नैतिक : बुकी वैगेरे आहेस का काय तु?? ते मॅच मध्ये पैसे लावतातना प्लेयरवर तस काही करतोस का तिथे जाऊन??
रॉबिन : ए शौर्य.. तु USA ला जाऊन असले धंदे करतोस.. ??
शौर्य : काहीही काय बोलताय तुम्ही लोक.. आज आमचा रिझल्ट होता.. ह्या लग्नाच्या गडबडीत विसरून गेलो मी.. आणि तो मी पास झालोय हे सांगत होता तो..
आर्यन : तो तर बोलत होता.. सगळ्या मॅच मध्ये गॉल केलंस.. मेन ऑफ दि मॅच मिळालं तुला..
शौर्य : त्याला बोलायच होत की.. सगळ्या सबजेक्ट मध्ये टॉप केलंय मी.. तो फक्त ते फुटबॉल मॅचच्या लॅंग्वेजमध्ये बोलत होता.. म्हणून ते सगळे काँग्रेस करत होते मला..
वॉव ग्रेट काँग्रेचुलेशन.... गाथा लगेच आपला हात शौर्य समोर धरत बोलली..
थेंक्स.. शौर्य गाथाला हात मिळवतच बोलला..
सगळेच शौर्यला हात मिळवत त्याच अभिनंदन करू लागले..
रॉबिन : मग निघुयात?
शौर्य : कुठे??
नैतिक : आता पार्टी तर झालीच पाहिजे ना.. एवढ USA सारख्या देशात पण तु टॉप केलयस म्हटलं तर..
गाथा : ए हा शौर्य पार्टी तर तुला आम्हांला द्यावीच लागेलं..
शौर्य : उद्या डिनरसाठी जाऊयात आपण सगळे.. आता डान्स करूयात..
रॉबिन : तुला काही आनंद वैगेरे होत नाही का..?? चेहऱ्यावर कुठे दिसतच नाही तुझ्या.. जर आम्ही हा फोन असा स्पिकरला कनेक्ट केला नसता तर कदाचित आम्हांला कळलं पण नसत..
आर्यन : तुझ्या जागी मी असतो तर हे अस डान्स वैगेरे करत बसण्यापेक्षा मित्रांना घेऊन सरळ पार्टी करायला घेऊन गेलो असतो..
नैतिक : माझं पण असच काही झालं असत म्हणजे ते गाणं आहे ना..
"आनंद पोटात माझ्या माईना रे माईना.. "
मी पण सरळ रॉबिनला सोबत घेऊन मस्त पैकी एक दोन पॅक....
शौर्य : बस बस.. उद्या तुम्हां लोकांना पार्टी देऊन मला झालेला आनंद मी व्यक्त करून दाखवेल... पण आता प्रॅक्टिस करूयात.. 8.30 होत आलेत..
रॉबिन : उद्या पक्का डिनरला तरी घेऊन जातोयस ना..
शौर्य : हो रे..
मोबाईलमध्ये गाणी चालु करतच शौर्य बोलतो..
सगळेच पुन्हा डान्स प्रॅक्टिस करू लागतात.. एवढी छान न्युज मिळुन सुद्धा शौर्यच्या चेहऱ्यावर जरा पण आंनद का नाही हा विचार करत गाथा एक टक शौर्यकडे बघत असते..
जवळपास 8.45 होतात तस सगळेच आपापल्या घरी जायला निघतात..
शौर्य : मी येतो तुम्हां लोकांना घरी सोडायला..
सर्वेश : आम्ही गाडी आणलीय आज.. ते तुला पुन्हा आम्हाला घरी सोडायला यायला त्रास होतो म्हणुन माईच बोलली गाडी घेऊन जाऊयात..
(अस बोलत सर्वेश तिथुन निघतो)
नैतिक : गाथाला सोडायला शौर्यला कसला आलाय त्रास.. हो ना शौर्य..
गाथा नैतिककडे प्रश्नार्थी तोंड करत बघु लागते..
नैतिक : म्हणजे एवढ कुठे लांब राहतेस तु.. म्हणुन बोललो ग..
गाथा : तरी पण.. तो दमत असेलच ना.. एक तर सकाळपासुन पत्रिका वाटत असतो मग आपल्या सोबत प्रॅक्टिस.. आणि परत मला सोडायला येतो.. नाही बोलता बोलता गाडीने अर्धा तास लागतो ट्राफिक मुळे..
आर्यन : शौर्य गाथा काय बोलतेय बघ खरच एवढं दमतोस तु..??
शौर्य : आता नऊ वाजलेत तुम्ही लोक अजुन उशीर नका करू.. सांभाळुन जा.. (आर्यनच्या बोलण्याकडे इग्नोर करतच तो गाथाला बोलतो)
बाय गाईज.. गाथा सगळ्यांना बाय करत तिथुन जाऊ लागले..
रॉबिन : बेड लक शौर्य.. गाथाला आज तुला सोडता नाही येत आहे.. रडु वैगेरे नकोस आता..
रॉबिन शौर्यला आणि त्याच्या मित्र मंडळींना ऐकु जाईल अस बोलतो..
(शौर्य रागातच रॉबिनकडे बघु लागतो)
(तसे नैतिक आणि आर्यन मिळुन त्याला हसु लागतात..)
रॉबिन : ए नैतिक ह्याला किती राग येतोय बघ त्या ड्राइव्हरचा...
शौर्य : ज्यो.. जरा बाहेर ये ग..
शौर्य मोठ्यानेच ओरडतो तस गाथा पण मागे वळुन शौर्यला काय झालं ते बघत तिथेच थांबते..
रॉबिन : बस काय शौर्य.. ज्यो ला कश्याला बाहेर बोलवतोय तु..
ज्योसलीन : काय झालं??
(ज्योसलीन बाहेर येतच बोलते)
रॉबिन : तु का आलीस बाहेर..
शौर्य : ज्यो ह्या रॉबिनला बघना जरा.. काय पण बोलतोय मला..
रॉबिन : शौर्य यार... आता परत नाही बोलणार..
शौर्य : नक्की..??
