अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 70

In marathi

विराज : एवढं सिरीयस होऊन माझ्याकडे बघु नका.. शौर्यचा बर्थडे येतोय.. माहिती ना.. त्याच्या बर्थडेला मी काही प्लॅन केलेत.. त्यासाठी मला तुमची गरज लागेल.. म्हणजे खुप दिवसांपासुन तुमच्यासोबत भेटुन डिस्कस करायच ठरलेलं पण वेळ मिळत नव्हता मला. आज वेळ भेटलाच आहे म्हटलं तर डिस्कस करूनच टाकुयात

ज्योसलीन : काय करायचं ठरवलंय मग त्याच्या बर्थडेला.. नाही म्हणजे आम्ही पण आत्ता इथे बसून तेच डिस्कस करत होतो..

विराज : त्याच्या बर्थडेला काय करायचं ते तर मी सांगणारच आहे.. पण त्या आधी एक रिक्वेस्ट.. जर परत शौर्य अस वेड्यासारखं काहीही डिसीजन घेत असेल तर प्लिज त्याला सपोर्ट करू नका.. आय नो तुम्ही सगळे एकमेकांसाठी खास आहात.. एकमेकांसाठी वाटेल ते करायला तैयार असता.. बट आपल्याला कळतंय की समोरची व्यक्ती चुकतेय.. आणि तरीही तुम्ही त्याला मदत करत होते.. तुम्ही एकदा मला येऊन सांगायला हवं होत.. स्पेसिअली ज्यो तु.. तुला माहिती ना तो माझ्यासाठी काय आहे ते.. तु पण त्याच्या चुकीच्या निर्णयाला साथ देत होतीस.. 

ज्योसलीन : विर आम्ही समजवल रे त्याला पण तो ऐकायलाच तैयार नव्हता.. आणि आता झालं ना सॉर्ट आउट.. परत नाही होणार अस आमच्याकडून. आम्हा सगळ्यांकडून सॉरी.. ओके.. 

नैतिक : हो परत अस नाही होणार..

आर्यन : आणि अस काही वाटलं तर आम्ही तुझ्याशी येऊन बोलु..

विराज : नक्की..

हो.. नक्की... सगळेच एकत्र बोलतात..

विराज : बर.. शौर्यचा हा बर्थडे मला एकदम स्पेसिअल करायचाय.. म्हणजे मी काही प्लॅन केलेत.. मला तुमची हेल्प लागेल..

आर्यन : तु काय प्लॅन केलंयस??

विराज त्याने केलेला प्लॅन शौर्यच्या मित्र मंडळींना सांगतो..

ग्रेट यार.. रॉबिन आणि इतर सगळेच विराजला बोलतात.. आणि त्यात थोडं एडिशन करून विराजने केलेला प्लॅन अजुन थोडा हटके कसा करता येईल हे ते विराजला सांगतात.. 

विराज : मग ठरलं तर आपलं.. आणि ह्यातलं शौर्यला काहीही कळता कामा नये.. ओके..

ओके बॉस...

विराज : आणि आत्ता थोडं महत्वाच.. रॉबिन आणि ज्यो.. तुम्ही दोघ लग्नात शौर्यसोबतच रहाणार आहात.. फक्त लग्नात बोलणं चुकीच आहे. एंगेजमेंटपासूनच.. त्याचे मित्र मंडळी येतीलच त्याला भेटायला... ते डायरेक्ट लग्नातच येतील अस धरून आपण नाही चालू शकत.. जरी शौर्य बोलला तरी त्याला एकट सोडायच नाही.. आणि तुम्हांला जरा पण काही प्रॉब्लेम वाटला तर मला नाही तर मम्माला लगेच कळवा.. नैतिक तु आणि आर्यन.. बर्थडेसाठी आपण केलेल्या प्लॅनची जबाबदारी तुम्हा दोघांवर.. ओके..

नैतिक : ओके..

विराज : मग चालु द्या तुमची प्रॅक्टिस. मी निघतो.. मला काम आहेत.. आणि हो जो खर्च लागेल तो माझ्याकडुन घ्या.. ओके??

नैतिक : ओके बाय..

विराज सगळ्यांना बाय करत तिथुन निघाला..

★★★★★

इथे समीरा पण आजच मुंबईला परत आली होती..

तिच्या घरचे सगळेच सामान भरून गावी निघायच्या तैयारीत होते.. फक्त तिचीच वाट बघत थांबले होते..

समीरा : तुम्ही लोक गावी निघालात पण??

कोणीच तिच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही..

समीराची वहिनी डायनींग टेबलवर ठेवलेला जग हातात घेत त्याच्या बाजुला असलेल्या रिकामी काचेच्या ग्लासात पाणी भरून तिला देत होती.

समीरा : इट्स ओके वहिनी मी घेतलं असत.. तु पण निघालीस गावी..

वहिनी : मी आणि श्री नंतर येऊ.. आम्हांला थोडं ऑफिसच काम आहे

श्री : आई, बाबा आणि सोबत काका काकु पण आहेत.. तु त्यांच्यासोबत जा पुढे.. आम्ही नेक्स्ट विक येऊ..

