अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 68

In marathi

शौर्य ज्योसलीनच्या घरात शिरणार तस त्याच्या लक्षात येत की तो फोन विराजच्या गाडीत विसरून आलाय.. 

ए ज्यो रॉबिनला फोन लाव ना आणि त्याला सांग मी फोन विरच्या गाडीत विसरलोय.. त्यावर फोन वैगेरे नको करुस.. शौर्य ज्योसलीनच्या घरी गेल्या गेल्या तिला बोलतो..

ज्योसलीन : अस कस विसरलास तु??

शौर्य : तु आधी फोन लाव त्याला मग मी सांगतो कस विसरला ते.. नको ते प्रश्न खूप असतात तुम्हां मुलींचे...

ज्योसलीन : ओके ओके.. वेट करते त्याला फोन..लगेच चीड चीड करायला पण येते तुम्हा मुलांना..

शौर्य : हाय तु आलीस पण.. सर्वेश कुठेय??

(गाथाकडे लक्ष जाताच शौर्य तिला विचारतो)

गाथा : तो दि सोबत मामाकडे गेलेला ना.. दि आली पण तो तिथेच राहिला..

शौर्य : ओहहह.. बाय दि वे काही ठरलं का नाही तुमचं..??

आर्यन : ए SD.. करूया सुरुवात..??

शौर्य : मी जस्ट आलोय रे.. थोडं बसतो नि येतो.. तोपर्यंत तुम्ही करा सुरुवात..

नैतिक : टेरेसवर करूयात ना प्रॅक्टिस..

आर्यन : मला कुठेही चालेल..

गाथा : मला पण चालेल..

शौर्य : चला मग..

सगळे टेरेसवर जाऊन मोबाईलमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावुन सगळे ज्योसलीनची वाट बघत असतात.. तोच ज्योसलीन आपला फोन कानाला लावतच तिथे येते..

शौर्य : केलास का फोन??

ज्योसलीन : बिजी येतोय..

शौर्य : परत ट्राय कर ना..

ज्योसलीन पुन्हा पुन्हा रॉबिनला फोन लावत असते पण रॉबिनचा फोन बिजी येत असतो..

हा घे फोन आणि तूच ट्राय कर.. ज्योसलीन शौर्यच्या हातात मोबाईल देतच डान्स करायला गाथाच्या बाजुला जाऊन उभी राहते.. शौर्य डान्स शिकवायला इंटरेस्ट घेत नाही म्हटलं तस सगळेच युट्युबवर बघुन डान्स प्रॅक्टिस करू लागतात.. शौर्य मात्र ज्योसलीनच्या मोबाईल मधुन रॉबिनला फोन लावण्यात बिजी असतो.. अधुन मधुन हळुच ज्योसलीनसोबत नाच करणाऱ्या गाथाकडे सगळ्यांच्या नकळत तो आपली नजर फिरवत असतो..

इथे गाडीत रॉबिनच बोलणं ऐकुन विराज आणि अनघाला खुप मोठा धक्काच बसला असतो.

रॉबिन : अरे शौर्य बोल ना लवकर.. काय करू..?? करु काय बुक??

विराज : आहेस तिथेच थांब..

रॉबिन : तुझ्या आवाजाला काय झालं..

विराज : मी विराज बोलतोय..

विराजचा आवाज ऐकुन रॉबिन खुप घाबरतो.. 

रॉबिन : त.. तु... म्हणजे शौर्य कुठेय?? त्याचा फोन तुझ्याकडे??

विराज : ते मी तुला भेटुन सांगतो.. चालेल.

रॉबिन : विर ज्योसलीन फोन करतेय मला..  मी तुला नंतर करतो....

विराज : एक मिनिट.. मी सांगेपर्यंत फोन कट नाही हा करायचा आता.. एअरपोर्टवर आहेस ना तु??

(मध्येच रॉबिनला तोडत विराज बोलतो)

रॉबिन : अ हो..

विराज : मी 15 मिनिटात एअरपोर्टवर येतोय... एअरपोर्ट बाहेर उभं रहा.. आणि मी तिथे येईपर्यंत फोन असाच चालू ठेवायचा.. ना कोणाचा फोन उचलायचा ना माझा फोन कट करायचा.. कळलं तुला..

रॉबिन : अरे पण..

विराज : मी काय बोललो ते कळलं का तुला..??

रॉबिन : हम्मम..

