अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 73

IN marathi

विराज डोक्याला हात लावुन बाजुबंद कुठे गेले ह्याचा विचार करत बसला होता...

इकडे दागिन्यांचा बॉक्स होताना कुठे गेला??

(विराजची मोठी मम्मी त्याच्याकडे बघतच त्याला विचारते...)

छान बाजुबंद आहेत हे?? मला खुप आवडले.. 

मोठी मम्मी विराजच्या हातात बाजुबंद देतच त्याला बोलली..

विराज : तुला कुठे भेटलं??

मोठी मम्मी : तु अंघोळीला गेलास तेव्हा इथे बॉक्स ठेवलेलाना तो उघडुन बघितला मी.. मला आवडली डिजाईन म्हणुन तुझ्या मोठ्या पप्पांना दाखवायला घेऊन गेली.. मला पण असलाच बाजुबंद करा म्हणुन..

शौर्य विराजचा दरवाजा नॉक करतच त्याला आत येऊ का म्हणुन बाहेरून मोठ्यानेच विचारतो..

विराज : ये...

बाजुबंद विराजच्या हातात बघुन शौर्य विराजकडे बघत त्याला काहीही न बोलता गप्प त्याच्या रूममधुन निघुन जातो..

विराज : शौर्य.. 

पण शौर्य विराजच काहीही ऐकुन न घेता तिथुन निघुन सरळ खाली डायनींग टेबलवर जाऊन बसतो.. विराजपण त्याची समजुत काढायला त्याच्या मागे जात नाही.. पण आता अनिताला काय सांगायच ह्याचा विचार तो करत असतो..

मोठी मम्मी : 9 वाजत आलेत तुला नाश्ता नाही करायचा का?? उशीर होईल कामावर जायला परत..

विराज : मी कामावर जाऊन करेल.. 

मोठी मम्मी : अजिबात नाही.. नाश्ता करूनच जा.. तुझे मोठे पप्पा पण थांबलेत तुझ्यासाठी नाश्ता करायचे..

मोठ्या मम्मीच आणि पप्पांच मन राखायच म्हणुन विराज खाली नाश्ता करायला जातो.. शौर्य पण पेपर वाचतच आपल्या प्लॅट मधला नाश्ता करत असतो.. विराज आपला नाश्ता करायच सोडुन एकटक शौर्यकडे बघतच असतो.. विराज नाश्ता काही करत नाही हे बघुन त्याची मोठी मम्मी विराजची प्लॅट हातात घेत विराजला जबरदस्ती भरवु लागते..

विराज : मी खातो अग हाताने..

मोठी मम्मी : राहू दे रे.. नेहमी हातानेच खातोस.. उशीर होतोय.. खा पटकन...

विराजला वाटत शौर्य आता तरी त्याच्याकडे बघेल पण शौर्य विराजकडे बघतच नाही..

मोठे पप्पा : तिथे नेहमीच आठवण काढत असते तुझी.. माझा विराज कसा त्या परक्या लोकांत रहात असेल ना देव जाणे.. हेच नेहमी बोलत असते ती..

मोठे पप्पा अस बोलताच विराज शौर्यकडे बघतो.. शौर्य अगदी शांतपणे पेपरच पान पलटी करत वाचु लागतो..

मोठी मम्मी : डब्बा नाही नेत का तु कामावर??

विराज : केंटींग आहे कामावर..

मोठी मम्मी : रोज कस ते बाहेरच खातोस...? तुझ्या त्या मम्मीला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही पण ह्या मम्मीला आहे.. मी पाठवुन देते डब्बा.. माझ्या हाताने बनवुन.. खाशील ना??

विराज : नाही नको..

मोठे पप्पा : रोज बाहेरच खाऊन आजारी पडशील..

विराज : नाही पडत.. सवय झालीय..

मोठे पप्पा : आज पासुन सवय मोडायची.. आम्हांला ह्या अस लोकांच्या घरी रहाता येणार नाही.. पण जो पर्यंत आहे तोपर्यंत तुझी मोठी मम्मी देत जाईल डब्बा तुला.. आणि जमलं तर काल बोललो ना त्या गोष्टींचा विचार करून बघ..

विराज : बस झालं मला.. मी निघतो..

मोठी मम्मी : एवढं संपवुन जा बघु...

अस बोलत विराजला जबरदस्ती त्याची मोठी मम्मी नाश्ता भरवते..

शौर्य स्वतःचा प्लेटमधला नाश्ता संपवत पेपर व्यवस्थित घडी करत तिथे डायनींग टेबलवर ठेवतो..

शौर्य : काका मम्मा रात्री आली की तिला सांगा मी आज पण जेवायला नाही रात्री.. 

घरात काम करणाऱ्या काकांना निरोप देतच शौर्य घराबाहेर पडतो..

विराज पण आपला नाश्ता आवरून त्याच्या मागोमाग घराबाहेर पडतो.. खर तर त्याला शौर्यला भेटुन सॉरी बोलायच असत.. पण तो जस घराबाहेर पडतो तस त्याची मोठी मम्मी त्याला सोडायला त्याच्यासोबत बाहेर पडते..

तिला हात दाखवतच तो गाडीत जाऊन बसतो.. आणि सरळ ऑफिसला निघुन येतो..

मोठे पप्पा : हेच मी सुरजला बोललो होतो..आपला मुलगा गुणी आहे.. फक्त प्रेमाने हँडल कर त्याला.. सगळं ऐकेल तो तुझं..

मोठी मम्मी : कस पण करून त्याला आपल्यासोबत घेऊन चला बघु इथुन..

मोठे पप्पा : त्याला इथुन नाही.. आपणच इथे येऊन रहायच.. हे घर अनिताला शौर्यच्या नावावरून विराजच्या नावावर कस करायला लावतो ते बघच तु.. आणि एकदा का हे घर विराजच्या नावावर झालं की मग आपण इथेच येऊन विराजसोबत रहायच.. त्या दोघांच काय करायच ते मी बघतोच मग.. सगळ्यात आधी तर तिच्या मुलाच.. 

मोठी मम्मी : मला माझ्या विराजसाठी डब्बा बनवायचाय..

मोठे पप्पा : तु बनव..मी स्वतः त्याच्या कामावर जाऊन देऊन येतो त्याला..

ह्या दोन दिवसांत विराजसोबत त्याचे मोठे मम्मी पप्पा अगदी प्रेमाने वागवुन त्याच मन पुर्णपणे आपल्या बाजुने वळण्याचा प्रयत्न करत असतात.. आणि मुळात विराजला पण त्यांच प्रत्येक बोलणं अगदी सहज पटत होत.. एक मन हे सगळं चुक आहे हे त्याला सांगत असत पण मोठ्या मम्मी पप्पांकडुन मिळणाऱ्या प्रेमापुढे तो त्याच्या मनाच काहीच ऐकून घेत नव्हता..

असच एक दिवस रात्री... विराज शौर्यच्या रूममध्ये जातो..

शौर्य आपली बेग भरत असतो...

विराज : काय करतोयस??

शौर्य काहीच बोलत नाही..

विराज : शौर्य.. तुझ्याशी बोलतोय..

शौर्य : काय काम आहे??

विराज : थोड बोलायच होतं...

शौर्य : बोल मग..

विराज : ते मी लग्न झाल्यावर मोठ्या मम्मी पप्पांसोबत रहायला जायचा विचार करतोय..

शौर्य : ए विर तु बरा आहेस ना?? आणि इथे मी आणि मम्मा कस रहाणार तुझ्याशिवाय??

विराज : मम्मासोबत तु आहेस ना.. त्या लोकांना माझ्याशिवाय कोणी नाही ना शौर्य.. 

शौर्य :  छान.. म्हणजे ह्या तीन दिवसांत तुला छान हिप्नॉटाईज केलंय त्या लोकांनी.. खुपच काळजी वाटायला लागलीय तुला त्यांची..

विराज : तस नाही रे.. बट तु विचार कर ना त्यांचा..