रॉबिन : हो नक्की.
ज्योसलीन : काय चाललंय कळेल का??
आर्यन : SD मला अस वाटत तु ज्यो ला सांगुनच टाकावं
रॉबिन : जाताना आपण एकत्रच जाणार आहोत आर्यन.. विसरतोयस तु..
शौर्य : तु आर्यनला धमकी देतोयस.. ज्यो बघ हा आर्यनला धमकी देतोय.
रॉबिन : मी धमकी वैगेरे देत नाही जस्ट त्याला सांगतोय.. आपण एकत्र जाऊयात.. नाही तर तो एकटा निघुन जाईल.. त्याने बाईक आणलीय ना म्हणुन बोलतोय..
ज्योसलीन : काय केलयस रॉबिन तु..?? आता तर मला कळायलाच हवं
रॉबिन : कुठे काय केलं??
ज्योसलीन : शौर्य काय बोलला हा जरा मला पण कळु दे..
शौर्य : अग हा मला ना... सारख सारख.. सारख सारख..
(शौर्य अस बोलताच रॉबिन घाबरतच गाथाकडे बघतो.. गाथा पण शौर्य काय बोलतोय ते ऐकत असते)
रॉबिन : बोललो ना मी नाही परत बोलणार.. (रॉबिनमध्येच शौर्यला तोडत बोलतो)
ज्योसलीन : रॉब कीप क्वाईट.. शौर्य तु बोल..
शौर्य : हा मला सारख सारख म्हणजे गेल्या आठवड्यापासुन हेच बोलतोय की... तो ह्या पुढे ड्रिंक वैगेरे करणार नाही... हो ना रॉबिन..
एक नंबर शौर्य... नैतिक आणि आर्यन एकमेकांना टाळी देतच हसतात..
ज्योसलीन : खरच रॉब.. मला तर विश्वासच नाही बसत.. मी तर ह्याला सांगुन सांगुन दमली ड्रिंक घेणं बंद कर पण ऐकतच नाही.. आता अचानक एवढा प्रकाश कसा काय पडला ह्याच्या डोक्यात
रॉबिन : ते मला पण आत्ताच कळलना मी अस काही बोललो..
नैतिक : म्हणजे तु खरच ड्रिंक घेणं बंद करणार??
शौर्य : आणि अजुन एक रॉबिनला कंपनी म्हणुन नैतिकने सुद्धा त्याच्या पाऊलांवर पाऊल ठेवत ह्यापुढे ड्रिंक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हो ना नैतिक..
नैतिक : फक्त निर्णयच घेतलाय अजुन अस ठरवलं नाही.. रॉबिनला जमलं ना मग मी नक्कीच बंद करेल.. रॉबिन मित्रा तुझ्यासाठी काय पण..
ज्योसलीन : रॉब तु खरच ड्रिंक वैगेरे करणं बंद करणार.. आय एम सो हॅप्पी फॉर यु..
रॉबिन : अ हो.. म्हणजे तस मी ठरवतोय.. आता बघु..
शौर्य आर्यनच्या खांद्यावर हात ठेवत आपली भुवई उडवतच रॉबिनला चिडवत असतो..
गाथा : एक बोलु का मी..
आर्यन : तु परमिशन का मागतेस.. बोल बिनदास्त..
गाथा : रॉबिन जी गोष्ट आपल्याला करायला आवडते ती गोष्ट माणसाने नक्कीच करावी.. पण आपण ज्या जोडीदारासोबत आयुष्यभराची स्वप्न बघतोना तिला हे सगळं आवडत का ह्या गोष्टीचा विचार करून ती गोष्ट करावी.. आणि ड्रिंक घेऊन, स्मोकिंग वैगेरे घेऊन माणसाला तात्पुरता आनंद मिळतोरे.. पण कालांतराने हाच आनंद ना आपल्या शरीरातील नाजुक अवयवांसाठी खुप मोठ संकट घेऊन येतो.. तेव्हा आपल्याला होऊन गेलेले दिवस आठवतात.. मी का ड्रिंक घ्यायला लागलो..?? मी का ती सिगारेट ओढली.. असे खुप सारे प्रश्न त्यावेळेला निर्माण होत असतात.. त्याची उत्तर आपल्याकडे असतात तरी पण आपण त्याची उत्तर होऊन गेलेला भूतकाळ आठवुन शोधत असतो.. पण त्या होऊन गेलेल्या काळात पुन्हा जाऊन केलेल्या चूका निस्तरायची संधी आपल्याकडे नसतेरे.. कारण अर्ध शरीर निकामी झालेलं असत.. जस आता साथ देत तशी साथ त्यावेळेला देत नाही.. आणि ड्रिंक मुळे हस्ती खेळती कुटुंब उध्वस्त होताना मी स्वतः जवळुन पाहिलीत.. काही वर्षांनी तुझं आणि ज्योच लग्न होईल.. तुम्हां दोघांच छानस हसत खेळत कुटुंब असेल.. पण ते मी पाहिलेल्या कुटुंबासारखं उध्वस्त होऊ नये असच मला वाटत.. बघ जमलं तर ड्रिंक सोडायला.. आणि मला अस वाटत ज्योसाठी तु हे सगळं करूच शकतोस.. हो ना..
रॉबिन ज्योकडे बघत मानेनेच हो बोलतो..
यु आर ग्रेट गाथा... शौर्य टाळ्या वाजवतच गाथाच कौतुक करू लागतो..
सर्वेश : ए माई चल ना ग लवकर..
(सर्वेश गाडीत बसुनच गाथाला आवाज देत बोलला..)
शौर्य : छान जमत तुला समजवायला..
(शौर्य गाथाला तिच्या गाडी पर्यंत सोडायला जाता जाता तिला बोलतो)
गाथा : हम्मम.. बाय दि वे मला आजच कळलं.. जिजु का सारखे तुझे केस कापायसाठी तुझ्या मागे लागायचे ते.. कारण केस कापल्यावर तु खरच जास्त छान दिसतोस.. पण अस अचानक का कापले..??
