप..

शौर्य आत्याकडे संशयी नजरेने बघतो..

आत्या हसतच आपली भुवई उडवत त्याच्याकडे बघते..

शौर्य गाथाकडे बघत तिच्याकडे बघतो..

शौर्य : तु कश्याबद्दल बोलतेस??

आत्या : ए बच्चा... आत्या आहे मी तुझी.. 

गाथाकडे इशारा करतच ती त्याला बोलते आणि तिथुन उठते..

आत्या... अग तु समजतेस तस काही नाही ग.. शौर्य पण तिच्यामागे जातच तिला बोलतो..

राहु दे रे.. होत अस कधी कधी.. आत्या आपले हात धुतच त्याला बोलते..

शौर्य पण आपले हात धुत पुन्हा तिच्या मागे जातो..

आत्या : आईस्क्रीम..?? 

अस बोलत आयस्क्रिमची प्लॅट शौर्यच्या नजरेसमोर धरतच त्याच्या दंडाला पकडत ती त्याला घेऊन एका बाजुला जाऊन बसते..

शौर्य काही बोलणार तोच आयस्क्रिमने भरलेला स्पून ती त्याच्या तोंडात कोंबते..

आत्या : तुला आपल्या आत्याला नाही सांगावस वाटत तर नको सांगुस..

थोडं नाराज होतच आत्या बोलते..

शौर्य : काहीही काय तुझं?? खरच तस काही नाही ग.. म्हणजे मला नाही माहीत काही.. 

आत्या : तुला ती आवडते??

शौर्य आत्याकडे बघत डोळे बंद करतो.. एक खोल श्वास घेतो.. तस गाथाचा चेहरा त्याला समोर दिसतो.. तो मानेनेच हो बोलतो..

आत्या : मग मी बोलु तिच्याशी?

शौर्य : वहिनीची बहीण आहे ती..

आत्या : मग काय झालं?? माझा भाचा खुश होणार असेल तर माझ्या भाच्यासाठी मला आवडेल अस काही करायला.

शौर्य : आत्या.. हे आवडण वैगेरे ठिक आहे ग. पण परत प्रेम नको वाटत ग मला.. त्रास होतो खुप..

आत्या : काय झालं?? 

शौर्य आत्यापासून आपली नजर लपवु लागला..

आत्या : इथे बघ बघु..

काय चालु आहे आत्या आणि भाच्याच.. अनिता तिथे येतच बोलते..

शौर्य : मम्मा अगदी करेक्ट टायमिंगवर आलीस..  आत्या आत्ता तुझ्याबद्दलच विचारत होती मला.. आत्या तु ही आईस्क्रीम खा.. (आत्याला आईस्क्रीम भरवतच तो बोलतो) आणि मम्मा माझ्या आत्याची काळजी घे.. मला खुप काम आहेत.. उद्याची तैयारी करायचीय मला.. काम लवकर उरकली तर रात्री येतो तुझ्याशी गप्पा मारायला.. बाय..

अस बोलत शौर्य पळतच तिथून निघाला..

शौर्यची आत्या मात्र त्याच्याकडे बघतच रहाते..

आत्या : वहिनी बस ना.. साखरपुडा अगदी छानच झाला..

अनिता : सगळं आपल्या शरूने केलंय..

अनिता आणि शौर्यची आत्या गप्पा मारत तिथेच बसतात..

इथे सगळेच हळदी मंडपाच्या डेकोरेशनच्या तैयारीला लागले असतात..

आर्यन : होतास कुठे तु??

शौर्य : आत्यासोबत..

रॉबिन : ए शौर्य यार.. संपुर्ण स्टेज यल्लो कस वाटेल ते.. त्यात नवरा नवरी पण यल्लोच असणार. त्यांचे कपडे पण यल्लो.. आपण स्टेज गुलाबाच्या फुलांनी सजवुया..

नैतिक : होणं.. मला पण असच वाटत.. तु यलो फ्लोवर्स का सांगितलं डेकोरेशन वाल्याला..??

गाथा : Yellow is a symbol of opulence and prosperity.

सगळेच मागे वळुन बघतात.. गाथा मागे असते..

गाथा : आपल्या संस्कृतीत पिवळा रंग हे ऐश्वर्य आणि समृद्धीचा प्रतिक मानलं जातं. म्हणूनच नवरा नवरी हळदीला आणि लग्न कार्याच्या वेळी पिवळे कपडे घालतात. बीकॉज पिवळा रंग हा शुभ मानला जातो. 

शौर्य : ग्रेट..

(शौर्य टाळ्या वाजवतच बोलतो)

तसे इतर लोक पण टाळ्या वाजवतात..

गाथा : थेंक्यु.. थेंक्यु..

ज्योसलीन : मग गाथा उद्या DJ आहे इथे.. नाचणार की नाही बहिणीच्या लग्नात??

गाथा : हम्मम.. बघु

शौर्य डेकोरेशन वाल्याला एक एक आयडिया देत मंडप सजवायला सांगत असतो.. 