समीरा : दादा मला जायच का नाही ते मी ठरवेल.. आणि मी जस्ट आलीय.. थोडं बसु तरी दे..

आई : एक्साम संपून महिना झाला नि तु आता घरी आलीस. जरा तरी काही वाटत का नाही तुला? आणि ह्यापुढे तुझं जे काही शिक्षण असेल ते तु इथेच करायच..

समीरा : आई तुझं झालं असेल तर माझं पण ऐक.. जो पर्यंत तो माणुस ह्या घरी असेल तोपर्यंत मी ह्या घरात रहाणार नाही. कळलं तुला.. एक तर तो तरी राहील नाही तर मी तरी.. तूच ठरव मग काय करायच ते.. तु त्याला माफ केल असशील पण मी नाही..

श्री : समीरा.. बाबांना अस एकेरी शब्दाने बोलायला लाज नाही का वाटत तुला..

समीरा : त्यांना नको ते रंग उधळायला लाज नाही वाटली मला का लाज वाटेल..

आई : श्री तुच जास्त लाडवून ठेवलयस हिला.. 

श्री : आई अग तु थोडं शांत बस.. दमुन आलीय ती.. समीरा जा जाऊन फ्रेश हो.. आणि पेकिंग करायला घे..

दादा.. मी त्या माणसासोबत गावी जात नाही आहे.. कळलं तुला.. समीरा रागातच सगळ्यांसमोर आपल्या भावावर ओरडत आपल्या रूममध्ये जायला निघते तोच समोर तिला तिचे बाबा दिसतात.. समीरा त्यांच्याकडे रागात बघतच तिथुन जाऊ लागते..

श्री प्रितिकडे बघत तिला समीराच्या रूममध्ये जाऊन तिला थोडं शांत करायला सांगतो..

समीरा आपली बेग ऑपन करून त्यातलं सामान लावत असते..

प्रिती : तुला नाही जायच त्यांच्या सोबत तर ठिक आहे.. आमच्यासोबत चल.. आपण तिघ एकत्र जाऊ..

समीरा : नाही नको.. मी उद्या माझं मी जाईल..

प्रिती : तु अस एकट??

समीरा : मला आहे सवय.. तु आज कामावर नाही गेलीस..?

प्रिती : नाही.. आई बाबा निघतायत ना आज गावी जायला.. म्हणुन सुट्टी घेतली.. दुपारी शॉपिंगला पण जायचय.. कामाच्या गडबडीत माझी लग्नासाठीची काहीच शॉपिंग नाही झाली.. आणि त्यात आम्हां दोघांचे कॉलेज मधले खास मित्र मैत्रीण आहे त्यांचं लग्न आहे त्यासाठी पण शॉपिंग करायचीय.. तु येतेस तर चल आमच्यासोबत मला तेवढीच मदत होईल..

समीरा : तुमच्या मित्र मैत्रिणीच्या लग्नाला मी कस येऊ..??

प्रिती : लग्नाला नाही ग शॉपिंगला बोलतेय मी..

समीरा : हम्म बघु..

प्रिती : बर नाश्ता वैगेरे देऊ का आणुन.??

समीरा : नको मी घेईल मला हवं तर तु खाली आईलाच बघ काही हवं का.. आणि तिला सांग मी नाही येत.. माझं मी उद्या येईल..

प्रिती काहीही न बोलता समीराच्या रूममधुन निघाली..

समीरा काही ऐकणार नाही हे तिच्या घरच्यांना माहिती होत.. म्हणुन जास्त तिला फोर्स न करता सगळे सरळ गावी जायला निघतात..

समीरा... श्री जोरात तिला आवाज देतो.. तस समीरा बाहेर येते..

समीरा : काय झालं??

श्री : ह्या लोकांसोबत जायला काय प्रॉब्लेम आहे तुला..??उद्या एकट जाण्यापेक्षा आजच जा ना..

समीरा : मगाशी सांगितलेलं ना नाही जायचय म्हणुन.. जिथे हा माणूस...

बस बस... मध्येच समीराचे काका तिला थांबवत बोलतात..

काकी : तु नक्की येत नाहीस??

समीरा : नाही.. उद्या माझं मी जाईल..

काका : समीरा आमच्याबरोबर आलीस तर काही बिघडणार आहे का?? 

समीरा : हो.. खुप काही बिघडेल.. 

(समीरा आपल्या वडिलांकडे बघतच बोलते.. तिचे वडील गप्प मान खाली घालुन घराबाहेर पडतात)

श्री : काका जाऊ दे तिला.. तिच्याकडे लक्ष नको देऊस.. मी बघतो तिच्याकडे.. तुम्ही बसा गाडीत. 

श्री दारातच उभ्या असलेल्या गाडीत त्याच्या आई, वडिलांना आणि काका काकूंना बसवतो.. प्रिती आणि श्री दोघेही हसतच त्यांना बाय करतात.. आणि घरात येतात..

श्री समीराकडे रागात बघत तिच्याशी न बोलताच रूममध्ये जायला निघतो..

श्री : प्रिती आपल्या दोघांच नाश्ता वर्तीच घेऊन ये.. आपण रूममध्ये बसुन करूयात..