शौर्य : ते माझं हृदय मला बोलत होत आणि मनाला विचारल तर त्याला पण लगेच पटल.. मग काय गेलो सरळ सलूनमध्ये आणि कापले केस..
गाथा गालातल्या गालात हसतच शौर्यकडे बघते.. शौर्यपण हसतच तिच्याकडे बघतो..
गाथा : मग उद्या प्रॅक्टिस झाल्यावर डिनरला जायच ना??
शौर्य : हम्मम.. मग भेटूया उद्या.. बाय.. सांभाळुन जा.. आणि पोहचल्यावर मला एक टेक्स कर ओके..
(शौर्य काळजीच्या सुरातच बोलला)
गाथा : बर बाय...
शौर्य : हेय सर्वेश बाय..
सर्वेश : बाय...
गाथा शौर्यला बाय करून आपल्या घरी आली...
स्वतःच्या रूममध्ये न जाता ती सरळ अनघाच्या रूममध्ये जाते.. अनघा कोणाशी तरी फोनवर बोलत असते.. गाथा तिला अस फोनवर बोलताना बघुन परत आपल्या रूममध्ये जायला निघते पण अनघा तिला इशाऱ्यानेच थांब बोलत तिथे बसायला सांगते..
काय मॅडम आज तुमची स्वारी इथे कशी??? अनघा फोन ठेवुन गाथाच्या बाजुला बसतच तिला बोलते..
गाथा : तु डान्स प्रॅक्टिस करतेस कि नाही ते बघायला आली..
अनघा : माझी तर चालु आहे.. आम्ही दोघे अस व्हिडीओ बघुनच करतोय..
गाथा : ही आयडिया पण छान आहे ना..
अनघा : हो.. तुमची झाली का प्रॅक्टिस..
गाथा : हो म्हणजे शौर्यच शिकवतोय डान्स आम्हाला.. उद्या एक दिवसच करू प्रॅक्टिस मग झाल..
अनघा : एका आठवड्यात डान्स बसला पण तुमचा..
गाथा : हो.. आम्हाला कोरियोग्राफर छान भेटलेत ग..
अनघा : ओहह शौर्य शिकवतोय ना डान्स तुम्हांला.. पण खरंच छान डान्स करतो.. त्याचे व्हिडीओ आहेत माझ्याकडे..
गाथा : मला पण पाठव ना.. मला आवडेल बघायला त्याच्या डान्सचे व्हिडीओ..
अनघा : बर पाठवते मी.. चल जेवुन घेऊयात.. साडे नऊ वाजुन गेले..
सगळेच जेवायला बसतात..
नेहमीप्रमाणे डायनींग टेबलवर गप्पा गोष्टी करत सगळे जेवत असतात..
सर्वेश : मम्मी उद्या मी आणि माई रात्री जेवूनच येणार आहोत..
मम्मी : कुठुन..
गाथा : अग हो मी विसरलेच तुला सांगायला.. शौर्य पार्टी देतोय आम्हांला.
अनघा : शौर्य??? कश्याबद्दल??
गाथा : त्याचा आज रिझल्ट होता ना.. सगळ्या सबजेक्ट मध्ये त्याने टॉप केलंय.. फस्ट रेंक आलाय त्याचा.. आम्ही तर सगळे आजच पार्टी मागत होतो पण तोच उद्या देतो बोलला..
अनघा : वॉव.. मग तर मी पण येणार पार्टीला..
सर्वेश : ए दि ज्यांच लग्न जमलं असत त्यांना अलाऊड नाही आहे अस पार्टीला यायला.. हो ना ग माई..
गाथा : दि आज तुला टारगेट केलंय बघ ह्याने...
अनघा : ठिक आहे ना मी नाही येत पार्टीला.. विराजकडुन घेईल.. तस पण त्याचा भाऊ फस्ट आलाय.. USA सारख्या कन्ट्रीमध्ये अस टॉप रेंकला येणं एवढ सोप्प नाही.
सर्वेश : पण तो तर गेल्यावर्षी पण टॉप आलेला.. असा त्याचा मित्रच बोलत होता..
अनघा : काय?? विराज मला काही बोललाच नाही ह्याबद्दल..
सर्वेश : शौर्यने सांगितलं नसेल त्याला.. आणि एवढी छान न्युज मिळाली तरी शौर्य काही हॅप्पी दिसतच नव्हता आम्हांला..
गाथा : हो अग.. त्याचे मित्र त्याला विचारत होते तेव्हा तो बोलला.. नाही तर मी फक्त पास झालोय अस आधी बोलला तो.. तो टॉप आलाय हे त्याला त्याच्या मित्रांनी जेव्हा खोदुन खोदुन विचारलं तेव्हा तो बोलला..
सर्वेश : मे बी त्याला त्याचे मित्र लोक पार्टी वैगेरे मागतील हे माहीत होतं म्हणुन तो सांगत नसेल..
गाथा : दि सर्वेशच डोकं नको तिथे ना खुप विचार करत..
सर्वेश : म्हणजे माई आज तु फायनली एक्सेप्ट केलंस की मला डोकं आहे म्हणुन..
इथे शौर्यच्या घरी पण सगळे जेवायलाच बसले असतात..
विराज : मम्मा आता बोल कोणता लुक शौर्यला छान दिसतो ते..
अनिता : तु बोलत होतास त्याप्रमाणे हा वाला जास्त छान दिसतो..
विराज : पण अस अचानक का कापलेस केस..?? कोणी बोललं का काप म्हणुन??
शौर्य : हममम.
विराज : Who??
शौर्य : My heart..
विराज : नाही सांगायच तर राहु दे..
शौर्य : अरे खरच तर..
विराज : परत मुव्ही वैगेरे बघायला चालु केलेस की काय.. असे एक एक डायलॉग मारतोस ते..
शौर्य : सध्या तुझ्यासारखा वेळ नाही रे माझ्याकडे मूव्ही वैगेरे बघायला.. आय एम बिजी मेन.. मोठ्या भावाच लग्न आहे ना माझ्या अस मुव्ही वैगेरे बघुन थोडी ना चालेल.. एकदा का लग्न झालं ना मग वेळच वेळ आहे.. मग बघेल मुव्ही.. आणि मम्मा 20th मे ला मी जातोय USA ला.. तिकीट बुक कर माझं..