रॉबिन आता पुरत घाबरून गेलेला.. तो तसाच फोन चालु ठेवुन विराजची वाट बघत एअरपोर्ट बाहेर उभं रहातो..

इथे ज्योसलीन रॉबिनला फोन लावत असते पण रॉबिनचा फोन कॉन्टिन्युअसली बिजी येत असतो.. 

विराज शांतपणे गाडी ड्राइव्ह करत असतो.. पण ड्राइव्ह करताना ह्या आठवडाभरात शौर्यच वागणं त्याच बोलणं त्याला आठवत असत.. प्रत्येक शब्द त्याच्या कानाभोवती फिरत असतात.. तो त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ लावत असतो..

अनघा पण गाडीत डोक्याला हात लावुन शांत बसुन असते.. 

गाडी एअरपोर्टजवळ येऊन थांबते..

विराज : गाडीत येऊन बस.. 

विराज अनघाच्या हातात आत्तापर्यंत चालु असलेल्या फोनवरूनच रॉबिनला सांगतो.. आणि फोन सरळ कट करतो..

अनघा मागे जाऊन बसते.. रॉबिन येऊन विराजच्या बाजुला येऊन बसतो..

पुन्हा ज्योसलीनचा फोन येतो..

रॉबिन : आता तरी उचलु का फोन.. काम असेल तिच.. मगासपासून फोन करतेय..

विराज : उचल पण तु आमच्यासोबत आहेस हे अजिबात नाही सांगायच तिला.. आणि नॉर्मली बोलतोस तसच बोल.. 

रॉबिन : हा ज्यो बोल... (पण ज्योच्या फोन शौर्यकडे असतो..) शौर्य.. तु...  बोल...

विराज इशाऱ्यानेच त्याला फोन स्पीकरवर टाकायला सांगतो.. तस रॉबिन फोन स्पिकरवर ठेवतो..

शौर्य : आहेस कुठे?? आणि ज्योसलीन इथे असताना तु एवढा वेळ कोणाशी बोलत होतास..??

विराज : तुझं काही काम होत का??

शौर्य : तु बरा आहेस ना.. माझं USA च तिकिट काढायला जाणार होतास ना?? काढलस का??

शौर्य अस बोलताच रॉबिन डोक्याला हात लावुन शांत बसुन रहातो..

शौर्य : काय झालं?? तु बोलत का नाहीस..

रॉबिन : शौर्य मी तिथे येऊन बोलतो ना..

शौर्य : एक मिनिट.. काय झालंय??  तिकीट बुक झाल की नाही ते सांग आधी..

रॉबिन : ते 10th ला मॉर्निंगच्या सर्व फ्लाईट्स बुक आहेत.. 

शौर्य : आणि 9th च??

रॉबिन : त्यादिवशीच आहे..

शौर्य : मग त्यादिवशीच काढ..

रॉबिन : ओके.. ठेवु..

शौर्य : हा आणि लवकर ये..

रॉबिन : हो..

रॉबिन फोन कट करून मान खाली घालुन बसतो..

विराज : काय चाललंय हे?? 

रॉबिन शांत बसुन असतो..

मी तुला विचारतोय.. मला राग देऊ नकोस हा.. विराज रागातच रॉबिनवर ओरडतो..

अनघा : विराज.. शांत हो.. प्लिज.. तु त्याच्यावर का ओरडतोयस??

 विराज : कसा शांत होऊ.. काय चाललंय ह्या लोकांच बघतेसना.. 

अनघा : रॉबिन.. काय चाललंय शौर्यच..??

रॉबिन : ते तो USA ला जातोय... विरच्या लग्नात नाही आहे तो..

अनघा : पण का?? अचानक काय झालं??

रॉबिन : ते विरने श्री ला कार्ड दिलं तर तो जाणार हे त्याच ठरलं होतं.. म्हणजे लग्नात समीरा आणि त्याचे मित्रमंडळी येतील ना.. त्याला त्यांना नाही भेटायचं.. आम्ही समजवल त्याला पण तो ऐकत नव्हता आमच.. 

विराज : एकदा मला येऊन सांगावस नाही वाटलं का तुम्हांला??

रॉबिन : शौर्यने कोणाला सांगु नको अस सांगितलेलं..

विराज : आणि तु ऐकलं??