प्रिती : बर..

श्री रूममध्ये जाताच समीरापण त्याच्या मागे त्याच्या रूममध्ये जाते..

समीरा श्री सोबत काही बोलणार तोच.. श्रीचा फोन वाजतो..

तो फोनवर बोलेपर्यंत समीरा तशीच त्याच्या रूममध्ये फेऱ्या मारत बसते..

तोच तीच लक्ष त्यांच्या टीपॉयवर ठेवलेल्या आकर्षक अश्या विराजच्या वेडिंग कार्डवर जात.. किती छान आहे.. अस बोलत ती कार्ड हातात घेते..

पत्रिकेवर चि. विराज आणि चि. सौ. का. अनघा अस लिहिलेलं.. विराज हे नाव वाचुन समीराच्या चेहऱ्यावर आठ्या पडतात...तेच तिला शौर्यच्या भावाची आठवण येते.. आणि तेवढाच त्याचा राग पण येतो.. समीरा कार्ड हातात घेते.. शौर्यच्या भावाच नाव पण विराज आहे.. हे कार्ड त्याचच तर नसेल?? असा विचार मनात करतच ती कार्ड ओपन करते.. कार्डवर सुरुवातीला श्रीमती अनिता सुरज कुलकर्णी ह्यांचा ज्येष्ठ सुपुत्र.. असा उल्लेख केलेला असतो.. म्हणजे हा विराज देशमुख नसुन कोणी तरी वेगळाच आहे.. असा विचार करून समीरा परत ते कार्ड तसच टेबलवर ठेवते आणि एकटक त्या कार्डवर लिहिलेल्या विराज ह्या नावकडे बघते.. पुन्हा रागातच कार्ड परत हातात घेत ते फाडुन टाकते. बेडवर बसत श्रीच फोनवरच बोलणं कधी पुर्ण होतय ह्याची वाट बघत बसते..

श्री फोनवरच त्याच बोलणं आटोपुन तिच्याजवळ येतो..

श्री : काय झालं??

समीरा : मी उद्या जातेय गावी..

श्री : मग मला का सांगतेस.. जे करायच ते कर..

समीरा : अस का बोलतोयस ?? तुला माहिती ना मला त्या माणसाला बघितलं तर राग नाही कंट्रोल होत.. तरी तु अस बोलतोस मला..

तोच प्रिती दोघांचा नाश्ता घेऊन नेहमीप्रमाणे रूममध्ये शिरते..

श्री : तुला पण मी हजार वेळा सांगितलंय बाबांसोबत तु अस वागलेलं मला नाही आवडत.. तरी तु का अस वागतेस..?? जरा स्वभाव बदल तुझा.. आणि माणसात ये थोडं.. चांगलं वागायला नाही जमत मग वाईट पण वागु नकोस..

समीरा : आणि ते आपल्यासोबत जे वागले ते..?

श्री : जमाना झाला त्या गोष्टीला.. तु तीच गोष्ट धरून बसु नकोस.. आणि ते माझ्या घरी रहातात कळलं तुला.. तुझ्या दारावर नाही रहात.. जे तु त्यांना अस अपमानास्पद वागवतेस.. 

प्रिती : श्री ओव्हर रिएक्ट होतोयस तु.. प्लिज.. तिला हर्ट होईल अस नको बोलुस..

श्री : कॉलेजला सुट्टी पडली की लगेच घरी ये म्हटलं होतं मी हिला. तिथे मित्र मंडळींसोबत उनाडक्या करत बसते.. आईची आणि काकांची रोज बोलणी खावी लागतात मला हिच्यामुळे.. हौस मौज करायला हिला मी पैसे पुरवतो म्हणुन.. हिला कुठे फरक पडतोय.. एक गोष्ट ऐकत नाही ही.. फक्त स्वतःचा जीव ठेवढा रमवता येतो हिला.. तिथे गावी जाऊन मामा मामीला मदत करायची तर ते नाही जमत हिला.. किती केलंय त्यांनी आपल्यासाठी.. सगळं कसं तु विसरतेस.. नाती जोडुन धरायला शिक समीरा..

समीरा : तुझी ही अशी नाटकी असतात म्हणुन यावस नाही वाटत मला इथे.. येऊन एक तास पण नाही झाला तुझं झालं चिडचिड करायला सुरुवात.. मी पण का आली इथे तेच नाही कळत.. आणि उद्या जाणारच आहे ना गावी.. एक दिवसाने काय फरक पडणार आहे?? तस पण इतर लोक आहेत ना मदतीला.. मी त्या माणसासोबत नाही जाऊ शकत.. आणि हा टॉपिक इथेच स्टॉप कर.. प्लिज..

श्री : एक्साम झाल्या झाल्या खर तर तु जायला हवं होतंस गावी.. तुला नात्यांची किंमत नाही कळत.. तिथे मामी एकटीच आहे माहिती ना?? एक महिना आधी तिच्यासोबत जाऊन राहिली असतीस तर तेवढीच तिला मदत झाली असती.. आणि बर पण वाटलं असत..

समीरा : मग तुच जायचस ना गावी..

