अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 74

In marathi

आर्यन : शौर्य दुसर प्रेम होऊ शकत काय ??

शौर्य : त्याला सोडा आधी मग सांगतो...

नैतिक आणि आर्यन रॉबिनला सोडतात..

आर्यन : आता बोल..

सगळेच आता शौर्यकडे बघत असतात.. गाथा पण एकटक शौर्यकडे बघत असते.. 

शौर्य : तु नको ते विचार का करतोयस.. म्हणजे दोन तीन दिवसांपासुन मी तुझी नाटक बघतोय.. सारख सारख अस नको ते का बोलतोयस तु.. तुला खरच कंटाळा आलाय काय ज्यो चा.. ??

रॉबिन : ए शौर्य काहीही काय बोलतोयस.. मला का कंटाळा येईल ज्यो चा.. आणि आपला प्रश्न काय आहे.. खर प्रेम परत होत का?? तु त्यावर तुझं अन्सर दे ना.. उगाच नको ते बोलतोय..

शौर्य : ज्यो तुला नक्की समजुन घेतेना???

रॉबिन : हा घेते..

शौर्य : ती सोबत असताना अचानक कधी तुझ्या खास मैत्रिणीचा फोन वैगेरे आला आणि ज्यो ला माहिती आहे की ती तुझी छान मैत्रीण आहे.. तरी ती तुझ्यावर रागावते.. किंवा त्या मुलीवरून डाऊट वैगेरे घेते का..??

रॉबिन मानेनेच नाही बोलतो..

शौर्य : तिला तु दुःखी आहेस हे तुझा चेहरा बघुन कळत की नाही कळत..??

रॉबिन : हो कळत तिला..

शौर्य : तु बोलशील ती प्रत्येक गोष्ट ती तुझी ऐकते??

रॉबिन : हो..

शौर्य : तु तिला दिसलास नाही तर ती तुझ्याशिवाय किती दिवस राहील..

रॉबिन : एक मिनिट सुद्धा ती राहू शकणार नाही.. तु दिवसाच कुठे घेऊन बसतोयस.. म्हणजे आम्ही जास्त लांब रहात नाही तरी व्हिडिओ कॉल करतेच ती..

शौर्य : तुझ्यावर कधी खोटे आरोप करून तुझ्यासोबत भांडुन तुला त्रास होईल अस वागते का ती??

रॉबिन : नाही.. पण तु एवढे प्रश्न का करतोयस..

शौर्य : जर ह्यातली एक पण गोष्ट ज्यो करत नाही.. मग तु परत दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडुच शकत नाहीस. ती ज्यो आहे रॉबिन तुझ्यासाठी काहीही करू शकते.. आणि तुम्हां दोघांच प्रेम म्हणजे विर आणि वहिनीच्या लव्हस्टोरी सारख आहे. तुमच्या प्रेमाला एन्ड नाही.. खर प्रेम परत होत असेलही पण तुझ्या बाबतीत तस नाही होणार... कारण तुझं पहिलं प्रेमच हे खरं प्रेम आहे.. तुझं ज्योवर खर प्रेम आहे आणि ज्योच पण तुझ्यावर खर प्रेम आहे..

नैतिक : कळलं तुला रॉबिन.. एक वेळ आपला शौर्य परत प्रेमात पडु शकतो पण तु नाही..

हम्मम्म रॉबिन शौर्यकडे बघतच आपली मान होकारार्थी हलवत बोलला..

शौर्य : गाथा तु गाडी आणलीस..??

(नैतिककडे रागात बघतच तो गाथाला बोलतो)

गाथा : केब बुक करते मी..

शौर्य : मी सोडतो तुला.. तसही मला फोटो आणायला स्टुडियोत जायचय.. उद्या लागतीलना..

गाथा : बर ..

शौर्य : आता 3 वाजलेत.. तुम्ही लोक आराम करा.. मी येतो 7 वाजेपर्यंत येतो.. ट्राफिक असेल तर अजुन लेट होईल मला.. आणि ब्रूनोला पण बघा जरा... तस जेवलाय तो.. तुम्ही चहा पाणी घ्यायला जाल तेव्हा त्याला पण घेऊन जा.. आणि दूध द्या त्याला..

नैतिक : घेऊन जा ना त्याला पण.. आमच्याकडे राहील का तो..

शौर्य : घेऊन गेलो असतो.. पण गाडी चालवायला नाही देणार तो मला.. 

(रॉबिनकडे ब्रूनोला देतच तो बोलला)

ब्रुनो.. एक दम शांत बसायच.. ओके... मी परत येणार आहे.. कुठेही जात नाही..

गाथा : त्याला कळत का तु काय बोलतोस ते..

शौर्य : सगळं कळत त्याला.. गुड बॉय आहे तो.. 

आर्यन : मी येऊ तुझ्यासोबत स्टुडियोत..

शौर्य : तु दमला नसशील तर चल..

नैतिक : मगाशी तर बोलत होतास दमलोय मी.. झोप येतेय..

आर्यन : एक मिनिट.. ते रॉबिन बोलला.. मी नाही..

रॉबिन : त्या नंतर तु पण बोललास.. हे लोक डेकोरेशन बघायला गेले होते तेव्हा..

नैतिक : आणि इथे काम असताना तु पळुन कुठे जातोय..??

आर्यन : शौर्यला सोबत होईल म्हणुन...

शौर्य : तो येतोय तर येऊ दे ना त्याला.. तु का त्याला अडवतोयस??

नैतिक : मला आर्यन शिवाय करमत नाही म्हणुन.. जर आर्यन येणार असेल तर आम्ही पण येणार..

आर्यन : तुम्हा लोकांना झालं काय आहे?? 

(रॉबिन गाथाकडे इशारा करतच आर्यनला काही तरी खुणावतो)

नैतिक : शौर्य तु निघ.. आर्यन दमला आहे खुप. डोळे बघ कसे झालेत त्याचे..

शौर्य : आर्यन तु..

आर्यन : नाही येत.. मला झोप पण येतेय..

शौर्य : म्हणुन आधीच बोललो आराम करा तिघांनी.. काही असेल तर फोन करा..आणि चहा नाश्ता करून घ्या.. मला ट्राफिकमुळे उशीर पण होईल..