विराज : एवढ्या लवकर का जातोयस.. रहा ना थोडे दिवस..
शौर्य : नाही नको..
अनिता : नंतर परत दोन वर्ष इथे यायला नाही मिळणार.. त्यापेक्षा रहा थोडे दिवस नि मग जा..
माझी 20th ला तिकीट बुक कर.. आज प्लिज डिस्कशन नको ह्या टॉपिकवर.. मी 20th ला जातोय..मला आज खुप झोप येतेय.. अस बोलत शौर्य जेवण आटोपुन सरळ आपल्या रूममध्ये जाऊन झोपतो..
विराज पण आपल्या रूममध्ये येत लॅपटॉप उघडुन त्यात थोडे फार राहिलेलं काम करत असतो..
साडे दहाच्या सुमारास अनघा त्याला फोन करते..
विराज : बोला मॅडम..
अनघा : पार्टी कधी देतोयस ते बोल..
विराज : पार्टी?? कश्याबद्दल??
अनघा : हे बर आहे तुझं.. शौर्य समोर एकटिंग करत होतास तेव्हा मला अस वाटत होतं की माझा नवरा एखादा छान ऍक्टर होऊ शकला असता.. म्हणजे दिसायला हॅण्डसम आहेसच तु आणि त्यासोबत छान एकटिंग पण जमते तुला करायला.. पण आज तर खात्री झालीय तु खरच बिजीनेस वैगेरे सोडुन एकटिंग हे क्षेत्र निवडायला हवं होतंस..
विराज : तस तु कॉलेजमध्ये असताना सांगितलं असतस तर तुझ्यासाठी नक्कीच केलं असत ग मी तस.. पण ते सगळं जाऊ दे तु पार्टी कश्याबद्दल मागतेस??
अनघा : ज्याच्याबद्दल तुला पार्टी द्यायची त्याबद्दल..
विराज : अग पण कश्याबद्दल ते तरी मला सांग..??
अनघा : शौर्यने तुला काही सांगितलं नाही का??
विराज : शौर्यने..(विराज विचार करू लागला) हा म्हणजे बोलला तो.. पण तु त्याबद्दल पार्टी मागतेस..
अनघा : हो.. तुला आनंद नाही झाला का??
विराज : तु बरी आहेस ना.. माझा भाऊ माझ्या पासुन लांब USA ला जायच बोलला त्याचा मला आनंद होणार का.. आणि अनु तो USA ला जातोय त्याबद्दल तुला पार्टी हवीय??
अनघा : काय?? कधी जातोय USA ला..
विराज : 20th मे ला..
अनघा : हे तर मला तुझ्याकडुन कळल तो USA ला जातोस.. मी त्याबद्दल पार्टी मागतच नाही आहे.. ते सोडुन तुला खरच काही बोलला नाही का तो??
विराज : कश्याबद्दल?
अनघा : त्याचा रिझल्ट होता आज त्याच्याबद्दल..
विराज : नाही ग.. काहीच नाही बोलला..
अनघा : असा काय हा?? मे बी विसरला असेल.. बर मीच सांगते.. माझ्या हुशार अश्या छोट्या दिराने USA सारख्या कंट्रीत टॉप रेंक केलंय.. पूर्ण कॉलेजमधुन तो पहिला आलाय..
विराज : काय बोलतेस तु??
अनघा : खर तेच बोलतेय.. इट्स नॉट जॉक.. म्हणजे USA सारख्या शहरात टॉप येणं.. खरच ही इज जिनियस..
विराज : पण तो जेवताना काही बोललाच नाही ग..थांब मी आत्ताच जाऊन त्याला बघतो.. एवढी चांगली न्यूज त्याने मला सांगितली कशी नाही ते..
अनघा : जागा आहे का तो?? कारण तो झोपला वैगेरे असेल म्हणुन मी फोन नाही केला त्याला..
विराज : झोपला असेल तर मी त्याला उठवुन विश करेल.. भाऊ यार माझा..
अनघा : फोन चालुच ठेव ना मग मला पण विश करायचय त्याला..
बर बर.. विराज स्वतःच्या रूमबाहेर पडतच अनघाला बोलतो..
शौर्य अगदी गाढ झोपला असतो... विराज त्याला जबरदस्ती उठवतो.
शौर्य डोळे चोळतच उठतो..
शौर्य : काय झालं??
विराज : छुपेरुस्तम.. तु 1st आलास कॉलेजमधुन आणि मला सांगितल का नाहीस..??
शौर्य : ए विर तु हे बोलायसाठी माझी झोप मोड केलीस का?? मॅड..
विराज : मग काय करू.. माझा भाऊ असा फस्ट आलाय मला आनंद झालाय यार..
शौर्य : आता कळलं ना मग झोपु दे आता..
तु झोपतोयस कसला उठ बघु..(शौर्यने तोंडावर घेतलेली उशी खेचतच विराज त्याला बोलतो)
शौर्य : विर नको ना त्रास देऊस.. झोपु दे ना यार..
विराज : अनघा फोनवर आहे तिला तुला काँग्रेचुलेशन करायचय.
शौर्यच्या कानाला फोन लावतच विराज बोलतो.
तस शौर्य उठुन बसत अनघासोबत बोलतो.
अनघा त्याला काँग्रेचुलेशन वैगेरे करते.. त्याची नेहमीप्रमाणे विचारपुस करते.. तिच्याशी बोलुन होताच शौर्य फोन विराजकडे देत पुन्हा झोपतो..
अनु मी तुला नंतर फोन करतो.. बाय अस बोलत विराज फोन कट करतच परत शौर्यला उठवतो..
विराज : ए शौर्य मग झोप ना यार.. मम्माला सांगुन येऊयात ती पण खुश होईल खुप..
शौर्य : विर माझी झोप मोड नको ना करुस.