श्री : समीरा तुझ्यासारख मी मित्र मंडळींसोबत उनाडक्या करत नव्हतो.. काम असतात मला ऑफिसची.. मी पण तुझ्याकडुन नको त्या गोष्टीची अपेक्षा ठेवतोय.. जी स्वतःच्या आईचा विचार नाही करत ती गावी एकटीच असणाऱ्या तिच्या मामीचा काय विचार करणार?? 

समीरा : तु अस का बोलतोयस?? 

श्री : कधी वेळ काढुन भेटायला येतेस इथे?? का कधी स्वतःहुन फोन करतेस आम्हाला?? आई आजारी असेल अस तुला फोन करून सांगितलं तरी तु परत तिला फोन पण नाही करत.. एवढी बिजी असतेस तु तिथे.?? 

समीरा : एक मिनिट. तु कुठचा विषय कुठे नेतोयस?? तुझा राग शांत झाला ना मग बोल माझ्याशी.. आणि वेळ मिळतो तस मी करते आईला फोन..

श्री : आईला फोन करण्यासाठी तुला वेळ काढावा लागतो..?? काय करत असतेस ग दिवसभर सांग जरा..

समीरा : तु त्या माणसामुळे मला ओरडतोयस दादा..

श्री : बाबांमुळे बोलायच का तुला???

मला बोलायच नाही काही.. अस बोलत समीरा रागातच तिथुन जाऊ लागली

श्री : एक मिनिट आणि अजुन एक.. हे तुला शेवटच सांगतोय.. माझ्या घरात माझ्या वडिलांना कोणी काय बोललेलं मी सहन करणार नाही.. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची ह्या पुढे. 

(समीरा ऐकुन न ऐकल्यासारखं करत तिथुन बाहेर पडते.. आणि सरळ आपल्या रूममध्ये जाऊन सामान पॅक करायला घेते..)

प्रिती हातातील ट्रे समोर असलेल्या टेबलवर ठेवत श्रीकडे जाणार तोच तीच लक्ष समीराने फाडुन टाकलेल्या कार्डवर जात..

प्रिती : हे वेडिंग कार्ड कोणी फाडल अस..??

श्री : काल गडबडीत वाचायला नाही मिळालं म्हणुन मिच ते कार्ड इथे ठेवलेलं जेणे करून लक्षात राहील माझ्या.. सकाळपर्यंत तर नीट होत ते.. म्हणजे समीरा ने??

प्रिती : ए श्री.. प्लिज...तु बघितलं नाहीस तर अस आरोप नको करूस तिच्यावर.. 

श्री : तिच्याशिवाय कोण आलय रूममध्ये.. थांब आत्ताच्या आत्ता जाऊन विचारतोच तिला..

प्रिती : श्री तु आज जास्तच हायपर होतोयस.. 

श्री : हायपर होऊ नको तर काय होऊ.. त्यात एड्रेस होता हॉलचा.. आणि अस कस ती फाडु शकते.. कालच विराज कार्ड देऊन गेलेला.. कार्ड उघडुन पण नाही बघितलं मी ते..

प्रिती : इट्स ओके ना.. तस पण अनघाने दिलेलं वेडिंग कार्ड आहे माझ्याकडे.. त्यात आहे एड्रेस.. तु इथे बस बघु.. आणि नाष्टा करून घे आपण जाऊयात.. शॉपिंगला.. डोकं थोडं शांत होईल तुझ..

श्री : ही हॉस्टेलवर असते ना तेच बर असत अस वाटत मला.. बर ते जाऊ दे.. काय गिफ्ट घ्यायच त्याबाबत केलास का विचार?? 

प्रिती : तिथे गेल्यावर सुचेल ते.. आणि प्लिज तु एकदा तिच्याशी नीट बोलुन घे..

श्री : कोणाशी??

प्रिती : समीराशी..

श्री : हम्मम्म.. बघु बोलतो नंतर.. शॉपिंग वरून आल्यावर.. तिला पण विचार येते का शॉपिंगला..??

प्रिती पटकन नाश्ता आवरून समीराच्या रूममध्ये जाते.. समीरा आपली बेग भरत असते.. 

प्रिती : काय करतेस??

समीरा : उद्याची तैयारी..

प्रिती : तु येतेयस शॉपिंगला?? आम्ही दोघे निघतोय..

समीरा : नाही नको.. तुम्ही जावा.. 

प्रिती : चल ना घरी एकट बसुन काय करणार..??

समीरा : सॉरी पण खरंच मला नाही यावस वाटत.. तुम्ही जावा..

प्रिती : बर तुला काही हवंय??

समीरा : नो थेंक्स

तेवढ्यात श्री येतो समीराच्या रूममध्ये..

समीरा : दादा अजुन काही बोलायच राहीलय का तुझं??

श्री : सॉरी.. पण प्लिज बाबांना परत काही बोलु नकोस.. तुला त्यांच्याशी नाही बोलायच तर नको बोलूस पण त्यांना हर्ट होईल अस नको वागुस.. प्लिज माझ्यासाठी..

समीरा श्री च्या बोलण्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता आपलं सामान बेगेत भरते..