शौर्य : तुला पण चांगलं माहितीय मम्मा माझ्याशिवाय राहू शकते पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत.. तरी तुला नको त्या लोकांसाठी नको ते करायला सुचत तर कर.. आणि त्यांना तु आता मोठा झाल्यावर दिसतोस.. लहान होतास तेव्हा कधी नाही आली तुझी मोठी मम्मी तुला बघायला.. तुझ्या केसांत तेल वैगेरे घालायला.. तुला अस प्रेमाने भरवायला.. तुझ्या रूममध्ये बसुन तुमच काय चालु असत ते मला सगळं माहितीय विर.. आणि कसं असतना गरज लागली तशी माणस स्वभाव बदलतात विर.. तेच तुझे मोठे मम्मी आणि पप्पा करतायत.. आणि आत्ता तु पण.. तुझी पण गरज संपली ना.. तु पण बदललास.. पण एवढा बदलशील अस नव्हतं वाटलं.. 

विराज : तु अस भडकतोस का?? मी काही बदललो नाही आहे.. आणि मी अजुन गेलो तर नाही ना.. फक्त सांगतोय तुला की मी असा विचार करतोय..

शौर्य : असा नको तो विचार पण का करतोयस तु.. आणि तिथे जाण्यापेक्षा त्यांनाच इथे रहा म्हणुन बोलु शकतोस ना..

विराज : ते नाही बोलतात इथे रहायला.. हे घर तुझ्या नावावर आहे म्हणुन.. नाही तर मी का त्यांच्यासोबत जायच डिसीजन घेऊ.. हे घर जर माझ्या नावावर असत तर ते लोक राहिले असते इथे.. मग मला मम्मा सोबत पण रहायला मिळालं असत आणि त्यांच्यासोबत पण..

शौर्य : विर तुला जे हवं ना ते तु नीट माग माझ्याकडे.. तुझ्यासाठी जीव पण देईल मी.. पण हे अस पोलिटिक्स लॅंग्वेजमध्ये माझ्यासोबत बोलत नको जाऊस यार.. जे आहे ना ते सगळं तुझंच आहे विर.. मम्मा, हे घर.. तुझा बिजीनेस.. मम्माचा बिजीनेस... सगळं म्हणजे सगळंच तुझं आहे.. माझा फक्त तु आहेस. आय मिन होतास. तुला जे हवं ते करत जाईल मी तुझ्यासाठी.. पण हे घर सोडुन जायच परत बोलु नकोस.. आणि मी उद्या जाऊन करतो तुझ्या नावावर हे घर.

विराज : शौर्य तु..
(शौर्य मध्येच विराजला थांबवत बोलतो)

शौर्य : मम्माल नाही काही कळणार ह्यातलं.. तसही मी USA वरून इथे परत येणारच नाही कधी.. आणि मम्माने जे काही माझ्या नावावर केलं ते मी स्वतःहुन तुझ्या नावावर करूनच जाणार होतो.. मी खूप आधीच साठे काकांसोबत बोललोय ह्याबद्दल.. पण आज तुझे हे डोळेना खुप काही बोलतायत.. फक्त माझ्या मम्माला नीट सांभाळ.. तुझ्यासाठी माझी सावत्र आई झाली विर ती हे विसरू नकोस तु..

विराज : शौर्य तु कुठची गोष्ट कुठे नेतोयस यार??

शौर्य : तु प्लिज जा तुझ्या रूममध्ये.. मला त्रास होतोय तुला अस समोर बघुन पण...

विराज :  तु..

तु नाही जाणार मग मीच जातो इथुन.. विराजला मध्येच थांबवत शौर्य त्याच काहीच बोलणं ऐकुन न घेता स्वतःच्या रूममधुन बाहेर पडतो.. आणि आपल्या नेहमीच्या जागेवर येऊन डोळे मिटुन शांत बसतो..

विराज शौर्यच्या बोलण्याचा विचार करत त्याच्याच रूममध्ये बसुन रहातो..

तोच अनिता शौर्यच्या रूममध्ये येते..

अनिता : शौर्य कुठेय??

विराज : तो ते.. बाहेर गेलाय..

अनिता : बर... आणि हो विर सॉरी.. 

विराज : कश्याबद्दल??

अनिता : ते शौर्य बोलला मला की ते बाजुबंद नंतर शौर्यलाच स्वतःच्या रूममध्ये मिळाले.. आणि मी उगाचच तुला ओरडले... त्याबद्दल खरच सॉरी.. खर तर मी ह्या दोन दिवसात तुझ्या रूममध्ये येणार होती पण तुझे मम्मी पप्पा बसलेले असतात तुझ्या रूममध्ये.. मग मला नाही जमलं.. बर एक काम करशील..

विराज : हम्मम

अनिता : हे शौर्यच तिकीट मी बुक केलं.. तो आला की त्याला दे..ओके..

विराज : तु 11th तारखेच तिकीट बुक केलंस त्याच..??

अनिता : लवकर जाऊदे त्याला इथुन... मुळात मला तर अस वाटत त्याने आजच जावं इथुन.. बट तुझं लग्न आहेना तो नाही एकणार माझं.. तस पण उद्यापासून रिसॉर्टवरच राहील तो.. तिथे सेफ असेल.. मग जाईल निघुन तिथुन.. प्लिज त्याला नीट जाऊ दे USA ला..

विराज : तु अस का बोलतेयस मम्मा??

अनिता : तु मला काही बोललास का विर??  नाही म्हणजे ह्या दोन तीन दिवसांत तुझ्या तोंडुन मी हा शब्द ऐकलाच नाही ना म्हणुन ते थोडं.. 

अनिता डोळ्यांतुन येणार पाणी विराज समोर लपवतच स्वतःच्या रूममध्ये जाते..

विराज तिथुन शौर्यला भेटायला त्याच्या नेहमीच्या जागेवर जाणार पण तोच त्याचे मोठे पप्पा त्याला आवाज देत त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात.. 

नेहमी प्रमाणे त्याची मोठी मम्मी त्याला आपल्या समोर बसायला सांगते.. 

विराज पण गप्प तिच्या पुढ्यात जाऊन बसतो..

मोठे पप्पा : बोललास तु त्याच्या सोबत??

विराज : हम्मम..

मोठे पप्पा : नाही बोलला असणार ना??

विराज : मी काही बोलायच्या आतच तो देतो बोलला नावावर करून.. मला नकोय पण हे सगळं.. हे जे काही आहे ते त्याच आहे.. मला फक्त माझा भाऊ आणि मम्मी हवीय..

मोठे पप्पा : हाच वेडेपणा त्यावेळेला तुझा डॅड करत होता..आणि तस पण तो देतो बोललाय फक्त.. अजुन नावावर तर केलं नाहीना.. बोलणं आणि करणं ह्यात फरक असतो.. 

विराज : पप्पा तो काहीही करू शकतो माझ्यासाठी.. आणि मला हे सगळं नकोय.. मी डॅडला पण आधी बोलायचो आणि आता तुम्हांला पण बोलतो..

मोठे पप्पा : म्हणजे तुला आम्ही दोघ नकोय..

विराज : अस कुठे बोललो मी.. मला तुम्ही लोक हवे आहात.. मला हे घर माझ्या नावावर नकोय..

मोठी मम्मी : पण तो स्वतःहुन देतोय ना रूम नावावर करून मग करून घे ना बाळा.. तुला तुझी ती मम्मी पण सोबत मिळेल आणि ही मम्मी पण.. आणि शौर्य पण राहीलच ना तुझ्यासोबत.. त्याला थोडी ना तु कधी तुझ्या घरातुन काढुन टाकणार..

मोठे पप्पा : कसला विचार करतोयस एवढ?? आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत करून घे सगळं आपल्या नावावर. 

विराज : मला झोप येतेय.. मी झोपायला जातो..

मोठे पप्पा : इथे बस बघु तु..

विराजचा हात पकडतच त्याचे मोठे पप्पा त्याला आपल्या बाजुला बसवतात..