रॉबिन : म्हणजे आम्ही त्यावेळेला त्याला हो बोललो.. कारण आम्हाला वाटलं की तु नाही देणार श्री ला कार्ड.. आणि त्यादिवशी तो फोन करून बोलला पण की तु श्री ला कार्ड नाही देत.. मला माझ्या भावाच लग्न मस्त एन्जॉय करायला मिळणार.. एन्ड ऑल बट त्याच्या दुसऱ्यादिवशीच त्याने पुन्हा फोन करून सांगितलं की मला जायचय USA ला.. मी त्याला समजवल पण तो ऐकायला तैयारच नाही होत म्हटल्यावर मग मीच स्वतःला तैयार केलं त्याच USA च तिकीट काढायला..

अनघा : आज ना उद्या विराजला हे सगळं कळणार तेव्हा त्याला काय वाटेल ह्याचा विचार नाही का केला तुम्ही लोकांनी?? आणि एवढा मोठा डिसीजन शौर्य घरी न सांगता घेऊच कस शकतो.. आज ना उद्या त्याला ती लोक भेटणारच ही गोष्ट तुम्ही का नाही समजवली त्याला..

रॉबिन : त्याच सगळंच ठरलेलं ना.. तो USA ला कायमचा जाणार आहे.. इथे परत कधीच नाही येणार तो.. त्याला त्या लोकांना नाही भेटायचं.. आणि मेन म्हणजे त्या समीराला.. त्याला नाही जमत ते सगळं विसरायला.. ती लोक समोर आली की माझं काय होईल हे मी नाही सांगु शकत असच तो सारख सारख बोलत होता.. मग आम्ही काय करू सांग.. आम्ही त्याला बोललो की आपण विरला सांगुयात तो नाही देणार कार्ड श्री ला.. पण विरला वाईट वाटेल जर श्री त्याच्या लग्नात नाही आला तर आणि श्री ला पण.. अस सांगुन त्याने आम्हाला ते पण नाही करू दिलं..

विराज गाडी बाजुलाच एका गार्डन जवळ थांबवतो.. 

मी आलोच अस बोलत दरवाजा उघडुन गाडी बाहेर जाऊन उभं रहातो.. विराज अस बाहेर गेला हे बघुन अनघा पण त्याच्या मागे जाते...

अनघा : विराज प्लिज शांत होत.. 

विराज अनघाच्या विरुद्ध दिशेने तोंड करून उभं रहातो..

अनघा : हे बघ आपण समजवु त्याला... मी आहे ना.. मी बोलते त्याच्याशी.. तु इथे बघ बघु..

अनघा विराजच्या दंडाला हात लावतच त्याच तोंड आपल्याकडे करते..

अनघा : तु रडतोयस?? 

विराज : अस कस वागू शकतो शौर्य..?? किती खोट बोलतोय तो माझ्यासोबत.. खरच आज त्याने तो माझा सावत्र भाऊ आहे हे प्रूफ केलंय.. 

अनघा : विराज अस अजिबात काही बोलायच नाही हा.

विराज : मग काय बोलु.. तोच तोच टॉपिक घेऊन हा किती दिवस असाच रहाणार आहे.. बस झालं ना आता.. आणि अनु दहा वेळा विचारलं असेल मी त्याला.. श्री शी बोलु का फोन करून..?? नाही तु दे कार्ड.. मला नाही काही वाटणार.. हेच त्याच उत्तर असायच वर माझ्यावर भडकायचा.. सारख सारख एकच गोष्ट नको विचारुस म्हणुन.. तुझ्या लग्नात मी तुझ्यासोबत नसेल.. मी थोड इतर कामात बिजी असेल.. पण तु पेनिक नको होऊस.. आणि सवय कर विर माझ्याशिवाय रहायची. लग्नात मी नसणार तुझ्या सोबत.. पण मिच मूर्ख.. त्याच्या बोलण्याचा अर्थच मला नाही कळला.. जर त्याचा मोबाईल गाडीत राहीलच नसता तर कळलंच नसत ना आपल्याला.. त्याला माहिती तो माझ्यासाठी काय आहे ते.. एकदा विचार नाही आला का त्याच्या डोक्यात मला काय वाटेल जर तो माझ्या लग्नात नसेल तर.. किती काय काय चाललंय त्याच्या डोक्यात..?? 

विराज रडतच खाली घुडग्यावर बसतो..

अनघा : तो अजुन गेला नाही ना USA ला.. आपण त्याच्याशी बोलूयात. प्लिज तु नको ना रडुस अस..