ज्योसलीन : ए शौर्य आम्ही जाऊ का?? झोप आलीय.

शौर्य : हा... उद्या तसपन लवकर उठाव लागेल.. गाईज तुम्ही पण जाऊन आराम करा..

आर्यन : गाथा तु इथेच थांब.. आम्ही वेगळं डेकोरेशन करायला जातोय.. जर हा तिथे आला तर??? किंवा काही प्रॉब्लेम वाटला की लगेच ज्योच्या नंबरवर फोन कर.. ओके??

गाथा आपला अंगठा दाखवतच ओके बोलते..

सगळे तिथुन निघुन जातात..

शौर्य वारंवार डेकोरेशन वाल्याला चेंजेस सांगत असतो..  

गाथा : शौर्य असच राहू दे ना छान वाटतय रे.. 

शौर्य मागे वळुन बघतो तर गाथा अजुन तिथेच असते..

शौर्य : तु इथेच आहेस गेली नाहीस..

गाथा : तु एकट किती थांबणार इथे.. म्हणुन म्हटलं तुझी सोबत म्हणुन थांबुयात..

शौर्य : तु दमली नाहीस??

गाथा मानेनेच नाही बोलते..

शौर्य : नक्की??

शौर्य हसतच तिला विचारतो..

गाथा : थोडीशी..

शौर्य : तु जाऊन आराम कर.. मी करतो इकडच मॅनेज..

गाथा : नाही नको..

शौर्य : तुझे डोळे बघ किती थकलेले दिसतायत.. उगाच त्रास होईल तुला.. तु जा बघु इथून..

गाथा : मी तुला सोडुन कुठेही जाणार नाही.. मी तुझ्यासोबतच रहाणार.. ओके.. 

अस बोलत गाथा डेकोरेशन वाल्याकडे जात त्याला थोडे चेंजेस सांगु लागते.. शौर्य मात्र तिच्याकडे एकटक बघतच रहातो..

जवळपास एक दिड तासाने हळदीचा मंडप फायनली डोकरेट होतो.. 

गाथा : फायनली डन..

शौर्य : छान वाटतोय ना..??

गाथा : नाही रे..

(गाथा अस बोलताच शौर्य तिच्याकडे बघु लागतो.. )

खुप म्हणजे खुप छान वाटतोय अस मला बोलायच होत..

(गाथा आपल्या उजव्या डोळ्यावरची भुवई उडवत हसतच शौर्यकडे बघत त्याला बोलते)

शौर्यसुद्धा तिच्या अश्या बोलण्यावर अगदी मनापासुन हसु लागतो..

दोघेही डेकोरेशन आटोपत आपापल्या रूमवर  जायला निघतात.

शौर्य : ब्रूनो...

गाथा : काय??

शौर्य : मी ब्रूनोला मगाशी मंडपातच सोडुन आलो.. ओहह शट.. 

शौर्य पळतच पुन्हा साखरपुड्याच्या मंडपाजवळ जायला निघतो.. मंडपमध्ये फक्त कामगार मंडळी आपापली काम करत असतात.. 

ब्रुनो..

शौर्य मोठ मोठ्याने ब्रूनोला आवाज देत असतो..  पण तो तिथे नसतो..

गाथा सुद्धा पळत तिथे येते..

गाथा : मिळाला..??

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

गाथा तिथुन पळत बाहेर येऊन ब्रुनोला आवाज देत शोधते.. शौर्य सुद्धा बाहेर येत त्याला आवाज देत शोधत असतो. रिसॉर्टच्या पाण्यात ते लोक ब्रुनो दिसतोय का बघु लागतात.. पण ब्रुनो मात्र कुठेच दिसत नाही.. दोघांचा आवाज ऐकुन शौर्यची मित्र मंडळीपण आपलं काम अर्धवट टाकुन तिथे येतात..

आर्यन : काय झालं??

माझा ब्रुनो.. कुठे दिसतच नाही.. शौर्य रडतच आर्यनला बोलतो..

रॉबिन : ए मॅड रडतोस काय.. मीच त्याला वर्ती माझ्या रूममध्ये सोडुन आलोय.. तो इथे पुलजवळ दिसलेला मला.. त्याला माझ्यासारख स्विमिंग करता येत नसेल म्हणुन मग मीच त्याला माझ्या रूमवर सोडलं..

शौर्य : एकदा सांगायच तरी यार.. किती घाबरलो मी..

रॉबिन : विसरलोरे मी.. 

गाथा : आता कळलं ना तुला तुझा ब्रुनो सेफ आहे.. जाऊन भेटुन ये आधी त्याला.. ओके

शौर्य मानेनेच हो बोलतो..

शौर्य : एक मिनिट तुम्ही लोक झोपायला गेलेले ना??

चौघेही एकमेकांची तोंड बघु लागले. एकमेकांना डोळ्यानेच काही तरी इशारे करत रागातच शौर्यजवळ येतात..