मोठे पप्पा : तुला काय वाटत?? आम्ही इथे तुझ्यासोबत राहावं की नको.. नाही तर तस सांग आम्ही जातो निघुन.. आम्हांला कोण आहे सांग तुझ्याशिवाय.. ही मोठी मम्मी किती करते तुझ्यासाठी बघतोयस ना.. तुला ती पण इथे तुझ्यासोबत राहू नये अस वाटत का..

मोठे मम्मी : त्याला काही बोलू नका.. आपणच उद्या सकाळी निघुन जाऊयात इथुन..

विराज : तु अस का बोलतेस..?? तुम्ही दोघ इथेच रहाणार माझ्यासोबत.. आणि मला आता खरच झोप येतेय उद्या एक दिवस कामावर जायचय मग मी सुट्टीवर आहे.. मग बोलुयात ह्या टॉपिकवर..

विराज येऊन आपल्या रूममध्ये झोपतो.. खर तर झोप त्याला येतच नसते.. फक्त आपली कुस बदलत तो झोपण्याचा प्रयत्न करत असतो..

इथे शौर्य अजुनही आपल्या नेहमीच्या जागेवर डोळे मिटुन शांत बसुन असतो..

खिश्यातुन मोबाईल काढत तो नैतिकला फोन लावतो..

नैतिक : झोपला नाहीस का अजुन??

शौर्य : तुम्ही लोकांनी पेकिंग केली का?? उद्या पासुन आपण रिसॉर्टवर जातोय रहायला.. आहे ना लक्षात??

नैतिक : हो.. भेटु सकाळी..

शौर्य : 7 वाजता तुला माझ्यासोबत एका ठिकाणी यायचय.. तैयार रहा.. 

नैतिक : एवढ्या सकाळ सकाळी कुठे नेतोयस?? सगळं ठिक आहे ना..

शौर्य : ते उद्या भेटल्यावर कळेलच तुला.. मी तुला 7 वाजता पीक अप करतो.. तु बेग घेऊनच बाहेर पड ओके.. आणि हो रॉबिन आणि आर्यनला पण सांग.. 

नैतिक : बर सांगतो.. पण सगळं ठिक आहे ना..

शौर्य : हम्मम.. गुड नाईट..

मोबाईल खिश्यात ठेवुन तो तसाच तिथे काही तरी विचार करत बसतो..

दुसऱ्यादिवशी ठरल्याप्रमाणे शौर्य घरी काहीही न सांगता सकाळीच बाहेर पडतो.. आपल्या तिघा मित्रांना पिकअप करत तो वकिलांच्या घरी जातो.. गाडीत तिघेही त्याला विचारत असतात पण तो कोणाला काहीच सांगत नाही.. जवळपास 9 वाजता चौघेही मिळुन शौर्यच्या फेमिली वकिलांच्या घरी पोहचतात..

साठे वकील आधीपासूनच त्याची वाट बघत असतात..

साठे वकिल : तु नीट विचार केलायस ना ह्या सगळ्या गोष्टींचा.. कारण अनिता मॅमला ह्याबद्दल...

शौर्य : मम्माला मी USA ला गेल्यावर सांगेल ह्या बद्दल.. आणि मला नाही वाटत तिला काही प्रॉब्लेम असेल ह्याबद्दल.. 

साठे वकिल : मी पण एकदा त्यांच्याशी बोलून घेतो..

शौर्य : एकच्युअली मी बोललोय मम्माशी.. आणि मुळात प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे.. मी तुम्हांला बोललो ना.. प्लिज जर पेपर रेडी असतील तर माझ्याकडे द्या.. मी एकदा वाचुन मग सही करतो..

रॉबिन आणि त्याचे बाकीचे मित्र मंडळी शौर्यच काय चालु आहे ते बघतच असतात..

साठे वकिल त्याला त्यांनी तैयार केलेले पेपर शौर्यला दाखवतात.. शौर्य सगळे पेपर नीट वाचतो आणि त्यावर आपली सही करून तिथुन निघतो..

चौघेही वकिलांच्या घरुन रिसॉर्टवर जायला निघतात..

रॉबिन : काय चाललंय शौर्य..

शौर्य : तुम्ही तिघ रिसॉर्टवर जाताय.. पण रिसॉर्टवर जाण्या आधी वाटेतच विरच ऑफिस लागेल.. विरच्या ऑफिसमध्ये जाऊन ही फाईल त्याच्या हातात द्या आणि मग पुढे रिसॉर्टवर जावा.. मी घरी जाऊन माझी बेग घेऊन येतो.

नैतिक : तु बेग नाही घेऊन आला..

शौर्य : काल भरूनच नाही झाली रे.. मी घरी जाऊन येतो.. तुमच्या आधी पोहचेल मी रिसॉर्टवर.. तुम्ही जाता जाता ही फाईल फक्त विरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याला द्या..

रॉबिन : तो घरी असतोना.. तु त्याला घरी पण देऊ शकतोस ना..

शौर्य : तस करू शकतो पण मला त्याच्या समोर पण जायची इच्छा नाही.. आणि ते सगळं रिसॉर्टवर गेल्यावर बोलूयात.. ही गाडीची चावी.. मी केब बुक करून जातो घरी.. रिसॉर्टवर भेटु..

तिघेही शौर्यने सांगितल्याप्रमाणे विराजच्या ऑफिसमध्ये जातात..

रिसेप्शनिस्ट त्यांना वेटिंग रूममध्ये बसायला सांगते.. तिघेही वेटिंग रूममध्ये जाऊन बसणार तोच अनघा त्यांना दिसते..

आर्यन : हेय अनघा वहिनी..

अनघा : तुम्ही तिघे इथे?? काय स्पेसिअल??

रॉबिन : ही फाईल शौर्यने विरला द्यायला सांगितलंय..

अनघा : तो कुठेय??

रॉबिन : तो तर घरी आहे.. ऐकण तु देशील का ही फाईल विर ला?? आम्ही निघतो.. आम्ही सगळे रिसॉर्टला चाललोय.. परत उशीर होईल जायला.

अनघा : चहा वैगेरे तरी घेऊन जावा..

नैतिक : रिसॉर्टवर गेल्यावर घेऊच आम्ही.. पण ही फाईल आठवणीने दे.. आम्ही निघतो. बाय..

अनघा : बर बाय..

अनघा हसतच त्यांना बाय करते..

कसली फाईल असेल.. मे बी कंप्लायन्स ची फाईल विराज घरी विसरलेला ही तीच फाईल असेल.. अस बोलत अनघा फाईल ओपन करतच विराजच्या केबिनमध्ये जाऊ लागली..

प्रॉपर्टीचे पेपर बघुन ती तशीच एका जागेवर उभी राहुन सगळे पेपर बघु लागली.. आणि रागातच ती विराजच्या केबिनमध्ये शिरते.. विराज त्याच्या गमोठ्या पप्पांसोबत आपल्या केबिनमध्ये बोलत असतो..

विराज : अनु ये ना बस.. अग आज पप्पा पण यायच बोलत होते कामावर.. मग घेऊन आलो त्यांना पण..

अनघा : थोडं बोलायच होत.. बोलूयात.. आहे का वेळ..

विराज : हम्म बोल ना..

हे काय आहे?? अस बोलत विराजच्या पुढ्यात फाईल ठेवतच ती बोलते..

विराज : प्रॉपर्टी पेपर्स?? कोणी आणुन दिली ही फाईल..

अनघा : शौर्यचे मित्र आलेले फाईल द्यायला.. ते देऊन गेले.. 

विराज : शौर्य कुठेय??

अनघा : तो घरी आहे.. आणि काय आहे काय हे.. शौर्यने घर तुझ्या नावावर का केलं..??

मोठे पप्पा : अरे वाहह.. फायनली घर माझ्या विराजच्या नावावर झालं म्हणायच.. विराज तुझं बोलणं लगेच मनावर घेतल त्याने..

अनघा : what.. विराज तु त्याला हे सगळं करायला सांगितलंस??

विराज : मी नाही काही सांगितलं त्याला.. त्याने स्वतःहुन केलंय..

मोठे पप्पा : घर विराजच्या नावावर केलं हे चांगलंच आहे ना.. तसही ते घर त्याच्या नावावर असल्यामुळे मला आणि ह्याच्या मोठ्या मम्मीला यायला नाही आवडायचं ह्या घरी.. आता हे घर विराजच्या नावावर आहे म्हटलं तर आम्हाला विराजसोबत रहायला मिळेल.. काय विराज बरोबर ना??

विराज : अ हो... (विराज अनघाकडे बघतच बोलला)

मोठे पप्पा : बर मी निघतो आता घरी जायला हवं.. तसही मोठ्या मम्मीला ही आनंदाची बातमी सांगतो.. तिला पण बर वाटेल... आणि शौर्य घरी असेल तर त्याला ही भेटुन घेतो.. थेंक्स बोलायला नको का त्याला??

विराज : मी ड्रायव्हरला सांगतो तुम्हांला सोडायला..

विराज समोर असलेल्या लेंडलाईनवरून ड्रायव्हरला फोन करून त्याच्या मोठ्या पप्पांना घरी नेऊन सोडायला सांगतो..

अनघा एकटक विराजकडे बघतच रहाते..

विराज : तु अस का बघतेयस.. बस ना..

अनघा : तु एवढा स्वार्थी कसा काय होऊ शकतोस ते बघतेय.. 

विराज : अनघा.. मी नाही काही बोललोय.. शौर्यने स्वतःहुन केलंय हे सगळं..

अनघा : विराज ते घर त्याच्या नावावर होत आणि शेवटपर्यंत त्याच्या नावावरच राहील.. कळलं तुला.. 

विराज : मोठे मम्मी पप्पा नाही रहाणार मग सोबत..

अनघा : तो त्यांचा प्रॉब्लेम आहे विराज.. आपला नाही.. 

विराज : मग आपण लग्न झाल्यावर अलिबागला त्यांच्यासोबत रहायला जाऊयात..

अनघा : तुझं सगळंच ठरलंय का??

विराज : अनु त्यांच माझ्याशिवाय कोणी नाही ग.. 

अनघा : हे तुला कधी कळलं.. नाही म्हणजे आत्तापर्यंत कधी बोलला नाहीस मला म्हणुन विचारतेय... 

विराज : ते दोघ खुप चांगले आहेत ग..

अनघा : हे पण कधी कळलं विराज तुला?? 

विराज : कधी कळलं म्हणजे.. मला माहिती आहे.. माझे मम्मी पप्पा आहेत ते.. माझ्यावर खुप प्रेम करतात.. तुला दिसत नव्हतं का दोन दिवस मोठे पप्पा डब्बा घेऊन येतायत मला ते... मोठी मम्मी स्वतःच्या हाताने बनवुन पाठवते माझ्यासाठी.. ते दोघे खुप काही करतायत माझ्यासाठी..

अनघा : म्हणूनच तु त्यांच्यासोबत रहायला जाणार??

विराज : त्यांच माझ्याशिवाय कोणी नाही म्हणुन मी त्यांच्यासोबत रहायला जाणार.. आणि तु समजुन घ्यावं अस मला वाटत..

अनघा : आणि तुझ्या मम्मीच काय??

विराज : तिला शौर्य आहे ना??

अनघा : शौर्य USA ला असणार विराज.. निदान पुढील दोन वर्षे तरी.. किंवा त्याहुन अधिक वर्षही लागतील त्याला जर त्याने पुढे अजुन काही वेगळं शिकायच ठरवलं तर आणि ह्या तीन दिवसांत ती लोक करतायत तुझ्यासाठी ते तुला दिसत.. पण सावत्र आई न बनता तुझी सख्खी आई बनुन आत्तापर्यंत तुला हवं नको ते बघत असणारी तुझी मम्मी तीने काय काय केलं ते नाही दिसत तुला.. आणि शौर्य..तो तर काहीही करू शकतो विराज तुझ्यासाठी.. हे बघ.. तुझ्या पुढ्यातच प्रूफ आहे.. आत्ताच्या जमान्यात आपल्या भावासाठी कोणी नाही करू शकत अस.. तु ते सोडुन नको त्या लोकांच्या नादी लागतोयस?? अस का वागतोयस तु.. मुळात माझा विश्वास नाही बसत ह्या सगळ्यांवर की तु अस काही वागतोयस.. तुला तुझ्या मोठ्या पप्पांनीच सांगितलं असणार शौर्यची रूम आपल्या नावावर करून घ्यायला.. बरोबर ना??

विराज समोरच असलेल्या डेस्कवर हात ठेवुन आपलं तोंड त्यात खुपसून बसतो..

अनघा : काय विचारतेय मी?? 

विराज मानेनेच हो बोलतो..  

अनघा : आणि तु ऐकलस विराज??? जरा काही वाटलं नाही का तुला असं काही वागताना??

विराज : मग काय करू.. मला ती लोक माझ्यासोबत रहावं अस वाटत होतं ग.. मला शौर्यची प्रॉपर्टी वैगेरे नकोय.. माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता.. मोठी मम्मी मला तुला घेऊन कायमच अलिबागला चल बोलते.. मोठे पप्पा तिथे बिजीनेस सेट अप करून देतो बोलले.. इकडे माझी दगदग होते हे त्यांना आवडत नाही.. ते मोठ्या मम्मी पप्पांमध्ये मी थोडा इमोशनल झालो.. म्हणुन मी.. पण मी शौर्यला अस बोललोच नाही की तु हे घर माझ्या नावावर कर.. 

अनघा : पण तुझ्या वागण्याचा अर्थ तर तोच झाला ना.. आणि त्याला न कळण्या इतपत तो मूर्ख नाही आहे विराज.. काय वाटलं असेल त्याला??

विराज खिश्यातुन फोन काढत तो शौर्यला लावतो..

शौर्य विराजच नाव बघुन फोन काही उचलत नाही..

अनघा : शौर्यला फोन लावतोयस??

विराज : उचलत नाही..

अनघा : थांब मी लावून बघते.. 

शौर्य अनघाचा फोन एकाच रिंगमध्ये उचलतो..

अनघा : हे शौर्य कसा आहेस??

(अनघा फोन स्पिकरवर ठेवतच बोलते)

शौर्य : मी एकदम मस्त.. तु??

अनघा : मी पण.. आहेस कुठे??

शौर्य : घरी.. 

अनघा : तु रिसॉर्टवर जाणार होतास ना आज..?

शौर्य : हो म्हणजे पेकिंग करतोय मी.. अर्ध्या एक तासाने निघेल..

अनघा : ऐक ना.. विराजला तुझ्यासोबत बोलायचय..

विराज : शौर्य.. माझा फोन का नाही उचलत तु..??

शौर्य : मी बिजी आहे.. बाय..

विराज : शौर्य प्लिज...

पण शौर्य फोन कट करून टाकतो..

विराज पुन्हा स्वतःच्या फोनवरून शौर्यला फोन लावतो.. पण शौर्य फोन उचलत नाही.. अनघाच्या फोनवरुन पण तो त्याला फोन लावतो.. पण तरी शौर्य फोन उचलत नाही..

विराज : मी घरी जातो.. नि बोलतो त्याच्याशी..

अनघा : मी येऊ का सोबत.. घरी नाही येत बाहेर थांबते..

विराज : नाही नको.. मी करेल मॅनेज.. बाय..

विराज शौर्यला फोन लावतच आपल्या घरी जायला निघतो..

शौर्य एक एक सामान आपल्या बेगेत भरत असतो.. लॅम्प जवळ ठेवलेला त्याचा आणि विराजचा फोटो तो हातात घेत एकटक त्या फोटोत बघत असतो.. फोटोला घट्ट मिठी मारत तो रडु लागतो..

तोच विराजचे मोठे पप्पा शौर्यच्या रूममध्ये येतात..

शौर्य डोळे पुसतच तो फोटो आपल्या बेगेत भरतो....

शौर्य : दुसऱ्याला संस्कार शिकवता शिकवता माणस स्वतः वर केलेलं संस्कार विसरून जातात वाटत.. कोणाच्याही रूममध्ये जाताना दरवाजा नॉक करून यायच हे आता तुमच्या आई वडिलांनी तुम्हांला शिकवलं नाही का..??

मोठे पप्पा : जीभ खुपच चालते तुझी.. अगदी तुझ्या मम्मी सारखी.. 

शौर्य : सारख सारख माझ्या मम्माला काही बोलायच नाही हा.. मी आधीच सांगतोय तुम्हांला.. 

मोठे पप्पा : नाही तर काय करशील..?? तसही तु काही करायला हे घर आत्ता तुझं राहिलेलंच नाही.. 

शौर्य : जस हे घर माझं नाही.. तस तुमच सुद्धा नाही.. सो प्लिज.. बाजुला व्हा.. मला काम आहेत.. 

मोठे पप्पा : थोडं बोलायच होत तुझ्याशी.. बसुन बोलुयात.. 

अस बोलत शौर्यला जबरदस्ती आपल्या पुढ्यात बसवतात..

मोठे पप्पा : एवढ्या सहज तु हे घर विराजच्या नावावर केलंस म्हणजे मला तर विश्वासच नाही बसत.. नक्कीच ह्यामागे काही तरी प्लॅन असेल ना तुझा.. शेवटी नाही बोलायला गेलं तर तु अनिताचा मुलगा आहेस.. 

शौर्य : तुम्हांला दिसणारी सगळीच माणस ही तुमच्या सारखी स्वार्थी नसतात.. आपला फायदा साधून घ्यायला कोणत्याही थराला जाऊ शकता तुम्ही लोक.. विर पण एवढा मोठा बिजीनेस मेन असुन कस काय फसला तुमच्या बोलण्यात तेच कळत नाही मला..

मोठे पप्पा : शेवटी कुलकर्णी घराण्याचा वंश आहे..

शौर्य : खर तर मी पण आता हेच बोलणार होतो.. तुमच्यावरच गेलाय तो अस बोलायला हरकत नाही.. तसही तुमच्या मनासारखं झालं ना मग प्लिज निघा माझ्या रूममधुन.. 

मोठे पप्पा : महत्वाच तर बोलायचंच राहील..

तोच विराजची मोठी मम्मी शौर्यच्या रूममध्ये हातात ट्रे घेऊन येते त्यात दोन ज्युसने भरलेले ग्लास असतात..

विराजचे मोठे पप्पा एक ग्लास ट्रे मधुन उचलतात.. आणि ज्युस पितात..

शौर्य त्यांच्याकडे बघतच रहातो..

मोठे पप्पा : अस बघु नकोस.. घे तुझ्यासाठीच आणलाय ज्युस.. 

शौर्य : मला नकोय.. 

मोठी मम्मी : घे ना बाळा..

शौर्य : एक मिनिट.. हे खोट प्रेम ना विराजला दाखवायचं.. कळलं ना?? आणि माझ्या रूममध्ये येताना रूम नॉक करून यायच.. ओहहह मी तर विसरलोच...एवढे मॅनर्स तर ह्यांच्यात सुद्धा तर तुमच्यात तरी कुठून येतील... 

मोठे पप्पा : आवाज खाली करून बोलायचं.. कोणाशी बोलतोय कळत का तुला.. काहीच शिकवलेलं दिसत नाही तुझ्या आईने तुला..

शौर्य : कोणाशी कोणत्या भाषेत बोलायच हे चांगलच शिकवलंय माझ्या मम्माने मला.. आणि मुळात तुम्ही दोघ माझ्या रूममध्ये काय करताय?? काही तरी प्लॅन करून नक्कीच आले असाल..

मोठे पप्पा : अगदी बरोबर ओळखलस.. कस आहे. घरी आज कोणीच नाही.. आमचा विराज पण कामावर गेलाय नि तुझी आई पण.. त्यात तु अस खुप दिवसांनी एकट्यात भेटलायस म्हटलं तर संधी कशी सोडु मी..

शौर्य : म्हणजे?? कसली संधी??

मोठी मम्मी : कसली नाही.. एवढा ज्युस घे बघु...

शौर्य ज्युसचा ग्लास हातात घेतो आणि जोरात खाली आपटतो...

शौर्य : मराठी कळत नाही का तुम्हाला.. मला नकोय आणि गेट लॉस्ट..

मोठे पप्पा : माझ्या बायकोशी अश्या भाषेत बोलायची हिंमत कशी झाली तुझी..??

रागातच शौर्यच्या गालावर आपला हात उचलतच ते त्याला बोलतात..

शौर्य : तुमची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची.. 

जशी तुझी माझ्या बायकोवर ओरडायची झाली.. अस बोलत शौर्यचा रागात जोरात गळा धरत ते त्याला बेडवर झोपवतात ..

शौर्य : तुम्ही.... काय ...करताय.. सोडा मला..

मोठे पप्पा : जे मी खुप आधी पासुन सुरजला करायला सांगत आलो.. पण त्याला नाही जमलं आता मीच करतो.. जास्तच तोंड चालतय तुझ.. 

शौर्य आपल्या गळ्याभोवती धरलेला त्यांचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.. तोंडातुन त्याच्या शब्दच फुटत नसतात..

विराजचे मोठे पप्पा जेवढं जोरात जमेल तेवढ्या जोरात त्याचा गळा आवळत असतात..

मोठे पप्पा.... विराज जोरातच शौर्यच्या रूममध्ये येत ओरडतो..

विराजचा आवाज ऐकताच विराजचे मोठे पप्पा आणि मम्मी घाबरतात.. मोठे पप्पा लगेच शौर्यचा गळा सोडतात..

शौर्य आपला गळ्याला हात धरत जोर जोरात श्वास घेत बेडवरच बाजूला होऊन बसतो..

विराज धावतच शौर्य जवळ जातो.. त्याला आपल्या मिठीत घेत तो बरा आहे का बघतो..

विराज : तुम्ही काय करताय?? कळतंय का तुम्हाला.. जीव घ्यायला निघाले त्याचा...

मोठे पप्पा : शांतपणे बसुन बोलायला आलेलो पण तैयारच नाही बोलायला.. आणि जीव वैगेरे घेत नव्हतो फक्त घाबरवत होतो त्याला.. तुझ्या मोठ्या मम्मीला उलट सुलट बोलत होता म्हणुन..

विराज : माझ्या भावाला हात लावायची हिंमत कशी झाली तुमची..

मोठी मम्मी : विराज तु ह्या मुलासाठी आपल्या मोठ्या पप्पांवर आवाज करतोय..

विराज : आत्ताच्या आत्ता ह्या घरातुन चालत व्हायच दोघांनी पण.. परत तोंड नाही दाखवायचं मला..

मोठे पप्पा : हेच दिवस बघायचे बाकी होते..

विराज : आय सेड गेट आऊट..

मोठी मम्मी : विराज एकदा माझं ऐकुन तर घे..

विराज : खर तर पोलिसांनाच फोन करायला हवा मी.. माझ्या भावाचा जीव घ्यायला निघाले तुम्ही लोक.?? देवाने तुमच्या पदरी मुलं बाळ का नाही दिलं ना ही गोष्ट आज मला कळली.. आत्ताच्या आत्ता चालत व्हायच ह्या घरातुन उगाच मला ह्या घरात पोलिस नकोयत.. 

मोठे पप्पा : कळेल एक दिवस तुला..

विराज : अजुनही तेच तुमच.. सिक्युरिटीला बोलवुन तुम्हांला धक्के मारून हकलवुन द्यायला मला आवडेल आत्ता तर..

विराज शौर्यच्या रूममध्ये असलेल्या लॅंडलाईन वरून फोन फिरवत सिक्युरिटीला फोन लावणार..