श्री प्रितीकडे बघतो.. प्रिती त्याला इशाऱ्यानेच शांत राहायला सांगते..

प्रिती : चल ना समीरा शॉपिंगला.. आम्हांला पण थोडं बर वाटेल.. तु आमच्यासोबत आलीस तर..

समीरा : नाही बोलली ना मी तुला.. परत का तेच तेच विचारतेस..

प्रिती श्रीकडे बघत समीराच्या रूममधुन बाहेर पडते..

श्री : बर मग घरीच थांब.. घरी कोणी नाही.. नाही तर बाहेर परत कुठेतरी उनाडक्या करायला जाशील.. राधा मावशी आहेत सोबत तुझ्या.. 

श्री आणि प्रिती दोघेही शॉपिंगसाठी घराबाहेर पडतात.. 

समीराने मात्र मामे भावाच्या लग्नासाठी दिल्लीवरून येतानाच शॉपिंग केली असते.. गाणं गुणगुणत ती तेच आपलं सामान लावण्यात व्यस्त असते..

तोच वृषभ तिला फोन करतो..

समीरा : हा वृषभ बोल..

वृषभ : रोहन पण आहे लाईनवर.. 

समीरा : काय झालं??

रोहन : तु गेलेलीस का ग शौर्यच्या घरी..??

समीरा : कश्यासाठी??? 

वृषभ : अस काय करतेस... तुला काल बोललो ना मी.. शौर्यच्या हॉस्टेलवर मी फोन केलेला तो तिथे नाही आहे.. कदाचित मुंबईत आला असेल तर..? तु जाऊन बघुन तर येऊच शकतेस ना.. तस पण तुला जास्तीत जास्त एक तास लागत असेल तस बघायला गेल तर. न जाणो तो मुंबईतच असेल तर..

समीरा : अरे हो सॉरी मी विसरलेच.. ते घरी थोडं गोंधळ चालु होता.. बट मला नाही वाटत मला आज जायला मिळेल.. कारण आता घरी कोणीच नाही.. तु थोडं आधी तरी फोन करायचास ना.. आता मला घरीच थांबाव लागेल.. जर दादा आणि वहिनी लवकर आले शॉपिंगवरून तर मी जाऊन बघते.. पण मला एकटीला त्याच्या घरी जायला भीती पण वाटते..  शौर्य भेटेल का नाही माहीत नाही पण त्याचा तो भाऊ नक्कीच भेटेल.. परत नको ते बोलून इन्सल्ट करून पाठवुन द्यायचा.. 

वृषभ : तु अस कस बोलु शकते यार. माझंच चुकलं मी स्वतः तिथे येऊन बघायला हवं होतं..

समीरा : एक मिनिट.. मी जात नाही अस नाही बोललीय..

रोहन : पण तु मी जाते अस पण कुठे बोलतेयस.. एक तर माझा डॅड माझा व्हिसा काढून देत नाहीय.. नाही तर मीच न्यूयॉर्कला गेलो असतो..

वृषभ : माझ्याकडे पण जर खरच एवढे पैसे असते तर मी पण लगेच तिथे गेलो असतो.. अस कुणाला मस्का लावत नसतो बसलो..

समीरा : तुम्हां दोघांना बोलायच काय आहे?? आणि वृषभ तु तर त्याच्या भावाला फोन करतोस ना.. मग त्यालाच विचार ना एकदा तो आलाय का??

वृषभ : तुला अस खरच वाटत का?? शौर्य आलाय हे त्याचा भाऊ मला सांगेल..

रोहन : समीराने हे काही होईल अस मला नाही वाटत.. वृषभ आपण एक काम करूयात.. आपण परत एकदा हॉस्टेलवर कॉल करून बघुयात.. जर खरच नसेल तिथे तर मी उद्या मुंबईत जातो आणि बघतो.. जर डॅड घरी नसलाना तर आजच निघेल..

वृषभ : बर..

समीरा : एक मिनिट..  रोहन तुला एवढ्या लांब इथे यायची गरज नाही.. मी दादा आणि वहिनी शॉपिंगवरून आले की जाऊन बघते.. आणि सांगते तुम्हांला.. नाही तर दादालाच घेऊन जाते.. मला अस वाटत की तो मुंबईत नसेल.. जर तस असत तर त्याच्या फ्रेंड्सपैकी एकाने तरी गुड बाय सारखच वेलकम बेक इंडिया अशी पोस्ट विथ त्याचा फोटो फेसबुकवर एकमेकांना टेग करत लगेच शेअर केली असती..

वृषभ : एकदा बघून यायला काय हरकत आहे.. तु नक्की जाणार असशील तर सांग.. नाही तर आम्ही आमच करू मॅनेज..

समीरा : बघते मी.. ठेवु आता..?? मला काम आहेत..

रोहन : आम्हांला फोन कर... 

वृषभ : पण तरी किती वाजता जाशील..

समीरा : दादा वहिनी आले की निघते मी..

वृषभ : बर ठिक आहे.. 

समीरा फोन ठेवते आणि आपलं सामान भरून बेग बाजुला ठेवुन आपल्या दादा वहिनीची वाट बघत बसते..