रॉबिन : एक तर मोठ मोठ्याने ओरडुन आमची झोप मोड केलीस तु.. आता परत झोप येतेय का काय माहिती.. घेऊन जा तुझ्या त्या ब्रूनोला..

(शौर्यला मागे ढकलतच रॉबिन बोलतो आणि तिथुन रूमवर जायला निघतो)

एक शब्द बोलु नकोस.. स्वतःच्या ब्रूनोला सांभाळता येत नाही.. आणि दुसऱ्याची झोप मोड करतोस.. इडियट.. शौर्य काही बोलायच्या आत आर्यन त्याला बोलतो आणि तिथुन निघुन जातो..

नैतिक : प्लिज आता आवाज नकोय मला. ते काय आहे ना सारखी सारखी झोप मोड झाली की मग माझं डोकं दुखू लागत.. 

ज्योसलीन : गुड नाईट शौर्य आणि गाथा..

गाथाला खर तर हसु कंट्रोल होत नसत.. ती तोंडावर हात ठेवतच आपली मान हलवत ज्योसलीनला बाय करते..

शौर्य : हे लोक नक्की झोपायला गेलेले का??

गाथा : ब्रूनोला भेट जा आधी..

शौर्य : हम्म

गाथा : गुड नाईट.. मला पण खरंच झोप आलीय आता..

शौर्य : हम्मम.. मला पण.. गुड नाईट..

★★★★★

दुसऱ्या दिवशी 9च्या सुमारास हळद दळण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.. गाथा आपल्या आजीचा हात पकडुन थोडं तोंड पाडुनच सगळा कार्यक्रम बघत होती.. 

सगळ्या सुहासिनी एकत्र बसुनच सुंदर अश्या ओव्या बोलतच हळद दळत होत्या.. शौर्य आणि त्याचे मित्र मंडळी लांबुनच हे सगळं बघत होते.. 

माझ्या कार्याला ग सई बाई ग
खंडेराया तुम्ही यावा.. तुम्ही यावा..
भंडारा जपुन सई बाई ग
संगे म्हाळसाला घ्यावा बाई घ्यावा ग

माझ्या कार्याला ग सई बाई ग बाई
आंबे माता तुम्ही यावा ग बाई यावा
जात इसवर ग सई बाई ग सई बाई ग
तुला सुपारीचा पाया ग बाई पाया
सीतामाई साठी सई बाई ग सई बाई ग
नवरे झाले रामराया ग रामराय

जाते इसवरा ग बाई इसवरा ग
तुला सुपारीच्या खांब ग बाई खंबा
रुक्मिणीसाठो ग सई बाई ग सई बाई 
नवरे झाले पांडुरंग ग बाई रंग

जाते इसवरा ग बाई इसवरा ग
तुला सुपारीचा पाला ग बाई पाला ग
म्हाळसासाठी ग सई बाई ग सई बाई ग
नवरे झाले खंडे राया ग बाई राया ग

जाते इसवरा ग बाई इसवरा ग
तुला सुपारीच्या डाहू ग बाई डाहू ग
पार्वतीसाठी  ग सी बाई ग सई बाई ग
नवरे झाले महादेऊ ग बाई देऊ ग

जाते इसवरा ग बाई इसवरा 
हळद कुंडल बांधल ग बाई बांधल ग
जाते सई बाई ग सई बाई ग
तुला सुपारी बांधली.. बांधली ग..

गाथा आजीचा हात सोडत मध्येच उठुन तिथुन आता आपल्या रूममध्ये जाऊ लागली..

तस शौर्य तिला आवाज देत तिच्या मागे जातो..

शौर्य : काय झालं??

गाथा मान खाली घालूनच काही नाही बोलते.. शौर्यकडे न बघताच तिथुन जाऊ लागते..

शौर्य तिच्या समोर येतच तिची वाट अडवतो..

शौर्य : इथे बघ बघु..

गाथा मानेनेच नाही बोलत खालीच बघत असते.. गाथा आपल्याकडे बघत नाही हे बघुन शौर्य तिच्या हनुवटीला धरतच तिची मान वर करतो.. तस तिच्या डोळ्यांतील पाणी त्याला दिसत..

शौर्य : ए गाथा तु रडतेस??  कोणी काही बोलल का तुला?? मी मगास पासुन बघतोय तु नाराज दिसतेयस.. काय झालं??

गाथा काहीच बोलत नाही.. 

शौर्य : प्लिज सांगना काय झालं??

गाथा : दि आम्हांला सोडून दुसऱ्याच्या घरी जाते म्हणुन मला वाईट वाटतंय.. मला माहिती ती खुश रहाणार तिथे.. पण नाही ना जमत तिच्याशिवाय रहायला.. ती USA ला गेलेली तेव्हा पण मला नव्हतं जमत तिच्याशिवाय राहायला.. आणि आता परत मला सोडुन चाललीय.. 