अनघा विराजला आपल्या कुशीत घेत समजवतच शांत करते..

विराज : आत्ता तर भीती वाटते ग ह्याची. हा काहीही करू शकतो अनु.. विश्वासच उडालाय माझा ह्याच्यावरून..

अनघा : विराज खरच त्याला त्रास होत असेल रे अजुन.. आपल्याला त्याच्याशी बोलल्याशिवाय कस कळेल त्याला काय वाटत ते..

विराज : दोन वर्ष बस नाही का होत.??

अनघा : विराज आपण स्वप्न बघितली एकमेकांसोबत.. आणि आज आपण एकत्र आहोत.. मी तुला उद्या दुसऱ्या कुणाच्या सांगण्यावरून तुझ्यावर नको ते आरोप करून तुला सोडून तुझ्यापासुन लांब निघुन गेली तर तुला सावरायला किती वेळ लागेल.. दोन वर्ष बस होतील?? का एक वर्ष पण बस होईल तुला??

विराज अनघाकडे बघतच रहातो..

अनघा : आहे उत्तर तुझ्याकडे ह्याच..?? नाही ना.. आणि अजुन एक विचार करना.. त्याला एवढा त्रास तेव्हा झालेला की त्याने स्वतःच्या करिअरचा विचार नाही केला त्यावेळेला.. दोन वर्ष बस झाली ना.. हे तुला बोलायला सोप्प वाटत पण कदाचित त्यासाठी तेवढं सोप्प नसेल विराज ते.. त्याच्या जागी तु असतास तर तु काय केलं असतस??

विराज : मी शौर्यसारख अस त्या लोकांपासुन पळून तर नक्कीच नसतो गेलो.. मी जे काही असेल ते समोरा समोर बोलेल आणि क्लीअर करेल.. कारण अस पळुन जाण्याने सगळ्यानाच त्रास होतोय.. शौर्यला, सोबत आम्हाला आणि त्याच्या त्या मित्रमंडळींना पण.

अनघा : तेच त्याला जमत नाही ना.. आपल्याला त्याला फक्त त्या गोष्टीची जाणीव करून द्यायचीय.. तुला कळतंय मला काय बोलायचंय ते??

विराज फक्त अनघाकडे बघतच राहतो..

अनघा : जाऊयात आता शौर्यला भेटायला..आणि हो.. तु अजिबात भडकणार नाहीस हा त्याच्यावर..

विराज काहीही न बोलता आपले डोळे पुसतच गाडीत येऊन बसतो. शांतपणे गाडी ड्राइव्ह करत असतो.. अनघा गाडीत वारंवार त्याला शांत राहायला सांगत असते पण अनघाच्या बोलण्यावर विराज काहीच रिएक्ट होत नसतो..

गाडी येऊन ज्योसलीनच्या घराजवळ थांबते..

विराज शौर्यला आवाज देतच ज्योसलीनच्या घरी आला..

ते लोक वर्ती टेरेसवर प्रॅक्टिस करतायत.. अस ज्योसलीनच्या आईने सांगताच विराज आणि अनघा शौर्यला शोधतच टेरेसवर जाऊ लागले..

विराज तु शांतपणे बोलणार आहेस.. अनघा समजवतच त्याच्या मागे जात असते..

विराज : जेव्हा मी बोलवलेलं ना तेव्हा तु वर्ती यायच. तोपर्यंत इथे ह्या सोफ्यावर गप्प बसायच..

(रॉबिनला सुचना देऊन विराज वर्ती टेरेसवर जाऊ लागला..)

ज्योसलीन : अरे विर तु.. तुम्ही दोघ पण प्रॅक्टिसला येणार होते काय?? शौर्य बोलला नाही काही..

शौर्य : मला नव्हतं माहिती हे दोघे येणार होते ते..

विराज : शौर्य तु तुझा मोबाईल गाडीतच विसरलास तोच द्यायला आलोय..

शौर्य : घरी येणारच होतास ना.. एवढी काय घाई केली.. आणि तुम्ही दोघ तुमच्या कुठल्या तरी मित्राकडे जात होते ना.?? जाऊन आले??

विराज : ते रॉबिन फोन करत होता सारख.. मला वाटलं काही काम असेल म्हणून फोन द्यायला आलो आधी.. आत्ता जातच आहोत मित्राकडे.. 