चला इथुन.. तरी मी इथे नको यायला बोलत होती.. विराजची मोठी मम्मी त्याच्या मोठ्या पप्पांना शौर्यच्या रूममधुन बाहेर नेतच बोलली..

तु ठिक आहेस ना शौर्य.. विराज शौर्यकडे बघतच त्याला विचारतो..

शौर्य विराजला रागातच लांब ढकलुन देत त्याच्या पासुन लांब होतो.. आणि कपाटातील सामान आपल्या बेगेत भरू लागतो..

विराज : शौर्य आय एम सॉरी.. प्लिज.. नको ना रागवूस अस.. मला नव्हतं माहिती हे लोक तुझ्यासोबत अस काही वागत असतील यार..

शौर्यचा हात पकडतच विराज बोलतो..

शौर्य : डोन्ट टच मी मिस्टर विराज कुलकर्णी. मला अजिबात हात नाही लावायचा तु.. तु कोण समजतोस स्वतःला ते सांग.. लाज वाटतेय मला तुला माझा भाऊ बोलायची.. कुठे कमी पडलो मी मला तरी कळु दे जरा.. आणि सगळं कसं रे पटत होत तुला त्या माणसाच.. एवढं तुला तो मम्मा बद्दल काहीही बोलत होता तु बर ऐकुन घेत होतास.. खरच माझी मम्मा तशी आहे.. आज एका सोबत उद्या एकसोबत.. ऐकत होतो विर मी तुमच बोलणं.. आणि तु मुळात ऐकुन कस घेत होतास.. सगळं पटत होत तुला.. हे घर तुझ्या नावावर करून घे.. त्यानेच सांगितलं ना तुला.. ते पण पटलं तुला.. मला प्रॉपर्टीत काहीही इंटरेस्ट नाही शौर्य तुला माहिती ना.. नेहमी हे तूच बोलायचास ना मला..?? तुझे मोठे पप्पा आल्यावर तुझ्यात तो पण इंटरेस्ट आला.. वेरी गुड.. एवढा कसा काय बदलु शकतोस तु.. 

विराज : शौर्य..  सॉरी..

शौर्य : तु ना रोहन आहेस दुसरा.. नेहमी त्रास द्यायचा आणि मग सॉरी बोलायला यायच.. बट मी आता तो शौर्य नाही आहे जो प्रत्येक वेळेला तुम्हां लोकांना माफ करत बसु.. तुला घर हवं होता ना दिलं.. तुला मम्माचा बिजीनेस हवाय तो पण तुझ्याच नावावर केलाय बघ.. बट त्यावर मम्माची सही लागेल रे.. मी करून टाकलीय माझी सही. सगळं घेऊन टाक.. जीव हवा असेल माझा तर तोही घेऊन टाक.. तसही थोडं उशिरा आला असतास तर तो ही भेटला असता तुला..

विराज : शौर्य अस काहीही नको ना बोलूस.. आणि मला प्रॉपर्टी वैगेरे नकोयरे.. मला तुम्ही दोघ हवेत..

शौर्य : आम्ही लोक कश्याला हवेत तुला?? तु इथे कसा राहतोस ह्याच टेन्शन असत तुझ्या कुलकर्णी घराण्याला.. 

विराज : शौर्य ते डॅडचे मोठे भाऊ होते रे.. मग कस वागू मी त्यांच्यासोबत मला नव्हतं कळत.. त्यात मोठी मम्मी पण खुप प्रेम करत होती.. 

शौर्य : मम्माने आणि मी तर तुला वाऱ्यावर सोडुन दिलंय विर.. आम्ही तर तुझे हाल हाल करतो. म्हणुन त्यांच प्रेम तुला दिसलं. एवढी वर्ष आम्ही करत होतो ते काय होत मग?? आणि एक मिनिट.. आता परत तु हे पण काढुन दाखवशील.. तुझ्यासाठी मी माझ्या मोठ्या पप्पांना गमवल.. कधी तरी बोलशीलच तु..

विराज : शौर्य प्लिज माफ कर यार..

शौर्य : अजिबात नाही.. आय हॅट यु.. मी हे लग्न फक्त नि फक्त अनघा वहिनीसाठी अटेंड करतोय.. ह्या पुढे माझ्या नजरेसमोर कधीच यायच नाही तु..

तोच शौर्यचा फोन वाजतो.. फोन हातात घेऊन बघतो तर गाथाचा.. एक खोल श्वास घेत डोकं शांत करतच तो फोन उचलतो..

शौर्य : हा गाथा बोल..

गाथा : तु येतोयस ना इथे?? डेकोरेशन वाला आलाय सुद्धा..

शौर्य : तु पण आहेस रिसॉर्टवर??

गाथा : हो.. तुला काल मेसेज केलेला मी.. तु बघितला नाहीस बट.. तु कुठेयस??

शौर्य : मी निघतोच आहे.. तो पर्यंत तु जे ठरवलंस ते घे एक एक करून डेकोरेशनवाल्या कडुन..

गाथा : बर.. ये लवकर.. 

शौर्य : ओके बाय..

शौर्य फोन कट करत गाथाने काल केलेला मेसेज बघु लागतो.. 

विराज : शौर्य ही तुझ्या प्रॉपर्टीची फाईल.. मी जाऊन मम्माकड देतोय..

शौर्य : जे करायच ते कर..

शौर्य आपली बेग भरून काही राहील का बघतो आपल्या रूममध्ये.. 

विराज : शौर्य तु माझा एवढा राग कधी पासून करू लागलायस यार..

शौर्य : त्याशिवाय तुला माझी किंमत नाही कळणार.. उठ सुट भडकायला आणि हात उचलायला येतो ना माझ्यावर.. पर्वा पण बिना कारण माझ्यावर भडकलास.. नाही विसरणार मी.. हे जे वागलास ना ह्या तीन दिवसांत हे तर मरेपर्यंत लक्षात ठेवेल मी.. 

स्वतःची बेग घेतच शौर्य रूम बाहेर पडला.. तोच गेलरीत असलेला ब्रुनो त्याला दिसतो..

गेलेरीची काच उघडत तो त्याला पण आपल्यासोबत रिसॉर्टवर घेऊन जायला निघतो.. 

शौर्य : जयराम... 

शौर्यने जयरामला आवाज देताच जयराम येतो..

सामान गाडीत ठेव आणि ड्रायव्हरला सांग गाडी काढायला.. मला रिसॉर्टवर सोडुन गाडी परत इथे घेऊन यायला..

शौर्य रूम बाहेर निघताना.. परत एक नजर आपल्या रूमवर फिरवतच बाहेर पडतो..

विराज : शौर्य तु परत येणार आहेस इथे.. अस का बघतोयस रूम..

शौर्य विराजच्या प्रश्नाच उत्तर न देताच ब्रूनोला घेऊन गप्प गाडीत जाऊन बसतो.. गाडी चालु होणार तोच विराज पण मागे गाडीत येऊन बसतो..

विराज : मला ऑफिसजवळ सोड आणि गाडी पुढे ने..

(विराज ड्रायव्हरला सूचना देतच बोलला)

शौर्य एक टक खिडकीबाहेर बघत असतो आणि विराज फ्रंट मिररमधून फक्त त्याच्याकडे..

तोच गाथाचा मेसेज येतो शौर्यला..

गाथा : Is Everything ok??

शौर्य : तु अस का विचारतेस??

गाथा : तुझा आवाज मगाशी थोडा वेगळा वाटलं म्हणुन... सगळं ठिक आहे ना??

शौर्य : yaaa...

गाथा : बर.. आम्ही सगळे वाट बघतोय तुझी.. 

शौर्य : जस्ट निघालोय.. 

गाथा : तु लंच नाही ना केलास?? 

(शौर्य मोबाईलमध्ये टाईम बघतो तर दुपारचे दिड वाजले असतात..)

शौर्य : नाही.. बट तुम्ही करून घ्या.. मी एकटा करेल नंतर.. 

गाथा : एकत्रच करूयात सगळे.. आम्ही पण थांबतोय तुझी वाट बघत..

शौर्यला कधी एकदाच तो रिसॉर्टला पोहचतो अस झालं असत..

गाडी विराजच्या ऑफिसजवळ येऊन थांबते..

विराज काहीही न बोलता गप्प गाडीतुन उतरून ऑफिसमध्ये शिरतो.. 

केबिनमध्ये जाऊन आपल्या डेस्कवर डोकं टेकतच आत्ता पर्यंत कंट्रोल केलेल्या आपल्या अश्रूंना तो वाट मोकळी करून देतो.. विराज केबिनमध्ये आलाय हे कळताच अनघा लगेच त्याच्या केबिनमध्ये जाते..

अनघा : विराज काय झालं?? बोललास तु शौर्यसोबत..

विराज अनघाच्या प्रश्नावर काहीच रिएक्ट होत नाही.. तसाच डोकं टेकुन आपल्या डेस्कवर असतो...

अनघा त्याच्याजवळ जातच त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला विचारते..

अनघा : काय झालं विराज?? तु रडतोयस का?? पाणी पी बघु..

अनघा नीट बसवत त्याच्या हातात पाण्याचा ग्लास देतच त्याला बोलते..

विराज पाणी पितच एकटक कसल्या तरी विचारांत हरवुन जातो..

अनघा : काय झालं?? भेटला का शौर्य..??

विराज : वेळेवर गेलो नसतो ना तर कधीच नसता भेटला ग तो.. 

विराज घडलेला सगळा प्रकार अनघाला सांगतो.. 

अनघा : तु पोलिस कम्प्लेन्ट का नाही केलीस?? आणि शौर्य आहे ना बरा??

विराज : रागवलाय खूप माझ्यावर.. परत माझ्याशी बोलेल अस नाही वाटत ग मला.. तु बोललेलीस ना.. तो लांब गेल्यावर त्याची किंमत कळेल मला.. तस झालंय.. हे लग्न तो फक्त तुझ्यासाठी अटेंड करतोय.. मी त्याचा भाऊ आहे ह्या गोष्टीची त्याला लाज वाटतेय आता..

शौर्य काय काय बोलला हे विराज अनघाला सांगु लागला..

अनघा : तु खरच अस वागलायस विराज?.

विराज : मला मोठे मम्मी पप्पा माझ्यासोबत रहावे अस वाटत होतं ग.. म्हणुन.. माझं मन चलबिचल झालेलं ग.. मला नाही माहीत कस?? मला प्रॉपर्टी वैगेरे नकोय.. 

अनघा : पण एवढं?? एकदा माझ्याशी बोलावसं नाही वाटल तुला..??

विराज : सॉरी..

अनघा विराजची समजुत काढत तिथेच त्याच्यासोबत त्याच्या केबिनमध्ये बसुन असते..

★★★★★

इथे समीराच्या गावी तिच्या मामे भावाच्या लग्नाची तैयारी सुरू झाली असते..

समीराला मात्र तिच्या भावाच्या लग्नात तिची आणि शौर्यची चालु असलेली मस्ती आठवत होती.. ती एका ठिकाणी शांत बसुन ते सगळ आठवत एकटीच गालातल्या गालात हसत होती..

काय माहिती का पण आज शौर्यची खुप आठवण येत होती तिला.. मोबाईल घेतच ती वृषभला फोन लावते.. 

समीरा : बिजी आहेस का??

वृषभ : नाही ग.. काय झालं??

समीरा : शौर्यबद्दल काही कळलं का??

वृषभ : बोललो तर तुला तो न्यूयॉर्कलाच आहे.. तु आज अचानक का विचारतेस ??

समीरा : ते लग्नाची तैयारी चालू आहे ना आमच्या घरी.. आपण माझ्या दादाच्या लग्नात केलेली मज्जा मस्ती आठवतेय मला.. शौर्यची पण आठवण येतेय..

वृषभ : मग जाऊन भेट त्याला न्यूयॉर्कला..

समीरा : नको..

वृषभ : मी पण तुला काय सांगतोय समीरा.. ह्या दोन वर्षात तु त्याला भेटायला नाही जाऊ शकली मग आता कशी जाशील..

समीरा : वृषभ कायमच तर तो नाही राहु शकत तिथे.. आज ना उद्या यावच लागेल त्याला इथे.. मग भेटेलच मी त्याला.

वृषभ : बर बर.. लग्नाची झाली का तैयारी??

समीरा : चालू आहे.. तुझं काय चालु आहे..

वृषभ : सध्या तरी आराम.. 

(समीराचा दादा तिला आवाज देत असतो...)

समीरा : ऐकणं.. मी करते तुला फोन.. दादा आवाज देतोय मला..

वृषभ : बर बाय..

समीराला शोधत तिचा दादा तिच्या जवळ येतो..

दादा : काय करतेयस इथे एकटीच बसून..

समीरा : हाताला मेहेंदी लावलीय.. काम तर नाही करू शकत.. म्हणुन बसलीय मी अशीच..

दादा : मी आणि प्रिती 10 तारखेला सकाळीच निघतोय मुंबईला.. 

समीरा : पूजा आहे ना 10 ला..

दादा : हो बट मम्मी बाबा आहेत ना.. तु पण चल आमच्यासोबत मुंबईला.. तस पण तुझे मित्रमंडळी येणार असतील ना??

समीरा : ए दादा प्लिज तु परत चालु नको होऊस.. माझ्या मित्रमंडळींना तेवढीच काम आहेत का?? उठसूट मुंबईला यायला.. काहीही कारण नसताना काहीही बोलत बसतोस तु..

दादा : अस काय करतेस??

पण समीरा आपल्या भावाच काहीही ऐकुन न घेता रागातच तिथुन उठुन सरळ आत जाऊ लागली..

★★★★★

इथे शौर्य फायनली रिसॉर्टवर पोहचला..

मित्र मंडळींची मज्जा मस्ती चालु असते..

रॉबिन : आमच्या आधी येणार होतास ना तु..?? किती वाजले बघ..

शौर्य : अरे बेग नव्हती भरली.. त्यामुळे उशीर झाला.. गाथा कुठेय??

आर्यन : ती त्या डेकोरेशन वाल्यासोबत बोलतेय.. ह्याला पण आणलंस

शौर्य : हम्म.. ह्याच्याशिवाय कोण आहे मला.. मी सामान ठेवुन येतो रूमवर.. आपण सगळे जेवुन घेऊयात.. आणि मग कामाला लागुयात..

शौर्य पटकन बेग एका रूममध्ये ठेवुन येतो.. सगळे मिळुन जेवायला जातात..

गाथा : डॉगी छान आहे तुझा..

आर्यन : ब्रुनो नाव आहे त्याच.. आमच्या कोलेजजवळ भेटलेला..

गाथा : मग तु घरी घेऊन गेलास??

शौर्य : हा म्हणजर बाळ होत ग ते.. आणि पाऊस खुप होता.. त्याच्या जवळ कोणी दिसतच नव्हतं..

नैतिक : त्या नंतर घरी किती लेक्चर भेटले शौर्य तुला..

शौर्य : बट नंतर मम्मा रेडी झाली ना त्याला ठेवायला..

गाथा : बाय दि वे..फोटो कुठेयत प्रिंट करून आणलेले??

शौर्य : आर्यन आणणार होता ना.. आर्यन कुठंत फोटो??

आर्यन : ओहहह शट मी विसरलोच.

रॉबिन : ए आर्यन अस कस विसरलास तु??

आर्यन : अरे लक्षात नाही राहील..

नैतिक : एक काम निट करत नाही तु..

शौर्य : बस झालं.. चुकून होत माणसांकडून.. संध्याकाळी जाऊन घेऊन येतो मी.. ते सोडुन बाकी काही राहिलय का??

गाथा : टीजर तर फोटोग्राफर घेऊन येईल.. बाकी फुलांच्या पाकळ्या वैगरे लागतील.. त्या तर त्याच दिवशी आणूयात..

