अतरंगीरे एक प्रेमकथा भाग 67

In marathu

विराज शौर्यला घेऊन ठरल्याप्रमाणे अनघा आणि गाथाला पिकअप करायला जातो.. 

विराज : तु ठरवलस का?? तु काय घालणार लग्नात ते..

शौर्य : ऑफ कोर्स... येस.. 

विराज : ग्रेट.. आणि तुझ्या बाकीच्या गेंगना पण त्यांना पाहिजे तसे कॉश्क्युम घे माझ्या कडुन.. खुप मदत केलीय त्यांनी.. आणि अजुनही करतायत..

शौर्य : तु सांगायच्या आधी झालंय हे सगळं करून..

विराज : तुझे सगळे प्लॅन आधीच तैयार असतात.. आणि मुळात टाइम मॅनेजमेंट पण तुला खुप छान जमत.. मला अस वाटत ना बर झालं मम्माने त्यावेळेला तुला सायन्स फिल्डमध्ये न जाऊ देता कॉमर्स फिल्डमध्ये घातलं ते.. तु बिजीनेस मेन म्हणुन परफेक्ट आहेस.. खुप इजिली मॅनेज करायला जमेल तुला तुझा बिजीनेस

शौर्य : एक मिनिट आय एम नोट इंटरेस्टेड इन बिजीनेस.. 

विराज : तस मला पण इंटरेस्ट नव्हता बिजीनेसमध्ये.. बट एकदा त्यात घुसलास की हळुहळु येऊ लागतो..

शौर्य : तु आणि मम्मा मिळुन ह्या दोन कंपन्या मर्ज का नाही करत?? म्हणजे तु आणि वहिनी मिळुन सांभाळाल तिचा बिजीनेस..

विराज : आणि तु काय करणार..??

शौर्य : जे ठरवलेलं ते नाही करता आलं मला.. आणि जे मम्मा ने माझ्यासाठी ठरवलंय ते मला करता येईल अस नाही वाटत.. आणि इथुन पुढे काय करायच ते पण नाही ठरलंय माझं.. आणि समजा जरी मी काही ठरवल आणि ते तुम्हाला जर सांगितलं तर तुम्ही लोक ते थोडी ना मला करू द्याल.. नुसतं स्वतःचे डिसीजन माझ्यावर टाकुन मोकळे होता तुम्ही दोघे पण.. 

विराज : तु अस का बोलतोयस..?? तुझ्या चांगल्यासाठीच मम्मा सर्व काही करते.. आणि 2 वर्षांनी तुलाच इथे येऊन तिची कंपनी सांभाळायची आहे.. हे जरा डोक्यात फिट करून USA ला जा...

शौर्य : मी इथे आलो तर ना..

विराज : म्हणजे??

तुला नाही कळणार.. अस बोलत शौर्य गाडीत म्युसिक ऑन करतो..

विराज : तुला ना चांगला मुड खराब करायला अगदी सहज येतो ना??

शौर्य : विषय तु काढलास ब्रो.. आणि तसही आता वहिनी आली की तुझा मुड होईल चांगला..

विराज : आणि तुझा पण..

शौर्य : तुला बोलायच काय आहे..??

विराज : रॉबिन आणि तुझं काय चालल असत हे न कळायला मी मूर्ख नाही शौर्य..

शौर्य : तु अजुन एक एड झालास त्यांच्यात.. 

विराज : ए शौर्य बट खर खर सांग.. कशी वाटते तुला गाथा..??

शौर्य एक खोल श्वास घेतो.. आणि विराजकडे बघतो

शौर्य : मला अजुन पण समीराच आवडते.. 

विराज : आर यु मॅड शौर्य.. आणि मुळात ती तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे.. 

शौर्य : ते मी ठरवेल ना विर.. आणि तु किती काहीही बोललास तरी पण मला तीच आवडते..

विराज : त्यादिवशी तर बोलत होतास आता परत नकोय ती लाईफमध्ये..

शौर्य : अस बोलून थोडी ना होत.. मला अजुनही तीच आवडते.. पहिलं प्रेम आहे.. नाही विसरू शकत.. 

विराज गाडीचा यु टर्न घेतो..

शौर्य : तु यु टर्न का घेतोयस..?? वहिनीच घर तर त्याच वे ला आहेना..

विराज : हो माहिती मला.. पण तुझ्या समीराच घर तर ह्या वे ला आहे ना.. आपण श्री कडे जाऊयात.. समीरा पण भेटेल तुला. तिला घेऊनच शॉपिंगला जाऊयात..

शौर्य : वेडा आहेस का?? थांबव इथे गाडी..

विराज : का?? काय झालं?? पहिलं प्रेम आहे.. भेटुन तर घे.. 

शौर्य : विर प्लिज गाडी थांबव हा.. 

विराज : दोन वर्षांनी भेटाल तुम्ही.. बघु तर दे.. दोन वर्षांनी तुला बघुन तिला किती आंनद होतो ते.. आणि हाता बरोबर श्री ला पत्रिका पण देतो.. आणि तुम्हां दोघांच्या लग्नाची बोलणी पण करूयात.. दोन वर्षा आधीच.. म्हणजे जस तु दोन वर्षाआधी पासुन माझ्या लग्नाच प्लॅनिंग करत होतास तस मी तुझ्या करतो..

शौर्य : विर त्रास देतोयस तु मला... का अस वागतोस..?? प्लिज गाडी थांबव बघु साईडला..

विराज : तुला अजुन पण आवडते ना समीरा मग तु तर खुश व्हायला हवा ना. तिलाच तर भेटायला जातोय आपण.. आणि उलट मी तुम्हां दोघांना परत एकत्र आणतोय तरी तु मला अस कस बोलु शकतोस मी तुला त्रास देतोय म्हणुन..

शौर्य : मी आता ह्या चालत्या गाडीतुन उडी मारेल हा विर.. तु जर गाडी थांबवली नाहीस तर.. 

शौर्य गाडीचा डॉर ऑपन करतच बोलला.. तस विराज गाडी थांबवतो..