★★★★★

दुपारचे तीन वाजतात.. गाथा ठरल्याप्रमाणे आपल्या चार पाच मैत्रिणींना घेऊन ज्योसलीनच्या घरी येते..

रोबिन : अरे वाह.. आज तुझे फ्रेंड्सपण आले का??

गाथा : हो.. शौर्य कुठेय..??

नैतिक : आम्ही पण त्यालाच फोन लावतोय..? उचलतच नाही..

गाथा आपल्या मैत्रिणींची सगळ्यांसोबत ओळख करून देते..

सगळेच शौर्यची वाट बघत बसतात.. 

ज्योसलीन : मला अस वाटत आपण चालु करूयात प्रॅक्टिस.. शौर्य येईल तेव्हा येईल..

सगळेच प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात..

जवळपास संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान शौर्यला जाग येते.. हातात मोबाईल घेऊन बघतो तर साडे पाच वाजले असतात..

ओहह शट... अस बोलत पटकन बेडवर उठुन बसतो आणि नैतिकला फोन लावतो..

नैतिक : आहेस कुठे??

शौर्य : झोपलेलो..

नैतिक : हे बर आहे.. इथे तुझ्या भावाच लग्न आणि आम्ही प्रॅक्टिस करत बसलोय आणि तु मस्त झोपा काढतोयस.. बर येतोयस आता तरी...

शौर्य : हम्मम.. 

शौर्य तोंडावर पाणी मारतच थोडं फ्रेश होतो.. आणि ज्योसलीनच्या घरी जायला निघतो.. 

एवढे फोन केले तुला.. एक तरी फोन उचलायचास ना.. शौर्य घरी आल्या आल्या रॉबिन त्याला बोलतो..

शौर्य : झोपलेलो रे.. 

(ज्योसलीनच्या सोफ्यावर डोळे मिटुन तो बसतो...)

रॉबिन : कधी झोपलास??

शौर्य : तुम्ही लोक आवाज देऊन गेले त्यांनतर लगेच..

आर्यन : जेवायला पण नाही उठलास का??

शौर्य मानेनेच नाही बोलतो..

शौर्य : गाथा नाही आली??

नैतिक : वर्ती टेरेसवर प्रॅक्टिस करतायत ते लोक.. तिच्या मैत्रिणी पण आल्यात..

रॉबिन : ती पण आल्या आल्या हा दिसला नाही म्हणुन ह्याला विचारते.. आणि हा ती दिसली नाही म्हणुन तिला.. कुछ तो गडबड हे दया..

नैतिक : दो दिलं.. मिल रहे हे.. मगर चुप चुप के..

नैतिक गाणं गातच शौर्यला चिडवु लागतो.. नैतिक अस गाणं बोलताच आर्यन आणि रॉबिन एकमेकांचा हात पकडत शौर्यच्या समोर सालसा करत त्याला चिडवत नाचु लागतात..

शौर्य त्यांच्या अश्या वागण्यावर काहीच रिएक्ट होत नाही.. एक टक कसल्या तरी विचारात हरवुन जातो..

शौर्य काहीच रिएक्ट होत नाही हे बघुन दोघेही नाचायचे थांबतात.. आणि त्याच्या बाजुला जाऊन बसतात..

आर्यन : टीजरमध्ये जे तु चेंजेस सांगितलेत ते झालेत.. इव्हीनींगला जाऊन बघुन येऊयात.. 

नैतिक : ए SD गाथाला पण घेऊन जाऊयात टीजर बघायल.. म्हणजे तिला आम्ही मगाशी सांगितलं तेव्हा ती बोलली तिला पण यायचय.. 

आर्यन : चालेल ना SD गाथा आली तर..

रॉबिन : शौर्य थोडी ना नाही बोलणार..

तिघेही हसतच त्याची मस्ती करत असतात..

शौर्य शांतच बसुन कसला तरी विचार करत असतो...

आर्यन : कुठल्या दुनियेत हरवलायस??

रॉबिन : मागासपासून तुझ्याशी बोलतोय आम्ही.. कसला एवढा विचार करतोयस..

शौर्य : समीराचा..

नैतिक : काय??

शौर्य : हा म्हणजे लग्नात येईल ना ती.. काय आणि कसं बोलु तिच्याशी त्याच्याच विचार करतोय. मी तर विचार करतोय आत्तापर्यंत गाण्यातून माझ्या फिलींग तिला सांगत होतो.. पण आता विचार करतो ह्या वेळेला डान्स मधुन मी माझ्या फिलींग तिला सांगेल..

(तिघेही एकमेकांकडे बघत रहातात..)

शौर्य : तशी एक दोन गाणी ठरवलीत मी.. 

रॉबिन : तु तिच्यासाठी डान्स करणार..?? डोकं आहे ना ठिकाणावर.. 

शौर्य : तेव्हा नव्हतंना पण आता आलंय..

नैतिक : नक्की काय करणार आहेस तु??

शौर्य त्यांना काही सांगणार तोच विराज फोन करतो त्याला.. ..

शौर्य : हम्मम्म बोल..