शौर्य : काय तु पण.. मी जस्ट केला रॉबिनला फोन ह्या ज्योच्या फोन वरून..

विराज : बाय दि वे शौर्य वेडिंगला कोणता डान्स ठरलाय तुझा..

शौर्य : अजुन ठरायचा बाकी आहे.. आणि ते सरप्राईज आहे तुम्हा दोघांसाठी.. अस आम्ही नाही सांगू शकत..

विराज : बर नको सांगु पण तु करतोयस ना आमच्या वेडिंगला डान्स..

शौर्य : बघु..

गाथा : आपण वेडिंगलाच डान्स करतोय ना.

शौर्य : हो बट माझं ठरलं नाही अजुन..

विराज आणि अनघा एकमेकांकडे बघु लागतात..

विराज : बर ते जाऊ दे.. मी तुला सत्तर हजार दिलेले.. त्यातले काही उरलेत का??

शौर्य : हो... म्हणजे नाही..

विराज : हो की नाही..

शौर्य : खर्च झाले विर.. 

विराज : कश्यासाठी लागले एवढे कळेल का मला..

शौर्य : ते मी.. डेकोरेशन वाल्याला दिले...

विराज : सगळे??

शौर्य : नाही म्हणजे ते थोडे उरलेत..

विराज : दे मग ते इथे.. मला हवेत आता..

शौर्य : आत्ता कुठुन देऊ.. आत्ता नाहीत माझ्याकडे.. 

विराज : आपण घरी जाऊन घेऊन येऊयात ना मग.. 

शौर्य : विर पण ते पैसे रॉबिनकडे आहेत.. म्हणजे तोच आत्ता डेकोरेशन वाल्याकडे गेलाय ना पैसे द्यायला..

विराज : पैसे पण त्याच्याकडे दिलेस??

शौर्य : ते म्हणजे.. हो.. म्हणजे.. ते डेकोरेशनच तोच बघत होता ना..

(विराज समोर खोट बोलताना शौर्य आता घाबरत होता)

विराज रागातच शौर्यकडे बघत असतो..

शौर्य : तु अस रागात का बघतोयस??

विराज : तुला माहिती मला खोटं बोललेलं नाही आवडत तरी तु एवढं क्लीअर कट कस खोटं बोलु शकतोस तेच बघत होतो.. तुला जरा पण काही वाटत नाही का शौर्य अस खोटं बोलायला .

शौर्य : तु अस का बोलतोयस विर?? आणि मी खोटं का बोलु??

विराज : पैसे कश्यासाठी घेतलेलेस शौर्य.. मी शांतपणे विचारतोय मला राग नको देऊस.. प्लिज..

शौर्य त्याच्या मित्र मंडळींकडे बघत थोडं घाबरतच विराजकडे बघतो..

कश्यासाठी घेतलेलेस सांग लवकर.. विराज जोरातच शौर्यवर ओरडतो..

शौर्य : डेकोरेशनसाठीच घे...

शौर्य... विराज रागातच एक कानाखाली शौर्यला मारतो..

गाथा : शौर्य... (गाथा घाबरतच जोरातच ओरडते)

तसे सगळे तिच्याकडे बघतात.. गाथा तोंडावर हात ठेवत घाबरतच एकटक शौर्यकडे बघते..

विराज : आत्ता खर सांगतोय का अजुन देऊ तुला.. शौर्यची कॉलर धरतच तो बोलला..

अनघा : विराज प्लिज तु काय करतोयस.. सोड त्याला..

रॉबिन... जरा वर्ती ये... विराज मोठ्याने ओरडतो.. तस रॉबिन विराजच्या पुढ्यात येऊन शौर्यकडे बघत मान खाली घालुन उभं रहातो..

विराज : शौर्य आत्ता तरी सांगतोयस का मी माझं डोकं आपटून घेऊ तुझ्या पुढ्यात ते सांग..

शौर्य : ते मी USA ला जाण्यासाठी घेतलेले पैसे.. 

विराज : म्हणजे तु लग्नात नाहीस..

शौर्य : नाही..

विराज : नक्की..?

शौर्य शांतच बसतो..

विराज : नक्की नाहीस??

शौर्य नकारार्थी मान हलवत नाही बोलतो..