विराज : मग तु मगाशी का नाही सांगितलंस आम्हाला.. ते काही नाही तु चल बघु माझ्यासोबत आणि मम्माला तु स्वतःहुन सांगणार आहेस हे..
विराज जबरदस्ती शौर्यला अनिताच्या रूममध्ये घेऊन जातो..
अनिता पण लॅपटॉपमध्ये काही तरी करत असते.. विराज शौर्यला अस हाताला पकडुन घेऊन येतोय बघुन अनिता लॅपटॉप बाजुलाच ठेवत दोघांकडे बघु लागते.. तस शौर्य जाऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवुन परत झोपतो..
अनिता : काय झालं??
विराज : काय पराक्रम करून आलाय विचार त्यालाच
अनिता : शौर्य आत्ता काय करून आलायस तु??
विराज : शौर्य सांग ना..
शौर्य डोळे मिटुन झोपुनच असतो...
अनिता : काय केलं ह्याने??
विराज : अग मम्मा फस्ट आलाय तो.. आज रिझल्ट होता त्याचा..
अनिता : खरच..
शौर्यच्या केसांवर हात फिरवत अनघा त्याच्याकडे बघते..
विराज जाऊन पण शौर्यच्या बाजूला बसतो..
विराज : मम्मा आईस्क्रिम मागवुयात?? शौर्य खाणार तु आईस्क्रीम??
अनिता : खाणार म्हणुन का विचारतोयस.. मागव..
विराज घरातीलच एका नोकरदार मंडळीला सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन यायला सांगतो..
शौर्य अजुनही डोळे मिटुन झोपुन असतो..
विराज : शौर्य उठ ना यार.. एवढं आम्ही तुझ्यासाठी सेलिब्रेट करतोय पण तु अस झोपुन राहतोस..
शौर्य : एक तर माझी झोप मोड करतोस आणि कसल सेलिब्रशन करतोस तु.. आता आईस्क्रीम खाऊन जाशील स्वतः झोपायला.. मी रहातो जागा रात्रभर..
विराजला उशी फेकुन मारतच शौर्य बोलतो..
विराज : मग जेवताना का सांगितल नाहीस..
शौर्य : ते मी विसरलो..
अनिता : एवढी मोठी आनंदाची बातमी तु कशी काय विसरू शकतो शौर्य..
विराज : बघ तर.. मस्त हॉटेलमध्ये वैगेरे जेवायला गेलो असतो आपण..
शौर्य : उद्या जाऊयात ना..
विराज : उद्या मोठे पप्पा आणि मम्मी येतायत.. माहिती ना..
अनिता : सकाळी आणायला जावं लागेल ना??
विराज : हो मी जाईल
अनिता : बर..
तोच घरातील नोकर दरवाजा नॉक करत आत येतो आईस्क्रीम विराजच्या हातात देऊन निघुन जातो..
तिघेही आईस्क्रीम खात सेलिब्रेशन करतात..
आईस्क्रीम खाऊन होताच शौर्य आणि विराज आपआपल्या रूममध्ये झोपायला जातात..
दुसऱ्यादिवशी विराज त्याच्या मोठया मम्मी पप्पांना घेऊन येतो.
दोघेही घरी आल्या आल्या अनिता दोघांच अगदी हसतच स्वागत करते..
विराज आपल्या घरातील नोकराला दोघांच सामान एका रूममध्ये ठेवुन यायला सांगतो ल.. आणि दोघांनाही फ्रेश होऊन खाली ब्रेकफास्ट साठी यायला सांगतो..
अनिता आणि विराज दोघेही त्यांची वाट बघत डायनींग टेबलवर बसुन असतात..
विराज : शौर्य उठला नाही काय अजुन??
अनिता : ब्रूनोला घेऊन गेलाय बाहेर..
थोड्याच वेळांत विराजचे मोठे पप्पा आणि मम्मी खाली डायनिंग टेबलवर येऊन बसतात..
मोठे पप्पा : तुला कामावर जायच असेल ना??
विराज : हो थोडया वेळाने निघतो..
मोठे पप्पा : आणि अनिता तु??
अनिता : मी आज थोडं उशिराने जाईल..
मोठी मम्मी : तुझा मुलगा कुठेय??
अनिता : बाहेर गेलाय येईल..
मोठे पप्पा : इथेच आहे म्हणायचा..
(मोठे पप्पा असे बोलताच अनिता आणि विराज त्यांच्या बघू लागतात..)
मोठे पप्पा : विराज बोलला होता तो बाहेर गावी असतो शिकायला म्हणुन बोललो..
विराज : माझ्या लग्नासाठी आलाय तो.
तेवढ्यात शौर्य ब्रूनोला घेऊन घरी येतो..
अनिता त्याला आवाज देतच आपल्याकडे बोलवते..
अनिता इशाऱ्यानेच त्याला त्यांच्या पाया पडायला सांगत असते... शौर्य एक टक तिच्याकडे फक्त बघत असतो..
विराज : शौर्य बस ना ब्रेकफास्ट करायला..
शौर्य विराजच्या बाजुलाच असलेल्या चेअरवर बसतो..
विराजचे मोठे पप्पा एकटक शौर्यकडे बघतच असतात..
सगळे शांतपणे नाश्ता करत असतात..
विराज : मी निघतो.. मिटिंग आहे आज कामावर मला जावं लागेल नाही तर सुट्टी घेतली असती..
मोठे पप्पा : बर..
शौर्य : विर.. तु काही तरी विसरतोयस..
विराज : काय??
शौर्य : मला पैसे देणार होतास ना..??
(शौर्य अनिताकडे बघत इशारा करतच विराजला बोलला)
विराज : अरे हो.. हे क्रेडिट कार्ड ठेव... पिन मी पाठवतो तुला व्हाट्सएपवर..
(खिस्यातून क्रेडिट कार्ड काढून देतच तो शौर्यला बोलतो)
शौर्य : ओके..
विराज : मी निघतो.. मम्मा बाय.. पप्पा काही लागलं तर फोन करा.. मोठी मम्मी बाय.. संध्याकाळी येतो लवकर..
मोठी मम्मी : सांभाळुन जा..
विराज : हो..