विराज : संध्याकाळी अपॉइंटमेंट घेतलीय.. 8 वाजताची.. 

शौर्य : कसली??

विराज : डॉक्टची.. बोललो तर होतो सकाळी तुला..

शौर्य : ए विर मी नाही येणार हा डॉक्टरकडे वैगेरे प्लिज.. तु केन्सल करून टाक ती अपॉइंटमेंट..

विराज : आपण डॉक्टरकडे जातोय.. मी 7 पर्यंत घरी येतोय.. कुठे जाऊ नकोस..

शौर्य : विर मला आता बर वाटतंय.. मी नाही म्हणजे नाही येत आहे डॉक्टरकडे प्लिज.. तु ठेव बघु फोन एवढं बोलुन शौर्य विराजचा फोन कट करून टाकतो..

फोन ठेवुन मित्रमंडळींना सोबत घेऊन ज्योसलीनच्या टेरेसवर जातो..

गाथा सोबत तिच्या इतर मैत्रीणी डान्स करण्यात बिजी असतात.. ह्या दोन तीन तासात बऱ्यापैकी डान्स बसला असतो.. तोच गाथाच लक्ष शौर्यकडे जात.. डान्समध्येच थांबवत ती शौर्यकडे येते..

गाथा : कुठे होतास तु?? झोपलेलास का??

शौर्य : हो पण तुला कस कळलं..

गाथा : ते रात्रभर जागा होतास ना.. म्हणुन जरा अंदाज लावला.. बाय दि वे मिट माय फ्रेंड्स.. 

गाथा आपल्या मैत्रिणींसोबत शौर्यची ओळख करून देते..

शौर्य सगळ्यांना हाय हॅलो करतो..

शौर्य : मी अजुन एक दोन गाणी एड केलीत.. आणि ती मी कोरियोग्राफ करणार..

गाथा : अरे वाह.. मला आवडेल तुझ्याकडुन डान्स शिकायला..

ज्योसलीन : मग चल करूयात प्रॅक्टिसला सुरुवात..

शौर्य : उद्या पासून.. उद्या एक दिवसात आपण बसवून टाकूयात डान्स चालेल.. तो पर्यंत तुम्ही करा प्रॅक्टिस.. 

गाथा आम्ही पण निघतो आता.. उशीर होईल.. गाथाच्या मैत्रिणी तिला रिक्वेस्ट करतच बोलतात..

गाथा : बर.. चालेल.. 

शौर्य : मी सोडु का तुम्हा लोकांना??

गाथा : गाडी आणलीय म्हणजे ड्रायव्हर काका असतील ते सोडतील त्यांना घरी..

चला मग आम्ही निघतो..सगळयांना बाय करत गाथाच्या मैत्रीणी तिथुन जाऊ लागल्या..

शौर्य : तु नाही जात??

गाथा : टीजर बघायला जायचय ना?? तो बघुन झाला की जाईल..

शौर्य : तु पण येतेयस??

रॉबिन : तुला नैतिक बोलत होता ना मगाशी अस काय करतोस..

शौर्य : कधी??

नैतिक : जेव्हा तु त्या तुझ्या समीराची आठवण काढत होतास तेव्हा..

नैतिक अस बोलताच गाथा शौर्यकडे बघते आणि शौर्य त्याच्या मित्रांकडे..

शौर्य : आठवण वैगेरे नव्हतो हा काढत.. उगाच काहीही नको बोलुस.. 

रॉबिन : राहू दे आता..

आर्यन : सात वाजत आलेत आपण निघुयात का ट्रेजर बघायला?? 

गाथा : हो.. मला पण मग घरी जाता येईल..

सगळेच शौर्यच्या गाडीत बसुन आर्यनच्या मित्राच्या स्टुडियोत जायला निघतात...

★★★★★

इथे वृषभ रोहनला फोन लावतो..

वृषभ : रोहन मी पुन्हा त्या हॉस्टेलवर फोन केलेला.. आज कोणी नवीन रिसेप्शनिस्ट होती वाटत म्हणजे आवाजावरून वाटलं.. 

रोहन : मग काही कळलं का शौर्यबद्दल??

वृषभ : तीने एकाला आवाज देत शौर्यला बोलवायला सांगितलं... खुप वेळ फोन चालुच होता.. मग ती फोन उचलुन बोलली की तो रूमवर नाही.. सगळे डान्स प्रॅक्टिसला गेलेत तो पण तिथेच असेल.. नंतर करा.. आता तिच्या बोलण्यावरून मला असच वाटत की शौर्य न्यूयॉर्कलाच आहे...

रोहन : मग समीराला फोन करून कळवतो.. गेली तर नसेल ना ती त्याच्या घरी.??

वृषभ : ती एवढी कारण देत होती मगाशी.. तुला वाटत ती जाईल??

रोहन : तरी मी कळवतो तिला फोन.. न जानो शौर्यला भेटावस वाटलं तर जाईल पण..

वृषभ : बर बघ काय ते.. मी तर नाही करत तिला फोन.. चल मग बाय.. 

रोहन वृषभचा फोन कट करत लगेच समीराला फोन लावतो..