शौर्य : प्लिज नको रडुस.. तुला आठवण आली की तु येत जा ना आमच्याकडे.. नाही तर आमच्याकडेच येऊन रहा तुझ्या दि सोबत.. 

आपल्या खिश्यातुन रुमाल काढत तिच्या हातात देत तो तिला बोलतो..

गाथा तरीही रडत असते..

शौर्य : वेटर पाणी..

लांबुन जाणाऱ्या वेटरला आवाज देतच शौर्य त्याला आपल्याकडे बोलावतो.. त्याच्या ट्रे मधुन पाण्याने भरलेला ग्लास उचलत तो गाथा समोर धरतो..

शौर्य : पाणी पी बर वाटेल..

गाथा शौर्यच्या हातातुन पाण्याचा ग्लास घेत त्यातलं पाणी पिते.. तस तिला थोडं बर वाटत..

शौर्य : बर वाटतंय??

गाथा : हम्मम..

शौर्य : नक्की??

शौर्य आपली कॉपी करतोय हे बघुन गाथा हसु लागते..

शौर्य : हसल्यावर किती छान दिसतेस बघ.. प्लिज परत नको ना रडुस.. तुला अस रडताना बघुन मला त्रास होतोय.. आणि  जास्त लांब कुठेय तुझी दि.. मोजुन अर्ध्या तासांवर आहे.. आठवण आली की बिनदास्त येत जा.. माझंच घर आहे. आय मिन माझ्या भावाच घर आहे.. तु रहायला आलीस तरी कोणी काही बोलणार नाही.. पण प्लिज परत नको रडुस.. नाही ना रडणार???

हम्ममम नाही रडत... गाथा हसतच शौर्यला बोलते..

शौर्य : मग चलना तिथे बस बघु.. 

गाथा शौर्यच बोलणं ऐकते.. आणि ती त्याच्याबरोबर परत कार्यक्रमाच्या इथे येऊन बसते.. 

शौर्य : मला ते जात्यावर हळद दळताना ओव्या बोलतात ना ते खुप आवडत..

गाथा : मला पण.. 

शौर्य : आता परत रडायचं नाही हा.. माझं लक्ष आहे तुझ्यावर.. जर परत रडलीस तर मी पण तुझ्या बाजुला येऊन रडु लागेल.. तुला चालणार असेल तर मग रडु शकतेस..

शौर्य गाथाला हसतच अस बोलत तिथुन निघुन आपल्या मित्र मंडळींसोबत जाऊन बसतो..

गाथा मात्र तिथेच उभी राहुन तो मित्रमंडळींजवळ जाईपर्यंत त्याच्याकडे एक टक बघत असते.. आजी आवाज देत तिला आपल्याजवळ बसायला सांगते.. तस ती तिच्याजवळ जाऊन बसते.. पण तीच लक्ष मात्र तिच्या हातात असणाऱ्या शौर्यच्या रुमालाकडे असत.. आता मात्र रडु यायच सोडून शौर्यचे मगासचे शब्द आठवुन तिला हसु येत असत.. ती गालातल्या गालात हसत असते.. ती अस हसतेय हे बघुन शौर्यला छान वाटत असत..

हळद दळण्याचा कार्यक्रम अगदी छान पार पाडतो.. सगळी मंडळी जेवायला जातात..

शौर्य विराजच्या रूममध्ये जाऊन तो काय करतो ते बघतो..

विराज आपल्या मित्रमंडळींसोबत गप्पा गोष्टी करत असतो..

विराज : ये ना शौर्य..

शौर्य : भुक लागली असेलना तुला.. जेवणाचा टाईम झाला म्हणुन..

विराज : अरे हो.. गाईज तुम्ही जेवुन घ्या.. 

तु पण चल ना आमच्यासोबत.. विराजचे मित्र त्याला बोलतात..

शौर्य : त्याच जेवण मी घेऊन आलोय..

शौर्य आपल्या हातातलं ताट विराजच्या मित्रांना दाखवत बोलला..

विराजचे मित्र विराजला बाय करतच तिथुन जातात..

शौर्य : आज माझ्या भावाला मी माझ्या हाताने भरवणार..

विराज : काही काय.. मी जेवतो माझ्या हाताने..

शौर्य : मी भरवतोय ना..

विराज : मस्का पोलिश कश्याबद्दल चाललीय कळेल मला??

शौर्य : विर ते.. मम्माने तिकट बुक केलंय.. मला 20th ला जायचय USA ला.. म्हणजे लग्नानंतर पण एक दोन फंक्शन असतील ना मग ते एन्जॉय करायचय मला..

विराज : मी तुझं 30th मे च बुक केलंय तिकीट.

शौर्य : 30th च का केलंस.. एवढे दिवस नको.. 

विराज : थोडं रहा ना आमच्यासोबत.. प्लिज... माझ्यासाठी..

शौर्य : बर.. 

विराज : आता मी खातो माझ्या हाताने..

शौर्य : मी बोललो ना भरवतो.. हट्टी पणा बंद कर हा विर.. मला राग नको देऊस.

विराज : माझा डायलॉग मलाच बोलून दाखवतोयस..

(विराज हसतच त्याला बोलतो.. शौर्यपण त्याला हसतच जेवण भरवतो)

शौर्य : विर तुला काही तरी सांगायचंय होत.. 

विराज : हम्म सांगणा मग..

शौर्य : ते.. मला

शौर्य काही बोलणार तोच अनिता आत्याला घेऊन त्याच्या रूममध्ये येते..

विराज : आत्या ये ना बस..

शौर्य : दि आली??

विराज : what?? निधी पण येतेय?

आत्या : तिच्या लाडक्या भावाच लग्न मग येणारच ना..

शौर्य : कधी??

आत्या : एक तास लागेल.  मे बी फ्लाईटमध्ये असेल

शौर्य : तिला फोन करून विचार कुठेय मी आणायला जातो तिला.

शौर्यची आत्या निधीला फोन लावते बट ती फ्लाईटमध्ये असल्यामुळे फोन स्विच ऑफ येत असतो..

आत्या : फोन स्विच ऑफ आहे..

शौर्य : मग सांग मला.. मी जाईल तिला आणायला.. ओके..

आत्या : बर..

अनिता : आणि हे काय.. शौर्य तु विरला भरवतोयस..??

शौर्य : आता मला वाटलं माझ्या भावाला भरवावस.. म्हणून भरवतोय. तस पण एकदा तो पाटावर बसलास की त्याला सात आठ तास उठायला मिळणार नाही..

विराज : एवढा वेळ??

आत्या : हो मग.. शौर्य मला अस वाटत नऊ दहा तास पण लागतील.. आता खाली माणसच बघितलीस ना किती आहेत ते..

विराज : मम्मा.. मी एवढा वेळ कस बसु..??

शौर्य : बसावं लागणार विर.. ऑप्शन नाही दुसरा.. मी मात्र तर मस्त नाचत असणार..

आत्या : पोटभर जेवून घे बघु.. मग जेवायला वैगेरे पण नाही मिळणार हा तुला..

शौर्य : आणि पाणि वैगेरे पियायला सुद्धा.. जे खाऊन पिऊन घ्यायच ते आत्ताच घे..

विराजला टेन्शन येऊ लागत.. तो तोंड पाडतच अनिताकडे बघतो..

अनिता : मस्ती करतायत तुझी.. तु पण कुठे त्यांच बोलणं एकढ मनावर घेतोयस..

विराज : आत्या तु पण काय ग घाबरवतेस.. आणि शौर्य आज ना उद्या लग्न करशीलच.. लक्षात ठेवेल मी हे सगळं..

शौर्य आणि आत्या एकमेकांना टाळी देतच हसु लागतात..

(वातावरण सगळं आनंदमयी असत..)

विराज : तु काही तरी सांगत होतास मगाशी..

शौर्य : ते... (शौर्य आत्याकडे बघतच विराजला इशारा करतो) आपण नंतर बोलूयात.. आता आत्यासोबत बोलुयात.. तुला अजुन भात वैगेरे काही हवंय का??

विराज : नाही मला बस झालं.. तुम्ही लोक जेवुन या..

आत्या : तु रूमवर एकटा कस रहाशील?? मी थांबते तुझ्यासोबत..

विराज : माझे मित्र येतीलच ग.. तुम्ही तिघेही जेवायला जाताय.. इट्स माय ऑर्डर..

अनिता : बर.. काही लागलं तर कळव आम्हांला.., ओके??

विराज : ओके..

सगळेच जेवण आटोपुन घेतात.. आणि ज्या क्षणांची सगळे आतुरतेने वाट बघत होते.. तो क्षण आलेला असतो.. पिवळसर गोंडयाच्या फुलांनी संपूर्ण स्टेज  सजवलेला असतो..  विराज जाऊन पाटावर बसतो..  थोड्याच वेळात गाथा आणि सर्वेश अनघाला घेऊन तिथे येतात.. अनघा आज खुप हळवी झाली असते.. नजर खाली ठेवतच ती विराजच्या समोर असलेल्या पाटावर येऊन बसते.. हातात भरलेला हिरवा चुडा आणि त्यासोबत तिची दिसणारी लाजरी नजर विराज आज बघतच राहिला.. नेहमी प्रमाणे अनघा बिनदास्त अशी त्याच्याकडे बघत नव्हती.. अनघा येताच मोठ्या आवाजात DJ वर गाणं वाजु लागत..

गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची
लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली 
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची
लाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं
पोरी नवरी आली


थोड्या वेळात विराजची आत्या हातात हळदीच भांड घेऊन येते.. हळदीवर गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर अस डेकोरेशन करून दोन आंब्याची पाने त्यात ठेवली असतात..