विराज : हे बघ शौर्य.. तुझ्या लाईफचा डिसीजन तु घे.. पण समीरा तुझ्यासाठी योग्य आहे अस मला अजिबात नाही वाटत.. ती ह्या दोन वर्षात तुला भेटायला USA ला आरामात येऊ शकत होती आली का ती..?? इव्हन एकदा वृषभने फोन केलेला मला.. तेव्हा तोच बोलला होता की तु सनी कॉलेजला आहेस हे त्या लोकांना माहिती.. छान डान्स करतोस.. तुझं कौतुक करत होता.. त्याला माहिती म्हणजे समीराला पण माहिती असेल.. जर समीराला तु कुठे आहेस?? तुझं कॉलेज कुठल?? हे सगळं माहीत आहे तर ती तिथे जाऊच शकत होती ना.. जर तीच खरच तुझ्यावर प्रेम असत तर.. पण तिने प्रत्येक वेळेला प्रूफ केलय शौर्य की तुझ्यासाठी काहीच नाही करू शकत. 

शौर्य : एक मिनिट तुझा नंबर वृषभकडे कसा आला??

विराज : ते लास्ट टाईम ती लोक आपल्या घरी आलेले तेव्हा मी त्या लोकांसोबत थोडं रुडली बोललो होतो.. म्हणजे मी त्यांना फक्त ती लोक चूक आहेत हेच दाखवुन दिलं आणि एवढ्या लांब ते लोक तुझ्यासाठी आलेले. ती लोक नीट घरी गेली की नाही हे बघणं आपलं काम होत.. म्हणुन मीच ज्योकडुन वृषभचा नंबर घेऊन त्याला फोन केलेला.. आणि मुळात माझं प्रेम आहे अस बोलून प्रेम होतं नाही शौर्य... तिने तुला समजुन घ्यायला हवं होत.. आणि समीरा इतकी पजेसिव्ह आहे की ज्योला पण फोन करून नको ते बोललीय.. हे मी आणि ज्योने तुला अजुन पर्यंत सांगितलं नाही. तुला अजुनही तीच आवडत असेल तर चल आत्ता जाऊनच भेटुयात तिला..

शौर्य : ते तु मला गाथा वरून परत चिडवु नये म्हणुन बोललो मी मगाशी.. आणि मला माहिती त्या लोकांना मी सनी कॉलेजला आहे ते माहिती ते.. इव्हन माझ हॉस्टेल पण.. एक दिवस त्या लोकांनी फोन केलेला मला माझ्या हॉस्टेलवर.. पण मी नाही बोललो त्यांच्याशी.. पण मी रिसेप्शनिस्ट कडुन नंतर लेंडलाईनवर आलेला नंबर घेऊन नैतिकला दिलेला.. चेक करायला.. तर तो रोहनचा होता.. पण त्या दिवसा नंतर मी समीराची वाट बघत होतो.. म्हणजे मला अस वाटत होतं.. समीराला एक संधी द्यावी.. आणि अस आतुन फिल होत होतं की ती येईल माझ्यासाठी बट ती नाही आली.. वृषभ, राज आणि टॉनीच मी समजु शकतो.. ते तिघ ऍफोर्ड नाही करू शकत तिथे येण.. पण रोहन आणि समीरा मात्र सहज येऊ शकत होते.. आणि अजुन एक समीरा नाही आवडत तस गाथा पण नाही आवडत.. तुम्ही लोक प्लिज मला गाथा वरून चिडवन थांबवा.. मी त्या रॉबिन आणि नैतिकला सांगुन सांगुन थकलोय.. पण ते दोघ काही ऐकत नाही.. सगळ्या भाषेत सांगुन बघितलं त्या दोघांना.. प्रेमाने, रागात आणि मारून पण बघितलं पण दोघांच आहे तेच आहे.. तु तर भाऊ आहेस ना विर.. तु तरी माझ्या फिलींग समजुन घे.. आणि स्टॉप दिस टॉपिक हिअर..  

विराज : मला तुला लाईफ टाईम हॅप्पी राहिलेलं बघायचंय शौर्य.. समीरा तुला हॅप्पी ठेवेल अस नाही वाटत.. तुला गाथा नाही आवडत इट्स ओके.. पण समीरा पण नको.. 

शौर्य विराजच्या बोलण्यावर काहीच रिएक्ट होत नाही.. कारण त्यालाच कळत नसत की त्याला नक्की काय करायचय ते..

विराज पुन्हा गाडी वळवत अनघा आणि गाथाला पिकअप करायला जातो..

नेहमीच्या जागी अनघा आणि गाथा उभे असतात.. पण आज त्यांच्यासोबत सर्वेश पण असतो..

विराज : आज साले सहाब पण आहेत सोबत..

शौर्य : सर्वेश ना हा... 

शौर्य अस बोलताच विराज त्याच्याकडे बघु लागतो..

विराज : गाथा ने सांगितलं का??

शौर्य : हो..

विराजची गाडी दिसताच तिघे गाडीत येऊन बसतात..

सर्वेश : हाय जिजु.. गुड इव्हीनींग कसे आहात..??

विराज : मी मस्त.. तु कसा आहेस?? आणि व्हेकेशन एन्जॉय करतोयस की नाही..

सर्वेश : तस करतोय एन्जॉय.. पण दि ने पण मध्येच लग्नाचा गोंधळ घातला म्हणुन थोडं व्हेकेशन माझं बिजी झालं.. बट इट्स ओके दि साठी इतना तो बनता हे बोस.. काय दि.. बरोबर ना..

अनघा हसतच त्याला हो बोलते..

विराज : हा माझा भाऊ शौर्य.. 

शौर्य : हेय ड्युड...

शौर्य पाठी वळुन सर्वेशला हात मिळवतच बोलला.. सर्वेश पण त्याला हात मिळवतो..

सर्वेश : तुम्हांला काय बोलु मी..

शौर्य : शौर्यच बोल आणि मला अस अहो जाओ करणार असशील तर माझ्याशी अजिबात बोलु नकोस.. तु फक्तना तुझ्या ह्या जिजूंनाच कर अहो जावो. मला नको.. मला नाही आवडत..

सर्वेश : जिजु चालेल ना तुम्हांला..?? तुमच्या भावाला अस अरे तुरे केलेलं..

शौर्य : त्याला काय विचारतो. मी बोलतोय ना..

विराज : तुम्ही दोघ ठरवा काय ते मला नका घेऊ मध्ये..

सर्वेश : बाय दि वे तुझ्या केसांचा लुक मस्त ठेवलायस.. 

शौर्य : थेंक्स..

विराज ड्राइव्ह करता करता एक नजर शौर्यकडे फिरवतो.. शौर्यपण विराजकडे बघत आपली एक भुवई उडवतच त्याला चिडवु लागतो..

सर्वेश : दि मला पण माझ्या केसांचा असाच लुक ठेवायचा....

अनघा : ओके..

सर्वेश : हे शौर्य.. तुझी शॉपिंग झाली??

शौर्य : हो कधीच.. आणि तुझी..??

सर्वेश : आजच करेल.. तु मला हेल्प करशील..??

शौर्य : हो करेल ना.. त्यात काय एवढं..

सर्वेश : म्युसिक सिस्टीम बंद आहे का गाडीतली..??

गाथा : सर्वेश किती बोलतोयस तु.. जरा तरी शांत बस ना.. 

सर्वेश : ते काय असत..?? 

गाथा : दि म्हणुन मी ह्याला नको बोलत होती.. 

सर्वेश : दि म्हणुन मी हिच्यासोबत कधी बाहेर येत नाही.. माणसाने कस हसत खेळत मस्त पैकी गप्पा गोष्टी करत रहावं.. वेळ लगेच निघुन जातो.. हो ना जिजु तुम्हांला काय वाटत..??

शौर्य : तु पण कोणाला विचारतोयस सर्वेश..??

शौर्य विराजकडे बघत हसतच त्याला बोलतो..

विराज : तुला काय बोलायच मी हसत वैगेरे नाही का??

शौर्य : मी कुठे अस बोललो.. ते तर तूच आत्ता बोलतोयस..

विराज : अनघा हा शौर्य म्हणजे सर्वेशची कार्बन कॉपी आहे.. हा पण आधी असाच होता..

शौर्य : थेंक्स फॉर दि कॉम्प्लिमेंट.. बाय दि वे सर्वेश काय करतोस तु..??

सर्वेश : तस मला हवं ते मी सगळच करतो.. पण सध्या जस्ट FYJC ची एक्साम दिलीय.. 

शौर्य : सायन्स की कॉमर्स??

सर्वेश : कॉमर्स.. आणि तु..

शौर्य : मी पण तस कॉमर्स स्टुडंन्टच आहे.. बट सध्या न्यूयॉर्कला असतो.. विरच्या लग्नासाठी आलोय इथे..

सर्वेश : ग्रेट.. मला पण जायचय अस आउट ऑफ इंडिया शिकायला.. 

विराज : गाथा तुला नाही जावस वाटलं कधी आउट ऑफ इंडिया??

गाथा : अजिबात नाही.. मला जे शिकायचं होत ते माझ्या ह्या इंडियामध्ये आहे.. आणि मेन म्हणजे मला माझ्या फेमिली शिवाय रहायला नाही जमणार एवढ्या लांब.. 

सर्वेश : ही आमची माई अशीच आहे.. पप्पा हिला पण शिकायला पाठवत होते.. पण नाही गेली..

शौर्य : गुड डिसीजन गाथा.. म्हणजे मला पण आधी असच वाटायच.. इंडियातच शिकाव..

सर्वेश : एक मिनिट.. पण तु स्वतः दुसऱ्या देशात शिकतोयस..

शौर्य शांतच बसतो..

विराज : तो USA जातच नव्हता.. पण काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात ना तस झालं शौर्यच.. पण आता तिथे गेल्यावर इथं यावस नाही वाटत त्याला..

शौर्य : तुमच कार्ड वाटप झालं का चालू??

(शौर्य टॉपिक चेंज व्हावा म्हणुन बोलतो)

अनघा : हो म्हणजे पप्पा, मामा आणि आमचे काका मिळुन करतायत.. विराज आणि मी मिळुन आमच्या मित्र मंडळींना द्यायला जाऊ कार्ड.. अरे कार्ड वरून आठवल विराज मी तुला सांगायलाच विसरली.. पर्वा मी आणि गाथा मॉलमध्ये गेलेलो तेव्हाय प्रीती आणि श्री भेटला मला.. दोघेही शॉपिंगसाठी आलेले तिथे.. 

विराज : तु त्याला सांगितलंस का आपण नेक्स्ट मंथमध्ये लग्न करतोय ते..??

अनघा : हो मग काय?? मी हाताबरोबर कार्ड पण दिलं. नशीब गाथाच्या बेगेत होत कार्ड .. म्हणजे तस पण मी प्रीतीला आधीच सांगितलं होतं आपण लग्न करणार आहोत ते.. पण ते सोड.. प्रॉब्लेम असा आहे की... श्री बोलला की त्याच्या मामे भावाच पण त्याच दरम्यान लग्न आहे.. तो आणि त्याची पूर्ण फेमिली गावी असेल तेव्हा.. बाकीच्या फंक्शनला ते लोक इथे नसतील पण वेडिंगला आणि रिसेप्शनला न चुकता येतील आपल्या.. आणि तो तुझ्यावर नाराज आहे.. तु त्याला साद फोन करून पण कळवलं नाहीस म्हणुन..

विराज गाडीला जोरात ब्रेक मारतच गाडी मध्येच थांबवतो.. आणि तो शौर्यकडे बघतो... 

शौर्य नाराज होतच खिडकी बाहेर बघत असतो..

अनघा : गाडी का थांबवलीस तु??

विराज : तु का त्याला कार्ड दिलंस अनघा?? एकदा विचारायच तरी ना?? आणि मी पण विसरलो तुला सांगायला..

शौर्य : विर प्लिज.. उशीर होतोय आपल्याला..

अनघा : काय झालं?? 

विराज : श्री ला इंव्हीटेशन नव्हतं द्यायच होत..

शौर्य : विर तु गाडी ड्राइव्ह करतोस का मी करू..?? आणि आता दिलं ना तिने इंव्हीटेशन.. मग इट्स ओके.. तु पण जाऊन देऊन ये.. 

अनघा : पण कार्ड दिलं तर काय झालं..??

विराज : नंतर बोलतो..

शौर्य : विर काही गरज नाही हा ह्या टॉपिकवर नंतर पण बोलायची.. ओके.. आणि साडे सहा वाजलेत प्लिज लवकर कर..

अनघा आणि गाथा एकमेकांकडे बघत विराजकडे बघतात... दोघींना काय झालं ते कळतच नसत..

शौर्य : सर्वेश तु पण येणार मंडे पासुन आमच्या सोबत डान्स प्रॅक्टिसला??

सर्वेश : मला आवडलं असत.. पण डान्स मधला D पण नाही येत मला.. तु शिकवणार असशील तर मी येतो..

शौर्य : बस काय.. तेवढ करेल मी तुझ्यासाठी..

सर्वेश : दि जाऊ??

अनघा : तुला हवं तर जा..

शौर्य : उद्या भेटुन आम्ही गाणी फायनल करू  आणि मंडे पासून प्रॅक्टिस.. तस पण उद्या गाथा येणार आहेस ना.. ज्यो बोलली मला..

गाथा : हो म्हणजे येतेय मी उद्या.. पण सकाळी ठरलयना ना आपलं.. सर्वेश हवं तर तु उद्या चल माझ्यासोबत. 

सर्वेश : बर ठिक आहे..

विराज गाडी एकीकडे पार्क करतो.. सगळे गाडीतुन उतरून शॉपिंग करू लागतात.. शौर्य विराजसोबत सर्वेशला पण कॉश्क्युम निवडायला मदत करत असतो.. जवळ पास दोन अडीच तासाने शॉपिंग आटोपते.. तसे सगळे परत घरी जायला निघतात.

विराज नेहमीप्रमाणे तिघांना ड्रॉप करून आपल्या घरी जायला निघतो..

शौर्य डोळे मिटुन गाडीत शांत बसून असतो..

विराज : शौर्य माझ्या डोक्यातच आलं नाही यार की तो श्री अनघाचा पण मित्र आहे.. प्लिज सॉरी..मी घरी गेल्या गेल्या त्याच्यासोबत बोलतो..

शौर्य : इट्स ओके विर.. येऊ दे त्याला.. मी तुला आधी पण बोललो ना.. तु नको काळजी करू.. जे करायच ते मी करतो.. तु फक्त लग्न एन्जॉय कर.. मला नाही काही वाटत आहे.. श्री येऊ दे नाही तर कोणी पण येऊ दे.. मी कुठे असणार तिथे.

विराज : म्हणजे??

शौर्य : मी त्यांच्यासमोर नाही येणार.. तु नको काळजी करू.. आणि मला अस वाटत तु पण कार्ड देऊन ये आता..

विराज शांतपणे गाडी ड्राइव्ह करतो.. गाडी घराबाहेर येऊन थांबते..

रात्री जेवण वैगेरे आटोपुन अनघा गाथाच्या रूममध्ये बसुन असते.. दोघीही मगाशी गाडीत दोघा भावांच काय चालु असत ह्यावर डिस्कस करत असतात.. शेवटी न राहवुन अनघा विराजला फोन लावते...

विराज : चक्क एवढ्या रात्री तु मला फोन केलास.. जास्तच आठवण येते की काय??

अनघा : ती तर येतच असतेरे.. पण मला सांग.. श्री ला कार्ड दिलं म्हणुन तु माझ्यावर अस भडकलास का??

विराज : अग अनघा... समीरा जिच्यावर शौर्य प्रेम करत होता ती दुसरी तिसरी कोणी नसुन आपल्या श्रीची सख्खी बहीण आहे.. तो USA वरून आलेला त्यादिवशी आमची त्याच कारणावरून भांडण झालेली. तो त्यादिवशी पासुन माझ्या पाठी लागलेला की तु श्री ला कार्ड देणार नाहीस.. मी त्याला समजवुन पण सांगितलं पण ऐकत नाही म्हटलं तर भडकलो पण त्याच्यावर पण तरी तो ऐकायला तैयार नव्हता. मग नंतर मी काही ऐकत नाही म्हटल्यावर तो कस बस तैयार झाला.. पण मग मीच ठरवलं की श्री ला कार्ड नको द्यायला.. कारण शौर्य अजुन मेंटली प्रिपेर नाही त्या लोकांसमोर जायला अस मला वाटत होतं.. श्रीला कळलं मग समीराला पण कळेल आणि सोबत त्याच्या मित्रमंडळींना पण.. म्हणुन मी श्रीलाच कार्ड न द्यायचा विचार केला.. 

अनघा : तु मलाही आधी का नाही सांगितलं विराज.. मुळात ही गोष्ट तु एवढी लाईटली कशी काय घेऊ शकतोस..??

विराज : सॉरी पण माझ्या लक्षात नाही ना ग आलं की तु त्याला कार्ड देशील ते. पण आता तस काही वाटत नाही ग.. म्हणजे शौर्य स्वतः दोन तीन दिवसांपासून मला फोर्स करतोय की मी श्री ला कार्ड द्याव.. बहुतेक त्यालाच अस वाटतंय की श्री ने लग्नात यावं..

अनघा : नक्की ना?? नाही म्हणजे हवं तर मी श्री सोबत बोलते..तस तो समजूतदार आहे..आपला प्रॉब्लेम समजेल तो..

विराज : नाही नको.. मी पण जाऊन देऊन येतो त्याला कार्ड.. शौर्यच बोलला मला दे म्हणुन..

अनघा : बर.. बघ कस काय ते आणि कळव मला.. बाय..

इथे अनघाने फोन ठेवल्या ठेवल्या गाथा तिला विचारत असते नक्की काय झालं ते..

अनघा शौर्यच्या आयुष्यात घडलेला घटनाक्रम जसा विराज तिला सांगायचा अगदी तसाच ती गाथाला सांगते.. गाथा एकटक अनघाकडे बघतच रहाते..

अनघा : खुप त्रास सहन केलाय त्याने.. 

गाथा : बापरे.. एवढं सगळं कसं सहन केल असेल ग त्याने.. म्हणजे एका हसऱ्या चेहऱ्यामागे एवढं दुःख असेल ह्याचा विचारच करवत नाही मला.. 

अनघा : मी तर हा प्रसंग घडुन गेल्यानंतर लगेच एक दोन आठवड्याने त्याला भेटली तेव्हा मला पण त्याच्याकडे बघुन अस वाटलं नाही की खरच विराज ज्या शौर्यबद्दल सांगत होता तो हा शौर्य असेल.. बट आता अजून त्रास नको व्हायला त्याला. आणि मेन म्हणजे तो खुप गोष्टी मनात ठेवतो म्हणुन त्याला त्रास होतो..

रात्र खुप झाल्यामुळे अनघा आपल्या रुममध्ये निघुन जाते पण गाथा मात्र शौर्यचाच विचार करत रहाते..

★★★★★

दुसऱ्यादिवशी ठरल्याप्रमाणे गाथा सर्वेशला घेऊन ज्योसलीनच्या घरी हजर असते.. शौर्य आधीपासूनच तिथे असतो..

शौर्य : हाय ड्युड व्हाट्सएप..

सर्वेशला हाय फाय देतच शौर्य विचारतो..

सर्वेश : आय एम गुड...

गाथा : गुड मॉर्निंग शौर्य..

शौर्य : गुड मॉर्निंग..

गाथा : बाकीची मंडळी कुठेत..??

तोच ज्योसलीन किचनमधून चहा घेऊन येते..

ज्योसलीन : हेय गाथा.. तु पण आलीस.. मम्मा अजुन दोन कप चहा दे..

गाथा : नाही नको.. आम्ही जस्ट ब्रेकफास्ट करून निघालो..

शौर्य : मग ज्यूस वैगेरे??

गाथा : नाही नको..

सर्वेश : मला चालेल ज्युस..

शौर्य : गुड.. मी आणतो...

गाथा : सर्वेश..  (गाथा रागातच सर्वेशकडे बघत बोलते)

शौर्य : नको ना ग भडकुस त्याच्यावर.. आपलंच घर आहे हे. थांब मी घेऊन येतो तुझ्यासाठी ज्युस.. 

शौर्य आत जाऊन सर्वेशसाठी ज्यूस वैगेरे घेऊन येतो.. आणि त्याच्या बाजुलाच बसुन त्याच्यासोबत गप्पा मारत बसतो..

गाथाला अनघाने सांगितलेला शौर्यच्या बाबतीतला प्रसंग आठवतो. ती एकटक सर्वेश सोबत हसत असणाऱ्या शौर्यकडे बघत बसते.. 

ज्योसलीन : गाथा इथे येऊन बस ना तु अशी उभी का आहेस..

ज्योसलीनच्या आवाजाने ती भानावर येते.. आणि तिच्या बाजुला जाऊन त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकत बसते.

शौर्य : चहा घे ना तु पण..

गाथा : खरच नको..

शौर्य : हे तर तु घेऊच शकतेस..

बिस्किटांनी भरलेला ट्रे गाथा पुढे धरत शौर्य तिला बोलतो..

गाथा शौर्यला थेंक्स बोलत त्याने तिच्या पुढे धरलेल्या ट्रे मधलं एक बिस्कीट उचलते..

गाथा : बाकी दोघे कुठेय??

शौर्य : येतील.. 

ज्योसलीन : तु लिस्ट आणलीस का ठरवलेल्या गाण्यांची..

गाथा : हो ही बघ..

गाथा आपल्या गाण्याची लिस्ट ज्योसलीनच्या हातात देते.. आणि ज्योसलीन शौर्यच्या..

शौर्य : तु माझ्याकडे का देतेस..?? तुम्हीच ठरवाना काय ते.. आणि मी फक्त एक तास आहे.. मला निघायचय..

गाथा : कुठे??

शौर्य : तु पण येतेस का सोबत.. गेट बनवायला दिलाय ना.. फक्त तो बघुन यायचाय.. आणि एकदा रिसॉर्टला जाऊन कुठे काय करायचं ते डेकोरेशन वाल्याला सांगुयात.. मोजुन 25 दिवस राहिलेत लग्नाला..नंतर वेळ नाही मिळणार ह्या गोष्टीत लक्ष द्यायला..

गाथा : मला चालेल..

सर्वेश : मी पण येऊ..?

शौर्य : विचारतोस काय?? चल.. ज्यो तु पण चल ना सगळेच जाऊयात??  

ज्योसलीन : चालेल चल..

गुड मॉर्निंग.. आर्यन धापा टाकतच बोलला..

तोच त्याच्या पाठून नैतिक येतो धापा टाकत.. गुड मॉर्निंग...

ज्योसलीन : कुत्रा वैगेरे पाठी लागलेला की काय तुमच्या?? असे पळत का आलेत??

आर्यन : रेसिंग लावलेली दोघांनी.. 

शौर्य : किती लेट यार.. या बसा लवकर.. आणि प्लिज गाणी फायनलाईज करा.. 

ज्योसलीन : चहा घेणार की थंडा..??

नैतिक : फक्त पाणी..

आर्यन : मला पण..

ज्योसलीन : मम्मा पाणी आण ग..

शौर्य : आंटीला का त्रास देतेस सारख.. स्वतः काम कर ना जरा.. कस व्हायच ग रॉबिनच.??

ज्योसलीन : तिथे पण कामवाली आहे..

शौर्य : पण तुझी कामवाली कुठेय आज?? अजुन आली नाही ती..

ज्योसलीन : सुट्टीवर आहे ती.. त्या लोकांना पण व्हेकेशन हवं असत..

शौर्य : तुझा चहा पिऊन झाला असेल तर ठेव तो कप इथे ट्रेमध्ये. मी ठेवुन येतो.. आणि पाणी पण घेऊन येतो ह्या लोकांना. तु गाणी डीसाईड कर लवकर. 

गाथा आणि सर्वेश शौर्यच वागणं बघतच रहातात..

नैतिक : शौर्य मला ज्युस पण हवाय..

आर्यन : मला पण. पण त्या आधी पाणी आण..

शौर्य : आणतो..

ज्योसलीन : शौर्य घेऊन येतोय म्हटलं तर झाली का ऑर्डर द्यायला सुरुवात त्याला..??

आर्यन : मज्जा येते ग त्याला अस त्रास द्यायला.. बाय दि वे हा कोण??

गाथा : सर्वेश..

नैतिक : म्हणजे तुझा छोटा भाऊ ना..?? त्यादिवशी ह्यालाच यायच होत ना प्रिवेडिंग शूट साठी..

सर्वेश : हो बट मी उठलोच नाही लवकर..  

आर्यन : हाय मी आर्यन.. 

नैतिक : आणि मी नैतिक..

दोघेही सर्वेशला हात मिळवतच बोलले..

शौर्य दोघांसाठी पाणी आणि सोबत ज्युस घेऊन येतो..

शौर्य : झाली का गाणी डीसाईड??

गाथा : हो बट तु एकदा चेक कर.. 

गाथा शौर्यच्या हातात कागद देतच बोलली..

मला तर ओके वाटतायत.. शौर्य गाणी चेक करतच बोलतो..

शौर्य : आर्यन गाणी एकदा बघ. सध्या तरी हीच कर डाउनलोड मग आपण उद्या नाही तर पर्वा रात्री माझ्या घरी बसुन एडिट करूयात.. 

नैतिक : अजुन काय बाकी आहे..

शौर्य : मॅन काम तर रॉबिनच आहे यार.. नको त्या वेळेला गोवा वैगेरे जातो..

ज्योसलीन : येईल रे तो मंडेला..

शौर्य : बर.. निघुयात का आपण??

नैतिक : कुठे??

शौर्य : रिसॉर्टवर..

गाथा : शौर्य अजुन एक काम होत तुझ्याकडे दि आणि जिजूंचे जुने फोटो असतील तर आपण एंगेजमेंटच्या दिवशी ते एन्ट्री करतीलना तिथे लावु.. माझ्याकडे तसे आहेत थोडे.. तुझ्याकडे असतील तर बर होईल..

शौर्य : आयडिया छान आहे. 

गाथा : हे आमच्या सर्वेशच डोकं.. बट तुझ्याकडे आहेत का फोटो??

शौर्य : सॉरी बट माझ्याकडे नाहीत.. विरकडुन मागावे लागतील..

सर्वेश : त्यांना कळु नाही द्यायच.. आम्ही तर गपचुप घेतले दि च्या मोबाईलमधुन..

शौर्य : विरचा मोबाईल तर लॉक असतो.. तरी बघतो ट्राय करून..

गाथा : ओके.. मग एकत्रच ते प्रिंटिंगला देऊयात..

शौर्य : बर.. आता निघुयात?? मी गाडी घेऊन येतो..

सगळेच रिसॉर्टमध्ये जायला निघतात..

सर्वेश : लांब आहे का रिसॉर्ट..

(गाडीत बसुन अर्धा तास होतो तसाच सर्वेश बोलतो)

आर्यन : रिसॉर्ट हे लांबच असतात..

शौर्य : तुला काही हवंय का??

सर्वेश सगळ्यांकडे बघत हळुच आपली करंगळी शौर्यला दाखवतो..

शौर्य पब्लिक टॉयलेट बघुन तिथे गाडी पार्क करतो.. सर्वेश पटकन जाऊन फ्रेश होऊन पुन्हा गाडीत येऊन बसतो..

सर्वेश : थेंक्स शौर्य...

शौर्य : मेन्शन नॉट.. निघायचं मग?? डेकोरेशन वाला फोन करतोय.. पोहचला वाटत तो आपल्या आधी.. आर्यन बोल ना ह्याच्याशी.. अस बोलत शौर्य आपला फोन आर्यनला देतो.. आणि स्वतः गाडी ड्राइव्ह करतो..

आर्यन डेकोरेशन वाल्याशी बोलतो.. अर्ध्या तासांत आम्ही सगळेच रिसॉर्टवर येतो अस तो डेकोरेशन वाल्याला सांगतो..

जवळपास अर्ध्या तासाने सगळे रिसॉर्टला पोहचतात..

आर्यन : भारी आहे यार हा रिसॉर्ट.. पण स्लाईड कुठेत??

गाथा : हा स्पेसिअली वेडिंगसाठी फेमस आहे.. इथे पिकनिक वैगेरे शक्यतो कमी असते. बिजीनेस फंक्शन, वेडिंग, बर्थडे पार्टी एन्ड ऑल ह्या साठी हा फेमस आहे.. बुकिंग सुद्धा सहजा सहजी नाही मिळत.. आपलं नशीब म्हणुन आपलयाला मिळालं.. 

नैतिक : छान आहे... आपण 3rd पासुन इथेच येतोय ना रहायला..

शौर्य : हो.. पण काम करणार असाल तर.. उगाच त्रास देत बसणार असाल तर अजिबात नका येऊ..

नैतिक : तुला आम्ही कधी त्रास देतो काय शौर्य..?? तु तर आमचा जिगरी यार आहे रे मित्रा.. आम्ही तुला मदतच करू..

शौर्य : राहू दे रे नैतिक नाही तर आता खरच रडु येईल मला तुझं हे मित्र प्रेम बघुन.

ज्योसलीन : आपण सगळेच येऊयात 3rd ला.. रॉब पण येईल..

गाथा : मी पण येईल.. बट रहायला नाही जमणार..  हेल्प करून मी घरी जात जाईल..

शौर्य : नको अग.. आम्ही करू मॅनेज.. तशी आमची गेंग व्हेकेशनमध्ये बिजी आहे.. नाही तर आपल्या गाडीत जागा नसती आता.. तु त्यादिवशी बघितलंच असशील.. नेक्स्ट विकपर्यंत सगळेच येतील.. तस नाही गरज लागणार.. आणि लागली की मी सांगेल तुला..

आर्यन : डेकोरेशन वाला कुठेय??

शौर्य : फोन करून विचारतो थांब..

डेकोरेशन वाला शौर्यला तो कुठेय ते फोन वर सांगतो.. तसे सगळे त्याला भेटायला जातात..

शौर्य आणि गाथा दोघेही मिळुन त्याला त्यांनी ठरवलेल्या डेकोरेशनच्या आयडिया देतात.. डेकोरेशन अजुन कस एट्रेकटिव्ह करता येईल ह्यासाठी बाकीची मंडळी मदत करत असतात.. जवळपास तीन चार तास ह्यात निघुन जातात..

फायनली त्यांनी ठरवल्यापेक्षा सुद्धा खुप छान अस डेकोरेशनची ऑर्डर ते लोक देतात..

शौर्य : हे एक टेन्शन थोडं कमी झालं माझं..

नैतिक : ह्यात कसलं टेन्शन होत..? तु अस बोलतोयस जस तुलाच डेकोरेशन करायच होत.. 

शौर्य : तुला नाही कळणार यार.. जाऊ दे.. वेडिंग आणि रिसेप्शनच डेकोरेशन फक्त लक्षात ठेव म्हणजे झालं.. 

आर्यन : माझ्या आहे लक्षात..

शौर्य : ग्रेट.. आर्यन टीजर किती दिवसात मिळेल?? 

आर्यन : अजुन एक विक तरी लागेल.. 

शौर्य : बर.. तुम्हा लोकांना भूक लागली असेल ना..

सर्वेश : मला तर खुप लागलीय..

गाथा : सर्वेश आपण घरी जाऊन जेवणार आहोत... 

शौर्य : आपण सगळे इथे जवळच एक हॉटेल आहे तिथे जेवुन घेऊयात.. 

गाथा : शौर्य आम्ही जेवु घरी जाऊन..

शौर्य : आपल्या सगळ्यांनाच भुक लागलीय.. आपण जेवुनच जाऊयात घरी.. 

सगळेच एका हॉटेलमध्ये थांबुन लंच करून आपापल्या घरी जायला निघतात..

आर्यन : उद्या पासुन प्रॅक्टिस चालू ना??

शौर्य : मंडे पासुन करूयात..मी बिजी आहे खुप.. इव्हन आत्ता पण मी एकीकडे चाललोय.. कार्ड द्यायला..

नैतिक : दमला नाहीस का तु??

शौर्य : दमलोयरे पण हे कार्ड वाटुन झालेना मग मला बाकीच्या कामात लक्ष द्यायला मिळेल मला.

गाथा : आज आराम कर ना.. उद्या जा..

शौर्य : नको... परत माझं केलक्युलेशन चुकेल.. प्रत्येक दिवशीच टाईम टेबल ठरलंय माझं.. 

गाथा : एक काम करते मग.. मी आणि सर्वेश इथुनच जातो..

ज्योसलीन : मी पण..

नैतिक : आणि आम्ही दोघे तुझ्यासोबत येतो..

शौर्य : मी त्याच रूटने जातोय.. तुम्हा सगळ्यांना घरी ड्रॉप करतो आणि मग मी जातो पुढे.. आणि तुम्ही दोघ पण घरी जाऊन आराम करा..

नैतिक : गाथा तुला काही तरी बोलतोय बघ..

शौर्य : एक मिनिट मी तुला आणि आर्यन ला बोलतोय..

नैतिक : मग तर बोलुच नकोस तु..  आम्ही पण तुझ्यासोबत येतोय..

आर्यन : तस पण घरी जाऊन काय करू आता.. आम्ही पण येतो सोबत..

शौर्य दोघांना काहीच बोलत नाही.. कारण दोघेही आपलं काही ऐकणार नाही हे त्याला चांगलं माहीत असत.. तो शांतच बसतो.. 

नैतिक : SD गाणी लावणं.. झोप यायला लागलीय..

शौर्य : म्हणुन बोललो घरी जाऊन झोप जरा.

सर्वेश : SD म्हणजे??

आर्यन : ह्याच्या नावाचा शॉर्ट फॉर्म.. शौर्यचा S आणि देशमुखचा D..आम्ही कॉलेजमध्ये सगळे ह्याला SDच बोलायचो.. 

सर्वेश : बट जिजूंच सर नेम तर कुलकर्णी आहे ना..??

सर्वेश अस बोलताच शौर्य फ्रंट मिरर मधुन गाथाकडे बघतो.. 

गाथा :  सर्वेश तु शांत बस.. आपण घरी गेलो की मी सांगते तुला.. आणि प्लिज घर येईपर्यंत तोंड एकदम बंद.. ओके..

शौर्य आधी ज्योसलीनला ड्रॉप करतो.. पुढे जाऊन गाथा आणि सर्वेशला..

गाथा : प्लिज जास्त दगदग नको करुस.. आजारी पडशील... मंडे पासुन प्रॅक्टिस आहे आपली...

गाथा अस काळजीच्या सुरात बोलताच शौर्य तिच्याकडे बघतच रहातो..

गाथा : बाय गाईज...

नैतिक आणि आर्यन गाथाला आणि सर्वेशला बाय करतात..

शौर्य : बाय.. 

गाथा : हम्म.. बाय..

आर्यन आणि नैतिकला तो आपल्या सोबतच कार्ड वाटप करायला पाहुणे मंडळींकडे घेऊन जातो..

जवळपास रात्री साडे दहा वाजतात शौर्यला घरी यायला..

विराज अनिता दोघेही त्याची डायनींग टेबलवर वाट बघत असतात..

विराज : कुठे होतास एवढा वेळ.. कधीच फोन ट्राय करतोय तुझा स्विच ऑफ येतोय..

शौर्य खिश्यातुन लिस्ट काढुन विराजच्या हातात देतो..

विराज : काय आहे हे..??

शौर्य : ह्या लोकांकडे गेलेलो कार्ड घेऊन.. आणि आता प्लिज प्रश्न नको करुस.. फोन स्विच ऑफ झालाय माझा..

अनिता : जेवुन तर घे.. आम्ही थांबलोय तुझ्यासाठी..

शौर्य : मम्मा ते सोबत नैतिक आणि आर्यन पण होते.. मग मी त्यांच्यासोबत बाहेरूनच जेवुन आलो.. प्लिज तुम्ही लोक जेवुन घ्या..

एवढं बोलून शौर्य आपल्या रूममध्ये निघुन  येतो.. फ्रेश होतच बेडवर आडवा होतो.. तोच विराज त्याच्या रूममध्ये येतो..

विराज : दमलायस का??

शौर्य : नाही.. ये ना बस... काही काम होत का??

विराज : तुला श्री लग्नात आल्यावर नक्की त्रास नाही ना होणार??

शौर्य : बोललो ना विर नाही होणार.. तु एकच प्रश्न का करतोस

विराज : नाही म्हणजे अनघा बोलत होती की ती श्री सोबत बोलते..

शौर्य : नको.. काही गरज नाही.. माझं मी बघेल.. आणि परत परत नको ना तो विषय..

विराज : बर नाही काढत परत.. पण नक्की ना.. तु ओके आहेस ना??

शौर्य : हो ना विर..

विराज : बर तु झोप आराम कर...

एवढं बोलुन विर तिथुन जाऊ लागतो..

शौर्य : थोडं बोलायच होत विर..

विराज : बोल ना

शौर्य : ते तुझ्या लग्नात मी खुप बिजी असेल ना.. म्हणजे पाहुणे मंडळी पण खुप असतील.. मला तुझ्यासोबत रहायला नाही मिळणार.. तस नैतिक आणि आर्यन तुझ्यासोबत असतीलच तुला हवं नको बघायला.. मी पण असेल.. पण कामाच्या गडबडीत नाहीच जमलं तुझ्यासोबत रहायला तर प्लिज रागवु नकोस..

विराज : तुला काय एवढी काम असणार..आणि मला तु माझ्यासोबतच हवा आहेस.. तसही काम करायला आपल्याकडे नोकर मंडळी आहेत..

शौर्य : पाहुणे मंडळींची उठ बस करायला नको का..?? आणि इतर काम पण असतात.. मम्मा किती काय काय करेल आणि तस ही नैतिक असेल.. तु त्याला हवं नको ते सांग.. आणि प्लिज पेनिक नको होऊस मी दिसलो नाही तर.. मी तिथेच असेल म्हणा.. पण थोडा बिजी असेल.. आणि चेहऱ्यावर थोडं स्माईल ठेवत जा निदान फोटो काढेपर्यंत तरी.. ओके?? आणि रिसेप्शनच्या वेळेला जो डान्स करणार ना त्याची प्रॅक्टिस पण चालु करूयात तुला वेळ भेटेल तसा..

विराज : बर बाबा तु बोलशील तस.. 

शौर्य : आणि विर ते पैसे मी तुला देणार होतो ना ते खर्च झाले.. म्हणजे मी तुला सांगतो नंतर काय काय केलं ते..

विराज : नाही राहू दे.. अजुन लागत असतील तर सांग मला देतो काढुन..

शौर्य : विर तु रागवु नकोस हा माझ्यावर... आणि मला थोडं समजुन घे..

विराज : अस का बोलतोयस??काही झालंय का शौर्य..

शौर्य : अजुन झालं नाही रे पण होईल.. 

विराज : काय बोलतोयस??

शौर्य : म्हणजे... ते तुझ लग्न होतय ना.. मग तु बदललास तर.. म्हणुन बोलतोय.. बाकी काही नाही.

विराज : शौर्य प्लिज हा... मी तुला एक गोष्ट दहा वेळा नाही सांगणार.. माझ्यासाठी तु खुप इंपोर्टन्ट आहेस ते..

शौर्य : बघ तु रागवतोय.. जाऊ दे जा तु इथुन.. मी झोपतो.. गुड नाईट.. बाय.. 

विराज : गुड नाइट.. बाय..

विराज शौर्यला गुड नाईट बोलुन तिथुन त्याच्या रूममधुन बाहेर पडतो..

येणारे सगळे दिवस पत्रिका वाटप करण्यातच जातात.. 

अश्यातच मंडेचा दिवस उजाडतो.. 

शौर्य सकाळी उठुन सगळ्यात आधी रॉबिनला फोन करतो..

रॉबिन : हा शौर्य लक्षात आहे माझ्या.. जस्ट उठलोय यार.. मी फ्रेश होऊन जातो तिकीट काढायला.. 

रॉबिन फोन उचलल्या उचलल्या शौर्यला बोलतो.. आणि शौर्यच काहीही बोलणं न ऐकता फोन कट करतो..

इथे विराज तैयार होऊन शौर्यच्या रूममध्ये येतो..

विराज : निघुयात?? 

शौर्य : तु जास्त तुझ्या आत्यासोबत गप्पा मारत नको बसुस हा.. मला 2 वाजेपर्यंत प्रॅक्टिसला यायचय परत..

विराज : बर बाबा.. तसही मला आणि अनघाला पण आमच्या एक दोन फ्रेंडकडे जायचय.. येताना तिला पिक अप करतो तुला ड्रॉप करतो.. आणि मग पुढे जातो..

दोघेही नवी मुंबईला विराजच्या आत्याकडे जाऊन येतात... 

शौर्य : तु एकटा पण येऊ शकत होता ना विर इथे.. उगाच माझा टाईम वेस्ट करतोस.. 

विराज : तु सोबत असल्यावर थोडं बर वाटत ना.. 

शौर्य : लग्नात तर एकट्यालाच उभं रहायचय तुला.. मी नसणार तेव्हा..

विराज : बाजुला तर उभं रहाशील ना माझ्या..

शौर्य : सवय करून घे रे विर आता माझ्या शिवाय रहायची.. ह्यापुढे तुला अनघासोबतच रहायचय..

विराज : ते नंतरच नंतर बघु..

शौर्य रॉबिनला फोन लावुन फोन सरळ कानाला लावतो..

रॉबिन : अरे शौर्य मी निघतोय यार.. 10th च मॉर्निंगच तिकीट काढायच आहे लक्ष्यात माझ्या. प्लिज तु नको ना टेन्शन घेऊस..

शौर्य : बर बर.. ठेव..

विराज : अरे यार मोबाईल स्विच ऑफ झाला.. शौर्य गुगल मॅप चालु करून तुझा मोबाईल ठेवना समोर..

शौर्य विराजने सांगितल्याप्रमाणे गुगल मॅप चालु करतो आणि मोबाईल विराजच्या समोर ठेवतो..

विराज बोलल्याप्रमाणे अनघा त्याची वाट बघत असते.. 

अनघा गाडीत येऊन बसते... नेहमी प्रमाणे तिघेही गप्पा मारत असतात.. 

विराज शौर्यला घराजवळ सोडतो आणि अनघा सोबत मित्र मंडळींना कार्ड द्यायला निघुन जातो..

अनघा विराजच्या बाजुच्या सिटवर येऊन बसते.. तोच समोर असलेला शौर्यचा फोन वाजतो..

विराज : हा फोन विसरून गेला...

अनघा : रॉबिन.. 

विराज : राहू दे नको उचलुस..

रॉबिनचा फोन वाजुन कट होतो.. परत रॉबिन फोन करतो..

अनघा : बहुतेक काम असेल रे विराज.. उचलुन बोल ना एकदा त्याच्याशी..

विराज : बर उचल आणि स्पिकरवर ठेव..

अनघा फोन उचलत स्पिकरवर ठेवते..

रॉबिन : शौर्य किती वेळ लावतोस यार फोन उचलायला.. बर ऐक 10th तारखेच्या सर्व फ्लाईट फुल आहेत.. 9th रात्रीच काढु का तुझं तिकीट..?? (रॉबिन अस बोलताच विराज गाडी बाजुला घेतो आणि थांबवतो..) अरे बोल ना लवकर शौर्य.. जातोयस 9th ला USA ला.. ?? 10th च फ्लाईट आहे..

विराज आणि अनघा एकमेकांकडे बघत समोर स्पिकरवर असलेल्या फोन कडे बघतात..

(आता पुढे काय?? बघुया पुढील भागात... हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा..)

क्रमशः

©भावना विनेश भुतल

🎭 Series Post

View all