समीरा : रोहन मी थोड्या वेळाने निघतेय.. 

रोहनचा फोन उचलल्या उचलल्या समीरा बोलते..

रोहन : मी तेच सांगायला फोन केला की तुला शौर्यकडे जायची काहीही गरज नाही..

समीरा : रोहन तुम्ही दोघ ओव्हर रिएक्ट होतायत. मी बोलली ना जाते.. मग का सूनवतोयस मला.. मला पण भेटावस वाटतय शौर्यला.

रोहन : ए हॅलो मी सूनवत नाही.. शौर्य न्यूयॉर्कलाच आहे अस वृषभ मला फोन करून बोलला.. त्याने त्याच्या होस्टेलवर फोन केलेला तेव्हा त्याला कळलं.. 

समीरा : मी सकाळी तेच बोलत होती पण तुम्ही दोघ ऐकतच नव्हते.. 

रोहन : बर ..बर.. मी ठेवतो.. थोडं बिजी आहे..

समीरा : हम्म बाय.. मी पण बिजी आहे..

रोहन : ओके..

★★★★★

इथे शौर्य आणि इतर मित्र मंडळी विराज आणि अनघाच्या प्रीवेडिंग शूटचा टीजर बघत असतात.. 

शौर्य : एकदम मस्त.. गाथा आवडला तुला??

गाथा : खुप म्हणजे खुप.. आणि ते फोटो प्रिंटिंगला दिलेले ते झालं का??

आर्यन : झालेत ते पण बघुन जाऊयात हाता बरोबर.. 

गाथाने ठरवल्याप्रमाणे फोटो सुद्धा अप्रतिम प्रिंट होऊन आले असतात..

सगळेच स्टुडियोत बसुन ते बघण्यात बिजी असतात..

गाथा : हा फोटो एन्ट्रन्सला लावुयात.. छान वाटेल..

गाथा एक एक अरेंजमेंट तिथेच बसुन शौर्यला सांगु लागली.. शौर्य फक्त तिच्याकडे एकटक बघत ती कस बोलते ते ऐकत असतो..

गाथा : तु पण सजेस्ट कर ना..

शौर्य : तु बोलशील तस चालेल मला..

रॉबिन : बर आम्ही निघतो इथुनच.. 

नैतिक : कुठे??

रॉबिन : एक काम सांगितलेल तुला मी काहीतरी.. विसरलास??

रॉबिन काही तरी इशारे करतच नैतिकला बोलतो..

शौर्य : एकत्रच जाऊयात ना..

आर्यन : आम्हांला एक काम आहे.. 

शौर्य : आत्ता काय काम आहे तुमच??

रॉबिन : आहे काम बोललो ना.. ह्या ज्योसोबत शॉपिंगला पण जायचय.. हो ना ज्यो..

ज्योसलीन : हो ना.. चल उशीर होईल परत..

नैतिक : आम्ही पण येतो..

रॉबिन : चला मग..

बाय गाथा आम्ही निघतो इथुनच सगळेच शौर्य आणि गाथाला बाय करत स्टुडियोतुन निघतात.. शौर्य पण स्टुडियो वाल्यासोबत बोलुन गाथाला सोडायला तिच्या घरी जायला निघतो.. 

मी जस ठरवतोय त्याहुन पण जास्त छान होतय हे लग्न... शौर्य गाडी ड्राइव्ह करता करताच गाथाला बोलतो..

गाथा : माझं ही काहीस असच झालंय..

शौर्य : सर्वेश कधी येतोय??

गाथा : मे बी आला असेल आज.. 

शौर्य : मग उद्या घेऊन ये त्याला पण..

गाथा : हम्मम..

शौर्य : गाथा ते माझं तुझ्याकडे एक काम होत.. 

गाथा : हा बोल ना..

शौर्य : आपण शांत ठिकाणी जाऊन बोलुयात?? 

गाथा : हम्म चालेल..

शौर्य जवळच एका हॉटेलजवळ गाडी थांबवतो..

 दोघेही आत जाऊन बसतात..

शौर्य : तु काही खाणार??

गाथा : जर तु ऑर्डर करणार असशील तर आवडेल मला खायला..

शौर्य घड्याळात बघतो तर 8.30 झाले असतात..

शौर्य : ज्युस करू का ऑर्डर का तु जेवुन जातेस??

गाथा : जेवण नको.. ज्युस चालेल मला..

शौर्य वेटरला ज्युस आणि स्नॅक्स ऑर्डर करतो..

गाथा : काय हेल्प करू मी तुझी सांग..

शौर्य त्याच्या समोर ठेवलेल्या ग्लासातील पाणी पितो.. आणि गाथाकडे बघतो..

गाथा : काय झालं??

शौर्य : ते तु माझी फियांसी बनशील???

शौर्य अस बोलताच गाथा एकटक शौर्यकडे बघतच रहाते.. तीच हृदय अगदी जोरजोरात धडधड करू लागत.. शौर्यने खरच अस काही आपल्याला विचारलंय ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता..

(काय होईल पुढे?? पाहूया पुढील भागात आणि हा भाग कसा वाटला ते ही नक्की कळवा..)

कर्मश

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all