अनिता शौर्यच्या आत्यालाच विराजला हळद लावुन हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला सांगते.. शौर्यची आत्या विराजला हळद लावायला घेते.. तस पुन्हा सगळे मिळुन ओव्या गायला सुरुवात करतात..

हळदीचा मान वं.. मान आहे कुणाच्या दानी वं..
पहिला मान वं... मान कोणाच्या हाती वं..
पहिला मान वं... मान कोणाच्या हाती वं..
पहिला मान वं.. मान आत्याच्या हाती वं...

आत्याची हळद लावून होताच विराज थोडी हळद तिच्या गालाला लावतो. आत्या पण हसतच त्याचे गाल खेचते.. तीच हळद घेऊन विराजच्या समोर बसलेल्या अनघाला ती हळद लावायला जाते.

(तस पुन्हा गाणं वाजु लागत)

नवऱ्या मुलाची आली हळद ही ओली
हळद ही ओली लावा नवरीच्या गाली
हळदीनं नवरीचं अंग माखवा
पिवळी करून तिला सासरी पाठवा
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी सासरच्या ओढीनं ही
हासते हळूच गाली गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी गं पोरी नवरी आली


आत्याची हळद होताच अनिता विराजला हळद लावायला घेते..

हळदीचा मान वं.. मान आहे कुणाच्या दानी वं..
दुसरा मान वं.. मान आईच्या हाती वं...

शौर्य सगळ्यांना बाजुला करत आपल्या मित्र मंडळींना घेऊन भावाला हळद लावण्यासाठी पुढे जातो.. 

हळदीचा मान वं.. मान आहे कुणाच्या दानी वं..
तिसरा मान वं.. मान भावाच्या हाती वं...

शौर्य संपूर्ण हात भरून हळद घेत विराजच्या तोंडाला आणि संपुर्ण अंगाला हळद फासतो.. विराजपण त्याच्या गालाला हळद लावतो.. कार्यक्रमाला जमलेले सगळेच दोन भावांच प्रेम बघतच रहातात.. 

I am so Happy for you Vir.. अस बोलत आपल्या भावाला घट्ट मिठी मारत त्याच्या डोक्यावर किस करतो.. पाठून आत्या आपले सगळे हळदीचे हात शौर्यच्या चेहऱ्यावर आणि कपड्यांवर फासते.. शौर्य पण तिच मन भरेपर्यंत तिला हळद लावु देतो.. आपल्या हातातील हळद आपल्या आईला लावत तो समोरच बसलेल्या आपल्या लाडक्या वहिनीला हळद लावायला जातो.. अनघा समोर जाताच तिचा रडत असलेला चेहरा बघुन शौर्य तिला प्लिज एक स्माईल दे अस इशाऱ्यानेच सांगतो.. अनघा ओठांवर हसु आणतच शौर्यकडे बघते.. तस तिला तो हळद लावतो.. अनघाला हळद लावुन होताच तिच्या बाजुला उभ्या असलेल्या सर्वेशला पण तो थोडी हळद लावतो.. सर्वेशच्या बाजुलाच असलेल्या गाथाकडे बघत तो तिला पण हळद लावत एक गोड स्माईल तिला देत.. तिच्याकडे बघतच आजु बाजुला जमलेल्या गर्दीला बाजुला करत तिथुन बाहेर पडतो.. गाथापण हसतच त्याच्याकडे बघत रहाते..

अनघाचे आई वडील तिला हळद लावायला घेतात..

अनघाला हळद लावताना आई वडिलांना खुप भरून येत असत.. पण तिच्यासमोर तस ते दाखवत नाही पण अनघाच्या नजरेतून पण ते काही सुटत नाही.. गाथापण आपल्या लाडक्या बहिणीला हळद लावत मिठी मारत थोडी रडते.. अनघाला हळद लावुन होताच ती विराजला पण हळद लावते.. ज्योसलीन शौर्यच्या आत्याबरोबरच उभी असते.. ज्योसलीन गाथाला आपल्या जवळ ओढत तिच्या गालाला हळद लावते.. गाथा हसतच गर्दी बाजुला करत तिथुन बाहेर पडते.. डोळ्यांतुन येणार पाणी लपवत ती एका शांत ठिकाणी जाऊन उभी राहते.. आणि रडु लागते.. तस शौर्य हाताची घडी घालुन तिच्या समोर येऊन उभा रहातो..

गाथाच्या हाताला हळद लागली असल्यामुळे तिला तिचे डोळे त्याच्यासमोर पुसता येत नसतात.. शौर्य खिश्यात हात घालुन रुमाल शोधतो पण त्याला आठवत की रुमाल तर आपण सकाळी गाथालाच दिलेला.. 

प्लिज नको ना अस रडुस.. अस बोलत तो आपल्या हातानेच तिचे डोळे पुसतो..

गाथा मात्र एकटक त्याच्याकडे बघतच रहाते..