विराज कामावर निघुन जातो..
मोठे पप्पा : शौर्य तु आमच्या विर सारखा कधी रे मोठा होणार?? म्हणजे मोठं व्हायचा विचार केला असशील की नाही?? का असच नेहमी आपल्या सावत्र भावाकडे पैसे मागुन त्याच्या पैस्यांवर मज्जा मस्ती करणार.. नाही म्हणजे काळजी वाटते म्हणुन विचारतोय..
शौर्य : मोठं तर मी नक्की होणार.. आणि माझी काळजी करायला माझी मम्मा आहे.. सो प्लिज.. तुम्ही फक्त नाश्ता करा पोटभर..
अनिता : शौर्य..
(अनिता रागातच शौर्यकडे बघत बोलते)
मोठे पप्पा : छान संस्कार केलेस स्वतःच्या मुलावर.. मोठ्यांशी कस बोलायचं ते ही कळत नाही अजुन..
अनिता : शौर्य सॉरी बोल त्यांना..
मला तेवढीच काम नाहीत ग मम्मा.. ते सोडुन दुसर काही काम असेल तुझं तर सांग ऐकतो मी...अस बोलत शौर्य तिथुन उठुन सरळ आपल्या रूममध्ये निघुन येतो.. पटकन फ्रेश होत विराजने सांगितल्या प्रमाणे सोनाराच्या दुकानात जायला निघतो.. बाजुबंद घेऊन तो परत घरी येतो.. गाडी बाहेर पार्क करत विराजसोबत फोनवर बोलतच तो आपल्या रूममध्ये जायला निघतो..
विराजचे मोठे पप्पा त्याच वागणं आणि फोनवरच त्याच बोलणं सगळं ऐकत असतात..
शौर्य : हो रे विर नीट घेऊन आलोय... आता माझ्या रूममध्येच ठेवतो.. बट छान चॉईज आहे मम्माला आवडेल.. आणि विर मी रात्री जेवायला नाही आहे ओके.... हो.. बाय..
अस बोलत शौर्य फोन ठेवतच आपल्या रुममध्ये जातो.. सोबत आणलेल्या दागिन्यांचा बॉक्स तो आपल्या कपाटात ठेवतो आणि पुन्हा घराबाहेर पडतो.. रॉबिनला सोबत घेऊन तो एक दोन ठिकाणी कार्ड वाटप करायला घेऊन जातो.. तिथुन डान्स प्रॅक्टिस.. जवळपास 9 च्या दरम्यान सगळेच डीनरसाठी हॉटेलमध्ये जातात.. मज्जा मस्ती करतच डिनर आटोपतात.. डिनर आटोपेपर्यंत 10 वाजुन जातात..
गाथा आणि सर्वेश हॉटेलमधुनच आपल्या घरी जायला निघतात..
शौर्य त्याच्या मित्रमंडळींसोबत गप्पा गोष्टी करत आपल्या घरी यायला निघतो..
घरी येईपर्यंत 11 तरी वाजतात त्याला..
पोहचलीस का?? मोबाईलवर गाथाला असा मेसेज टाइप करतच शौर्य घरी येत असतो..
घरी येताच विराजचे मोठे पप्पा हातातील घड्याळात बघतात..
हा नेहमी असाच घरी येतो?? 11 वाजलेत...
अनिताकडे बघतच ते तिला विचारतात..
विराज : पप्पा तो कार्ड वाटायला गेलेला.. माझ्या लग्नाच सगळं तोच बघतोय..
अनिता : शौर्य तु जेवायला नाही येणार हे मला कळवलंस का नाही.
शौर्य : विरला बोललो होतो मी.. मला वाटलं त्याने सांगितल असेल..
विराज : हो मला बोलला होता तो..
अनिता : विराजच क्रेडिट कार्ड देऊन टाक त्याला..
शौर्य : ते रूमवर आहे..
अनिता : तुला मी त्यादिवशी बोलली ना... जो काही खर्च लागेल तो माझ्याकडुन घेत जा.. मग का तु त्याच्याकडे पैसे मागत असतोस..
विराज : अग मम्मा.. माझंच काम होत त्याच्याकडे.. त्यासाठी पैसे मागत होता तो.. आणि मागितले पैसे तर काय होत.. भाऊ आहे माझा..
अनिता : ते तुला कळत ना. इतरांना नाही कळत.. इतरांना फक्त तो तुझा सावत्र भाऊ आहे हेच कळत.. आणि शौर्य हे लास्ट सांगतेय मी तुला... ह्यापुढे विर कडुन कोणत्याच गोष्टीसाठी पैसे घेणार नाहीस कळलं.. आणि विर तु ही ह्याला पैसे देणार नाहीस.. तस तो तुझ्याकडे मागत असेल अस मला नाही वाटत.. कारण माझं क्रेडीटकार्ड दिलय मी त्याला..फक्त तुझ्या मोठ्या पप्पांच्या पुढ्यात मी ह्या गोष्टी क्लीअर करतेय..
विराज : मम्मा काय झालं कळेल का मला??
अनिता विराजसोबत काहीही न बोलता आपल्या रूममध्ये निघुन येते.. शौर्यपण तिच्या मागे तिच्या रूममध्ये जातो..
शौर्य : मम्मा.. नको ना एवढी हायपर होऊस तु..
अनिता : खर तर मी सुट्टीच काढलेली उद्यापासुन विराजच्या लग्नासाठी.. पण मला अस वाटत की मला नाही जमणार अस रहायला घरी..
शौर्य : तु खुप इस्यु करतेस.. मला माहिती होत.. तो माणुस आला की असच काही ना काही करणार ते..
अनिता : विराजच्या पुढ्यात अस काही बोलु नकोस म्हणजे झालं..
काय बोलु नकोस माझ्या पुढ्यात?? विराज दरवाजा उघडतच अनिताला विचारतो..
शौर्य : हेच की तुझे मोठे पप्पा आले की असे इस्यु क्रिएट व्हायला चालु होतात घरी..
विराज : शौर्य काय बोलतोयस कळत तुला.. ते का क्रिएट करतील इस्यु.. उगाच काहीही नको बोलुस..