नैतिक : ओके बॉस.. 

शौर्य : आणि पक्का अजून काही राहील नाही ना..

गाथा : मग मी आहे ना... मी घेऊन येईल..

शौर्य : ओके

गाथा : बाय गाईज...

सगळेच गाथाला बाय करतात..

शौर्य : सॉरी काल मी तुझा मेसेज बघितला नाही.. थोडं बिजी होतो..

(गाडी ड्राइव्ह करतच शौर्य बोलतो)

गाथा : शौर्य ते तु आज रडलायस का?? म्हणजे तु आलासना रिसॉर्टवर तेव्हा तुझे डोळे थोडे असे मला वाटत होते.. सगळ्यांसमोर नाही विचारू शकत म्हणुन आता विचारते..

शौर्य : ते मे बी डोळ्यांत काही तरी गेलं असेल म्हणुन.. ते तुला अस वाटलं असेल..

गाथा : काय झालंय शौर्य..?? मला तुझ्यासोबत फोनवर बोलतानाच तुझ्या आवाजावरून पण वाटलंच होतं.. तु रडत होतास ते.. प्लिज सांगशील काय झालं...

शौर्य : तुला सगळंच कस कळत माझ्याबद्दल??

गाथा : आधी सांग काय झालं ते मग सांगते..

शौर्य : ते थोडं विरसोबत भांडण झाल.. त्यात मी आज पहिल्यांदाच त्याला खुप हर्ट होईल अस बोललो ना.. मग मलाच नंतर थोडं वाईट वाटत होतं.. म्हणुन..

गाथा :  मी आणि सर्वेश पण भांडतो.. बट तो लहान आहे ना अजुन म्हणुन होतात भांडण.. बट तुम्ही दोघे एवढे मोठे झाले तरी भांडता.??

शौर्य : आता मोठे झालोत.. एकमेकांपासून लांब असतो म्हणुन तरी खुप कमी झालय.. पहिल लहान असताना तर खुपच भांडायचो.. बट जेवढे भांडतो त्याहुन जास्त एकमेकांवर प्रेम करतो आम्ही.. 

गाथा : जिजु खूप रागीट आहेत ना.. मला कधी कधी दि च टेन्शन येत.. म्हणजे ते तूझ्यावर भडकलेले ना ते बघुन.. आणि त्यादिवशी तर तुझ्यावर हात पण उचलला.. मी किती घाबरली असेलना तु विचारच नाही करणार.. म्हणजे आम्ही तिघा भावांनी कधी अस मार नाही खाल्लाय कुणाचाच.. सर्वेश पण खूप मस्ती खोर आहे बट मी सुद्धा कधीच त्याच्यावर हात नाही उचलत..

शौर्य : ए गाथा.. तो जस माझ्यावर भडकतोना तस तुझ्या दि वर अजिबात भडकणार नाही आणि  मारण वैगेरे तर लांबच राहील.  राग येतो त्याला म्हणुन तो वाईट नाही ना.. खुप चांगला आहे माझा भाऊ.. खुप म्हणजे खुप..

गाथा : दि पण असच बोलते.. त्यांना राग नाही कंट्रोल होत. पटकन बोलुन मोकळे होतात..

शौर्य : खुप लाडात वाढलाय ना तो.. प्रत्येक गोष्ट त्याला तो जेव्हा मागेल तेव्हा त्याच्या हातात मिळायची.. नाही हा शब्द त्याने कधी ऐकलाच नाही.. कोणतीच गोष्ट त्याच्या कधी मनाविरुद्ध घडलीच नाही ना.. म्हणुन  जर कधी एखादी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध घडली की मग तो भडकतो.. त्यादिवशी मी त्याच्या मना विरुद्ध वागलो म्हणुन तो भडकला.. त्याला राग जेवढा पटकन येतो तेवढा पटकन जातो पण.. आणि राग ही एकच गोष्ट सोडलीना विर मधली की माझा विर म्हणजे डायमंड आहे.. आणि नको टेन्शन घेऊस दि च.. मी विरला जेवढं ओळखतो ना त्यावरून एवढ नक्की सांगेल तुझी दि माझ्या विर सोबत खुप खुश राहील.. खुप म्हणजे खुप..

गाथा : तस पण तु असणार ना दि सोबत.. मग मला नाही टेन्शन..

शौर्य : सॉरी पण मी नसणार ग इथे.. मी चाललोय USA ला.. बट माझी मम्मा असेल ना.. ती घेईल काळजी वहिनीची.. तु नको ग टेन्शन घेऊस.. आम्ही लोक तुझ्या दि चे हाल वैगेरे नाही करणार.. माझी फेमिली वेल एज्युकेटेड आहे.  

गाथा : तस नाही रे.. पण एक बहिण म्हणुन मला काळजी वाटते ना.. 

शौर्य : तेच सांगतोय नको काळजी करुस.. 

गाथा : हम्मम.. मी पण तुझ्यासोबत येतेय स्टुडियोत.. चालेल ना??

शौर्य : मला काय प्रॉब्लेम असणार.. मला चालेल.. आणि मला सांग पण फोटो कसे लावु ते.. म्हणजे तु काही ठरवलं असशील ना..

गाथा : हम्मम्म... 

शौर्य : तु येताना कशी आलीस??

गाथा : माझा मामा आलेला रिसॉर्टला.. ते स्नॅक्स आणि इतर जेवणाच वैगेरे पण बघायच होत ना.. मग ते हॉटेलच्या मॅनेजर सोबत बोलायला आलेले.. त्यांच्यासोबतच आली मी..

शौर्य : ओके.. आपण चहा घेऊयात का??? मला झोप यायला लागलीय..

गाथा : मला चालेल..

गाडी एका हॉटेलबाहेर पार्क करतच दोघेही आत शिरतात..

शौर्य दोघांसाठी चहा ऑर्डर करतो..

गाथा : तुझं कॉलेज कधी पासुन सुरु होईल??

शौर्य : ते तर चालुच असत.. माझं कॉलेज बंद कधीच नसत..

गाथा : म्हणजे..??

शौर्य : म्हणजे लेक्चर होत नाहीत.. बट इतर एक्टिव्हिटी असतात चालु.. 

गाथा : तु काय काय करतोस..??

शौर्य : मी सकाळी 5 ला उठतो.. मग जिम ला जातो.. तिथून 6 ला रूमवर येतो. फ्रेश होतो मग ब्रेकफास्ट.. मग लेक्चर्स.. मग फुटबॉल प्रॅक्टिस.. मग डान्स प्रॅक्टिस.. बँड पण आहे आमचा.. तिथे पण जातो.. मुड असेल तर.. मग लंच.. थोडा फार अभ्यास.. मग पुन्हा डान्स प्रॅक्टिस.. जर शॉ असेल आमचा तर तिथे जातो.. मग डिनर करतो.. मग मित्र मंडळींसोबत थोडा फार टाईमपास... मग झोपतो..

गाथा : तु पुर्ण दिवस बीजी असतोस..

शौर्य : हो.. आणि तु..

गाथा : माझं तर कॉलेज आणि मीच.. अभ्यासच एवढा असतो.. तुझ्यासारख मला इतर काही करायलाच नाही मिळत.. मला कधी कधी अस वाटत मी उगाच डॉक्टर व्हायच डीसाईड केलं. मला तुझ्यासारखी लाईफ एन्जॉय करायलाच नाही मिळत.. कॉलेज.. मग प्रॅक्टिकल.. मग अभ्यास.. ह्या तीन गोष्टीच मी करत असते.. बोरिंग झालीय लाईफ..

गाथा अस बोलताच शौर्य हसतच तिच्याकडे बघतो..

गाथा : तुला हसु येतंय..

शौर्य : सॉरी.. बट ते तुला मी पहिल्यांदाच अस इरिटेट होऊन बोलताना बघतोयना.. 

गाथा : ए शौर्य.... अस इरिटेट होऊन बोलताना मी फनी वैगेरे दिसते का??

शौर्य : अजिबात नाही... उलट अजुन जास्त छान दिसतेस.. मला तर अस बघतच रहावं तुझ्याकडे अस वाटत..

शौर्य त्याच्या मनातल्या फिलिंग गाथाला अगदी सहज बोलुन गेला.. 

आपण भावनेच्या भरात थोडं जास्तच बोललो हे शौर्यच्या लक्षात येताच तो गाथा पासुन आपली नजर लपवु लागला.. गाथा मात्र गालातल्या गालात हसतच त्याच्याकडे बघत असते.. तोच वेटर येऊन चहा दोघांच्या समोर ठेवतो आणि तिथुन निघुन जातो..

गाथा : चहा घे थंड होईल..

शौर्य :  तुला राग नाही आलाना..??

(गाथाकडे बघतच तो तिला विचारतो)

गाथा मानेनेच नाही बोलते..

शौर्य : तुला खरच मनापासुन डॉक्टर व्हायचय होतं?? का घरचे प्रेशराईज करतात म्हणुन??

गाथा : माझे पप्पा आणि मम्मी सपोर्टीव्ह आहेत.. त्यांनी कधीच त्यांच डिसीजन आम्हा तिघा भावंडांवर नाही लादलं.. 

शौर्य : मग एवढं इरिटेट का होतेस.. एन्जॉय करत स्टडी कर.. मला बघ.. मला तर ह्या साईटमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही.. बट स्टडी मात्र मी मन लावुन करतो.. 

गाथा : व्हॉट?? तुला कॉमर्समध्ये इंटरेस्ट नाही..

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

गाथा : मग कश्यात इंटरेस्ट आहे..??

शौर्य : मला पण सायन्स घ्यायच होत.  

गाथा : मग??

शौर्य : "अजिबात नाही.. तु कॉमर्समध्येच एडमिशन घेतोयस.." अस मम्मा बोलली..

गाथा : आणि तु घेतलंस??

शौर्य : तीच पण बरोबर होत ना ग.. बाबाने माझ्यासाठी एवढा मोठा बिजीनेस उभारलाय.. आणि मी तो सांभाळावा अशी इच्छा त्याने मम्माजवळ बोलुन दाखवली होती.. म्हणुन तिने मला सायन्स नाही घेऊ दिलं.. 

गाथा : तुला पण डॉक्टर व्हायच होत का??

शौर्य : नाही ग.. मला ऐरोस्पेस इंजिनिअर व्हायच होत.. इव्हन अजुन पण तेच वाटत..  मला NASA मध्ये जायच होत.. मी स्कुल थ्रू एकदा जाऊन पण आलोय NASA मध्ये.. 

गाथा : मग तु थोडं तुझ्या मम्माला फोर्स करायचंस ना. 

शौर्य : तुझा चहा पिऊन झाला असेल तर आपण निघुयात..??

गाथा : हम्ममम चल..

दोघेही गाडीत येऊन बसतात.. शौर्य गाडी अगदी शांतपणे ड्राइव्ह करत असतो..

गाथा : शौर्य का नाही रिक्वेस्ट केलीस तुझ्या मम्मीला.. जिजुंना तर रिक्वेस्ट करायची त्यांनी मदत केली असती ना..

शौर्य : एंगेजमेंटचाच फोटो फ्रेम बनवायला देऊयात का प्रीवेडिंग मधला एखादा छानसा फोटो देऊयात?? नाही म्हणजे एंगेजमेंटचा फोटो पटकन फ्रेम होऊन येईल अस नाही वाटत मला. फोटो ग्राफर आपल्यासोबत बिजी असेल ना..आपण प्रीवेडिंग मधलाच एखादा छानसा देऊन टाकुयात.. चालेल ना..

गाथा : टॉपिक का बदलतोयस?? माझ्यासोबत नाही बोलवस वाटत त्या टॉपिकवर तर सांग तस.. पण तु स्पष्ट बोलायला शिक शौर्य.. तु जोपर्यंत स्पष्ट नाही बोलणार तोपर्यंत समोरच्याला नाही कळणार.. समोरच्याच मन जप पण स्वतःच मन न दुखवता.. USA ला जाण्याचा हट्टी पणा करत होतास तसाच शिक्षणाच्या बाबतीत केला असतास तर आत्ता तुला पाहिजे ते तु करू शकला असतास ना..

शौर्य : खुप केलेला.. मम्माने नाहीच ऐकलं.. मम्माच एका शब्दात ऐकायला शिक.. अस विर बोलला.. गप्प कॉमर्समध्ये जायच अस बोलत विरच्या डॅडने एडमिशन फॉर्म मम्माच्या आणि माझ्या पुढ्यातच फाडुन टाकला.. जेवण वैगेरे पण सोडलेल मी.. बट मम्मा ऐकायलाच तैयार नाही.. माझ्या बाबाच स्वप्न होतंना मग मी ही तैयार झालो.. आणि गाथा प्लिज हे सगळं वहिनीला नको बोलुस.. परत ती मम्माबद्दल तिच्या मनात गैरसमज करून घेईल.. मम्माने जे काही केलं ते माझ्या चांगल्यासाठीच.. 

गाथा : अस तु स्वतःच्या मनाला समजवतोयस??

शौर्य : हम्मम.. 

गाथा : मग आता काय करणार पुढे?? जिजूंसारख बिजीनेस मेन..

शौर्य : माझं नाही ठरलंय काही.. आणि मी काही ठरवणार पण नाही.. स्वप्न बघायला भीती वाटते ग मला.. सगळी मेस होऊन जातात.. म्हणजे आत्तापर्यंत जी पण स्वप्न बघितली ना ती सगळी स्पोईल झालीत माझी..

(अस बोलतच शौर्य गाडी स्टुडियोजवळ येऊन थांबवतो.. आणि हातातील घड्याळात टाईम बघतो)

4.30 झाले.. मला अस वाटतंय मला 8 वाजतील रिसॉर्टवर पोहचायला.. 

(शौर्य गाडी बाहेर पडतच गाथाला बोलला)

गाथा पण गाडी बाहेर पडते..

शौर्य स्टुडियो वाल्यासोबत बोलत असतो.. स्टुडियोवाला त्याच्या कॉम्प्युटरमध्ये शौर्यला विराज आणि अनघाचे प्रीवेडिंगस फोटो दाखवत असतो.. गाथा मात्र  एकटक शौर्यकडे बघत असते..

शौर्य : गाथा हा वाला फोटो बघ ना तुला आवडतो का?? फ्रेमसाठी देऊयात..

गाथा : तुला आवडला तर छानच असेल... देऊन टाक..

शौर्य : मला तर सगळेच आवडतात ग.. प्लिज एकदा बघ ना..

गाथा पण कॉम्प्युटरमध्ये बघत फोटो चॉईज करू लागली.. तिला पण शौर्यने दाखवलेला फोटोच पसंत पडतो..

शौर्य तोच फोटो मोठ्या फ्रेममध्ये बनवायला सांगतो.. आणि प्रिंट केलेले मोठे फोटो घेत गाथाला दाखवतो.. गाथा एका सिरीजमध्ये फोटो लावुन ह्याच सिरिज नुसार लाव अस शौर्यला सांगते..

शौर्य : मोठं काम झालं.. 

गाथा : हम्मम

शौर्य : आता अजुन एक मोठं काम झालं म्हणजे टेन्शन फ्री..

गाथा : आता कोणतं काम राहीलय??

शौर्य : तुला सेफली तुझ्या घरी सोडायच..

काय तु पण.. गाथा हसतच शौर्यला बोलते..

शौर्य पण हसतो..

गाथा मात्र तो हसताना त्याच्या गालावर पडणारी खळी बघत रहाते..

शौर्य : आपण परत एकदा चहा घेऊयात?? नाही तर कॉफी?? 

गाथा : आत्ताच घेतलीस ना चहा..

शौर्य : मग काय झालं परत घेऊयात..

गाथा : एवढ चहा किंवा कॉफी घेणं चांगलं नसते.. आणि मुळात मी चहा नाही घेत.. मगाशी तु ऑर्डर केलीस म्हणुन मी घेतली.. मी एकदाच कॉफी घेते तेही मॉर्निंगला..

शौर्य : मग तु का नाही स्पष्ट बोललीस मगाशी मला चहा नकोय म्हणुन??

गाथा : तुझं मन नाही तोडावस वाटलं मला म्हणुन.. 

गाथा अस बोलत खिडकी बाहेर बघु लागते.. आणि शौर्य तिच्याकडे..

शौर्य : मग आता नाही बोलुन माझं मन तोडतेस ते??

गाथा : कारण तुलाच त्रास होईल त्याचा म्हणुन..

शौर्य : मिस डॉक्टर गाथा.. मला झोप येतेय म्हणून मी चहा घ्यायच बोलत होतो.. मला मग एकट्याला चहा पियायला कंटाळा येईल.. आणि मी उतरणार पण नाही गाडीतुन.. पुन्हा दीड तास ड्राइव्ह करायचय मला... मध्येच झोपलो तर...एक्सि....

गाथा : बस बस.. काहीही नको बोलत जाऊस.. तुला झोप येतेय मग ज्युस पिऊयात आपण.. पण चहा नको.. आणि म्युसिक ऑन कर मग नाही येणार झोप तुला..

(गाथा थोडा राग दाखवतच शौर्यला बोलते)

शौर्य : ओके..

थोडं पुढे जाताच एका ज्युस कॉर्नर जवळ शौर्य गाडी थांबवतो..

शौर्य : तु गाडीतच बस मी येतो ज्युस घेऊन.. बाय दि वे कोणता घेऊ तुला??

गाथा : जो तुला आवडेल तो घे.., मला तर सगळ्या प्रकारचे ज्युस आवडतात.. 

शौर्य : बिट रूटचा घेतो मग तुझ्यासाठी..

(शौर्य हलकेच हसु चेहऱ्यावर आणत गाथाला बोलतो)

गाथा : मला चालेल काहीही.. पण तु त्यातला अर्धा पिणार असशील तरच आण..

गाथा पण हसतच शौर्यला बोलते..

शौर्य : बर बस मी घेऊन येतो..

दोघांसाठी मिक्सफ्रूट ज्यूस ऑर्डर करत शौर्य रॉबिनला फोन लावतो.. 

रॉबिन : गुड मॉर्निंग शौर्य ।

शौर्य : गुड इवहिनींग झालीय मित्रा....

रॉबिन : हा काय असेल पण..

शौर्य : असेल म्हणजे काय?? खरच झालीय.. झोपलायस अजुन..

रॉबिन : हम्मम्म.. 

शौर्य : मला यायला अजुन थोडा उशीर होईल.. मी आता गाथाला सोडायला चाललोय घरी.. तुम्ही लोक चहा नाश्ता करून घ्या..

रॉबिन : बर.. झोपु मी..

शौर्य : हम्मम.. बाय

शौर्य ज्युसचा ग्लास घेऊन गाडीत येतो. दोघेही गाडीत बसुन ज्युस पितात..

ज्युस पिऊन होताच शौर्य ग्लास ठेवुन येतो.. आणि गाथाला सोडायला गाडी तिच्या घराच्या दिशेने वळवतो..

गाथा : म्युसिक करू का ऑन..?

शौर्य : कर ना..

गाथा : तु एवढ्या लांब जाण्यापेक्षा आज घरीच जाऊन आराम कर ना.. उद्या सकाळी उठुन जा..

शौर्य : नाही नको.. मित्र तिथे रिसॉर्टवर आणि मी घरी.. चांगलं नाही दिसणार ते..

गाथा : आपण नंतर परत एकदा डान्स प्रॅक्टिस करूयात हा.. 

शौर्य : हम्मम.. वेळ मिळेल का.. ह्या गडबडीत??

गाथा : आपल्या माणसांसाठी काढावा लागतो वेळ.. मी काढेल माझ्या दि साठी.. आणि तु ही तुझ्या विरसाठी काढुच शकतोस..

शौर्य : हम्मम..

गाडी गाथाच्या घराजवळ थांबते..

गाथा : आत चल येतोस तर.. चहा घेऊयात..

शौर्य : जास्त चहा पिण चांगल नसत शरीरासाठी.. अस माझ्या ओळखीतले एक मोठे डॉक्टर आहेत ते बोलले..

शौर्य अस बोलताच गाथा हसते...

गाथा : सांभाळुन ड्राइव्ह कर.. आणि पोहचलास की मला टेक्स कर.. ओके..

शौर्य : ओके.. बाय..

गाथा गाडीतुन बाहेर उतरू लागली..

गाथा.... शौर्य परत तिला आवाज देतो.. तशी ती थोडं वाकुन खिडकीतुन आत डोकावत शौर्यकडे बघत त्याला काय झालं म्हणुन विचारू लागली..

शौर्य : माझ्या मनातल सगळंच कस तुला कळत??

गाथा : खर सांगु.. मला पण नाही माहीत ह्या प्रश्नाच उत्तर.. मे बी आज काल तुझ्याबद्दल जास्तच विचार करत असेल म्हणु...

(आपण पण नको ते बोलुन गेलो अस गाथाला वाटाताच गाथा पुढे काय बोलायच हा विचार करत शब्द शोधते)

म्हणजे तु डिप्रेशनमध्ये असतोस ना.. मग तु काय विचार करत असशील त्याची स्टडी मी करत असते.. तुला उशीर होतोयना??

शौर्यला ती काय बोलते ते खरं तर कळत नसत.. 

शौर्य : हम्मम्म..  बाय.

गाथा : बाय..

आज गाथा आत न जाता शौर्य तिथुन जाईपर्यंत तिथेच उभी असते.. शौर्यसुद्धा साईड मिररमधुन तिला बघतच तिथुन निघतो..

गाणी ऐकतच डोळ्यांवर येणारी झोप उडवत तो रिसॉर्टवर यायला निघतो.. गाथासोबत एवढा वेळ गप्पा मारून शौर्यला खुप छान वाटत होत.. तिने घरी जाऊच नये अस त्याला वाटत असत.. आता गाडीत अस एकट आणि शांत बसुन रहाणं त्याला नकोस वाटत होतं..

आणि तोच त्याच फेव्हरेट गाणं लागत

हम्मम हम्म्म हम्ममम
तुझसे ही तो मिली है राहत....
तू ही तो मेरी है चाहत.....
तुझसे ही तो जुडी ज़िन्दगी....

ते गाणं लागताच शौर्यच डोकं जड होऊ लागत..

रेपिस्ट सोबत असच वागतात शौर्य... तु रेपिस्ट आहेस.. 

समीराचे शब्द शौर्यच्या कानाभोवती फिरू लागतात.. गाडी बाजुला थांबवत तो ते गाणं बंद करतो.. 

डोळे बंद करत गाथाने सांगितल्याप्रमाणे एक खोल श्वास घेत सॉरी 10.. सॉरी 9... अस आपल्या हृदयाला बोलतो..

आणि हो तु रेपिस्ट नाहीस शौर्य.. अचानक गाथाचे शब्द त्याला आठवतात.. तस एक हसु त्याच्या चेहऱ्यावर येत.. पुन्हा गाडी ड्राइव्ह करत तो रिसॉर्टच्या दिशेने जायला निघतो.. जवळ पास साडे सातच्या सुमारास तो रिसॉर्टवर येतो.. मित्र मंडळी पुलमधील पाण्यात पाय टाकून मस्त पैकी मज्जा मस्ती करत बसले होते....

नैतिक : लवकर आलास..

शौर्य : ट्राफिक होत रे..

आर्यन : तरी लवकरच आलास..

शौर्य : तुम्हा लोकांना नक्की मी उशिरा आलोय अस बोलायच की लवकर आलोय अस बोलायचंय..

रॉबिन : आम्हाला वाटलं की तु डिनर वैगेरे करून येशील.. सासरी गेलेलासना..

शौर्य लगेच रॉबिनचा हात पकडत मागे पिरगळणार तस रॉबिन त्याला लांब ढकलत त्याच्यापासुन लांब पळतो..

रॉबिन : विराजच्या सासरी गेलेलासना अस बोलायच होत यार मला.. तु पूर्ण ऐकतच नाहीस माझं.. 

शौर्य : तुला काय बोलायच होत ना मला चांगलंच माहिती.. तुला दुपारपासून नकरे करतोयस तु.. 

शौर्य रॉबिनला पकडायला त्याच्या मागे पळतो..

नैतिक : काय चुकीच बोलला तो.. आज ना उद्या तुझं पण तेच सासर असणार ना शौर्य... 

आर्यन : हो ना. किती छान जोडी आहे तुझी आणि गाथाची..

तिघेही मुद्दामुन शौर्यला चिडवत त्रास देत होते..  

शौर्य : जाऊ दे माफ करतो तुम्हांला कारण मला पण असच वाटतंय आता..

शौर्य अस बोलताच तिघेही त्याच्याजवळ येतात..

रॉबिन : काय??

रॉबिन शौर्यच्या जवळ येतच त्याला विचारतो. तो जवळ आलाय हे दिसताच शौर्य त्याचा हात जोरातच मागे पिरगळतो

शौर्य : जाळ पाण्यात टाकलं पण नाही आणि मासा जाळ्यात अडकला पण..

रॉबिन : शौर्य प्लिज हात सोड.. आर्यन यार वाचव.. नैतिक प्लिज..

शौर्य : बाय 1 गेट 2 फ्री ऑफर आहे वाटत माझ्यासाठी.. कमॉन आर्यन..  

आर्यन : रॉबिन तुला कोणी त्याच्या जवळ जायला सांगितलं होतं..

रॉबिन : मॅग्नेट लावलय त्याने.. ओढला गेलो आपणच..

आर्यन : काय??? 

रॉबिन : नको त्या टाईमला नको ते प्रश्न कसले करतोयस.. माझा हात बघ.. शौर्य हात दुखतोय यार..

शौर्य : नको ते बोलताना तोंड नाही दुखत का??

शौर्य रॉबिनचा हात जोरात पिरघळत अजुन त्रास देत होता त्याला.

नैतिक आणि आर्यन एकमेकांना इशारे करतच शौर्यच लक्ष नाही हे बघुन त्याला पाठुन पकडतात.. 

रॉबिन आपला हात धरतच बाजुला होतो..

रॉबिन : किती जोरात हात पिरघळलास.. तु आता गेलासच..

शौर्य : रॉबिनजे करणार ते विचार करून कर.. नंतर एकटा भेटशीलच मला..

नैतिक : रॉबिन घाबरू नको.. वि आर विथ यु मेन..यु टेक युअर रिवेंज..

रॉबिन : शौर्य बी रेडी नाव्ह..

रॉबिन शौर्यजवळ येतच बोलला..

बाजुलाच पूल असतो.. शौर्य जोरातच नैतिकला धक्का देत त्याला पाण्यात ढकलतो..

शौर्य : आता आर्यन तु..

अजिबात नाही हा शौर्य.. एक तर मला सर्दी झालीय.. अस बोलत आर्यन शौर्यपासुन लांब पळु लागला...

चौघांचीही पुल जवळ मज्जा मस्ती चालू असते.. 

★★★★★

अनिता आपल्या रूममध्ये काम करत बसली असते.. आपण नसताना आपल्या घरी काय घडलंय ह्याबद्दल तिला काहीच माहिती नसत.. 

विराज शौर्यने दिलेली प्रॉपर्टीची फाईल हातात घेतच तिच्या रूममध्ये शिरतो..

अनिता त्याच्याकडे एक नजर फिरवत पुन्हा लॅपटॉपमध्ये काम करू लागते.. विराज फाईल अनिताच्या बेड वर ठेवत.. आपल्या घुडग्यांवर बसत अनिताचे दोन्ही पायाचे तळवे आपल्या हातात पकडत त्यावर डोकं ठेवत रडु लागतो..

अनिता : विर काय करतोयस.. पाय सोड बघु माझे.. इथे ये बघु.. 

विराज मात्र अनिताचे पाय सोडत नसतो.. 

अनिता कस बस आपले पाय सोडवत त्याला जवळ घेते..

विराज अनिताला रडतच मिठी मारतो..

अनिता : काय झालं सांगशील..

विराज : आय एम सॉरी मम्मा... मी खुप वाईट वागलो.. मी हलकवुन दिलं त्या लोकांना..

अनिता : कोणाला??

विराज : मोठ्या मम्मी पप्पांना..

अनिता : काय??

विराज : शौर्यला मारून टाकणार होते ते लोक.. मी दुपारी वेळेवर घरी नसतो आलो तर माझा भाऊ मला कधीच भेटला नसता ग.. खुप वाईट आहेत ती लोक..

विराज अस बोलताच अनिता घाबरून जाते..

अनिता : क.. काय केलं त्यांनी..

विराज दुपारी घडलेला प्रसंग अनिताला सांगतो..

अनिता : त्याला मारून काय मिळणार त्यांना मला तेच कळत नाही.. आधी सुरज आणि आता त्याचा भाऊ.. 

विराज : हे ह्या घराचे पेपर्स.. 

अनिता : शौर्यने हे घर तुझ्या नावावर केलंय मला माहिती आहे..

विराज : तुला माहीती होत हे सगळं??

अनिता : वकिल बोलले.. त्यादिवशी तो गेलेला त्यांच्याकडे.. मम्माला काही सांगु नका अस बोलला तो त्यांना.. माझ्या विश्वासातले आणि फेमिली वकिल आहेत ते.. मला न सांगता कस काय राहतील.. मी ही त्यांना सांगितलं मला हे माहिती आहे हे शौर्यला कळु देऊ नका.. त्याला जे करायच ते करू दे.. आज सकाळीच जाऊन शौर्यने सह्या केल्यात त्या पेपरवर..

विराज : आणि तु हे सगळं त्याला करू दिलंस..?? मला प्रॉपर्टी वैगेरे नकोय ग मम्मा.. मला तु आणि शौर्य हवाय.. हे घर शौर्यच होत आणि शौर्यचच राहील.. मला ह्या घरात काहीच इंटरेस्ट नाही.. तु आणि शौर्य तुम्ही दोघेच माझी प्रॉपर्टी आहात.. तुमच्या पूढे ह्या पेपर्सची व्हॅल्यू झिरो आहे ग मम्मा.. मला माफ कर.. मोठ्या मम्मीच्या आणि पप्पांच्या खोट्या प्रेमात मी आंधळा झालेलो ग.. परत नाही होणार माझ्याकडून अस..

अनिता : रडु नकोस.. शांत होत.. तुझ्यावर जास्त रागवायला मला नाही येत.. तुझ्या मोठ्या मम्मी सारखी मी घरी नसते रे दिवसभर हे तुला पण माहिती... पण ह्याचा अर्थ असा नाही ना की मी तुझ्यावर प्रेम करतच नाही.. माझं तुझ्याकडे लक्ष नाही..