शौर्य : तुझी दि खुप हॅप्पी रहाणार ग.. आणि तुम्ही लोक तिला असे रडताना दिसले तर तिला त्रासच होईल.. जर तुला चालणार असेल तर रड मग.. चालणार तुला???

गाथा मानेनेच नाही बोलते.. आणि हसतच आपल्या दोन्ही हाताला लागलेली हळद ती शौर्यच्या गालाला लावते..

तिच्या मुलायम अश्या हाताच्या स्पर्शाने शौर्यच हृदय अगदी धडधडु लागत.. तो तिच्याकडे बघतच रहातो..

ए शौर्य... रॉबिन जोरात आवाज देत शौर्यला आपल्याकडे बोलवत असतो..

शौर्य : आता परत रडलीस तर मी बोलणार नाही हा तुझ्याशी..

शौर्य रॉबिनकडे पळत जातच गाथाला बोलतो.. गाथा मात्र तिथेच उभं राहुन मनात गाणं गुणगुणत त्याच्याकडे बघत असते..

(ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणते
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.)

शौर्य तिथुन रॉबिनसोबत बोलतच पुढे निघुन जातो.. तस गाथा तिथुन निघुन आपल्या बहिणीसोबत जाऊन उभी राहते..

शौर्य : काय झालं??

रॉबिन : ते विराजच्या बेडरूम सजवायला जायच होत ना?? जाऊयात??

शौर्य : आता?

आर्यन : मग कधी??

शौर्य : उद्या जाऊयातना.

रॉबिन : उद्या आम्ही काय काय करु.?

शौर्य : उद्या काय काम आहे.??

आर्यन : विराजच्या बुटांवर लक्ष ठेवाव लागेल. दोन जण स्टेजवर हवीत.. नवरा नवरी एकमेकांना हार घालताना विराजला आपल्याला उचलुन घ्यायला लागणार.. आणि अजुन पण खुप काम आहेत यार..आत्ता जाऊन येऊयात..

शौर्य : आत्ता नको ना.. आपण लग्न लागायच्या आधी जाऊन करूयात.. आता फक्त हळदी एन्जॉय करू दे मला माझ्या भावाची..

अस बोलत मित्रांचा हात पकडत तो त्यांना DJ च्या सॉंगवर नाचायला घेऊन जातो.. आपल्या मम्माला आणि आत्याला पण तो जबरदस्ती नाचायला स्टेजवरून खाली घेऊन येतो.. हळुहळु पाहुणे मंडळीपण नाचु लागतात..  गाथा आपल्या बहिणीसोबत स्टेजवरूनच सगळं पहात असते..

शौर्य ज्योसलीनच्या कानात काहीतरी सांगतो.. तस ज्योसलीन गाथाला आणायला स्टेजवर जाते. तिचा हात पकडतच जबरदस्ती ती तिला नाचायला घेऊन येत असते.. गाथा मागे वळुन अनघाकडे बघते.. अनघा तिला इशाऱ्यानेच जा म्हणुन सांगते.. शौर्य गाथाला एक एक स्टेप्स देत आपल्या सारख नाचायला सांगत असतो.. गाथा पण तो देणाऱ्या स्टेप्स फॉलो करत त्याच्यासारख नाचण्याचा प्रयत्न करत असते.. तोच शौर्यची आत्या शौर्यचा हात पकडत त्याला थोडं बाहेर घेऊन येते. शौर्य अचानक निघुन गेल्यावर गाथा ज्योसलीन आणि इतर मित्रमंडळींसोबत सोबत नाचत असते.. इथे शौर्य बाहेर येऊन बघतो तर त्याची निधी दि आली असते.. निधीला घेऊन तो स्टेजवर विराजला हळद लावायला घेऊन जातो.. निधीला बघुन विराजपण खुप खुश होतो.. हळद लावुन होताच तिला पण तो आपल्या सोबत नाचायला घेऊन जातो..

ज्योसलीन नाचताना इशाऱ्यानेच त्याला कोण म्हणुन विचारते..

शौर्य : कजिन..

शौर्य गाथाकडे बघतच बोलतो.. जेणे करून तिने कोणता गैरसमज करून घेऊ नये.. सगळे अगदी बेधुंद होऊन नाचत असतात.. थोड्या वेळाने विराजचे मित्र मंडळी विराजला घेऊनच स्टेजवरून खाली नाचायला येतात.. आणि अनघाच्या मैत्रिणी अनघाला.. एक जण विराजला आपल्या खांद्यावर उचलून घेऊनच नाचतो.. विराज अगदी बेधुंद नाचत आपली हळद एन्जॉय करत असतो.. 

शौर्य विराजचा हात पकडतच त्याला अजुन नाचवत होता.. आणि इथे गाथा अनघाला.. हळदीचा कार्यक्रम अगदी रंगात आला असतो.. पण विराजने ठरवल्या प्रमाणे 10 वाजता हळदीचा कार्यक्रम आटोपण्यात येतो.. सगळे दमुन आजु बाजुलाच चेअर दिसतात तिथे बसुन जातात.. 

शौर्य आत्या आणि निधी सोबतच गप्पा मारत बसतो..

आणि त्याचे मित्रमंडळी एकत्रच त्याच्या बर्थडेच प्लॅनिंग डिस्कस करत असतात..

आर्यन : हा कुंभकर्ण झोपायला गेला तर ह्याला 12 वाजता उठवणार कस..??

रॉबिन : त्याला झोपायला पाठवायचंच नाही.

आर्यन : ते कसं??

रॉबिन : ते तो झोपायला जायच बोलल्यावर सांगतो तुला..

सगळे थोडा वेळ बसुन मिळुन जेवायला जातात..

★★★★★

इथे समीराच्या मामे भावाच्या लग्नाचा कार्यक्रम अगदी छान पार पाडला असतो..

श्री आणि प्रीती सकाळीच मुंबईला निघायच म्हणुन तैयारी करत असतात..

तोच समीरा त्यांच्या रूममध्ये येते..

समीरा : वहिनी तुझा नेकलेस..

(अस बोलत प्रितीने तिला लग्नात घालायला दिलेला नेकलेस ती तिला परत देते)

प्रीती : आवडला तर ठेव ना..

समीरा : नाही नको.. मी घेईल नवीन.. बाय दि वे झाली पेकिंग तुमची??

प्रीती : नाही ग चाललीय.. तु पण येतेस तर चलना??

समीरा : नाही नको..

श्री : तु इतकी सेल्फीश का आहेस?? तो माझ्या लग्नात आलेला ना?? मग तु त्याच्या भावाच्या लग्नात का नाही येत??

समीरा : तु कोणाबद्दल बोलतोयस??

श्री : शौर्यबद्दल..

समीरा स्तब्धपणे भावाकडे बघतच उभी रहते..

समीरा : कोणाच लग्न आहे??

श्री : विराजच.. म्हणजे शौर्यच्या मोठ्या भावाच..

समीरा : पण पत्रिका तर विराज देशमुखची नसुन कुलकर्णी...ची हो....ती..

(समीरा शौर्यच्या बोलण्याचा विचार करू लागली.. त्याने तिला एकदा विराज आणि त्याच्या डॅडबद्दल सांगितलेलं)

ओहह शट.. ती मनातच बोलली..

श्री : विराज कुलकर्णीच नाव आहे मग पत्रिकेवर तेच नाव असणार ना..

समीरा : मला पण यायच मुंबईत.. मी पण येते

समीरा अस बोलत आपल्या रूममध्ये पळते.. वृषभला फोन करायला आपला मोबाईल शोधते..पण नेमका फोन स्विच ऑफ झाला असतो.. ती फोन तसाच चार्जिंगला लावत आपलं सामान भरायला घेते.. 

तोच तिची आई तिला आवाज देत तिला खाली बोलावते..  चिडचिड करतच हातातलं काम तसच ठेवत ती आईकडे जाते.. 

आई एक दोन काम तिला सांगते.. हातातील काम उरकून ती पटकन पळत वर्ती येते.. आणि मोबाईल स्विच ऑन करते..  मोबाईल स्विच ऑन करत ती वृषभला फोन लावते.. पण वृषभ काही फोन उचलत नसतो.. ती लगेच रोहनला फोन लावते.. रोहनच्या बाबतीतही तसच घडत.. तसाच मोबाईल बेडवर टाकत ती आपली बेग भरायला घेते.. 

इथे रोहन समीराचा फोन बघुन परत तिला फोन करतो.. ती लगेच त्याचा फोन उचलते..

रोहन : सॉरी मी बिजी होतो.. तु फोन केलेलास तेव्हा..

समीरा : शौर्यच्या भावाच लग्न आहे..

रोहन : कधी??

समीरा : उद्या.. 

रोहन : म्हणजे शौर्य आला असेल ना..

समीरा : मे बी.. 

रोहन : लग्न कुठेय??

समीरा : मुंबईत.. एड्रेस मला पण नाही माहीत बट मी दादाला विचारून सांगते.. तु वृषभ आणि बाकीच्यांना सांग.. 

रोहन : ओके मी उद्या सकाळच्याच फ्लाईटने मुंबईत येतो.. थेंक्स समीरा.

समीरा : तो आला असेल ना इंडियात??

रोहन : भावासाठी नक्कीच आला असेल.. भेटुयात मग उद्या.. तु आठणीने एड्रेस पाठव.. मी वृषभला आणि बाकीच्यांना फोन करून कळवतो..

समीरा : बर बाय...

समीराला कधी एकदाच सकाळ होते आणि ती शौर्यला भेटते अस झालं असत..

★★★★★

इथे सगळे शौर्यच्या बर्थडे साठी एक्साईट असतात.. 

(बघुया कसा सेलिब्रेट होतोय शौर्यचा बर्थडे.. पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all