आर्यन : विरची रूमपण सजवावी लागेल ना.. म्हणजे वहिनीचा आणि त्याचा फोटो वैगेरे..

शौर्य : हा तर मी विचारच नाही केला.. तस ही तीन दिवसांनंतर  ती लोक इथेच रहायला येतीलना.. मग बघुयात ते.. एंगेजमेंटचाच एखादा छानसा फोटो फ्रेम करून घेऊयात त्यांच्या रूममध्ये लावायला..

रॉबिन : मला तर आता झोप यायला लागलीय..

नैतिक : काम करायला आलायस की झोपा काढायला??

रॉबिन : 6 च्या आधी उठलोय मी.. ह्या शौर्यमुळे.. आणि काय चालल होत तुझं त्या वकिलांच्या घरी??

शौर्य : नंतर बोलूयात ना.. प्लिज..

आर्यन : नंतर तरी सांगशील ना??

शौर्य : हम्मम..

गाथा शांतपणे जेवत चौघांच काय चालू असत ते ऐकत असते..

जेवण झालं तसे सगळे परत डेकोरेशन कस करतायत ते बघायला गेले..

शौर्य : एवढ करून पण झालं ह्या लोकांच..??

रॉबिन :10 वाजता आलेत ते लोकं.. तुझ्यासारख 2 वाजता नाही..

शौर्य : आय नो.. तरी एवढं झाल करून... अस बोलायच होत मला..

गाथा : हाता खाली माणस खुप आहेत ना..

शौर्य : स्टेज जरा जास्तच खाली नाही वाटत का??

गाथा : मी मगाशीच बोलली त्यांना.. करतो बोलले..

शौर्य : तीन दिवसांनी विर आणि वहिनी येतील राहायला इथे.. पण त्यांना इथे अजिबात येऊ द्यायच नाही.. 

गाथा : दि ला करेल मी मॅनेज..

रॉबिन : आणि विरला शौर्य तु करशीलच..

शौर्य : तुम्हाला करायच त्याला मॅनेज.. इतर पाहुणे मंडळी पण येणार इथे रहायला.. त्यांना बघु की त्याला बघु..

नैतिक : ठिक आहे आम्ही बघतो त्याच्याकडे.. 

गाथा : फाउंटन च्या इथुन गेट ठेवुयात ना..

शौर्य : तु बोलशील तस... 

गाथा : हे तर होईल.. बट पहिला कार्यक्रम मेहेंदीचा आहे.. आहे ना लक्षात तुझ्या. तो आत मध्ये हॉलवर ठेवुयात ना..

शौर्य : ते मला नाही कळत ग.. तु डेकोरेशन वाल्याला सांग ते करतील तुला पाहिजे तस..

गाथा : एकदा तु पण येऊन बघुन घेतलं असतस तर..

नैतिक : एवढं बोलतेय ती तर जाऊन बघुन ये ना आम्ही आहोत इथे..

शौर्य : चला सगळेच जाऊयात..

रॉबिन : एक मिनिट मी काही मेहेंदी वैगेरे काढणार नाही.. त्यापेक्षा मी इथेच बसतो.. ज्यांना मेहेंदी काढायची त्यांनीच जाऊन आत बघुन या..

नैतिक : मग मी पण इथेच बसतो..

आर्यन : मी पण.. म्हणजे मी पण मेहेंदी वैगेरे काढणार नाही.. मी रॉबिन सोबत इथेच बसतो..

शौर्य : रॉबिन तुला नको तिथे नको ते बोलायला सुचतच कस.. तु थांबच

रॉबिनच्या मागे पळतच शौर्य बोलला..

रॉबिन : अरे शौर्य मला कंटाळा आलाय यार.. म्हणुन बोललो.. 

गाथा : शौर्य आपण बघुन येऊयात ना.. मला निघायचय... घरी पण खुप काम आहेत..

रॉबिन : थेंक्स गाथा..

गाथा : थेंक्स कश्याबद्दल.. मी एकटीच घरी जाणार आहे.. शौर्य आहे इथेच.. शौर्य अजिबात सोडु नकोस ह्याला..

रॉबिन : बस काय गाथा.. तु अस बोलणार आता..

गाथा : मदत नाही करत म्हटलं तर असच बोलावं लागणार ना रॉबिन..

गाथा हसतच रॉबिनला बोलते..

शौर्य : रॉबिन बघतोच तुझ्याकडे नंतर मी.. चल गाथा आपण बघून येऊयात..

रॉबिन : जोडी अगदी शोभुन दिसते.. 

शौर्य : रॉबिन तु इथेच आहेस आज विसरतोयस..

रॉबिन : गाथा वाट बघतेय शौर्य हे तु विसरतोयस..

गाथा गेली ना की बघतोच तुझ्याकडे.. अस बोलत शौर्य गाथासोबत आतमध्ये असलेल्या हॉलला कस डेकोरेशन करता येईल ते बघायला निघुन गेला..

गाथा एक एक आयडिया डेकोरेशन  वाल्याला सांगत होती.. शौर्य फक्त तिला एकटक बघत होता.. मध्येच ती शौर्यकडे बघत... चालले ना अस केलं तर.?? अस बोलत शौर्यकडे बघत होती.. शौर्य अंगठा दाखवतच तिला हो बोलत असतो.. फायनली मेहेंदीच्या प्रोग्रॅमसाठीच डेकोरेशन ठरवतच गाथा आणि शौर्य एकमेकांसोबत बोलतच बाहेर पडतात..

गाथा : चल मग मी निघु???

शौर्य : हम्मम सांभाळून जा.. आणि मी करतो इथे मॅनेज.. तु घरीच थांब.. जास्त धावपळ नको करुस.. आजारी पडशील..

गाथा : बर पण काही गरज लागली तर सांग मी नक्की येईल...तसही मी तीन दिवसांनी येईलच..

शौर्य : हम्मम

शौर्य वाचव मला... रॉबिन मोठ्यानेच ओरडतो...

तस गाथा आणि शौर्य रॉबिनकडे बघतात.. नैतिकने त्याचे पाय पकडले असतात आणि आर्यनने त्याचे हात.. दोघेही त्याला स्विमिंग पूल मध्ये टाकत असतात..

गाथा आणि शौर्य पळतच तिथे जातात..

शौर्य : ए नैतिक सोड त्याला.. काय करताय..??

आर्यन : तो काय बोलतोय बघ आधी आणि मग बोल..

नैतिक : तसही त्याला आम्ही सोडणार तर आहोत.. पण डायरेक्ट ह्या पूलमध्ये..

रॉबिन : ए मॅड लोक मला स्विमिंग वैगेरे येत नाही हा.. पाणी खुप डीप आहे. प्लिज सोडा.. 

शौर्य : नको ती मस्ती नको हा.. आर्यन सोड त्याला..

आर्यन : तो काय बोलला आधी विचार त्याला..

शौर्य : काय बोललास रॉबिन तु??

रॉबिन : मी काही चुकीच नाही बोललो.. जर ज्यो मला बोलली तिला माझ्याशी लग्न नाही करायच.. आणि गेली मला सोडुन मग मी दुसरी गर्लफ्रेंड बघणार ना शौर्य.?? का ज्योसाठी रडतच बसु..?? तूच सांग शौर्य.. परत प्रेम होऊच शकत ना.. ह्या लोकांना पटतच नाही.. उगाच त्रास देतायत..

नैतिक : आता बोल शौर्य तुला पटलं ह्याच बोलणं.. 

आर्यन : शौर्य दुसर प्रेम होऊ शकत काय ??

शौर्य : त्याला सोडा आधी मग सांगतो...

नैतिक आणि आर्यन रॉबिनला सोडतात..

आर्यन : आता बोल..

सगळेच आता शौर्यकडे बघत असतात.. गाथा पण एकटक शौर्यकडे बघत असते.. 

(काय उत्तर असेल शौर्यच?? पाहुया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला हे नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all