अनिता विराजचे डोळे पुसतच त्याला बोलते..

विराज : आय नो मम्मा.. परत नाही होणार ग अस.. आणि हे घर आधी शौर्यच्या नावावर कर..

अनिता : तुझं लग्न झाल्यावर बघुयात..

विराज : लग्न व्हायच्या आधी हे घर शौर्यच्या नावावर झालं पाहिजे. मला नाही माहीत काही.. 

अनिता : शौर्य आहे बरा??

विराज : तु फोन लाव ना त्याला.. जेवला का बघ.. आणि मी इथे आहे नको सांगुस त्याला.. रागवलाय माझ्यावर तो..

अनिता विराजच्या पुढ्यातच शौर्यला फोन लावते.. आणि फोन स्पिकरवर ठेवते.. 

इथे शौर्य आर्यनच्या मागे पळत असतो.. मध्येच थांबत खिश्यातुन फोन काढुन बघतो तर त्याच्या मम्माचा फोन असतो...

मित्रांना हात दाखवतच तो थांबायला सांगतो.. आणि बाजुला जाऊन अनिताचा फोन उचलतो..

शौर्य : हा मम्मा बोल..

अनिता : तुझा आवाज का असा येतोय. बरा आहेस ना तु??

शौर्य : अग ते आम्ही खेळत होतो थोडं. मग दम लागलाय.. तु बोल ना.. काय झालं??

अनिता : जेवलास??

शौर्य : नाही ग.. थोड्या वेळाने जेवेल.. तु जेवलीस..

अनिता : आता जातच होती जेवायला..

शौर्य : विर आहे बरा?? 

अनिता : तो रूममध्ये असेल ना त्याच्या.. तूच फोन कर ना त्याला..

शौर्य : नाही नको.. तु त्याला घेऊन जा जेवायला.. सकाळपासुन थोडं टेन्शनमध्ये होता तो.. काही खाल्लं वैगेरे नसेल त्याने.. काळजी घे त्याची.. लग्न आहे ना त्याच. उगाच आजारी पडेल..

अनिता : बर.. 

शौर्य : तु येशील ना इथे 3 दिवसांनी रहायला.. ??

अनिता : हम्मम्म येईल मी.. तु वेळेवर जेवत जा आणि काळजी घे स्वतःची.. ओके

शौर्य : हम्म.. आणि मम्मा विर ला सांगु नकोस मी त्याच्याबद्दल तुला विचारत होतो तुला ते..

अनिता : का?? काय झालं??

शौर्य : असच मला वाटत म्हणुन.. तु काळजी घे तुझी आणि विर ची पण.. मी ठेवतो..

अनिता : बर बाय..

अनिता फोन कट करतच विराजकडे बघते..

अनिता : पहिल्यांदाच एवढा रागावला असेल ना तुझ्यावर..

विराज : हम्मम्म...

अनिता : तुझ्याशिवाय जास्त वेळ नाही राहु शकणार तो.. थोडा राग शांत झाला ना की स्वतःहुन बोलेल तुझ्यासोबत.

विराज : हम्मम्म्म

अनिता : चल जेवून घेऊयात..

अनिता विराजची समजुत काढतच त्याला जेवायला घेऊन जाते..

★★★★★

दोन दिवस येणाऱ्या फंक्शनची तैयारी करण्यातच निघुन जातात..

सगळी पाहुणे मंडळी पण रिसॉर्टवर येतात रहायला..

आपली मम्मा आलीय हे कळताच शौर्य तिला भेटायला जातो..

अनिताच्या रूममध्ये इतर पाहुणे मंडळी पण असतात आणि त्यासोबत विराज पण असतो..

शौर्य विराजकडे अजिबात बघत नाही.. 

आपल्या मम्माची आणि इतर पाहुण्यांची विचारपुस करून तो तिथुन निघतो..

विराज शौर्यला आवाज देतो पण शौर्य ऐकुन न ऐकल्यासारखं करत पाहुणे मंडळींना बाय करत अनिताच्या रूमबाहेर पडतो..

बाहेर मित्रमंडळींसोबत गाथा त्याला दिसते..

शौर्य : हेय गाथा... तु कधी आलीस??

गाथा : हे काय जस्ट.. तुला टेक्स्ट केला ना मी...

गाथा अस बोलताच सगळेच शौर्यकडे संशयी नजरेने बघु लागतात..

शौर्य : बघितला नाही ग मी.. मोबाईल चार्जिंगला लावलाय रूमवर.. बाय दि वे डेकोरेशन कस आहे??

गाथा : एकदम परफेक्ट डेकोरेशन केलयस..

रॉबिन : एक मिनिट.. आम्ही पण होतो हा मदतीला..

गाथा : तुम्ही सगळ्यांनीच खुप छान डेकोरेशन केलंय.. 

धन्यवाद... सगळे एकत्रच गाथाला बोलतात..

शौर्य : मी तुला पणत्या पण आणायला सांगितलेल्या..

गाथा : ह्या बघ आणल्यात.. पण एवढ्या पणत्या कश्यासाठी हव्यात??

शौर्य : रात्री तुला एक डेमॉ दाखवतो..

गाथा : रात्री..?? मेहंदीचा कार्यक्रम असणार.. आहे ना लक्ष्यात?? मला मेबी नाही जमणार यायला..

शौर्य : माझ्यासाठी दोन मिनिटं वेळ काढुन तु येऊच शकतेस ना.. प्लिज..

नैतिक : आम्ही मस्त काही तरी प्लॅन केलंय.. तुला आवडेल.. दोन मिनिटं लागतील फक्त..

गाथा : बर ट्राय करते मी..

शौर्य : ओके.. 

गाथा : अजुन काही राहील तर नाही ना आपल.. उद्या गोंधळ होईल नाही तर..

शौर्य : नाही ग.. बट तु आता फ्री असशील तर आपण एकदा प्रॅक्टिस करूयात आणि सर्वेश कुठेय..?? त्याला पण घेऊन ये... तो उद्या डान्स करणार आहे ना..

गाथा : उद्या तर आमचा पण एक सरप्राईज डान्स असणार.. नवऱ्या कडच्या मंडळींसाठी..

ज्योसलीन : हे कधी ठरलं..??