अनिता : शौर्य ह्याच क्रेडिट कार्ड आजच्या आज देऊन टाक आणि झोपायला जा तुझ्या रूममध्ये.. दमलायस बघ किती तु..
शौर्य : हम्मम गुड नाईट.. विर थोड्या वेळाने आणुन देतो तुला तुझ्या रूममध्ये..
विराज : मम्मा काय झालंय??
अनिता : विर तु पण जाऊन झोप.. मला पण झोप येतेय.. गुड नाईट..
विराज काहीही न बोलता सरळ आपल्या रूममध्ये निघुन येतो.. त्याचे मोठे मम्मी पप्पा त्याच्याच रूममध्ये त्याची वाट बघत असतात..
विराज : तुम्ही दोघ झोपले नाही अजुन??
मोठी मम्मी : इथे बस बघु.. तुझ्या केसांत तेल घालुन मस्त मालिश करून देत म्हणजे शांत झोप लागेल तुला..
विराज : कश्याला त्रास करून घेतेस.. तसही मला शांत झोप लागते..
मोठी मम्मी : आपल्या मुलासाठी काही करायला आईला कधी त्रास होतो का?? उलट मला पण तेवढंच बर वाटेल.. बस बघु तु इथे येऊन..
विराज त्याच्या मोठ्या मम्मीच्या पुढ्यात जाऊन बसतो..
किती बारीक झालायस?? तब्येतीकडे जरा पण लक्ष देत नाहीस.. विराजच्या डोक्यात तेल घालतच त्याची मोठी मम्मी त्याला बोलते..
मोठे पप्पा : किती दिवस तु अस लोकांच्या दारावर रहाणार आहेस?? शेवटी कितीही झालं तरी परकी आहेत ती लोक.. जस तुझा डॅड तुझ्यावर प्रेम करायचा आणि आता आम्ही प्रेम करतो तस प्रेम नाही देणार तुला ही लोक आणि मला अस वाटत तु लग्न करून सरळ आमच्याकडे रहायला यावं..
विराज : त्यापेक्षा तुम्ही दोघ रहाना इथे.
मोठे पप्पा : हे घर जर तुझ्या नावावर असत तर राहिलो असतो इथे.. घर पण स्वतःच्या मुलाच्या नावावर करून तु सावत्र मुलगा आहेस हे दाखवुन दिलं ना तिने.. अजुन पण तुला नाही कळत का.. सुरज पण हेच सांगायचा आम्हांला नेहमी.. पण तुला मात्र पटत नाही..
विराज : पप्पा नको ना तो विषय.. मला नाही आवडत ह्या गोष्टींवर बोलायला..
मोठे मम्मी : बर नाही बोलत.. पण तु आमच्यासोबत चल.. आपण सगळे एकत्र राहु.. आमच्या सुनेचे लाड तरी करू द्यायला दे आम्हांला..
विराज : हम्म बघु...
मोठे पप्पा : बघु वैगेरे काही नाही.. तुझा सगळा बिजीनेस मी सेटअप करून देतो तिथे. आणि मुळात तुला एवढं त्रास करून घ्यायची गरजच नाही.. सगळं करून ठेवलय मी तुझ्यासाठी.. इथे मी बघतोयना सकाळी कामावर गेलास ते रात्री 8 वाजता थकुन घरी आलास तु... कश्यासाठी एवढा त्रास करून घ्यायचा. एवढा तुझा मोठा पप्पा जिवंत असताना.. अनिताला तिच्या मुलाचीच पडली आहे. तिला तुझं काहीही एक पडलेलं नाही.. कळतंय तुला.. तु कामावर निघुन गेल्यावर तुझ्याबद्दल बोलत असतात ती लोक.. मी स्वतः आज माझ्या काकांनी ऐकलं..
(विराजची मोठी मम्मी इशाऱ्यानेच विराजच्या मोठ्या पप्पांना शांत रहायला सांगते..)
विराज मात्र त्याच्या मोठ्या पप्पांच्या बोलण्याचा विचार करू लागतो..
चल ना बाळा आमच्यासोबत... विराजची मोठी मम्मी त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतच त्याला बोलते..
विर तुझं क्रेडिटकार्ड... शौर्य विराजचा दरवाजा उघडतच त्याला बोलतो..
सगळ्यांना अस एकत्र बघुन शौर्य विराजच्या दरवाजाजवळ असलेल्या टेबलवर क्रेडिट कार्ड आणि दागिन्यांचा बॉक्स ठेवुन गप्प जायला निघतो..
कोणाच्याही रूममध्ये येताना नॉक करून यायच असत हे अनिताने शिकवलेलं दिसत नाही वाटत तुला.. फक्त समोरच्याचा पान उतारा करायला छान शिकवलंय.. विराजचे मोठे पप्पा शौर्यवर भडकतच बोलले..
शौर्य विराजकडे बघतो.. त्याला अस वाटत की तो काही बोलेल पण विराज काहीच बोलत नाही.. गप्प एक टक कसल्या तरी विचारांत तो हरवलेला असतो.. शौर्य काहीही न बोलताच आपल्या रूममध्ये निघुन येतो..
मोठी मम्मी : तु दमलायस बघ किती झोप बघु इथे..
विराज : मी झोपतो.. तुम्ही दोघांनी पण जाऊन आराम करावा अस मला वाटत..
पण विराजची मोठी मम्मी तो पूर्ण झोपेपर्यंत त्याच्या उश्याजवळच त्याला एखाद्या लहानमुलासारखं थोपटत बसते.. तो जसा झोपतो तस ते दोघ आपापल्या रूममध्ये झोपायला निघुन जातात..
दुसऱ्यादिवशी सकाळी विराज उठायच्या आधी त्याची मोठी त्याच्या रूममध्ये जाऊन त्याला अगदी प्रेमाने उठवत असते..
कामावर जायचय की नाही.. 8 वाजुन गेले..
विराज : काय?? एवढा वेळ कसा झोपलो मी आज..
विराज घाई घाईतच बेड वरून उठला..