विराज : अनघा ज्या लग्नात माझा भाऊ माझ्या सोबत नसेल ते लग्न मला नाही करायच.. तु श्रीला कार्ड दिलं नसतस तर कदाचित माझा भाऊ हे लग्न अटेंड करू शकला असता.. तुझ्यामुळे त्याला हे लग्न अटेंड करता येत नाही आहे अनघा.. मला नाही करायच तुझ्याशी लग्न.. आणि तुम्ही लोक जी ह्या एक दीड महिन्यापासुन तैयारी करताय ना माझ्या लग्नासाठी तशीच तैयारी परत करा ते सगळं केन्सल करण्यासाठी.. कारण हे लग्न होणारच नाही..

शौर्य : विर प्लिज..

विराज : तु खुश आहेस ना.. उद्याच हवं तर जा USA ला. थांब मी करतो तुझ तिकीट बुक..

अनघा : विर तु काय बोलतोयस कळतंय तुला??

विराज : मी जे बोलतोय ते सगळं मला कळतंय अनघा. तु जाऊ शकतेस इथुन.. मला नाही हे लग्न करायचं.

शौर्य : विर काहीही काय बोलतोस?? वहिनी प्लिज तो रागात बोलतोय. तु लक्ष नको देऊस त्याच्या बोलण्याकडे.

विराज : एक मिनिट मी जे बोलतोय ते पुर्णपणे शुद्धीत बोलतोय.. अनघा तु इथुन गेलीस तर बरं होईल.. प्लिज..आणि सोबत तुझ्या बहिणीला पण ने..

गाथा : जिजु तुम्ही अस कस बोलु शकता.. घरी जाऊन आम्ही मम्मी पप्पांना काय सांगायच?? दि तु समजवना जिजूंना..

गाथा रडतच विराजला बोलु लागली

शौर्य : विर तु माझ्या मुळे वहिनीला का अस बोलतोयस.. 

विराज : तु अजुन इथेच?? गेली नाहीस.. मी जा बोललो ना.

अनघा गाथाला घेऊन गप्प पणे तिथुन जायला निघते..

शौर्य : वहिनी प्लिज नको जाऊस.. मी समजवतो विरला..

शौर्य अनघाची वाट अडवतच तिला बोलतो..

अनघा : शौर्य मला जाऊ दे प्लिज.. 

शौर्य : मी नाही जाऊ देणार तुला अस.. प्लिज तु थांब.. तुला माहिती ना विर रागात काहीही बोलतो ते.. मी समजवतो त्याला.. तो ऐकेल माझं..

अनघा : शौर्य विराजला जस लग्न नाही करायच तस आत्ता मला पण नाही करायच हे लग्न.. ह्याचा स्वभाव रागिष्ट आहे हे माहिती माळ.. पण हा रागिष्ट स्वभाव आज मला नाही पटला.. रागात स्वतःच लग्न कस काय हा मोडु शकतो.. जरा तरी माझा विचार करतो का हा?? आणि प्लिज बाजुला हो मला जाऊ दे.. विराज प्लिज शौर्यला बाजुला घे..

गाथा : दि तु काय बोलतेस कळतय तुला.. प्लिज दोघांनी एकदा बसुन शांतपणे एकमेकांशी बोलुन विचार करा.. प्लिज..

शौर्य जाऊ दे तिला बाजुला हो.. अस बोलत विराज शौर्यचा हात धरतच त्याला बाजुला घेतो... तस अनघा गाथाचा हात पकडतच तिथुन जायला निघते.. गाथा रडतच शौर्य आणि विराजकडे बघत अनघासोबत तिथुन निघुन जाते..

शौर्य : वहिनी प्लिज नको जाऊस.. विर सोड ना मला.. 

विराज : जाऊ दे तिला.. मला नाही करायच हे लग्न.. कळलं तुला..

शौर्य : विर तुला कळतंय तु काय केलंस ते.. तु का नाही कंट्रोल करत तुझ्या रागावर.. काय गरज होती अस काहीही बोलायची.. कस वाटलं असेल तिला जरा तरी विचार करून बोलत जा.. बघावं तेव्हा नुसता राग डोक्यात भरलेला असतो तुझ्या.. 

विराजला जोरातच मागे ढकलत शौर्य त्याला बोलतो..

विराज : शौर्य मला जे वाटत ते मी करेल.. आणि तुम्ही लोक काय बघत बसलायत.. मी लग्न नाही करत आहे.. इथे कसलीच डान्स प्रॅक्टिस होत नाही.. कळलं तुम्हांला.. जावा आपापल्या घरी.. 

विराज पण तिथुन निघुन घरी जाऊ लागतो..

शौर्य : विर.. थांब इथे.. तुला झालं काय आहे?? एवढ ओव्हर रिएक्ट का होतोयस?? जरा तरी कळतंय तु काय वागतोयस ते..?

विराज : मला सगळं कळतंय.. मी काय करतोय आणि काय वागतोय ते.. पण तुला कळत नव्हतं तु काय वागणार होतास ते.. माझ्याशी खोट बोलत होतास तु.. एकदा पण नाही वाटल का मला काय वाटेल जर तु माझ्या लग्नात नसशील तर.. आय नो शौर्य मी सावत्र भाऊ आहे तुझा.. एवढ पण हर्ट होईल अस नको ना वागुस आणि मुळात खोट प्रेम पण नको ना दाखवुस मला.. बाय दि वे तु खुश असशील ना माझं लग्न मोडल म्हणुन.

शौर्य : अस नको ना बोलुस विर.. 

विराज : आणि तुम्ही लोक..अश्या कामात ह्याला मदत करताना जरा पण काही वाटलं नाही का?? ज्यो तु पण ह्या पुढे माझ्याशी कधी बोलायच नाही हा..

विराज रागातच तिथुन निघुन आपल्या घरी येतो.. शौर्य त्याची समजुत काढतच त्याच्या मागे मागे जातो.. पण विराज त्याच बोलणं काही ऐकुन घेतच नसतो..

अनिता पण कुठे तरी जायच्याच तैयारीत असते..

अनिता : अरे विर.. तु एवढ्या लवकर जाऊन आलास पण मित्राकडे..

विराज : मम्मा तु कुठे चाललीयस..??

अनिता : हो हे काय तुझं कार्ड घेऊनच चाललीय..

काही गरज नाही कुठे जायची.. मी नाही लग्न करत आहे.. विराज शौर्यकडे बघतच अनिताला बोलतो..

अनिता : काय बोलतोयस तु हे..?

विराज : मी हे लग्न नाही करत आहे.. हे लग्न मोडलय..

अनिता : काय बोलतोयस तु हे विर..

विराज : जे तु ऐकतेस तेच मी बोलतोय मम्मा.. ह्याच्या त्याच्या घरी जाऊन कार्ड देणं थांबव.. मी नाही करत आहे हे लग्न.. तेच अनघासोबत बोलुन मी इथे आलोय..आणि ह्याला जबाबदार फक्त नि फक्त..

(विराज मध्येच थांबत रागातच शौर्यकडे बघतो)

विराज अस शौर्यकडे बघतो म्हटलं तर नक्कीच शौर्यने काही तरी केलंय म्हणुन अनितापण शौर्यकडे बघु लागते..

अनिता : शौर्य काय झालंय??

विराज : मम्मा मला नाही करायचं हे लग्न.. आणि ह्याला फक्त नि फक्त मीच जबाबदार आहे...

अस बोलत विराज आपल्या रूममध्ये निघुन जातो..

अनिता त्याला आवाज देत असते पण तो काही थांबत नाही..

अनिता : काय झालंय शौर्य??

शौर्य : तो रागात आहे ग थोडं.. तु जा कार्ड द्यायला.. मी बघतो त्याला..

शौर्य अनिताच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तिथे न थांबता सरळ विराजच्या रूममध्ये येतो..

शौर्य : विर तु बोलशील तस करेल पण प्लिज हे लग्न वैगेरे नको मोडूस.. 

विराज : हाच विचार न थोडा आधी करायला हवा होतास शौर्य तु.. 

शौर्य : परत नाही होणार अस सॉरी.. प्लिज चल आपण वहिनीला समजवायला जाऊयात..

विराज : तुझं सॉरी वैगेरे बोलुन झालं असेल तर जाऊ शकतोस तु इथुन.. 

शौर्य : विर नको ना एवढं ओव्हर रिएक्ट होऊस..

विराज : हे तु मला बोलतोयस.. आणि तु करायला जाणार होतास ते काय होत?? बोलत होतो ना तुला मी श्री सोबत बोलतो म्हणून?? बोलत होतो की नाही?? 

हे सगळं बोलत बसण्यापेक्षा तु चल माझ्यासोबत... शौर्य विराजचा हात पकडत त्याला जबरदस्ती घराबाहेर घेऊन जाऊ लागतो.

विराज : शौर्य कुठे नेतोस तु??

शौर्य : वहिनीकडे.. गाडीत बस..

विराज : मला नाही करायचय हे लग्न.. एकदा बोललेलं कळत नाही का तुला..

शौर्य : हे तु नाही हा ठरवायच विर.. आणि माझी चुक आहे.. त्याची शिक्षा तु वहिनीला का देतोयस.. तु बोलशील ते करेल.. ह्यापुढे नाही होणार अस काही प्लिज.. गाडीत बस..

विराज : तुला कळत नाही का मी काय बोललो ते.. का फोर्स करतोयस तु..?? एकदा बोललेलं ऐकायला शिक..दहा वेळा एकच गोष्ट सांगायला नको लावुस मला..

तुला कळत नाही का मी काय बोललो ते.. गाडीत बस विर.. शौर्य रागातच विरला बोलतो..

शौर्य जबरदस्ती विराजला गाडीत बसवत अगदी वेगाने अनघाच्या दिशेने गाडी पळवतो..

शौर्य : विर तु राग का नाही कंट्रोल करत.. आणि एवढं लग्न वैगेरे नाही करणार बोलायची काय गरज होती तुला.. 

विराज शौर्यसोबत काहीच बोलत नाही..

शौर्य : विर मी तुझ्याशी बोलतोय.. प्लिज बोल काही तरी.. आणि वहिनीला सॉरी बोलणार आहेस तु.

विराज गाडीत शांतच बसतो..

गाडी अनघाच्या घराजवळ येऊन थांबते..

शौर्य गाडीतुन उतरून बाहेर येतो.. विराज मात्र गाडीतुन उतरायच काही नाव घेत नाही हे बघुन शौर्य स्वतः त्याच्या जवळ असलेला डॉर ओपन करत त्याला बाहेर उतरवतो..

शौर्य : विर तु बोलशील तस करेल पण प्लिज आत जाऊन वहिनीला सॉरी बोल.. 

शौर्य विराजचा हात पकडत त्याला अनघाच्या घरी घेऊन येतो..

या तुमचीच वाट बघत होतो मी.. विराज आणि शौर्यला घरी आलेलं बघुन अनघाचे वडील बोलतात.

त्यांच्या चेहऱ्यावरचा राग बघुन विराज शौर्यकडे बघतो..

विराज : अनघा??

अनघाचे वडील : अजून काही बोलायच बाकी आहे का??

विराज : मला एकदा अनघाला भेटायचंय.. प्लिज

अनघाचे वडील : तिला तुम्हाला भेटायची इच्छा नाही आणि मुळात ती इथे नाही आहे..

शौर्य : कुठे गेली??

अनघाचे वडील : ते तुम्हाला मी नाही सांगु शकत. 

शौर्य : अस कस नाही सांगु शकत..??

अनघाचे वडील : लग्न मोडल ना तुम्ही लोकांनी.. मग आता अजुन काय हवंय.. प्लिज मला जास्त बोलायला नका लावु..

शौर्य : मला माहिती माझी चुक झाली पण एकदा मला वहिनीला भेटु द्या.. प्लिज मी तुमच्या पाया पडतो..

अनघाचे वडील : मी तुम्हांला हवं तर रिक्वेस्ट करतो पण माझ्या मुलीला अजुन त्रास नका देऊ.. प्लिज..

विराज : शौर्य चल इथुन..

शौर्य : वहिनीला भेटल्याशिवाय मी नाही येणार कुठे..

विराज : झाला तेवढा तमाशा पुरे झाला शौर्य चल इथुन.. तुला ऐकायला नाही आलं का मी काय बोललो ते..

अनघाचे वडील : आणि परत इथे येऊन माझ्या मुलीला त्रास नका देऊ.. एक बाप म्हणुन रिक्वेस्ट करतो...

अनघाचे वडील दोन्ही हात धरतच शौर्य आणि विराजला बोलु लागले..

विराज शौर्यचा हात पकडत त्याला तिथुन घेऊन जाऊ लागला.. 

एकदा वहिनीला भेटु द्या प्लिज.. अक्षरशः अनघाच्या घरातुन बाहेर पडे पर्यंत शौर्य अनघाच्या वडिलांना रिक्वेस्ट करत राहतो पण ते त्याच काहीच ऐकुन घेत नाही..

(आता पुढे काय?? खरच हे लग्न होणार नाही?? पाहूया पुढील भागात.. हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all