गाथा : सरप्राईज अस अचानकच ठरवतात ग..

शौर्य : करूयात प्रॅक्टिस??

गाथा : मला चालेल..

रॉबिन : वर्ती एक हॉल आहे रिकामी.. तिथे जाऊन करूयात..

गाथा : आणि इथे कोणी आलं तर..

शौर्य : इथे येऊन काही दिसणार पण नाही ना.. आपण सगळीकडे कर्टन लावलेत...  मेन मेन गोष्टी हाइड पण केल्यात.. 

ज्योसलीन : चला मग डान्स करूयात..

सगळेच मिळुन डान्स प्रॅक्टिस करायला निघुन जातात.. 

बोलता बोलता संध्याकाळ होते..

फायनली अनघाच्या हातावर विराजच्या नावाची मेहंदी लावायला घेण्यात आली.. हॉलवर महेंदिची गाणी वाजतच होती.. 

गाथा पण आपल्या हातावर मेहेंदी काढुन घेत होती..

ज्योसलीन तिच्या बाजुलाच बसून होती..

ज्योसलीन : दोन्ही हातावर मेहेंदी लावलीस मग जेवणार कशी??

गाथा : एकदा मेहेंदी सुखली की मग स्पून ने खाईल मी.. तु पण काढ..

ज्योसलीन : मी जेवुन वैगेरे झाल्यावर काढेल.. 

गाथा : बर पण नक्की काढ..

ज्योसलीन : हम्मम

जवळपास 9 च्या सुमारास गाथाची मेहेंदी काढुन होते..

इथे शौर्य गाथाला फोन लावत असतो पण तिचा फोन तिने रूमवर ठेवला असतो...

रॉबिन : काय झालं??

शौर्य : फोनच उचलत नाही 

रॉबिन : मला अस वाटत ना रागावली असेल ती तुझ्यावर..

शौर्य : कश्याला??

रॉबिन : ती डान्स करत होती तेव्हा कस बघत होतास तिच्याकडे.. तिला कळलं असणार तु तिच्यावर प्रेम करतोस ते..

शौर्य : तुला बोलायच काय आहे.. अस बघितलं म्हणजे मी प्रेम करतो का?? आणि तुम्ही लोक पण बघत होते ना..

नैतिक : हो बघत तर आम्ही पण होतो पण तु ज्या प्रेम भऱ्या नजरेने बघत होतास ना तस आम्ही नव्हतो बघत..

(शौर्य एक दोन मिनिटं नैतिकच्या बोलण्याचा विचार करू लागतो...)

शौर्य : खरच ती रागावली असेल का?? म्हणजे माझा फोन तिने कधी उचलला नाही अस नाही झालंय कधी.. तु एकदा जाऊन बघ ना आत..

रॉबिन : पागल आहेस का?? मुलींमध्ये मी कुठे जाऊ..

आर्यन : ज्यो.. 

रॉबिन : हा थांब मी ज्यो ला कॉल लावतो..

रॉबिन थोडं बाजुला जाऊनच ज्योसलीनला फोन लावतो.. आणि गाथाला बाहेर घेऊन यायला सांगतो.. आणि फोन कट करतो..

शौर्य : काय बोलली??

रॉबिन : गाथा खुप रागावलीय शौर्यवर.. शौर्यच तोंड पण बघायच नाही अस बोलली..

शौर्य : तु परत फोन लाव मला बोलायच गाथा सोबत..

रॉबिन : नाही नको.. ती परत तुला काही तरी बोलेल मग तुला त्रास होईल..

शौर्य : नाही त्रास होणार तु लाव फोन..

नैतिक : ए शौर्य राहू दे यार.. तु नको मनाला लावुस..

शौर्य : ती अस का बोलली पण.. मला नाही वाटत गाथा अस काही बोलेल.. 

रॉबिन : म्हणजे मी खोटं बोलतोय अस बोलायचंय तुला..

आर्यन : ए रॉबिन शांत हो.. आणि शौर्य तु एवढा विचार का करतोयस तिचा.. सोड ना..

शौर्य : माझं प्रेम..

शौर्यमध्येच थांबत आपल्या मित्रमंडळींकडे बघतो..

रॉबिन : प्रेम काय??

शौर्य : माझ्यासोबत नेहमी प्रेमाने बोलते ना मग अस रागवून माझ्यासोबत बोलणार नाही ती.. अस मला बोलायच होत..

रॉबिन : मग तिलाच विचार ती अस का बोलली ते..

शौर्य : तेच बोलतोय ना.. लाव परत फोन ज्यो ला.. एक मिनिट मीच लावतो.. मी पण का तुला लावायला सांगतोय.. माझ्याकडे आहे ज्यो चा नंबर...

रॉबिन : विश्वासच नाही ह्याचा.

शौर्य : तुझ्यावर तर अजिबात नाही..

नैतिक  : एक मिनिट..अस फोन करून बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनच बोल ना तिच्याशी..

शौर्य : ती भेटायला तर पाहिजे ना.. 

आर्यन : पाठी बघ ती आली..

शौर्य मागे वळुन बघतो तर गाथा असते.. 

तु फोन का नाही उचलत... शौर्य तिच्याजवळ जातच तिला विचारतो..

गाथा दोन्ही हात शौर्य समोर धरत तिने दोन्ही हातावर लावलेली मेहेंदी त्याला दाखवते..

शौर्य : म्हणजे तु रागावली वैगेरे नाहीस ना माझ्यावर..??

गाथा : काय?? मी का रागवु तुझ्यावर.. आणि तुला कोण बोललं??

शौर्य मागे आपल्या मित्र मंडळीकडे बघतो तर तिथे कोणीच नसत..

शौर्य : ते तु फोन उचलत नव्हतीस ना म्हणुन मला अस वाटलं..

गाथा : तुझ्यावर कोणी कधी रागवु शकेल का शौर्य.. बाय दि वे तु काय दाखवणार होतास..

शौर्य : अरे हा मी विसरलोच.. चल लवकर दाखवतो तुला..

गाथा शौर्यला आपल्यासोबतच घेऊन जातो..

(काय दाखवायला घेऊन जात असेल शौर्य गाथाला.. पहा पुढील भागात.. आणि हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः 

© भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all