मोठी मम्मी : काल रात्री मालिशच तशी केली मी..
(विराजच्या बेड वरील चादर नीट करतच ती त्याला बोलते..)
विराज : तु ते राहू दे.. जयराम करेल ते सगळं नीट..
मोठी मम्मी : मी केलेलं नाही आवडत का तुला??
विराज : तस नाही ग... घरात नोकर मंडळी असताना तु का करणार हे सगळं.. बर मी फ्रेश होऊन येतो..
मोठी मम्मी : पटकन फ्रेश होऊन खाली ये..
विराज : हम्मम..
विराज पटकन फ्रेश होत आपला लॅपटॉप बेगेत भरत खाली जायच्याच तैयारीत असतो.. तोच त्याच लक्ष काल शौर्यने टेबलवर ठेवलेल्या क्रेडिट कार्डवर आणि दागिन्याच्या बॉक्सवर जात..
तो क्रेडिट कार्ड खिश्यात टाकतो.. एकदा बघुयात बाजूबंद आपण बनवायला सांगितलं तसच बनवलय का.. अस विचार कर तो दागिन्यांचा बॉक्स उघडतो पण त्यात बाजूबंद नसत.. तो तसाच बॉक्स हातात घेऊन शौर्यच्या रूममध्ये असतो..
शौर्य नुकताच ब्रूनोला अंघोळ घालुन त्याला बेडवर ठेवुन त्याच्याशी एकटाच गप्पा मारत त्याला टॉवेलने पुसत बसला असतो..
विराज : शौर्य तुला बाजूबंद घेऊन यायला सांगितलेलं मी..
शौर्य : हा मग.. काल बॉक्स तुझ्या रूममध्ये तर ठेवुन आलेलो..
विराज : मग बाजुबंद कुठे आहेत त्यातले??
रिकामी बॉक्स शौर्यला दाखवतच विराज बोलला..
शौर्य : त्यातच होत विर..
विराज : मग आत्ता कुठेय??
शौर्य : तु कुठे ठेवलस का??
विराज : तु रूममधून गेल्यानंतर मी आज सकाळी तो बॉक्स उघडुन बघितलाय शौर्य.. तु नक्की त्यात बाजुबंद ठेवुन दिलेलेस..
शौर्य : तु अस काय बोलतोयस विर.. एकदा रूममध्ये बघ ना तुझ्या..
विराज : माझ्या रूममध्ये कस असेल शौर्य.. मी बॉक्स उघडलाच नाही तो.. तुला मी काल दोनदा तीनदा बोललो नीट घेऊन जा घरी.. परत घरी आल्यावर फोन पण केलेला ना नीट आणलंस का म्हणुन विचारायला.. अडीच लाखाची वस्तू आहे यार ती.. एवढं निष्काळजीपणाने तु कस काय वागू शकतोस..
शौर्य : विर मी व्यवस्थित आणलेलं.. काल तुझ्या रूममध्ये जे होते त्यांना विचारून बघ ना मे बी त्यांनी कुठे तरी ठेवलं असेल..
विराज : what you mean.. माझे मोठे मम्मी पप्पा चोर आहेत अस बोलायचंय का तुला..?? एक तर चूक स्वतः करायची आणि त्यांच्यावर अस नाव टाकतोस शौर्य.. काही वाटत का नाही तुला. काल पण तोंडाला येईल ते बोलत होतास त्यांना..
शौर्य : विर मी अस काहीच नाही बोललोय.. मी फक्त एकदा त्यांना विचार असच बोललोय.. मे बी त्यांनी बघायला म्हणुन घेतलं असेल.. आणि कुठे तरी ठेवलं असेल..
विराज : एक शब्द बोलु नकोस शौर्य.. आणि मी नाही कुणाला विचारायला जाणार.. न विचारता ते कसं काय माझ्या वस्तुंना हात लावतील. मला अस वाटत तुच इथे तिथे हरवुन आलायस..
विराजचा आवाज ऐकुन अनिता त्यांच्या रूममध्ये येते..
अनिता : काय झालं विर.. बाहेर पर्यंत आवाज येतोय तुझा..
विराज : विचार ह्यालाच.. एक काम नीट नाही करत.. तुझ्यासाठी बाजुबंद बनवायला दिलेले.. ह्याला सांगितलेलं काल नीट घेऊन यायला.. हरवुन टाकलेत ह्याने. वर मला बोलतोय मोठ्या मम्मीने नाही तर पप्पांनी घेतले असतील..
अनिता : शौर्य काय आहे हे??
शौर्य : विर खोट का बोलतोयस यार तु.. मी अस काहीच नाही बोललोय मम्मा.. मी फक्त एकदा त्यांना विचार म्हणुन बोललो.. आणि मी हरवले वैगेरे नाहीत विर.. काल पर्यंत तरी ते ह्याच बॉक्स मध्येच होते..
विराज : मग आत्ता कुठे गेले..??
अनिता : शौर्य किती रुपयांचे होते ते??
शौर्य : दोन लाख ऐंशी हजार..
अनिता : विर.. शौर्यने जर ते हरवले असते तर त्याने तस कबूल केलं असत.. हे तुला पण चांगलं माहितीय.. तरी तु त्याच्यावर आरोप करतोयस.. आणि माझ्यासाठी ह्यापुढे काही घ्यायची गरज नाही.. तुझे दोन लाख ऐंशी हजार रुपये मी तुझ्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करते.. आणि हा टॉपिक इथेच थांबव.. आणि शौर्य तुझं 11 तारखेच रात्रीच तिकीट बुक करते मी आजच. तु जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर इथुन निघुन जा..
एवढं बोलुन अनिता तिथुन निघुन जाते..
विराज : हेच हवं होतंना तुला.. मला तर ह्या घरी रहावसच वाटत नाही आता..
विराज रिकामी बॉक्स शौर्यच्या बेडवर फेकतच तो आपल्या रूममध्ये येऊन डोक्याला हात लावुन बसतो..
क्रमशः
(कुठे गेला असेल बाजुबंद?? पाहूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.)
©भावना विनेश भुतल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा